कोण होतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2019 - 11:26

फडणवीस भले मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाले होते मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..

पण आता ते गेले !

मुख्यमंत्री भाजपचा होत नाही हे आता नक्की झालेय. झाल्यास तो २.५ वर्षांचाच होईल. म्हणजे महाराष्ट्राला २.५ वर्षांसाठी वा पुर्ण ५ वर्षांसाठी नवा मुख्यमंत्री दिसतो हे जवळपास नक्की आहे.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.

तर आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे निव्वळ रिमोट कंट्रोलच आपल्या हातात न ठेवता आपलेच सुपुत्र आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पुढे करताहेत हे बघणे रोचक आहे. किंबहुना मला ईथे मुंबईत जे वारे वाहताना दिसत आहेत त्यानुसार ९९ टक्के शक्यता हिच दिसतेय.

तर आता प्रश्न पडलाय आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्रीपद वा उप्मुख्यमंत्रीपद निभावू शकतात का?

मला वाटते संधी मिळाल्यास आणि पुढाकार घेत स्वत:हून मिळवल्यास कदाचित होय!

गेल्या काही काळात आदित्य ठाकरेंची बाॅडी लॅन्गवेज कमालीची सुधारली आहे. लोकांमधे ते स्वताहून मिसळत आहेत. प्रसारमाध्यमांसोबत बोलताना देखील खुप कम्फर्टेबल असतात.
भले सध्या खुप लहान आहेत आणि मुख्यमंत्री पद प्रचंड मोठी जबाबदारी आहे. प्रशासनाचा अनुभव नाहीये त्या लेवलचा. पण अंगात ठाकरेंचे रक्त आहे. नेतृत्व करू शकतातच.

तुम्हाला काय वाटते?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण योग्य आहे आणि सद्यस्थितीत कोण बनू शकते?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

राजकारणावरचा आणखी एक धागा ललित लेखनात?
Angry
>>>>
राजकारणात काढला तर त्या त्या पक्षांचे राजकीय अजेंडे घेऊन आलेले तेच तेच लोकं चिखलफेक करत राहतात. सामान्य माणसाला काय वाटते हे त्यात दडून जाते.

मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..

हे फक्त रामसेन्नाच शोभते .. आता तेही गेले .  
असे तारस्वरात किंचाळू नये ..अगदी यायचेच असेल तर पवारांसारखे गपचिप यावे आवाज न करता .  यांचा आवाज ब्रेकिंग न्युज वाल्या नीवेदकाचा .  किती त्रास झाला असेल महा रास्।ट्राला !    आणे एकुण   किती निवे दक सहन करणार एकाच वेळी ..

घातकोपरला अजूनही इथे ट्रेन नाही  मेट्रो नाही काहीच नाही  .    बाहेर पडलो की कचारा.  तो ओलांडला की कशी बशी बस मिळते /  त्या मानाने मुमं ही फार क्षुद्र गोस्ट आहे हो  ..    किती सहन करणार माणूस ..  

वरतून सर्वात मोठे दुख म्हणजे टीवी बघणे कंप  ल्सरी !! 

Admin,webmaster हे राजकारणावरचे धागे योग्य ग्रुपात उघडलेले नसल्याने यांना कुलूप लावा प्लीज.

या धाग्यात तरी राजकारण आणू नका

अच्चा वारेवारेवारेवा .. म्हणजे तुम्ही ललि तात राज कारण आणलेले चालते होय .

ललितात धिंगाना घालायची वेगळी मोड्स आपरेंदी आहे. उदर जाओ .. अभी तुम तुम्हारा ये धोती इधर सुखाने का नए // उधर कोलापूर मे सुखाव

माझी वरची कोमेंट कुणी वाचू नका ..काय राव इथ एकतर सरकार चं टेंश न पडलंय .. यांचे आपले आओ लल्लिता

भरत आपण शिवसेना विरोधक आहात का?
सेनेच्या विरोधात एक धागा ललितातच निघाला आहे तिथे आपण चर्चेत भाग घेत आहात.
या धाग्यात सेनेचा संभाव्य मुख्यमंत्री होतोय हा टोन दिसताच धागा बंद करायची मागणी.
अर्थात धागा राजकारणात हलवल्यास माझी काही हरकत नसेलच. पण नंतरचा धुमाकूळ नकोसा होतो मग..

कस्सला विनोदी धागा आहे Wink
जरा परिस्थितीचे आकलन वगैरे नावाची काही चीज असती का नाही?
शीर्षकात कुणाचा? असा प्रश्न विचारायचा आणि धाग्यात अमक्याचा वगैरे निर्णय देवून टाकायचा Proud

पुणेकर तो निर्णय नाही माझा अंदाज दिलाय.
न दिल्यास तुम्हीच म्हणाल की आधी तुझे लिही मग आम्ही बोलू.
आणि मी दोन अंदाज दिलेत
१) आठा - ५ वर्षे
२) देफ - आठा - २.५ ईच

फडणवीसने राजीनामा दिलाय म्हणजे गेले नाहीत हो. जुन्या मंत्रिमंडळाचा कार्यकाल संपलाय म्हणून.
राज्यपाल सोमवारी मोठ्या पक्षाचे गटनेते म्हणून सरकार बनवायला बोलावतील तेव्हा जाणार आहेतच.
सरकार बनवणार तीन चार मंत्री घेऊन.

पवारसाहेब कालच बोलले "राज्यपाल बोलवत का नाहीत?" हेतू साफ आहे. त्यांचे ५४ भाजपच्या बाजूने वजन टाकणार बहुमत सिद्ध करताना आणि सेनेचा पत्ता कापला जाणार. त्या बदल्यात राकां मागच्या दाराने सत्तेवर पकड घेणार.
राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा. ती पाहणी अधिकारी वर्ग आणि चारही पक्षनेत्यांनी केलेली आहेच.
(या प्रतिसादात ललिता डोकावली नसल्यास माफ करा. मी बोलावलं पण ती येत नै.)

मागच्या दाराने ललिताच्या वेषात राजकारणाने का येऊ नये?
चला हवा येऊ द्या. चारचार पुरुष बायका बनून येतात.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना आता किंगमेकर बनायची जी संधी प्राप्त झाली आहे ते ती साधताहेत असे आजच्या घडामोडींवरून लक्षात येतेय. त्यामुळे नवा मुख्यमंत्री (२.५ किंवा पुर्ण ५ वर्षे) सेनेचाच असेल यातही आता काही गुपित राहिले नाही.

<<

तुम्ही फार मोठे राजकिय अभ्यासक दिसताय.
राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांनी 'आम्ही सक्षम विरोधी पक्षाचे काम करु' असे स्पष्टपणे सांगितल्या नंतरही ५६ आमदार असलेला पक्ष बहुमत सिद्ध करुन, स्वत:चा मुख्यमंत्री बनवून, पाच वर्षे सरकार कसे काय चालवू शकतो, याचे थोडे सविस्तर विश्लेषण करा बरे आम्हा अडाण्यांसाठी.

नाही, शरदला आता कमळ नाही, धनुक्षच बगावे लागेल. तसेही कॉ कुठली का असेना, कोणाचेही सरकार नीट बनु देत नाही. पाठिंबा दिल्याचे नाटक करायचे आणी धपकन पाडायचे अशी महान परम्परा कॉ वाले चालवतात. काये, आता या वयात हरी हरी करायचे तर पोरगी आणी पुतण्या दोघांचे भविष्य बोंबलेल म्हणून पावसात सुद्धा भिजुन का होईना सभा घ्याव्या लागतात. सहानुभुती का काय ते म्हणतात ना ती कामाला आली भिजल्यामुळे. पण एवढा उठारेटा करुन पावसात भिजण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या जमिनी भिजवता आल्या असत्या तर बरे झाले असते ना? नाही, पोरीला फार अनूभव आहे म्हणे शेतीचा. तिचा करोडोचा अनूभव बाकी शेतकर्‍यांना समजावला असता तर त्यांनी आत्महत्या तरी केल्या नसत्या ना !

आठा - मुमं? Are you kidding?
>>>
तसे रीतसर पोस्टर लाऊन जनमताचा अंदाज घ्यायचा प्रयत्न चालू आहे. जर २.५-२.५ वर्षाला मांडवली झाली तर येस्स. नंतरच्या २.५ वर्षात आपण आठा यांना मुख्यमंत्री बघू शकतो.

शिवसेनेने कोणताही निर्णय घेतला तरी तो त्रासाचाच असणार आहे कारण हुकमाचे पत्ते फार लवकर उघड केले.
सद्यातरी असं वाटतंय.

अडीच वर्षांचा खेळ एकदा मायावतीने भाजपाशी खेळलाय. एकदा कुमारस्वामीनी भाजपाशी खेळलाय. दोन्हीवेळा भाजप तोंडघशी पडला होता. मोदींना हे माहित नसेल असे वाटत नाही. त्यामुळे आजा बिजा तिजा होईल अस वाटत नाहीये.

पण एवढा उठारेटा करुन पावसात भिजण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या जमिनी भिजवता आल्या असत्या तर बरे झाले असते ना

Proud

हे करायला फडनविसला एकहाती सत्ता दिली कि पुन्हा

<सहानुभुती का काय ते म्हणतात ना ती कामाला आली भिजल्यामुळे. >

पावसात भिजले म्हणून मतदारांनी राकॉ ला मतं दिली म्हणता? छान छान!

मोदी स्वतःला पवारांचे शिष्य म्हणवतात. २०२४ च्या निवडणुकांत एप्रिल मे महिन्यात ते स्वतःवर सिनेमातल्या सारखा खोटा पाऊस पाडून घेतील बहुतेक.

कधी??

सारक्यास्टिकली बोललो.

म्हणजे फडनविसनेही हे केले नाही म्हणून तर त्याला घालवले

म्हणजे फडनविसनेही हे केले नाही म्हणून तर त्याला घालवले
<<

भाजपा-शिवसेना, युती म्हणून निवडणुक लढली. व जनतेने त्या दोघांना सरकार चालवण्याकरता बहुमत देखील दिले. आता आढ्यातखोर शिवसेनेमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला, तर त्यांना जनतेने घालवले असे कसे म्हणता येईल ?

युती नावालाच होती , बंडखोर होते , स्वतचेही उमेदवार होते,

निकाल आले की पद वाटपाचा प्रश्न येणार , हे माहीत नव्हते ? आणि हे म्हणे आता पुढच्या महापुराचे अन पुढच्या 5 वर्षांचे नियोजन करणार !

आणि नेहरू अन शरद पवारांच्या नावाने गावभर ओरडत फिरत होते

जनतेने त्या दोघांना सरकार चालवण्याकरता बहुमत देखील दिले.
>>>
युतीपूर्व आणि युतीपश्चातही यांचा एकमेकांवर चढाचढीचा कार्यक्रम चालूच होता. त्यामुळे जनता यांना मित्रप्क्ष समजत असतील असे वाटत नाही. दोघांचे आपापले मतदार होते. सोशलसाईटवर तर यांचे समर्थक काँग्रेस राष्ट्रवादी ऐवजी एकमेकांना जास्त शिव्या घालतात. त्यामुळे या दोघांपैकी कोणीही काँग्रेस राष्ट्रवादी पाठिंबा घेत सरकार स्थापन केले तर त्यात फार काही धक्कादायक वा अनैतिक नसेल

बोकलतला करुन टाका मुख्यमंत्री. तसेही त्याने सुचवलेच होते की. भाजप सत्तेत येणार नसेल तर असा विनोदी स्वभावाचा मुख्यमंत्री नक्कीच चालेल. विनोदी दिसणारा सुमीचा नवरा नको हं !

Pages