आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!
पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!
बुम बुम बुमराह बुंगाट
बुम बुम बुमराह
बुंगाट
मस्त फिनिश. वाटलेलं हि मॅच पण
मस्त फिनिश. वाटलेलं हि मॅच पण सुपरओवर ला जाते कि काय्? मलिंगाज यॉर्कर रुल्स!! वेल डन मुंबई!!!
काय खतरनाक झाली मॅच! १०-१२
काय खतरनाक झाली मॅच! १०-१२ ओव्हर्स नंतर इंचभरही हललो नाही जेथे बसलो होतो तेथून.
जबरदस्त मॅच! फायनल ला शोभेल
जबरदस्त मॅच! फायनल ला शोभेल अशी झाली. बुंगाट बुमराह आणी स्लिंगा मलिंगा ने मस्त खेचली. वेल डन मुंबई!!
मलींगाचं एक षटक 20 धांवा ,
मलींगाचं एक षटक 20 धांवा , जणूकाही सामन्यांत रंमत यावी म्हणून टाकल्यासारखं ! आणि मग खरा मलिंगाचा इंगा !! बुमराह तर विश्वचषकासाठी मोठाच आधार आहे आपल्यासाठी !! छान फायनल !!
मस्त झाली मॅच. सगळे जण
मस्त झाली मॅच. सगळे जण चेन्नाईला जिंकवायचा प्रय्त्न करत होते. कॉकने १७ रन पाहिजे असताना ४ बाईज दिल्या. बॉल हातातून गेला. अंपायरने पोलार्ड खेळत असताना शेवटच्या ओव्हरीत २ बॉल वाईड का दिले नाहीत हे त्यालाच माहिती. मुंबईने पण कॅचेस सोडून मॅच जिंकायची नाहीच असे ठरवले होते की काय वाटले.
मलिंगानेपण शेवटचा बॉल मस्त पायावर टाकला होता. अगदी मार एक सिक्सर. पण ठाकूर मुंबईचा असल्याने शेवटी तोच मदतीला आला. त्याने बॅट बॉलला न लागेल अशी काळजी घेतली व शेवटी गंगेत घोडे न्हायले.
मॅच रंगतदार झाली असे म्हणले तरी क्रिकेटचा दर्जा सुमार होता.
रोहीत लवकर फॉर्म मध्ये येवो.
आता वर्ल्ड कपचा धागा काढा.
To be honest , I am very
To be honest , I am very surprised with reactions here
Umpiring, bowling , batting , fielding , captaincy decisions , everything was pathetic.
It was just so bad I hope it was fixed , otherwise this was so low quality .
मॅच रंगतदार झाली पण ती दोन्ही
मॅच रंगतदार झाली पण ती दोन्ही संघांकडून झालेल्या चुका करण्याच्या चढाओढीमुळे.... धोनी म्हणाला सुद्धा की "It was quite a funny game, we were passing the trophy to each other. Both committed mistakes, and eventually the winning team was the one that committed one mistake less"
बाकी सगळ जाउदे पण बुमराह ने दिल जित लिया... the way he reacted even after that misfield from QDK and then hugged him and tried to motivate him and uplift the moral in the last crusial over; it was very mature!
* I am very surprised with
* I am very surprised with reactions here* -
IPL T-20 is entertainment and greats like Sachin, Ponting etc are roped in to artificially pump in some authenticity into it. ' Quallity cricket ' is incidental and is a bonus, if you are lucky to get it. This is my view and the 'final was good ' is consistent with this view !
*It was very mature! * पूर्ण सहमत .
>>IPL T-20 is entertainment
>>IPL T-20 is entertainment and greats like Sachin, Ponting etc are roped in to artificially pump in some authenticity into it. ' Quallity cricket ' is incidental and is a bonus, if you are lucky to get it.
sorry Bhau! find this quite extreme or negative view. IPL sure is entetrtainment mainly because of 'add ons' around the cricket. It is still good 40 overs cricket game. In fact the best thing about IPL is it brings out the top most competition and characters. Even one ball can change the outcome and to me that is the best part. Otherwise, even 50 overs game become very predictive.
I rather believe IPL is the best format to have been ever played in Cricket. Talks of fixing do not really justify all the hard work and termendous commitment shown by everyone involved. Thos things may have happened in past.. But let us remember, end of the day, franchisee invest lot of effort and money in their teams and games and am sure quality performance is part of their agenda.
कालच्या अंतीम सामन्यात दोन्ही संघाकडून मोक्याच्या वेळी चुका झाल्या हे बरोबर आहे. प्रत्येक षटका गणिक पारडे वेग वेगळ्या बाजूने झुकत होते. धोणी धाव बाद होणे ही अशक्यप्राय घटना काल घडली. अर्थात त्यातही मिलिमिटर्स चा फरक होता. माझ्यासाठी तरी कालची अंतीम लढत ही अख्ख्या सिझन ला साजेशी झाली. बुमराह खरच जबरदस्त गोलंदाज/खेळाडू आहे.
किंबहुना या सिझन च्या अनुभवावरून राहूल, रोहीत, बुमराह, शमी, या आपल्या अतीशय मोक्याच्या व महत्वाच्या खेळाडूंचा ऊत्साह व आत्मविशवास प्रचंड वाढला असेल. जे विश्वचषका साठी ऊत्तम आहे. चाहर सारखा फिरकी गोलंदाज देखिल तयार झाला आहे.
आता लवकर कुणितरी विश्वचषक २०१९ चा बाफ काढा. तिथे भेटू. भारत व ईंग्लंड अंतीम सामना होईल्/असावा असे आम्हा लंडन वासीयांना वाटते आहे. आणि तसे होऊन भारत जिंकला तर सोने पे सुहागा.
>>greats like Sachin, Ponting etc are roped in to artificially pump in some authenticity into it. '
are u suggesting IPL was only real when Sachin and Ponting were playing it? Rather, if Grreats like Sachin and Ponting are still associating with IPL, is there a chance that IPL is still real and respected by them and by us?
Quallity cricket ' is
Quallity cricket ' is incidental and is a bonus, if you are lucky to get it. This is my view and the 'final was good ' is consistent with this view ! >> Agreed to it
, but where was that bonus .
I have nothing against adding masala and making chicken spicy , but if the chicken itself is Stale , it doesn't taste good no matter what you put in it
आयपीएल मधे क्रिकेट चा दर्जा
आयपीएल मधे क्रिकेट चा दर्जा सामान्यतः थोडा कमी असतो हे मान्य आहे. कदाचित, बहुतेक आंतरराष्ट्रीय खेळाडू थोडं हातचं राखून खेळतात आणी फ्रिंज खेळाडू जीव तोडून खेळतात. त्यामुळे दर वर्षी कुणीतरी आयपीएल स्टार असतोच जो पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर फारसा चमकत नाही. उदा. हाच दीपक चहर आंतरराष्ट्रीय सामन्यात सामान्य दर्जाचा वाटतो. कित्येक स्वप्नील असनोडकर, पॉल वल्टाथी, सौरभ तिवारी, पियुष चावला, सिद्धार्थ कौल, सिद्धार्थ त्रिवेदी, युसूफ पठाण, शादाब जकाती, सुदीप त्यागी हे असे वेळोवेळी आयपीएल मधे चमकून गेले आहेत. जितके कॅचेस एका आयपीएल मॅच मधे सोडले जातात तेव्हढे तर एखाद्या संपूर्ण (आंतरराष्ट्रीय) टूर्नामेंट मधे सुद्धा सुटत नाहीत.
अंपायरिंग मधल्या चुका सुद्धा glaring असतात. मला तर एस. रवी ह्या माणसाला एलिट पॅनेल मधे घेऊन आयसीसी ने भारताची खिल्ली उडवलीय असंच वाटतं नेहमी. (पण तो कन्सिस्टंट आहे. टेस्ट मॅचेस ला सुद्धा इतकच गलथान अंपायरिंग करतो).
पण तरिही कालची फायनल थ्रिलिंग झाली. दोन्ही टीम्स ची 'तू जिंक, तू जिंक' अशी अहमिका लागली होती असंही बरेच वेळा वाटून गेलं. पण तरिही मागच्या वर्षीसारखी एकतर्फी नाही झाली. मागच्या वर्षीची फायनल अगदीच, 'कामं करता करता बघू' टाईप झाली होती. ह्या वेळी तसं काही झालं नाही. शेवटी मॅच सुपरओव्हर ला जाते की काय असं सुद्धा वाटून गेलं.
काल बुमरा ची बोलिंग आणि डिकॉक
काल बुमरा ची बोलिंग आणि डिकॉक ने तो बॉल सोडल्यावर नंतर जाउन त्याच्याशी बोलणे वगैरे बघता कौशल्य आणि टेम्परामेण्ट दोन्हीमधे टोटल रिस्पेक्ट. नंतरच्या मुलाखतीतही तो मस्त बोलला.
मॅच रंगतदार झाली तरी तक्रार
मॅच रंगतदार झाली तरी तक्रार असते, एकतर्फी झाली तरी तक्रार असते, बॉलर्स धुतले गेले तरी तक्रार असते, कमी धावांमधे डाव आतोपला तरी तक्रार असते. मॅच फिक्सिंगचा पोस्ट प्रत्येक मॅच नंतर असते.
आपण खेळाची मजा कशी लुटायची हे विसरत चाललो आहोत का ?
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
संपूर्ण स्पर्धे मधे I'm really impressed with रRahul Chahar. १९ वर्षाचे पोरगे आहे. बहुधा KKR च्या मॅचचा अपवाद वगळता जबरदस्त बॉलिंग केली आहे. प्रत्येक वेळेला मधल्या overs मधे धावा न देण्याचे नि मोक्याच्या विकेट्स घेण्याचे काम केलय. Kid needs to play for India at some time.
(पण तो कन्सिस्टंट आहे. टेस्ट
(पण तो कन्सिस्टंट आहे. टेस्ट मॅचेस ला सुद्धा इतकच गलथान अंपायरिंग करतो). >>>
या वर्षीच्या वन डे वर्ल्ड
या वर्षीच्या वन डे वर्ल्ड कपसाठी नवीन धागा सुरु करावा...
*but where was that bonus .*
*but where was that bonus .* - you get the bonus, if you are lucky. . Bad luck !
(No subject)
उघडया बसमधून मुंबै टीमची मिरवणूक ! -
अहो, तुमचं काय तें टी20, चहाबददलच असतं ना ? मग निवडणूक आयोगाने आक्षेप नाही घेतला, 'चायवाल्याचा रोड शो ' म्हणून !!
धोनी धावबाद होता?https://www
धोनी धावबाद होता?
Run-out rule change
A batsman cannot be adjudged run out if his bat bounces after being grounded behind the crease. Take this scenario. A batsman stretches his bat out and it crosses the crease, but when the stumps are broken, his bat happens to be in the air and no part of his body is behind the crease, or the ‘safe zone’. As per the current rules, he is run out. But come October 1, he cannot be ruled run out. He is deemed safe.
https://www.google.com/amp/s/www.thehindu.com/sport/cricket/internationa...
धोनी धावबाद होताच. त्याची बॅट
धोनी धावबाद होताच. त्याची बॅट क्रिजमधे पोचलीच नव्हती तर आपटून हवेत जाण्याचा प्रश्नच नाही.
धोनी धावबाद होता. समोरून
धोनी धावबाद होता. समोरून बघताना लाँग-ऑफ च्या बाजूची बेल जेव्हा डिसलॉज झाली तेव्हा त्याची बॅट क्रीझ च्या बाहेर होती. पण पहिला रिप्ले मिडविकेटकदून दाखवला, ज्या स्प्लिट सेकंद मधे, त्याची बॅट आत आली आणी मग त्या बाजूच्या स्टंप मधला दिवा लागला होता.
धोणी धाव बाद होता हे समोरच्या
धोणी धाव बाद होता हे समोरच्या कॅमेरा मूळे स्पष्ट झाले होते. तरिही, या निमित्ताने एकूणात DRS अंतर्गत:
Ball tracker/trajectory is not 100% accurate. असे बरेच वेळा वाटले. मुळात खेळप्पटी आणि त्यावर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर होणार्या गोष्टि ईतक्या बदलत्या (dynamic) आहेत की चेंडू कुठल्या रेषेत किती ऊंचीवर स्टंप वर लागेल वगैरे algorithm तयार करणे तित्तके सरळ व अचूक असणे शक्य नाही. त्यातही 'विकेट हिटींग' हा कधी कधी अंपायर कॉल ठेवून अजून गोंधळ वाढवलाय असे मला वाटते. I wonder if the trajectory algorithm takes into consideration variables such as age of the ball, humidity, air speed, pitch state (time elapsed, wear and tear), bowler speed, type of spin expected, any reverse/late swing.. so many variables which I believe impacts the predictability accuracy .
Sound tracker: In Rain'sa case the most experienced umpire (I Gould) was certain that the ball had brushed glow/part of glow.. but the sound tracker didn't pick it up. Again, wonder amidst the chaos and high decibels in the stadium, how does the sound tracker pick up clear noise? Why is hot spot not used in conjunction with this, I am not sure.
Finally, there is growing demand for no ball checking using DRS.
Technology is of course a big help esp. when every run and millions are at stake.. in every high profile game/series/tournament. पण निव्वळ रन ऑट चेक करण्या साठि सुरू झालेले हे थर्ड अंपायर चे भूत मला वाटते आता सर्वच बाबतीत मानगुटीवर बसू लागले आहे. भविष्यात ऑन फील्ड अंपायर ही व्यक्ती गायब नाही झाली त्याची भूमिका निव्वळ हातवारे करण्या एव्हडिच राहील अशी शंका आहे.
ईथल्या ईतर जाणका व रसिकांची मते जाणून घ्यायला आवडेल. खेरीज, विश्वचषकात नेमकी काय काय वापरणार आहेत, कुणाला माहित आहे का?
ps: As per the code, if the evidence is inconclusive, the decision should be in the favour of batsman.
व्यक्तिशः मला options
व्यक्तिशः मला options available असतील तर वापरावे असे वाटते. ह्यामम्धे अंपायर चा अपमान किंवा अवहेलना वगैरे नसून त्याने दिलेल्या निर्णयांची अचूकता वाढवणे एव्हढेच आहे. माझ्या लीगमधल्या अंपायरींगच्या स्वतःच्या अनुभवावरून दीर्घकाळ concentration ठेवणे हे किचकट आहे त्यामूळे technology च्या मदतीने चूका टळता येत असतील तर बरे होईल. माझ्या हातात असते तर Third Ump ला मैदानात चुकीचा निर्णय दिला जातो हे लक्षात आले तर तो overwrite करता यावा, मग तो कसलाही निर्णय असो.
इथे वर्षानुवर्षे अंपायरचा शब्द ब्रह्मवाक्य वगैरे चालत आले आहे ह्या आक्षेपावर माझे एव्हढेच म्हणणे आहे कि सध्या ज्या संखेमधे मॅचेस खेळल्या जातात नि त्यामधे किती प्रवास होतोय ते बघता अंपायर कडून चूकांचे प्रमाण वाढणे मला साहजिक वाटते. म्हणून आधी काय होते ह्या तुलनेत अर्थ नाही.
उपलब्ध टेक्नॉलॉजीचा जमेल
उपलब्ध टेक्नॉलॉजीचा जमेल तितका उपयोग करून जगणं सुसह्य, सुखकारक अधिक प्रॉडक्टीव्ह आणी एफिशियंट करणं हे सार्वत्रिक सत्य आहे.
त्यामुळे हे क्रिकेट मधे सुद्धा लागू आहे. टेक्नॉलॉजी हळूहळू प्रगत होत जाते. जितकी शक्य आहे तितकी टेक्नॉलॉजी वापरावी असं माझं मत आहे.
"amidst the chaos and high decibels in the stadium" - असं होत नाही. स्निकोमीटर, रेझोनंस फिल्टर वापरून, अँबियन्स नॉईझ neutralize करतो आणी मग बॅट - बॉल च्या काँटॅक्ट च्या आवाजाच्या फ्रिक्वेन्सी ला अँप्लिफाय करून, स्लो मोशन मधे प्लॉट करतो. हॉट स्पॉट डीआरएस मधे कंपल्सरी नाहीये, पण बॉल ट्रॅकिंग आणी स्निको आहेत असं मला वाटतं.
टेकनाॅलाॅजीचा वापर जरूर करावा
टेकनाॅलाॅजीचा वापर जरूर करावा पण त्यामुळे क्रिकेट दुय्यम ठरणार नाही, याची दक्षताही घेणं अत्यावश्यक. जर खेळायचं तंत्र, खेळातली सौंदर्यस्थळं यापेक्षां टेकनाॅलाॅजीचा वापरच लक्ष वेधून घेत असेल , तर तो टेकनाॅलाॅजीचा दुरूपयोग ठरेल. मला वाटतं, सर्व मैदानी खेळांत क्रिकेटचे नियमच सर्वाधिक क्लिष्ट असावेत. त्यात आणखी ही भर नको.
खेळाडूनीही ( व प्रेक्षकानीही ) क्वचित चूकीचे निर्णय त्यांच्या विरोधात जाणयाची शक्यता हा खेळाचाच भाग असल्याची मानसिकता बाळगणंही आवश्यक आहे.
मला वाटतं, सर्व मैदानी खेळांत
मला वाटतं, सर्व मैदानी खेळांत क्रिकेटचे नियमच सर्वाधिक क्लिष्ट असावेत >> माझ्या मते तो मान NFL ला जाईल.
>>मला वाटतं, सर्व मैदानी
>>मला वाटतं, सर्व मैदानी खेळांत क्रिकेटचे नियमच सर्वाधिक क्लिष्ट असावेत >> माझ्या मते तो मान NFL ला जाईल<<
नोप; गॉल्फचे नियम अतिशय किचकट आणि अतर्क्य आहेत...
"माझ्या मते तो मान NFL ला
"माझ्या मते तो मान NFL ला जाईल." - हेच लिहायचं मनात आलं होतं. पण म्हटलं आपलं अज्ञान (NFL विषयी) असेल कदाचित. क्रिकेट कसं लहानपणापासून खेळत आलो. परवा मिश्रा जसा थ्रो करताना मधे आला, ते बघताना जाणवलं की लहानपणी गल्ली क्रिकेट खेळताना हा प्रकार सरसकट चालायचा. अचानक आयसीसे ने नियम बदलला म्हणून २०-२५ वर्षं रक्तात भिनलेलं इन्स्टिंक्ट कसं बदलणार? ह्या रक्तात भिनलेल्या क्रिकेट च्या तुलनेत, अमेरिकन फूटबॉल ही अक्वायर्ड टेस्ट आहे (दूध आणी व्हिस्की इतका फरक आहे - सवय आणी अक्वायर्ड टेस्ट मधे). गेली अनेक वर्ष अमेरिकन फूटबॉल बघतोय. कधीतरी गम्मत म्हणून कॅच पण खेळलोय. पण त्याला, 'मिळाला वेळ आणी थोडीशी जागा, की सुरू क्रिकेट' सारखं अंगात भिनायला वेळ नाही मिळाला.
"गॉल्फचे नियम अतिशय किचकट आणि
"गॉल्फचे नियम अतिशय किचकट आणि अतर्क्य आहेत..." - परत माझं वरचीच पोस्ट लागू आहे.
मी टेक्नॉलॉजीकडे हाय-कोर्ट
मी टेक्नॉलॉजीकडे हाय-कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट अशा हायरआर्कीने बघतो. कायदे/नियम कितीही स्पष्ट असले तरी फ्रिंज केसेस घडून येतात आणि येणारच. सेम नियमांच्या चौकटीत राहून हाय कोर्टाने दिलेला निकाल सुप्रीम कोर्ट बदलू शकते तसेच अनुक्रमे ऑन फील्ड अंपायर आणि थर्ड अंपायरचे आहे.
ह्याचा अर्थ प्रत्येक केस फ्रिंज केस असतेच आणि ती सुप्रीम कोर्टाकडे/थर्ड अंपायर कडे दिली पाहिजे असे नाही. कॅप्टन/बॅट्समनला दिलेले रिव्यु चे अधिकार नेमके हेच लिमिटेड एस्कलेशन घडवून आणण्यासाठी आहेत. टेक्नॉलॉजी ह्यूमन बायस कमी करण्यासाठी मस्ट आहे पण आऊट/नॉटआऊट किंवा गिल्टी/नॉन गिल्टी चे वर्डिक्ट देणारा जोवर ह्यूमन आहे तोवर हा बायस १००% काढता येणार नाही.
डकवर्थ्/लुईस अल्गोरिदम ही एकमेव गोष्ट क्रिकेटला ईतर कुठल्याही खेळापेक्षा जास्त कीचकट बनवते असे माझे मत आहे. तुम्ही डकवर्थ/लुईस चे नंबर्स मान्य करू शकता तर बाकी टेक्नॉलॉजी वापरून घेतलेले निर्णय मान्य करणे फारच सोपे वाटते.
टेनिसमधल्या लाईन कॉलसाठी हॉक आयचा वापर हे चपखल ऊदाहरण आहे. खेळाडू ने कितीही मोठा टँट्रम फेकत सांगितले की बॉल लाईनच्या बाहेर पडलेला मी बघितला तरी हॉक-आय ने दाखवलेले अन-बायस्ड सोल्यूशन मान्य करावेच लागते, तसेच तर आहे क्रिकेट मध्ये सुद्धा.
टेनिसमधल्याच फूट फॉल्ट सारखे ऑटोमॅटिक (अजून वापरात नसले तरी टेक्नॉलॉजी ऊपलब्ध आहे) नो-बॉल डिटेक्टशन करता आले पाहिजे. ऑन फील्ड अंपायर फक्त गेमच्या प्रॉपर कंटिन्यूटी साठीच राहिला तरी हरकत नाही , खेळ अनबायस्ड असणे महत्वाचे. बीसीसीआय आयपीएल वापरून 'एजंट ऑफ चेंज' होऊ शकते पण भारताचाच डीआरएसला बर्यापैकी विरोध करण्याच ईतिहास पाहता ते शक्य वाटत नाही.
Pages