Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शिवानी आल्यामुळे वीणा पुढे
शिवानी आल्यामुळे वीणा पुढे आली असं एकवेळ मान्य केलं तरी शिवानी आल्यावर नेहाचं तिच्यापुढे दबून राहणं (तेही शिवानी तिच्याशी जसं वागते ते पाहता...) तिच्या मागे जाण्याचं कारण आहे.
वीणाचा सूर सुरुवातीपासून आहे तोच राहिला आहे.
नेहाने आल्या आल्या चढा सूर लावला. सगळ्यांनी पंचिंग bag केलं आणि तिचा सूर खाली आला.
सुरुवातीला agression मध्ये ती वरचढ होती पण जसे जसे लोक तिच्या agression ला agression ने उत्तर मिळाल्यावर तिचा सूर खाली आला. सातबारात किशोरी, शिव अनेकदा..., आता शिवानी...
परागच्या बाहेर जाण्याला
परागच्या बाहेर जाण्याला कारणीभूत असणारे वैशाली,केळकर बाहेर गेले.अगदी माधव,हीना जरी कारणीभूत नसले तरी त्यावेळी नेहाच्या टीममध्ये होते,तेही बाहेर गेले.
परागनेही बाहेर आल्यावर बिबॉसचा खेळ चालूच ठेवला आणि प्रेक्षकांची सहानुभूती स्वत:कडे आणि राग नेहाकडे वळवला,ज्याची बिबॉसने आणि चँनेलने कल्पनाही केली नसेल
नेहाविरोधी प्रचंड वातावरण तापवल परागने,त्यात शिवानीने माधवच्या जाण्याला नेहाला कारणीभूत ठरवून नेहा नाटक करते कँमेर्यासमोर अस चित्र उभ केल,तेव्हापासून नेहा पूर्णपणे बँकफूटवर गेली.
शिवानी,वीणा ,शिव, बिचुकले टीआरपी थोडातरी देतच होते,म्हणून बिबॉसने नेहाकडे दुर्लक्ष केल असाव वीकएंडच्या डावात पण ती असून नसल्यासारखीच होती.
शिव वीणाच हवेत टॉप २ ,
शिव वीणाच हवेत टॉप २ , डिझर्विंग म्हणून आणि खूप नाट्यमय करता येईल हे बिबॉला म्हणुन

दोघांनी फिनालेलाही मॅचिंग कपडे घालणे, एकत्रं लाइट बन्द करणे, शेवटी म.मा पुन्हा एकदा विचारतील शिवला कि आत्ताही ट्रॉफीचा त्याग करशील का वीणेसाठी , शेवटी विनर अनाउन्स करताना ममा एका हतात शिवचा आणि दुसर्या हतात वीणाचा हात घेऊन भरपूर टीपी करणार कोणीही जिंकल तरी शिव वीणाला स्टेजवर उचलून घेणार , तसेच दुसर्या दिवशी गणपती बसणार, त्यामुळे शिवच्या फेमस ‘गणपती बाप्पा मोरया‘ आरोळीने सिझन संपवण्यासारखा चांगला शेवट बिबॉला मिळणार नाही
एबीपी माझावर दिसलेलं पत्रकार
एबीपी माझावर दिसलेलं पत्रकार परिषदेतलं नेहाचं शेवटचं वाक्य बिग बॉसनी दाखवलं नाही.
शिवानी आल्यामुळे वीणा पुढे
शिवानी आल्यामुळे वीणा पुढे आली असं एकवेळ मान्य केलं तरी शिवानी आल्यावर नेहाचं तिच्यापुढे दबून राहणं (तेही शिवानी तिच्याशी जसं वागते ते पाहता...) तिच्या मागे जाण्याचं कारण आहे.>>> हे मान्य. इथे तिने खरा तोडीस तोड स्टँड घ्यायची गरज होती.
>>नेहाने आल्या आल्या चढा सूर लावला. सगळ्यांनी पंचिंग bag केलं आणि तिचा सूर खाली आला.>> इथे असं म्हणावं लागेल की तिला तिचा अती self consciousness नडला. जेव्हा जेव्हा तिला वीकेन्डच्या डावात सुनावलं गेलं तसंच तिच्या खुनशी लूक्सवरुन हिणवलं गेलं तेव्हा तेव्हा तिने स्वतःमधे बदल करायचा प्रयत्न केला व तिथेच चुकली. याचं सगळ्यात मस्त उदाहरण म्हणजे UP म्हणतात ते शिवानीने माधवच्या जाण्याला नेहाला कारणीभूत ठरवून नेहा नाटक करते कँमेर्यासमोर अस चित्र उभ केल,तेव्हापासून नेहा पूर्णपणे बँकफूटवर गेली.
अजबच्या पोस्टला पूर्ण अनुमोदन
अजबच्या पोस्टला पूर्ण अनुमोदन!
मी इथेच आधी कधीतरी म्हणालो होतो.... शिवानी व्हिलन/व्हॅंप बनतीय तर तिच्याविरुद्ध उभे रहाणारे कुणीतरी हिरो होणारच.... ती संधी वीणाने साधली!
शिवानीने नेहालाही ती संधी दिली होती पण नेहाने अनपेक्षित रित्या नमते घेतले!
त्यात घरात येणाऱ्या जुन्या सदस्यांनी त्यांच्या मैत्रीचे पोवाडे गायले आणि वरतुन पुन्हा दोघीनाच फिनाले तिकीट मिळाले (ज्याला प्रत्यक्षात काहीच अर्थ नव्हता.... उलट फुकटचा रोष वाट्याला आला) मग भांडायला तसे काही कारणही उरले नाही!
असो!
तरीही नेहाच आवडती आहे!
आजच्या पत्रकार परिषदेत शिव आणि आरोहची उत्तरे आवडली.... शिवचा आजचा एकंदर वावरच क्यूट होता!
किशोरी आजही सगळ्यात प्रभावहीन वाटली!
त्या एका पत्रकाराने शिव आणि नेहाच्या नावाची बाहेर टॉप २ म्हणून चर्चा आहे म्हंटल्यावर नेहा परत फॉर्मात आल्यासारखी वाटली आणि शिवानीचा चेहरा उतरल्यासारखा वाटला
प्रमोशनल टास्कमध्ये मात्र सगळेच काहीच्या काही ओव्हरॲक्टींग करतात!
दीपांजलींंच्या रिसेंट पोस्ट्स
दीपांजलींंच्या रिसेंट पोस्ट्स sarcastic वाटताहेत
शिवानीने माधवच्या जाण्याला
शिवानीने माधवच्या जाण्याला नेहाला कारणीभूत ठरवून नेहा नाटक करते कँमेर्यासमोर अस चित्र उभ केल
>>>खरे आहे ते. जुने एपिसोड परत बघितले कि कळते.
प्रत्येकाची एव्ही दाखवली का़
प्रत्येकाची एव्ही दाखवली का़
पत्रकार परिषदेत वाटले तेवढे
पत्रकार परिषदेत वाटले तेवढे फटाके फुटले नाहीत. प्रोमो मधे मुद्दाम मिसलिडींग वाक्य एकामागोमाग दाखवतात. विणा आणि शिवानी मधले बरेच वाद मिटल्यासारखे वाटले कारण बिचूकले गेल्या नंतर दोघीजणी एकमेकींच्या गळ्यात पडल्या होत्या. आणि प परिषदेत मध्ये शिवानी म्हणाली सुद्धा माझ्या बाजूने भांडण मिटलं (मला खरंतर आश्चर्य वाटलं, हे अपेक्षित नव्हतं शिवानी कडून)
शिव खुपच आवडला नेहमीसारखा प्लेझंट. विणापण आवडतेच.
App वरून वोट कसे करायचे ते
App वरून वोट कसे करायचे ते कोणी स्टेप बाय स्टेप समजावून सांगेल का? मला वोटिंग ऑप्शन सापडत नाहीये
App वरून वोट कसे करायचे ते
App वरून वोट कसे करायचे ते कोणी स्टेप बाय स्टेप समजावून सांगेल का? मला वोटिंग ऑप्शन सापडत नाहीये
वूटवर जा,बिगबॉस मराठी सिझन
वूटवर जा,बिगबॉस मराठी सिझन 2वर जा ,तिथू मराठी जत्रा वर क्लिक करा,रजिस्टर करा ,मग ऑप्शन्स दिसतील.
दीपांजलींंच्या रिसेंट पोस्ट्स
दीपांजलींंच्या रिसेंट पोस्ट्स sarcastic वाटताहेत

<<
वर स्वरुपने बरोब्बर लिहिलय, शिवानीने हिरो बनायची संधी नेहालाही दिली होती पण तिने तह केला येड्यासारखा, सिंपथी घेऊन एकटी पडून इंडीव्ह्ज्युअल खेळायच्या ऐवजी पूर्ण बॅकफुटवर गेली आणि जेंव्हा कधी बोलली ते निगेटिव वाटेल असेच बोलली , त्यात शिवानीने पॉइंटाउट केल्या प्रमाणे खरोखरच तो कॅमेरा पाहून रडायचा ड्रामा, शिवानीची संगत सगळच निगेटिव गेलं !
वीणाला चांगले मुद्दे मांडता येतात,तिचा सेल्फ रिस्पेक्ट , तिने घेतलेले स्टँड हे केवळ शिवानी-नेहा या २ लाउड अनॉयिंग बायका व्हिलन झाल्यामुळे उठून दिसले, ती अचानक पॉझिटिव झाली .
हीच वीणा मला जुई गडकरी पेक्षा अनॉयिंग वाटायची अगदी अत्ता अत्ता पर्यंत, पण गेले २ आठवडे, आयॅम इंप्रेस्ड !
इन शॉर्ट पब्लिकने कितीही शिव्या घतल्या तरी शिवानीने खरच कलाटणी दिली गेमला.
हीच वीणा मला जुई गडकरी पेक्षा
हीच वीणा मला जुई गडकरी पेक्षा अनॉयिंग वाटायची अगदी अत्ता अत्ता पर्यंत>>>याला +१११
पण गेले २ आठवडे, आयॅम इंप्रेस्ड ! Biggrin>> मी मात्र इम्प्रेस्ड वै नाही पण सहणेबल नक्कीच झालीये ती सध्या.
नेहा फार कोणाला आवडत नाहि
नेहा फार कोणाला आवडत नाहि कारण तिचं वागणंच तसं आहे. ती खोटं चांगलं वागायचा प्रयत्न करते पण जमत नाही. आता लेटेस्ट म्हणजे ज्या शिवच्या मांडीवर बसली, त्याला कुशीत घेऊन लॉनवर पहुडलेली, त्यालाच म्हणते मला हात लावू नको. हे सगळं बाहेर लोक पिक अप करतात व कमेंट करतात. किशोरीला एकटं करुन छळण्याचा बेत होता पण शिवानी वीणा बिचुकले तिघे किशोरीसोबत असल्याने नेहाचं काहि चाललं नाही.
कायम खुनशी भाव असतात तोंडावर
विनर तर शिव च असनार आहे.
विनर तर शिव च असनार आहे. दोन आणी तिन नंबर वर कोण असेल याची उत्सुकता आहे मला.
नेहानी बरेचदा वुमनकार्ड खेळली
नेहानी बरेचदा वुमनकार्ड खेळली आहे, टास्क क्वीन वगैरे म्हणतात तिला , डोक्यानी आहे ती शार्प पण हिना आणि शिव तिच्यापेक्षस बेटर टास्क्स करतात.
टास्कमधे मेल काँटेस्टन्ट्सनी फिजिकल झालेलं/हाताचे बोटही लागलेलं आवडत नाही अशी ऋतुजा धर्माधिकारी होती मागच्या सिझनला, हिन्दीमधे दीपिका, पण मग त्या स्वतः त्यांच्याकडून तसं वागायच्या नाहीत, दीपिका तर टास्क सोडून बाजुला निघून जायची अशी वेळ आली तर.
नेहा मात्रं स्वतः जे काय करता येईल ते करते आणि तिच्यावर वेळ आलीकि मात्रं कांगावा करते त्यामुळे फेअर वाटत नाही तिचा गेम.
असो!
असो!
तरीही नेहाच आवडती आहे!>> @स्वरुप, +१११
सनव भारी आहे फोटो, काही अजून
सनव
भारी आहे फोटो, काही अजून बोलायची गरजच नाही
बादवे, मी केलं वोट, शिव ५०
बादवे, मी केलं वोट, शिव ५० विणा ४९
बादवे, मी केलं वोट, शिव ५०
बादवे, मी केलं वोट, शिव ५० विणा ४९
<
अरे, असं करु नका ! आता फक्त तुमच्या आवडत्यालाच वोट करा, २ मधे नका डिव्हाइड करु.
नाहीतर शिवला नुकसान होईल.
नेहा आवडणारे पुणेकर असावेत
नेहा आवडणारे पुणेकर असावेत फक्त.
पुणेकरांनी कधी पुष्कर किंवा
पुणेकरांनी कधी पुष्कर किंवा अस्तादला नाही वोट केलं, नेहाला सुध्दा केवळ पुणेकर म्हणून वोट करणारे असतील असं वाटत नाही !
, असं करु नका ! आता फक्त
, असं करु नका ! आता फक्त तुमच्या आवडत्यालाच वोट करा, २ मधे नका डिव्हाइड करु.
नाहीतर शिवला नुकसान होईल.>>>अर्रर लक्षात नाही आलं, पण आता मी माझ्या मुलाला सांगितलय तो शिवला ९९ मतं देतोय. थँक्स डिज्जे
मी शिवला आणि विणालाच विभागून
मी शिवला आणि विणालाच विभागून दिले. धनुडीपेक्षा शिवला चार जास्ती आणि वीणाला चार कमी. दिलका मामला, दोघांना द्यावीशी वाटत होती.
मला बोअर झालं आजही. शिव, वीणा, आरोह छान बोलले. वीणाने उगाच गुडी गुडी काही उत्तरं दिली नाहीत. जशी वागली ते त्या त्या वेळी योग्य होतं आणि रिग्रेट नाही कशाबद्दलही सांगितलं. शिवानीशी फ्रेंडशीप होऊ शकत नाही, पण एकाच प्रोफेशनमधे आहोत आणि एकत्र काम करायची वेळ आली तर तेव्हा हाऊ आर यु वगैरे विचारेन, व्हु आर यु असं नाही विचारणार म्हणाली. फ्रेंडशिपमधे तिने शिव, ताई, केळकर नाव घेतलं, हिनाचं का नाही घेतलं. तिच्याशी चांगली झाली होती मैत्री, तिच्याशी का नाही बाहेर मैत्री ठेवणार काय माहीती. पत्रकारांनीपण स्पेसिफिक विचारलं नाही तिला हीनाबद्दल.
मला फक्त शिव आणि वीणाची एव्ही बघण्यात इंटरेस्ट आहे. मागच्यावर्षीपण मेघा आणि स्मिताची फक्त बघितली होती मी.
चॅनेल कदाचित शिवला एक आणि नेहाला दोनवर आणू शकतं, आज पत्रकार म्हणाले त्यावरुन वाटतं. अर्थात मला शिव वीणाच आवडणार.
एपिसोडमध्ये सर्वात आधी बोलत असताना, शिव वीणा चर्चा करत होते. शिवला वीणाची आई खूप आवडली हा. वीणाला तिच्या घरून लग्नाला परवानगी मिळेल म्हणाली पण तुझ्या मम्मीचा विरोध होईल असं म्हणत होती, तेव्हा शिव म्हणाला, मनवेन तिला. इथे वेगळं होतं, तू आईला ओळखत नाहीस, नंतर तुला ती जवळ करेल बघ म्हणजे तू लाडकी होशील तिची अशा अर्थाचे म्हणाला.
शिवानी आल्यामुळे वीणा पुढे आली असं एकवेळ मान्य केलं तरी शिवानी आल्यावर नेहाचं तिच्यापुढे दबून राहणं (तेही शिवानी तिच्याशी जसं वागते ते पाहता...) तिच्या मागे जाण्याचं कारण आहे. >>> अगदी अगदी.
वीणाने आज शिवानी नसती तर काय झालं असते म मां म्हणाले होते त्यावर पण छान मत मांडले, की मी नसते तर शिवानीचं काय झालं असते. ती बोलण्यात आणि मत मांडण्यात ऐकत नाही कोणाला.
विणाचा उद्धटपणा, उर्मटपणा हे आवडलं नाही पण तिचा खेळ आवडायचा मला. आरोह आणि शिवने तिच्या task मधल्या वावराबद्दल बरेचदा कौतुक केलं तसंच मलाही वाटतं आणि मला जाणवायचं ते. मी ते लिहिलंही वेळोवेळी.
शिव एकीकडे फार innocent आणि एकीकडे aggressive असा आहे. तो मला अर्थातच वीणापेक्षा जास्त आवडतो.
नेहासाठी आता शशांक केतकर आणि श्रेयस तळपदे यांनी वोट अपील केलंय. मेघाला शिव आणि ताई यांनी लाईट्स बंद करावे असं वाटतंय.
शिव नेहाचं नाव पत्रकारांनी घेतल्यावर, शिवानीचा चेहेरा पडला प्लस नेहाचे कौतुक वीणाने केलेलं त्यामुळे अजूनच.
नेहा fans साठी चांगली news आहे, तिने शिवानीला मागे टाकलं आहे. आता एक नं शिव, दोन वीणा, तीन नेहा, चार शिवानी, पाच ताई आणि सहा आरोह आहे. शिव आणि वीणामध्ये खूप अंतर आहे. शिवला अजूनतरी जबरदस्त voting येत आहे आणि त्याच्या जवळपास कोणीही नाही. त्याचा एक नं तसाच राहूदे, आमेन.
प्रमोशनल टास्कमध्ये मात्र सगळेच काहीच्या काही ओव्हरॲक्टींग करतात! >>> हो ना
. अगदी त्या productsचा कंटाळा येईल इतपत.
मी इथेच आधी कधीतरी म्हणालो होतो.... शिवानी व्हिलन/व्हॅंप बनतीय तर तिच्याविरुद्ध उभे रहाणारे कुणीतरी हिरो होणारच....>>> हो, तुम्ही हे लिहिल्यावर माझ्या डोक्यात वीणाचेच नाव होतं, ते मी लिहिलंही.
शिव नखं खात होता पत्रकारांसमोर ते मात्र नाही आवडलं.
शिव वीणा एकदम opposite स्वभावाने म्हणून attracted. शिवने मस्त सांगितलं की त्या तिकडीला पाच मिनिटं सहन करू शकतो फक्त. ते काय बोलतात डोक्यावरून जातं, बहुतेक ते तिघे उच्चअभिरुचीसंपन्न असावेत म्हणजे त्यांचे विषय आणि शिव साधा सुधा, असं वाटलं तो बोलल्यावर. अर्थात त्याचं दादा ताईपेक्षा पण विणाशीच जमायचं आणि वीणाचं पण तसंच. अजून एक अनसीन अनदेखावरून समजलं की दोघेही ड्रिंक्स घेत नाहीत आणि स्मोकिंग वगैरे करत नाहीत. एका सीनमध्ये ते त्याबद्दल बोलत होते. ही common गोष्ट आहे दोघांत आणि ती आवडली असेल एकमेकांची.
शिव वीणाच हवेत टॉप २ ,
शिव वीणाच हवेत टॉप २ , डिझर्विंग म्हणून आणि खूप नाट्यमय करता येईल हे बिबॉला म्हणुन Happy
दोघांनी फिनालेलाही मॅचिंग कपडे घालणे, एकत्रं लाइट बन्द करणे, शेवटी म.मा पुन्हा एकदा विचारतील शिवला कि आत्ताही ट्रॉफीचा त्याग करशील का वीणेसाठी , शेवटी विनर अनाउन्स करताना ममा एका हतात शिवचा आणि दुसर्या हतात वीणाचा हात घेऊन भरपूर टीपी करणार कोणीही जिंकल तरी शिव वीणाला स्टेजवर उचलून घेणार , तसेच दुसर्या दिवशी गणपती बसणार, त्यामुळे शिवच्या फेमस ‘गणपती बाप्पा मोरया‘ आरोळीने सिझन संपवण्यासारखा चांगला शेवट बिबॉला मिळणार नाही Happy >>> आमेन. गणपतीबाप्पा मोरया.
< शेवटच्या काही
< शेवटच्या काही आठवड्यांपूर्वीपर्यंत ज्या वीणाला सोशल मीडीयावर जमके शिव्या पडत होत्या >
वीणाला जमके शिव्या पडत होत्या का माहीत नाही, नेहाला मात्र खच्चून शिव्या पडत होत्या.
बिबॉ म्हणाले की गार्डन एरियात
बिबॉ म्हणाले की गार्डन एरियात पहिल्यांदाच पत्रकार परिषद असल्याने वेगळेपणा आलेला आहे (?) म्हणजे? काय वेगळे होणार होते?
बाकी 'स्ट्रॅटेजी', 'कंफर्ट झोन', बाँडिंग, बळाचा वापर, इंडिव्हिजुअल गेम हे काही की वर्ड्स आहेत तिथे , हे लोक कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देताना ते च शब्द उलट सुलट वापरून गुळगुळीत वाक्ये फेकतात. त्यामुळे पत्रकार परिषद फारशी रंगली नाही. तेच ते वाटले सगळे.
मैत्रेयी, अजुन एक आवडता शब्द.
मैत्रेयी, अजुन एक आवडता शब्द.... सगळ्यांचाच.... "पाईलअप"
वीणा चे "चक इट" आवडत मला
Pages