न्युझीलंड- दहशतवादी हल्ला

Submitted by भरत. on 16 March, 2019 - 07:33

न्यु झीलंडमधल्या ख्राइस्ट चर्च इथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. जगातला कोणताही देश अतिरेकी, द्वेषाधारित, विध्वंसक विचारसरणीपासून सुरक्षित राहिलेला नाही. या हल्ल्यानंतर न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी देशाला उद्देशून केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आश्वासक वाटलं. त्यांच्या भाषणातला हा काही भाग. (स्वैर अनुवाद)

या हल्ल्याने घायाळ झालेल्या लोकां करिता हा माझा संदेश. हा संदेश फ़क्त माझ्याच नव्हे तर माझ्या देशाच्या वतीने आहे , माझ्या देशवासियांच्या भावनाही याच असतील , याची मला खात्री आहे.
या हल्ल्यात क्षती पोचलेल्या लोकांसोबत आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. बळी पडलेले लोक ख्राइस्टचर्चचे होते. त्यातल्या अनेकांचे ते जन्मस्थान नव्हते. खरं तर त्यातल्या अनेकांनी आपल्या वास्तव्यासाठी न्युझीलंडची निवड केली होती. हा देश त्यांनी (स्थलांतरासाठी) स्वत:हून निवडला त्याच्याशी नातं जोडलं, इथे त्यांची कुटुंब होती, इथल्या समाजाबद्दल त्यांना जिव्हाळा होता आणि या समाजानेही त्यांना प्रेम दिलं. या जागी ते एक सुरक्षित निवारा शोधीत आले. इथे त्यांना त्यांच्या धर्म आणि संस्कृतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य होते.

तुमच्यातल्या अनेकांना प्रश्न पडला असेल, हे असं माझ्या देशात कसं घडू शकतं? आपण लक्ष्य ठरण्याचे कारण, आपण द्वेष करणार्‍यांना आसरा दिला हे नव्हते. आपण वंशभेदाला , अतिरेकी विचारसरणीला थारा दिला, म्हणून हा हल्ला इथे झाला नाही. यांतलं ( वंशभेद, द्वेष, अतिरेकी विचार) काहीही आपल्यात नाही, म्हणूनच केवळ आपल्याला लक्ष्य केलंय. आपल्याला लक्ष्य केलंय कारण आपण विविधता, प्रेम, आपुलकी ही तत्त्वं मानतो. ही तत्त्वं मानणार्‍यांना सामावून घेतो. निराधार गरजूंना आश्रय देतो.

या तत्त्वांपासून आम्ही जराही ढळणार नाही, ढळू शकणार नाही याची खात्री बाळगा.

दोनशे वेगवेगळ्या वंशाच्या आणि एकशे साठ भाषा बोलणार्‍यांचा हा देश आहे, याचा मला अभिमान आहे. या विविधतेत आमची काही सामाईक तत्त्वं सामावलेली आहेत. या हल्ल्याची झळ लागलेल्यांबद्दल आमच्या मनात सहवेदना आहे, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत; हे आजच्या घडीला माझे सांगणे आहे.

ज्या विचारसरणीतून हे कृत्य झालं तिचा मी तीव्रतम शब्दांत निषेध करते.
तुम्ही (आपला देश, आपला समाज म्हणून) आम्हांला निवडलं असेल, पण आम्ही तुम्हांला पूर्णपणे नाकारतोय. तुमचा धिक्कार करतोय.

Group content visibility: 
Use group defaults

सर्वप्रथम काही लोंकांनी हा भ्रम मनातून काढून टाकावा की न्यूझीलंड मधील हल्ला हा सरसकट मायग्रंट्स विरोधात होता. कारण हा जबरदस्तीने पकडून ठेवलेला भ्रम तुमची विचारशक्ती गोठवतोय.

न्यूझीलंडमधील हल्ला व्हाइट सुप्रीमसीचाही भाग नाही, कारण तो विविध प्रकारच्या नॉन-व्हाइट लोकांनी भरलेल्या जागांवर झाला नाही. तर त्वचेचा रंग ना बघता वा मारल्या गेलेल्यांचा वंश ना बघता केवळ "एकापेक्षा जास्त" मशिदींत झाला (मंदिरात वा कृष्ण वर्णीयांच्या चर्चमध्ये नाही). तेव्हा हा व्हाइट सुप्रीमिस्ट दहशतवादाचा भ्रमही या हल्ल्याबाबतीत मनातून काढून टाका.

न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे भाषण मी अतिशय प्रभावी मुत्सद्दीपणाचे एक उदाहरण म्हणेन, कारण समोर जरी त्या भाईचाऱ्याच्या गोष्टी करत असतील तरीही त्यांनी त्यांच्या देशात यापुढे येणाऱ्या मुस्लिम मायग्रंट्सना कमी करण्याचे धोरण अवलंबायला सुरुवात केलेही असेल.

आता राहिला इस्लामोफोबिया! इस्लामची भीती हा फोबिया किंवा भ्रम नसून काळाच्या कसोटीवर उतरलेला जागतिक अनुभव आहे. आतापर्यंत ख्रिश्चन मिशनऱ्यांनी कितीतरी अपराध केले असतील, संस्कृती बुडवल्या असतील, परंतु मुस्लिम आक्रमकांनीही जगभर तेच केलेय. हे दोन्ही धर्म धुतल्या तांदळासारखे नाहीत. 14-15 व्या शतकात अरब लोकांकडे ताकदवान आरमार आणि दारुगोळा असता तर संपूर्ण अमेरिका खंड आता इस्लाममय दिसला असता, याबद्धल कुणाला शंका असेल तर सांगा.

परंतु ख्रिश्चन धर्मात कितीतरी सुधारक झाले ज्यांच्यामुळे तो धर्म सर्वसमावेशक आणि अमिषांवर आधारित धर्मपरिवर्तनावर विश्वास करणारा बनला. निदान त्यांचे धर्मगुरू प्रेम, दया ,क्षमा या शब्दांची आळवणी करताना दिसतात. याउलट बहुसंख्य मुस्लिम धर्मगुरू इस्लामवरील संकटाचा राग आळवणे, जिहादला प्रोत्साहन, कुराण हेच पाहिले व शेवटचे पुस्तक आहे असे युक्तिवाद आणि धार्मिक सुधारणेला तीव्र विरोध हीच कामे करताना दिसतात.

सध्या जे काही जगभर सुरू आहे ते केवळ विविध धर्माच्या व इस्लाममधीलच पंथांच्या आपापसातील वैराचा फायदा उचलण्याचे धोरण आहे. कुणी तेलासाठी तर कुणी शस्त्रास्त्र विकण्यासाठी तर कुणी स्वतःची सत्ता टिकविण्यासाठी या संघर्षांना खतपाणी घालतात. असे असले तरीही जेव्हढे अतिरेकी हल्ले मुस्लिम संस्थांकडून इतर धर्मीय लोकांवर किंवा त्यांच्याच धर्मातील इतर पंथांवर होतात, तेव्हढे आणखी कुठल्याही धर्माच्या लोकांकडून होत नाहीत. याचे प्रमुख कारण म्हणजे इस्लामची धार्मिक शिकवण. जी अशा संघर्षांना जिहादच्या नावाखाली नैतिक बनवते व इस्लामसाठी मारणे व मरणे मुस्लिमांचे परामकर्तव्य असल्याचे सांगते. जगातील प्रमुख धर्मांपैकी इस्लाम हा एकच धर्म आहे जो इतर धर्मीयांशी हिंसा करायला सांगतो आणि वारंवार सांगतो. स्वतः प्रेषितांनी मदीनेच्या रूपाने उदाहरण देऊन ठेवलेय.

यातून जगाला वाचवायचे असेल तर याविरुद्ध त्यांच्याच धर्मात आवाज उठवला गेला पाहिजे. त्यांच्याच धर्मातील शांतिप्रिय लोकांनी (असलेच तर) एकत्र येऊन शांततेच्या व सुधारणेच्या आड येणाऱ्यांविरुद्ध धार्मिक व वेळप्रसंगी रक्तरंजित क्रांती करायला हवी, तरच पुढे काहीतरी आशा असेल. नाहीतर हे विश्व नव्या क्रुसेड्स च्या वाटेवर आहे आणि त्याची परिणीती अणूयुद्धात सहज होऊ शकते.

बाय द वे श्रीलंका हल्ल्याशी संबंधित काही पाकिस्तानी लोकांना श्रीलंकेत विशेष पथकाकडून अटक करण्यात आलेली आहे. तेव्हा तिथेही पाकिस्तान कनेक्शन मिळालेले आहे.

बाकी ज्या शहामृगांना अजूनही अँटी-मायग्रंट्स व व्हाइट सुप्रीमिस्टच्या स्वप्नरंजनाच्या वाळूत तोंड खुपसून राहायचे आहे, त्यांना राहुद्यात. ते जीव अज्ञानात सुखी राहतील

Lol. न्यूझीलंडमधल्या दहशतवाद्याने आपला मैनिफेस्टो काढलाय. त्यात त्याने त्याचं म्हणणं अगदी स्पष्ट शब्दांत लिहिलंय. यावर या धाग्यावर अनेक वेळा लिहून झालंय.
पण काही लोक त्याकडे साफ दुर्लक्ष करून आपला मुस्लिमद्वेष पाजळून घ्यायला त्या दहशतवाद्याच्या क्रुत्याला स्वतःच्या सोयीने अर्थ देताहेत आणि त्याचं समर्थनही करतात.
ही सगळी चर्चा महिन्यापूर्वी झालेली आहे.
तरी तेच मुद्दे पुन्हा लिहिण़ हे कसलं लक्षण?
तो मेनिफेस्टो किंवा त्याबद्दलचे लेख वाचलेत तरी का?
उगाच कशाला प्रतिसाद देऊन वेळ आणि जागा वाया घालवायची?

देश हिता साठी कोण्ही आत्मघातकी पथकात सामील झाला आहे असे माझ्या तरी वाचनात नाही .
आणि स्वः हितासाठी म्हणजे स्वतः वर होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी कोण्ही आत्मघातकी हल्ला केलाय अशी पण उदाहरण नाहीत .
पण धर्मासाठी आत्मघातकी हल्ले झाले आहेत .
तेव्हा प्रश्न पडतो की स्वतःचा जीव देवून त्यांना नक्की काय साध्य करायचे असते .
पैसे मिळतील ही शक्यता ना च्या बरोबर आहे .
मग नक्की काय कारण असेल
कारण मुंबई आत्मघाती हल्ल्यातील ऐकमेव जीवित आरोपी कसाब नी सुद्धा मी हा हल्ला पाकिस्तान साठी केलाय असे म्हंटले नाही तर मुस्लिम समाजावर भारता मध्ये होणाऱ्या अन्याय चा बदला म्हणून केलाय असे स्टेटमेंट
दिले आहे

हे दोन्ही धर्म धुतल्या तांदळासारखे नाहीत. >> यामधे हिंदू धर्माचाही सामावेश करायल हरकत नाही.

स्वः हितासाठी म्हणजे स्वतः वर होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी कोण्ही आत्मघातकी हल्ला केलाय अशी पण उदाहरण नाहीत .
पण धर्मासाठी आत्मघातकी हल्ले झाले आहेत .>>>>>> हे मत पटत नाही. ज्या श्रीलंकेवरील आत्मघातकी हल्ल्याची आता चर्चा करत आहात. मला वाटते सर्वप्रथम आत्मघातकी हल्ल्यांची सुरवात श्रीलंकेतूनच तामिळी वाघांच्या संघटनेने केली. बाकी चालू द्या.

हे दोन्ही धर्म धुतल्या तांदळासारखे नाहीत. >> यामधे हिंदू धर्माचाही सामावेश करायल हरकत नाही.

Submitted by आसिफ on 26 April, 2019 - 10:05 >>

नक्की कोणत्या बाबतीत म्हणताय? आणि कोणत्या घटनान्च्या आधारावर?

भ्रम, शहामृग, विचारशक्ती वाल्या प्रतिसादाला शेवटचं उत्तर
१.< सर्वप्रथम काही लोंकांनी हा भ्रम मनातून काढून टाकावा की न्यूझीलंड मधील हल्ला हा सरसकट मायग्रंट्स विरोधात होता>
https://indianexpress.com/article/world/christchurch-attack-mosque-new-z...
The manifesto stated that “the invaders must be removed from European soil, regardless from where they came or when they came. Roma, African, Indian, Turkish, Semitic or other. If they are not of our people, they must be removed.”
२.-न्यूझीलंडमधील हल्ला व्हाइट सुप्रीमसीचाही भाग नाही -
https://www.vox.com/2019/3/18/18267682/new-zealand-christchurch-shooter-...
It’s definitely clearly signaling that the author is a white supremacist, and anti-immigration and anti-Muslim.

३. https://foreignpolicy.com/2019/03/16/the-inspiration-for-terrorism-in-ne...

Millions of people [are] pouring across our borders … [i]nvited by the state and corporate entities to replace the White people who have failed to reproduce, failed to create the cheap labour, new consumers and tax base that the corporations and states need to thrive,” he argues in his manifesto. “This crisis of mass immigration and sub-replacement fertility is an assault on the European people that, if not combated, will ultimately result in the complete racial and cultural replacement of the European people.”
https://medium.com/@emilypothast/what-the-christchurch-killers-manifesto...
Brenton Tarrant Is Existentially Terrified of White Culture Being ‘Replaced’ Through a Process He Calls ‘White Genocide.’
The title of Tarrant’s manifesto is The Great Replacement.
<.

<<<न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे भाषण मी अतिशय प्रभावी मुत्सद्दीपणाचे एक उदाहरण म्हणेन, कारण समोर जरी त्या भाईचाऱ्याच्या गोष्टी करत असतील तरीही त्यांनी त्यांच्या देशात यापुढे येणाऱ्या मुस्लिम मायग्रंट्सना कमी करण्याचे धोरण अवलंबायला सुरुवात केलेही असेल.>>>>
त्यांनी आपल्या देशा तल्या मुस्लिमांना असुरक्षित वाटणार नाही यासाठी अनेक पावलं उचलली. एके दिवशी संसदेच्या कामकाजाची सुरुवात
इस्लामी प्रार्थनेने केली.
हेडस्कार्फ फॉर हार्मनी - पंतप्रधाम , पोलिस अधिकारी, दूरदर्शन वरच्या वृत्तनिवेदिका, नर्सेस यां नी हिजाब परिधान केला.
जुम्म्याची अजान टीव्ही आणि रेडियोवरून ऐकवली गेली.
वृत्तपत्रांतून अरेबिक शुभेच्छा दिल्या गेल्या आणि इस्लाम मधल्या रीति रिवाजांचा अर्थ सम जावून सांगितला
वृत्तनिवेदकांनी बुलेटिनची सुरुवात अस्सलाम आलेकुम ने केली.
अन्य धर्मीय लोक नमाजाच्या वेळी मशिदींच्या जवळ किंवा आत हजर राहिले.
Synagogues in the country closed on Shabbat for the first time in history.

शेवटचं - http://time.com/5567295/new-zealand-gun-laws-ban-semi-automatics/
New Zealand’s Parliament passed sweeping gun laws that outlaw military style weapons, less than a month after mass shootings at two mosques in the city of Christchurch left 50 people dead and dozens wounded.
इत्यलम्

भरत तुम्हाला काय सांगायचे आहे आक्रमण थांबायचे असेल तर आपली सर्व जीवनपद्धती,रीतिरिवाज बदलून आक्रमक ल जसे आवडते तसे राहवे .
तर न्यूझीलंड सोडून कोणत्या ही देशाला ते जमणार पण नाही आणि तशी चापुलासी करायची कोणाला आवड पण नाहीं
तशी आवड अस्ती तर श्रीलंकेत जे गैर मुस्लिम मेलेत त्या साठी चर्च मध्ये मुस्लिम समाजानी जावून ख्रिस्त लोकं बरोबर pradhana केली असती

इस्लामी प्रार्थनेने केली.
हेडस्कार्फ फॉर हार्मनी - पंतप्रधाम , पोलिस अधिकारी, दूरदर्शन वरच्या वृत्तनिवेदिका, नर्सेस यां नी हिजाब परिधान केला.)))))))))) .?
?.........जुम्म्याची अजान टीव्ही आणि रेडियोवरून ऐकवली गेली.
वृत्तपत्रांतून अरेबिक शुभेच्छा दिल्या गेल्या आणि इस्लाम मधल्या रीति रिवाजांचा अर्थ सम जावून सांगितला]))])]])))))))फक्त रेडीआओ वर आपल्या सारखी loud speaker वर पहाटे पहाटे 5वाजता.नाही....बहुत बेईन्साफी है ये...........आता भारतातला secularism ची गम्मत पाहू ...ईथ एक च मुस्लीम बहूल राज्य आहे ते.म्हणजे कश्मीर...ईथ हीदू लोक आहेत अल्पसंख्य (अल्प कसले पंडीतांच्या पलायना नंतर बहूतेक हीदू नाहीसेच झालेत)...आहेत....1957साली ईथ सफाई कामगारानी हरताळ केला म्हणून अम्रुतसर वरून दादापुता.करून 200कुटुबे वाल्मीकी हींदू समाजाची त्यानी आणली.....आणताना.त्याना.नागरीकता देतो म्हणून आणले..आता तो समाज आज.लाखोच्या घरात आहे...त्याना आजही नागरीकता दीली नाही....त्यातली सीमा गील म्हणून एक मुलगी डाँक्टर झाली..तीला कश्मीर मधे डाँक्टर ची नोकरी करता येत नाही...कारण सरकारने असा ordennce पास केलाय की या समाजाला कश्मीर मधे सफाई कामगाराचीच नोकरी करता येईल मग.भले ती डाँक्ताटर का असेना.......आता बोला

भरत
तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे नक्की कोणत्या प्रकारची वागणूक आक्रमक यक्तीला इतर समाजानी द्यावी

भरत, मी झालेल्या घटनांवरून ठाम निष्कर्ष काढतोय, तुम्ही इतरांनी लिहिलेल्या गोष्टी दाखवताय. तुमचं स्वतःच मत न्यूझीलंड आणि श्रीलंका हल्ल्यांबाबत सांगा.स्वीडन मधील हल्ल्याचा निषेध म्हणून न्यूझीलंड मध्ये हल्ला झाला अशाही बातम्या होत्या, त्या तुमच्यापर्यंत कदाचित पोहोचल्या नसतील.

कुराणात जहाल वचने आहेत की नाही आणि त्या जहाल वचनांना मुस्लिमांनी बदलण्याची गरज आहे की नाही ते सांगा.

न्यूझीलंड मधील हल्ले फक्त मशिदींवर का झाले ते सांगा.

आणि आता इसिसने श्रीलंकेवर केलेला हल्ला तुमच्यामते नक्की काय आहे ते सांगा. कुठल्या व्हाइट सुप्रीमिस्टविरुद्ध तो हल्ला होता?

न्यूझीलंड मध्ये ज्या प्रकारे त्या लोकांनी हिजाब वगैरे नेसून सपोर्ट केला आणि सलाम आलेकुम म्हटले ते सर्व ठीक आहे, मग श्रीलंकेत मुस्लिम समाज कट्टरतावाद्यांना संपवायला , त्यांची ओळख पटवायला मदत करतोय का? या हिजाब वगैरेला तुमचा सपोर्ट आहे का हा प्रश्न मी सध्या बाजूला ठेवतो.

तुम्हांला वाचता येतं का?
त्या लिंक उघडून पाहिल्या असत्या, तर कळलं असतं की ते इतरांनी लिहिलेल़ं म्हणताय ते त्या दहशतवाद्याचे विचार आहेत. बहुतेक ठिकाणी त्याच्याच शब्दांत. अन्यत्र दहशतवादावरच्या तज्ज्ञ अभ्यासकांनी त्या मेनिफेस्टोचा लावलेला अर्थ.

ठाम निष्कर्ष? काढा. पण मी मांडलेल्या facts समोर ते उताणे पडलेत.

श्रीलंकेतल्या मौलवीने काय केलं, त्याबद्दलची बातमी काल दिली आहे.

तुम्ही हा धागा एकदा वाचून काढा. अनेकदा खोडून काढलेले मुद्दे च तुम्ही पुन्हा पुन्हा मांडताय.

मुस्लिम समाज व्यतिरिक्त इतर लोकांकडून सुधा हिंदू समाजावर अत्यंत हिन भाषेत समाज मध्यामा मधून टीका होते म्हणून हिंदू नाही कधी आत्मघाती हमलावर झाले .
ह्याचे काय कारण असेल .

ते लष्कर ए शिवबा काय भानगड होती?
विलास तुपे म्हणून कोणी तरी संस्थापक आहेत म्हणे.
आणखी एक नाव म्हणजे कर्नल जयंत चितळे.

https://m.timesofindia.com/city/pune/First-suicide-squad-was-set-up-in-P...

तुम्हांला वाचता येतं का?
त्या लिंक उघडून पाहिल्या असत्या, तर कळलं असतं की ते इतरांनी लिहिलेल़ं म्हणताय ते त्या दहशतवाद्याचे विचार आहेत. ))))))))अहो साहेब दहशतवादी आभाळातून पडत नाहीत....त्यांना प्रशिक्षण द्याव लागत...त्यांना हत्यार.द्यावी लागतात....त्याना एखाद्या.हिंदकेसरी पहीलावाना.सारख तयार कराव लागत...त्यांचा खुराक म्हणजे......जन्नत च आमीश दाखवाव लागत...त्या साठी.पैसा बाँब आणाव लागत.....तीथली स्थानीक माणसाच जाळ.वीणाव लागत....मग कुठ एक दहशतवादी तयार होतो...

कर्नल जयंत चितळे म्हणून कोणी तरी संस्थापक आहेत म्हणे.))))))त्या बीचार्याना कोण बाँब आणून देणार..त्याची multinationalकंपनी अजून हिंदू.लोकांना स्थापन करता आली.नाही...

प्रश्न अडचणी चे वाटले की फाटे फोडणे हे मस्त जमतंय काही लोकांना
प्रश्नांची कधीच सरळ उत्तर मिळत नाहीत फक्त गोल गोल उत्तर

दहशतवाद्याचे विचार आहेत. ))))))))अहो साहेब दहशतवादी आभाळातून पडत नाहीत....त्यांना प्रशिक्षण द्याव लागत...त्यांना हत्यार.द्यावी लागतात....त्याना एखाद्या.पहीलावाना.सारख तयार कराव लागत...त्यांचा खुराक म्हणजे......जन्नत च आमीश दाखवाव लागत...त्या साठी.पैसा बाँब आणाव लागत.....तीथली स्थानीक माणसाच जाळ.वीणाव लागत....मग कुठ एक दहशतवादी तयार होतो...

हे सर्व त्यांना चांगले उत्तम माहीत आहेत
पण काय करणार कबुल सुधा करता येत नाही

ठाम निष्कर्ष? काढा. पण मी मांडलेल्या facts समोर ते उताणे पडलेत. >>>> ठीक आहे भाऊ, उताणे तर उताणे..
बाकीच्या प्रश्नाचं काय? की ते अडचणीचे वाटले?

श्रीलंकेच्या मौलाविने त्यांच्या सुफी पंथाच्या मशिदींवर हल्ले झाल्यावर तक्रार केली, त्याला किती लोकांचा पाठिंबा मिळाला? त्याने कुराणात काय फरक पडला?

या फक्त एका मौलवीने आवाज उठविणे म्हणजे एक वर्ग इंचाच्या चिंधीने अंग झाकण्याचा प्रकार आहे.

असो, कुराणातील जहाल वचनांना तुमचा पाठींबा आहे असं दिसतंय कारण त्याविरुद्ध एक चकार शब्द तुम्हाला लिहवत नाहीय. जणू काही जगातील दहशतवाद न्यूझीलंडमध्येच जन्माला आला.

बघा.श्रीमंत मुसलमानांचा दहशतवाद बातमी लोकसत्तेतील आहे)))))))))श्रीलंकेमध्ये इस्टर संण्डेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बहल्ल्यांसंदर्भात धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे हल्ले घडवणारे हल्लेखोर हे देशातील लोकप्रिय मसाला व्यापाऱ्याची मुले असल्याचं तपासात समोर आले आहे. मसाला व्यापारी मोहम्मद यूसूफ इब्राहिम यांना या हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मोहम्मद यांची मुले इल्हाम अहमद इब्राहिम आणि इमसथ अहमद इब्राहिम या दोघांनी स्वत:ला शांगरी-ला आणि सिनामॉन ग्रॅण्ड हॉटेलमध्ये आत्मघाती हल्ला करत स्फोट घडवून आणला. बंगले, गाड्या, अमाप संपत्ती असणाऱ्या या कुटुंबातील दोन मुलांनी स्वत:ला उडवून दिले तर सुनांनीही स्वत:ला उडवून देत स्फोट घडून आणले. स्फोटात सहभागी असणारे सर्वच आत्मघाती हल्लेखोर हे इब्राहिम कुटुंबाच्या मित्र परिवारातील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार तपास अधिकारी पुरावे गोळा करण्यासाठी मोहम्मद यांच्या कोलंबो येथील बंगल्यात गेले असता तेथेही एक स्फोट झाला. महावेला गार्डन्स या उच्चभ्रू वस्तीमधील व्हाइट हाऊस नावाच्या बंगल्यामध्ये हा स्फोट झाला. या बंगल्यात मोहम्मद यांचे संपूर्ण कुटुंबाचे वास्तव्य होते. पोलीस चौकशीसाठी या बंगल्यात गेले असता तेथे मोहम्मद यांची सून फातिमा हिने स्वत:ला आपल्या तीन मुलांसहीत उडवून देत आत्मघाती स्फोट घडवल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
मोहम्मद यांनीच आपल्या मुलांना हे हल्ले करण्यासाठी प्रेरित केल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या मुलांना हे हल्ले करण्यासाठी उकसवणाऱ्या आणि मदत केल्याच्या आरोपाखाली मोहम्मद यांना अटक करण्यात आल्याची माहिती सीएनएनला पोलीस प्रवक्ते रुवान गुणशेखर यांनी दिली आहे. या दोन भावांशिवाय इतर सात जणांचाही मोहम्मद कुटुंबाशी संबंध असून ते या कुटुंबाच्या मित्र परिवारापैकीच होते अशी शक्यता असल्याचे गुणशेखर यांनी सांगितले आहे. सिनामॉन ग्रॅण्ड हॉटेलमध्ये स्वत:ला उडवून देणाऱ्या इल्हामला पोलिसांनी आधी एका प्रकरणात अटक केली होती अशी माहिती एक सरकारी अधिकाऱ्याने दिली आहे. सिनामॉन ग्रॅण्ड हॉटेलमध्ये इस्टरच्या सकाळी ब्रेकफास्टच्या रांगेत उभ्या असणाऱ्या इल्हामने स्वत:ला उडवून देत स्फोट घडवला. या दोन्ही भावांपैकी एकजण आधी ब्रिटनमध्ये आणि नंतर मास्टर्सच्या अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियात जाऊन शिक्षण घेऊन परत आला होता अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बुधावारी देशाचे रक्षा राज्यमंत्री रुवन विजयवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आत्मघाती हल्ल्यांमधील अनेक दहशतवादी हे एका श्रीमंत घरातील सदस्य आहेत. श्रीलंका सरकारने चर्च तसेच फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांसाठी नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) या संघटनेला जबाबादार ठरवले आहे. पोलीस प्रवक्ते रुवन गुनसेखरा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार नऊ दहशतवाद्यांनी श्रीलंकेतील वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट घडवले. नऊ आत्मघाती हल्लेखोरांपैकी ८ जणांची ओळख पटली असून नववी व्यक्ती आत्मघाती हल्लेखोराची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वच हल्लेखोर हे उच्चशिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय तसेच श्रीमंत वर्गातील होते. या प्रकरणात आत्तापर्यंत ७० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
)))))अतीश्रीमंत foriegh return लोकानी हे घडवले हे चिंताजनक

विषयाशी संबंध नाही अशा प्रश्नांना उत्तरं?

स्विडन हल्ला - न्यूझीलंड हल्ला - श्रीलंका हल्ला - कुराणाची शिकवण यात तुम्हाला संबंध कसाकाय दिसणार म्हणा? स्युडो सेक्युलॅरिज्म चा चष्मा घातल्यावर हिजाब काय, जिहाद काय सगळंच समर्थनीय वाटू लागतं. शिवाय श्रीलंकेत कुणाचे आर्थिक हितसंबंधही नाहीत. तेव्हा फक्त पुरोगामित्वाचा आव आणून खोट्या थिअरी रचायच्या नि मूळ कारणांकडे दुर्लक्ष करायच एव्हढचढ्काम उरत, नाही काय?

फुरोगामी नेहेमीच त्यान्च्या दुतोन्डीपणामुळे असे उघडे पडतात.

शहीद करकरे यान्च्यावरील धाग्याप्रमाणेच तुमची शेवटचि एक प्रतिक्रिया टाकुन हाही धागा बन्द करुन टाका , नाहीतर तेच आधीचे सर्व प्रश्न मी प्रत्येक इस्लामी हल्ल्यानन्तर विचारेन.

जगात झालेलं आता पर्यंतचे आत्मघाती हल्ले आणि बॉम्ब स्फोट करून जागतिक विजेते म्हणून ज्यनी नाव कमावले आहे तरी ते नाकारायचे असे भरत ह्यांना सांगायचे आहे

तुम्ही जोडले ला स्वीडन हल्ल्याचा स़बंध फोल आहे, हे तुमच्याचकडून मान्य करून घेतल़य. पहा पहिल्या पानावरचा अडचणीचा मुद्दावाला प्रतिसाद पहा.
न्यूझीलंडमधल्या दहशतवाद्याचा कुराण आणि सामान्य मुस्लिमाशी तुम्ही आणि तुमचे समविचारी संबंध जोडताय. ते सिद्ध करू शकत नाही आहात. हे फक्त तुमचे निष्कर्ष आहेत आणि ते आधारहीन, तथ्यहीन आहेत, हेही दाखवून दिलंय.
लंकेतल्या हल्ल्याबद्दल मी स्वच्छ शब्दांत लिहिलंय. तुम्हांला समजेपर्यंत पुन्हा पुन्हा सांगायला सध्या माझ्याकडे वेळ नाही.

तुम्ही जोडले ला स्वीडन हल्ल्याचा स़बंध फोल आहे, हे तुमच्याचकडून मान्य करून घेतल़य. पहा पहिल्या पानावरचा अडचणीचा मुद्दावाला प्रतिसाद पहा.
न्यूझीलंडमधल्या दहशतवाद्याचा कुराण आणि सामान्य मुस्लिमाशी तुम्ही आणि तुमचे समविचारी संबंध जोडताय. ते सिद्ध करू शकत नाही आहात. हे फक्त तुमचे निष्कर्ष आहेत आणि ते आधारहीन, तथ्यहीन आहेत, हेही दाखवून दिलंय.
लंकेतल्या हल्ल्याबद्दल मी स्वच्छ शब्दांत लिहिलंय. तुम्हांला समजेपर्यंत पुन्हा पुन्हा सांगायला सध्या माझ्याकडे वेळ नाही. >>>

गोल्गोल वाक्ये फिरवुन स्वतःचे समाधान करुन घेण्याचे तुमचे कसब वाखाणण्यासरखे आहे.

शहीद करकरे यान्च्यावरील धाग्याप्रमाणेच तुमची शेवटचि एक प्रतिक्रिया टाकुन हाही धागा बन्द करुन टाका , नाहीतर तेच आधीचे सर्व प्रश्न मी प्रत्येक इस्लामी हल्ल्यानन्तर विचारेन.
Submitted by ShashankP on 26 April, 2019 - 14:41

भरत. यांनीच असं नव्हे पण इन जनरल अनेकांनी जाणते अजाणतेपणी शहीद या शब्दाचा चूकीचा वापर केला आहे. अगदी भारतीय सेनेच्या जवानांकरिताही...

हुतात्मा किंवा वीरगती प्राप्त झालेले, अथवा वीरमरण आलेले असा उल्लेख केला जावा. शहीद या शब्दाचा अर्थ इस्लाम धर्माच्या प्रचारा / प्रसारा / रक्षणा करिता मरण आलेली व्यक्ति असा होतो.

Shahid Ke Types Aur Kounsi Maut Shahadat Kehlati Hai By Adv. Faiz Syed

https://www.youtube.com/watch?v=phhvNLvbQbU

इथे जान और माल की हिफाजत मे मरनेवाला देखील शहीद असा उल्लेख आहे पण पुन्हा तो देखील कुराण व हदीसच्याच हवाल्यानेच...

त्यामुळे एखाद्या गैरमुस्लिमाकरिता शहीद शब्द वापरला जाऊ नये.

Pages