बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वैशाली जाताना वाटलं की ती जशी प्रत्यक्षात आहे तशी तिला दाखवलं नाही.तिनं रडवलं सगळ्यांना.
तिची चांगली बाजु दाखवलीच नाही की काय ? तिला कायम बेड वर बसुन कुचकट्पणा करताना दाखवलं का बिबॉ नी ?
ती जाताना वाईट वाटलं खरचं.काल मला अगदीच वाटलं की खरच हा शो स्क्रीप्टेड असणार. त्याना जसं हवं तसं लोकांकडुन काम करवुन घेतात न मग झालं की परत पाठवतात.
या लोकांसोबत आत येतानाच कॉन्ट्रॅक्ट केलं असणारे की अमुक अमुक ईतके दिवसच तुम्हाला ठेवणार म्हणुन. त्यामुळे ते संपल्यावर तिला घालवलं. अगदीच खुप टीआर्पी देत असतील तर चेंज करत असतील थोडाफार.
रुपाली ला आणि माधव ला घालवावं आता. लई बोअर करतायत दोघे.
फॉर अ चेंज केळ्या हुशार वाटु लागलाय आता मला Happy ममां म्हणाले तसा त्याचा फोकस क्लीअर आहे. वैशाली गेली तरी त्याला फार फरक नाही पडणार. काल पण बळच रडं काढलं ती जाताना. मनातुन त्याला फार काही फरक पडलाय असं नाही वाटलं.

कालचा भाग बोअर. शिव वीणा चा खुप कंटाळा आला. शिव ला जरा काही दिवस सीक्रेट रुम मधे पाठवायचं ना काल आणी बघायचं मग वीणाचं वागणं. आणी शिवानी ताईंचा मुक्काम वाढवला का बिबॉ नी ? घालवायचं ना तिला पण काल. मग नेहा न माधव जरा जमिनीवर आले असते.
का चांगली वागतेय न टास्क करतेय म्हणुन खरच तिला करतात वाईल्ड कार्ड.
आरोह शांत वाटला काल. बघु कसं करतोय टास्क.

केळकर नेहापेक्षा पण हुशार वाटायला लागला आहे कुचका असला तरी. तो माणसे जास्त धरून आहे. शिवानीला लवकर पाठवल नाही तर नेहा भ्रमात राहील. हीना सटकलीच तिच्या तावडीतून म्हणजे grp मधून, वीणा आणि केळकर pamper करतायेत तिला, जे दुश्मन होते आधी ते जुळवून घेतायेत.

नेहा कॅप्टन??? नको रे बाबा.. सगल्या घराचे चिडणाऱ्या घरात रूपांतर करेल.
तिचे तोंड दिसले tv बंद करावा वाटतो. Thoda तरी न्यूट्रल हावभाव असावे कि चेहऱ्यावर , कायम चिडलेला, खुन्नस वाले एक्सप्रेशन्स.
टॉप 5 मध्ये असेल पण जिंकणे अवघड आहे तिचे. अर्थात पुण्याच्या लोकांनी मते दिली तर शक्य आहे म्हणा.

सुधारते का बघूया.

रुपालीपेक्षा ती झाली तर चालेल असं म्हणायचं आहे मला. रुपाली जावी आता.

नेहा खुन्नस देतेच पण एखादी ठमाकाकू कशी सगळ्यांना शिकवत असते त्या टोनमध्ये कित्ती ग बाई मी हुश्शार करत ज्ञान पाजळत असते बरेचदा. कोणीही ऐकत नाही, अगदी माधवसुद्धा Lol

त्यामुळे शिवानी आल्यावर तिने होल्ड घेतला तर सगळे तिचे ऐकायला लागले मग नेहा माधवला म्हणाली आपण दोघे मेन आहोत हे लक्षात ठेव, आता इक्वेशन्स बदलली आहेत.

कॅप्टनशिप साठी शिवानी आणि केळ्या दावेदार आहेत असं एका प्रोमोत दिसले. शिवानीला खरंच कन्टेस्टन्ट चे स्टेटस बहाल करतात की काय आता बिबॉ.

वीणाने आता जरा नेहेमीच नीट वागावं, मागच्या आठवड्यात वागली तशी. त्या नेहासारखं एक आठवडा नीट वागून परत ये रे माझ्या मागल्या करू नये.

कालच्या एपिसोड मध्ये तो ईमोजी वरुन गाणी ओळखायच गेम सुपर बोरिंग होता. आणी प्रत्येक गेम मध्ये महेश सर डांस करायला का लावतात कंटाळा येतो त्याचा.वीणा तर कधी नीट डांस करत नाही.
तो मी टीवी वाला गेम पण पकाऊ होता. शीव त्याच्यात किती धावपळ करत होता इतकी मेहनत जर खुनी च्या टास्क मध्ये केली असती तर
चांगले झाले असते.

तिने त्या केसाच्या फ्लिक्स नव्यानेच कापून घेतल्या आहेत वाटते. >>> विग घातलेला. ते विग बघत होतेना काहीजण.
>>> नाही अन्जू विग नाही आहे. कापलेच आहेत तिने आजच्या एपिसोड मध्ये पण तसेच केस आहेत तिचे प्रोमोत पहिले

रविवार एपिसोड कायम बोअर होतो. त्यामुळे फार बघत नाही मी. शेवटी थोडा वेळ बघते, कोण जातंय ते. शनिवारी पूर्ण बघते. Tv सुरु असतो पण फार बघत नाही मी रविवारी.

शिवला हाकला आता. दोन आठवड्यांपासून बोअर करतोय.
रूपाली वीणा जसं रूठना मनाना करायचे, तसं तो करतोय.. स्वतःच रुसून बसतोय.
त्याने वर्क आउट करायचं पण थांबवलंय का? तोंड सुजलेलं दिसतंय.

शिव ला नाही घालवणार. मेल कमी आहेर तिथे फिमेल जास्त.
मला तर शंका आहे माधव ला सर्वात कमी वोट असतील पण मुद्दाम त्याला काढले नाही.

हम्मम्म.

तो बिचुकले हायकोर्टाने जामीन नाकारल्याने परत आत आहे, म्हणून हिला ठेवलं बहुतेक.

हो Amupari विग नाहीये, आता ती अजून भयानक दिसतेय.

शिवानि कैप्टन झाली. या आठवड्या त nominations नसतील बहुतेक.
गेस्ट ची सदस्य झाली का शिवानि . बीबी ना तिला कैप्टन करायचे असेल म्हणुन तर तिला टास्कमध्ये खुनी केलेले.तिला टास्क मध्ये खुनी केल्यावर वाटलेलेच की ती काही लवकर जाणार नाही.

आहेत नॉमीनेशन्स.

TRP तर खाली आलाय bb चा असं म्हणतात मग शिवानीला कसं ठेऊन घेतलं सदस्य म्हणून काय माहिती.

नेहाला कुणितरी आत मध्ये जाऊन ती कशी खेळती आहे हे सांगण्यापेक्षा तिचे ड्रेस्सिन्ग आणी हेयर स्टाईलिंग भयानक आहे हे सांगण्याची गरज आहे.

या आठवड्यात किशोरी ताई जातिल नेक्स्ट रुपाली जाईल पूढे जर नविन वाइल्ड कार्ड ने काही केले नाही तर तो जाईल किन्वा माधव. असे वाटते.

शिवानि कडे प्रेक्षकांचा कल कसा आहे हे बघुन शिवानि ला ठेवतिल किन्वा काढतील. लोकांचा तिच्या विषयीचा राग कमी झाला असेल तर तिला कंटिन्यू करतील. नसेल तर काढतील. लोक चिडले होते म्हणून सुरुवातीला पाहुणी म्हणून आणले आता कैप्टन केले. शिवानि बाबत लोकांचा राग थोडा निवळल्या सारखा वाटतो.

येडेपणा आहे सगळा, आधी शिवानीला अपमान करून हाकलणे, मग तिला सुधारयला आणि बाहेरून बघून व्यवस्थित होमवर्क करायला आणि इमोशनली फिट होण्यासाठी वेळ देणे, मग गेस्ट बनवणे , मग काँटेस्टन्ट, बिबॉ टिम इज बिग फेल्युअर धिस सिझन !
आता बिचुकले सुटला कि त्यालाही आणा मग आणि डायरेक्ट विनरही बनवा त्याला Happy
वैशाली बाकी जाताजाता इमेज क्लिअर करून गेली आणि ऑल ऑफ अ सडन हेटर्स सुध्दा हळहळून गेले, सोशल मिडीयावर तिला ट्रोल करणारे सगळे हेटर्स अचानक इमोशनल मेसेजेस टाकू लागले !
गुड फॉर हर, कंप्लिट निगेटिव इमेज न घेता , सिंपथी/इमोशनल कार्ड्स न खेळता, कायम मित्रांशी लॉयल राहून ग्रेसफुली गेली, तिचा ए.व्ही सुध्दा फार छान बनवला होता !
बाकी रुपाली, किशोरी, माधव सारखे अत्यंत बिनडोक आणि स्वतःचा काहीही स्टँड नसणार्या फालतु स्पर्धकांआधी वैशाली गेली हे नाही आवडले.

Pages