मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

फ्लॉप bigg बॉस....>>अगदीच अगदीच..
रच्याकने हिंदी बी. बॉ. एवढा फ्लॉप होता का कधी?
एवढे पार्शिअल डिसिजन्स, आणि बाहेर एक महिना काढलेल्या व्यक्तीला फिनाले पर्यंत नेणे असे प्रकार हिंदी बीग बॉस मध्ये झालेत का कधी?
मी हिंदी बीग बॉसचा एकही सिझन फ़ॉलो केला नाही म्हणून विचारतीये.

me_rucha,
मी फक्त मागचा सिझन पाहिला हिन्दीचा आणि तो सिझनही सेम अस्साच मॅनिप्युलेटिव , अत्यंत पर्शल होता,!
सगळ्या डिझर्विंग लोकांना हाकलले आणि कॉमनर्सना पुढे ढ्कलले.
बिबॉचे आवडते लोक नॉमिनेशन्स मधे आल्यावर एलिमिनेशन्स कॅन्सल करणे, तेही पब्लिक वोट्स घेऊन मग !
फॅन्सच्या पाठिंब्या प्रमाणे विनर होता कन्टेन्ट किंग श्रीसन्त , पण त्याला डावलून अजिबात अपेक्षा नसलेली सो कॉल्ड डिग्निफाइड रहायचे कारण देऊन मागेमागे राहून बॅकफुटवर रहाणार्या दीपिका कक्करला जिंकवलं होतं.
त्या हिशोबानी इथे किशोरी जिंकली तर आश्चर्य वाटु नये.

बेक्कार शो. काही भागच मोजून पाहिले
पहिल्यांदाचा हा शो बघितला आणि अतिशय फालतु शो.
एकही स्पर्धक लायक नाहीच आहे. कुठुनही उचलून आणलेले लोकं आहेत. खेळाचे बेसिक नियमातही न बसणारे.
मला वरच्या पोस्टी वाचून आश्र्च्र्य वाटले की, लोकं वोट देण्यात का आपला वेळ घालवतात? ते हि बिबॉ हा स्क्रिपटेड शो आहे हे क्लिअर असून आणि व्युवरच्या मतांना किंमत नाही?
खेळ पण इतके पांचट...
लोकांना का इतका उच्च शो वाटतो ते काही कळले नाही.
त्या मुर्ख बिचकुलेला द्या ट्रॉफी.

उत्तराबद्दल धन्यवाद दीपांजली.
सिझनही सेम अस्साच मॅनिप्युलेटिव , अत्यंत पर्शल होता,!
सगळ्या डिझर्विंग लोकांना हाकलले आणि कॉमनर्सना पुढे ढ्कलले.>> ओह्ह.... dat इस बॅड.

एवढे पार्शिअल डिसिजन्स, आणि बाहेर एक महिना काढलेल्या व्यक्तीला फिनाले पर्यंत नेणे असे प्रकार हिंदी बीग बॉस मध्ये झालेत का कधी?
>हिंदीत असेच होते म्हणून हिन्दी पहाणे कधीच सोडून दिले.
मराठी देखील पुढचा सीज़न नाही पहाणार.

बेक्कार शो>>>
शो चांगला आहे implementation चुकीचे आहे

हिंदीत असेच होते म्हणून हिन्दी पहाणे कधीच सोडून दिले.>>hmm.. हल्ली सगळ्याच रिऍलिटी शोज मध्ये तेच होतं.
सा रे ग म मराठी मध्ये आर्या आंबेकर जिंकणार असे वाटत होते पण भलतीच आली. (की आणली? )
पण इतर रिऍलिटी शोज मध्ये तेवढ्या वेळापुरता आनंद तरी मिळतो.
बीग बॉस मध्ये सतत भांडाभांडी, आरडाओरडा त्यामुळे बघण्याची इच्छा राहिली नाही. अर्थात असे बरेच लोक आहेत ज्यांना हे पहायला आवडत म्हणून अश्या शोज मधून प्रोड्युसर रग्गड पैसा कमवून निघतो.

हल्ली सगळ्याच रिऍलिटी शोज मध्ये तेच होतं >>>हो. आजकाल रिऍलिटीशो मध्ये singing डांसिंग च्याही talent दाखवणे कमी आणी ड्रामा रडारडी जास्त. खोटी खोटी भांडणे घेतात. मराठी मध्ये माहिती नाही हिंदीमध्येतर असतेच.

बीग बॉस मध्ये सतत भांडाभांडी, आरडाओरडा त्यामुळे बघण्याची इच्छा राहिली नाही. अर्थात असे बरेच लोक आहेत ज्यांना हे पहायला आवडत
>>> आमच्या घरात बिग बॉस कुणालाच आवडत नव्हते पण मी आणी माझी बहिण पुर्वी हिन्दी बिग बॉस दोघीच सगळ्यां च्या इच्छेविरुध्द पहायचो. घरातले नावे ठेवायचे काय फालतू शो बघताय म्हणून. सगळे टोमणे एकत निमूटपणे बघत बसायचो. Uhoh घरात जर आम्ही काही कारणाने वाद घातला तर आई बोलायची की बिग्ग बॉस बघण्याचे परिणाम आहेत हे. Biggrin
आता ही कुणाला नाही आवडत पण वूट जिंदाबाद Lol

रच्याकने हिंदी बी. बॉ. एवढा फ्लॉप होता का कधी? >>>>>> लास्ट सिझन फ्लॉप होता.

आज बीबी मध्ये कार्य होणार आहे आणी कार्याचे नाव आहे अभिजित बिचुकले. Lol इन शॉर्ट कौतुक सोहळा. >>>>>>>>> कौतुक करुन करुन त्याला हाकलवणार आहे तर. Lol

ती गौरी इंगवले छान वाटली मला, >>>>>>>> हि झीमच्या ' तुझ माझ जमेना' सिरियलमध्ये होती ना? इतकी मोठी झाली? भाऊ कदमची मुलगी झाली होती. छान नाचली काल. गाण सुन्दर होत.

बीग बॉस मध्ये सतत भांडाभांडी, आरडाओरडा त्यामुळे बघण्याची इच्छा राहिली नाही. अर्थात असे बरेच लोक आहेत ज्यांना हे पहायला आवडत >>>>>>>> ५०% भांडाभांडी, ५०% एन्टरटेनमेण्ट असेल तर बिबॉ ( मराठी, हिन्दि नाही) बघायला आवडेल मला. नुसत सौजन्य सप्ताह दाखवल तर ते फेक वाटेल. हा, पण गेम चिप, लो लेव्हलला जाऊ नये एवढच वाटत.

पण ह्यावेळचा मराठी बिबॉ फ्लॉप झालाय. टोटल गण्डलाय.

ती मनोरुग्णच आहे . पण बिग बॉसची आवडती कारण फाड फाड बोलते . >>>>>>>> शिवानी आजारी आहे की नाही माहित नाही. पण मनोरुग्ण आहे म्हणून ती व्यक्ती वाईट ठरत नाही. हा, पण ती बिगबॉसचा अपमान करुनही तिला फायनलपर्यन्त नेण, तिच माजोरड वागण, एटिटयूड ते नाही आवडल.

एक सुंदर चेहरा सोडला तर काहीच नाही तिच्याकडे >>>>>> अगदीच काही वाईट नाही. 'देवयानी' मध्ये चान्गल काम केल होत तिने. बिबॉमध्ये आल्यावर ती अशी वागेल ते वाटल नव्हत.

काही म्हणा, स्पर्धक नसताना देखील प्रचंड फुटेज घेऊन गेले बिचुकले अख्खा सिझन , ते नसतानाही त्यांची चर्चा होतीच,पब्लिकने त्यांना शिव्याही दिल्या पण त्यांनाच भरपूर हसवलही बिचुकलेने , युनिक नमुना असल्यानी पूर्ण सिझन गाजवला त्यांनी ! >>>>>>>>>++++++++१११११११११ यु कॅन लव्ह हिम, यु कॅन हेट हिम, बट यु कान्ट इग्नोर हिम. अस आहे त्याच.

किशोरी काय सुंदर नाचली निंबुडा वर. ५०+ वयात इतका फिटनेस, एनर्जी, उत्साह..क्या बात है. हर फेस ग्लोज! खूपच ग्रेसफुल आणि गोड नाचली. >>>>>>>> सहमत

Btw मला आत्ताच समजलं की शिवानी सुर्वेचा पिक्चर येतोय, त्यात तिच्या आईच्या भूमिकेत माझी भाची आहे Happy .

ट्रिपल सीट नावाचा सिनेमा येतोय 24octला ट्रेलर येणार आहे बहुतेक अंकुश चौधरी आणी पल्लवी पटिल आहेत.

हो तोच पिक्चर. भाचीने fb वर पोस्ट केलं म्हणून मी तिला personal msg वर विचारलं की शिवानी सुर्वे आहे का यात, तेव्हा तिने मला सांगितलं की, ती तिच्याच आईचा रोल प्ले करतेय.

पुष्कर चा ही बिग बॉस संपल्यावर ती आणी ती मूवी आलेला ना . फार चालला नाही तो मूवी.

तो मृणाल कुलकर्णीचा लंडनवालाना, म्हणून पुष्कर सारखं लंडन लंडन करायचा कारण शुटींग तिथे झालेलं बहुतेक.

काल पण जे काय थोडे फार असेल ते बिचुकलेनेच एंटरटेन केले. काय ते एका राज्यात अनेक शहरे, चंद्रावरचे डाग काय काय गोल गोल घुमवत होते!! त्यांचा आणि ममांचा संवाद फनी होता. ममां बिचुकलेंच्या पळण्याची नक्कल मस्त करतात Lol
काल ममांचे टायमिंग भारी होते काही काही जोक्स चे. आरोह म्हणाला मला गाण्याचे शब्द माहित नहीयेत तर त्याला म्हणाले असू दे, तुझे पाय काय करतायत ते तुझ्या हातांनाही माहित नाही. Happy

बिचुकले एंटरटेन करतात तसे पण अस्वछता दुसर्यना कमी लेखणे आणी चिडले तर शिव्या देणे इतके पॉईंट सोडले तर .
शिवानि हीरोईन आहे. ती फक्त 24years ची आहे सो तिचे करीअर करण्यासाठी भरपुर वेळ आहे तिच्या कडे.

या वेळेस बिबॉचे घर पण खुप घाण ठेवले आहे सगळ्यांनी. कोणी हॉल मधला सोफा बघितला का..... किती मळलेला दिसत होता कालच्या भागात.
वर लिहिल्याप्रमाणे शिवानी खरच चांगला मेकअप करत नाही. तिला वाट्ते हे खुप छान दिसेल. तिच्यापुढे ताईंचा मेकअप बघायचा किती छान असतात त्या. नेहा आता ते तोकडे कपाळावर येणारे केस मागे पिना लावून बांधू लागली आहे.
या सगळ्यांचे वीस वर्षानंतरचे दाखवलेले फोटो पाहून हसु आवरत न्हवते. जर बिचुकलेची पेटी उघडायचीच न्हवती तर पाठवायची तरी कशाला. सरळ नेहमीसारख सांगायच कि तांत्रिक कारणामुळे पेटी आलीच नाही.......
त्या गौरीची ओळख करून देताना सारख सातारा सातार करत होते ममा.
पुढच्या भागात ममा नको म्हणतात पण काहींना वाटत महागुरू येतील, पण मला वाटते की ते या कार्यक्रमाचे संचालन नाही करायचे. आधिच एका गाण्यामुळे जनतेनी त्यांना सळोकीपळो केल, आता जनतेच्या भावना दुखावणारे काहीही करणार नाहीत. ममांच्या जागी चन्द्रकांत कुलकर्णी,संजय नार्वेकर,गिरीश ओक्,अलका कुबल,हर्षदा खानविलकर यांच्यापैकी कोणी घ्यायला हवे.

>>त्या गौरीची ओळख करून देताना सारख सातारा सातार करत होते ममा.<<
अरे हो, सरळ सावत्र मुलगी म्हणुन ओळख का करुन दिली नाहि. हि माझी मुलगी, सातार्‍याला असते तिच्या पेरेंट्स बरोबर अशी सुरुवात केली. सावत्र हा शब्द सध्या बॅडवर्ड आहे का मुंबईत?..

हो ते काही कळले नाही मला. "मुलगीच आहे माझी. ( जसे आपण एखाद्या "मानलेल्या" नात्याबद्दल बोलतो तसे) ९ वर्षाची असताना तिचा डान्स पाहिला होता. तेव्हाच वाटले ही मोठी होऊन नाव काढेल" वगैरे म्हणाले. तेव्हा मला वाटले अशीच कोणीतरी ओळखीतली कलाकार असेल. आणि म्हणे आता करियर साठी मुंबई बेटर असल्याने इथे मुंबईत माझ्यासोबतच रहाते. असं मोघम का बोलायचं?

युट्युबवर कोणी तरी लिहिलं होतं कि फायनान्शिअल रिझन्स साठी दत्तक घेणे टाइप काहीतरी, सोशल वर्क .
गुड फॉर दॅट गर्ल आणि नाइस ऑफ म.मा असं असेल तर !
मी तर सगळं फॉरवर्ड केला एपिसोड शोच्या अधलामधला टीपी त्यामुळे पाहिला नाही डान्स.

Big boss cha creative team la phatke dile pahijet.eka criminal vyaktila janu kahi jivan gaurav puraskar dilyasarkha satkar kela Ani nirop dila.bakiche spardhak mhanje phaltu kivva kimmatshunya?

Pages