कार्यालयात बॉस वयाने लहान असल्यास ती सिच्युएशन कशी हाताळावी?

Submitted by Parichit on 13 June, 2019 - 00:39

नमस्कार मायबोलीकरहो,

आज मी रजा घेऊन घरीच थांबलो आहे. मूड अजिबात चांगला नाही. डोके दुखत आहे. डोक्याला अमृतांजन लावूनच हा धागा लिहायला बसलो आहे. कारण मला आधी मनातली जळजळ मोकळी करायची आहे. मग मी जरावेळ झोप काढणार आहे. कारणच तसे घडले आहे. ऑफिसमध्ये मला सांगितलेले काम मी इमानेइतबारे पूर्ण केले असतानासुद्धा माझी जी बॉस आहे तिने काल मला आपल्या केबिनमध्ये बोलवून काहीतरी खुसपट काढून मला सुनवले. "तुमच्या कामात नेहमीच चुका असतात" वगैरे वगैरे बेसलेस आरोप व अवमानास्पद शेरेबाजी केली. माझी बाजू मांडायला तिने मला संधीच दिली नाही. मला हा तीव्र मानसिक धक्का होता. केवळ मला सुनवायचे म्हणून सगळे माझे आजवरचे सगळे किरकोळ नकारात्मक मुद्दे आधीच काढून पूर्वतयारीनेच बसली होती आणि मला केबिनमध्ये बोलवून माझ्यावर हल्ला केला अशी माझी भावना झाली आहे. सध्या मन अत्यंत उदास आणि उद्विग्न आहे. म्हणून आज थेट रजाच काढून घरीच बसलो आहे. व कुणाशीतरी हे शेअर करावे वाटल्याने आपणाशी शेअर करत आहे. "झक मारु दे तिला काय करायचे ते करू दे. कामावरून काढले तरी गेली उडत" वगैरे वगैरे विचार सकाळपासून मनात येत आहेत.

इथे अजून एक महत्वाचा मुद्दा आहे. हि माझी बॉस माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. मला माझ्यापेक्षा वयाने लहान असलेली व्यक्ती ऑफिसमध्ये सिनियर म्हणून अजिबात सहन होत नाही. त्या व्यक्तीने काम सांगितेलेले मला आवडत नाही. मग तो स्त्री असो वा पुरुष. मनाने कितीही ठरवले तरी त्या व्यक्तीविषयी अनादर/चिडचिड/त्रागा/हेवा/असहायता इत्यादींचे समिश्र भाव माझ्या चेहऱ्यावर हे येतातच. आणि करीयरच्या सुरवातीपासून हा मला प्रोब्लेमच आहे. पूर्वीच्या ऑफिसमध्ये पण एकदा असे घडलेले आहे.

१. हा/हि कालची पोरगी/पोरगा. माझ्यापेक्षा अमुक वर्षांनी लहान. हा/हि काय काम सांगणार मला?

२. मला सपोर्ट मिळाला असता तर खरेतर ह्याच्या/हिच्या बॉसचा बॉस होण्याची माझी लायकी आहे. पण साले योग्यता असूनही आम्हाला कधीच प्रमोशन मिळाले नाही.

३. बॉसने कसे सर्वाना सांभाळून घेतले पाहिजे. लहान वयात बॉस झाले कि त्यांच्या डोक्यात हवा जाते व असले फडतूस अपरिपक्व बॉस तयार होतात. माझ्या इतकी वैचारिक परिपक्वता सुद्धा त्यांना नाही.

४. तुझ्यासारख्या चार पाच वर्षे ज्युनियर पब्लिकला मी कॉलेजमध्ये असताना विचारत पण नव्हतो. काय समजतोस/समजतीस स्वत:ला?

असे सगळे विचार माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या बॉसला पाहताच माझ्या मनात येतात. त्यांच्याशी बोलताना किंवा चर्चा करताना मी अजिबात कम्फर्टेबल नसतो. वयाने लहान व्यक्ती अधिकार गाजवतेय हे ध्यानात येताच नैसर्गिक न्याय तत्वानुसार मनात प्रतिक्रिया निर्माण होऊन वरील सर्व भावनांचा परिपाक म्हणून निर्माण झालेला उद्धटपणा चेहऱ्यावर दिसतो. परिणामी: माझ्या अशा "लहानुल्या" बॉसच्या नजरेत मी लो-प्रोफाईल-परफोर्मर म्हणूनच राहतो.

मित्रांशी किंवा ऑफिसमधल्या काही सहकाऱ्याशी याबाबत चर्चा केली तर त्यांनी कुणीच हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. "जाना देव यार. तू ज्यादा सोचता है. तेरे को सोचने को और कुछ मिला नहीं क्या?" अशा छापाची उत्तरे मिळतात.

तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला असे अनुभव आले आहेत का? असल्यास तुम्ही हे कसे हाताळता? यावर काही डेफीनीटीव आणि वर्किंग सोल्युशन आहे का.

(टीप: कृपया माझ्या आधीच्या धाग्यावरून टोमणे मारणारे प्रतिसाद इथे देऊ नयेत. जसे कि "लॉज मध्ये जायचे उद्योग थांबवा. कामावर लक्ष द्या. तुम्हाला पण प्रमोशन मिळेल" वगैरे वगैरे. आताशा मी मायबोलीवरच्या काही लोकांना ओळखू लागलो आहे. आधीच्या धाग्यांत मांडलेले विषय त्या धाग्यांपुरते ठेवा असे स्पष्ट लिहून सुद्धा काही लोक मुद्दाम अशा प्रकारचे उचकवणारे प्रतिसाद देतात. म्हणून आधीच सांगितले. म्हणजे, असे नासके प्रतिसाद दिले तरी हरकत नाही. पण माझ्या कडून तरी ते पूर्णपणे दुर्लक्षित केले जातील याची नोंद घ्यावी. धन्यवाद)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रतिसाद आवडला उपाशी बोका.

खरंतर धाग्यात जी समस्या मांडली आहे ती वेगळ्या शब्दांत खरडवही.....भाग १ इथे आली होती. आपल्यापेक्षा जास्त वयाचे सबोर्डीनेट्स कसे 'हँडल' करायचे, आपल्यापेक्षा कमी वयाच्या बॉसशी कसं डील करायचं... चांगली चर्चा होऊ शकली असती...

वरती परिचित यांनी उल्लेखलेली कंपनी फॅमिली ओन्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वाटतीय.... तिला पब्लीक लिमिटेड किंवा MNC त काटेकोरपणे पाळल्या जाणाऱ्या पॉलीसींच्या चष्म्यातून बघून उपयोग नाही. तिथली सोल्यूशन्स इथे चालणार नाहीत
पटत नसेल तर सोडून दुसरी कंपनी बघणे हा एकमेव उपाय अश्या कंपन्यातून असतो.... उगा तक्रारी करुन कुढत बसण्यात अर्थ नाही
आणि कंपन्या बदलूनही समस्या तश्याच रहात असतील तर अर्थातच स्वताला बदलण्याशिवाय पर्याय नाही!

परिचित भाउ, एव्हढ टेन्शन घेण्याची गरज नाही. तिला एकदा "सगळ्या टीमने" वर्गणी काढुन डिनरला न्या आणि क्याज्युअली सान्गा, की तुम्ही सगळे आपापल्या क्षेत्रात बरीच वर्षे कामे केलेले अनुभवी लोक आहात. तुम्हालाही तुमच्या बॉससारखाच स्वभिमान आहे व सगळ्यानी एकमेकान्शी प्रोफेशनल वागणे अपेक्षित आहे.

जर रोजच ओरडा पडणार असेल तर कामात सुधारणा होणार नाहीच, वर सगळे लोक काही दिवसान्नी गेन्ड्याच्या कातडीचे वा निराश होतील. तेव्हा तुमच्या बॉसने कुणालाही एखादे काम देताना आधी त्या कामाबबतच्या तिच्या अपेक्षा समब्धीत व्यक्तीला सान्गाव्यात.

त्याबरोबर हेही सान्गा की, कोणी शिस्त मोडत असेल तर ओरडण्याऐवजी मेमो द्या, नि ३ मेमो झाले कि कामावरुन काढुन टाका.

Pages