विस्मरणात गेलेले/सहज न मिळणारे खाऊचे पदार्थ.

Submitted by अज्ञातवासी on 10 June, 2019 - 13:19

या लेखाची सुरुवात, प्रस्तावना कशी करावी नाहीये कळत. बघायला गेलं, तर यापैकी बरेच पदार्थ अजूनही दर आठवडी बाजारी मिळतात. पण आता शहरात सहजासहजी मिळणं अशक्य!
ठिकठिकाणी मारवाड, राजस्थान, कृष्णा अशा नावाची चकचकीत स्वीटची दुकाने उघडलीत. त्यातून हे पदार्थ तर हद्दपारच झाले आहेत. जिथे आहेत, तिथे अव्वाच्या सव्वा भावात विकले जातायेत.
चला तर, लहानपणी कसे आजोबा गुडीशेव आणायचे, लग्नाच्या पंगतीत कशी मूठ मूठभर बुंदी खाल्ली, याची आठवण जागवूयात!

१. गोडीशेव/गुडीशेव

लालजर्द दिसणारा आणि बघताच लक्ष वेधून घेणारा पदार्थ म्हणजे गुडीशेव! गोड आणि क्रिस्पी हे कॉम्बिनेशन शक्यतोवर जात नाही, पण गुडीशेवची मजाच न्यारी. एकदा तोंडाला लागली, की सुटता सुटत नाही. पण आता शक्यतोवर आठवडे बाजारात किंवा जत्रेतच मिळते.

२. बुंदी

एरवी लग्नाच्या पंगतीमध्ये हमखास आढळणारा गोड आयटम म्हणजे बुंदी. रात्रभर जागून आचारी बुंदी पाडायचा. आता ही बुंदीही हद्दपार झालीये. बुंदी खाताना दाताखाली जो पाक यायचा, त्याची मजा काय वर्णावी महाराजा!

३. हलवायाचा बुंदीचा लाडू

मोतीचूर या गोंडस नावाने बुंदीचा लाडू चकचकीत काचेत विराजमान झाला, आणि तिथेच त्याची मजा संपली. 'शुद्ध घी मे बने हुए मोतीचुर के लड्डू - ६०० रु KG + GST ५ परसेन्ट. गिफ्ट पॅकिंग मे भी उपलब्ध' यात जी मजा नाही, जी एका जुनाट कळकट हलवायच्या दुकानात ओबडधोबड आकारात बनलेल्या ३० रु पावशेर ने कागदात बांधून मिळणाऱ्या लाडवात आहे.

सगळे एकत्र! PC शालिदा

IMG_20190610_222537_875.jpg

४. कडक शेव

भावनगरी, गाठींया, इंदोरी या नानाविध नावानी मिळणाऱ्या शेवेत ही पिवळीधमक दिसणारी झाऱ्यातून सरळ पाटीत आणि तिथून मुठीने कागदात पडणारी शेव हरवली. ही शेव खाताना येणारा कुर्र कुर्र आवाज आता कुठल्याही दुकानात मिळणाऱ्या शेवमध्ये नाही होत.

PC शालिदा

IMG_20190610_222903_625.jpg

५. भत्ता

भेळ नाही, फक्त भत्ता, आणि तोही मिळेल तर एखाद्या जुन्या दुकानात किंवा सरळ बाजारात. पॅकिंग फरसाण मध्ये प्रचंड आढळणाऱ्या मक्याच्या पोह्यांचा, तळलेल्या पोह्यांचा मागमूस नाही. सर्वात आधी तीन चार मुठा भरून मुरमुरे, त्यावर शेव, थोडी जाड शेव, थोडासा भाजक्या पोह्यांचा चिवडा, खारी बुंदी मग दाळ्या आणि सगळ्यात शेवटी पापडी. वर भरपूर मूठभर बारीक कापलेला कच्चा कांदा आणि कोथिंबीर! लिंबू पिळायचा असेल तर पिळा, जास्तच पट्टीचा असेल तर कच्चं तिखट आणि काळा मसाला वरून. स्वर्गसुख.

images (2)_0.jpeg

६. रेवड्या

रेवड्यांची चव काय सांगू महाराजा, गुडीशेवची लहान बहीण. शुभ्र, जिभेवर पडताच अवीट गोडीचा आनंद देणारी.

gulab-revdi-250x250.jpg

७. गुळाची जिलेबी.

पूर्वी मिळायची. आता नाही मिळत जास्त

IMG_20190610_223519.jpg

८. लाल रसगुल्ले

हो, अशा नावाने एक पदार्थ मिळायचा. एक रुपयाला चार. मध्ये पाक असायचा थोडा, गोड.
thaen-mittai-candy-500x500.jpg

९. दूधमलाई चॉकोलेट

एक रुपयाला चार. हीच्यात आणि किसमीमध्ये टफ फाईट होती. पांढरीशुभ्र चॉकोलेट असायची.

dudh-malai-toffee-500x500.jpg

१०. असवंतरा गोळ्या

पांढऱ्या गोळ्या असायच्या, जिभेवर ठेवताच एक वेगळीच अनुभूती यायची. नेटवर फोटो मिळाला नाही.

११. इमली

एक रुपयाला चार अशा अतिशय छोट्या पॅकिंग मध्ये आंबटगोड अशी ही इमली मिळायची. नेटवर फोटो मिळाला नाही.

१२. बोरकूट

अतिशय सुंदर चव, पुडी फोडून तोंडात टाकली, की कित्येक वेळ तोंडात चव रेंगाळायची.

IMG_20190610_224720_0.jpg

१३. दहिवडे

ह्या पदार्थाचा अजूनही मला नेटवर फोटो मिळाला नाही. थोडासा ब्राऊनिश लाल कलर असलेला पदार्थ जिलेबीच्या पाकात टाकला जायचा. स्वर्गीय चव.

अजून काही पदार्थ सुचवा, सांगा. लहानपणीच्या आठवणी जाग्या करूयात.

१४. राजमलाई चॉकोलेट (धन्यवाद किल्ली)

अशा चवेची चॉकोलेट अजून बनलेली नाहीये. मस्त चव..images (3)_1.jpeg

१५. काळ्या आंबट गोड गोळ्या (किल्ली)

१६. बटर (आशुचाम्प)

images (4)_0.jpeg

१७. संत्रा गोळी (आशुचाम्प)

ही मिळण्याच अजूनही हक्काचं ठिकाण, एस टी स्टँड Lol
images (5).jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या बुढ्ढी के बाल ला अर्धा तास तसेच ठेवले की फक्त चिमूटभर रंगीत चुरा शिल्लक राहात असे . त्यामागची केमिस्ट्री समजावून घेतली नाही अजूनही कधी Happy

पुण्यात दगडूशेठ दत्तमंदिराजवळ गाठी वगैरेची दुकाने असत - अजूनही असतील. तेथे वरून साखर लावलेली पण आत कसलेतरी तपकिरी गोडसर मटेरियल असे. त्या वरच्या साखरेपेक्षा ती आतली चव मस्त असे. त्याला काय म्हणत विसरलो.

शाळेजवळ एक भडभुंज्याचे दुकान होते.त्याच्याकडे टॉफी म्हणून बहुतेक गुळाच्या पाकापासून मऊसर तुकडे मिळायचे.एक खायला घेतला की १०-१५ मिनिटे तोंड गप्प असायचे.रच्याकने ही मंडळी गेली कुठे? कित्येक वर्षांत चणे शेंगदाणे असे भ.भुकडून घेऊन खाल्ले नाहीत.नाही म्हणायला दादरच्या कबुतर खान्याजवळ आहे एक दुकान.तो भाजक्या चणेदाण्याचा गंध,लाह्या,भडंग मिस करतेय.
बोरकूट हे इथेच वाचलं.सुकी बोरे,चण्यामण्या,शेंबडी बोरे खाल्ली आहेत.अजून एक चॉकलेट होते.नाव आठवत नाही.ऑरेंज फ्लेवरचे.बाहेर कडक पण चावले की आत मऊ ऑरेंज जिभेवर टपकायचे.

इथे वर्णन केलेले बरेचसे पदार्थ अजून मिळतात हे खरं आणि लहानपणीच्या आठवणीत रमून जायलाआवडतं हेही खरं.काही पदार्थ उदा.इमली गोळ्या किन्वा ओरेंजच्या फ्लेवरच्या गोळ्या छोट्या गावतल्या दुकानात बरण्यात भरुन ठेवलेल्या असतात.फक्त आता क्वालिटी,हायजीन ह्या लहानपणी लेखी नसलेल्या गोष्टी आता घाबरवतात म्हणून बिनधास्त खाता येत नाहीत एव्हध्ंच.रच्याकने,श्रीखंडा च्या स्वादच्या आंबटगोड गोळ्या मिळायच्या त्याचा उल्लेख येउन गेला की नाही?

आता यातले किती आधी येऊन गेलेत माहित नाही परंतु आत्ता हे आठवले - पारले किस्मि, पारले मेलडी, पान पसंद, मँगो बाइट्स, आणि पॉपिन्स

Old Chocs.png

दूधाची पेप्सी मिळते का हल्ली कुठे

टॉफी - खोबरयाची फेव्हरेट

बॉलमधील आईसक्रीम - बॉलला मग झाकण लाऊन खेळायचे.

कालाखट्टा गोळा - हल्ली रस्त्यावरचे पाण्याचे काही खावेसे वाटत नाही. मॉलमधल्याला मजा येत नाही.

हॉट डॉग - शाळेत मस्त मिळायचा. पुन्हा कधीच नाही खाल्ला आयुष्यात

अंडापॅटीस - यावर तर एक लेख होता माझा. कुठे नेऊन ठेवलाय आता तो काय माहीत.

रगडा प्याली - लहानपणीचा स्वस्तातला मस्त पोटभरीचा अन आवडीचा प्रकार

कालाखट्टा गोळ्याच्या गाडीवर चम्मच हा प्रकार मिळतो का हल्ली?
ग्लासात बर्फ कुस्करून त्यात सरबत मग चम्मचने खायचे

त्या बुढ्ढी के बाल ला अर्धा तास तसेच ठेवले की फक्त चिमूटभर रंगीत चुरा शिल्लक राहात असे . त्यामागची केमिस्ट्री समजावून घेतली नाही अजूनही कधी
<<
ही स्पन शुगर असते. अर्थात बारीक वाळलेले साखरेच्या पाकाचे धागे.

त्या मशिनमधे डबीत साखर प्लस रंग घालून साखर वितळवून ती बारीक छिद्रांतून उडवून धागे बनवले जातात.

ही स्पन शुगर असते. अर्थात बारीक वाळलेले साखरेच्या पाकाचे धागे. >>> धन्यवाद आ.रा.रा. Happy हवाबंद डब्यात ठेवली तर टिकत असेल बहुधा.

चिरकूट हा काय पदार्थ असायचा / असतो ? कधीच पाहिला नाही.
पण त्यावरून एकमेकांना हाका मारतात.

याचा अपभ्रंश तर नसेल ना ?
https://www.youtube.com/watch?v=dttYHqBuoxM

मोगली सुपारी माहित आहे का तुम्हांला? (मी कधी खाल्ली नाही कारण मला कोणत्याही फ्लेव्हर्ड सुपारीचा वास आवडत नाही.)

m.jpg

बॉलमधील आईसक्रीम - बॉलला मग झाकण लाऊन खेळायचे.>> व्हाइट बॉल त्यावर लाल अक्षराने बहुतेक क्वालिटी लिहिलेले असायचे निळे झाकण षट्कोनाचे डिझाइन बॉलवर. त्या छोट्या चमच्याने सर्व आइसक्रीम संपते आहे कि नाही ही काळजी. ह्याच्याशी माझी मुंबईतील एक सर्वात पहिली छान आठवण निगडित आहे.

मुंबईत बाबांचा हात धरून फिरत होतो. मग त्यांनी तो गार गार आइसक्रीमवाला बोल दिला व लगेच डबल डेकर चढलो. हे पुण्यात कधीच पाहिले नव्हते त्यामुळे जाम अपूर्वाई. तर वर पण गेलो आणी फ्रंट सीट वर बसून बाहेर मुम्बई बघत ते बॉल मधले व्हाइट आइसक्रीम खाल्ले. बेस्ट मोमेंट सो फार इन माय स्मॉल लाइफ. मग बी डी डी चाळीत एका नातेवाइकांकडे गेलो एक खोली चे घर पण मी पहिल्यांदाच बघितलेले. त्यात त्या काकुंनी आजिबात कशाला हात लावू नकोस असा दम भरला होता. वाचायला पुस्तक पण नाही. मग बोअर होत बसून राहिले अन काय.

तर वर पण गेलो आणी फ्रंट सीट वर बसून बाहेर मुम्बई बघत ते बॉल मधले व्हाइट आइसक्रीम खाल्ले. बेस्ट मोमेंट सो फार इन माय स्मॉल लाइफ.
>>>>

शाळेत अर्ध्या चड्डीत जायच्या वयात ईयत्ता चौथीमध्ये मी स्कॉलरशिप एक्स्ट्रा क्लासमुळे स्कूलबसने न जाता दादर ते दक्षिण मुंबईचा प्रवास "१ नंबर" या डबल डेकर बसने (मी डबल ढेकर बोलायचो) वरच्या त्या अगदी पहिल्या स्पेशल सीटवर बसून असेच बोरं चिंच भेल वगैरे खात करायचो. आणि त्यात पाऊस आला तर धमालच! खर्रंच मुंबई स्पेशल मजा होती. ते देखील काही पैश्यांच्या तिकीटात...

पॉपकॉर्नच्या जमान्यात कुणाला लाह्यावाला आठवतो का?
लाह्या फुटाणेवSSSS असा आवाज आला, की आई बाहेर यायची. हातात मोठ भांड असायच, आणि दोन चार छोटी भांडी.
मक्याच्या लाह्या मोठया भांड्यात. मग अनुक्रमे ज्वारी आणि गव्हाच्या लाह्या घेतल्या जात असत. आणि सगळ्यात शेवटी फुटाणे.
त्याची पोतडी इतकी मोठी असे ना, बघूनच डोळे विस्फारत!
आता कुठे गेला लाहीवाला माहिती नाही, बहुतेक अमेरिकेत विकत असेल.

@देवकी, पुण्यात गणेशपेठेत आहे एक भडभुंज्याचे दुकान. आम्ही कधी कधी शेंगदाणे भाजुन आणतो. घरी भाजलेल्या शेंगदाण्याच्या कुटापेक्षा हा कुट फार वेगळा व टेस्टी लागतो.

शाली यांनी रावळगाव चोकलेट चा फोटो टाकला आहे. पूर्वी रावळगाव ची जाडजूड गोल गरगरीत गोळी मिळत असे:

Bg54pMnCEAA8FKx_0.jpg

रावळपिंडी शी नाम साधर्म्य असल्याने रावळगावसुद्धा पाकिस्तानात असेल असा समज लहानपणी झाला होता Wink

गुगलच्या कृपेने सापडलं. येथेच आहे आपल्या महाराष्ट्रात. मालेगाव जवळ. आणि हि चोकलेट फॅक्टरीसुद्धा तिथेच वीस किमी वर दिसत आहे.

पुण्यात गणेशपेठेत आहे एक भडभुंज्याचे दुकान.-> ईथून च आजोबा भेळ घेऊन यायचे. गणेश पेठेतील दूध भट्टी अजून ही आहे का?

मला या शब्दावरून ते शाळेतल्या पुस्तकातले वाक्य आठवते "जैसे भडभुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडका जहाला." ”भाऊसाहेबांची बखर’ मधला उतारा. हे परीक्षेला हमखास यायचे.

"भडभुंजा" ही शिवी वाटली होती एका मुंबईकर मैत्रीणीला.>>>>>> शक्य आहे.कारण,काय तो भडभुंजासारखा अवतार वगैरे शब्द प्रयोग वाचले होते..चणेवाला /दाणेवाला असंच म्हणायचो

हाच तो मला हवा असलेला दहिवडा, बऱ्याच शोधमोहीमा चालवल्यावर मिळाला.
वरून कडकपणा आणि आत मस्त मऊ सारणातील पाक, अप्रतिम!

IMG_20190626_114256.jpg

Pages