विस्मरणात गेलेले/सहज न मिळणारे खाऊचे पदार्थ.

Submitted by अज्ञातवासी on 10 June, 2019 - 13:19

या लेखाची सुरुवात, प्रस्तावना कशी करावी नाहीये कळत. बघायला गेलं, तर यापैकी बरेच पदार्थ अजूनही दर आठवडी बाजारी मिळतात. पण आता शहरात सहजासहजी मिळणं अशक्य!
ठिकठिकाणी मारवाड, राजस्थान, कृष्णा अशा नावाची चकचकीत स्वीटची दुकाने उघडलीत. त्यातून हे पदार्थ तर हद्दपारच झाले आहेत. जिथे आहेत, तिथे अव्वाच्या सव्वा भावात विकले जातायेत.
चला तर, लहानपणी कसे आजोबा गुडीशेव आणायचे, लग्नाच्या पंगतीत कशी मूठ मूठभर बुंदी खाल्ली, याची आठवण जागवूयात!

१. गोडीशेव/गुडीशेव

लालजर्द दिसणारा आणि बघताच लक्ष वेधून घेणारा पदार्थ म्हणजे गुडीशेव! गोड आणि क्रिस्पी हे कॉम्बिनेशन शक्यतोवर जात नाही, पण गुडीशेवची मजाच न्यारी. एकदा तोंडाला लागली, की सुटता सुटत नाही. पण आता शक्यतोवर आठवडे बाजारात किंवा जत्रेतच मिळते.

२. बुंदी

एरवी लग्नाच्या पंगतीमध्ये हमखास आढळणारा गोड आयटम म्हणजे बुंदी. रात्रभर जागून आचारी बुंदी पाडायचा. आता ही बुंदीही हद्दपार झालीये. बुंदी खाताना दाताखाली जो पाक यायचा, त्याची मजा काय वर्णावी महाराजा!

३. हलवायाचा बुंदीचा लाडू

मोतीचूर या गोंडस नावाने बुंदीचा लाडू चकचकीत काचेत विराजमान झाला, आणि तिथेच त्याची मजा संपली. 'शुद्ध घी मे बने हुए मोतीचुर के लड्डू - ६०० रु KG + GST ५ परसेन्ट. गिफ्ट पॅकिंग मे भी उपलब्ध' यात जी मजा नाही, जी एका जुनाट कळकट हलवायच्या दुकानात ओबडधोबड आकारात बनलेल्या ३० रु पावशेर ने कागदात बांधून मिळणाऱ्या लाडवात आहे.

सगळे एकत्र! PC शालिदा

IMG_20190610_222537_875.jpg

४. कडक शेव

भावनगरी, गाठींया, इंदोरी या नानाविध नावानी मिळणाऱ्या शेवेत ही पिवळीधमक दिसणारी झाऱ्यातून सरळ पाटीत आणि तिथून मुठीने कागदात पडणारी शेव हरवली. ही शेव खाताना येणारा कुर्र कुर्र आवाज आता कुठल्याही दुकानात मिळणाऱ्या शेवमध्ये नाही होत.

PC शालिदा

IMG_20190610_222903_625.jpg

५. भत्ता

भेळ नाही, फक्त भत्ता, आणि तोही मिळेल तर एखाद्या जुन्या दुकानात किंवा सरळ बाजारात. पॅकिंग फरसाण मध्ये प्रचंड आढळणाऱ्या मक्याच्या पोह्यांचा, तळलेल्या पोह्यांचा मागमूस नाही. सर्वात आधी तीन चार मुठा भरून मुरमुरे, त्यावर शेव, थोडी जाड शेव, थोडासा भाजक्या पोह्यांचा चिवडा, खारी बुंदी मग दाळ्या आणि सगळ्यात शेवटी पापडी. वर भरपूर मूठभर बारीक कापलेला कच्चा कांदा आणि कोथिंबीर! लिंबू पिळायचा असेल तर पिळा, जास्तच पट्टीचा असेल तर कच्चं तिखट आणि काळा मसाला वरून. स्वर्गसुख.

images (2)_0.jpeg

६. रेवड्या

रेवड्यांची चव काय सांगू महाराजा, गुडीशेवची लहान बहीण. शुभ्र, जिभेवर पडताच अवीट गोडीचा आनंद देणारी.

gulab-revdi-250x250.jpg

७. गुळाची जिलेबी.

पूर्वी मिळायची. आता नाही मिळत जास्त

IMG_20190610_223519.jpg

८. लाल रसगुल्ले

हो, अशा नावाने एक पदार्थ मिळायचा. एक रुपयाला चार. मध्ये पाक असायचा थोडा, गोड.
thaen-mittai-candy-500x500.jpg

९. दूधमलाई चॉकोलेट

एक रुपयाला चार. हीच्यात आणि किसमीमध्ये टफ फाईट होती. पांढरीशुभ्र चॉकोलेट असायची.

dudh-malai-toffee-500x500.jpg

१०. असवंतरा गोळ्या

पांढऱ्या गोळ्या असायच्या, जिभेवर ठेवताच एक वेगळीच अनुभूती यायची. नेटवर फोटो मिळाला नाही.

११. इमली

एक रुपयाला चार अशा अतिशय छोट्या पॅकिंग मध्ये आंबटगोड अशी ही इमली मिळायची. नेटवर फोटो मिळाला नाही.

१२. बोरकूट

अतिशय सुंदर चव, पुडी फोडून तोंडात टाकली, की कित्येक वेळ तोंडात चव रेंगाळायची.

IMG_20190610_224720_0.jpg

१३. दहिवडे

ह्या पदार्थाचा अजूनही मला नेटवर फोटो मिळाला नाही. थोडासा ब्राऊनिश लाल कलर असलेला पदार्थ जिलेबीच्या पाकात टाकला जायचा. स्वर्गीय चव.

अजून काही पदार्थ सुचवा, सांगा. लहानपणीच्या आठवणी जाग्या करूयात.

१४. राजमलाई चॉकोलेट (धन्यवाद किल्ली)

अशा चवेची चॉकोलेट अजून बनलेली नाहीये. मस्त चव..images (3)_1.jpeg

१५. काळ्या आंबट गोड गोळ्या (किल्ली)

१६. बटर (आशुचाम्प)

images (4)_0.jpeg

१७. संत्रा गोळी (आशुचाम्प)

ही मिळण्याच अजूनही हक्काचं ठिकाण, एस टी स्टँड Lol
images (5).jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा वाचून मला बॉबी खाण्याची अनावर इच्छा होतेय.. genearlly, आम्ही बाहेर बॉबी खाऊ नये म्हणून आई कच्चे विकत मिळतात ते आणून तळून देत असे आम्हाला

सोनेरी नाण्यासारख्या पॅकिंग मधे मिळणारं चॉकलेट.>>
सिगारेट गोळी>>
लाल जेली लावलेलं बिसकिट
बदनाम कुल्फी रात्री येत असे शिरपुरात .
सूर्यफुलाच्या बिया skirt च्या खिशात ठेवून शाळेच्या तासाला खात असू
बाई खूप ओरडत असत सूर्यफुलाच्या बियाने कन्सर होतो अश्या भीती घालीत तरी आम्ही आपले समोरच्या दोन दाताने खात असू
कन्या शाळेत असताना गुढगे बेन्चाला वर करून बसल कि बाई पाय खाली करायला सांगत असत का ते कळत नसे आता हसू येते

मला वाटतंय की पदार्थ विस्मरणात गेलेले नाहीत तर इथल्या सगळ्या आयडींना विस्मरण झालंय.
कारण वरचे बरेच पदार्थ अजुनही मुबलक आणि सहज मिळतात.

विकत मिळणाऱ्या बॉबी मध्ये पाल असते अशी अफवा ह्या मोठ्या लोकांनी पसरवली होती.. तेव्हापासून मी ते miss करतेय, नाही खाल्लं

कधीतरी एकदा असेल गं
बाहेर खाताना एकंदर त्यांचे भांडवल, काम,मनुष्यबळ आणि शिक्षणाचा अभाव यामुळे पूर्ण घरा सारखी हायजीन अपेक्षा करता येत नाही(थर्ड वर्ल्ड देशांत तरी)
अग्नी प्रत्येक गोष्ट पवित्र करतो.त्यामुळे नजरेसमोर तळलेलं/उकळलेलं,नजरेला घाण न दिसणारं आणि चवीला शिळं/आंबट/वाईट न लागणारं सर्व वेळ प्रसंगी पवित्र मानून खावं ☺️☺️
बाहेर मिल्क शेक किंवा ज्यूस किंवा पाणीपुरी खायची मात्र आता एनर्जी नाही.लिस्टरीया इ कोलाय मंडळी घाबरवतात. पाणीपुरी वगैरे कधीतरी अगदी ओळखीचा घराजवळ चा असला तर खाल्लं जातं.

गुरुचेला विषयी कोणी कसं लिहिले नाही.
मला कधी त्याची चव आवडली नाही पण wrapper. उलटा सुलटा करुन गुरूला चेला आणि चेल्याला गुरु करण्यात गंमत वाटायची.

खूप छान लेख !!!
गुडीशेव मला अतिशय आवडते.
अजून एक सध्या न दिसणारा गोड पदार्थ म्हणजे
खोबऱ्याचा केक !! लाल रंगाचा वरून खोबऱ्याचा किस भुरभुरलेला असायचा. आई दर शनिवारी ऑफिसमधून येताना आणायची.

100

लिटिल हार्ट्स मिळतात की. मी इतक्यात कधीतरी खाल्ली.
लाल खोबऱ्याचा केक म्हणजे तो हिंदुस्थान बेकरीत मिळतो ( की मिळायचा) तोच का? मस्त असायचा.
गुरुचेला आठवलं. म्हणजे चित्र आठवलं.

खोबऱ्याचा केक !! लाल रंगाचा वरून खोबऱ्याचा किस भुरभुरलेला असायचा. आई दर शनिवारी ऑफिसमधून येताना आणायची.>> माझे पण बाबा आणायचे. ३० पैशे ला होता तो केक. दोन साधे केकचे तुकडे मध्ये स्ट्रॉबेरी जॅम व वरून खोबर्‍याचा कीस. एकदम युनिक टेस्ट.

बदनाम कुल्फी रात्री येत असे शिरपुरात .

बदनाम मटका कुल्फी. मडक्यात तप्कीरचा डबा(खुप सारे डबे) त्यात जमवलेली कुल्फी त्यात चार काड्या खोचुन मग बाहेर काढुन सुरीने चार तुकडे, ५० पैश्याला एक.
अजुनही मिळते पण चव आणी फील नाहीये. आता महावीर आईसक्रीम आणी कोल्ड्रींक्सवाले नी परदेशी घमंडी लस्सी वाल्यांची चल्ती आहे.

ह्या पोस्टी वाचुन, ८०-९० च्या काळातले आयडी आहेत वाटते. :))
DD60AC16-0593-4568-BBAE-1000230DCC04.jpeg
कोणीच कसा, क्रीमच्या चँपियन्स बिस्किट्सचा उल्लेख नाही केला. पेप्सीकोला चोरुन खावा लागे; आईच्या भितीने.
बाकी, मेलडी चॉ़कलेट्स, एकलेर, टॉफी बाईट्स, हॉलो गोळ्या ज्याच्यावर पाणी पिवुन थंड वाटायचे... आई गावी गेली रे गेली की , बाबा आणि मी असे पदार्थ आणुन चरत असु.
105CCD4D-22E1-4D7D-85A5-03518EF952B3.jpeg
गावी गेलो की गावच्या उरुसात/बाजारात मलदा, खाजा, लाल शेव, आल्याच्या वड्या ( दिवाळीत), शेवेचे लाडु, कंदी पेढे, चणे-शेंगदाणे असे बरेच काही अधुन मधुन खायला..
घरगुती पदार्थात, माझी आई आमच्याकडे अधे मधे खायला, बेसन लाडु, रव्याचा लाडु, चकली, शंकरपाळे , शेंगदाणा चिक्की, राजगीरा लाड्यु, कडक बुंदीच्गा लाडु,शेव असे काही ना काही जसे जमेल तसे करुन ठेवत असे. डबे स्टीलचे असत.
कडक बुंदीचा लाडु बेस्ट! माझा फेव.

आमच्याकडे बाबांचा मित्रपरीवार खुपदा टपके कधीही. केव्हाही न सांगता. हा हि प्रकार गेला आता कधीही येणारे पाहुणे.
आई नोकरीला त्यामुळे ती वेळ असेल तेव्हा असे करुन ठेवायची.
नाश्त्यात, थालीपीठं, पोहे, उपमा, शीरा, घावनं, अंबोळ्या, बटाटा घालुन मसाले भात, सकाळी किंवा संध्याकाळी. बाहेरचे खायचे नाही अशी ताकिद असल्याने शाळेत असेपरयंत चालली. जसे कॉलेजला गेल्यावर माझीच दादागिरी वाढली आणि चवी बदलल्या. पाव भाजी आली, मॅगी आली हॉस्टेलच्या जीवनात.

३० पैशे ला होता तो केक. दोन साधे केकचे तुकडे मध्ये स्ट्रॉबेरी जॅम व वरून खोबर्‍याचा कीस. एकदम युनिक टेस्ट..

अगदी अगदी !!! तोच तो....प्राण्यांच्या आकाराच्या पांढया गोळ्या मिळायच्या ..मिंट फ्लेवर च्या ..त्याही नाही दिसत आता कुठे.

मला वाटतंय की पदार्थ विस्मरणात गेलेले नाहीत तर इथल्या सगळ्या आयडींना विस्मरण झालंय.
कारण वरचे बरेच पदार्थ अजुनही मुबलक आणि सहज मिळतात.>>+१
Submitted by सस्मित on 12 June, 2019 - 07:31>>> तोंपासू Happy

आमच्या वेळी पांढर्या चौकोनी वड्या मिळायच्या बहुतेक मैद्याच्या असाव्यात.>>>>> +१.
कालपासून धागा वाचतेय पण ही गोष्ट नव्हती वाचली.गुलाबी/पिस्ता रंगाच्या खाल्ल्या आहेत.

बाकी लाल रसगुल्ले,गुळाची जिलेबी वगैरे नाही खाल्ली.चुरण म्हणून एक भन्नाट प्रकार मिळायचा.खूप उशीरा ट्राय केला.मऊसर लालभडक, गोड+आंबट अशा दैवी स्वादाचे मिळायचे.८ आण्याचे चुरण दे म्हटले की कणकेच्या गोळ्यातून छोटी गोळी ओढून काढू तसे चुरणवाला चुरण बाटलीतून ओढून द्यायचा.
अजून एक म्हणजे कोन आईस्क्रीम.गुलाबी रंगाचे कोन असत ,त्यात पिस्ता/बदामी रंगाचे आइस्क्रीम झकास लागे.
असेच एकदा शाळेजवळ आईस्क्रीम घेतल्यावर बाईंनी सांगितले की टाकून दे ,चांगले नसते.तेव्हा जड मनाने टाकून दिलेले आठवते.

बाकी लाल जिरागोळ्या आणि नेहमीच्या जिरागोळ्या कायम असत.बरं होतं त्याकाळी आरोग्य संरक्षण वगैरे मुलांच्या आणि आयांच्या डोक्यात फारसं नव्हते.

ह्यातले बरेचसे पदार्थ अजून मिळतात आणी ज्या वयात इथल्या आय-डीज नी ते खाल्ले, त्या वयातली मुलं खातात सुद्धा. त्यामुळे ह्या धाग्याच्या निमित्तानं बरेच जण नॉस्टॅल्जिक झाले असावेत. वयाप्रमाणे, काळाप्रमाणे, तब्ब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्यात बदल होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे 'आता, ती चव मिळत नाही' म्हणण्यापेक्षा, आता आपली चव बदलली असं म्हणावं का? खाण्या-पिण्याच्या बाबतीत मला नेहमीच नवे, जुने, चांगले, वेगळे पदार्थ आवडतात. त्यामुळे अशी फारशी हळहळ वाटत नाही. 'नो-रिग्रेट्स पॉलिसी' आहे. जेव्हा जे करायला मिळतं तेव्हा त्याचा मनमुराद आनंद लुटावा.

कँडीड शुगर. अर्थात खूप घट्ट केलेला पाक. याचा मोठा गोळा एका बांबूच्या काठीवर लावून फेरीवाले येत असत. हा पाक समहाऊ घट्ट चिकट व मॅलिएबल कन्सिस्टन्सी मेन्टेन करीत असे. प्लॅस्टीकच्या पिशवीने हा गोळा झाकलेला असे.

या पाकाचे हातावर बांधायचे घड्याळ उर्फ रिस्ट वॉच सारखा प्रकार तो फेरीवाला बनवून देई. मग ते चघळून खायचे तासभर.

मी स्वतः कधी खाल्ला नाही, पण लहानपणी पाहिलेला प्रकार आहे हा.

भारतात राहणाऱ्या सो कोल्ड मध्यमवर्गीय लोकांना असं क्षणाक्षणाला नॉस्टॅल्जिक व्हायला फार आवडत.
ते बघा अमेरिकेत इथे टाकलेले सगळे पदार्थ प्रत्येक मॉलमध्ये विराजमान आहेत. हॉटेल मध्ये (स्वारी, रेस्तराँमध्ये सुद्धा वेटर वूड यु लाईक टू हाव भत्ता इन स्टार्टर असं विचारतो.)
टिपिकल टीप गाळू लेखक सगळे!!!

(रेफरन्स कुविख्यात अड्ड्यावर शोधावा.)

आरारा त्याला लाची म्हणतात..., त्याचा कोंबडा चिमणी घोडा किंवा काय वाटेल ते बनवून देत असत ती मंडळी...
मी तेंव्हा कधीच खाल्लं नाही ते

Pages