मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

आणि फक्त शिवानीच नाहि तर नेहा-आरोह आर हंगप ऑन वीणा टू...

नेहा आरोह विणाला तिकीट टू फिनाले द्यायला तयार होते ना. नेहाला वीणा सध्या चालतेय. तिचं टार्गेट पहिल्यापासून किशोरीताई आहेत.
मला स्वतःला शिवानी नेहापेक्षा खूपच सुसह्य वाटते. निदान जे काय बोलायचं ते ताडताड फाडफाड बोलून टाकते. नो फिल्टर. प्रोव्हाईड्स इनफ कंटेंट. नेहा मात्र कायम दुसऱ्याला त्रास देण्याचं प्लॅनिंग, कोणाला त्रास झाला तर तेच एन्जॉय करणार, कॅमेऱ्याकडे बघत रडणार. कोणत्याही टास्कमध्ये खिलाडूपणे खेळण्याऐवजी लूपहोल शोधून टास्कची मजा घालवून टाकणार. शिवच्या मांडीवर बसणार, त्याला जबरदस्ती मिठी मारून खूप वेळ लोळणार आणि मग त्यालाच 'हात लावू नको' वगैरे चोराच्या उलट्या बोंबा.
सध्या सोशल मीडियात नेहाला ज्या खच्चून शिव्या पडतायत त्या ती पूर्ण डीझर्व्ह करते.
सोशल मीडियावर शिव वीणा किशोरी तिघांना खूप सपोर्ट आहे. शिव जिंकू नये असं वाटतं केवळ त्या चावण्याच्या प्रकारामुळे. अजिबात स्पोर्ट्समन स्पिरिट नाहीये त्याच्यात. वीणा किंवा किशोरी जिंकले तर आवडेल.

शिवानी म्हणत असते, मी वीणाचं नावही काढत नाही, ती माझ्यासाठी महत्वाचीच नाही पण येता जाता उठता बसता वीणा, वीणा करत असते फक्त Lol

आरोहला सगळ्यात कमी मतं असून सेफ दाखवणार आहात, तर कमीतकमी शिवपेक्षा आधी तरी सेफ करू नका, शिवला रेकॉर्डतोड voting आहे, तो निदान पहिला सेफ झाला अस तरी दाखवा.

जेव्हा शिव वीणाला वरच्या सुरात म मां ओरडतात तेव्हा शिवानी जाम एन्जॉय करत असते, आज तिच्या चुकांवर अगदी खालच्या सुरात बोलतायेत तर केवढा राग आलाय, चेहेरा बघा, मी काहीच बोलणार नाही, म्हणाली. नेहाने मात्र मुद्दे मांडले, हे बरं झालं नाहीतर तर ती हल्ली विकेंड डावात दिसत नव्हती, पण म मां ना शिवचं बरोबर आहे, नेहा चुकली हे इथे आम्हा काहीजणांना वाटलं, तेच म मां ना वाटलं.

नशीब नेहा शिवानीला ओव्हरकॉन्फिडन्स आलाय एवढं बोलले.

बिबि बर्थडे पार्टी चा एपिसोड बघितला थोडा, कोणाकोणाला कुठली गाणी आली होती, >> धनुडी शिव ला मल्हारी, वीणा ला आता वाजले की बारा ,बिचुकले ला आया रे राजा लोगो रे लोगो राजा के संग झुमलोरे झूमलो ,शिवानी ला देसी गर्ल ,आरोह ला झिंगाट ,नेहा ला कोंबडी पळाली किशोरीला पिया तू अब तो आजा .>>>>> थँक्यू अमुपरी सांगितल्याबद्दल, पण मी प्रश्न नव्हता विचारला, हे माझं वाक्य होतं सगळी गाणी लिहीत बसायची नव्हती म्हणून . पण लिहीताना माझंच चुकलं बहुतेक, तो प्रश्न वाटतोय Happy

Biggrin धनुडी.
या आठवड्यात कुणाला काढायचं नाही हे बहूतेक अधिपासुन ठरलेल. एकदा वीणा ही नेहा ला म्हणत होती की मागच्या वेळेला टॉप 6होते तर यावेळेलाही टॉप 6च असतिल. शिवानि आणी नेहाला टीकीट टू फीनाले अशाप्रकारे देणे हे एक buzz क्रिएट करण्यासाठी दिले असेल बीबी नी.
जर उलटे झाले असते वीणा आणी किशोरी सेफ असत्या. आणी नेहा शिवानि आरोह नोमिनेशन मध्ये असते. आणी eviction cancel झाले असते. तर म बोलले गेले असते ,शिवानि ला घालवयाचे नहिये म्हणून बीबी नी eviction cancel केले वगैरे . बीबी पार्शियल आहे. पण बीबी चे अधि पासुन सगळं ठरले असते. या आठवड्यात शिवानि आणी नेहा ला तिकीट देऊन सगळा मालमसाला बीबी ने मिळवला.

चला म्हणजे जेंव्हा जेंव्हा नेहा सेफ झालीय (कॅप्टन्सी/बाहेर जाणाऱ्यांनी सेव्ह केल्यामुळे/फिनाले तिकिट) त्या त्या वेळी इतरांना पण बिग बॉस ने सेव्ह केलेले आहे..... थोडक्यात तो advantage कधीच तिला मिळू दिलेला नाही..... त्यामुळे बिग बॉस नेहा ला फेव्हर करतो हा गैरसमज नेहा हेटर्स नी डोक्यातून काढून टाकावा Wink

बाकी "तिकीट टू फिनाले" पेक्षा आज जो प्रेक्षकांचा कौल डावलून ज्याला/जिला कुणाला वाचवले गेलेय ती खरतर "दया" (किंवा काहींच्या लाडक्या सोशल मिडीयाच्या मते भीक) आहे
Light 1 घ्या

एलिमिनेशन कॅन्सल केलं तर वोटींग लाइन्स बन्द केल्या होत्या का ? कि फक्त रविवरपुरत कॅन्सल केलं आणि मिडविक एलिमिनेशन होणार ?
बाकी त्यस वीणाचा प्रॉब्लेम असा आहे कि ती लगेच ओव्हरकॉन्फिडन्स मधे माती खाते !
मधेच मग टॅटू , दया वगैरे शब्द बोलून उगीच तोंडावर पडली सगळं तिच्या बाजुने चालु असताना, त्यात ती चुगलखोर चाची किशोरी जी कोणाचीही सख्खी नाही तिने तिचे निर्जिव हिरवट डोळे फडफडवत चुगली केली कि वीणाला शिवानीच्या हातचं खायला नको असतं Happy
शिवानी आणि तिचा पेटडॉग मांजरेकर सोडणारच नव्हते मग चान्स.

या वेळी कुणाला सगळ्यात कमी वोटस होते काय माहिती? बाहेर दाखवतात ते वोटिंग ट्रेंड बरोबरच असतिल असे नाही. सोशल मीडिया वर ऐक्टिव नसणारी लोक ही वोट करु शकतात.

हो स्वरूप, कालच वीणा म्हणाली ना, आमच्यावर दया करा. पण तिला खरंच प्रेक्षकांनी voting केलंय शिव पाठोपाठ पण हे bb ना कधीच दाखवायचं नसते, आरोह शेवट आहे आणि तसं असेल तर दया आरोहवर झाली किंवा आपण better शब्द वापरूया, कृपा.

एनिवे आधीच voting lines बंद ठेवायला हव्या होत्या.

अमुपरी खरं खोटं माहिती नाही पण voot डिक्लेअर करते आपल्याकडंचं voting आणि ती बातमी बाहेर येते, असं vloggers सांगतात.

मिडविक असेलही, काय माहिती. बिग बॉस आहेत, काहीही करू शकतात.

बिचुकलेला परत अटक झाली अशी बातमी वाचली, जाता जाता bb त्यावर trp घेईल, उद्या त्याचा फैसला घरातले लोक करणार, पण त्यांना बाहेरचं सांगून encash करू नये bb नी.

वोटिंग लाईन्स कशा नाही सुरु केल्या. :::: कशा साठी
एनिवे आधीच voting lines बंद ठेवायला हव्या होत्या.>>>>
वोटिंग लाइन्स चालू ठेवल्या असतिल कारण वीकेंड च्या डावाला trp मिळण्यासाठी कोण जाईल या बद्दल उत्सुकता होती. काही यूट्यूब channel अधि पासुन बातमी फोडतात त्यामूळे interest जातो एपिसोड बघताना.

अटक वगैरे काही नाही, तो मागे २४ तास जाऊन आला तेंव्हा २६ ला पुन्हा जाणारे तेंव्हाच आली होती न्युज.
त्याचं काय , आओ जाओ घर बिचुकलेका है !

ओके up विनर साठी च्या उद्या परवा चालू करतील. असे वाटतय.
मला वाटतय शिवानी ला परत पाहुणे करुन काढतिल की काय. तिला वोटिंग साठी ठेवतिल असे वाटत नाही.

आता सगळे फिनँलेमध्ये आहेत,आणि मिडविक एव्हिक्शन असेल तर वोटिंंग लाईन्स चालू करायला हव्यात ना.अरे, एकदातरी त्या शिवानीला वोटिंग मध्ये आणा.

शेवटचा पार्ट मुद्दाम बघितला. किशोरी काय सुंदर नाचली निंबुडा वर. ५०+ वयात इतका फिटनेस, एनर्जी, उत्साह..क्या बात है. हर फेस ग्लोज! खूपच ग्रेसफुल आणि गोड नाचली.
शेवटी तिला मांजरेकरने उगाचच थापा मारल्या. खरंतर सगळ्या पोल्समध्ये निदान आरोहच्या ती ती नक्कीच पुढे होति आणि काही पोल्समध्ये विणाच्याही.
नेहाला बाकी रडू कोसळायचं बाकी होतं किशोरी जात नाहीये कळल्यावर.

मांजरेकर काल ही बोलत होते की कधितरी आरोह वोटिंग मध्ये दुसर्या नंबर ला होता. काय खरे काय खोटे काय माहिती. त्या सगळ्याना असे वाटते ज्या क्रमाने सेव करतात तसेच वोटिंग असते.
अरे, एकदातरी त्या शिवानीला वोटिंग मध्ये आणा.>>>>>
तिला वोटिंग मध्ये आणतील का नाही या विषयी शंका आहे मला. Uhoh

मांजरेकरने बाकी ठळक बोलून मनाची तयारी करून दिली आहे कि १.अख्खा सिझन कोण कसं खेळलं त्याने काहीही फरक पडणार नाहीये, या आठवड्यात तुम्ही कसे खेळणार त्यावर पब्लिक विनर ठरवणार
२. मधूनच एंट्री मारल्याने शिवानी-आरोहला काही फायदा झाला नाहीये .

नेहाला बाकी रडू कोसळायचं बाकी होतं किशोरी जात नाहीये कळल्यावर. >>> Lol हो का, बघायला हवा तो सीन परत. वीणा वाचल्यावर शिवानीचा पडलेला चेहेरा बघितला मात्र.

बाकी म मां ना फार इंटरेस्ट आहे शिव वीणा नंतर काय करणार यात, त्याचं लग्न होणार की नाही, ते एक तारखेनंतर काय करणार. वीणाने मस्त उत्तर दिलं. ह्यांना काय करायचं आहे ओढूनताणून शिव वीणा.

अटक वगैरे काही नाही, तो मागे २४ तास जाऊन आला तेंव्हा २६ ला पुन्हा जाणारे तेंव्हाच आली होती न्युज. >>> हो का, परत बघते youtube वर जाऊन. २६ ला आहे सुनावणी ते वाचलेलं कुठेतरी.

आरोह खरंतर आवडतो मला, त्याचं रड्यानेस आणि सतत शिव वीणा target सोडलं तर. किशोरीताईपण आवडते, पण ती खुपदा सेफ खेळते आणि समोरचा आपल्यावर खूप उपकार करतोय असं जाणवून देते, केळकर, शिवानी आणि आज म मां ना पण म्हणाली मी ऋणी आहे तुमची.

शिवानी किंवा आरोहमधे निवडायचे असेल तर मी आरोहला निवडेन, तो चांगला task करतो शिवानीपेक्षा.

सगळे safe झाले हे कळल्यावर शिवानी चा चेहरा पाहण्याजोगा झाला होता. मज्जा आली खूप. वीणा ताई safe कळल्यावर पण तेवढ्याच उत्साहाने नाचली. तिरकस त्रिकुटाला मात्र काही देणं घेणं नव्हतं, असो.

Btw ती गौरी इंगवले छान वाटली मला, डान्स फार नाही बघितला पण चांगली नाचत होती जे काही बघितलं ते. ती खूप लाजाळू आहे मात्र आणि गोड दिसत होती. ती म मां ची मानलेली मुलगी आहे, साताऱ्याची आहे. टीव्ही 18 आणि म मां चा एकत्रित पिक्चर, त्याचं प्रमोशन चाललेलं. त्यातला हिरो हम बने तुम बने मध्ये गुज्जू charactor करत होता बहुतेक आणि आता आंबेडकर मालिकेत टीनेजर बाबासाहेबांची भूमिका करतोय. तोच असावा असं वाटलं, मागे प्रोमो दाखवलेला सलमान आलेला तो बघून.

आजची ती शिवानीवर आरोप करणारी मस्त होती मात्र. म मां भारीच impressed. मलाही आवडली ती एकंदरीत.

कालचा एपि. आत्ता पाहिला. शिवानी चा कॉस्च्युम आणि मेकप बघून ती वटवाघूळ म्हणून ड्रेस अप पार्टीला आली आहे असे वाटत होते. तिला मेक अप जमत नाही करायला. असाच काहीतरी विचित्र आय मेक अप करते नेहमी. तिचे आणि वीणाचे भांडण छान झाले Proud दोघी जणी खूप तयारी करून आल्यात असे वाटत होते Happy त्यामुळे मस्त फटाके उडाले. एंड ऑफ द डे कुणालाच अप्पर हँड मिळणार नाही याची ममांनी काळजी घेतली.

तिचा बाहूली मेकप होता Happy लहानपणी आम्ही बाहूलीला काळ्या पेनाने आयब्रो गडद करून पापण्याही गडद करायचो. लाल लिपस्टीक आणि गाल हायलाईट करायचो ते आठवले.

तिचे आणि वीणाचे भांडण छान झाले
<<
Rofl
मग काय, म.मा आणि क्रिएटिव टिमला वाटलं असेल कि आधीच शिवानी परत आली असती तर कित्तीतरी विकेंड्स हे शिवानी वि. वीणा फायरवर्क पहायला मिळालं असतं Proud

संपलेल्या आठवड्यात नेहा शिवानीला भीक घालून बिग बॉसने त्यांचा आधीच असलेला माज वाढवला आणि टीआरपी पदरात पाडून घेतला . याच साठी तर केला होता अट्टाहास .तो सुफळ संपूर्ण झाला . त्या दोघींच्या पाठोपाठ आरोहला सेफ डिक्लेयर करून त्या तिकडी ला जिंकल्याचा फिल दिला . शेवटच्या तिघांमध्ये मुद्दामून वीणा, शिव आणि किशोरीला ठेवलं आणि त्यांची धाकधूक वाढवली पण आता लास्ट वीक मध्ये बरोबर उलट होईल आरोह , शिवानी आणि नेहा पाठोपाठ बाहेर पडतील आणि टॉप तिघांमध्ये किशोरी, वीणा आणि शिव ला ठेवतील . नेहा किशोरीच्या आधी गेली पाहिजे आणि शिवानी वीणाच्या आधी बाहेर पडली पाहिजे म्हणजे मग त्यांच्या कडे बघायला मजा येईल Proud
.
प्रेक्षकांचा कौल म्हटलं तर आरोहाला सगळ्यात कमी मत होती त्यामुळे प्रेक्षकांचा कौल डावलून त्याला पण त्याच्या दोन मैत्रिणीप्रमाणे हि भीक मिळालेली आहे आणि त्यातून नेहा लव्हर्सनी हे पक्के समजून चालावं हो त्या दोघीना भिकच घातली होती बिग बॉस ने . भीक ती भिकचं . तिला वीणाने "दया" म्हटलेलं सुद्धा प्रेक्षकांना आवडलेल नाहीये Proud

दोन्ही कडे तीन लोकं ..आरोहला काढले नाही ते बरे केले त्यामुळे त्याचे फॅन्स त्यालाच मत देतील आता. नाहीतर त्यांची मते नेहा-शिवानीला गेली असती. बाहेर येऊन त्यानेही शिवानी-नेहाला मते द्या असे आवाहन केले असते. मत विभागणीमुळे या तिघींना कमी मते मिळतील. नेहाला मिळणार्‍या शिव्यांमुळे तिची मते खूपच कमी होतील व त्यातली काही शिवानी तर वीणा/शिव कडे वळण्याची शक्यता आहे.

किशोरी कडे तिची स्वतःची मते आहेत त्यामुळे तिला एवढा फरक पडणार नाही. आधीही बर्‍याच नॉमिनेशन पासून वाचली ती. पण यावेळी तिची इमेज खराब करण्याचे म.मां.नेही प्रयत्न केले त्यामुळे थोडीफार मते कमी होऊन शिव-वीणाला मते जातील. शिव-वीणाकडे त्यांची मते आहेत त्यामुळे इतका फरक पडणार नाही.

माझा अंदाज : या विकेंडला मध्येच कोणातरी ५-१० लाखाची ऑफर देऊन बाहेर काढतील. मोस्टली आरोहला. तो पर्यंत त्याला मिळणारी मते त्याचे फॅन्सनी संपवली असतील व याचा शिवानी-नेहाला फायदा होणार नाही. त्यामुळे टॉप ५ असे असतील

शिव-किशोरी-वीणा-शिवानी-नेहा आणि गेला नाहीतर आरोह सहा नंबरला.

अतिशय रटाळ, कंटाळवाणा, पार्शिअल असा हा बीग बॉस 2 होता.
परागला काढून टाकल्यापासून मी बघणं बंद केला.
नवरा बघायचा पण ती शिवानी आल्यापासनं त्यानंही बघणं बंद केलं.
आता तर तीला फायनाल लाही पोहोचवलंय.

शिवानी आणि बिचुकले ह्यांना परत आणून बीग बॉस नी काय साध्य केलं हे तेच जाणो. जर हे सगळं TRP साठी होतं तर ते दोघंही आल्यापासून असलेला प्रेक्षक वर्गही दुरावला. रोज नसलातरी अधनंमधनं इथे येऊन वाचात होते.
भरत, अंजू, दीपांजली ह्यांच्या कंमेंट्स पटायच्या.
तुम्ही सगळ्यांनी हा पूर्ण सिझन बघायचा आणि इकडे येऊन प्रतिसाद लिहायचा त्याबद्दल थँक यू.
फिनाले बघण्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीय.
कोण जिंकलं एवढं कळलं तरी बस्स आहे.

फिनाले बघण्यात काडीचाही इंटरेस्ट नाहीय.
कोण जिंकलं एवढं कळलं तरी बस्स आहे.>>>+111
खरंतर सोशल मीडिया सारखं प्रभावी माध्यम इतकं Active असतानाही प्रेक्षकांना काय आवडतंय काय नाही हे bb च्या team ला कळू नये हे आश्चर्यच आहे. पहिला season मी सुरवातीपासून नव्हता पाहिला पण एकदा पहायला सुरवात केली तर खूप आवडला म्हणुन यावेळी आधीपासूनच उत्सुकता होती. पण या season ने पार निराशा केली आणि अखेर पाहणे सोडून दिले.. ऋता आपल्यासारखे बरेच प्रेक्षक आहेत. खूप जणांनी अर्ध्यावर bb बघणं सोडलाय.. प्रेक्षकांसाठी बनवलेल्या show मध्ये प्रेक्षकांच्या आवडीचा विचार केला जात नाही ही खेदजनक बाब आहे... फ्लॉप bigg बॉस....

चला फायन्ली शेवटच्या विकेंडच्या डावाला गुळ्मुळीत का होईना, बिचुकलेच्या अंगावर धाऊन गेलेल्या शिवानीला समज दिली म.मांनी.
मला बिचुकलेने सुरेखाताईंना दिलेलं उत्तर खरच आवडलं होतं , हजरजवाबी आहेतच ते !
किशोरीला वाचवलं ममांनी अपेक्षेप्रमाणे , आता बिचुकलेची बिदाई काय सांगून करतात बघु !
काही म्हणा, स्पर्धक नसताना देखील प्रचंड फुटेज घेऊन गेले बिचुकले अख्खा सिझन , ते नसतानाही त्यांची चर्चा होतीच,पब्लिकने त्यांना शिव्याही दिल्या पण त्यांनाच भरपूर हसवलही बिचुकलेने , युनिक नमुना असल्यानी पूर्ण सिझन गाजवला त्यांनी !
पॉप्युलॅरीटी पहाता शिव मोठ्या मार्जिनने जिंकला पाहिजे पण हा अख्खा सिझन अनप्रेडिक्टेबल होता त्यामुळे १ तारखेला कोणाला जिंकवतील अंदाज बांधणे मुष्किल आहे.

Pages