कार्यालयात बॉस वयाने लहान असल्यास ती सिच्युएशन कशी हाताळावी?

Submitted by Parichit on 13 June, 2019 - 00:39

नमस्कार मायबोलीकरहो,

आज मी रजा घेऊन घरीच थांबलो आहे. मूड अजिबात चांगला नाही. डोके दुखत आहे. डोक्याला अमृतांजन लावूनच हा धागा लिहायला बसलो आहे. कारण मला आधी मनातली जळजळ मोकळी करायची आहे. मग मी जरावेळ झोप काढणार आहे. कारणच तसे घडले आहे. ऑफिसमध्ये मला सांगितलेले काम मी इमानेइतबारे पूर्ण केले असतानासुद्धा माझी जी बॉस आहे तिने काल मला आपल्या केबिनमध्ये बोलवून काहीतरी खुसपट काढून मला सुनवले. "तुमच्या कामात नेहमीच चुका असतात" वगैरे वगैरे बेसलेस आरोप व अवमानास्पद शेरेबाजी केली. माझी बाजू मांडायला तिने मला संधीच दिली नाही. मला हा तीव्र मानसिक धक्का होता. केवळ मला सुनवायचे म्हणून सगळे माझे आजवरचे सगळे किरकोळ नकारात्मक मुद्दे आधीच काढून पूर्वतयारीनेच बसली होती आणि मला केबिनमध्ये बोलवून माझ्यावर हल्ला केला अशी माझी भावना झाली आहे. सध्या मन अत्यंत उदास आणि उद्विग्न आहे. म्हणून आज थेट रजाच काढून घरीच बसलो आहे. व कुणाशीतरी हे शेअर करावे वाटल्याने आपणाशी शेअर करत आहे. "झक मारु दे तिला काय करायचे ते करू दे. कामावरून काढले तरी गेली उडत" वगैरे वगैरे विचार सकाळपासून मनात येत आहेत.

इथे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. हि माझी बॉस माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. मला माझ्यापेक्षा वयाने लहान असलेली व्यक्ती ऑफिसमध्ये सिनियर म्हणून अजिबात सहन होत नाही. त्या व्यक्तीने काम सांगितेलेले मला आवडत नाही. मग तो स्त्री असो वा पुरुष. मनाने कितीही ठरवले तरी त्या व्यक्तीविषयी अनादर/चिडचिड/त्रागा/हेवा/असहायता इत्यादींचे समिश्र भाव माझ्या चेहऱ्यावर हे येतातच. आणि करीयरच्या सुरवातीपासून हा मला प्रोब्लेमच आहे. पूर्वीच्या ऑफिसमध्ये पण एकदा असे घडलेले आहे.

१. हा/हि कालची पोरगी/पोरगा. माझ्यापेक्षा अमुक वर्षांनी लहान. हा/हि काय काम सांगणार मला?

२. मला सपोर्ट मिळाला असता तर खरेतर ह्याच्या/हिच्या बॉसचा बॉस होण्याची माझी लायकी आहे. पण साले योग्यता असूनही आम्हाला कधीच प्रमोशन मिळाले नाही.

३. बॉसने कसे सर्वाना सांभाळून घेतले पाहिजे. लहान वयात बॉस झाले कि त्यांच्या डोक्यात हवा जाते व असले फडतूस अपरिपक्व बॉस तयार होतात. माझ्या इतकी वैचारिक परिपक्वता सुद्धा त्यांना नाही.

४. तुझ्यासारख्या चार पाच वर्षे ज्युनियर पब्लिकला मी कॉलेजमध्ये असताना विचारत पण नव्हतो. काय समजतोस/समजतीस स्वत:ला?

असे सगळे विचार माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या बॉसला पाहताच माझ्या मनात येतात. त्यांच्याशी बोलताना किंवा चर्चा करताना मी अजिबात कम्फर्टेबल नसतो. वयाने लहान व्यक्ती अधिकार गाजवतेय हे ध्यानात येताच नैसर्गिक न्याय तत्वानुसार मनात प्रतिक्रिया निर्माण होऊन वरील सर्व भावनांचा परिपाक म्हणून निर्माण झालेला उद्धटपणा चेहऱ्यावर दिसतो. परिणामी: माझ्या अशा "लहानुल्या" बॉसच्या नजरेत मी लो-प्रोफाईल-परफोर्मर म्हणूनच राहतो.

मित्रांशी किंवा ऑफिसमधल्या काही सहकाऱ्याशी याबाबत चर्चा केली तर त्यांनी कुणीच हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. "जाना देव यार. तू ज्यादा सोचता है. तेरे को सोचने को और कुछ मिला नहीं क्या?" अशा छापाची उत्तरे मिळतात.

तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला असे अनुभव आले आहेत का? असल्यास तुम्ही हे कसे हाताळता? यावर काही डेफीनीटीव आणि वर्किंग सोल्युशन आहे का.

(टीप: कृपया माझ्या आधीच्या धाग्यावरून टोमणे मारणारे प्रतिसाद इथे देऊ नयेत. जसे कि "लॉज मध्ये जायचे उद्योग थांबवा. कामावर लक्ष द्या. तुम्हाला पण प्रमोशन मिळेल" वगैरे वगैरे. आताशा मी मायबोलीवरच्या काही लोकांना ओळखू लागलो आहे. आधीच्या धाग्यांत मांडलेले विषय त्या धाग्यांपुरते ठेवा असे स्पष्ट लिहून सुद्धा काही लोक मुद्दाम अशा प्रकारचे उचकवणारे प्रतिसाद देतात. म्हणून आधीच सांगितले. म्हणजे, असे नासके प्रतिसाद दिले तरी हरकत नाही. पण माझ्या कडून तरी ते पूर्णपणे दुर्लक्षित केले जातील याची नोंद घ्यावी. धन्यवाद)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधीच्या धाग्यांत मांडलेले विषय त्या धाग्यांपुरते ठेवा असे स्पष्ट लिहून सुद्धा >>> हे सर्व धागे आतासारखेच कोतबो या विभागात आहेत ना ? हा विभाग काल्पनिक किश्शांसाठी आहे का ?

अहो म्हणजे हाताळणे म्हणजे अशा बॉस शी रोजची कामे करताना कसे डील करावे किंवा हि माझ्या मनात भावना येते तो/ती वयाने लहान असल्याची ते कसे म्यानेज करावे

हा विभाग काल्पनिक किश्शांसाठी आहे का ?

>>> काल्पनिक किश्शांसाठी नाही. पण म्हणून विविध धाग्यात विविध विषय असतात त्यांची सांगड घालणे योग्य नव्हे

तुमचे खरे अनुभव असतील तर तुमचे एक प्रोफाईल तयार होते हे मान्य नाहीय का ? लोक एखाद्याला त्याच्या पास्टवरून जज्ज करतात यात तुम्हाला आक्षेप घेण्यासारखे काय वाटते ?

तूच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार. नोकरी सोडा आणि स्वत:चा काही व्यवसाय सुरु करा. तेथे तुम्हीच सर्वान्चे बॉस. (ना रहेगा बा(बॉ)स, ना बजेगी बाँसुरी ... हा का ना का) Lol

तुमचे सर्वच किस्से अ आणि अ या विभागात मोडतात. ते सर्वच शंकास्पद आहेत. तुम्ही वाचकाला प्रतिसादासाठी उचकवताय असे वाटते. आणि प्रतिसाद आले की अगं अगं म्हशी प्रमाणे अहो, मला तसे म्हणायचे नव्हते, मागचे का काढता असे पालुपद आळवताय असा माझा तरी समज झालेला आहे.

तूच तुझ्या आयुष्याचा शिल्पकार. नोकरी सोडा आणि स्वत:चा काही व्यवसाय सुरु करा. तेथे तुम्हीच सर्वान्चे बॉस. (ना रहेगा बा(बॉ)स, ना बजेगी बाँसुरी ... हा का ना का) Lol

नवीन Submitted by मनिम्याऊ on 13 June, 2019 - 10:23. >>>>

तिथेही वयाने लहान असून बॉसगीरी करणारे ग्राहक व मालपुरवठादार, वितरक वगैरे असतील तर व्यवसायही बोंबलेल त्यांचा.

टेक्निकल कामात प्रमोशन्स घेताना वयाने लहान मोठे पेक्षा राईट प्लेस राईट टाईम राईट डिसीजन जास्त महत्वाचे ठरतात.एका कंपनीचा सी इ ओ 41 वर्षांचा आणि त्याच्या हाताखालचा डायरेक्टर 55 वर्षांचा अनुभवी माणूस आहे.
शेवटी मोठा-लहान,ज्युनियर-सिनियर, सेल्फ एस्टीम,भावना यापेक्षा 'दिवसाच्या शेवटी ठरलेले काम टीम कडून झाले का' हे पहिले जाते.
बाकी अपमान वाटलेल्या गोष्टी बाजूला ठेवून सध्या हातातले काम नीट होईल असे पाहिले तर पुढे बॉस च्या वागण्याच्या ईस्कलेशन ला पुरावे किंवा हे सर्व करायचे नसल्यास नव्या कामासाठी अनुभव यातले एक नक्की मिळेल.केलेले काम कधीच वाया जात नाही.

तुम्ही वाचकाला प्रतिसादासाठी उचकवताय असे वाटते.

>>> देऊ नका प्रतिसाद माझे म्हणणे नाही. माझे आधीच डोके दुखत आहे. मी काही कुणाला उच्कावले नाही. फक्त मन मोकळे करायचे म्हणून लिहितो. शिवाय अजून कोणाला अशा समस्या असतील तर त्यांना सुद्धा उपयोग होईल असे पण वाटते. तुम्ही मागच्या धाग्यांवरून मला जज्ज करून "तू असाच आहेस तुझ्या आयुष्यात असेच होणार" असा निष्कर्ष काढू पाहत आहात काय? तुम्हालअकय वाटते तुम्ही असा विचार करून कोतबो मध्ये आधीच त्रस्त झालेल्या व्यक्तीस तुम्ही मदत करत आहात असे तुम्हास वाटते का? उदाहरणार्थ मी लॉजवर जात होतो म्हणून मला ऑफिसमध्ये हि समस्या आली असे तुम्हाला सुचवायचे आहे का? बर मग मी जर लोज चा धागा (किंवा मागचा कोणताच) धागा काढला नसता तर हि समस्या आली नसती असे वाटते का?

मी २८ व्या वर्षी करीयर बदलण्याचा विचार केला. वेगाने विस्तारणा-या आयटी क्षेत्रात जावे असे वाटत होते. म्हणून एका खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्थेत कोर्ससाठी गेलो. तिथे आधी मुलाखत घेतली. माझ्या सध्याच्या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती घेतली गेली. मग अजून दोन जणांकडे पाठवले. पुन्हा पहिल्या व्यक्तीकडे आलो. त्यांनी माझी व्यक्तीमत्व चाचणी घेऊन तुमचा आधीचा व्यवसाय बदलण्याची ठोस कारणे दिसत नाहीत असे मत दिले. तसेच आयटीमधे १६ वर्षाच्या मुलाच्या हाताखाली तुम्हाला काम करावे लागेल. हे तुम्हाला आवडेल का ? असे विचारले होते.

माझ्या दोन तीन मुलाखतीदरम्यात आणि काही टेस्ट्स ज्या लेखी होत्या त्यावरून त्यांचा सल्ला मी हा कोर्स करू नये आणि सध्याची साईड बदलू नये असा होता. त्या वेळी आलेली मंदी हटली आणि मला त्यांचे म्हणणे ऐकले याबद्दल समाधान वाटले.

परिचित,
तुम्ही प्रत्येक धाग्यावर मागच्या धाग्याचा उल्लेख करू नका म्हणता. पहिल्या लॉजच्या धाग्यात तुम्ही आयकार्ड दिले नाही. तुमचे म्हणणे कितपत खरे हे समजायला मार्ग नव्हता. पुढे तुमचे स्त्रीपुरूष संबंधावरचे धागे हे त्या धाग्याच्या विषयाशी सहजच रिलेट होत होते यात वाचकांची काय चूक ?

तुम्ही प्रश्न विचारता आणि असेच प्रतिसाद द्या अशी अपेक्षा ठेवता. हे चुकीचे आहे असे तुम्हाला वाटत नसेल तर प्रश्नच मिटला.

पहिल्या लॉजच्या धाग्यात तुम्ही आयकार्ड दिले नाही. तुमचे म्हणणे कितपत खरे हे समजायला मार्ग नव्हता.

>> पूर्ण चुकीचा आरोप आहे साहेब. पूर्ण चुकीचे आरोप!!!!!!!! इथे विषय तो नाही. तरीपण एका वाक्यात सांगतो. तो धागा पुन्हा वाचून पहा हि विनंती. मी कार्ड दिले होते पण नंतर त्याने "तिचा फोटो काढून माझ्या मोबाईल वर पाठवा" असे सांगून जो नालायकपणा केला. कारण त्या हलकट मनुष्याला "वाटले" ती माझी पत्नी नाही. तरीही मी तिला लॉजवर घून आलोय. म्हणून हलकटपणे तो तिचा फोटो मागत होता. रीड बिटवीन लाईन्स.

पुढच्या प्रत्येक धाग्यात तुमचे स्त्री पुरूष संबंधाने प्रश्न आहेत. त्यामुळे पहिल्या धाग्यात लॉजच्या मॅनेजरला आलेली शंका चुकीची नाही हे वाचकांना पटले आपोआप. तुम्ही स्वतःच त्याला कारणीभूत आहात.

>>> लॉजच्या मॅनेजरला आलेली शंका चुकीची नाही हे वाचकांना पटले

कुणाला काय शंका यावी आणि वाटावे हा ज्याच्या/त्याच्या वकुबाचा भाग. चुकीचे वटले असेल तर देशात कायदे आहेत. पोलीस आहेत. त्याच्या कुत्सितपणे फोटो मागण्याचे आपण थेट समर्थन करत आहात.

त्याच्या कुत्सितपणे फोटो मागण्याचे आपण थेट समर्थन करत आहात. >>>>

तुम्ही वेड घेऊन पेडगावला जात असाल तर प्रॉब्लेम नाही. पण तसे नसेल तर काहीतरी जबरदस्त केमिकल लोच्या आहे आणि तो इथे समजावण्याच्या पलिकडचा आहे हे निश्चित.

एक प्रश्न स्पष्टच विचारतो. आपण उत्तर देण्याचे कष्ट घ्यावेत. शंका आली म्हणून "तिचा फोटो मला पाठव (म्हणजे मला पण चान्स देते का बघतो नाहीतर फोटो तर आहेच माझ्याकडे. तिची बदनामी करतो)" ह्या वृत्तीचे आपण समर्थन करता आहात कि नाही? हो कि नाही सांगा. मग मी आपणास इथून पुढे उत्तर द्यायचे कि नाही किंवा आपण मला सल्ले द्यावेत कि नाही हे एकदाचे ठरेल.

तुम्ही आयकार्ड जवळ बाळगले नाही हा त्याचा दोष नाही. मी पण आत्ता १५ दिवस हिमालयात हिलस्टेशनला जाऊन आलो. आधार कार्ड सोबत घेतले होते. तशा सूचना मला हॉटेल बुक करणा-या वेबसाईटकडून आलेल्या होत्या.

तसेच तुम्हाला त्या धाग्यावर कायदेशीर अडचणीही अनेकांनी सांगितल्या होत्या. मात्र तुम्ही त्या फाट्यावर मारत आहात.

ह्या वृत्तीचे आपण समर्थन करता आहात कि नाही? हो कि नाही सांगा. मग मी आपणास इथून पुढे उत्तर द्यायचे कि नाही किंवा आपण मला सल्ले द्यावेत कि नाही हे एकदाचे ठरेल. >>> यातला पहिला प्रश्न म्हणजे विपर्यास आहे आनी दुसरा आक्रस्ताळेपणा, आकांडतांडव किंवा कांगावा यांचे दर्शन.

तुम्हाला सल्ले नको असतील तर तुम्ही पब्लीक डोमेन मधे विचारू नका. सिंपल आहे.

तुम्ही जे प्रश्न आत्ता विचारले आहेत त्या बाबत तुम्हाला अनेकांनी सांगुन झालेले आहे. लॉजच्या अडचणीही सांगून झाल्या आहेत. पण तुम्ही अत्यंत हेकेखोर आहात. हा समज दृढ झालेला आहे. तसेच समोरच्याबाबत अत्यंत प्रतिकूल मत बनवता, त्यासाठी कुठलाही बेस तुम्हाला लागत नाही. हे मत तुमच्या पुढच्या धाग्यातल्या समस्यांमधे कन्फर्म होते.

आता तुम्हीच तुमचे धागे ओळीने वाचून पहा.
कदाचित यावर उपाय योजना करायचा खर्च वाचेल.

यातला पहिला प्रश्न म्हणजे विपर्यास आहे

>>> काय विपर्यास आहे कळेल का? "ओळखपत्र नसेल तर त्या व्यक्तीचे मोबाईलवर फोटो घ्यावेत" असे कोणता कायदा सांगतो हे पण एकदा सांगून टाकाच.

तुमच्या त्या धाग्यावरचे प्रतिसाद पुन्हा वाचा. लोकांनी कष्ट घेऊन तुम्हाला आयत्या लिंका दिलेल्या आहेत.

लॉजचालकाची अडचण सांगणे म्हणजे तुम्ही बळेच त्याच्या मनात वाईट हेतू आहे असे ठरवले या आणि त्या हेतूचे समर्थन केले अशी बळजबरी करणे हा तुमच्या भाषेत विपर्यास होत नसेल तर आपली आणि माझी भाषा सुद्धा वेगवेगळी आहे असे म्हणावे लागेल.

https://www.maayboli.com/node/67847
हा तुमचा लॊजविषयक धागा

नंतर रिव्हर्स मी टू असा एक धागा होता तुमचा
https://www.maayboli.com/node/68373

मग इतरांच्या वैवाहीक जोडीदाराबाबतचा हा धागा
https://www.maayboli.com/node/69195

आणि नंतरचा हा धागा...
https://www.maayboli.com/node/69843

जर एखाद्याने विलक्षण निग्रहाने धागाकर्ता खरेच बोलत आहे असे ठरवले तरच त्याला शंका पडणार नाहीत. नाहीतर यात जो प्रचंड विरोधाभास आहे त्यामुळे तुम्हाला हव्या तशा प्रतिक्रिया येणे कठीणच दिसते. तरी देखील तुमच्या तशा अपेक्षा असतील तर शुभेच्छा !

अहो अडचण काय होती नक्की.

आहे का आयकार्ड?
ठीक आहे.

नाही का?
गेट लॉस्ट.

शंका आली का?
पोलिसांना बोलवा.

विषय संपला. "मोबाईल वर तिचा फोटो पाठव" हे ह्यात कुठे व कसे बसते हे आणि त्याचे समर्थन करणे हे सगळे म्या पामराच्या आकलनाच्या पूर्णपणे पलीकडचे आहे. जाऊ द्या. तो विषय इथे नसताना त्यावर चर्चा होत आहे. माझ्याकडून तरी त्या विषयावर इथे सुरु असलेल्या चर्चेस पूर्णविराम.

तुमचा धागा तुम्हीच पूर्ण वाचा. त्यात फोटो पाठव हा एकच प्रॉब्लेम नाही तुम्हाला.
त्या शहराच्या नावाचाही आहे. तुम्हाला जोडीदाराचे आय कार्ड मागितले याचाही प्रॉब्लेम आहे. आणि तुम्ही खोली बघायला गेलात. खाली आलात. तेव्हां रजिस्टर मधे एण्ट्री केल्याचाही आहे.
तुमच्याकडे कार्ड नाही म्हणून त्याने कदाचित मागणी केली असेल हे सांगून झालेय की तुम्हाला तिथे. तो मनुष्य मार्ग काढायला बघत होता हे दिसत्येय. तुम्ही धाग्यात जितके बडबड करताय त्याच्या दहा टक्के जरी त्याच्याकडे केली असती तर त्याने तुम्हाला गेट लॉस्ट म्हणून सत्कार केला असता याची तुम्हाला जाणिव असेल ना ? त्याला का नाही सांगितले स्पष्ट ? हे सर्व मागाहून सुचलेले शहाणपण त्याच्यासमोर उगाळले असते तर मुद्दे जास्त क्लिअर झाले असते.

ते जरी झाले नाही तरी लोक जेव्हां सांगतात तेव्हा त्यांनाच डाफरण्याचा तुमचा उद्योग भारीच आहे.

>>> जर एखाद्याने विलक्षण निग्रहाने धागाकर्ता खरेच बोलत आहे असे ठरवले

हे... हे... हे अयोग्य आहे. हे अत्यंत अयोग्य आहे !!!! हे शब्द तुमचे आधी मागे घ्या. हा आरोप मागे घ्या. तुम्ही तुमच्या बरोबर इतरांची पण मने माझ्याबाबत कलुषित करत आहात. आणि इतरांना ज्यांना खरेच मला मदत करायची आहे त्यांनी माझ्या धाग्यांवर लिहू नये म्हणून प्रयत्न करत आहात. एकंदरीत मी खोटे लिहितो व मला सर्वांकडून वाळीत टाकले जावे असा तुमचा प्रयत्न दिसून येतो. निषेध!!!!

इतर वाचकांसाठी:
माझे धागे हे सगळे त्या त्या वेळी आलेले वेगवेगळे अनुभव आहेत हे कुणालाही सहज' कळून येईल. मी खोटे काहीही लिहिलेले नाही. लिहिणार नाही. कृपया अशा कारस्थानांना बळी पडू नका.

लॉजच्या धाग्यातला तुम्ही लिहीलेला मजकूर वाचा...

लांडगापूरात (शहराचे नाव बदलले आहे) सकाळी आलो. काही कामे होती. काही व्यक्तींच्या भेटी घ्यायच्या होत्या. दिवसभर थांबून संध्याकाळी परतायचे होते. म्हणून लॉज बुक करायचा होता. बसस्थानकाच्या आसपास एक दोन लॉज पाहिले. आधी गुगलवर पण आसपास कुठे लॉज आहेत ते पाहून आलो होतो. त्यावरून जी कल्पना केली होती, प्रत्यक्षात मात्र भलतेच चित्र होते. इतकी शहरे फिरलोय. गुगलबाबत शक्यतो असे होत नाही. पण या शहरात उतरल्यापासूनच बहुतेक धक्कादायक अनुभव यायचे होते. शेवटी गुगलचा नाद सोडून आसपास जो लॉज दिसेल तिथे जाऊन चौकशी करायचे ठरवले. बस स्थानकातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला थोड्या दूर अंतरावर असलेल्या चौक आणि रस्त्याला लागून काही लॉज दिसत होते. तिकडे जाऊन एकएक लॉजवर चौकशी सुरु केली. बहुतेक लॉज सुनसान होते. दुरुस्तीची/साफसफाईची कामे काढलेली. कोण इथे येतंय कि नाही असे वाटावे असे गूढ वातावरण. ज्याला रेस्टॉरंट आहे असा लॉज पाहत होतो. काही ठिकाणी रूम्स फारच कोंदट अवस्थेत. तर काही ठिकाणी रूम्स चांगल्या पण रेस्टॉरंट नाही अशी तऱ्हा. मला सगळे बोअर वाटत होते.

एकेक लॉज बघता बघता एक लॉज दिसला ज्याला खाली रेस्टॉरंट होते. गर्दी होती. सर्व माझ्या अपेक्षेप्रमाणे होते. रेस्टॉरंटमधल्या कौंटरवर चौकशी केली. तेंव्हा रूम बुकिंग साठी त्याने आतल्या बाजूला जायचा इशारा केला. आत गेलो तर तिथे थोड्या कोंदट अंधाऱ्या जागेत एक काउंटर दिसला. काउंटरवरचा माणूस तिथेच बाजूला डबा उघडून जेवत बसला होता. मला पाहून त्याने कपाळावर आठ्या घालून "काय पाहिजे" अशा अर्थाने मान उडवली. मी "डबलबेड रूम आहे का? रेट काय आहे?" असे विचारताच त्याने ओरडून वेटरला बोलवून घेतले. त्याला मला रूम दाखवायला सांगितले. वेटर मला लिफ्टमधून वरती घेऊन गेला. वरती गेल्यावर पुन्हा तेच. गूढ वातावरण. कामे काढलेली. वेटरला विचारले, "या रूम्स सगळ्या रिकाम्या आहेत का? कोणी राहते कि नाही इथे?" तर तो म्हणाला "सगळ्या फुल्ल आहेत. एक दोनच रिकाम्या आहेत". त्यातली एक पसंत करून खाली आलो. काउंटरवरच्या व्यक्तीचे जेवण झाले होते. रूम नंबर सांगताच त्याने रजिस्टर उघडून मला तिथे रूम बुक करत असल्याची नोंद करायला सांगितले. तिथे सगळा तपशील लिहिल्यावर त्याने माझे आयडी कार्ड स्कॅन करून मला परत दिले. नंतर काउंटरवरच्या मदतनीसाने रूमचे भाडे भरण्यासाठी म्हणून माझे क्रेडीट कार्ड घेतले.

"तुमच्याबरोबर कोण आहेत? त्यांचे पण आयडी प्रुफ दाखवा" काउंटरवरचा तो मनुष्य मला म्हणाला. मी चक्रावलो. माझे आयडी प्रुफ दाखवल्यावर अजून बरोबरच्या व्यक्तीचे आयडी प्रुफ सुद्धा कशाला हवे? हा आगाऊपणा आहे असे मला वाटले. कारण मागे एकदा मित्राबरोबर याच शहरात थांबलो होतो, तेंव्हा हॉटेलमध्ये आमच्यापैकी एकाचेच आयडी कार्ड बघितले होते.

"नाही. त्यांचे कोणतेही आयडी कार्ड आणलेले नाही" मी निर्विकारपणे सांगितले

"असे कसे? काही न काही आयडी बरोबर आणले असेलच की" तो उद्दामपणे बोलला

"नाही. काहीच आणलेले नाही" मी ठाम

यात लॉजवाल्याची चूक आहे असे दिसत नाही. तुम्ही मात्र बळेच मला तुम्ही काढलेल्या निष्कर्शाशी सहमत व्हायला सांगताय. इथपर्यंत फोटोचाही प्रश्न आलेला नव्हता. चूक तुमची होती असे स्पष्ट दिसतेय. सर्वांचे आयकार्ड्स मागतात भारतात. यात नवीन काय आहे ?

Pages