निंबे हण्णिन गोज्जू (लेमन गोज्जू)

Submitted by योकु on 11 November, 2019 - 12:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

स्वयंपाका या यूट्युब चॅनल वर ही रेसीपी आहे. आणि जशीच्या तशी केली; पहिल्यांदाच केली म्हणून. तर साहित्य -
४ लिंब (स्वच्छ धूवून पूसून एकाचे ८ भाग करून; बिया काढून टाकणे)
एक चमचा मोहोरी
एक चमचा जिरे
अर्धा चमचा मेथ्या
१०/१२ बेडगी मिरच्या
चवीनुसार (अर्थात लोणचं टाईप आहे म्हणून जरा जास्त) मीठ
बर्‍यापैकी प्रमाणात (तरी ४ टेबली चमचे) गूळ
दीड कप पाणी
४ टेबली चमचे तेल आणि अर्धा अर्धा चमचा मोहोरी, जिरे फोडणीकरता

क्रमवार पाककृती: 

चिरलेली लिंब दीड कप पाण्यात शिजत घालावीत साध्याच पातेल्यात
मोहोरी, जिरं आणि मेथ्या कणभर तेलावर भाजून मिक्सर च्या पॉट मध्येच घ्यावेत सरळ. अश्याच मिरच्याही भाजून त्याच पॉट मध्ये घ्याव्यात.
लिंबं शिजली असतील एव्हाना किंवा अजून एक पाच मिनिटं शिजू द्यावीत आणि जरा गार झालीत की पाण्यासकटच मिक्सर च्या त्याच पॉट मध्ये घ्यावीत.
चवीनुसार मीठ घालावं आणि हे प्रकरण बारीक वाटावं. यातच गूळ घालावा आणि अजून एकदा मिक्सर फिरवावा.

गोज्जू एखाद्या भांड्यात काढून वर ४ टेबली चमचे तेलाची मोहोरी जिर्‍याची फोडणी द्यावी.
गोज्जू तयार आहे. पोळीबरोबर वरण भाताबरोबर चांगला लागतो.

वाढणी/प्रमाण: 
गोड लोणचे प्रकार आहे.
अधिक टिपा: 

रेस्पीत सांगितल्यानुसार पहिल्या दिवशी जरा कडसर लागू शकेल पण नंतर कडसरपणा कमी होईल.

माहितीचा स्रोत: 
सयंपाका युट्युब चॅनल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा तर आता माकाचु प्रश्न -
हे केलं आणि आज तीन दिवस झालेत. कडसरपणा कमी झालाय पण बर्‍यापैकी आहेच अजूनही. कश्यामुळे झालं असेल? लिंब, मोहोरी, जास्त भाज ल्यामुळे का अजून कश्याने? आणि हे दुरुस्त होइल का?

योकु, मेथी जास्त वाटत आहे रे. आणि लि म्ब पातळ सालीची होती का ? जाड सालीची असतील तर कडु होत. दुसरं म्हणजे बिया वाटल्या गेल्या का सालांबरोबर. बिया काढण मस्त आहे. Happy

आमच्या घरी हे नेहमीच असते. आम्ही साखर घालुन किंवा निम्मा गुळ्/साखर घालून करतो खरं.

मस्त होतं हे लोणचं. दही भात किंवा साधं वरण भात या बरोबर पर्फेक्ट तोंडीलावणं.

( तेवढं हण्णिन गोज्जू करशील का ? हण्णू म्हणजे न पिकलेलं फळ, काई/ कायी म्हणजे पिकलेलं फळ - बाळे हण्णू - हिरवं केळं, बाळे कायी - पिकलेलं केळं )

मेधा वर केला बदल.

सीमा, लिंबांमधल्या बिया काढल्या होत्या. पातळ सालीचीच होती आणि लिंबं. Uhoh

पाकृची फोटो देण्याची नियमित सवय लावल्याने बनवलेल्या जिन्नसात कडसरपणा येत नाही, आल्यास लौकर जातो असे ऐकून आहे.

हण्णू म्हणजे न पिकलेलं फळ, काई/ कायी म्हणजे पिकलेलं फळ >> नाही, उलटं आहे. हण्णु म्हणजे पिकलेलं, कायि म्हणजे कच्चं.

रेसिपी छानच. मलाही वाटतंय की एखादी बी राहिली असेल त्यामुळे कडू लागत असेल.

छान आहे मुख्य म्हणजे घरी सर्व घटक पदार्थ आहेत. करण्यात येइल. कडसर पणा साली मुळे / बिया वाटल्या गेल्याने असेल. शिजलेली लिंबे परत मिक्सर मधून का काढायची बाकी सर्व कुटुन घेउन लिंबाबरोबर मिक्स करता येइल. किंवा बाकी सर्व मिक्स र मधून काढून मग दगडी खलबत्त्यात लिंबा बरोबर अ‍ॅड करून हलक्या हाताने कुटुन घ्या. मिक्सर फार पावर फुल असल्याने लिंबाच्या सालीतले आतले बिटर तेल पण निघून पदार्थात मिक्स होत असेल.

वर लिहीले आहे तसे मेथीचे प्रमाणही कमी करून बघता येइल.

मोहोरी मुळे पण कडू - उग्र लागू शकते! मोहरी कमी घ्यावी असे वाटते...किंवा मोहरीची डाळ घ्यावी का?
कारण वाटलेली मोहोरी हमखास कडू लागते. मला कुणीतरी काकडीच्या कोशिंबीरीतही मोहरी वाटून घालायला सांगितली होती.............तर कडूजार कोशिंबीर खाववेना अगदी!
Happy

हण्णु म्हणजे पिकलेलं, कायि म्हणजे कच्चं. >> हे बरोबर आहे. माविनहण्णू म्हणजे आंबा आणि माविनकायी म्हणजे कैरी. आमच्याकडे चिपळूणला काही कानडी लोक राहतात.

मोहरी मिक्सर पेस्ट/ लिंबाच्या बियामुळे कडू लागत असणार.. मी असं लोणच करताना मोहरी वापरत नाही, वरून पुन्हा फोडणी नाही.. बाकी सेम स्टेप्स Happy

योकू, मोहरी नाही घालत रे आम्ही कधी. पहिल्यांदाच ऐकती आहे मी. काल मी वाचलं साहित्य तेव्हा मला मोहरी फोडणीत घालतोय अस वाटलं.
याला खरतर मेथी, हिंग , साखर , लिंबु,लाल तिखट आणि मीठ एवढच बास होत. लिंब जर ताजी , रसाळ आणि पातळ सालीची असतील तर शिजवायची पण गरज नाही.

हं तर मोहोरी इस द गाय... माझा कयास होता खरतर. आता टाकून देइन ते प्रकरण. मला नाही वाटत दुरुस्ती होइल त्यात म्हनॉओन///

तर मोहोरी इस द गाय... माझा कयास होता खरतर. आता टाकून देइन ते प्रकरण. मला नाही वाटत दुरुस्ती होइल त्यात म्हनॉओन///>>>>टाकून देणार? त्यापेक्षा तसंच ठेवलं तर मुरल्यावर चांगलं लागेल कि.

अजून नाही.
फ्रिजात गेलंय कुठेतरी मागे. पाहू अजून एखाद दिवस वाट...

Yoku for new recipe do a small trial batch first then take the final required volume. After adjusting all ingredients and quantities.