कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2019 - 11:26

फडणवीस भले मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..

पण आता ते गेले !

मुख्यमंत्री भाजपचा होत नाही हे आता नक्की झालेय. झाल्यास तो २.५ वर्षांचाच होईल. म्हणजे महाराष्ट्राला २.५ वर्षांसाठी वा पुर्ण ५ वर्षांसाठी नवा मुख्यमंत्री दिसतो हे जवळपास नक्की आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.

तर आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे निव्वळ रिमोट कंट्रोलच आपल्या हातात न ठेवता आपलेच सुपुत्र आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पुढे करताहेत हे बघणे रोचक आहे. किंबहुना मला ईथे मुंबईत जे वारे वाहताना दिसत आहेत त्यानुसार ९९ टक्के शक्यता हिच दिसतेय.

तर आता प्रश्न पडलाय आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपद वा उप्मुख्यमंत्रीपद निभावू शकतात का?

मला वाटते संधी मिळाल्यास आणि पुढाकार घेत स्वत:हून मिळवल्यास कदाचित होय!

गेल्या काही काळात आदित्य ठाकरेंची बाॅडी लॅन्गवेज कमालीची सुधारली आहे. लोकांमधे ते स्वताहून मिसळत आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना देखील खुप कम्फर्टेबल असतात.
भले सध्या खुप लहान आहेत आणि मुख्यमंत्री पद प्रचंड मोठी जबाबदारी आहे. प्रशासनाचा अनुभव नाहीये त्या लेवलचा. पण अंगात ठाकरेंचे रक्त आहे. नेतृत्व करू शकतातच.

तुम्हाला काय वाटते?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण योग्य आहे आणि सद्यस्थितीत कोण बनू शकते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आता देवरा यांनी शिवसेनेला, आघाडीलाच तुम्ही पाठींबा द्या असं सांगितल आहे. भाजप करणार नसेल स्थापन सरकार तर आघाडी म्हणून आम्ही दुसरे आहोत, आम्ही स्थापन करू.
<<

शिवसेनेची अवस्था धोब्याच्या कुत्र्यासारखी झाली आहे.

Bjp च्या जवळ जवळ दुप्पट आमदार आहेत .
शिवसेनेच्या आमदार पेक्षा.
ज्याच्ये जास्त आमदार त्याचाच मुख्यमंत्री हा नैसर्गिक न्याय झाला.
सेना मुख्य मंत्री पद का मागत आहे.ते पण दुसऱ्याच्या भरवशावर.
त्या पेक्षा स्वतःच पक्ष मजबूत करा संख्या बळ वाढवा न मागता मुख्यमंत्री पद मिळेल.
राजकारण खेळावं तर घाटावरच्या लोकांनीच.
कोकणातील लोकांची जास्त संख्या शिवसेनेत असल्यामुळे ते त्यांना जमत नाही.
काँग्रेस,राष्ट्रवादी वर पश्चिम महाराष्ट्र मधील नेत्यांचा वरचष्मा आहे.
कसं पद्धतशीर वाटून घेवून सत्ता चालवली

आता बहुधा फेरनिवडणुका होणार आणि राम मंदीर या भावनिक मुद्द्यावर सेनेला चारीमुंड्ता चीत करुन भाजप सत्ता स्थापन करणार

राजकारण खेळावं तर घाटावरच्या लोकांनीच.
कोकणातील लोकांची जास्त संख्या शिवसेनेत असल्यामुळे ते त्यांना जमत नाही. > Lol आता रजकरणी देखिल प्रांताप्रमाणे घ्यायचे तर

Bjp नी मान्य केली सेनेची मागणी तर ह्यांच्या कडे कोण व्यक्ती आहे ती ते पद सांभाळू शकेल .
सर्वांना बरोबर घेवून

अहो कोणीही करेल. जसं फडणवीसांनी खडसे, मुंडे, तावडेंना आणि मुख्य म्हणजे शिवसेनेला बरोबर घेऊन कारभार केला, तसाच तर करायचाय.

अहो कोणीही करेल. जसं फडणवीसांनी खडसे, मुंडे, तावडेंना आणि मुख्य म्हणजे शिवसेनेला बरोबर घेऊन कारभार केला, तसाच तर करायचाय.>> Proud

>>> केंद्र सरकार कसं चालतंय बघतोय की आपण गेली साडे पाच वर्ष. सगळा कारभार रामभरोसे. >>>

रामभरोसे असतं तर नेहरूंनी निर्माण करून प्रलंबित ठेवलेल्या अनेक गंभीर समस्या सुटल्या नसत्या, रामभरोसे असतं तर एव्हाना भारताचे अजून काही भाग पाकिस्तान-चीनने बळकावले असते, रामभरोसे असतं तर पाकिस्तानमध्ये घुसून हल्ले केले नसते, रामभरोसे असतं तर कॉंग्रेसी भ्रष्टाचारी तिहारमध्ये गेले नसते . . .

दोन पावले मागे येवून bjp बरोबर सरकार बनवणे हे शिवसेनेच्या फायद्या च आहे .
आता सुधा आणि भविष्यात सुद्धा.
काँग्रेस,आणि राष्ट्रवादी chya पाठिंबा घेवून सरकार बनेल हे नक्की.
पण त्याची किमंत ते दोन पक्ष नक्की वसूल करतील .
आणि त्यांची मन सभाळून सरकार चालवणे सेने ला जमणार नाही .
अर्थ्या वाटेत सत्तेच्या गाडी मधून ठकलून देतील.
तेव्हा तोंड फुटू नाही म्हणजे झाले

>>अहो कोणीही करेल. जसं फडणवीसांनी खडसे, मुंडे, तावडेंना आणि मुख्य म्हणजे शिवसेनेला बरोबर घेऊन कारभार केला, तसाच तर करायचाय.<<

त्यालाच स्कील लागत.... पुरुन उरलेत ते सगळ्यांना Happy

मला सुचलेली एक सिच्वेशन : नाहीतरी उठाचे सगळे निर्णय चुकलेले आहेत, चुकत आहेत. आठाला मनातून असंच काही वाटत असेलच की!तेव्हा आठा नी बापाविरुद्ध बगावत करायची. बीजेपी जी काही १५ - १६ मंत्रीपदं वगैरे देत आहे ते घ्यायचं. मला खात्रीनी वाटतं की सगळे आमदार आनंदानी आठाच्या मागे जातील. ५ वर्षांत काय जे चरता येईल ते चरुन घेतीलच सगळे. आठाच्या या धाडसी कृतीवर महाराष्ट्र खूष असणारच. तेव्हा पाच वर्षांनी शिवसेना बहुमतात नक्की जाईल, मग काय आठा अभिषिक्त सम्राट.
प्रश्न एकच असं होईल का?

काँग्रेस ला तोंड दुखे पर्यंत शिव्या दिल्या.
राष्ट्र वादी घोटाळेबाज म्हणून झाले.
आणि आता त्यांच्या मदतीने सरकार बनवणार
राष्ट्रवादी ,काँग्रेस चे मुरलेले नेते एकाकी पडलेल्या प्रतिस्पर्धी पक्षाला सत्तेचे गाजर दाखवून कात्रज चा घाट
तर दाखवणार नाहीत ना

मुंबै निवासी रा. रा. बाळराजे आणि त्यांचे पिताश्री तसेच प्रातः स्मरणीय बारामती- नरेश यांना भविष्यात दिल्लीश्वर चक्रवर्ती सम्राट नरेंद्र आणि त्यांचे तितकेच पराक्रमी सेनापती यांजकडून होणाऱ्या आक्रमणाला तोंड देण्यास आगाऊ सहस्राधिक शुभेच्छा !

कमळाबाईवर कुठाराघात...

घटस्फोट आणि गर्भपात एकाच वेळी...

एकदम वाईट्ट घडलं...!>>>>>> अय्ययो काय बोलता तुमी. व्यवहारीक दृष्ट्या ठीक असले तरी पुडे जाऊन बगा काय काय होतं ते. बाळराजे किंवा पिताश्री जर बाशिंग बांधुन खुर्चीत बसले तर त्यांना घड्याळ वा हाताची साथ लागेल. मग काही दिवसात काका साथ सोडुन देतील की वो. कारण सत्तेची उब त्यांना खाली बसु देणार नाही की. मंग ते ( काका की वो ) पाठीम्बा काडुन घ्येतील. पाठीत बाण घुसल्याने जराजर्जर अवस्था प्राप्त होईल मग. दिल्ली आणी कर्नाटकात काय झाले माहीत नाही का तुमाला?

कमळाबाई हुषार आहे वो. मुरलेली आहे ती.. अर्ध्या हळकुंडाने पिवळी ओनार्‍यातली नाही बगा ती.

आता कायम स्वरुपी कटुता येईल सेना आणि bjp मध्ये.
महाराष्ट्र मध्ये bjp सेनेची साथ घेणार नाही.
आणि एकटी शिवसेना सत्तेच्या जवळ जावू शकणार नाही.
मोदी आणि पवार हे चाणक्य कधी गळ्यात गळे घालतील ह्याची पण शास्वती नाही

राकांच्याही ५४ जागा आहेत. त्यांनी का मागू नये मुख्यमंत्रीपद?

ज्याची ब्याट बॉल तो क्याप्टन एवढेही विसरलेत.

आजच माझ्या कट्टर शिवसैनिक भावाने एक डायलॉग मारला.

"काँग्रेसचा पाठिंबा घेतला किंवा काँग्रेसला पाठिंबा दिला तर पुढच्या वेळी माझे मत शिवसेनेला नाही"

Bjp नी नकार दिल्या बरोबर राष्ट्रवादी नी भाषा बदलली आहे
अटी आणि शर्ती असाव्यात आणि bjp शी पूर्ण संबंध तोडवेत अस स्टेटमेंट दिले आहे.
सेने नी युती तुटली असे जाहीर केले की राष्ट्रवादी त्यांचे नियम सेनेला समजून सांगतील

बाजूला झाले, उत्तम.

Submitted by Srd on 10 November, 2019 - 19:39 >>>

सहमत , प्रत्येकाला स्वत:ची किंमत व मर्यादा कळण्याची गरज आहे. ते यानिमित्ताने होतंय.

रशियाने कुणाचे तरी थडगे उकरले होते, मग त्यांची महायुद्धात पीछेहाट झाली

शेवटी ते थडगे पुन्हा बांधले, मग रशिया जिंकली,

तैमुर

http://www.documentarytube.com/articles/how-the-curse-of-timur-s-tomb-ch...

तैमुरच्या थडग्याचा शाप

केंद्र मधील युती तोडा मग विचार करू पाठिंब्याचा
इती राष्ट्रवादी
नंतर म्हणाल
Bmc मधील युती तोडा
मग पाठिंबा देतो
त्या युतीचं आणि आता पाठिंबा देण्याचा काही संबंध नाही.
शिवसेनेच्या तोंडातून फेस आणणार राष्ट्रवादी

तैमुरच्या थडग्याचा शाप

नवीन Submitted by BLACKCAT on 10 November, 2019 - 20:39 >>>

अभी येईच सब बोलना तेरे हाथ में है रे मामु..

मुझे तो लगा के ये सब बाबर, तैमूर वगैरा हुरोंके साथ मजे करते रहेंगे.

Pages