Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बर्थडे टास्कमुळे वातावरण हलकं
बर्थडे टास्कमुळे वातावरण हलकं झालं. नाहीतर निगेटिव्हिटी उतू जात होती.
शिवानीचा लावणी डान्स छान होता.
शिव डान्स रियलिटी शोमध्ये जाऊ शकेल. किशोरीही.
बर्थडे टास्कमुळे वातावरण हलकं
बर्थडे टास्कमुळे वातावरण हलकं झालं. नाहीतर निगेटिव्हिटी उतू जात होती >>>
Oh, हा हेतू होता काय, sorry माझ्या लक्षात नाही आलं. मला वाटलं शेवटचा आठवडा असल्यामुळे त्यांच्याकडे आता काही नवे टास्क नाहीत so TP करत आहेत.
शिव कोरियोग्राफर च आहे ना.
शिव कोरियोग्राफर च आहे ना. त्याची dance acadamy आहे.
ते मराठी बिग्ग बॉस जत्रा मध्ये register करयला मोबाइल नंबर ही द्यावा लगतो का?
हो बहुतेक, इमेल किंवा फेबू
हो बहुतेक, इमेल किंवा फेबू ने लॉगिन करायचं, करुन बघ सोपं आहे. मला आता नीट आठवत नाही.
काही म.मां शिवानीला वगैरे
काही म.मां शिवानीला वगैरे ओरडणार नाहीत, त्यांना फार प्रिय आहे ती, हा शेवटचा वीकेन्डचा डाव असल्यानी स्पेअर करतील.
उलट वीणाला ओरडतील, शिवानीने काढलेल्या गरीब श्रीमन्त मुद्द्यावरून, शिवाय वीणाला तू का नाही उतरलीस शेवटी वरूनही ओरडतील.
शिवानी किशोरीला फॅमिलीवर पर्सनल रिमार्क्स म्हणून ओरडली म्हणून म.मा सुध्दा किशोरीलाच ओरडतील, बिचुकलेलाही ओरडतील ते शिवानीला ‘आपण दोघे जिथून आलो ‘ म्हंटल्याबद्दल , म्हणजे फिनाले आधी शिवानी खुष आणि शेवटचे ५ दिवस अजुन धुमाकुळाची गॅरेंटी
Btw मेघानी स्क्रीनशीट शेअर केलाय, शिवला ५१ वोट्स आणि किशोरीला ४८.
किशोरीच्या ऑफिशिअल ट्विटरने मेघाचा किशोरीसाठी वोट अपिल व्हिडिओ सुध्दा टाकलाय.
शिवानी ने मागच्या आठवड्यात
शिवानी ने मागच्या आठवड्यात शिव आणि वीणा ला टार्गेट केले आणि नेमके नंतरच्या वीकेन्ड ला ममां त्यांना ओरडले त्या नंतर म्हणे शिवानी म्हटली होती नेहाला की बघ. इट वर्क्स. तिला असे वाटतेय की तिच्या म्हणण्यावरून ममांनी झापले.
वीणाच हे परवा सांगत होती.
उलट वीणाला ओरडतील, शिवानीने
उलट वीणाला ओरडतील, शिवानीने काढलेल्या गरीब श्रीमन्त मुद्द्यावरून, शिवाय वीणाला तू का नाही उतरलीस शेवटी वरूनही ओरडतील. >>> हो हो, अगदी अगदी
तेव्हा वीणाने सांगायला हवं, तुम्हीच म्हणाला होतात ना, सर्वसहमती झालीच पाहिजे, टास्क थांबला तरी चालेल.
अजून एक मुद्दा आहे, शिवला चीयर अप केलं त्यावरून बोलले होते म मां, ते रडत सांगत होती ताईंना. मी loyal आहे, तसं वाटत नसेल तर मला पाठवा, मम्मा मम्मा करत होती ना. ती तिच्या आईला हाक मारत होती, ह्यांना वाटलं असेल म मां
.
शिवला नेहाला बोट लावलं म्हणून बोलतील. शिव आज वीणाला छान सांगत होता, कसं एका मुलीच्या आणि मुलाच्या बाबतीत होतं ते.
केक संपवा टास्क लास्ट टाईम सई आणी पुष्कर मध्ये झालेले. >>> हो मलाही आठवलं.
शिवानी आरोह केक नको म्हणत होते, चॉकलेट केक आवडत नाही आरोहला पण केक आला पाईनअॅपल मग शिवानीला असलं वाईट वाटलं, अरे पाईनअॅपल आलाय म्हणाली आणि नंतर अधाशासारखी बघत होती, कॅमेरा नेमका ते दोघे केक खाताना, तिच्यावर मारला दोन तीनदा.
मेघाने किशोरीला सपोर्ट केलंय
मेघाने किशोरीला सपोर्ट केलंय हे चांगलं आहे. आता सोशल मीडियावर बिग बॉससाठी दबाव बनत चालला आहे की चीटिंग बंद करा. किशोरी मोस्ट पोटेन्शियल आहे.
नाहीतर मग टॉप ५ कोण होतील?
अर्धा शो संपल्यावर आलेला आरोह.
एकदा बाहेर जाऊन परत काही आठवड्यांनी आलेली शिवानी.
टास्कमध्ये दुसऱ्या स्पर्धकाला चावणारा शिव.
हायजीन इश्यू असलेली वीणा.
सायको आणि थरकी नेहा.
कलाकार किरण माने जे
कलाकार किरण माने जे मागच्यावर्षी मेघाच्या बाजूने लिहित होते, तेही कलर्स फेसबुकवर किशोरीताईच्या बाजूने लिहितायेत आणि त्यानंतर त्यांचा पाठींबा शिव वीणाला दिसतोय.
ताई शीव वीणा या त्रिकुटाला बऱ्याच जणांचा soft corner मिळतोय, नेहा शिवानी आरोह तिकडीपेक्षा.
किशोरीने कधीही स्टँड घेतला
किशोरीने कधीही स्टँड घेतला नाही,
कायम कोणा ना कोणाचे शेपूट बनते ,
जो समोर असेल त्यासोबत गुडीगुडी बोलायचं वीकएंड ला इकडून तिकडे उड्या मारायच्या
फिनाले चा प्रॉमिस तिलां पण आहे , त्यामुळे फक्त बिचुकुले बाहेर जातील आणि सोबत आरोह
फिनाले चा प्रॉमिस तिलां पण
फिनाले चा प्रॉमिस तिलां पण आहे >>> हो का, कोणाकोणाला bb नी फिनाले प्रॉमिस दिलंय. मग सहाही जणांना पाठवायचं होतं खरंतर, मागच्यावर्षीसारखं. मग शेवटच्या दिवशी एकेकाला काढायचं.
काहिहि... तसे तर मग वीणा
काहिहि... तसे तर मग वीणा च्यानेल मुले इथवर आली आणि शिव वीणा फेक लवस्टोरी मुले इथवर आला असे म्हणावे लागेल.>>+१११
>>मला अजिबात वाटले नाही की नेहा वुमन कार्ड खेळत होती. सुरुवातीपासूनच त्यांचे तू चुटकी वाजवू नको माझ्यापुढे, तू फिंगर पॉइन्ट करू नको यावरून भांडण चालू होते काल. त्याचेच एक्सटेन्शन होते तिचे वाक्य.>>+१११
मागेही इथेच कोणीतरी लिहिलं
मागेही इथेच कोणीतरी लिहिलं होतं ना , कि तडतडी कंप्लेंट बॉक्स वीणा सुसह्य वाटावी म्हणून शिवानीला परत आणलय? Happy>>>या मताला मात्र +१००१.
अजूनही वीणा अज्जीब्बातच आवडत नाही...पण गेल्या ५/६ आठवड्यात कधी एकदा जातेय वाटणारी वीणा त्या शिवानीने तिला टारगेट करत राहिल्यामुळे सिंपथी वाटून वाटून चक्क सहणेबल झालीये. मात्र शेवटच्या २ जणांत ती?? बिल्कुलच नाही कल्पना करवत.
नेहाचं ओरडणं फक्तं फिंगर
नेहाचं ओरडणं फक्तं फिंगर पॉइंट करु नको यावरच होतं का ?मग मी फॉरवर्डच्या घाईत पाहिलं असेल मग , पण तिने मागच्या गोष्टी काढायला सुरवात केली, मागेही तू माझ्या अंगावर पडलास वगैरे जुने कांगावे काढत होती ती.
अशा गोष्टींचा इश्यु करायचा तर तिने स्वतः टास्कमधे फिजिकल होऊ नये मग, ती स्वतः अंगावर धाऊन जाते, फिजिकल होते कि बरेचदा!
हे फक्त आत्ताच नाही ,माधव- वीणा कॅप्टन्सी टास्कमधेही ओरडली होती शिववर कि अंगाला हात लावलास तर बघ, जेंव्हा तिची वॉटरबॅग खेचायला आला.
परागलाही चोर पोलिस टास्कमधे फोटो फ्रेम चोरी करायलस आली होती तेंव्हा म्हंटली होती कि माझ्या जवळ असा हात आडवून उभा राहिलास तर मी तक्रार करीन.
हे ड्बल स्टँड्र्ड्स बरेचदा दिसलेत तिच्या वागण्यात, त्यामुळे इतरांपेक्षा हुषार असली , चांगले मुद्दे मांडायची अॅबिलिटी असली तरी एकदमच मनातून उतरते अशा वागण्यानी !
नेहा ला जास्त फॅन नाहीयत.
नेहा ला जास्त फॅन नाहीयत.
मला वाटत आहे पण आज ममां
मला वाटत आहे पण आज ममां बोलतील शिवानीला.त्यांचा जो मेन पॉईंट असतो ,शिव आणि वीणा ,त्यांची रिलेशनशिप, त्याबद्दल या आठवड्यात बोलण्यासारख काहीच नाही.
बाकीचे मुद्दे लगेच निकालात काढेल वीणा......
आणि बिचुकले ममांच ऐकतच नाहीत,त्यातून त्यांना आज नारळ देणार असतील तर फार नाही बोलणार.
पुढच्या आठवड्यात तस फार काही नसत,आणि मुख्य म्हणजे शिवानी भांडणार नाही,वोटिंग चालू असेल ना.
काल लगोरी आणि चेंडू मारणार्
काल लगोरी आणि चेंडू मारणार्याच्या मध्येच उभं राहायची नेहाची स्ट्रॅटेजी मस्त होती. ती तिने शिवच्या वेळी केली असती, तर सामना बरोबरीत सुटला असता.
काल ती शिवला किती छान समजावून सांगत होती, प्रत्येक फुगा किती फुगवायचा, पण तो येडा ऐकतच नव्हता.
--------
किशोरी फुगे फोडताना "पिया तू अब तो आजा" वर नाचत होती, ते धमाल होतं.
----------
अंजू आणि दीपांजली, तुम्ही मांजरेकर आणि बिग बॉस टीमवर रिव्हर्स सायकॉलॉजी वापरताय का?
मला वाटत आहे पण आज ममां
मला वाटत आहे पण आज ममां बोलतील शिवानीला>>
बोलतील म्हणजे एखादं पुसट वाक्य सोडून देतील. ओरडणार नाहीतच..
हीना आणि शिवसाठी वाईट वाटतं मला.. म मां फारच अपमान करायचे दोघांचा .. शिवचा अजूनही करतील..
काल ते बिचुकले आणि मंडळी
काल ते बिचुकले आणि मंडळी सजावट प्रकरणावरुन नेहा वर उगाचच भडकले...... नेहा च्या ऐवजी शिवानी असती तर बिचुकलेंनी इतकी बडबड केली असती का?
बाकीच्यांनी लगेच वाहत्या पाण्यात हात धुवून घेतला.... नेहा ची मैत्रीण म्हणवणारी शिवानी अश्या वेळी एकदम सोयीस्करपणे गप्प बसते!
ते बिचुकलेंनी उगाच उड्या मारुन वरती फेकलेल्या त्या झिरमुळ्या खरच शॅबी दिसत होत्या.... त्यात एव्हढा मोठा बवाल करण्यासारखे काही नव्हते
शिवानी काल चांगली दिसत होती पण कुणीच फार भारी वगैरे नाचले नाही..... हीना ने मिस केला असेल हा टास्क!
वीणाला डान्स येत नाही असे ती म्हणत असली तरी जेंव्हा जेंव्हा करायची वेळ येती तेंव्हा ती प्रामाणिकपणे प्रयत्न करते
नेहा अधुनमधुन मस्त डायलॉग टाकत असते.... काल शिव ला तो केक खात असताना एक मस्त पंच टाकला तिने!
किशोरीचा काय तो फुगे फोडण्याचा अट्टहास..... अगदीच बालिशपणा चालला होता!
बिग बॉसनाच बहुतेक बघवले नाही ते आणि त्यांनी तो टास्क थांबवला!
किशोरीचा काय तो फुगे
किशोरीचा काय तो फुगे फोडण्याचा अट्टहास..... अगदीच बालिशपणा चालला होता!
बिग बॉसनाच बहुतेक बघवले नाही ते आणि त्यांनी तो टास्क थांबवला>>अट्टाहास याच साठी कारण ती nominate आहे..तिला स्वताला फुटेज मिळाव अस वाटत च असणार... त्यात बालिशपणा काय झाला..बिग बॉस चाच टास्क होता.. आणि जेव्हा टास्क थांबवला तेव्हा बरेच फुगे फोडून झाले होते.. सगळच दाखवत नाहित.. वीणा आणि शिव ने पण केलाच की केक टास्क
मला वाटत गेल्या वर्षी बर्थडे party टास्क खूप वेळ चालला होता.. यावेळी सगळच लुटू पुटू.. पहिले अर्धा तास काहीबाही दाखवत बसतात मग ऐक्चुअल टास्क
बिबॉने त्या आळशी गुड फॉर
बिबॉने त्या आळशी गुड फॉर नथिंग बिचुकलेला पाहुणा ठेवण्या ऐवजी हिनाला आणायला हवं होतं पाहुणी म्हणून या डान्स टास्कला, हिनाला फार मिस केलं आज !
बिबीची क्रिएटिव टिम जामच गंडली आहे, पराग एलिमिनेट झाल्यावर हॉटेल टास्क आणि हिना एलिमिनेट झाल्यावर डान्स टास्क !
आज शिव छा गया, फुगे फुगवणापासून, केक खाणे, डान्स करणे सगळं भारी केलं शिवने !
त्याचा मल्हारी डान्स छान झाला आणि नेहानेही कोंबडी पळाली चांगला केला, किशोरीला फुगे फोडायला लावले ते फनी होतं पण तिचा डान्स आणि एक्स्प्रेशन्स नाही बघवत मला.
वीणा आणि शिवानीला तर हलतानाही कष्ट पडतात.
आता नेक्स्ट काय? प्रेस येणार घरात ?
किशोरीचा काय तो फुगे
किशोरीचा काय तो फुगे फोडण्याचा अट्टहास..... अगदीच बालिशपणा चालला होता!
बिग बॉसनाच बहुतेक बघवले नाही ते आणि त्यांनी तो टास्क थांबवला! >> अगदी अगदी! आणि टास्क थांबवल्यावरदेखील मिनीट्भर किशोरीला दाखवत राहिले. केवढी दमली होती ती! पण नसती हौस! नेहा तिच्या आधी म्हणली होती मी फोडते फुगे म्हणून! पण "कन्व्हीनियन्ट्ली" ते टास्क तिच्याकडे दिले गेले, नेहा व इतरांकडून!
वरच्या भरत. आणि स्वरुप आणि दीपांजली यांच्या पोस्टला +१११
मला अजुन एक जाणवले की जेंव्हा
मला अजुन एक जाणवले की जेंव्हा पार्टी संपताना सगळे एकत्र येवून त्या डायस वर नाचत होते; तेंव्हा किशोरी शिवानीच्या मागे होती आणि ती अगदी कलून वाकून सीनमध्ये यायचा प्रयन्त करत होती..... नंतर हळूहळू (बहुतेक करुन) शिवानीला बाजूला करत अगदी कॉर्नरवर का होईना पण पुढे आली ती!
इतका कसला तो अट्टहास आणि अगदी नॉमीनेशन मध्ये असला तरी इतकी कसली ती मजबुरी.... एके काळच्या स्टार म्हणवता न स्वतःला मग त्याचा आब ठेवा की थोडा!
स्वरुप, फारच कीन ऑब्झरवेशन
स्वरुप, फारच कीन ऑब्झरवेशन आहे तुमचं! आता किशोरीची ती धडपड बघते परत एकदा!
हो बरोबर स्वरुप , फार
हो बरोबर स्वरुप , फार डेस्परेट वागतेय किशोरी !
मला अजुन एक जाणवले की जेंव्हा
मला अजुन एक जाणवले की जेंव्हा पार्टी संपताना सगळे एकत्र येवून त्या डायस वर नाचत होते; तेंव्हा किशोरी शिवानीच्या मागे होती आणि ती अगदी कलून वाकून सीनमध्ये यायचा प्रयन्त करत होती..... नंतर हळूहळू (बहुतेक करुन) शिवानीला बाजूला करत अगदी कॉर्नरवर का होईना पण पुढे आली ती! >> हो हे मी पण ऑबसर्व केल...
पण किती ही झाल तरी किशोरी 51
पण किती ही झाल तरी किशोरी 51 वयाची असताना सुध्हा टास्क साठी किंवा प्रत्येक फ्रेम मध्ये येण्यासाठी तिची एनर्जी लेवल 30शी च्या लोकांच्या बरोबरीने आहे..काहिवेळा जास्तच.. कालही ते सजावटी च सामान आणायला सगळ्यात आधी पळत गेली..मी म्हटल कुठून आणते एवढा stamina..बाकीचे तिच्या वयाचे कधीच कंटाळून घरी बसलेत.. लास्ट सिजन ला रेशम हिच्या पेक्षा 8 10 वर्ष लहान असलेली कंटाळली होती... काल दिलेले प्रोप्स वापरुन डान्स करायचा होता..फक्त किशोरीने शेवट पर्यंत डोक्यावर ठेवला होता विग..तो बरा दिसत होता की नव्हता तो भाग वेगळा... तिच्या पेक्षा निम्म्या वयाची शिवानी कपडे बदलून झोपायला गेलेली..टास्क संपला नव्हता तेव्हा..
तिच्या स्टॅमिना आणि एनर्जी
तिच्या स्टॅमिना आणि एनर्जी लेव्हल साठी Thumbs Up आहेच!
त्याबद्दल वाद नाही!
किशोरी टास्क करताना कंटाळत
किशोरी टास्क करताना कंटाळत नाही, हे खरंच आहे. वीणा आणि शिवानी दोघीही तिशी यायच्या आधीच किती बोजड आहेत. या कसल्या सिनेमाच्या हीरॉइन होणार? या सिरियलपुरत्याच बर्या आहेत. इनफॅक्ट यांपैकी कोणाचं करियर असं असेल पुढे? त्यातल्या त्यात किशोरीच नवे सिनेमे करेल असं वाटतंय
नेहा आणि आरोह वेबसीरीज वगैरे. भरत म्हणतात तसं शिव-शिवानीने डान्स रिअॅलिटी शो चा विचार करावा. शिव इतका हेवी वेट आहे, पण नाचतो मस्त. वीणाचं इमॅजिन नाही करता येत आहे!
मला असं वाटतंय, की व्होटिंग असलं तरी यंदा कोणीही बाहेर पडणार नाही, टॉप ६ असतील. आरोहचं सेटिंग आहे का नाही माहित नाही, पण तो एकदम फेअर प्लेयर आहे, त्यामुळे त्याने जायला नको आता. किशोरी इतके दिवस राहिली, राहूदे की अजून १० दिवस
(बिचुकलेंना का काढत नाहीयेत हा एक वेगळाच मुद्दा आहे!)
शिव आणि वीणा सेफ झाले आहेत
शिव आणि वीणा सेफ झाले आहेत.किशोरी आणि आरोह डेंजर झोन मध्ये आहेत.खूप कमी मतांचा फरक आहे.
पण बिबॉस च्या ट्रेंडनुसार तीन बायका आणि दोन पुरुष लागतात,त्यामुळे बिबॉस किशोरीला काढू शकतात
पण मला वाटत कुणालाही काढणार नाहीत.
अस जर केल तर शिवानी आणि नेहा दोघींचा जाम पचका होईल
उगाच भांडल्याचा पश्चात्ताप होईल.
Pages