कार्यालयात बॉस वयाने लहान असल्यास ती सिच्युएशन कशी हाताळावी?

Submitted by Parichit on 13 June, 2019 - 00:39

नमस्कार मायबोलीकरहो,

आज मी रजा घेऊन घरीच थांबलो आहे. मूड अजिबात चांगला नाही. डोके दुखत आहे. डोक्याला अमृतांजन लावूनच हा धागा लिहायला बसलो आहे. कारण मला आधी मनातली जळजळ मोकळी करायची आहे. मग मी जरावेळ झोप काढणार आहे. कारणच तसे घडले आहे. ऑफिसमध्ये मला सांगितलेले काम मी इमानेइतबारे पूर्ण केले असतानासुद्धा माझी जी बॉस आहे तिने काल मला आपल्या केबिनमध्ये बोलवून काहीतरी खुसपट काढून मला सुनवले. "तुमच्या कामात नेहमीच चुका असतात" वगैरे वगैरे बेसलेस आरोप व अवमानास्पद शेरेबाजी केली. माझी बाजू मांडायला तिने मला संधीच दिली नाही. मला हा तीव्र मानसिक धक्का होता. केवळ मला सुनवायचे म्हणून सगळे माझे आजवरचे सगळे किरकोळ नकारात्मक मुद्दे आधीच काढून पूर्वतयारीनेच बसली होती आणि मला केबिनमध्ये बोलवून माझ्यावर हल्ला केला अशी माझी भावना झाली आहे. सध्या मन अत्यंत उदास आणि उद्विग्न आहे. म्हणून आज थेट रजाच काढून घरीच बसलो आहे. व कुणाशीतरी हे शेअर करावे वाटल्याने आपणाशी शेअर करत आहे. "झक मारु दे तिला काय करायचे ते करू दे. कामावरून काढले तरी गेली उडत" वगैरे वगैरे विचार सकाळपासून मनात येत आहेत.

इथे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. हि माझी बॉस माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. मला माझ्यापेक्षा वयाने लहान असलेली व्यक्ती ऑफिसमध्ये सिनियर म्हणून अजिबात सहन होत नाही. त्या व्यक्तीने काम सांगितेलेले मला आवडत नाही. मग तो स्त्री असो वा पुरुष. मनाने कितीही ठरवले तरी त्या व्यक्तीविषयी अनादर/चिडचिड/त्रागा/हेवा/असहायता इत्यादींचे समिश्र भाव माझ्या चेहऱ्यावर हे येतातच. आणि करीयरच्या सुरवातीपासून हा मला प्रोब्लेमच आहे. पूर्वीच्या ऑफिसमध्ये पण एकदा असे घडलेले आहे.

१. हा/हि कालची पोरगी/पोरगा. माझ्यापेक्षा अमुक वर्षांनी लहान. हा/हि काय काम सांगणार मला?

२. मला सपोर्ट मिळाला असता तर खरेतर ह्याच्या/हिच्या बॉसचा बॉस होण्याची माझी लायकी आहे. पण साले योग्यता असूनही आम्हाला कधीच प्रमोशन मिळाले नाही.

३. बॉसने कसे सर्वाना सांभाळून घेतले पाहिजे. लहान वयात बॉस झाले कि त्यांच्या डोक्यात हवा जाते व असले फडतूस अपरिपक्व बॉस तयार होतात. माझ्या इतकी वैचारिक परिपक्वता सुद्धा त्यांना नाही.

४. तुझ्यासारख्या चार पाच वर्षे ज्युनियर पब्लिकला मी कॉलेजमध्ये असताना विचारत पण नव्हतो. काय समजतोस/समजतीस स्वत:ला?

असे सगळे विचार माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या बॉसला पाहताच माझ्या मनात येतात. त्यांच्याशी बोलताना किंवा चर्चा करताना मी अजिबात कम्फर्टेबल नसतो. वयाने लहान व्यक्ती अधिकार गाजवतेय हे ध्यानात येताच नैसर्गिक न्याय तत्वानुसार मनात प्रतिक्रिया निर्माण होऊन वरील सर्व भावनांचा परिपाक म्हणून निर्माण झालेला उद्धटपणा चेहऱ्यावर दिसतो. परिणामी: माझ्या अशा "लहानुल्या" बॉसच्या नजरेत मी लो-प्रोफाईल-परफोर्मर म्हणूनच राहतो.

मित्रांशी किंवा ऑफिसमधल्या काही सहकाऱ्याशी याबाबत चर्चा केली तर त्यांनी कुणीच हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. "जाना देव यार. तू ज्यादा सोचता है. तेरे को सोचने को और कुछ मिला नहीं क्या?" अशा छापाची उत्तरे मिळतात.

तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला असे अनुभव आले आहेत का? असल्यास तुम्ही हे कसे हाताळता? यावर काही डेफीनीटीव आणि वर्किंग सोल्युशन आहे का.

(टीप: कृपया माझ्या आधीच्या धाग्यावरून टोमणे मारणारे प्रतिसाद इथे देऊ नयेत. जसे कि "लॉज मध्ये जायचे उद्योग थांबवा. कामावर लक्ष द्या. तुम्हाला पण प्रमोशन मिळेल" वगैरे वगैरे. आताशा मी मायबोलीवरच्या काही लोकांना ओळखू लागलो आहे. आधीच्या धाग्यांत मांडलेले विषय त्या धाग्यांपुरते ठेवा असे स्पष्ट लिहून सुद्धा काही लोक मुद्दाम अशा प्रकारचे उचकवणारे प्रतिसाद देतात. म्हणून आधीच सांगितले. म्हणजे, असे नासके प्रतिसाद दिले तरी हरकत नाही. पण माझ्या कडून तरी ते पूर्णपणे दुर्लक्षित केले जातील याची नोंद घ्यावी. धन्यवाद)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला स्पूनफीडींग करायला मला वेळ नाही. लिंका दिलेल्या आहेत. त्यावर जाऊन वाचा. तुम्हाला सर्व आयते दिले आहे. तरीही तुम्ही तुमची चूक चालूच ठेवताय. मी का मागे घ्यायचा आरोप ?

मी का मागे घ्यायचा आरोप ?

>>> मायबोलीकर सुज्ञ आहेत त्यांचा निर्णय घ्यायला. संपूर्ण पानभर धाग्याशी असंबंध चर्चा कोण करत आहे व कोण चुकीचे आहे हे त्यांना कळते. मी वारंवार माझे डोके दुखत आहे व मला या विषयावर सल्ला हवा आहे असे सकाळपासून सांगूनही तुम्ही तुमचे काड्या लावायचे उद्योग सुरुच ठेवलेत. ह्यातच सगळे आले. विषय कोणता त्यावर चर्चा करावी हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. दुसऱ्या धाग्यातले परिच्छेदच्या परिच्छेद मुदाम आणून टाकून इथे कचरा करायचे सुरु आहे तुमचे. पण इतर मायबोलीकर सुज्ञ आहेत. ते तुमच्या कारस्थानांना बळी पडणार नाहीत. तेंव्हा चिंता नसावी.

एकदा हे मान्य केले की तुमच्या धाग्यावरचे त्यांचे प्रतिसाद पुन्हा डोळ्याखालून घाला आणि त्यावर अंमलबजावणी करा.

अरे बास करा की,
परिचित, तुम्हीच लेखात लिहिलेय न आधीच्या धाग्याला अनूसरून इथे प्रतिसाद देऊ नये म्हणून,मग जरा गप बसा की तुम्ही तरी
हल्ली कुठलाही धागा उघडा नुसती भांडणे,आणि मी भारी तुमी सॉरी असंच दिसतं
केवळ वाचनमात्र असल्यामुळे तर आता लोकांच्या अशा प्रतिसादांचा खरंच कंटाळा यायला लागलाय

जरा वेळ झोप काढणार होतात, आधी ते करा.
मग धागा परत शांतपणे वाचा. शाली़ंनी सांगितल्या प्रमाणे तुम्हालाच उत्तर सापडेल.

परिचित

या धाग्याच्या विषयाला धरून मी को प्रतिसाद दिला तो तुम्ही फाट्यावर मारला आहे. आणि मागच्या धाग्यांबाबत प्रश्न विचारत आहात. ते ही साफ खोटे प्रश्न आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव तुमचेच शब्द तुम्हाला दाखवले. आता ते कचरा आहे असे तुम्हीच सांगताय. नक्की काय ते ठरवा,

माझे म्हणणे अगदी स्पष्ट आहे.
कोतबो हा विभाग अशा मजा घेण्यासाठी नक्कीच नाही. सदरच्या धाग्यात देखील तुम्ही स्वतःची धुलाई करून घेण्यासाठी उत्सुक आहात हे स्पष्ट होतंय.

या विभागात अनेकांनी गंभीर समस्या मांडलेला आहेत. भले त्या वेगळ्या नावे असतील. त्यांना सल्लेही चांगले मिळाले आहेत.
तुम्ही जर याच विभागात असे विचित्र धागे काढू लागलात तर मात्र या विभागाकडे पाहण्याचा दृष्टीकोण दूषित होऊ शकतो. सगळेच तसे नाहीत. मात्र हा विभाग म्हणजे टाईमपास असा समज दृढ व्हायला हातभार लागू नये हा तुम्हाला इशारा देत आहे.

याउप्पर तुमची मर्जी.
पुन्हा याच प्रकारचा धागा काढणार असाल तर इतर विभागात काढायला कुणाचीही बंदी नाही.

विषय चांगला आहे. गंभीरपणे, आमलात आणता येतील असे उपाय सांगितले तर सगळ्यांनाच उपयोगी पडू शकतील.
धाग्यात समस्या काय आहे आणि ती का आहे हे लिहले आहे, ती कशी हँडल करायची याच्या ट्रिक प्रतिसादात मिळाव्या.

तुमच्यापेक्षा लहान व्यक्ती तुमच्यावर बॉसगिरी करते??? बापरे भयानक आहे हे सगळं, तुम्ही ऐकून घेतलंच कसं, अहो तुम्ही तिच्या पाचवीच्या मुटक्या खाल्ल्यात, असं ऐकून नका घेत जाऊ, कान पिळून धपाटा घालायचा पाठीत.

बोकलत Lol

जोक्स अपार्ट, मी बॉसची भावना समजु शकते, बिचारी Uhoh , पण हळुहळु अनुभवाने जमते असे नग हँडल करायला रादर जमवावे लागतेच

जोक्स अपार्ट, मी बॉसची भावना समजु शकते, बिचारी Uhoh , पण हळुहळु अनुभवाने जमते असे नग हँडल करायला रादर जमवावे लागतेच
<<

माझीपण त्या बिचारीला १००% सहानुभूती.

तिला असे गणंग नग हँडल करायला लवकर जमावे अशी सदिच्छा!

तीचे वय अन अनुभव तुमच्यापेक्षा जरी कमी असले तरी एकतर शिक्षण जास्त असेल किंवा परफॉर्मन्स जास्त चांगला असेल, सो जर जमले तर तीच्या वयाकडे दुर्लक्ष करुन स्वता:ची प्रोडक्टीव्हिटी कसी वाढेल, काम जलद अन ऊत्तम कस होईल यावर लक्ष द्या, तक्रारीची संधी देऊ नका, आपल्या कामाला मोर दॅन १००% द्या, पॉझिटीव विचार वाढवा, अन मुख्य म्हणजे कामावर प्रेम करा कारण जर तेच आवडले नाही तर बॉस बदलली तरी दुसरा एखादा त्रास जाणवेल तुम्हाला.

स्वानुभवातुन सांगतेय सकारात्मक विचार वाढवुन बघा, खुप खुप खुप फरक पडतो. कोणाचेही वागणे जज करु नका, जर आपल्याला प्रगती करायचीये तर सुरवात स्वबदलातुनच व्हायला हवि. दुसर्या विषयी वाईट विचार करुन का स्वत: रक्त आटवायचे ? त्याने काय साध्य होइल?? दिवसातुन थोडावेळ स्वत:साठी काढुन टू डू लिस्ट बनवा, बघा हो खुप फरक पडतो, नक्कीच

खरेतर तुमचे आधीचे धागे वाचलेयेत म्हणुन प्रतिसाद देणारच नव्हते, पण तरी वाटले कि जर खरे असेल अन तुम्ही मनावर घेतले तर कदाचित थोडा ऊपयोग होईल

मला विचाराल तर महिन्याच्या शेवटी मोबाईलवर जो मेसेज येतो your account is credited with____ त्यासाठी मी कंपनीत साडेआठ तास बसून असतो. आता या वेळात जर कोणी मला त्याची गाडी पुसायला सांगितली, बूट पॉलिश करायला सांगितले तरी मी ती कामं करेल. कारण मला फक्त त्या मसेजशी मतलब आहे. बाकी प्रमोशन, पगारवाढ, साहेब पद या सगळ्या गोष्टी कामगाराने मरेस्तोवर काम करावं म्हणून बनवलेले मायाजाल आहेत

धागा वाचतानाच देजाऊ फिलींग येत होतं. म्हटलं हे तेच आहेत का तर पुढे खुलासा झालाच. Rofl

धाले कोणत्या कंपनीत काम करतात ?
माझे आकलन कमी आहे. कार्यक्षमता शंकास्पद आहे. शिवाय माझ्यापेक्षा वयाने अगदी लहान लहान मुलेही व्यवहारात माझापेक्षा स्मार्ट आहेत. या कारणाने मला कुठेही नोकरी मिळत नाही. इथे अर्ज करू काय ?

जर फक्त वयानुसार आयक्यु, इक्यु, ज्ञान, टाइम मॅनेजमेंट, डेलिगेशन, प्रोजेक्ट / बिझिनेस मॅनेजमेंट या गोष्टी आल्या आणि वाढल्या असत्या तर कंपनीतील सर्वात वयस्कर सर्वोच्च बॉस असता प्रोमोशन केवळ वय बघून मिळाले असते.
आपल्या पेक्षा लहनांकडूनही खूप शिकण्या सारखे असते, टीमला चांगले लीड करू शकतात हे आधी लक्षात घ्यावे. उद्या आपल्याला टीम लीडर व्हायचे असेल तर त्यास लागणाऱ्या क्वालिटीज डेव्हलप करून, आपली क्षमता दाखवून.
वय / सिनिओरिटीचा दुराभिमान बाळगून ते होणार नाही हे लक्षात घ्यावे.

सर्व प्रथम डायवर्सिटी ट्रेनिन्ग साठी एच आर कडे अर्ज करा. ह्यात स्त्रिया, ( सर्व वयाच्या आकाराच्या व मॅरिटल स्टेट स च्या) इतर धर्माचे, इतर रेसचे जसे ब्लॅक लॅटिन एशिअन , एल जी बीटी क्यु व्यक्तींच्या बरोबर काम कसे करावे व तुमचे वैयक्तिक बायसेस तुमच्या पर्फॉरमन्स च्या
आड येउ नयेत ह्याची जाणीव करून देतात. मी तर म्हणते ए आय किम्वा रोबॉटला रिपोर्ट करण्यापरीस निदान बॉस ह्युमन आहे व ती तिच्या अ‍ॅबिलिटी नुसार वर गेलेली आहे हे ध्या नात घ्या.

आपण त्या रोल ला रिपोर्ट करतो व्यक्तिला नव्हे. बाकी बोकलत प्लस वन.

उत्तम धागा आहे आणि प्रश्न पण.

परिचित, इग्नोरन्स इज अ ब्लिस !! हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. हाफिसात बॉस च्या कंमेंट्सला आणि इथे प्रतिसाद ना इग्नोर करायला जेंव्हा जमेल, सुखी व्हाल !!

तुम्ही थोडे लाईट घेत जा हो.

बॉसचे ऐकुन न ऐकल्यासरखे करायचे. एक-दोन वेळा बोंबलेल आणि नाद सोडेल.. फार भाव नका देऊ तुमच्या बॉस ला..!

प्रथमच असं झालं की बोकलतचा प्रतिसाद वाचून फिस्सकन हसू नाही आलं. त्यांच्या पोस्टशी सहमत नाही.

Btw वस्तू हाताळतात ना? बॉस हाताळणे शब्दप्रयोग खटकला.

बाकी लेखावर प्रतिक्रिया जी लिहिली असती ती सेम मानव पृथ्वीकरांसारखीच. त्यांच्याशी अगदी सहमत.

सकारात्मक प्रतिसाद दिले त्या सर्वाना धन्यवाद. काही लोकांच्या प्रतिसादांमुळे बाकीचे पण त्यांच्या शब्दात येऊन बॉसची बाजू घेऊन लिहित आहेत. कर्तुत्वाने बॉस होतात ते माहिती आहे की मला. पण असे फार थोडे लोक असतात. बहुतेकजण/जणी कसे बॉस होतात सगळ्यांना ठावूकच आहे. ह्या केस मध्ये ... हि कंपनी त्यांचा पूर्वीच्या वंशजांनी चालू केली आहे... हि मुलगी त्यांची तिसरी का चौथी पिढी असेल. अजून जेमतेम पंचविशीत पण नसेल तर तिला थेट बॉस केली आहे... ...आता ह्यात तिचे काय कर्तृत्व? आली कि सगळ्यांना डाफरने एवढेच तिला जमते.,.. सगळे तिला टरकून असतात. अनेक सिनियर तिला वैतागले आहेत................... हे सगळे सांगणार नव्हतो कारण कदाचित अंदाज येऊ शकतो हि कंपनी कोणती कंपनी आहे. म्हणून मला हे सांगायचे नव्हते............... पण काही आयडींच्या प्रतिसादांमुळे इतरांचा गैरसमज होऊ नये म्हणून सांगणे भाग पडत आहे. पण माझ्या व्यक्तिगत केस मध्ये जायलाच कशाला हवे? घरोघरी मातीच्या चुली. अनेक कंपन्यात हे चित्र दिसते ना? सार्वत्रिक समस्या आहे. म्हणून माझ्या व्यक्तिगत डिटेल मध्ये कशाला जाता???
माझा फक्त विषय एवढाच आहे कि: आपल्यापेक्षा लहान वयाची व्यक्ती बॉस म्हणून आली आणि तुम्हाला ऑर्डर सोडायला लागली किंवा फैलावर घेऊ लागली कि तुम्ही ती सिच्युएशन कशी हाताळता.
(शीर्षकात योग्य तो बदल केला आहे) धन्यवाद.

बॉस वयाने छोटा आहे की मोठा .
स्त्री आहे की पुरुष ह्याला जास्त किंमत नाही .
तो विचारांनी परिपक्व,सर्वांना बरोबर घेवून काम करणारा आणि कार्य कुशल आणि कामात तरबेज असावा

बहुतेकजण/जणी कसे बॉस होतात सगळ्यांना ठावूकच आहे. >>>
बहुतेकजण /जणी कर्तृत्वाने होतात, आणि जे कर्तृत्वाशीवाय केवळ वशील्याने होतात ते त्या जागी फार काळ टिकत नाहीत.

माझा फक्त विषय एवढाच आहे कि: आपल्यापेक्षा लहान वयाची व्यक्ती बॉस म्हणून आली आणि तुम्हाला ऑर्डर सोडायला लागली किंवा फैलावर घेऊ लागली कि तुम्ही ती सिच्युएशन कशी हाताळता.
<<< प्रत्येकवेळी आपल्या योग्य मुद्द्यांसह आपली बाजू मांडून ती डॉक्युमेंट करून ठेवावी. कामाशी थेट संबंध नसलेल्या इतर बाबींकडे (वय, लिंग, इ.) दुर्लक्ष करावे. तरीही समोरच्याला किंवा आपल्याला जुळवून घेणे अवघड होत असेल तर अश्या क्लेशदायी अवस्थेत कायम वावरण्यापेक्षा नोकरीचे दुसरे पर्याय शोधावेत.

बॉस लहान असो कि मोठा आपल्याला कोणी फैलावर घेतले कि नेहमीच राग येतो, जरी आपली चुकी असली तरीही. माझा बॉस सुद्धा माझ्यापेक्षा वयाने फारच लहान आहे . मला तो फैलावर घेऊ लागला कि खूप राग येतो, लगेच राजीनामा लिहूया आणि त्याची कशी वाट लागते याची मजा बघूया असे वाटते. पण नंतर डोळ्यासमोर इएमआय , मुलीची शाळेची फी, टाळता येत असलो तरी न टाळता येणारी शॉपिंग या गोष्टी येतात. आणि आपण गेल्यानंतर आपल्या जागी आपली रिप्लेसमेंट येणार असते. आपल्या बॉस ला काडीचाही फरक पडणार नाही हे आठवते. नंतर चेहऱ्यावर रागाच्या ऐवजी स्मितहास्य येते आणि बोकलत यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्याला दिलेले कुठलेही काम करायला चालू करतो, महिन्याच्या अखेरीस मोबाईलवर येणाऱ्या मेसेजसाठी.

असे प्रसंग बॉस वि. सबॉर्डिनेटला हि लागू पडत असल्याने उपाय कॉमन आहेत. अर्थात, तुमच्या कार्यालयातले व्यवहार किती ऑर्गनायज्ड्/स्ट्र्क्चर्ड आहेत त्यावरहि या गोष्टी अवलंबुन आहेत.
१. कामाबाबत तक्रार असेल तर कम्युनिकेशनचा दोष असु शकतो. इमेल, मिटिंग मिनिट्स्/नोट्स यांचा ट्रेल सेव करुन ठेवा. काम दिल्याचं/मिळाल्याचं/समजल्याचं/स्विकारल्याचं/नाकारल्याचं डॉक्युमेंटेशन ठेवा.
२. इशु टार्डिनेस, ऑफिस डेकोरमचा असेल तर वॉर्निंग द्या, त्याची नोंद ठेवा. फरक पडला नाहि तर एस्कलेट करा.
३. मेंटली हरॅसमेंटचा इशु असेल तर सुरुवातीला एक तोंडी सुचना द्या, फरक पडला नाहि तर लेखी तक्रार नोंदवा.
४. सर्वात महत्वाचं. वन-ऑन-वन बैठकित तुमची मतं, अपेक्षा, खटकणार्‍या गोष्टी मांडा, समोरच्याची बाजु ऐका. त्यांची मतं, अपेक्षा, खटकणार्‍या गोष्टी समजुन घ्या. संवादामुळे तोडगे निघतील, बरेचसे इश्युज कायमचे निकालात निघतील... Happy

सहसा जे कंपनीचे मालक आहेत ते जी कामाची माणसं आहेत त्यांना दुखवत नाहीत
फायदा होणे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते . इगो कुरवाळत बसत नाहीत

<<< तिला असे गणंग नग हँडल करायला लवकर जमावे अशी सदिच्छा! >>>
या धाग्याच्या संदर्भात माझी सहानुभूती बॉसला नाही तर धागा-लेखकाला आहे. (लहान वयाची बॉस आहे किंवा ती स्त्री आहे म्हणून न्हवे, तर ती त्रास देते म्हणून. ) बॉसचा त्रास ही समस्या गंभीर आहे आणि वाटते त्यापेक्षा कॉमन आहे.

बोकलत यांच्याशी १००% सहमत.
एच.आर. कडे जा, डायवर्सिटी ट्रेनिन्ग घ्या, ती तिच्या अ‍ॅबिलिटी नुसार वर गेलेली आहे हे तर अगदी हास्यास्पद आहे. त्याने का-ही-ही होत नाही.

@परिचीत,
पूर्वी जे लिहिले होते, तेच परत लिहितो.
It is not the most intellectual of the species that survives; it is not the strongest that survives; but the species that survives is the one that is able best to adapt and adjust to the changing environment in which it finds itself. हा निसर्गाचा नियम आहे आणि तो लक्षात ठेवा.

Pages