मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो आज जाम राडा होणार आहे,
>>>>>पण त्या साम दाम मध्ये तो पराग किती भयानक दिसत आहे>>>> हो भयंकर दिसतो त्याचा चेहेरा,

परागला वेड लागलय, त्याचा सध्या रोमिल चौधरी झालाय, मित्रं बदलत रहाणे, सगळ्या बायकांच्या मागे असणे आणि स्वतःला मास्टरमसिंड समजणॅ !
ना घरका ना घाटका, उद्याच्या ट्रेलरमधे काय साम दाम दंड भेद केकाटतोय Biggrin
परागची टार्गेटही सतत बदलतात, कधी बिचुकले, कधी शिव, कधी वीणा , आता काय केळ्या आणि वैशाली या २ लोकांना काढण्यासाठी पराग इतकी मेहनत करून गृप स्विच करतोय ? पण हा स्वतःच असतो नॉमिनेटेड कायम Proud
वीणानी तिचा गेम बदललाय वाटतं, परागला खुन्नस द्यायला लागल्यापासून थोडी टोन डाउन झालीये आणि बरी वाटतेय चक्क !
हिनानेही आवाज चढवायला सुरवात केलीये परागवर, बिचुकले आणि इतर पुरुष मंडळींच्या मागेमागे करायच्या ऐवजी चांगला गेम खेळला पाहिजे तिनी !
रुपाली-बिचुकले प्रकरण एकदमच फुस्स , बिबॉ टिमने काहीतरी जबरदस्तं सुनावलेलं दिसतय कि रुपाली माफी मागायला गेली ? कदाचित काहेतरी एडीटींग लोचे दिसतयेत, दोघही शान्त एकदम विकेन्डच्या वार आधीच, कदाचित रुपालीला अजुन माहितच नाहीये त्यानी काय काय तिच्या कॅरॅक्टरसकट किती गोष्टींबद्दल वाईट बोललेत ते!

शिवानीने TOI ला जी पहिली मुलाखत दिली तिथेच तिचा मराठी बिबॉसचा प्रवास संपला,ती त्या फॉर्मँट मधूनच बाहेर आली.एकतर ती घरी गेली,सोमिवरही अँक्टिव्ह आहे,इंटरव्ह्यू देत आहे,त्यामुळे,ती इता स्पर्धक राहिलेलीच नाही.
तरी जर ती आली,तर या वेळी मात्र बिबॉस वरून संपूर्णपणे लोकांचा विश्वास उडेल
कदाचित हिऔदी बिबॉसमध्ये जाऊ शकेल.

शिवानी सगळीकडे बिग बॉसने हाकललं नाही, मीच सांगितलं होतं बाहेर जायचंय ते फक्त ऐकलं असं सांगत्येय

आजच्या लोकसत्ता मधे शिवानीचि बातमी आहे, ति म्हणे परत येउ शकते शो मधे. Uhoh>>>>>>> बाहेर येऊनही तिची काहीच बातमी नाही त्यावरूनच मला वाटलं होतं की ती परत येऊ शकते.

ते बिग बॉसचा मेसेज ऐकून आल्यावर परागने नेहाला तो बॅच मागितला काय.... बिग बॉसने तसे करायला सांगितलेय म्हणाला काय मग परत तो नेहाला दिला काय?.... नक्की काय करायचे होते त्याला?
अतिशहाणपणा केला की असे होते! >> बिग बॉस ने पराग ला का कन्फेशन रूम मध्ये बोलावलं ? नेहाला बोलवायला पाहिजे होत ना ? कारण ती मॅनेजर होती . पण त्याला बोलावलं कारण बिग बॉस ला परागलाच कामगार म्हणून वागू नका खेळाडू म्हणून वागा असं सुचवायचं होत जे परागपर्यंत नक्की पोचेल अशी बिग बॉस ना खात्री होती आणि ती हिंट पराग पर्यंत पोचली . त्याला वाटलं बिग बोस ने मला बोलावलं आहे म्हणजे आता मला मॅनेजर होण्यासाठी बिग बॉस सुचवत आहेत म्हणून नेहाकडून बॅच मागून घेऊन स्वतःच्या शर्टाला लावला आणि जेव्हा केव्हा आतून कपडे आणावेत असं त्याच्या लक्षात आलं तेव्हा ताबडतोब बॅच काढून नेहाला परत देऊन टाकला आणि कामगार बनून आत मध्ये जाऊन कपडे घेऊन आला. . बॅच परत करायचा हे पण त्याला तिथल्या तिथे सुचलं. यात अतिशहाणपणा काहीच नाही . तो डोक्याने शार्प आहे . आणि तो तसा आहे असं बिग बॉस ला पण वाटत असावं Happy

परागची टार्गेटही सतत बदलतात, कधी बिचुकले, कधी शिव, कधी वीणा , आता काय केळ्या आणि वैशाली या २ लोकांना काढण्यासाठी पराग इतकी मेहनत करून गृप स्विच करतोय ? पण हा स्वतःच असतो नॉमिनेटेड कायम Proud
वीणानी तिचा गेम बदललाय वाटतं, परागला खुन्नस द्यायला लागल्यापासून थोडी टोन डाउन झालीये आणि बरी वाटतेय चक्क !
हिनानेही आवाज चढवायला सुरवात केलीये परागवर, बिचुकले आणि इतर पुरुष मंडळींच्या मागेमागे करायच्या ऐवजी चांगला गेम खेळला पाहिजे तिनी !>>>>>>>>>> दुसर्‍या टिम मधे परागचं कोणीच एव्हढं ऐकताना दिसत नाहीये. आणि मधेच विणाच्या ग्रुप मधे काय झालं? थोडी वदावादी, तर पराग म्हणत होता की खोटं भांड्ताएत, लक्ष देउ नका वगैरे , ते कळलं नाही नक्कि काय झालं

>> त्याला वाटलं बिग बोस ने मला बोलावलं आहे म्हणजे आता मला मॅनेजर होण्यासाठी बिग बॉस सुचवत आहेत

हाच तो अतिशहाणपणा!
वरती म्हणाला पण की बिग बॉसने मला तसे सांगितलेय आणि यावर नेहा ने जेंव्हा खोदून खोदून विचारले आणि समोरच्या टीमने पण आरडाओरडा केला म्हंटल्यावर त्याची गोची झाली
आणि या बॅच बदलाबदलीतून साध्य काय झाले म्हणे?

हाच तो अतिशहाणपणा >> यात अतिशहाणपणा काहीच नाही . त्याचा तो अर्थ लावत गेला .शेवटी बिग बॉस काही त्याला चमच्याने भरवणार नाही ना ? हिंट च देणार . हा डोक्याचा गेम आहे . बिग बॉस ने बरोबर त्यालाच बोलावलं . माधव ला बोलवलं नाही . हीनाला बोलावलं नाही . बिचुकलेनं बोलावलं नाही का ? अगदी नेहाला सुद्धा ते मॅनेजर असून बोलावल नाही यातच परागचं काय तो डोक्याने खेळेल अशी बीबॉ ना खात्री वाटत होती . नेहाला बिग बॉस चा म्हणणं समजलाच नसत असं बिग बॉस ला वाटलं म्हणून त्यांनी पराग ला बोलावलं
आणि या बॅच बदलाबदलीतून साध्य काय झाले म्हणे? >> ते मी लिहिलेलेच आहे . वाचा ना जरा .कदाचित कामगारांनाच अशी युक्ती करण्याची मुभा असेल मॅनेजरला नसेल .

जर लेटरमध्दये दहादा घरातील कोणतीही वस्तू वापरु नये असे लिहून पाठविल्यावर सुद्धा परागने घरातील कपडे आणले असतील आणि त्यावर बिबाॕने काही ॲक्शन नाही घेतली तर मात्र बिबॉच confused आहेत असं म्हणावे लागेल.

शिव बरोबर गप्प करतो टकलु ला. झूँज मराठमोळी मध्ये पण खूप ओवरऐक्टिंग करायचा पराग.सुरेखा ताई खरचं good for nothing,नूसत्या वर बसून होत्या. बिचूकले कित्ती घाण पद्धतीने हीना ला बोलवत होते,पाठिला हात लावून. **की कुठला.....

यावेळी बिबॉला काही डिमांड नाही वाटतं. सोमिवरुन पब्लिकच बिबॉ चालवतयं असे वाटत आहे.शिवला नॉमिनेट काय केलं, रुपाली-बिचुकलेच्या भांडणात खेद-पत्र वैगरे काय पाठवत आहेत. नाहीतर अशा तोंडी भांडणात ते कधीच मधे पडत नाहीत. घाला काय घालायच्यात त्या शिव्या आम्ही म्युट करुन दाखवू. शनिवारी सलमान घेईल शाळा,असाच फंडा असायचा. पण इथे मराठी माणसांंसमोर हतबल झालेत बिच्चारे Lol

जर लेटरमध्दये दहादा घरातील कोणतीही वस्तू वापरु नये असे लिहून पाठविल्यावर सुद्धा परागने घरातील कपडे आणले असतील आणि त्यावर बिबाॕने काही ॲक्शन नाही घेतली तर मात्र बिबॉच confused आहेत असं म्हणावे लागेल.>> वीणाने कठड्याला लावायला घरातलं तेल वापरलच ना ? तिला जर अभय बिग बॉस देणार असतील तर यालाही देतील Happy

>>कदाचित कामगारांनाच अशी युक्ती करण्याची मुभा असेल मॅनेजरला नसेल .

मग असे जर असेल तर मॅनेजर झाला कशाला? कामगार राहूनच करायचे ना जे काय करायचे ते!

लेटर मध्ये लिहलले नियम मोडले तर संचालकने कारवाई करायची असते कारण बिग्ग बॉस च्या नुसार संचालीका त्यांची प्रतिनिधी असते.
आणी वैशाली तर सरळ सरळ दुसय्रा टीम कडून खेळत होती मधेच येउन नेहाने इस्त्री केलेले कपडे चुरगळून गेली

परा ग हुशार नाही तर बिबॉ हुशार आहेत.कालचा दिवस चक्क बर्यापैकी शाऔततेत गेला,कस चालेल बिबॉ ला,म्हणून आज आतून कपडे आणले,मग आता सगळ्यांना भांडायला रान मोकळ नाही का,
बिबॉ या मालिकेचे लेखक,डिरेक्टर बाबॉ स्वत:आहेत.
ममांना पण काहीतरी बोलायला सब्जेक्ट नको का?
पब्लिक सब.जानती है ,बाबू.

दिलेल्या टास्क मध्ये कहीच इंटरेस्टिंग घडत नसेल तर बिग्ग बॉस लगेच त्यातल्या त्यात हुशार किन्वा बिग्ग्बोस्स ला वाटते तो हे काम करु शकेल त्याला confession रुम मध्ये बोलावून कार्य सांगतात . मागच्या सिझनमध्ये खुनी च्या task मध्ये आधी नेमलेल्या खुन्या कडुन कहीच होईना म्हणुन मेघाला confession रुम मध्ये बोलावून 5 कार्य करुन खून करायला सांगितलेले आणी ते तिने कमी वेळात आणी मस्त केले होते

आज्या शीत्ली राणादा रिकामेच आहेत सध्या!!!
BBM2 मध्ये गेले तर बघायला मजा येईल कदाचित्..
आत्ताचा सीजन तसाही पांचट फुसका झालाय..
.. मसाला म्हणुन काय बघायचं तर ab- हीना जोडी.. यक्क्!!!
किती फुटेज देतात त्याला..
voot वर तर unseen सीन त्याचेच भरलेले असतात....

अरे तो बिचुकले किती अंगचटीला येतो, आणि ती हिना पण कशी काय त्याला जवळ येऊ देते, देव जाणे.....

हे भगवान ऊठाले रे बाबा, मुझे नही.... बिचुकले को,

https://www.instagram.com/p/By7kWe5gDDI/?igshid=1vungl6gm44r4
हे बघा आणि क्रुपया आज बिबॉ बघताना आपल्या टीव्हीचा व्हॉल्युम कमी ठेवा,तसच म्हातारी माणस आणि लहान मुल असतील तर त्यांना दुसर्या खोलीत ठेवा.
हाहाहा

धाग्यावर आधीच सगळयान्न्नी मते माण्डली आहेत, मला वेगळ लिहायची गरज नाही. Lol बाकी पराग स्मार्ट प्लेयर आहे.

हिना इतकी रिग्रेसिव्ह असेल आजच्या काळात अस वाटल नव्हत. बघा, मी किती सोज्वळ, आदर्श मुलगी आहे हे दाखवायचा प्रयत्न करत होती ती. काय तर म्हणे आईकडून मी घरची सगळी कामे शिकली आहेत १० वी त असताना. उद्या सासरी कोणी माझ्या आईवडिलान्ना नावे ठेवू नये म्हणून.

कोणीतरी घरातल्या डिटरजण्ट पावडच्या दोन पिशव्या आणल्या म्हणून वैशाली का नेहा म्हणत होती. ते दाखवल नाही, मेबी आज दाखवतील.

आताच कळलेल्या बातमीनुसार भाजपच्या माजी नगरसेविकेने बिचुकलेविरोधात तक्रार केली असून हा शो बंद करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. >>>>>>> एकटया बिचुकलेसाठी अख्खया शोला का शिक्षा? तसही हिन्दी बिबॉच्या वेळेस सुद्दा साडे सतराशे साठ वेळा शो बन्द करा म्हणत होते. तरीही हिन्दि शो चालूच आहे १२ वर्षापासून. Biggrin

परागला साम, दाम, दण्ड, भेदची नीती वापरुन खेळायला सान्गितल होत, साम, दाम, दण्ड, भेदचा जप करायला नव्हे. Proud

परागला साम, दाम, दण्ड, भेदची नीती वापरुन खेळायला सान्गितल होत, साम, दाम, दण्ड, भेदचा जप करायला नव्हे.>>आधी शिव ने चालू केला जप.. आजच्या प्रोमो मध्ये दिसतोय..

साम, दाम, दण्ड, भेदचा जप >> काय बावळटपणा आहे Uhoh तो पराग अ‍ॅक्चुअल टास्क कमी आणि नुस्त्याच स्ट्रॅटेज्या अन भांडण करत आहे.
नेहा सगळ्यात डेडिकेटेड प्लेअर आहे. मोस्टली तिचे आडाखे बरोबर असतात, गेम समजतो, पण ती कुणाला फारशी आवडत नसल्यामुळे तिला लॉयल फ्रेन्ड्स नाहीत कुणी. तिथेच ती मार खाणार कायम.

.विक्रम टास्क पण मस्त करायचा 1 no आणि माज कमी..पराग सारख नाही करायच.. >>> हो तो सॉलिड होता, एकदम मस्त.

माणूस म्हणून त्यात तो, मनीषा, पंढरीनाथ, दीप्ती देवी, स्वप्नील राजशेखर आणि पुष्करही आवडले होते पण पुष्कर bb मध्ये मनातून उतरला.

विक्रम पहिल्यापासून हवा होता.

शांतपणे task चाललेला आवडला नाही bb ला, राडा हवाच Lol

परागने इथले कपडे चोरले असतील तर तो सॉलिड डोकेबाज आहे, नेहाने सांगितलं होतं तसं.

नेहा सगळ्यात डेडिकेटेड प्लेअर आहे. मोस्टली तिचे आडाखे बरोबर असतात, गेम समजतो, पण ती कुणाला फारशी आवडत नसल्यामुळे तिला लॉयल फ्रेन्ड्स नाहीत कुणी. तिथेच ती मार खाणार कायम. >>> खरं आहे. तिची कटकट आणि भोचकपणा अति असतो. ती वीणाला किती बाई मी शहाणी attitude वाली म्हणते पण ही पण तशीच आहे. पण डोकेबाज आहे. ही बोलायला लागली की आवाज ऐकू नये इतकं वाटतं.

>>पण ती कुणाला फारशी आवडत नसल्यामुळे तिला लॉयल फ्रेन्ड्स नाहीत कुणी. तिथेच ती मार खाणार कायम.

हो ना!
मेघाच्या सपोर्टला जसे शर्मिष्ठाला पाठवले होते तशी एखादी वाईल्ड कार्ड एंट्री झाली पाहिजेल नेहासाठी
तशी ती strong आहे पण अगदीच एकटी पडू नये!

Pages