आयपीएल १२ - २०१९

Submitted by भास्कराचार्य on 20 March, 2019 - 09:11

आयपीएल - २०१९ ह्या आठवड्याच्या शेवटी सुरू होते आहे. आयपीएलचा तडका बसला, की लगोलग येणार्‍या विश्वचषकाची चव अजूनच लज्जतदार होणार आहे! कोण जिंकणार, कोण चांगलं खेळणार, विश्वचषकाची संघनिवड आयपीएलमधील कामगिरीवर ठरणार का - एक ना दोन! निवडणुका असतानाही ह्यावेळी आयपीएल भारतातच असणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात हवा चांगलीच गरम असणार आहे. स्पर्धा सुरू होईल तशी चर्चा जोमाने होईलच. वॉर्नर-स्मिथ जोडगोळी पुन्हा क्रिकेटमध्ये परतली आहे. सॅम कुरानसारखा खेळाडू ह्या वेळेस आहे. कोहलीसारखा खंदा फलंदाज व कप्तान ह्यावेळी आयपीएल आणि विश्वचषक दोन्ही मान पटकावण्यासाठी सज्ज आहे. जयदेव उनाडकत ह्याही वेळेस भरपूर किंमत घेऊन मैदानात उतरलाय. ह्याशिवाय रशिद चहल, चहल, कुलदीप यादव ह्यांच्या फिरकीची मजा लुटता येणार आहे. एकंदरीत भरपूर मजा येणार आहे!

पहिला सामना शनिवार २३ मार्च, चेन्नई विरुद्ध बेंगालुरू असा रंगणार आहे. आपल्या संघाचं समर्थन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, वादविवादाच्या फैरींची मजा लुटण्यासाठी, अचूक आणि मार्मिक व्यंगचित्रांनी घेतलेल्या 'फिरकी'साठी इथे आता धमाल करूया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज रियान पराग छान खेळला.
इतक्यात भारतीय संघात घेणार नाहीत, कारण त्याला दाढीमिशा नाहीत.
पण अजून खूप लहान आहे. केशवर्धक तेल लाऊन दोन तीन वर्षात दाढीमिशा वाढवल्या तर भारतीय संघात घेतील.
शिवाय तो आसामचा आहे. म्हणजे संघात डायवर्सिटी पण येईल.

म्हमइच जिंकणार वो आय पी एल. Happy
शुभनम गील आणि मनिष पांडे यांना रायडूच्या ऐवजी राखीव ठेवावे.

काल महिलांचा सामना सुद्द्धा शेवटच्या चेंडू पर्यंत रंगला होता.

आपला अंदाज:

चेन्नई वि. मुंबई: चेन्नई
दिल्ली वि. हैद्राबाद: दिल्ली
मुंबई वि. दिल्ली: मुंबई
चेन्नई वि. मुंबई: चेन्नई

मुंबई फायनल ला पोहोचली. आज सुर्यकुमार यादव लाजवाब खेळला. खूप परिपक्व इनिंग होती. मजा आली.

मनिष पांडे एकदम जबरदस्त खेळतोय मात्र.

यादव खूप दिवसांनी त्याच्या गुणवत्तेला न्याय देणारी खेळी खेळला आज. स्पिन नि रन रेट ज्या तर्‍हेने हँडल केला ते मस्तच होते. इशान किशन पंतच्या जमान्या आल्यामूळे रखडणार आहे बिचारा, साहा चे धोनी मुळे झाले तसे.

*आज सुर्यकुमार यादव लाजवाब खेळला. * - हया आयपीएलमधे तो नेहमीच खेळाच्या पद्धतीमुळे लक्ष वेधून घेत होता.
शेवटच्या टप्प्यात फाॅर्मात येण्याची मुंबईला संवयच जडली असावी !
मला इम्रान ताहिरची 100% योगदान देण्याची व ' नेवर से डाय ' वृत्ती भावते. चेंडूला फ्लाइट द्यायला तो कचरत नाही, हेंही विशेष. ( अर्थात, बळी मिळाल्यावर एवढं नाचण्याची त्याची जुनी संवय मोडणं आतां कठीणच! )

आज दिल्ली वि. हैद्राबाद. कागदावर तरी हैद्राबाद चं पारडं जड वाटतय.

पांडे आयपीएल किंवा डोमेस्टीक क्रिकेट मधे जसा खेळतो आणी मिळालेल्या मर्यादित संधींत आंतरराष्ट्रीय सामन्यात जसा खेळला, ते पहाता मोठ्या स्टेज वर खेळण्याच्या टेंपरामेंट चा प्रॉब्लेम असावा अशी शंका येते.

इशान आणी पंत दोघंही एकाच अंडर-१९ संघात खेळले होते. इशान किशन कॅप्टन होता आणी पंत विकेटकीपर म्हणून खेळला होता. सध्या तरी पंत ने त्याला लीपफ्रॉग केलं असं चित्र आहे. पण सांगता येत नाही, धोनी-साहा होणार की कार्थिक - धोनी होणार ते कळेलच.

What a match!

जबरदस्त झाली मॅच. मिश्राजींनी शेवटी अगदीच हरयाणवी पद्धतीनं खेळ केला ;). पंत काय जबरदस्त खेळला!! आता चेन्नई वि. दिल्ली!

रोहित, यादव नि शॉ, मुंबई मधे असे काय आहे कि एकासारखे खेळणारे खेळाडू मिळतात ? easy on eyes and frustrating to follow !

*easy on eyes and frustrating to follow !* -+1
You said it !! ' देरसे आये, दुरूस्त आये ! ' , म्हणून समाधान मानावं लागतं. त्या शाॅची एक चांगली खेळी बघायला मिळावी म्हणून किती ताटकळत रहावं लागतं ! पण , it is worth waiting हेंही आहेच !

*झक मारली आणि वर त्या माॅरिसचंच उदाहरण दिलं ; काढूनच टाकला ना त्या बिचारयाला द.आफ्रिकेचया विश्वचषक संघातून ! * - ही होती माझी 19 एप्रिलची पोस्ट. आजची बातमी आहे, त्याला पुन्हा संघात स्थान मिळाल्याची. चला, मीं सुटलो, माझी बत्तीशी त्याला बाधली या आरोपातून ! Wink

चेन्नई हारायला पाहिजे, दिल्लीने फायनल जायला पाहिजे, पण मग मुंबई फायनल सहज जिंकेल...

it is worth waiting >> अगदी अगदी ! डोळ्याचे पारणे फिटले काल, विशेषतः ज्या तर्‍हेने रशिद खानला हँडल केलेले ते बघून.

धोनीने शेवटच्या ३ ओव्हर मध्येच फलंदाजीला यावे. आधी उगाच वेळ घालवतो. शेवटी मारतो पण बर्‍याचदा हल्ली आउटही होतो. त्याच्या आधी ब्रावोला का पाठवत नाही कोण जाणे. चेन्नाईची टीम दमल्यासारखी वाटते ना?.
दिल्लीची बॅटिंग खूप स्ट्राँग झाली आहे. रदरफोर्ड आणि पॉल चांगले मिळाले आहेत.
आज दिल्ली जिंकणार. काळे विरूद्ध पांढरे केस. Happy

"दिल्ली चेन्नईला हरवेल मग मुंबैलाच कां नाहीं " - भाऊंमधला मुंबईकर जागा झाला. दिल्लीकडे शॉ, अय्यर असे दोन दोन मुंबईकर आहेत ना! Happy

१४७ पुरेसा ठरणार का दिल्ली साठी? पंत ची एक मॅच्युअर बॅट्समन म्हणून दिसणारी प्रगती वाखाणण्याजोगी आहे. अय्यर आणी शॉ च्या विकेट्स appalling होत्या. इतक्या स्लो विकेट वर शॉ ने प्रयत्न केलेला पुल शॉट आणी मॅच च्या इतक्या नाजुक वळणावर असताना, सरळ बॅट ने, मान खाली घालून मोठी पार्टनरशिप करायची गरज असताना, अय्यर ने गूगली ला मारलेला स्वीप अत्यंत बेजवाबदार होते.

दिल्लीची पोरं चेननईच्या बडया धेंडांसमोर फारच दबून खेळलीं, असं वाटलं.
मुंबई वि. चेन्नई अटीतटीची होईल , अशी अपेक्षा.

Only for MSD!

Pages