माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्यांदाच इथे विचारते आहे. कधी नव्हे ते काल इडली चं पीठ घरी भिजवले, पण उबदार जागी ठेवूनही ते अजून फुगले नाहीच, मला जेवायला आत्ता इडल्या करायच्या होत्या. आता काय करू? Without fermentation त्याचे आता दगड होतील. कुणाकडे काही उपाय?

नाही डोसे नाही इडल्याच करायच्या आहेत. इनोच आलं होतं डोक्यात पण अजून काही उपाय कुणाला माहीत असेल तर त्यासाठी विचारलं . पण थँक्स अंजु

अजून काही उपाय कुणाला माहीत असेल तर त्यासाठी विचारलं>>>वरून सोडा/इनो घालून पीठ फुगवून घेण्यापेक्षा दुसरा उपाय माहीत नाही,बहुतेक नसावाचं, पण सोडा वगैरे घालून पण इडल्या तेवढ्या हलक्या होत नाहीत असा माझा अनुभव आहे

इडल्या पीठ या हवेत पटकन फुगत नाही.
इथल्या टिपा आणि कुकर चा वाफ निसटण्याचा प्रॉब्लेम घालवणे कृपे करून शुक्रवारी राजमा एकदम मऊ शिजला.
आज परत एकदा वड्या साठी उडीद थोडाच वेळ भिजवले आहेत.सर्व सुखरूप पार पडेलच.

पण सोडा वगैरे घालून पण इडल्या तेवढ्या हलक्या होत नाहीत असा माझा अनुभव आहे >> exactly
दह्याचं माहीत नव्हतं पण आता काही उपयोग नाही, पाऊस आणि थंड हवा यामुळे फुगलं नसावं, असो आता इनो !

शेजवान इडली चिली हा चांगला पर्याय आहे.कितीही दगडी इडली असेल तरी छोटे भाग करून आलं, लसूण, मिरची,कॅप्सिकम,कांदा,गाजर,चिंग्स शेजवान चटणी हे सर्व परतून त्यात इडल्या लहान तुकडे परतून गरम गरम मस्त लागतं.

मस्त, छान आयडीया करुन सुगरणपणा दाखवलात. विकतचं बॅटर आयडीया मस्त. इनो घालून हलक्या होतात, हा माझा अनुभव आहे म्हणून लिहीलेला, अर्थात हे पीठ नीट नसेल झालं तर, आदरवाईज इडल्या अशाच हलक्या होतात.

कधी फसल्या तर फोडणीला घालून परतून फ्राय इडली करायची.

बेकर्स यीस्ट (ड्राय) घालून पीठ लवकर आणि छान फर्मेंट होते. इडलीसाठी नाही केलंय (इडली आवडत नाही म्हणून) पण उत्तपा, डोसा ह्यासाठी नेहमी चिमुटभर वापरलं जातं घरी.

आता प्रतिसाद देऊन उपयोग नाही ,खूप उशीर झालाय हे कळतंय .. पण तरी कदाचित पुढच्यावेळी उपयोगी पडेल म्हणून सांगते .
इडलीच्या पिठात मधोमध अर्धा कांदा खुपसून ठेवायचा आणि झाकण ठेवायचं भांड्यावर . मग पीठ फुगायला खूप मदत होते . मी असा अनुभव २-३ दा घेतलाय

इडलीच्या पिठात मधोमध अर्धा कांदा खुपसून ठेवायचा आणि झाकण ठेवायचं भांड्यावर . मग पीठ फुगायला खूप मदत होते . मी असा अनुभव २-३ दा घेतलाय >> उगीच विचारते पण ................... सगळ्या पिठाला कांद्याचा वास येत नाही का ?

सगळ्या पिठाला कांद्याचा वास येत नाही का ?>> अगदी याच भीतीने मी खूप दिवस हे टाळत होते पण कांद्याचा अज्जिबात वास येत नाही .. काळात हि नाही कि अशी ट्रिक केली आहे ..

कांद्याच्या चकतीने आम्ही, बीडाचा तवा तेलाने पुसतो त्याने आंबोळीला छान चव पण य्तेते.
कांदा नकोच असेल तर, तिखट हिरवी ताजी मिरची मध्ये कापून पीठावर अलगद ठेवून झाकण ठेवायचे. मस्त फुगते पीठ. सकाळी मिरची काढून पीठ ढवळून घ्यायचे. मीठ सुद्धा सकाळीच घालावे जर थंडी असेल तर.
टेंशन नहि लेनेका, टेंनशन इडली को देनेका की, देख उप्पर आने का मंग्ताईच है सुब्बे को. Happy

तिखट हिरवी ताजी मिरची मध्ये कापून पीठावर अलगद ठेवोन झाकण ठेवायचे. मस्त फुगते पीठ>> अरे वा हे पण मस्तय .. नव्हतं माहिती . आता भिजत घालायलाच हवं पीठ विथ मिरची Happy

मंजूताई,
हे वाचा,
>>मिरची मध्ये कापून पीठावर अलगद ठेवून झाकण ठेवायचे. मस्त फुगते <<

मिरचीची फोडणी नाही ओतायचीय पीठात. Wink

तिखट हिरवी ताजी मिरची मध्ये कापून पीठावर अलगद ठेवोन झाकण ठेवायचे. मस्त फुगते पीठ> मस्त टीप! हे केलं नाहीये कधी; पण दह्याच्या बाफ वर विरजण नसेल तर दूध या पद्धतीने विरजता येतं असं वाचल्याच आठवतय. हेच कारण असेल.

अरे वा भरपूर टीपा मिळाल्या. कांदा आणि मिर्चीचं माहिती नव्हतं आधी. पुढल्या वेळी लक्षात ठेवेन. कारण मला somehow इनो टाकणं मनाला पटत नव्हतं, त्यामुळे हे जरूर try करेन.
बादवे या एका query मुळे माझ्यासारख्या अनेक जणींना घरी पीठ भिजवून इडल्या करायचा हुरुप नक्की वाढला असेल...

अरे वा भरपूर टीपा मिळाल्या >>> टीपी करत टिपा मिळाल्या Wink . आता टिपून ठेवा सर्वांनी.

टीप टीप बरसा पानी, पानीने वाट लगायी ( पीठ फुगलेच नाही ).

निंबे हन्निना गोज्जू (लेमन गोज्जू) - हे केलं आणि आज तीन दिवस झालेत. कडसरपणा कमी झालाय पण बर्‍यापैकी आहेच अजूनही. कश्यामुळे झालं असेल? लिंब, मोहोरी, जास्त भाज ल्यामुळे का अजून कश्याने? आणि हे दुरुस्त होइल का?

निंबे हन्निना गोज्जू (लेमन गोज्जू) - हे केलं आणि आज तीन दिवस झालेत. कडसरपणा कमी झालाय पण बर्‍यापैकी आहेच अजूनही. कश्यामुळे झालं असेल? लिंब, मोहोरी, जास्त भाज ल्यामुळे का अजून कश्याने? आणि हे दुरुस्त होइल का?
चुकुन लिंबाची बी शिजली असेल का? नाहीतर मग मेथ्या जास्त झाल्या असतील !

आज प्लम केक उर्फ रेझिन केक चा पोपट झाला.
मल्टी टास्किंग करत मुळ्याचे पराठे,कोथिंबीर वडी आणि हा केक असं चालू होतं.मैदा, 1 चमचा कणिक, कोको पावडर, पिठी साखर, फ्रिज मधले बेदाणे असं सगळं मिसळून ओव्हन प्रीहिट करून ऐन वेळी पटकन चिमूटभर बेकिंग पावडर टाकून ओव्हन ला 230 डिग्री 9 मिनिट ठेवलं.वरचा क्रस्ट मस्त लागत होता.पण आत पातळच.(बहुतेक दूध जास्त पडलं.किती वगैरे विचारू नका.अंदाज पंचे टाकलं होतं.)
तरी जिद्द न हरता जॅक द रिपर किंवा रामन राघवन सारखं झालेल्या प्रकाराला सुऱ्याने सगळीकडे भोसकून मोल्टन लाव्हा बाहेर काढून परत 5 मिनिट ठेवला.आता वरचा क्रस्ट खमंग, आत बऱ्यापैकी चांगला शिजलेला केक असं काही तयार झालंय.चव जबरा आहे.पण सर्व बेदाणे खालीच जाऊन चिकटलेत.
(हौशी लहान मंडळींना विश्वासात घेऊन हा प्रकार आईस्क्रीम खाली दडपून कसाटा म्हणून देणे हा प्लॅन बी आहे.प्लॅन ए त्यांना चमचे घेऊन तसाच आवडला तर खायला लावणं.पण सगळं सच्चाई का रास्ता अपनाते हुवे.मोल्टन चोको लावा केक म्हणून त्यांना देण्याइतकी मुलं निरागस(चंपट) राहिली नाहीत.)

Pages