मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

हो भरत.

वीणाने एकदा बोलून गप्प बसायला हवं होतं. शिव सगळं सांगतो वीणाला येऊन तेही चूक आहे. शिवला फार इतरांशी बोलायला पण आवडत नाही खरंतर, पण सगळेच शिवशी बोलायला पुढे असतात, त्याला मनापासून वीणाशीच बोलायला आवडतं आणि आधी अभीदादा, वैशालीताई. तो शिवानीला फार भाव देत नाही म्हणूनही तिला राग येतो, तो काम करत होता तर शिवानीने स्वत: हून बोलावलं त्याला tatooचं विचारायला. तो नाही फार जात स्वत:हून तिच्याशी बोलायला. शिव जास्त फेमस आहे बाहेर माहितेय म्हणून धडपडतात सगळे त्याच्याशी बोलायला पण त्याला फक्त विनी एके विनी दिसते म्हणून सगळे जळतात.

आज फेसबुकवर कलर्सच्या आणि bb च्या वीणाने चुकीचा शब्द दया वापरला असं दाखवलं आहे, म्हणजे तो प्रोमो दाखवलाय तर उलट वीणाला positive comments आहेत, की भिक शब्द वापरायला हवा होतास. वीणा काहीच चुकीचं बोलली नाहीये कारण तिने जे तोंडावर सांगितलं ते पब्लिक गेले चार दिवस लिहितायेत, पार्शल आहे bb दोघींना याप्रकारे निवडलं म्हणून.

शिवानी nominate न होऊन म्हणते, मी इथपर्यंत येईन असं वाटलं नव्हतं, अग खरंच दयेवर आलीस ग तू.

खरंतर सो मि ह्या आठवड्यात शिव वीणा ताई या त्रिकुटाच्या बाजूने जास्त होता म्हणून म मां ना तेवढं तरी वीणाला उत्तम performer म्हणावं लागलं आणि शिवानीचे दोष दाखवायला लागले.

ओह. खूपच निगेटिव्हिटी आहे शिवानीबद्दल.

तीन वीकेंड्स तरी झाले. मांजरेकर नेहाकडे बघतच नाहीत. तिच्याबद्दल काही कमेंट्स नाहीत.

पुढचा सिझन आला तर ममां नकोत अस बरेच जण म्हणत आहेत.पण नका अस म्हणू
कारण मला खात्री आहे कि ममांना काढल तर महागुरू(सचिन पिळगावकर)किंवा डँमम इट( महेश कोठारे)यांच्यापैकी कोणालातरी आणतील
सहनशक्तीच्या पलीकडे जाईल
मी यावेळी एपिसोड कमी आणि वीकएंडचे डाव तरी पाहिले आहेत
पण वरच्या दोघापैकी कोणी आल तर ते ही अशक्य होईल
त्यामुळे ममां असू देत.बिबॉसने त्यांना जे बोलायच आहे ते बोलायच फ्रीडम द्याव.

पुढचा सिझन आला तर ममां नकोत अस बरेच जण म्हणत आहेत.पण नका अस म्हणू
कारण मला खात्री आहे कि ममांना काढल तर महागुरू(सचिन पिळगावकर)किंवा डँमम इट( महेश कोठारे)यांच्यापैकी कोणालातरी आणतील
<<
I posted exactly the same last season and this season discussions too Happy
Actually now I feel they'll do better job than Manjrekar.
More than the host , BB creative team needs to get replaced.

आज वीणा चांगलीच बोलत होती तिला खूप दिवसांनी आज ममा चांगलं म्हणाले म्हणून ती आतलं सगळं बोलू पाहत होती पण शिवानी मॅडम तिला चांगलं म्हटल्यामुळे चांगल्याच नाराज झाल्या त्यात आधीच त्यांनी पाठ करून ठेवलंच होतं विणाला बोलायचं. पण वीणा तिला पुरून उरली त्यामुळे ममांना आयतच कोलीत मिळालं विणाला बोलायला.
आज शिवाणीचा मेकअप भयंकर होता ती व्हॅपायर दिसत होती त्यात चेहऱ्यावरचे भयानक भाव बापरे. वीणा सगळं स्पोर्टिंगली घेत होती. दया म्हटली तर चिडण्याचं कारण नव्हतं, उलट झालं असतं आणि शिव वीणा ला तिकीट मिळालं असतं तर 100 ℅ हे तिघे असंच बोलले असते. विणाला गरीब हे गबाळ्या दिसतो आहोत अशा अर्थाने म्हणायचं होतं पण ह्या तिरकस त्रिकुटाला फक्त तिच्याविरोधात खाद्य हवं असतं, असो.

तिरकस त्रिकुटाला >>> मस्त शब्द. भरत यांनी पण मस्त नाव दिलंय त्यांना काल का परवा.

पण अगदी धन्यवाद ह्या तिकडीचे. त्यांच्या जळकुटेपणामुळे सो मि वर शिव वीणाला आधीपेक्षा positive कमेंटस यायला लागल्या आणि ताईना तर येत आहेतच पण शिव वीणाविरोधात थोडं वातावरण झालेलं ते निवळलं नक्कीच. आता वीणाही बऱ्याच जणांच्या goodbook मध्ये गेलीय.

मला तर वीणा ही आवडत नाही आणी शिवानी ही आवडत नाही. त्यामूळे त्यांच्या दोघींच्या भांडनामुळे बिग्ग बॉस बघावेसे वाटत नाही. शिवानी परत येण्याचा सगळ्यात जास्त फायदा वीणा ला झालायपण. त्यामूळे वीणा टॉप 2किन्वा 3मध्ये जाईल.

शिवानी किती खुनशी दिसते, हसते आणि बोलते. जराही गोडवा नाही. वीणाही किती किरकिरी आहे. अगदी लाडावलेली गुबगुबीत मांजर वाटते. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे आरोह खरंच शाळकरी वाटतो. नेहा किती गप्प गप्प असते. जितू किती बोलत होता. किती ज्ञान पाजळू असं झालेलं त्याला आणि बिचुकलेला काय सांगत होता जाताना. बिचुकले खूप बिचारा आहे आणि त्याच्यावर उगीचच केस वगेरे टाकल्या आहेत असे का बोलतात हे बाहेरून आलेले लोक त्याच्याशी. त्याला जामीन द्यायला यातले कितीजण जाणार आहेत वेळ पडली तर किंवा अगदी पैसे द्यायची वेळ आली तर. बाहेर ओळख तरी दाखवतील का काय माहित. बिचुकलेही किती हवेत उडतोय, हा यव म्हणाला आणि तो त्यंव म्हणाला. मागच्यावेळचं म्हणाल तर मेघा जिंकली कारण तिला तेव्हडी चांगली स्पर्धक नव्हती. रेशम फारच आळशी होती, सई प्रेमात पडली आणि पुरुष बोलबच्चन होते, ऋजुता असती तर मेघाला टफ दिली असती. यावेळी मोस्ट डिसर्विंग असं कोणी वाटत नाही.

काल पुन्हा एकदा सिद्ध झाले कि ममां माबो वरचा हा बिबि वाचतात, ते म्हणाले विणाला कि शिवानी नसती तर तू काय केलं असतंस?
इथे कोणीतरी लिहीलं होतं, आणि बरेच जणांनी हे मत व्यक्त केलं होतं कि विणा ची बाजू उठून दिसावी म्हणून शिवानी ला आणलंय

हा दुसरा सीझनच इतका फ्लॉप आणि बोअर ठरलाय की तिसरा सीझन बघायचा नाही अ शा निर्णयावर ९०% आलोय.
हाउसमेट्स कोण आहेत, त्यावर कदाचित निर्णय बदलला तर. नव्या चित्रपटाच्या टीव्ही प्रीमियरचे प्रोमोज पाहून रिंकू राजगुरूला आणावं असं वाटतं. वीणाची आई, नेहाचा नवरा, आरोहची बायको, वीणाचा एक्स. शिवानीचा बॉयफ्रेंड अशी नावं सुचताहेत. म्हणजे कंटिन्युटीही राहील Wink

<काल पुन्हा एकदा सिद्ध झाले कि ममां माबो वरचा हा बिबि वाचतात> - ते स्वतः किंवा त्यांना त्यांची टीम - मांजरेकर काल म्हणाले मी बायस्ड नाही.

कालचा एपिसोड बघून परत कळले की वीणा किती नीच आहे. घाणेरडी तर ती आहेच म्हणून त्या सतत पारोसा दिसणाऱ्या शिव बरोबर जुळले, नो वडर

काल शिवानी बरोबर बोलली की मी बोलते म्हणून तोंड दिसते पण हिचे काय? वीणा ने हे सांगितले की मी शिवानी च्या हातचे जेवणार नाही पण तरी जेवलीये हे मात्र सांगितले नाही, किती निचपणा, आरोह ने पण सांगितले दोघे कसे वागतात घरात, नुसते टास्क चांगले खेळून भागत नाही, तुम्ही एक चांगले माणूसपण असायला हवे, कोणीही जिंकले तरी चालेल अगदी कोणीही शिव शिवानी नेहा आरोह किशोरी, कोणीही पण ही पहिले पाच मध्ये पण नको

त्या शिवानीचा उर्मट आणि माजोर्डा स्वभाव आणि चेहरा बघून तर तिला दोन सणसणीत ठेऊन द्याव्याश्या वाटतात . एक नंबरची नीच बाई म्हणजे शिवानी . वीणाने ना कधी कोणाला शारीरिक इजा केली आहे . ना नेहासारखे जेटसच्या पॅन्ट च्या आत हात घालून घालून दुखऱ्या भागाला इजा पोचवण्याचा प्रयत्न केलाय . ना कोणाच्या हाताला चावली आहे . अतिशय स्वच्छ पारदर्शी एकदाही कॅप्टन न होता अजूनही घरात टिकून राहणारी एकमेव स्पर्धक म्हणजे वीणा . तरी ती आणि किशोरी ताई ज्या अगदी पहिल्या दिवसापासून टिकून आहेत या दोघींपैकी कोणीही विनर झालेलं चालेल पण नेहा आणि शिवानी नकोच नको

काय फालतुपणा शेवटचा विकेन्डव्हा डाव, जितु घुसला घरात, मी सगळं फॉरवर्ड केलं.
आज मांजरेकरने पुन्हा प्रुव्ह केलं कि शिवानी हीच त्याची बॅट्,बॉल्,स्टंप्,पिच सगळे काही आहे Proud
गुळमुळीतपणाने केलं सुरवातीला वीणाचं कौतुक पण जशी शिवानी त्याच्या नजरेसमोर आली कि त्याची लाळच टपकायला लागते जणु, ओरडायच नाटक केलं तरी नजर खिळलेली असते, काय वाट्टेल ते मुद्दे घेतो शिवानीचे, ती काढते मुद्दाम वाट्टेल ते मुद्दे इनक्लुडींग तो गरीबीचा मुद्दा काय, रात्री झोपेतून जाग येते वीणामुळे आणि मांजरेकर झेलतो सगळे मुद्दे, वर म्हणे शिवानीला काही फायदा नाही झाला म्हणे बाहेरून बघून आल्याचा, तसे तर सगळेच मागचा सिझन बघून आलायेत म्हणे Biggrin आर यु किडींग ? वावा टाळ्या !
वीणा शिवानी सोडून आज कोणी अस्तित्त्वातच नव्हते फार, नेहालाही काहीच मुद्दे बोलता येत नाहीत वीकेन्डला.

भरत तुम्हीच लिहिलं होतंत का, नेहाला शिवानीमुळे उलट तोटाच होईल, अगदी करेक्ट वाटायला लागलं आहे मला तुमचं म्हणणं.

केळकर पण जाताना नेहाला सांगून गेला, त्याचा मतितार्थ शिवानीपासून जपून रहा असाच होता. आधी नेहाला थोडा फायदा झाला पण आता शिवानीमुळे तोटा होतोय तिला. तुम्ही योग्य ओळखलं, ग्रेट.

वीणा एकटीच टफ देतेय त्यामुळे तिचं कौतुक होतंय आणि शिवानी म मां ची लाडकी असंच म्हणतायेत बरेच जण.

अंजू यांच्या सर्वच मुद्दयांशी सहमत, शिवानी ,नेहा , आरोह यांना इतका सॉफ्ट कॉर्नर का दिला जातोय माहीत नाही, कुणाच्या दयेवर इथपर्यंत आले नाही हा वीणा चा मुद्दा योग्य च होता, आणि किशोरी ताई ना बोलले मांजरेकर ते देखील पटल नाही, जिला बोलायला हवं तिला कुणी काहीच कसं बोलत नाही.

काल दहीहंडी मुळे मिस झालेला एपिसोड तो आत्ता बघितला

वीणाचे कसे झाले ना की युद्धात कमावल आणि तहात गमावल!
आख्खा आठवडा चांगली खेळली आजसुद्धा सुरुवात चांगली झालेली वीकेण्डचा डावाची पण ती "दया"वाली कॉमेंट तिने केली आणि तिथुन तिची गाडी घसरली
तिचे तिच्या बाजूने बरोबर असेलही पण आपण प्रेक्षक म्हणून तशी कॉमेण्ट करणे आणि त्या खेळात involve असणाऱ्या एखाद्याने तीच कॉमेंट करणे यात फरक आहे..... माझा प्रेक्षकांवर आणि माझ्या फॅन्सवर विश्वास आहे आणि ते पोचवतील मला फिनाले ला इतके बोलून ती थांबली असती तर ते तिच्यासाठीच जास्त योग्य ठरले असते
ते दया वगैरे म्हणून तिने नेहा-शिवानी ला तर दुखावलेच पण शोच्या फॉर्मेटलाही चॅलेंज केले मग मांजरेकरांची सटकणे साहजिक होते..... मग पुढचे तिचे काही मुद्दे बरोबर असूनही तिला म्हणावा तसा सपोर्ट मिळाला नाही!
मांजरेकरांची वीणा बद्दलची "सोअर ग्रेप" वाली आणि किशोरी बद्दलची "तळ्यात मळ्यात" वाली कॉमेंट परफेक्ट होती!

बाकी कुणाच्या संगतीत राहून नेहाचे नुकसान वगैरे होईल असे मला नाही वाटत.... कुणाला किती जवळ करायचे आणि कुणापासून कधी अंतर ठेवायचे हे तिला बरोबर कळते!
गेल्या आठवड्यात पण छोट्या छोट्या मुद्द्यांचे इश्यू करु नका असे ती शिवानी आणि आरोहला समजावताना दिसली आणि आजही तिने वीणाने शिवानीबरोबरच्या भांडणात सरसकट आम्हाला ओढू नये हा मुद्दा ही व्यवस्थित मांडला!

जितेंद्र जोशीचा घरातला वावर आवडला!

आरोह ने काल छान विश्लेषण केले. तो सर्वांची पोल खोल करतो म्हणून त्यांना (केळकर, शिव,वीणा) त्याचा राग येतो.

वीणा खूप आळशी आहे. जुना गडी नवे राज्य टास्क मध्ये किचन एरिया टास्क नको खेळायला असे सुशांतला म्हणाली.

जेव्हा जेव्हा नेहा safe झाली तेव्हा सगळेच safe झालेत. ज्यांचे contract आहे त्यांनी नेहावर दया झाली वगैरे बोलू नये.

काल नेहा म्हणाली की वीणा "हे लोक" "हे लोक" करत असते. त्यामुळे नेहा व आरोह वाईट दिसतात.

शिवानी व वीणा BB मध्ये नसत्या तर खूप छान झाले असते,
खूप negativity पसरवतात.

नेहा जिंकणार असं दिसतंय, शरद उपाध्ये आले होते शिवची रास वृश्चिक सांगितली आणि वृश्चिकेच्या लोकांना सध्या साडेसाती सुरू आहे.

जितेंद्र जोशीचा घरातला वावर आवडला! >>>>>>>> मलाही. फक्त ते बिचकुले आणि शिवानीची स्तुती पटली नाही. बाकी त्याच बोलण, कविता फर्मास होत्या. विदूषकावरची कविता स्केरी होती. त्याची प्रेमावरची कविता चालू असताना विणावर कॅमेरा फोकस होत होता.

कॅप्टन रुममध्ये कोणीतरी झोपलय बघून शिवानी इतकी पॅनिक का झाली? नेहा तिला म्हणतसुद्दा होती की तो माणूस आहे. तिला खरच मानसिक आजार आहे का?

नेहमीप्रमाणे ममा शिवानीपेक्षा विणावरच जास्त बरसले. तिला बोलूच देत नव्हते. शिवानीचा तो गरीब असण्याचा मुद्दा- विणा आणि शिव एवढे म्हणतायत की ते intentionally नव्हत. तरीही ममानी शिवानीनीच बाजू घेतली. त्यात शिवानीलाही वाटतय की ती आपल्याला गरीब म्हणाली. शिवानीचा ग्रुप विणाच्या ग्रुपने बोललेल्या प्रत्येक गोष्टीचा वेगळाच गैरसमज का करुन घेतात दरवेळी?

बाकी ते टॅटू सन्दर्भात विणाला बोलले ते योग्यच होत.

आरोह तर शिव- विणावर वॉचच ठेवून असतो, किती बेजबाबदार वागतात दोघे हे सान्गायला. हा, ते रात्रीची खरकटी भाण्डी सकाळी सिन्कमध्ये ठेवणे मलाही नाही आवडत.

>>त्या शिवानीचा उर्मट आणि माजोर्डा स्वभाव आणि चेहरा बघून तर तिला दोन सणसणीत ठेऊन द्याव्याश्या वाटतात .<<
या, रांगेत उभ्या रहा. Happy वीणा काल दारुगोळा घेउनच आली होती शिवानीला उध्वस्त करायला, आणि त्यात यशस्वी झालीहि. नंतर नंतर शिवानीची "दया" यायला लागली. शी निड्स हेल्प. सिरियस हेल्प...

वीणासुद्धा काल इरिटेटिंग वागत होती, एस्पेशियली मांजरेकर बोलत असताना मध्येच त्यांना इंटरप्ट करुन स्वतःचंच घोडं दामटण्याचा प्रयत्न करताना. इतकि साधी डिसंसी नाहि या लोकांमध्ये?..

आणि फक्त शिवानीच नाहि तर नेहा-आरोह आर हंगप ऑन वीणा टू...

वीणा काही वेळा खूप जास्त बोलते पण ती तिची चिडचिड असते आणि एकच शनिवार मिळतो ज्यात ती मांजरेकरांना हे सगळं सांगू शकते त्यामुळे हे ठीक आहे आणि तिने म्हटलेला " दया" हा शब्द तर एकदम चपखल होता . खर तर भिकच होती ती पण तिने जो माईल्ड शब्द वापरला तर काहीच हरकत नाहीये कारण जो तो नेहा आणि शिवानीला सेफ करत होता कि शेवटी प्रेक्षकांना जस वाटलं कि बिग बॉस ने आतून सगळ्यांना पढवून पाठ्वलेलं आहे त्या दोघींचेच फोटो लावायचे तेच घरच्या लोंकाना पण वाटत होत . म्हणजे हि पार्शलिटी घरच्या लोंकाच्या पण लक्षात आली . बाप्पाने आधी किशोरीचा फोटो उचलला होता पण तो ठेऊन शिवानी आणि नेहाचे फोटो उचलले यातच सगळं आलं कि त्या लोकांवर बिग बॉस ने किती दडपणच घातलं होत ते . शेवटी वीणा म्हणतेच आहे कि माझा या घरातला प्रवास बघितला तर एक लक्षात येईल मी माझ्या हिमतीवर खेळलेली आहे त्यामुळे बाहेर गेले तर माझ्या चुकीमुळे जाईन आणि घरात राहिले तर कोणाच्या दयेवर नाही याचा मला आनंद होतोय . अगदी बरोबर बोलली .

कॅप्टन रुममध्ये कोणीतरी झोपलय बघून शिवानी इतकी पॅनिक का झाली? नेहा तिला म्हणतसुद्दा होती की तो माणूस आहे. तिला खरच मानसिक आजार आहे का? >> आहेच तीला यात डाऊट च नाही . त्या कुंड्याच्या टास्क मध्ये किशोरी ताईंना का कोणाला तरी झालेला त्रास बघून ती जोरजोरात रडायला काय लागली . बाजूला जाऊन श्वास काय घेत बसली . माधव येऊन आणि कोण कोण येऊन तिला समजावत काय होते सगळी तिची नाटक झेलत होते . ती मनोरुग्णच आहे . पण बिग बॉसची आवडती कारण फाड फाड बोलते . बाकी तिला सकाळी नाचता येत नाही टास्क मध्ये नीट भाग घेता येत नाही . एक सुंदर चेहरा सोडला तर काहीच नाही तिच्याकडे

विना किंवा शिव जिंकायला हवी >> हो तसच व्हायला हवं खर तर पण माहिती नाही आले बिग बॉसच्या मना त्याच्या पुढे कोणाचे काही चालेना असं आहे Happy

<त्या कुंड्याच्या टास्क मध्ये किशोरी ताईंना का कोणाला तरी झालेला त्रास बघून ती जोरजोरात रडायला काय लागली . बाजूला जाऊन श्वास काय घेत बसली >
सात बारा. किशोरीला काटे टोचत होते. पण यासाठी जितेंद्र जोशीने शिवानीचे कौतुक केलं की दुसर्‍याला लागलेलं बघून हिला किती रडू आलं. इ.इ.
ते उपरोधिक असेल अशी शंकाही आहे. मी त्याला पुष्कळसा फा फॉ केला. नेमकं हे पाहिलं.
जेवढं पाहिलं त्यावरून अशोक नायगावकरांची आठवण आली.

कोणीतरी झोपलेलं पाहून तिची जी रिअ‍ॅक्शन होती तीही विचित्रच्या पलीकडची होती. इतके इश्युज आहेत की कॅमेरा वळवायची आणि सहानुभूती मि ळवायची गरज?

फ्रेंडशिप डेला नेहाचा मित्र म्हणून जितेंद्र जोशी आलेला ना? त्याला बघून ही आता परत रडणार असं वा टलेलं पण काल तेवढी रड्ली नाही Lol

बिबि बर्थडे पार्टी चा एपिसोड बघितला थोडा, कोणाकोणाला कुठली गाणी आली होती, त्यात आरोह शिव ला स्टेप सांगत होता मल्हारी वर :कपाळावर हात मारणारी बाहुली: शिवानी म्हणाली सुद्धा कोण कोणाला सांगतंय. मग हा शहाणपणा तिचा, विणाच्या बाबतीत वागताना कुठे जातो? सारखं तिला तिचा चेहेरा कसा असतो चेहेरा कसा असतो! बाई तुझ्या पेक्षा नक्कीच बघणेबल असतो. भरत म्हणाले तसं हिला आरसा दाखवा रे बोलताना कशी खुनशी दिसते आणि चेहरा कसा दिसतो स्वतः चा ते बघ. पण त्याचं सुद्धा बिल ती विणावरच फाडेल कि हिला बघून माझा चेहेरा असा होतो (आणि डोळ्यात पाणी बिणी आणेल रडण्याची अॅक्टिंग करेल)
जितू ला शिवानी चं रडणं फेक वाटलं नाही असं म्हणाला, ते त्याचं मत आहे, बाकी पब्लिक ला समजत कि ते आयदर फेक आहे ऑर शिवानी ला काहीतरी प्रॉब्लेम आहे सायकॉलॉजीकल

बिबि बर्थडे पार्टी चा एपिसोड बघितला थोडा, कोणाकोणाला कुठली गाणी आली होती, >> धनुडी शिव ला मल्हारी, वीणा ला आता वाजले की बारा ,बिचुकले ला आया रे राजा लोगो रे लोगो राजा के संग झुमलोरे झूमलो ,शिवानी ला देसी गर्ल ,आरोह ला झिंगाट ,नेहा ला कोंबडी पळाली किशोरीला पिया तू अब तो आजा .
मला फक्त शिव च जिंकलेला आवडेल बाकी कोणी नाही.
वीणा वीकेंड च्या डाव मध्ये फारच उध्दट पणे वागते. किती ते हातवारे तिचे हात दुखत कसे नाहित. शिवानी ला पण शु शु असे करत होती महेश सरांसमोर. शिवानी अल्यापासुन वीणा च्या सगळ्या चुकांकडे प्रेक्षकांचे दुर्लक्ष होत आहे. शिवानि वर चिडल्या मुळे तिने बनवलेले खाणार नाही म्हणालेली हे चुकी चेच आहे ना. शिवानि यायच्या अधि पण वीणा सगळ्यांशी उध्दट पणे वागत होती. म्हणून सोमीवर तिच्या वर टीका होत होती.

मला राज यांचं पटलं, वीणा नंतर इरिटेट करत होती, आधी मस्त बोलली, पण नंतर शांत रहायचं, ते नाही.

दया नेहाला लागू होत नाही पण शिवानी दयेवरच आहे, वीणाच्या बाजूने लोकं बोलतायेत सो मि वर, त्यामुळे ती success झाली, bb नी negative ली घेतलं आणि तिला काढलं तरी, आता लोक भडकणार नक्कीच.

Pages