न्युझीलंड- दहशतवादी हल्ला

Submitted by भरत. on 16 March, 2019 - 07:33

न्यु झीलंडमधल्या ख्राइस्ट चर्च इथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. जगातला कोणताही देश अतिरेकी, द्वेषाधारित, विध्वंसक विचारसरणीपासून सुरक्षित राहिलेला नाही. या हल्ल्यानंतर न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी देशाला उद्देशून केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आश्वासक वाटलं. त्यांच्या भाषणातला हा काही भाग. (स्वैर अनुवाद)

या हल्ल्याने घायाळ झालेल्या लोकां करिता हा माझा संदेश. हा संदेश फ़क्त माझ्याच नव्हे तर माझ्या देशाच्या वतीने आहे , माझ्या देशवासियांच्या भावनाही याच असतील , याची मला खात्री आहे.
या हल्ल्यात क्षती पोचलेल्या लोकांसोबत आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. बळी पडलेले लोक ख्राइस्टचर्चचे होते. त्यातल्या अनेकांचे ते जन्मस्थान नव्हते. खरं तर त्यातल्या अनेकांनी आपल्या वास्तव्यासाठी न्युझीलंडची निवड केली होती. हा देश त्यांनी (स्थलांतरासाठी) स्वत:हून निवडला त्याच्याशी नातं जोडलं, इथे त्यांची कुटुंब होती, इथल्या समाजाबद्दल त्यांना जिव्हाळा होता आणि या समाजानेही त्यांना प्रेम दिलं. या जागी ते एक सुरक्षित निवारा शोधीत आले. इथे त्यांना त्यांच्या धर्म आणि संस्कृतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य होते.

तुमच्यातल्या अनेकांना प्रश्न पडला असेल, हे असं माझ्या देशात कसं घडू शकतं? आपण लक्ष्य ठरण्याचे कारण, आपण द्वेष करणार्‍यांना आसरा दिला हे नव्हते. आपण वंशभेदाला , अतिरेकी विचारसरणीला थारा दिला, म्हणून हा हल्ला इथे झाला नाही. यांतलं ( वंशभेद, द्वेष, अतिरेकी विचार) काहीही आपल्यात नाही, म्हणूनच केवळ आपल्याला लक्ष्य केलंय. आपल्याला लक्ष्य केलंय कारण आपण विविधता, प्रेम, आपुलकी ही तत्त्वं मानतो. ही तत्त्वं मानणार्‍यांना सामावून घेतो. निराधार गरजूंना आश्रय देतो.

या तत्त्वांपासून आम्ही जराही ढळणार नाही, ढळू शकणार नाही याची खात्री बाळगा.

दोनशे वेगवेगळ्या वंशाच्या आणि एकशे साठ भाषा बोलणार्‍यांचा हा देश आहे, याचा मला अभिमान आहे. या विविधतेत आमची काही सामाईक तत्त्वं सामावलेली आहेत. या हल्ल्याची झळ लागलेल्यांबद्दल आमच्या मनात सहवेदना आहे, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत; हे आजच्या घडीला माझे सांगणे आहे.

ज्या विचारसरणीतून हे कृत्य झालं तिचा मी तीव्रतम शब्दांत निषेध करते.
तुम्ही (आपला देश, आपला समाज म्हणून) आम्हांला निवडलं असेल, पण आम्ही तुम्हांला पूर्णपणे नाकारतोय. तुमचा धिक्कार करतोय.

Group content visibility: 
Use group defaults

इतकं क्लिअर कॉर्रिलेशन असताना कर्मठ इस्लाम अतिरेकाला प्रोत्साहन देत नाही, असं कसं काय म्हणता येईल ? >>>>

कोणीही व्यक्ती अतिरेक्यांना प्रोत्साहन देत आहे हा अतिशय गंभीर आरोप आहे. ती व्यक्ती प्रत्यक्षात तसे करत आहे का हे महत्त्वाचे आहे. ते जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत ती व्यक्ती केवळ त्या धर्माची आहे म्हणून ते गृहीत धरायची ही गोष्ट नाही. धार्मिक पुस्तकात अतिरेकी वागण्याच्या आज्ञा आहेत. मुस्लिम लोक ते धार्मिक पुस्तक मानतात. म्हणजे ते ही या अतिरेकाला प्रोत्साहन देतात - हे कनेक्शन फार दूरचे आहे.

धार्मिक पुस्तकातले उतारे आणि त्याचा सध्याच्या जगाशी न लागणारा ताळमेळ याकडे सर्वसामान्य लोक सहसा दुर्लक्ष करतात. त्यातले जे सध्या ग्राह्य वाटते ते घेतात व बाकीचे आपल्या डोक्यापलीकडचे आहे, किंवा तेव्हाच्या काळाशी रिलेव्हण्ट असेल म्हणून सोडून देतात. हा जनरल अनुभव. आता सर्वसामान्य मुस्लिम लोक हेच करतात का कल्पना नाही. पण ते नक्कीच प्रोत्साहन देत असावेत असे म्हणणेही दुसरे टोक आहे.

वरील बातमीत सांगितलेल्या हालचाली भारतातील लोकशाहीच्या विरुद्ध आहेत कि लोकशाहीला समर्थन म्हणून आहेत हे मला फारएन्ड, भरत, सिम्बा, हेला व उदयभाऊ सांगतील काय? >>>
शशांक - तुम्ही जे स्पेसिफिकली विचारले आहे त्याचे उत्तर आधी देतो:
- त्या गोष्टीचा लोकशाहीशी काय संबंध आहे मला समजले नाही. ते बाजूनेही नाही आणि विरोधातही.

आता तुम्हाला बहुधा जे विचारायचे होते असे मला वाटत आहे त्याचे उत्तर देतो. तुम्हाला हे विचारायचेच नसेल तर दुर्लक्ष करा.
- हे करणे योग्य आहे का. याचे उत्तर नाही. मुस्लिम समाजाचे नागरी कायदे भारतातील इतर नागरी कायद्यांच्या लेव्हलला आणण्याचे काम करणे आवश्यक आहे. तसे काही प्रयत्न होत आहेत की नाही माहीत नाही.

सध्याच्या भारतीय राज्यघटनेच्या विरोधात ते नाही. चूक आहे की बरोबर हा वेगळा प्रश्न आहे आणि त्याचेही उत्तर वरती दिलेले आहे.

इस्लाम हा खूप चांगला आहे पण काही लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला आहे आणि म्हणून दहशतवाद निर्माण होतो असा एक लोकप्रिय सिद्धांत आहे.
कधीतरी हे गृहितक विसरून इस्लामचे परीक्षण आणि मूल्यमापन होईल का?
वर म्हटले आहे की इराण व अफगाणिस्तान हे पूर्वी पुढारलेले होते. ७०च्या दशकात स्त्रिया पाश्चात्य वेष परिधान करत. मग काय बदलले? तर इस्लामचा अतिरिक्त पगडा सुरू झाला. लोक तीच. तत्त्वज्ञान बदलले.
जिथे इस्लामचा पगडा असतो तिथे लोक बदलतात. त्यामुळे इस्लाम धर्मात मूलभूत सुधारणा करणे हा एक पर्याय तपसलाच पाहिजे. परंतु इस्लाम हा देवाचा अखेरचा अपरिवर्तनीय शब्द आहे हा सिद्धांत असल्यामुळे तसे होणे अशक्य प्राय आहे. उलटे परिवर्तन जास्त होते आहे. सैद कुतुब नावाच्या विचारवंताने १९५० च्या सुमारास एक "सुधारणावादी" चळवळ सुरू केली जी आणखी जास्त कडवा इस्लाम आणण्याकरिता प्रयत्नशील होती.
हा धर्म दैवी नाही. त्यात सुधारणा होऊ शकतात असे जर घडले तर त्या धर्माचा पायाच नष्ट होतो असे अनेक धर्म धुरीण लोकांना वाटते. त्यामुळे हा एक तिढा आहे.

त्यांच्या बाजूने कधी बघितले का? अमेरिका युरोपियन ख्रिश्चन लोक त्यांच्या (इस्लामी) धर्मबंधूंवर अत्याचार करतात (असे त्यांना फीड केले जाते) म्हणून आपला धर्म वाचवण्यासाठी व त्याची जरब बसण्यासाठी त्यांच्यातले कट्टर हाती शस्त्रं घेतात अशी त्यांची थेरी (अल कायदाद्वारा). दहशतवाद कुणाच्या तरी असुरक्षिततेला फुंकर घालूनच पेटवला जातो. इथे हा हल्लेखोर तेच (मुस्लिम धोकादायक) जाहिर करत आहे. इथे भारतात हिंदूत्ववादी तेच (फीड) करत असतात. हिंदुत्ववाद्यांच्या मते त्यांच्या धर्माला ख्रिश्चन आणि मुस्लिम हे धोकादायक असतात. मुस्लिमांत ख्रिश्चन धोकादायक अत्याचारी म्हणून समजण्याचा इतिहास आहे. एकच बाजू धरुन आपली मते ठोकून बसवायची असल्यास प्रत्येकाला मुभा आहे. परंतु एकूणच जगात धार्मिक श्रेष्ठत्व, त्याआधारे जगावर राज्य करण्याची सुप्त इच्छा, इतरांनी आमच्या जुतीके निचे राहिले पाहिजे ही भावना सर्वांतच समान आहे.

इस्लामबद्दल या धाग्यावर चर्चा करणे म्हणजे न्यु झीलंडमधल्या दहशतवाद्याच्या कृत्याचे समर्थन.

मी अमेरिकेत एक माणूस पाहिला होता ज्याची बायको व लहान मुलगी बुरख्यात होत्या व तो माणूस आणि लहान मुलगा जीन्स टीशर्ट अशा अमेरिकन कपड्यात होते.
आता त्या माणसाने गन घेऊन कोणाचा खून केला नव्हता पण ७ वर्षाच्या मुलीला असं त्या काळ्या बुरख्यात ठेवणं मला अमानुष आणि दहशतवादी कृत्य वाटलं. अशा लोकांना कुठल्याही देशात स्थलांतरित म्हणून प्रवेश मिळू नये. जर दुसरीकडे राहायचं असेल तर चुकीच्या रुढींचा पूर्ण अस्वीकार हवा. अन्यथा हे लोक जिथे जिथे लोकसंख्येत जास्त होतील तिथे मध्ययुग पुन्हा आणतीलच.

फारएन्ड, भरत, सिम्बा, हेला व उदयभाऊ सांगतील काय? >>>
यावरून मला असे जाणवले की जणू इथे हिंदुंच्या बाजूने व हिंदुंच्या विरोधात अशा दोन पार्ट्या लढत आहेत असे चित्र निर्माण होत आहे किंवा केले गेले आहे. वरच्या सर्व आयडींशी माझे अनेकदा वाद झाले आहेत, अनेक मतभेद आहेत. पण सर्वच बाबतीत एकमत किंवा मतभेद असतात असे नाही.

मी हिंदूंना कसलाही दोष दिलेला नाही. मुस्लिम समाज हा आदर्श समाज आहे वगैरे तर सोडा, पण गरीब बिचारे उगाच लोक त्यांना त्रास देतात छाप टोनही अजिबात नाही. इस्लामी दहशतवादाबद्दलही "असे अतिरेकी प्रत्येक धर्मात आहेत" वगैरे नॉर्मलायझेशन मी केलेले नाही. जेथे दोष देणे आवश्यक आहे तेथे तो दिलाच पाहिजे. पण त्याचबरोबर "दोषी" ठरवण्याची सरकारने/घटनेने राबवलेली सर्वमान्य पद्धत सोडून इतर कोणत्याही पद्धतीने दोष ठरवणे मला मान्य नाही.

मी फक्त सर्वसामान्य मुस्लिमांना उगाच आत्मपरीक्षण वगैरे करायला लावण्याच्या विरोधात आहे. बाकी कोणत्याही मुद्द्यावर मी काहीही मत दिलेले नाही (शशांक यांच्या मला स्पेसिफिकली विचारलेल्या पोस्टचा अपवाद)

गंमत पहा. पहिल्या पानावर एक लिंक दिली गेलीय. त्यातले मुद्दे मी मांडले नाहीत कारण मला ते गैरसोयीचे आहेत, असा शोध लावला गेला.
मूळ लेखात मी न्यु झीलंडच्या पंतप्रधानांच्या भाषणाचे भाग दिलेत. त्यामुळे अन्य मुद्दे मांडण्याचा प्रश्नच येत नाही.

आता त्या लिंकमधल्या लेखाचा शेवट काय आहे -
The manifesto leaves a lot to dissect about the killer’s hate-filled and hateful motives. “To take revenge for the enslavement of millions of Europeans taken from their lands by the Islamic slavers,” and then he dragged in the name of a little deaf girl: “To take revenge for Ebba Akerlund.”
लेखाच्या शीर्षकापासून ते पहिल्या परिच्छेदापर्यंत स्वतःच्या द्वेषभारित कृत्याचे समर्थन करण्यासाठी दहशतवादी काय करताहेत ते लिहिलंय.
they declare enemies , license to take revenge and commit mass murder. हे शब्दसमूह दहशतवाद्यांच्या या मानसिकतेवर अचूक बोट ठेवतात.

पण तो लेख इथे देणार्‍याला वाटतंय की त्या बिचार्‍या न्यु झीलंडमधल्या माथेफिरूच्या डोक्यात हे खूळ कुठून भरलंय याचं ते स्पष्टीकरण आहे.

पुढची चर्चा पद्धतशीरपणे इस्लाम आणि इस्लामी दहशतवादाकडे वळवली गेलीय.

दहशतवाद्याच्या कृत्याला लेजिटिमसी मिळवून द्यायचं काम चोख चाललंय.

भरत , आता तुम्ही दोन तीन वेळा लिहिल्याने मला पटलं की तुम्हाला ती लिंक अडचणीची नव्हती. पुन्हा लिहून एव्हढा काही फरक पडणार नाही.

असो, तुम्हाला सध्या च्या कुराण व शरियासकट मुस्लिम हवे असतील तर बेस्ट ऑफ लक...

आम्हाला सुधारलेल्या कुराणासाकट व ज्या देशात राहतात त्या देशाचे कायदे पाळणारे मुस्लिम हवेत, जी अवाजवी मागणी नाही.

पाश्चिमात्य देश मध्यपूर्वेवर हल्ला करण्या आधीपासून इस्लाम अस्तित्वात होता नि नेहेमीच कुठे ना कुठे खतरेंमे होता. तो खतरेंमे नसतो तेव्हा बाकीचे धर्म खतरेंमे असतात आणि शांतताप्रिय मेंढरे तेव्हा जिहादींच्या मागे गुमान चालत असतात.

विलभ, तुमच्या पोस्टमधून it is okay to kill Muslims असा अर्थ निघतोय.
इथे तुमच्यासह अनेकजण त्या दहशतवाद्याच्या क्रुत्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करताहेत - कारण तुमच्यामते तो अँटी मुस्लिम आहे.
>>

भरत , वरचे विधान तात्काळ मागे घ्या. माझ्या कुठल्याही पोष्टीतून असं समर्थन केलेलं नाही . बहुधा "पण प्रत्येकाचा इस्लामी दहशतवादात सहभाग आहे." या वाक्याशी मी दाखवलेली असहमती बहुदा तुमच्या ध्यानात आली नसावी. तसंच न्यूझीलंडच्या दहशतवाद्याची "माथेफिरू" अशी केलेली संभावना दिसली नसावी. तरीही शंका असेलच तर इथे मी जाहीर करतोच, की माझा या हल्ल्याला पूर्ण विरोध आहे.

आता हा हल्ला होण्यामागे त्याने चुकीचा मार्ग अवलंबला, पण त्याच्या या रागामागे काय कारण आहे ? एखाद दिवशी पाकीस्तानने विनाकारण केलेल्या कुरापतीत देशाचे तरुण जवान शहीद होतात, तेव्हा आपल्याही मनात राग येतोच ना ? हाच राग त्यालाही मुस्लिम दहशतवादामुळे गेलेले बळी पाहून आला असेल ना ?
पण राग आला म्हणून आपण काय थेट शेजारच्या मोहोल्ल्यात निष्पापांचे गळे कापत फिरतो का ? नाही ना ?
मग पुढे सैनिकांचे निष्कारण जीव जाऊ नयेत म्हणून मी काय करावं ? मी फक्त ज्या गोष्टीमुळे दहशतवादाला कुरण मिळतं ते कुराण सुधारण्याची मागणी मवाळ मुस्लिमांकडे करू शकतो.

आता कुराण(च) का सुधारावे ? तर मुस्लिम अतिरेक्याचं ब्रेन वॉशिंग कुराणातली भडकाऊ वचने ऐकवून केलं जातं म्हणून (तसं प्रत्येक धर्माचंच असतं यात नवल ते काय ?). (https://en.wikipedia.org/wiki/Terrorist_training_camp). आता जगातल्या उच्च पदावरचं कुठलाही मुस्लिम बोर्ड (जो मवाळ आहे असं मी मानतो ) ही कलम बदलायला, हटवायला का तयार नाही ? इस्लाम शांतीचा पुरस्कर्ता आहे ना , मग मीही म्हणतो शांतीची कलम राहूद्या, बाकीची हटवा ना. सगळ्या शांतीप्रिय मुस्लिमांना ही मागणी केली हे माझं चुकलं का ? का त्यांच्याकडे आत्मपरीक्षणाची मागणी करणं हेही धार्मिक सहिष्णुतेच्या विरोधात आहे ? आमच्याकडेही आत्मपरीक्षण होईलच ना अतिरेकी विचारावर, आणि तसंच ते मुसलमानांनीही करावं.

धार्मिक पुस्तकातले उतारे आणि त्याचा सध्याच्या जगाशी न लागणारा ताळमेळ याकडे सर्वसामान्य लोक सहसा दुर्लक्ष करतात. त्यातले जे सध्या ग्राह्य वाटते ते घेतात व बाकीचे आपल्या डोक्यापलीकडचे आहे, किंवा तेव्हाच्या काळाशी रिलेव्हण्ट असेल म्हणून सोडून देतात. हा जनरल अनुभव. आता सर्वसामान्य मुस्लिम लोक हेच करतात का कल्पना नाही. >>

मी मागल्या एका पोस्टीत अभिनेता इरफान खान यांचा एक व्हिडीओ नमूद केला होता. बहुधा नजरेतून सुटला असेल तर इथं पुन्हा पहा (विशेषतः ७:३० - ९:२० मधला भाग ) . त्याच्यासारख्या प्रसिद्ध आणि सुधारणावादी अभिनेत्याची ही गत आहे, बाकीच्यांचा हवाला ना दिलेलाच बरा.

ही आणखी काही उदाहरणं - https://www.youtube.com/watch?v=8fSvyv0urTE , https://www.youtube.com/watch?v=Ry3NzkAOo3s,

खासकरून हे - https://www.youtube.com/watch?v=cJkxOF9QqEk, कारण यात तुमच्या आमच्यासारखे सामान्य मुसलमानच आहेत. त्यांची ज्यूविषयक मते ऐका आणि मग ठरवा कुराणाला लोक किती सिरियसली घेतात ते.

इतकंच कशाला, कुराण आणि भारतीय संविधान यात काही सामान्य मुसलमान काय निवडतात हेही पहा -
1)https://www.quora.com/What-do-Indian-muslims-think-is-superior-the-constitution-or-the-quran
2) https://www.quora.com/As-an-Indian-Muslim-if-you-find-a-contradicting-po...

देशातल्या संविधानापेक्षाही वर जर काही मुस्लिम कुराणाला मानत असतील, तर ते बदलायला, तशी विचारसरणी बदलायला एक भारतीय नागरिक म्हणून मी मवाळ मुस्लिमांना का विचारू नये ?

- हे करणे योग्य आहे का. याचे उत्तर नाही. मुस्लिम समाजाचे नागरी कायदे भारतातील इतर नागरी कायद्यांच्या लेव्हलला आणण्याचे काम करणे आवश्यक आहे. तसे काही प्रयत्न होत आहेत की नाही माहीत नाही.>>>>

उत्तराबद्धल धन्यवाद फारएंड भाऊ.

बाकिच्या लोकान्ना कदाचित तो प्रश्न अडचणीचा वाटला असावा.

विलभ,
<तसंच न्यूझीलंडच्या दहशतवाद्याची "माथेफिरू" अशी केलेली संभावना दिसली नसावी.>
इथे पहिल्या पानावरच एका प्रतिसादात त्या खुन्याचा उल्लेख मा थेफिरू असा केला गेलाय. त्यावर विचारणा केल्यावर <इस्लामी दहशतवादाच्या मोठ्या कटात आणि न्यूझीलंडमधील एका लहानशा गटाने घडवून आणलेले हिंसक कृत्य ह्यात फरक नाही का?> असं उत्तर मिळालंय.

मीडयात, विशेषतः पाश्चात्य मी डिया, एका हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हणताना दुसर्‍या हल्ल्याला तसं म्हणत नाहीत, असं अनेकदा दिसतं.
१. दहशतवाद्याला दहशतवादी न म्हणता माथेफिरू म्हटल्याने त्याच्या गुन्ह्याची तीव्रता कमी होते.
२. माथेफिरू म्हणजे ज्याचं मा थं फिरलंय, जो नीट विचार करू शकत नाही. या दहशतबाद्याने आपला जाहीरनामा, गुन्ह्याचं चित्रण आणि लक्ष्य निवडणे या तिन्ही गोष्टी अत्यंत थंड डोक्याने विचार करून केल्यात . तो माथेफिरू नाही.
३. न्युझीलंडच्या पंतप्रधानांनी हा अत्यंत सुनियो इत दहशतवादी हल्ला होता, असं स्पष्टपणे म्हटलंय.

तुमच्या पहिल्या प्रतिसादातल्या <ज्या व्हाईट सुप्रीमिस्ट गटाकडून हा हल्ला झाला, त्यांच्या रागाचं एक मुख्य कारण , मवाळ मुसलमानांची इस्लामी दहशतवादाविषयीची चुप्पी , हेसुद्धा आहे> वाक्याने ब्लेमिंग द व्हिक्टिम, चर्चेचा ओघ या दहशतवाद्याकडून मुस्लिमांनाच लक्ष्य करण्या मागे मुस्लिमच कसे जबाबदार आहेत (जस्टिफिकेशन ऑफ क्राइम) याकडे वळायला मदत झाली. आताच्या तुमच्या प्रतिसादातला बराच भागही त्याबद्दलच आहे.

पुढेही तुम्ही न्युझीलंडमधली स्थलांतरितांची आकडेवारी दा खवून तो मुस्लिमांनाच लक्ष्य करतोय आणि त्याला मुस्लिमच जबाबदार आहेत, हे संगत आला आहात.

माझ्यासाठी हा इथे चर्चेचा मुद्दा होऊच शकत नाही. जरी त्याला मुस्लिमांनाच लक्ष्य करायचे असले तरी ही तो अन्य कोणत्याही आणि कोणाहीविरुद्ध झालेल्या हल्ल्या इतकाच निषेधार्ह आहे. तुमच्या प्रतिसादातून तसं जाणवत नाही. वारंवार या हल्ल्याला सामान्य मुस्लिम कसे जबाबदार आहेत, हे तुम्ही (आणि इतर काही जण( ) लिहिताय. मी त्या चर्चेत इथे तरी भाग घेणार नाही.

तरीही
<ज्या व्हाईट सुप्रीमिस्ट गटाकडून हा हल्ला झाला, त्यांच्या रागाचं एक मुख्य कारण , मवाळ मुसलमानांची इस्लामी दहशतवादाविषयीची चुप्पी , हेसुद्धा आहे > या तुमच्या विधानाला आधार काय?
त्या दहशतवाद्याचा जाहीरनाम्याचं आणि कृत्याचे विश्लेषण करणारे काही लेख / मुला खती मी वाचल्यात. त्यांच्या लिंक्स दिल्या आहेत. (पान ३ वरचा माझा मोठा प्रतिसाद. त्याच पानावर इट्स ओके टु किल मुस्लिम्सवाल्या पोस्टच्या आधीच्याच प्रतिसादात मी त्यच्या जाहीरनाम्यात की काही वाक्य दिलीत. हे दोन्ही प्रतिसाद तुम्ही वाचल्याचं दिसत नाही.

उद्या या दहशतवाद्याकडून प्रेरणा घेऊन (जो त्याचा उद्देश आहे) आणखी कोण्या व्हाइट सुप्रीमिस्ट दहशतवाद्याने हिंदूना लक्ष्य केले तरीही तुम्ही त्यासाठी सामान्य मुसलमानांना दोषी ठरवाल, अशी शंका येते.

<फार कशाला, न्यूझीलंडच्या हल्ल्याविरोधात मेणबत्ती मार्च करायलाही फार थोडे लोक पुढे आले, यातच कायतें समजा. बऱ्याच जणांमध्ये (यात क्रिश्चन, हिंदू, ज्यू सगळेच आले) या हल्ल्याला उलट छुपी सहानुभूती आहे.> तुमच्या या निरीक्षणात आणि त्या दहशतवाद्याच्या आडाख्यात अंगावर काटा आणणारं साम्य आहे. नेमका हाच विचार करून त्याने मुस्लिमां ना लक्ष्य केलंय. म्हणजे मुस्लिम मारले गेले तर तितकी तीव्र प्रतिक्रिया उमटत नाही, हे दहशतवाद्यांनाही माहीत आहे. काहींसा ठी तो हीरो सुद्धा असेल.

या सगळ्याला इस्लामोफोबिया तितकाच जबाबदार आहे. फारेंण्ण्ड यां नी लिहिलेलं याच्याशी मिळतं जुळतं वाक्य मला पटलं होतं. मी लिंक दिलेल्या एका लेखातही हेच म्हटलंय. या धाग्यावर इस्लामोफोबि या पसरवणारे प्रतिसाद आलेले आहेत.

या क्षणी , बळी गेलेल्या लोकांच्या पाठीशी खं बीरपणे उभं राहणं आणि दहशतवाद्याला तुला आम्ही झिडकारतोय हे ठामपणे सांगणं या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. न्यु झीलंडच्या पंत प्रधानांनी त्या केल्यात. दहशतवादाचा अभ्यास करणार्‍या लेखकाचं हे वाक्य मी आधी ही नोंदवलं होतं Tarrant’s manifesto is a call to action; our response must counter that call with unwavering solidarity with the targets of white supremacist violence everywhere.

तुमच्या मांडणीचा ओघ या सगळ्याच्या नेमक्या विरुद्ध दिशेने जातोय, असं म्हणावं लागतंय.

कॅनडाचे पंतप्रधान We must counter this hatred. And together, we will. -Justin Trudeau >>

ही लिन्क इथे टाकण्याचे प्रयोजन समजेल काय?

इस्लाम मोभोबिया झाल्या सारख्या प्रतिक्रिया

त्यात त्यांची काही चूक नाही .ज्यांना चूक वाटत असेल त्यांनी एक प्रयोग करावा
प्रत्येकाच्या पोस्ट वर उत्तर म्हणून शिव्या द्यायला survat करा बघुया सर्व विचाराचे असलेले मिपाकर तुमच्या विषयी किती दिवस सहनभुती दाखवतात ते .

ज्या व्हाईट सुप्रीमिस्ट गटाकडून हा हल्ला झाला, "त्यांच्या रागाचं एक मुख्य कारण" , मवाळ मुसलमानांची इस्लामी दहशतवादाविषयीची चुप्पी, हेसुद्धा आहे >>
दहशतवादाविषयी सगळ्यांच्या मनात असंतोषच आहे, आणि त्यांना मुस्लिमांकडून हवा असलेला वैचारिक पाठिंबा न मिळणं, हे असंतोषात भर टाकणारे आहे. आणि वैचारिक पाठिंबा फक्त मीडियात बोलून होत नाही, तसा तो प्रत्यक्षात दाखवावा लागतो - कुराणातल्या अन्याय बाबींना हटवून, मुस्लिम उलेमांचे अन्याय फतवे झिडकारून , कुराणविरोधी पण सत्य बोलणाऱ्या विचारवंतांनासुद्धा सामावून घेऊन (जे हमीद दलवाई, तस्लिमा नसरीन यांच्याबाबत झाले), अतिरेक्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सरकारांना जाब विचारून, प्रसंगी प्रतिसरकारे स्थापन करून अतिजहाल मुस्लिमांना खाली खेचून.

यासंबंधात जर्मनीने नाझीवादाचा कलंक पुसण्यासाठी केलेली मेहनत उल्लेखनीय (https://en.wikipedia.org/wiki/Denazification) आहे. नाझीवादाचं समर्थन करणारी पुस्तकं, कवनं जर्मन सरकारने स्वतः जप्त करून नष्ट केली. त्याला नाझीवादाच्या पुरस्कार करणाऱ्यासाठी कडक शिक्षेची तरतूद केली, इतकंच काय नाझीवादाची प्रतीक असणारं स्वस्तिक आणि कुप्रसिद्ध "नाझी सॅल्यूट" कायद्याने बॅन केला. बहुतांश जर्मनसुद्धा शांतीप्रिय होते आणि त्यांचा जुंच्या हत्येशी थेट संबंध नव्हता. पण आपल्या चुप्पीमुळे जो अति जहाल नाझीवाद फैलावला त्याची जबाबदारी घेतली आणि योग्य त्या सुधारणा केल्या. हे आजवर कुठल्या मुस्लिम राष्ट्राने केलं ?

अहो न्यूझीलँडच्या पंतप्रधानांनीही व्हाईट सुप्रीमसी विरोधात मोहीम उघडली, आणि बहुतांश नागरिक त्यांच्या पाठी ठामपणे उभे आहेत. तेव्हा त्यांच्याकडून रेसिझम नष्ट करण्याचे सर्वतोपरी प्रयन्त होतील यात काहीच शंका नाही. असे जहाल विचार हटवण्याचा प्रयत्न आमच्या बाजूनेही आम्ही करू असे कुठला मुस्लिम बोर्ड म्हणाला ?शांतीप्रिय मुस्लिमांचा दबाव का येत नाहीये त्यांच्यावर ?मग ते या दहशतवादविरोधी लढ्यात बाकी धर्मियांबरोबर आहेत असे बाकीच्यांनी कशावरून मानायचे ?

फार कशाला, न्यूझीलंडच्या हल्ल्याविरोधात मेणबत्ती मार्च करायलाही फार थोडे लोक पुढे आले, यातच कायतें समजा. बऱ्याच जणांमध्ये (यात क्रिश्चन, हिंदू, ज्यू सगळेच आले) या हल्ल्याला उलट छुपी सहानुभूती आहे. तुमच्या या निरीक्षणात आणि त्या दहशतवाद्याच्या आडाख्यात अंगावर काटा आणणारं साम्य आहे. नेमका हाच विचार करून त्याने मुस्लिमां ना लक्ष्य केलंय.>>
होय, आणि त्यामागची कारणमीमांसा मी स्पष्ट केलीय. माझ्या मते बरीच लोकं जहाल मुस्लिम आणि मवाळ शांतीप्रिय मुस्लिम यात अंतर जाणत नाहीत. कारण मी स्पष्ट केलेलंच आहे, मवाळ मुसलमानांचं मौन, आणि मोजके विरोधाचे बोल जे फार क्वचित त्यांच्या कृतीत दिसतात, मग अन्यधर्मीयांनी त्याच्यात फरक करायचा कसा ?. जितकी जबाबदारी अन्यधर्मीयांची शांतिप्रियांना दहशतवाद्यांपासून वेगळं करण्याची आहे, तितकीच किंबहुना थोडी जास्तच शांतीप्रिय मुस्लिमांची स्वतःचा वेगळेपण दाखवायची आहे.

म्हणजे मुस्लिम मारले गेले तर तितकी तीव्र प्रतिक्रिया उमटत नाही, हे दहशतवाद्यांनाही माहीत आहे
>> होय, बऱ्याच लोकांत जो मुस्लिम दहशतवादामुळे शेकड्याने हत्या झाल्यात त्याचा असंतोष होता, अजूनही आहे. त्याला एक अत्यंत चुकीची वाट मिळाली असं म्हणायला बराच वाव आहे. म्हणून त्यांचा असंतोष खोटा, अवाजवी ठरत नाही. त्या असंतोषावर फुंकर घालण्याचं काम शांतीप्रिय मुस्लिम आपल्या जहाल गटांना आवर घालून करू शकतात. मुस्लिमांनी अतातुर्क मुस्तफा केमाल पाशाचा आदर्श समोर ठेवावा, आणि जहाल गटांना तात्काळ आवर घालावा.

या सगळ्याला इस्लामोफोबिया तितकाच जबाबदार आहे. फारेंण्ण्ड यां नी लिहिलेलं याच्याशी मिळतं जुळतं वाक्य मला पटलं होतं. मी लिंक दिलेल्या एका लेखातही हेच म्हटलंय. या धाग्यावर इस्लामोफोबिया पसरवणारे प्रतिसाद आलेले आहेत. >>

"इस्लामोफोबिया" हा शब्द ताबडतोब मागे घ्यावा. मी स्वतः इस्लाम किंवा अल्लाह हटवला पाहिजे असे कुठलेही विधान केलेलं नाही, फक्त कुराण (त्यातल्या असहिष्णू बाबी, जेणेकरून त्या वापरून नवीन अतिरेकी तयार होणार नाहीत) शरिया ,आणि त्यामागची अतिजहाल विचारसरणी बदलायची मागणी केलीय.
आणि फोबियाचा अर्थच मुळी इररॅशनल फिअर असा होतो. आणि बाकी धर्मियांची अन्य मुस्लिमांबद्दल असणारी भीती संपूर्णपणे इर रॅशनल, असंबद्ध नाहीये. पुरावे वर दिलेले आहेतच, आणखी इथे खाली देतोय -
१) shendenaxatra यांनी मागे नमूद केलेल्या प्यू रिसर्च ची ही (http://www.pewresearch.org/fact-tank/2017/08/09/muslims-and-islam-key-fi...) लिंक - जिथे साऊथ ईस्ट आशियात किमान ७२% मुस्लिम शरिया देशाचा कायदा बनावा या बाजूचे आहेत
२) अन ही लिंक जिथे दोन त्रितीयांश मुस्लिम शरियाला त्या देशाच्या संविधानापेक्षा मोठं मानतात. - https://www.wzb.eu/en/press-release/islamic-fundamentalism-is-widely-spread
३) अन आपल्या भारतातल्या मुस्लिमांची मतंही थोडी नजरेखालून घाला - https://www.quora.com/How-many-Muslims-in-India-want-sharia-law

इतक्या मोठ्या प्रमाणात शरियाचं समर्थन सगळीकडे होत असताना बाकी धर्मियांनी सगळं काही आलबेल असल्याचा आव आणून आपली झापडं बंद का करावी ? त्यांची भीती बऱ्याच अंशी रॅशनल आहे. एकतर वरची आकडेवारी खोटी आहे हे सिद्ध करा नाहीतर "इस्लामोफोबिया" शब्द मागे घ्या, ही माझी नम्र विनंती.

उद्या या दहशतवाद्याकडून प्रेरणा घेऊन (जो त्याचा उद्देश आहे) आणखी कोण्या व्हाइट सुप्रीमिस्ट दहशतवाद्याने हिंदूना लक्ष्य केले तरीही तुम्ही त्यासाठी सामान्य मुसलमानांना दोषी ठरवाल, अशी शंका येते. >>

काहींच्या काही तर्क. ऑस्ट्रेलियात हिंदूंवर जे हल्ले झाले तेव्हा कुणीही मुसलमानांना दोष दिलेला नाही, भारतात तर नाहीच नाही. उलट आपले हिंदू तिकडे जाऊन कसे अस्वच्छ राहतात, मिळून मिसळून राहत नाहीत (या आरोपात थोडं तथ्य नक्कीच आहे ) , या प्रकारचे लेख भारतीय वृत्तपत्रात छापून आलेले.

इस्लाम मधले अपेक्षित बदल आणि त्याची इस्लामी दहशतवादाशी घातलेली घट्ट सांगड समजली नाही. अशी मांडणी अन्यत्र पाहिलेली नाही.
इस्लाम धर्मात अंत र्गत सुधा र णा होत नाहीत म्हणून इतर लोकांना त्यांचा द्वेष वाटतो? की इस्लामी दहशतवाद्यांमुळे?

Islamophobic
adjective

Having or showing a dislike of or prejudice against Islam or Muslims, especially as a political force. - ऑक्सफ डिक्शनरीतला अर्थ. तुम्हे या शब्दाचा काही वेगळाच अर्थ लावताय.

चर्चा पुन्हा त्याच मुद्द्यांशी घोळत असेल, तर तेवढ्यापुरता माझा त्यात सहभाग नाही.
मी लिंक दिलेले तीन लेख वाचायची विनंती पुन्हा एकदा करतो.

परदेशात राहून माणुसकीच्या गप्पा मारणाऱ्यांसाठी -----

हिंदू किंवा कुठलाही भारतीय जेव्हा परदेशात जातो तेव्हा त्यामागे त्या देशाविषयी प्रेम असते कि पैसे मिळवून स्वतःचा फायदा करून घेणे हे कारण असते?

फायद्याबरोबर काही वाइट गोष्टी येतातच. त्या गुमान सहन करायला हव्यात.

आम्ही इथे व्हाईट सुप्रीमिस्टना शिव्या घालून आगीत भर घालू, मग ते हिंदूंवर डूख धरून बसावेत अशी तुमची अपेक्षा आहे काय? तुमच्यापैकी कुणीही सीरियामध्ये वा लेबेनॉनमध्ये कामाला असेल असं मला वाटत नाही.

तुम्ही परदेशात राहता त्या भागात न्यूझीलंड मध्ये हल्ला करणाऱ्या व्हाइट सुप्रीमिस्टविरुद्ध मेणबत्ती वा निषेध मोर्चा काढू शकाल का?

आम्हाला वाटते कि या सर्वात इस्लाममधील निर्घृण नियमांचा सर्वात मोठा वाटा आहे आणि कुराण व शरियाला बदलण्याची गरज आहे. तर त्या चर्चेत तुम्हाला माणुसकी घुसडावीशी वाटते. कुराण, शरिया यांचा माणुसकीशी काय संबंध आहे काय ते एकदा उदाहरणासकट पटवून द्या.

हिंदू धर्म आणि इस्लाम यांना परदेशी लोक समान समजतात काय? तसे असेल तर परदेशात असलेल्या हिंदूंनी स्वतःच्या शांतीप्रिय आणि सहिष्णू धर्माची ओळख तुम्ही स्थानिकांना करून द्यायला हवी. तसे काही कृत्य तुमच्याकडून घडते काय? घडत असेल तर खालील प्रश्न निर्माण होणार नाहीत.

<< उद्या या दहशतवाद्याकडून प्रेरणा घेऊन (जो त्याचा उद्देश आहे) आणखी कोण्या व्हाइट सुप्रीमिस्ट दहशतवाद्याने हिंदूना लक्ष्य केले तरीही तुम्ही त्यासाठी सामान्य मुसलमानांना दोषी ठरवाल, अशी शंका येते. >>

It's high time for Muslims community and check why this has started. It's like what you sow you reap

इस्लामच्या भोवती चर्चा घोळवणार्‍यांनी एका मुद्द्या कडे सहेतुक दुर्लक्ष केलंय. तो दहशतवादी अँटि इमिग्रंट होता. त्याला युरोपात एथ्निक क्लीन्सिंग अपेक्षित आहे. त्याचं लक्ष्य मुस्लिम का होते ते त्याने सांगितलंय. दुसर्‍या कोणा व्हाइट सुप्रीमिस्टचं लक्ष्य मुस्लिमेतर स्थलांतरित असणारच नाहीत आणि तो स्थलांतरितांत धार्मिक भेद करणार नाही, अशी खात्री असेल, तर उत्तम आहे.

न्युझीलंडच्या पंतप्रधानांनी आपण ठामपणे हल्ल्याचं लक्ष्य असलेल्या लोकांसो बत असल्याचं आणि हल्लेखोराला , त्याच्या विचारसरणीला ठामपणे नाकारल्याचं म्हटलंय. आपण नक्की काय कर तोय, कोणाला नाकारतोय आ णि कोणाला स्वीकारतोय, हे तपासून पाहयची गरज आहे.

दुसर्‍या कोणा व्हाइट सुप्रीमिस्टचं लक्ष्य मुस्लिमेतर स्थलांतरित असणारच नाहीत ----

भारतीय स्थलांतरित हिंदू लोकांवर हेट क्राईम , खून ऑलरेडी झाले आहेत व पुढेही होत राहतील यात मला तरी शंका नाही. बरेचसे परदेशात राहणारे भारतीय याबद्दल व्यवस्थित अवेअर असतात. पण भारतात परत जाऊन तरी काय सुरक्षित राहणार, भारतातही हेट क्राईम, विखारी जातीयवादी, प्रांतवादी लोक आहेतच की, त्यामुळे हेट क्राईमला घाबरून सगळे भारतीय परत देशात गेले असं होत नाही. तुलनेने जास्त सेफ कुठे हे पाहिलं जातं.

मिस्टर सनव, भारतात हेट क्राईम कुठे नि कोणासोबत घडतात ते विषद कराल का? त्याला घाबरन इथून मायग्रेशन झाले का परदेशात? मनाला येईल ती भांकस करत राहायचं ह्यला काय अर्थय?

या सगळ्याला इस्लामोफोबिया तितकाच जबाबदार आहे. फारेंण्ण्ड यां नी लिहिलेलं याच्याशी मिळतं जुळतं वाक्य मला पटलं होतं. >>>

भरत. - थोडा खुलासा. मी इस्लामी दहशतवादाकरता इस्लामोफोबिया जबाबदार आहे असे म्हणत नाही. तो फोबिया ही प्रतिक्रिया आहे, मूळ कारण नाही असे मला वाटते. हे वेगळा अर्थ निघू नये म्हणून. हे मुद्दे लिहीण्याची ही जागा (बाफ व औचित्य दोन्ही) नव्हे याची मला जाणीव आहे. इतके मोठे हत्याकांड झाल्यावर त्याचा अनक्वालिफाइड निषेध करणे महत्त्वाचे आहे. "पण त्याचबरोबर" वाली वाक्ये अशा वेळेस येउ नयेत.

सनव, भारतात तुम्ही हेट क्राईमला कधी आणि कुठल्या कारणामुळे बळी पडलात?

Pages