अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथेला मिळालेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल धन्यवाद. लवकरच दुसरा भयानक पार्ट येणार आहे. हडळ विरुद्ध बोकलत अमानवीय द्वंद्व असं काहीतरी नाव असेल त्या भागाचं.
@मीरा, तुम्ही ती कमेंट का टाकली माहीत नाही पण नकळत तुम्ही कधी दुखावल्या गेला असाल तर माफ करा.

बोकलत, प्लिज तुम्ही सेपरेट धागा काढून लिहा न,तुम्ही खरच छान लिहिता,पण इथे किस्से म्हणून नको तुमचा स्वतः चा धागा काढून लिहा न

लवकरच दुसरा भयानक पार्ट येणार आहे.हडळ विरुद्ध बोकलत अमानवीय द्वंद्व असं काहीतरी नाव असेल त्या भागाचं.>>>
मजा येईल! Proud

मी जातोय बरं का.

Submitted by बोकलत on 9 October, 2019 - 18:47
>>>>>
लहान पोरं रुसले की दर दोन मिनिटांनी समोर येऊन लक्ष वेधायला करंगळी दाखवून कट्टी म्हणतात. तसेच आहे हे. Rofl

बरं झालं माबोवरची घाण गेली. बोकलत एक नंबरचा मुर्ख अक्कलशून्य माणूस आहे. किती वाट लावली या धाग्याची त्यानं. नसलेलाच बरा तो इकडे.

तुम्ही सगळ्यांनी जे भरभरून प्रेम दिलंत त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचं हे प्रेम मला वारंवार इकडे खेचून आणतं आणि साहसी थरारक गोष्टी लिहायला भाग पाडतं. तुमच्या सगळ्यांचा मान राखून मी इथून कधीच कुठे जाणार नाही. जोपर्यंत मायबोली आहे तोपर्यंत बोकलत आहे. लवकरच माझ्या कथेचा पुढचा थरारक भाग इथे टाकेन.

Wink Lol

This is like Boklat ....मला वरची कथा वाचून वाटलं होतं की तुम्ही पण पुड्या बांधायला घेतल्या म्हणून मी वैतागलेच होते. तुमच्या पूर्वीच्या पुड्या मला सॉल्लिड आवडायच्या Proud

Mayबोली
बोkलt
^^^^^^^
बो आणि ल कॉमन आहेत (कोणीही त्यांना बोल / बोलू नको असे नाही म्हटले तरी ते बोलणारच आहेत) अर्थात बोकलत आणि मायबोली अभिन्नच आहेत त्यामुळे ते कधीच मायबोली सोडून जाऊ शकत नाहीत आणि तसेच आम्हीही कधी बोकलतना ह्या धाग्यावरून सोडु शकणार नाही.
विषय संपला Proud

हा अनुभव नक्की कशात मोडतो मला माहित नाही,
पण माझ्या आईला सकाळी सहाच्या दरम्यान स्वप्न पडले त्यात तिने तिच्या भावाच्या म्हणजे माझ्या मामाचा मृतदेह व अंतिम संस्कर वगैरे क्रिया पहिल्या,अगदी घाबरी घुबरी होऊन तिला जाग आली,असे काही नसणार त्याचे आयुष्य वाढेल अजून(असा एक समज आहे ,ज्याचे प्रेत दिसते त्याचे आयुष्य वाढते) अशी प्रार्थना करून ती स्वप्नं विसरून रोजच्या कामाला लागली आणि 10 वाजता अगदी अचानक जवळपास 40 वर्षे वयाचा मामा अपघातात गेला म्हणून फोन आला

असे स्वप्न पडल्याचे त्यांनी फोन येण्याआधी कुणाला सांगितले होते का? डायरीमध्ये वगैरे टाईमस्टँप टाकून लिहून ठेवले होते का?

हा अनुभव नक्की कशात मोडतो मला माहित नाही, >> ट्रॉमॅटिक ईवेंटनंतर मेमरी/मेंदू स्थळ काळाचे रेफरंसेस मिक्स अप करतो.
९११ अनुभवलेल्या हजारो लोकांनी त्यांना जस्ट काही काळ आधीच ईमारतीला विमाने धडकण्याची स्वप्ने पडली होती असे छातीठोकपणे सांगितले.
काही लोक जे वर्ल्ड ट्रेड सेंटर च्या ईमारतींमध्ये कधी मधी कामानिमित्त जात ते 'विमाने धडकली मी तिथेच होतो असे झाले तसे झाले" वगैरे सांगू लागली. ह्याचा अर्थ ते खोटे बोलतात असे नाही पण ट्रॉमामुळे मिडिआमध्ये बघितलेले हे 'अनुभव' असे वर्गीकरण त्यांच्या मेंदूने करून ठेवले आहे. त्यामुळे "तुम्ही तिथे नव्हता" असे त्यांना सांगितले तरी त्यांचा विश्वास बसत नाही.

हा अनुभव नक्की कशात मोडतो मला माहित नाही>>सेम अनुभव आलाय मला घटस्थापनेच्या दिवशी. ज्या जवळच्या नातेवाईका बद्द्ल स्वप्न पडलं होतं सकाळी ते त्याच दिवशी संध्याकाळी 5 वा. हार्ट अटॅक ने गेले.

त्याची कुणीतरी घंटी वाजवलीय या ग्रुप वर. म्हणून फ्रस्ट्रेशन काढतोय इथे, ड्यू आयडी वरून ग्रुप ची वाट लावत बसलाय. त्याला इग्नोर मारा रे, मग स्वतःच्या घाणीत स्वतःच घुसमटून गायब होईल.

s1.JPG
------------
s2.JPG
------------
s3.JPG
------------
s4.JPG
------------
s5.JPG

Pages