विस्मरणात गेलेले/सहज न मिळणारे खाऊचे पदार्थ.

Submitted by अज्ञातवासी on 10 June, 2019 - 13:19

या लेखाची सुरुवात, प्रस्तावना कशी करावी नाहीये कळत. बघायला गेलं, तर यापैकी बरेच पदार्थ अजूनही दर आठवडी बाजारी मिळतात. पण आता शहरात सहजासहजी मिळणं अशक्य!
ठिकठिकाणी मारवाड, राजस्थान, कृष्णा अशा नावाची चकचकीत स्वीटची दुकाने उघडलीत. त्यातून हे पदार्थ तर हद्दपारच झाले आहेत. जिथे आहेत, तिथे अव्वाच्या सव्वा भावात विकले जातायेत.
चला तर, लहानपणी कसे आजोबा गुडीशेव आणायचे, लग्नाच्या पंगतीत कशी मूठ मूठभर बुंदी खाल्ली, याची आठवण जागवूयात!

१. गोडीशेव/गुडीशेव

लालजर्द दिसणारा आणि बघताच लक्ष वेधून घेणारा पदार्थ म्हणजे गुडीशेव! गोड आणि क्रिस्पी हे कॉम्बिनेशन शक्यतोवर जात नाही, पण गुडीशेवची मजाच न्यारी. एकदा तोंडाला लागली, की सुटता सुटत नाही. पण आता शक्यतोवर आठवडे बाजारात किंवा जत्रेतच मिळते.

२. बुंदी

एरवी लग्नाच्या पंगतीमध्ये हमखास आढळणारा गोड आयटम म्हणजे बुंदी. रात्रभर जागून आचारी बुंदी पाडायचा. आता ही बुंदीही हद्दपार झालीये. बुंदी खाताना दाताखाली जो पाक यायचा, त्याची मजा काय वर्णावी महाराजा!

३. हलवायाचा बुंदीचा लाडू

मोतीचूर या गोंडस नावाने बुंदीचा लाडू चकचकीत काचेत विराजमान झाला, आणि तिथेच त्याची मजा संपली. 'शुद्ध घी मे बने हुए मोतीचुर के लड्डू - ६०० रु KG + GST ५ परसेन्ट. गिफ्ट पॅकिंग मे भी उपलब्ध' यात जी मजा नाही, जी एका जुनाट कळकट हलवायच्या दुकानात ओबडधोबड आकारात बनलेल्या ३० रु पावशेर ने कागदात बांधून मिळणाऱ्या लाडवात आहे.

सगळे एकत्र! PC शालिदा

IMG_20190610_222537_875.jpg

४. कडक शेव

भावनगरी, गाठींया, इंदोरी या नानाविध नावानी मिळणाऱ्या शेवेत ही पिवळीधमक दिसणारी झाऱ्यातून सरळ पाटीत आणि तिथून मुठीने कागदात पडणारी शेव हरवली. ही शेव खाताना येणारा कुर्र कुर्र आवाज आता कुठल्याही दुकानात मिळणाऱ्या शेवमध्ये नाही होत.

PC शालिदा

IMG_20190610_222903_625.jpg

५. भत्ता

भेळ नाही, फक्त भत्ता, आणि तोही मिळेल तर एखाद्या जुन्या दुकानात किंवा सरळ बाजारात. पॅकिंग फरसाण मध्ये प्रचंड आढळणाऱ्या मक्याच्या पोह्यांचा, तळलेल्या पोह्यांचा मागमूस नाही. सर्वात आधी तीन चार मुठा भरून मुरमुरे, त्यावर शेव, थोडी जाड शेव, थोडासा भाजक्या पोह्यांचा चिवडा, खारी बुंदी मग दाळ्या आणि सगळ्यात शेवटी पापडी. वर भरपूर मूठभर बारीक कापलेला कच्चा कांदा आणि कोथिंबीर! लिंबू पिळायचा असेल तर पिळा, जास्तच पट्टीचा असेल तर कच्चं तिखट आणि काळा मसाला वरून. स्वर्गसुख.

images (2)_0.jpeg

६. रेवड्या

रेवड्यांची चव काय सांगू महाराजा, गुडीशेवची लहान बहीण. शुभ्र, जिभेवर पडताच अवीट गोडीचा आनंद देणारी.

gulab-revdi-250x250.jpg

७. गुळाची जिलेबी.

पूर्वी मिळायची. आता नाही मिळत जास्त

IMG_20190610_223519.jpg

८. लाल रसगुल्ले

हो, अशा नावाने एक पदार्थ मिळायचा. एक रुपयाला चार. मध्ये पाक असायचा थोडा, गोड.
thaen-mittai-candy-500x500.jpg

९. दूधमलाई चॉकोलेट

एक रुपयाला चार. हीच्यात आणि किसमीमध्ये टफ फाईट होती. पांढरीशुभ्र चॉकोलेट असायची.

dudh-malai-toffee-500x500.jpg

१०. असवंतरा गोळ्या

पांढऱ्या गोळ्या असायच्या, जिभेवर ठेवताच एक वेगळीच अनुभूती यायची. नेटवर फोटो मिळाला नाही.

११. इमली

एक रुपयाला चार अशा अतिशय छोट्या पॅकिंग मध्ये आंबटगोड अशी ही इमली मिळायची. नेटवर फोटो मिळाला नाही.

१२. बोरकूट

अतिशय सुंदर चव, पुडी फोडून तोंडात टाकली, की कित्येक वेळ तोंडात चव रेंगाळायची.

IMG_20190610_224720_0.jpg

१३. दहिवडे

ह्या पदार्थाचा अजूनही मला नेटवर फोटो मिळाला नाही. थोडासा ब्राऊनिश लाल कलर असलेला पदार्थ जिलेबीच्या पाकात टाकला जायचा. स्वर्गीय चव.

अजून काही पदार्थ सुचवा, सांगा. लहानपणीच्या आठवणी जाग्या करूयात.

१४. राजमलाई चॉकोलेट (धन्यवाद किल्ली)

अशा चवेची चॉकोलेट अजून बनलेली नाहीये. मस्त चव..images (3)_1.jpeg

१५. काळ्या आंबट गोड गोळ्या (किल्ली)

१६. बटर (आशुचाम्प)

images (4)_0.jpeg

१७. संत्रा गोळी (आशुचाम्प)

ही मिळण्याच अजूनही हक्काचं ठिकाण, एस टी स्टँड Lol
images (5).jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूर्य फुलाच्या मीठ लावून भाजलेल्या बिया
चिंच गोळी
तेलातली बोर
वाळलेली बोर
पोंगा पंडित
मुरुक्कुल
टरबूज खरबूज बिया

संत्रा गोळी,दूधमलाई चॉकोलेट,राजमलाई चॉकोलेट वा मस्तच.
माझ्या कडुन थोडी भर....

.मैंगो चॉकलेट
57924855_2223189371330521_6769205901086589248_n.jpg
. पेप्सि
flavors-for-pepsi-cola-500x500.jpg
. बॉबीन्स
61337245_347931719138955_6572204172207650760_n.jpg
.पेपर मिन्ट
mint candy.JPG
.चिंच कॅन्डी
hqdefault.jpg
.गोळ्या
deodorant_1509620515.jpeg
.
बचपन की यादे ढूंढने लगे और सारी यादों की बारात सामने आ गयी......

बोरकुट आमच्या नागपुरात अजुन ही मिळतो. आत्तच मार्च महिन्यात गेलेलो तेव्हा घेतलेला मी केळकरांचा Happy

राजमलाई चॉकलेट पण मिळतं बापटान्च्या दुकानात धरमपेठ ला. ते पण वर्धेतल्या केळकरांचेच प्रोडक्ट

बॉबी अजुन खातो अधुनमधून. प्रत्येक बोटात एक खोचायची आणि खायची. फोटो शोधतो.
-शालीदा
मी पण शोधत होते पण नाही सापडली इमेज.

बटार , श्रिखंडाच्या गोळ्या, संत्याच्या गोळ्या , बोरकुट अजुनही मिळते हो.
रेवड्या प्रसादाम धे आनि बुंदी अजुनही लग्नात वाढली जाते.

गुडीशेव-रेवड्या आजही गावच्या उरुसात सहज मिळतात आणि मनसोक्त खाल्ल्याही जातात. Happy

बोरकुट my all time favorait!!. Happy

लिस्टमधले भत्ता आणि लाल रसगुल्ले हे खाऊ मला माहिती नाही.मिळाले तर ट्राय करायला आवडतील.

लेख वाचल्यावर पहिली आठवण झाली ती मिरचीच्या कँडीची आणि चॉकलेट डॉलरची.पण आता बाजारात सहज मिळत नाही. Sad

@ मी अश्विनी
सुंदर प्रतिसाद, बऱ्याच गोष्टी नव्याने आठवल्या.

@फारएण्ड
काय आहे हे? Rofl

@पल्वली
थँक्स. त्यांनाच आम्ही पोंगे म्हणायचो.

@अमा
मिळतात, पण सह्जासहजी नाही, जसे पूर्वी मिळायचेत.
राजमलाई आणि बोरकूटचा धागा वाचलेला आहे.

@च्रप्स
काही गावांच्या नावे, सुप्रसिद्ध भत्ता प्रसिद्ध आहे.
चांदवडला भेळभत्ता क्लस्टर उभारलं आहे.
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharas...

@मेधावि
जबरदस्त प्रतिसाद. या गोष्टीही हळूहळू घराघरात कमी खाल्ल्या जात आहेत.

@शाली
अप्पा रावळगाव शुगर फॅक्टरीत लहानपणी बऱ्याच वेळा गेलोय. तिथले एक ओळखीचे काका चोकोलेटचा मूठ भरेल एवढा तुकडा काढून द्यायचे.

@वावे
पेपरमिंटच्या गोळ्या आता अशा सुट्या मिळतही नाही.

@सीमा
मस्त. आणि गुडीशेव कशी बनवतात माहिती नाही

@Swara@1
पानपराग लहानपणी आमच्याकडे खायला बंदी होती. कारण माहित नाही. फोटो मस्तच.

@अभ्या
मस्त प्रतिसाद

@किरणुद्दीन
चुणचुण्या म्हणजे काय? फोटो द्याल

@स्वरुप
मस्त प्रतिसाद. नक्की लिहा.

@तनमयी
हा प्रॉपर शाळेबाहेरचा खाऊ. Happy

@सिद्धि
या धाग्यावर मी तुमची वाटच बघत होतो. Happy छान फोटोज.
आठवणीही मस्त.

@प्रसन्न
हो, लहानपणी पन्नास पैशाला केळकर यांची बोरकुटाची पुडी मिळायची.
मस्त

@अंकु
पण पूर्वीच्या प्रमाणात मिळत नाही. श्रीखंडाच्या गोळ्या तर खूप कमी झाल्यात

@मन्या
भत्ता आणि लाल रसगुल्ले हे खाऊ मला माहिती नाही.मिळाले तर ट्राय करायला आवडतील.>>>>>
विल पार्सल!!!!

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद. मी मिळेल तितके फोटो हेडर मध्ये अपलोड करणार होतो, पण आता प्रतिसाद्कर्त्याना विनंती कि त्यांनी पदार्थाची नावे टाकल्याबरोबर जमल्यास फोटोही टाकावा.
सगळ्यांच्या आठवणी खूप मस्त.

@सिद्धि
या धाग्यावर मी तुमची वाटच बघत होतो. Happy छान फोटोज.
आठवणीही मस्त.
- धन्यवाद अज्ञातवासी, मस्तच धागा काढला आपण.
आणि जिथे जुन्या आठवणी तिथे माझी हजेरी असणारच मग कोणी काहीही बोलुदेत.

बाकी भाग २ ची तयारी ठेवा.... कारण मी तरी ही यादों की यादी वाढवणार आहे .

मस्त धागा काढलाय. तुझ्या लिस्टमधले माझे सगळ्यात आवडते पदार्थ म्हणजे गुडीशेव आणि तू सांगितलेले दहीवडे (त्यांना कधीकधी गुलगुले म्हणतात. पण आमच्याकडे गोड दहीवडेच)
आमच्याकडे खूप पूर्वी आठवडे बाजारात कुणीतरी भंडारी म्हणून बसायचे. त्यांचा पाच रुपयाला एक पेढा मिळायचा. तपकिरी रंगाचा पूर्ण तळहात भरेल एवढ्या आकाराचा. तसल्या चवीचा पेढा आता नाही मिळत.
आठवडे बाजाराच्या दिवशीच मिळणार भत्ता पेपरच पूर्ण पान उलगडून, त्यावर पसरून सगळ्यांनी मुठा मुठा भरून खाण्याची मजा वेगळीच होती. पापडी कुणाला मिळणार यावरून भांडणे चालायची.
तुंबाड घ्यायला येशील तेव्हा आगाऊ कळव... दहीवडे आणि गोडीशेव आणून ठेवेन.

अज्ञातवासी, तोंपासु धागा काढलात. भत्ता / भेळ हा माझा अत्यंत आवडीचा पदार्थ. तुम्ही त्याची जी कृती लिहीलीत ना, ती वाचुन कधी एकदा खाईन असे झाले. बाकी काही पदार्थ मला नवीन आहेत, पण पेपरमिंट, आस्मनतारा खूप खाल्लेत. कडक शेव मस्त !! धन्यवाद. मस्त लेख आहे. Happy

आमच्याकडे खूप पूर्वी आठवडे बाजारात कुणीतरी भंडारी म्हणून बसायचे. त्यांचा पाच रुपयाला एक पेढा मिळायचा. तपकिरी रंगाचा पूर्ण तळहात भरेल एवढ्या आकाराचा. तसल्या चवीचा पेढा आता नाही मिळत.>>>>>
अण्णा भंडारी म्हणून एक होते आमच्याकडे
अभोणे जवळील चणकापूर गावचे
जे बाजारात त्यांची जीप घेऊन यायचे पेढे
विकायला पूर्ण पंचक्रोशीत ते प्रसिद्ध होते.

अच्छा! मला आभोणे चणकापूर वगैरे गावे माहिती नाहीत, नेमका कुठला जिल्हा?
मी सांगलीमधल्या एका गावाविषयी बोलतेय. वडिलांची तिथे बदली होती.

महाश्वेता, चणकापूर हे नासिक- मालेगाव पट्ट्यात येते. ( बरोबर ना नीलसागर ? ) चणकापूरचे धरण प्रसिद्ध आहे. आता पाण्या अभावी काय स्थिती असेल माहीत नाही.

चन्या मन्या बोरं
पेप्सीकोला मिळतो अजून बहुदा पण आमच्यावेळी साधा 50 पैसे आणि दुधपेप्सी 1 रु मिळे
त्यामुळे खास प्रसंगीच तो खाण्याची मुभा असे
अजून सेलिब्रेशन करताना दुधपेप्सी ची आठवण येते

@रश्मी - माहितीसाठी धन्यवाद.
@आशुचँप -अगदी अगदी हेच डोक्यात आलं. इनफॅक्ट लहानपणी गरीब श्रीमंतीचा भेद शिकवला असेल तर या पेप्सीकोल्यानेच Lol शाळेत एक मारवाड्याचा पोरगा होता, तो कायम दूधपेप्सी घ्यायचा. आम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे पेप्सी घ्यायचो आणि वरून त्याला पैशाचा माज आहे, अशी मखलाशीही करायचो. माज तर सोडा, बिचाऱ्याने कधी मुंगी मारली नसेल.
Lol

सॉस, जॅम वगैरे मंडळींनी आपला जम बसवण्याआधी घरोघरची फडताळे मोठ्ठ्या तोंडाच्या काचेच्या किंवा चिनीमातीच्या बरण्यातल्या घरी बनवलेल्या वर्षभराच्या आणि चांगल्या मुरलेल्या लोणच्यांनी भरलेली असायची
तसेच गुळांबा, साखरांबा, काकवी, फळे घालून बनवलेला पाक वगैरे तोंडी लावणी असायचीच
मेतकूट् आणि डांगर ही वर्षभराचे बनायचे आणि मुबलक असायचे घरोघरी!
उन्हाळी वाळवणे म्हणजे तर कहर मजा असायची.... गव्हाचा चीक, पापडाच्या लाट्या, ओले सांडगे हातोहात फस्त व्हायचे.
शाबुदाण्याच्या पापड्या अर्धवट ओल्या त्या प्लॅस्टीकवरुन उचकटून खाण्यात काही औरच मजा यायची
आईला मदत म्हणून त्या अंजलीच्या खिसणीवर कच्चे बटाटे एकदा उभे न एकदा आडवे खिसून बनवलेले जाळीदार वेफर्स खाण्यात जी मजा होती ती कुठल्याही चिप्स ला नाही

एखाद्या पावसाळी संध्याकाळी कॅलरी फिलरीचे हिशोब न मांडता घरातले अवघे तळण तळून एखाद्या मोठ्ठ्या परातीत वाढून त्या जोडीला तळलेल्या हिरव्या मिरच्या आणि तळलेले शेंगदाणे सगळ्यांनी मिळून बसून खाण्यात एक आगळी गम्मत होती!

Pages