या लेखाची सुरुवात, प्रस्तावना कशी करावी नाहीये कळत. बघायला गेलं, तर यापैकी बरेच पदार्थ अजूनही दर आठवडी बाजारी मिळतात. पण आता शहरात सहजासहजी मिळणं अशक्य!
ठिकठिकाणी मारवाड, राजस्थान, कृष्णा अशा नावाची चकचकीत स्वीटची दुकाने उघडलीत. त्यातून हे पदार्थ तर हद्दपारच झाले आहेत. जिथे आहेत, तिथे अव्वाच्या सव्वा भावात विकले जातायेत.
चला तर, लहानपणी कसे आजोबा गुडीशेव आणायचे, लग्नाच्या पंगतीत कशी मूठ मूठभर बुंदी खाल्ली, याची आठवण जागवूयात!
१. गोडीशेव/गुडीशेव
लालजर्द दिसणारा आणि बघताच लक्ष वेधून घेणारा पदार्थ म्हणजे गुडीशेव! गोड आणि क्रिस्पी हे कॉम्बिनेशन शक्यतोवर जात नाही, पण गुडीशेवची मजाच न्यारी. एकदा तोंडाला लागली, की सुटता सुटत नाही. पण आता शक्यतोवर आठवडे बाजारात किंवा जत्रेतच मिळते.
२. बुंदी
एरवी लग्नाच्या पंगतीमध्ये हमखास आढळणारा गोड आयटम म्हणजे बुंदी. रात्रभर जागून आचारी बुंदी पाडायचा. आता ही बुंदीही हद्दपार झालीये. बुंदी खाताना दाताखाली जो पाक यायचा, त्याची मजा काय वर्णावी महाराजा!
३. हलवायाचा बुंदीचा लाडू
मोतीचूर या गोंडस नावाने बुंदीचा लाडू चकचकीत काचेत विराजमान झाला, आणि तिथेच त्याची मजा संपली. 'शुद्ध घी मे बने हुए मोतीचुर के लड्डू - ६०० रु KG + GST ५ परसेन्ट. गिफ्ट पॅकिंग मे भी उपलब्ध' यात जी मजा नाही, जी एका जुनाट कळकट हलवायच्या दुकानात ओबडधोबड आकारात बनलेल्या ३० रु पावशेर ने कागदात बांधून मिळणाऱ्या लाडवात आहे.
सगळे एकत्र! PC शालिदा
४. कडक शेव
भावनगरी, गाठींया, इंदोरी या नानाविध नावानी मिळणाऱ्या शेवेत ही पिवळीधमक दिसणारी झाऱ्यातून सरळ पाटीत आणि तिथून मुठीने कागदात पडणारी शेव हरवली. ही शेव खाताना येणारा कुर्र कुर्र आवाज आता कुठल्याही दुकानात मिळणाऱ्या शेवमध्ये नाही होत.
PC शालिदा
५. भत्ता
भेळ नाही, फक्त भत्ता, आणि तोही मिळेल तर एखाद्या जुन्या दुकानात किंवा सरळ बाजारात. पॅकिंग फरसाण मध्ये प्रचंड आढळणाऱ्या मक्याच्या पोह्यांचा, तळलेल्या पोह्यांचा मागमूस नाही. सर्वात आधी तीन चार मुठा भरून मुरमुरे, त्यावर शेव, थोडी जाड शेव, थोडासा भाजक्या पोह्यांचा चिवडा, खारी बुंदी मग दाळ्या आणि सगळ्यात शेवटी पापडी. वर भरपूर मूठभर बारीक कापलेला कच्चा कांदा आणि कोथिंबीर! लिंबू पिळायचा असेल तर पिळा, जास्तच पट्टीचा असेल तर कच्चं तिखट आणि काळा मसाला वरून. स्वर्गसुख.
६. रेवड्या
रेवड्यांची चव काय सांगू महाराजा, गुडीशेवची लहान बहीण. शुभ्र, जिभेवर पडताच अवीट गोडीचा आनंद देणारी.
७. गुळाची जिलेबी.
पूर्वी मिळायची. आता नाही मिळत जास्त
८. लाल रसगुल्ले
हो, अशा नावाने एक पदार्थ मिळायचा. एक रुपयाला चार. मध्ये पाक असायचा थोडा, गोड.
९. दूधमलाई चॉकोलेट
एक रुपयाला चार. हीच्यात आणि किसमीमध्ये टफ फाईट होती. पांढरीशुभ्र चॉकोलेट असायची.
१०. असवंतरा गोळ्या
पांढऱ्या गोळ्या असायच्या, जिभेवर ठेवताच एक वेगळीच अनुभूती यायची. नेटवर फोटो मिळाला नाही.
११. इमली
एक रुपयाला चार अशा अतिशय छोट्या पॅकिंग मध्ये आंबटगोड अशी ही इमली मिळायची. नेटवर फोटो मिळाला नाही.
१२. बोरकूट
अतिशय सुंदर चव, पुडी फोडून तोंडात टाकली, की कित्येक वेळ तोंडात चव रेंगाळायची.
१३. दहिवडे
ह्या पदार्थाचा अजूनही मला नेटवर फोटो मिळाला नाही. थोडासा ब्राऊनिश लाल कलर असलेला पदार्थ जिलेबीच्या पाकात टाकला जायचा. स्वर्गीय चव.
अजून काही पदार्थ सुचवा, सांगा. लहानपणीच्या आठवणी जाग्या करूयात.
१४. राजमलाई चॉकोलेट (धन्यवाद किल्ली)
अशा चवेची चॉकोलेट अजून बनलेली नाहीये. मस्त चव..
१५. काळ्या आंबट गोड गोळ्या (किल्ली)
१६. बटर (आशुचाम्प)
१७. संत्रा गोळी (आशुचाम्प)
ही मिळण्याच अजूनही हक्काचं ठिकाण, एस टी स्टँड
आम्ही लहानपणी घाणेरी/ गंधाली
आम्ही लहानपणी घाणेरी/ गंधाली ( Lantana) ह्या वनस्पतीची मिरी दाण्यासारखी दिसणारी काळी गोड फळे भरपूर खायचो . गेंड्याची( झेंडू) फुले पिसाडून आतला खोबऱ्यासारखा तुरट भाग खायचो. निवडुंगाची बोंडे, पटकुळी ( ixora)ची लाल फळे खायचो. शिवाय मोसमात तोरणे, रांजणे ( खिरण्या) असायच्याच. मोठे झाल्यावर एकदा गागोद्याला विनोबाजींच्या आश्रमात गेलो असताना बाजूच्या वईवर घाणेरीची फळे दिसली आणि तोडून अंगावरच्या कपड्यांना पुसून तोंडात टाकली. हाsss गदारोळ झाला. विषारी जंतू गेले पोटामध्ये म्हणून मुले तर घाबरून गेली. घाणेरीचे झाड invasive असते, थोडे विषारी असते हे तोपर्यंत माहीत झाले होते. पण मोह आवरला नाही.
आमच्या आधीच्या घरी बिया पडून उगवलेले एक चेरीचे झाड होते. कलमी नसल्यामुळे ते देशी झाले होते. खूप फळे यायची. पण पूर्ण गोड व्हायची नाहीत. किंचित आंबटसर राहायची. पण आवारात खेळणारी मुले त्यांना हात लावत नसत. कारण पालकांची शिकवण, काहीही उचलून तोंडात टाकू नये वगैरे. अशा वेळी बोरे, चिंचा, राय आवळे तोडल्यावर न धुता खाण्याचे आमचे दिवस आठवत असत .
घाणेरी/टणटणीची फळे यमी असतात.
घाणेरी/टणटणीची फळे रुचकर असतात. त्या फुलांतील मधही प्यायचो आम्ही.
ती काळी फळं ना, फुलं छोटीशी
ती काळी फळं ना, फुलं छोटीशी असतात त्याची.
खूप खाल्ली आहेत.
ही फळे आणि फुले विषारी असतात
ही फळे आणि फुले विषारी असतात असं सांगण्यात आल्याने आम्ही ही नाही खायचो.. पण ती खातात हे ऐकून खूप मिस झालं सगळं असं वाटलं
अनिश्का, त्या फुलांतील मधही
अनिश्का, त्या फुलांतील मधही पिता येतो. आम्ही प्यायचो.
फळे आणि फुले विषारी असतात असं
फळे आणि फुले विषारी असतात असं सांगण्यात आल्याने आम्ही ही नाही खायचो.. पण ती खातात हे ऐकून खूप मिस झालं सगळं असं वाटलं......... +१.
फळे आणि फुले विषारी असतात असं
फळे आणि फुले विषारी असतात असं सांगण्यात आल्याने आम्ही ही नाही खायचो.. >>+१ पण गुलमोहराची फुले खूप खाल्ली आहेत. ‘मी आधी खाल्ली आहेत, काय नाय होत’ असे कोणी म्हटले कि झाले.
ही फळे खाऊन खाऊन पोट भरल्यावर
ही फळे खाऊन खाऊन पोट भरल्यावर अनेक वर्षांनी आम्हांला कळले की ती थोडी विषारी असतात. तोपर्यंत आम्ही ते हालाहल पचवले होते. आणि आम्ही काही निळे बिळे पडलो नव्हतो. कदाचित ते आम्ही कंठातच रोधून ठेवले नव्हते, आतड्यातून पुढे जाऊ दिले होते म्हणून असेल.
हिरा हाहाहा.
हिरा हाहाहा.
घाणेरीची पाने विषारी असतात,
घाणेरीची पाने विषारी असतात, कुठलेच प्राणी ह्याची पाने खात नाही. फळं फुलं विषारी नसतात.
(No subject)
आग्या, हो. म्हणूनच खूप पूर्वी
आग्या, हो. म्हणूनच खूप पूर्वी ती कांपाउंडसाठी ( ह्या शब्दासाठी चांगला मराठी शब्द सुचवा बुवा कुणीतरी. कुंपण हा शब्दसुद्धा कांपाऊंड वरूनच आलाय) वापरायचे. शेळ्या बकऱ्या आत शिरत नाहीत. पण ती फार पसरते. नंतर कोयनेल लावू लागले.
टणटणीची फळे खाऊन इतकी वर्षे आम्ही जगलो आहोत आणि टुणटुणीत आहोत म्हटल्यावर ती विषारी नसावीतच!
कुंपण हा शब्दसुद्धा कांपाऊंड
कुंपण हा शब्दसुद्धा कांपाऊंड वरूनच आलाय).......... अरे देवा! मग कुंपणाला,कोकणीतला वई/वयं शब्द आहे.
शेळ्या बकऱ्या आत शिरत नाहीत.
शेळ्या बकऱ्या आत शिरत नाहीत. पण ती फार पसरते. नंतर कोयनेल लावू लागले.
हो, बांधावर खूप आहेत, मी व्यवस्थित कापून त्याचा वसवा होणार नाही ह्याची काळजी घेतो.
हल्ली कोयनेल ऐवजी ' धूप छाव ' बागेच्या कुंपणासाठी लावतात. १० वर्षांपूर्वी मी कोयनेलची एक काडी लावली होती, आज घराच्या बागेला त्याचेच कुंपण आहे. मला त्याची सफेद नाजूक फुले खूप आवडतात, लहान असताना आम्ही त्यातील मध चोखून खायचो. पाने तर खूप कडू, हातावर रागडली तर दिवसभर हाताचा कडवटपणा जात नाही. जनावरे तर तोंडही लावत नाही त्याला.
कोयनेलचा एकंदर वास उग्र.
कोयनेलचा एकंदर वास उग्र. विशेषत: पानांचा. पण फुलांना मात्र मंद सुगंध आणि आतमध्ये गोड मध असायचा.
तिला शाळेत मेंदी किंवा विलायती मेंदी म्हणत असू हे आठवले. क्विनाईनला कोयनेल म्हणायचे खूप पूर्वी. त्यामुळे ह्याच वनस्पतीपासून औषध काढतात असा ठाम समज झाला होता.
कोणी बनवलय ते placard/ पोस्टर
कोणी बनवलय ते placard/ पोस्टर? सुंदर आहे.
आडव्या दांडी साठी एकच प्लस
आडव्या दांडी साठी एकच प्लस स्क्रू लावलाय!
_____________
हर्पांनी बनवले आहे सामो.
हर्पांनी बनवले आहे सामो.
मस्त हर्पा!!! खूपच सुंदर.
मस्त हर्पा!!! खूपच सुंदर. रंगसंगती लोभस आहे.
पोस्टर छान आहे.
पोस्टर छान आहे.
सुंदर पोस्टर.
सुंदर पोस्टर.
पॉपिन्स, फ़ाईवस्टार, रावलगाव,
पॉपिन्स, फ़ाईवस्टार, रावलगाव, मेलडी, किसमी सिनामेन चॉकलेट, पारले ची षटकोनी बिस्किटं, लाह्या, मिंटच्या गोळ्या…. लेखात-प्रतिसादात आलेले जवळपास सगळेच पदार्थ मिळतात. काही सहज काही थोडे शोधले की.
जर या पदार्थांमुळे आनंदी स्मृती जाग्या होत असतील तर आणायचे नी खायचे बिनधास्त. Don’t postpone happy indulgences. Enjoy them asap !
Pages