न्युझीलंड- दहशतवादी हल्ला

Submitted by भरत. on 16 March, 2019 - 07:33

न्यु झीलंडमधल्या ख्राइस्ट चर्च इथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. जगातला कोणताही देश अतिरेकी, द्वेषाधारित, विध्वंसक विचारसरणीपासून सुरक्षित राहिलेला नाही. या हल्ल्यानंतर न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी देशाला उद्देशून केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आश्वासक वाटलं. त्यांच्या भाषणातला हा काही भाग. (स्वैर अनुवाद)

या हल्ल्याने घायाळ झालेल्या लोकां करिता हा माझा संदेश. हा संदेश फ़क्त माझ्याच नव्हे तर माझ्या देशाच्या वतीने आहे , माझ्या देशवासियांच्या भावनाही याच असतील , याची मला खात्री आहे.
या हल्ल्यात क्षती पोचलेल्या लोकांसोबत आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. बळी पडलेले लोक ख्राइस्टचर्चचे होते. त्यातल्या अनेकांचे ते जन्मस्थान नव्हते. खरं तर त्यातल्या अनेकांनी आपल्या वास्तव्यासाठी न्युझीलंडची निवड केली होती. हा देश त्यांनी (स्थलांतरासाठी) स्वत:हून निवडला त्याच्याशी नातं जोडलं, इथे त्यांची कुटुंब होती, इथल्या समाजाबद्दल त्यांना जिव्हाळा होता आणि या समाजानेही त्यांना प्रेम दिलं. या जागी ते एक सुरक्षित निवारा शोधीत आले. इथे त्यांना त्यांच्या धर्म आणि संस्कृतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य होते.

तुमच्यातल्या अनेकांना प्रश्न पडला असेल, हे असं माझ्या देशात कसं घडू शकतं? आपण लक्ष्य ठरण्याचे कारण, आपण द्वेष करणार्‍यांना आसरा दिला हे नव्हते. आपण वंशभेदाला , अतिरेकी विचारसरणीला थारा दिला, म्हणून हा हल्ला इथे झाला नाही. यांतलं ( वंशभेद, द्वेष, अतिरेकी विचार) काहीही आपल्यात नाही, म्हणूनच केवळ आपल्याला लक्ष्य केलंय. आपल्याला लक्ष्य केलंय कारण आपण विविधता, प्रेम, आपुलकी ही तत्त्वं मानतो. ही तत्त्वं मानणार्‍यांना सामावून घेतो. निराधार गरजूंना आश्रय देतो.

या तत्त्वांपासून आम्ही जराही ढळणार नाही, ढळू शकणार नाही याची खात्री बाळगा.

दोनशे वेगवेगळ्या वंशाच्या आणि एकशे साठ भाषा बोलणार्‍यांचा हा देश आहे, याचा मला अभिमान आहे. या विविधतेत आमची काही सामाईक तत्त्वं सामावलेली आहेत. या हल्ल्याची झळ लागलेल्यांबद्दल आमच्या मनात सहवेदना आहे, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत; हे आजच्या घडीला माझे सांगणे आहे.

ज्या विचारसरणीतून हे कृत्य झालं तिचा मी तीव्रतम शब्दांत निषेध करते.
तुम्ही (आपला देश, आपला समाज म्हणून) आम्हांला निवडलं असेल, पण आम्ही तुम्हांला पूर्णपणे नाकारतोय. तुमचा धिक्कार करतोय.

Group content visibility: 
Use group defaults

इस्लाम मधले अपेक्षित बदल आणि त्याची इस्लामी दहशतवादाशी घातलेली घट्ट सांगड समजली नाही. अशी मांडणी अन्यत्र पाहिलेली नाही. >>

अन्यत्र दिसली नाही म्हणजे ती चुकीची आहे का ? तसे असेल तर कृपया उदाहरणासकट स्पष्ट करावे. कुराण आणि शरीयातली जहाल वचने वापरून तरुणांची माथी भडकावून दहशतवादी बनवलं जाते, हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे (पुरावा मागल्या एका पोस्टीत दिला आहेच) . तेव्हा जहाल इस्लाम (इथं जहाल शब्दावर जोर द्यावा ) आणि मुस्लिम दहशतवाद यांची सांगड अयोग्य का आहे याचा आपण खुलासा करावा.

इस्लाम धर्मात अंत र्गत सुधा र णा होत नाहीत म्हणून इतर लोकांना त्यांचा द्वेष वाटतो? की इस्लामी दहशतवाद्यांमुळे? >>

जोपर्यंत इस्लामी दहशतवादामुळे अन्य धर्मियांचे गळे चिरले जात नव्हते, तोपर्यंतच हा अंतर्गत मामला होता. जेव्हा दहशतवादाने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले तेव्हापासून तो ग्लोबल मामला झालाय. बाकी चुकीच्या गोष्टींना/वचनांना केलेला विरोध म्हणजे द्वेष करणे नव्हे, हेही लक्षात असू द्या.

Islamophobic
adjective
Having or showing a dislike of or prejudice against Islam or Muslims, especially as a political force. - ऑक्सफ डिक्शनरीतला अर्थ. तुम्हे या शब्दाचा काही वेगळाच अर्थ लावताय.
>>

कुराणातल्या चुकीच्या गोष्टींना विरोध केला म्हणजे इस्लामोफोबिया का ? मग आंबेडकर, फुल्यांनी मनुस्मृतीवर जे आसूड ओढले, म्हणून त्यांना हिंदूफोबिक म्हणावं का ?
माझा आक्षेप इस्लामोफोबियाच्या व्याख्येला नाही , तो ज्या उद्देशाने वापरला गेला त्याला आहे. "कुराणातील अन्याय्य गोष्टींना विरोध करणारे निव्वळ आंधळेपणाने, चुकीच्या माहितीच्या आधारे जहाल इस्लामचा विरोध/द्वेष करत आहेत" असा त्या शब्दाचा अर्थ होतो. मी आधीच स्पष्ट केलंय की मी कुठल्या आकडेवारीच्या आधारे माझे निष्कर्ष काढलेत. कृपया ती खोटी आहे हे सिद्ध करा, आणि मगच मला इस्लामोफोबियाचं लेबल लावा.

इस्लामच्या भोवती चर्चा घोळवणार्‍यांनी एका मुद्द्या कडे सहेतुक दुर्लक्ष केलंय. तो दहशतवादी अँटि इमिग्रंट होता. त्याला युरोपात एथ्निक क्लीन्सिंग अपेक्षित आहे. त्याचं लक्ष्य मुस्लिम का होते ते त्याने सांगितलंय. दुसर्‍या कोणा व्हाइट सुप्रीमिस्टचं लक्ष्य मुस्लिमेतर स्थलांतरित असणारच नाहीत आणि तो स्थलांतरितांत धार्मिक भेद करणार नाही, अशी खात्री असेल, तर उत्तम आहे. >>

अँटी इमिग्रंट विचारसरणीचा न्यूझीलंडच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर निषेध केलाय, व्हाइट सुप्रीमिस्ट विचारसरणीला सगळ्याच लोकशाह्यांनी पायदळी तुडवलंय आणि त्यापाठी जनता बहुसंख्याने जनता उभी आहे. तसे कायदे बऱ्याच देशांनी केलेत. माझं म्हणणं इतकंच की, ज्या अधिकाराने मुस्लिम (इथे कुठलाही धर्म टाकावा) जनता अन्य धर्मियांकडे रेसिझम संपवण्याची मागणी करू शकते, त्याच अधिकाराने अन्य धर्मीय कुराणातली असहिष्णू वचन हटवून दहशतवादाला लगाम घालण्याची, जर्मनांसारखा कृतिशील सहभाग घेऊन आपणही दहशतवादाच्या विरोधात आहोत हे दाखवण्याची मागणी, मवाळ मुस्लिमांकडे करू शकतात.

Just read an article in Tribune, "The World according to Islamophobes", where all the blame is again placed on the Western countries where Muslims have migrated in their thousands. The article does not say anything about the killings in Arab countries where hundreds of thousands have been killed and the killings continue. Saudis are bombing Yemen, Syria is killing its own ciizens and same thing happens in Africa. That is why I had written elsewhere that Muslims must introspect and determine how this can be countered. I know this is not the responsibility of a common Muslim but Muslim thinkers and politicians.

१<तेव्हा जहाल इस्लाम (इथं जहाल शब्दावर जोर द्यावा ) आणि मुस्लिम दहशतवाद यांची सांगड अयोग्य का आहे याचा आपण खुलासा करावा. > There you go. आपण इतका वेळ सरसकट आणि सामान्य मुस्लिम माणसाबद्दल बोलत होतो. ही जहाल शब्दाची अ‍ॅडि शन अगदी यो ग्य आहे. मला आणखी काही लिहायची गरज नाही.

२ <ज्या व्हाईट सुप्रीमिस्ट गटाकडून हा हल्ला झाला, "त्यांच्या रागाचं एक मुख्य कारण" , मवाळ मुसलमानांची इस्लामी दहशतवादाविषयीची चुप्पी, हेसुद्धा आहे> असं तो कुठे म्हणालाय ते मी विचारलंय. त्यावर तुम्ही सगळ्यांच्या मनात तो असंतोष आहे असं म्हणताय. सगळ्यांच्या हे तुम्हीच ठरवलंय.

३ तुम्ही इस्लामोफोबिया कशाला म्हणताय? <इस्लामोफोबिया" हा शब्द ताबडतोब मागे घ्यावा. मी स्वतः इस्लाम किंवा अल्लाह हटवला पाहिजे असे कुठलेही विधान केलेलं नाही, फक्त कुराण (त्यातल्या असहिष्णू बाबी, जेणेकरून त्या वापरून नवीन अतिरेकी तयार होणार नाहीत) शरिया ,आणि त्यामागची अतिजहाल विचारसरणी बदलायची मागणी केलीय.>

इस्लामी दहशतवाद आणि सामान्य मुस्लिम माणसं फॉलो करत असलेला इस्लाम यांची तुम्ही घातलेली सांगड हा इस्लामोफोबिया आहे.
प्रत्येक मुस्लिम माणूस कोणत्या ना कोणत्या प्रकारे इस्लामी दहशतवादा ला पाठिं बा देतो किंवा त्याबद्दल सहानुभूती बाळगतो अ शा अर्थाचं एक विधान इथे येऊन गेलंय.
सीरियन रेफ्युजींबद्दलचं एक फेसबुक शेअर किंवा व्हॉटस अ‍ॅप फॉर्वर्ड इथे डकवलं गेलंय. हा इस्लामोफोबिया आहे.

कोणताही दहशतवादी गट इतरांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रथम 'आपल्या वर होत असलेल्या अत्याचारांचं चित्र रंगवतो' 'आपण' खतरे में असल्याच्या घोषणा देतो आणि मग लोक जा़ ळ्यात आले , त्यांच्या भावनांवर ताबा मिळालेला असतो, मेंदूवर तांबा मिळवण्यासाठी एक थि यरी मांडतो. इस्लामी दहशतवादी कुराण - शरियाची थियरी मांडतात. त्या व्हाइट सुप्रीमिस्टनेही अगदी हाच पॅटर्न फॉलो केलाय. त्याचीही काही थियरी आहे.

४. न्युझीलंडच्या पंतप्रधान दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी पावले उचलताहेत. त्यांनी गन कंट्रोल अ‍ॅक्टला हात घातलाय. व्हाइट सुप्रीमसी ही एक विचारसरणी आहे. ती कायद्याने बंद करता येईल?
<व्हाइट सुप्रीमिस्ट विचारसरणीला सगळ्याच लोकशाह्यांनी पायदळी तुडवलंय आणि त्यापाठी जनता बहुसंख्याने जनता उभी आहे. तसे कायदे बऱ्याच देशांनी केलेत.> Are you sure? अनेक राजकीय नेते छुप्या किंवा उघड व्हाइट सुप्रिमिस्ट विचारांचे आहेत.
त्या दहशतवाद्यालाच यातले काही नेते आपल्याच विचारांचे आहेत , असं वाटतंय.

मागल्या पानावरच्या एका प्रतिसादातला हा प्रश्न पहा - "तुम्ही परदेशात राहता त्या भागात न्यूझीलंड मध्ये हल्ला करणाऱ्या व्हाइट सुप्रीमिस्टविरुद्ध मेणबत्ती वा निषेध मोर्चा काढू शकाल का? "

तसंच विचारसरणी पायदळी तुडवणे हे लोकशाहीत बसत नाही. त्या विचारा पासून लोकां ना परावृत्त करणे, हे नेत्यांचे काम आहे. जेसिंडा आर्डर्न आणि जस्टिन ट्रुडो सारखे काही नेते ते करताहेत.

शेवटी ऑस्ट्रेलियातल्या त्या टीनेजरबद्दल . There is scope for hope. These are the good people Trudeau referred to.
त्याचं कृत्य समर्थनीय नसेल, पण त्याने केलेला निषेध नक्कीच कौतुकास्पद आहे.

https://www.facebook.com/janfran/posts/1730002297099683

बातम्या कशा दिल्या जातात त्यावरुन लोकांच्या मनात इतर लोकांबद्दल कशा अयाडिया घुसवल्या जातात व मेंदूंची ब्रेनवॉशिंग केली जाते ह्याचे उदाहरण वरच्या लिंकमध्ये. सर्वसामान्य मुस्लिमांनाही दहशतवादाचे आरोपी करणारे सर्व ज्यूंना जर्मनीच्या हलाखीसाठी सरसकट जबाबदार ठरवणार्‍या जर्मनीच्या नाझींपेक्षा वेगळे नाहीत. सुधरा. तुमचा राक्षस होऊ घातला आहे.

बातम्या कशा दिल्या जातात त्यावरुन लोकांच्या मनात इतर लोकांबद्दल कशा अयाडिया घुसवल्या जातात व मेंदूंची ब्रेनवॉशिंग केली जाते ह्याचे उदाहरण वरच्या लिंकमध्ये. सर्वसामान्य मुस्लिमांनाही दहशतवादाचे आरोपी करणारे सर्व ज्यूंना जर्मनीच्या हलाखीसाठी सरसकट जबाबदार ठरवणार्‍या जर्मनीच्या नाझींपेक्षा वेगळे नाहीत. सुधरा. तुमचा राक्षस होऊ घातला आहे. >>

कायच्या काय ...

कुराणातील निर्घृण व जहाल वचनांनी जे राक्षस निर्माण केलेत आणि करत आहे ते संपविण्यासाठी आम्ही कुराणात बदल / शरिया बरखास्त करण्यासाठी मुस्लिमांनीच पुढाकार घ्यायला हवा तर आणि तरच परिस्थितीत काहीतरी फरक पडेल असे म्हणणे , नाझीवादाच्या बरोबरीचे आहे काय?

{@ व्यत्यय >>> शोधतो मी. जसा मी सांगितले कि हे काही दिवसापूर्वी वाचनात आलेले आहे ... तेव्हा मला थोडं शोधायला लागेल ... हे whatsapp नव्हते हे नक्की

Submitted by उनाडटप्पू on 18 March, 2019 - 20:35}

@उनाडटप्पू: काही रेफरन्स मिळाला का? कुठुन तरी कॉपी-पेस्ट केलं असेल ना तुम्ही? की स्वतःच्या आठवणीतुन एव्हढी मोठी पोस्ट तुम्ही स्वतः टाईप केली? जर काही रेफरन्स नसेल तर अ‍ॅड्मिन कडे दिलगीरी व्यक्त करुन काढुन टाका ती पोस्ट.

त्यावर तुम्ही सगळ्यांच्या मनात तो असंतोष आहे असं म्हणताय. सगळ्यांच्या हे तुम्हीच ठरवलंय. >>

हो, हा असंतोष दहशतवादामुळे निष्पाप बळी गेलेत, त्यामुळे आलाय. फक्त मुस्लिम दहशतवादाची व्याप्ती तुलनेने मोठी असल्याने त्याविरोधातला असंतोष प्रकर्षाने जाणवतो. आता कुणाच्या मनात मुस्लिम दहशतवादाविरोधात असंतोष नसेल असं मला तरी वाटत नाही (यात मवाळ मुस्लिमही आले), तसा तो असंतोष कुणाच्या मनात नसेल तर माझ्या निदर्शनास आणून द्या.

इस्लामी दहशतवाद आणि सामान्य मुस्लिम माणसं फॉलो करत असलेला इस्लाम यांची तुम्ही घातलेली सांगड हा इस्लामोफोबिया आहे.
प्रत्येक मुस्लिम माणूस कोणत्या ना कोणत्या प्रकारे इस्लामी दहशतवादा ला पाठिं बा देतो किंवा त्याबद्दल सहानुभूती बाळगतो अशा अर्थाचं एक विधान इथे येऊन गेलंय
.>>

प्रत्येक मुस्लिम दहशतवादाला समर्थन करतो असं मी मुळीच म्हटलं नाही. मीच हमीद दलवाई आणि तस्लिमा नसरीनचं उदाहरण दिलंय, कृपया त्याकडे लक्ष द्यावे. माझी आत्तापर्यंतची विभागणी सुध्दा मवाळ मुस्लिम आणि जहाल अशीच राहिली आहे. तेव्हा ते "प्रत्येक मुस्लिम माणूस..." टाईपची वाक्य मागे घ्यावीत.

फक्त त्या बहुसंख्य मवाळ मुस्लिमांच्या कृतीतून दहशतवाद विरोध दिसत नाही, माझा आक्षेप यावर आहे.
अन बहुतांश मुस्लिम जनता ही कुराण (त्यातले जहाल विचार) आणि शरियाच्या बाजूने आहे (मागच्या पोस्टीत युरोपातल्या दोन त्रितीयांश मुस्लिमाचा कल काय याची आकडेवारी आहे).

तरीही बऱ्याच जणांचा आक्षेप आहे की, ही बहुसंख्य मुस्लिम जनता दहशतवादाचं समर्थन करत नाही. माझं म्हणणं इतकंच की त्यांची शांती ही अप्रत्यक्षपणे दहशतवादाला खतपाणी घालतेय.

जर खरोखरच बहुसंख्याने मुसलमान समाज दहशतवाद विरोधी आहे, तर हाफिज सैद पाकिस्तानात खुलेआम भाषणं कुणासाठी करतोय ? त्याची भाषणं ऐकायला गेलेली शांतीप्रिय जनता तिथल्या तिथे आवाज का उठवत नाही ? का पाकिस्तानी पत्रकार त्याला आमंत्रण देऊन चर्चेसाठी बोलावतात (https://www.youtube.com/watch?v=H_Hyl4_cFCE)? बाकीची शांतीप्रिय जनता या चॅनेल वर बहिष्कार टाकत नाही ?

ते जाऊद्या, आपल्या नुकत्याच परदेशात स्थायिक झालेल्या झाकीर नायकाचं उदाहरण घ्या. भारतासकट अनेक देशात शांतीप्रिय जनता झाकीर नायकांच्या हजारोंच्या संख्येने हजेरी का लावते?झाकीर नाईक यांची प्रसिद्धी किती आहे, याचा हा एक ढळढळीत पुरावा -
He has attained so much popularity that even within our own community there is a section feeling extreme jealousy towards him. These sects are being used as a tool to fuel a vicious propaganda against him,” said Manzoor Sheikh, trust manager, IRF. (https://www.thehindu.com/news/national/4000-speeches-amp-counting-fans-s...)
कृपा करून वरील बातमीच्या खाली ज्या प्रतिक्रिया आहेत त्याही वाचाव्यात आणि स्वतःच ठरवावे.

या आवाज न उठवण्याला कुराणातली जहाल वचने जबाबदार आहेत, हे मत मांडणारा मी पहिलाच नाही. आपले संविधानकार काय म्हणाले होते याकडेही थोडं ध्यान द्या -

This is, of course, a very short list and could be easily expanded. But whether the number of prominent Hindus killed by fanatic Muslims is large or small matters little. What matters is the attitude of those who count, towards these murderers.The murderers paid the penalty of law where law is enforced. The leading Moslems, however, never condemned these criminals. On the contrary, they were hailed as religious martyrs and agitation was carried on for clemency being shown to them. As an illustration of this attitude, one may refer to Mr. Barkat Alli, a Barrister of Lahore, who argued the appeal of Abdul Qayum. He went to the length of saying that Qayum was not guilty of murder of Nathuramal because his act was justifiable by the law of the Koran. This attitude of the Moslems is quite understandable.

- "PAKISTAN OR THE PARTITION OF INDIA" By Dr. B.R. Ambedkar (p. 157)

इतकं सगळं पाहिल्यावर मी फक्त इतकंच म्हटलं, एकतर कुराणातली जहाल वचने काढून टाकावीत, अन्यथा बहुतांश मुस्लिमांनी त्या जहाल विचारांवर आपण विश्वास ठेवत नाही हे आपल्या कृतीतून दाखवून द्यावं. यात कुठली सुप्रीमिस्ट विचारसरणी, नाझीवाद, इस्लामोफोबिया आला ?आता तुम्ही आंबेडकरांनासुद्धा इस्लामोफोबिक म्हणणार का ? उत्तर नाही असेल तर कृपया ते सगळे शब्द मागे घेण्यात यावेत.

Are you sure? अनेक राजकीय नेते छुप्या किंवा उघड व्हाइट सुप्रिमिस्ट विचारांचे आहेत. >>
हो, कारण एकतर बहुसंख्य जनता अजूनही न्यायप्रिय आहे आणि दुसरं म्हणजे लोकशाहीत अजूनही सर्वोच्च न्यायालय संविधानाच रक्षण करायला समर्थ आहे. प्रसंग पडला तर जर्मनांनी जसा नाझीवादावर बॅन आणला तसाही आणला जाऊ शकतो, यात आत्ताच्या घडीला मलातरी काही शंका वाटत नाही.

शेवटी ऑस्ट्रेलियातल्या त्या टीनेजरबद्दल . There is scope for hope. These are the good people Trudeau referred to.
>>
चला, पाहिलं पाऊल टाकण्यात आपण कुठेही कमी नाही, हे न्यूझीलंडच्या एका टीनएजर ने दाखवलं, त्याबद्दल त्याचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे. आता त्याच्यासारखी हिंमत घेऊन पलीकडूनसुध्दा बऱ्याच जणांची पावलं पुढे येतील याची मी वाट बघतोय.

त्या दहशतवाद्यालाच यातले काही नेते आपल्याच विचारांचे आहेत , असं वाटतंय.>>

मला बाकीच्यांचं माहिती नाही. माझ्यातर्फे कुठल्याही दहशतवादाला समर्थन नाही, हे जाणून असा. राहिला प्रश्न थिअरीचा, त्याच्यापाठी मी घडाभर पुरावे वेळोवेळी दिलेले आहेत. त्यात चूक काढून योग्य तर्कनिशी आणि सबळ आकडेवारीनुसार माझ्याशी प्रतिवाद करण्यात यावा, त्यासाठी मी सर्व प्रतिसाद्कर्त्यांचा आभारी राहीन. विरोधातला एकही पुरावा न देता निव्वळ नेत्यांनी हे केले, ते केले, माझी विचारसरणी कुणासारखी दिसते अशी खुसपट काढून नसलेली लेबले मला चिकटवण्यात येऊ नयेत. तुमच्या पुरावे आणि आकडेवाऱ्यानी माझ्या ज्ञानात भरच पडेल यात काही वाद नाही.

{ज्या व्हाईट सुप्रीमिस्ट गटाकडून हा हल्ला झाला, "त्यांच्या रागाचं एक मुख्य कारण" , मवाळ मुसलमानांची इस्लामी दहशतवादाविषयीची चुप्पी, हेसुद्धा आहे> असं तो कुठे म्हणालाय ते मी विचारलंय. त्यावर तुम्ही सगळ्यांच्या मनात तो असंतोष आहे असं म्हणताय. सगळ्यांच्या हे तुम्हीच ठरवलंय}

यातलं तुम्ही {त्यावर तुम्ही सगळ्यांच्या मनात तो असंतोष आहे असं म्हणताय. सगळ्यांच्या हे तुम्हीच ठरवलंय. >>
एवढंच उचललंत.
इस्लामी दहशतवादाबद्दल प्रत्येकाच्याच मनात राग असणं स्वाभाविक आहे.
पण त्यासाठी सामान्य मुस्लिम माणसाबद्दल सगळ्यांच्या मनात राग आहे असं तुम्ही आधीच्या प्रतिसादात म्हणाला होतात.

तसं ते नाहीए, हे उघड आहे.

तसंच त्या दहशतवाद्यांचं सामान्य मुस्लिमांना लक्ष्य करण्याचं मुख्य कारण त्यांची चुप्पी असं तुम्ही म्हणालात.
तो असं कुठे म्हणालाय, हे मी पुन्हा विचारतोय.

{प्रत्येक मुस्लिम माणूस..." टाईपची वाक्य मागे घ्यावीत.}
तुम्ही नसाल म्हणिला. आणखी कोणीतरी लिहिल़य याच धाग्यावर तसं.

{इतकं सगळं पाहिल्यावर मी फक्त इतकंच म्हटलं, एकतर कुराणातली जहाल वचने काढून टाकावीत, अन्यथा बहुतांश मुस्लिमांनी त्या जहाल विचारांवर आपण विश्वास ठेवत नाही हे आपल्या कृतीतून दाखवून द्यावं. यात कुठली सुप्रीमिस्ट विचारसरणी, नाझीवाद, इस्लामोफोबिया आला ?आता तुम्ही आंबेडकरांनासुद्धा इस्लामोफोबिक म्हणणार का ? उत्तर नाही असेल तर कृपया ते सगळे शब्द मागे घेण्यात यावेत.}
इ स्लामोफोबिया म्हणजे काय ते मी व्यवस्थित लिहिल़य. वडाची साल पिंपळाला लावू नका.

कुराणावर विश्वास कसलेल्या मुस्लिमाने इस्लामी दहशतवादाला केलेला विरोध माझ्यासाठी पुरेसं आहे. त्यांच्यातलेच अनेक दहशतवाद , आयसिस जे करतंय, ते इस्लाममध्ये बसत नाही, असं म्हणतात.
मुंबै २००८ हल्ल्यातले दहशतवादी इस्लामच्या विरोधात वागले, कसं इथल्या मुस्लिमांनघ म्हटलं होतं. दफनाला नकार दिला होता.
आतख आयसिसने न्युझील़डमधल्या हल्ल्याचा सूड घेण्याची धमकी दिलीय.
फेसबुकवर इंडियन एक्स्प्रेसच्या या बातमीच्या पोस्टखाली न्युझीलंडमधल्या हल्ल्यासाठी आयसिसलाच दोष देणारे अनेक मुस्लिम दिसताहेत.

सामान्य माणसाच्या इस्लामची दहशतवादाशी घातलेली सांगड मला अजूनही समजलेली नाही.

कुराण आणि जी काय गाइडलाइन्स असतील त्यात तुम्ही म्हणता ते बदल झाले की इस्लामी दहशतवाद नाहीसा होईल असं तुम्ही सुचवताय का?

व्हाइट सुप्रीमिस्ट आपल्या थियऱ्या कशाच्या जोरावर मांडतात?

सामान्य माणसाच्या इस्लामची दहशतवादाशी घातलेली सांगड मला अजूनही समजलेली नाही. >>> मलाही. वरच्या त्या काही क्लिप्स पाहिल्या. एकतर इरफान खान (१०-१५ मिनीटेच पाहिली आहे ती क्लिप) काय चुकीचे बोलला ते समजले नाही. तो अर्णब गोस्वामी दुसर्‍याला एकही वाक्य पूर्ण न बोलू देता नुस्ताच ओरडत बसतो. त्याच्या शो वर लोक जातात कसे याचेच मला आश्चर्य वाटते. ओम पुरी च्या त्या शो पासून ओम पुरी पेक्षा अर्णबच जास्त डोक्यात गेला आहे. एखाद्याला २-४ मिनीटे डोक्यातले विचार एकत्र करून नीट उत्तर न देउ देता मधेच असंख्य वेळा कट करून आणखी कॉर्नर करणारे प्रश्न तो विचारणार. मग पब्लिक त्यातील वाक्ये सोयीनुसार कट करून इकडेतिकडे पाठवणार. साहजिकच इरफानची प्रतिक्रिया सावध होती. मी जितका वेळ ती क्लिप पाहिली तितक्या वेळात इरफान चे मत नक्की काय ते अजिबात समजले नाही. Two monologues don't make a dialog आठवले ते पाहून.

दुसरी ती पॅलेस्टाइन वाल्यांची. त्यातूनही हे अनुमान कसे निघते ते समजले नाही.

मुस्लिम लोकांमधे असले विचार करणारे असंख्य आहेत असे म्हणत असाल तर १००% सहमत आहे. पण मुस्लिम लोकांनी घाउकरीत्या एक समाज म्हणून आत्मपरीक्षण करावे अशी प्रतिक्रिया, ती ही घटनेचा निषेध करताना त्याबरोबरच - हे मला पटले नाही. एखाद्या समाजातील वाईट लोक कसे वागतात, याची जबाबदारी तसे न वागणार्‍या इतरांवर येत नाही हाच माझा प्रमुख मुद्दा आहे. त्यांनी त्यावर काही करायचे ठरवले तर चांगलेच आहे, पण त्यांनी तसे केले नाही तर त्यांचा या दहशतवादाला पाठिंबा आहे, कारण ते जी धार्मिक पुस्तके वाचतात त्यातही तेच आहे - ही फार मोठी उडी आहे.

{पण त्यांनी तसे केले नाही तर त्यांचा या दहशतवादाला पाठिंबा आहे, कारण ते जी धार्मिक पुस्तके वाचतात त्यातही तेच आहे}
या दहशतवादाला ते सामान्य लोक जबाबदार आहेत, असं म्हणणं आहे यांचं.

ह्या धाग्यावर मी भरत ह्यांच्या मताशी सहमत आहे .
कारण मी प्रतेक्ष अनुभव घेतला घेतला आहे 93 chya हिंदू मुस्लिम दंगलीत माझा मित्र जो मुस्लिम होता तो त्याच्या आईला फोन करून परिस्थिती काय आहे हे विचारून त्या नुसार तो मला मुस्लिम वस्ती मधून सुखरूप बाहेर काढायचा
माझे जे मुस्लिम मित्र आहेत ते प्रत्येक सणाला त्या सणाच्या फोटोसहित wish करतात

मी विलभ यांच्या सर्व मतांशी १०० % सहमत आहे.

कुराण आणि जी काय गाइडलाइन्स असतील त्यात तुम्ही म्हणता ते बदल झाले की इस्लामी दहशतवाद नाहीसा होईल असं तुम्ही सुचवताय का? >>>

नाही ते लगेच होणार नाही .. ते बदल झाले कि इतर धर्मीय लोकांमध्ये एक चांगला संदेश जाईल. मुख्य म्हणजे ज्या गोष्टीवर दहशतवादाचे धार्मिक समर्थन होते ती गोष्ट नाहीशी होईल. तरीही लोकांना बदल पचविणे कठीणच जाते. धार्मिक अधिष्ठाण नाहीसे झाल्याने जिहादच्या नावाखाली नवीन भरती होऊ शकणार नाही आणि नव्याने कुराण वाचणारी पिढी जुन्यां कर्मठ लोकांना प्रश्न विचारू लागेल..

या सर्व प्रोसेस ला किमान २५ वर्षे लागतील. पण इस्लामच्या नावाखाली होणाऱ्या कत्तली व इस्लामचे कारण सांगून केला जाणारा द्वेष काही काळाने जवळजवळ शून्य होईल.

राजेश१८८,

सर्वच मुस्लिम खराब आसतात असे मत फक्त एक दोघांनी व्यक्त केले. बाकीच्या कुणाचेही ते मत नाही. इथे जास्त valid कन्टेन्ट टाकणाऱ्या विलभ यांचेही ते मत नाही.

आम्ही फक्त कुराणात बदल व्हावा व मुस्लिमांनी शरियाला सोडचिट्ठी द्यावी हे दोन मुद्दे मांडले.

तसंच त्या दहशतवाद्यांचं सामान्य मुस्लिमांना लक्ष्य करण्याचं मुख्य कारण त्यांची चुप्पी असं तुम्ही म्हणालात.
तो असं कुठे म्हणालाय, हे मी पुन्हा विचारतोय.
>>

हे मी म्हणालो होतो. त्याने असं म्हटलंय, हे मला म्हणायचं नाही. पण जी न्यूझीलंडच्या इमिग्रंटसची आकडेवारी (मागच्या पोस्टीत लिंक आहे) दिलीय त्यावरून आणि न्यूझीलंड मध्ये जे जहाल इस्लामने डोकं वर काढलं होतं (https://en.wikipedia.org/wiki/Islam_in_New_Zealand) त्यावरून मला वाटतंय त्याच्या डोक्यात असलेल्या रेसिझमच्या आगीत तेल ओतलं गेलं. मुस्लिमांना टार्गेट करायचा एक हेतू जहाल इस्लामला कंटाळलेल्या न्यूझीलंडच्या जनतेची सहानुभूती मिळवणे हे ही असणार , हे आपलं माझं मत.

त्यांच्यातलेच अनेक दहशतवाद , आयसिस जे करतंय, ते इस्लाममध्ये बसत नाही, असं म्हणतात. >>

१) In January, Salman Mohiuddin of Hyderabad was arrested at that airport when he was preparing to board a flight to Dubai on way to Syria via Turkey.
२) Mehdi Masroor Biswas, the 24-year-old engineer, was arrested in Bangalore in December 2014 for allegedly propagating ISIS activities through Internet.
३) Four Mumbai youth had travel to Iraq-Syria last year to join ISIS. One of them is reportedly dead while one returned home after a few months.
(https://economictimes.indiatimes.com/news/defence/rapid-increase-of-isis...)

आयसिसचा निषेध मुसलमानांकडून होतोय , मग वरच्या केसेस का घडतात ?

मुंबै २००८ हल्ल्यातले दहशतवादी इस्लामच्या विरोधात वागले, कसं इथल्या मुस्लिमांनघ म्हटलं होतं. दफनाला नकार दिला होता.>>

माफ करा पण कृती ही शब्दांपेक्षा जास्त बोलते. २१ नोव्हेंबर २०१२ रोजी कसाब लटकावला गेला तेव्हाच्या या बातम्या -
१) हाफिज सैद ने हजारो (इथे हजारो शब्दावर लक्ष द्या) लोकांबरोबर पाकिस्तानात रॅली काढून अजमल कसाबसाठी नमाज अदा केला - http://archive.indianexpress.com/news/2611-mastermind-hafiz-saeed-offers...

२) काश्मीरमध्ये अशाच सभेसाठी लोक "शेकडोंच्या" संख्येने उपस्थित होते - https://web.archive.org/web/20130719103520/http://kashmirwatch.com/news....
तिथे गिलानी साहेब म्हणाले - "Funeral prayers should be held for (Palestinian) martyrs and Kasab should also be remembered".

हे झालं पाकिस्तान आणि काश्मीरच, आता आपल्या मुंबईच्या मुस्लिमांकडे वळू. कसाबला लटकावल्यापासून जवळपास ३ वर्षांनी, ३० जुलै २०१५ ला याकूब मेमनला मुत्युदंड देण्यात आला, आणि त्याच्या दफनयात्रेला हजारोंच्या संख्येने (जवळ जवळ ८००० लोकं ) हजेरी लावली गेली. व्हाट्सअँप वापरून या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले गेले आणि कुर्ला, मालाड, मुंब्रा येथून मुस्लिमांनी शेकडोंच्या संख्येने या आवाहनाला प्रतिसाद दिला . (https://indianexpress.com/article/india/india-others/in-quiet-grief-hund...)

आता हे सगळं होईपर्यंत शांतीप्रिय मुस्लिम का गप्प होते ? समोर धडधडीत चुकीचं घडत असताना त्याविरोधात बोलायची त्यांची हिम्मत का झाली नाही ? मला
शांतीप्रिय मुस्लिमांची जी चुप्पी अभिप्रेत आहे, ती हीच. त्यांचा सारासार विचार या समयी तोकडा का पडला ? का त्यांना दुसऱ्या कशाची भीती होती ?

३ वर्षांपूर्वी एका आतंकवाद्याचा निषेध (तोही फक्त ठराविक ठिकाणी) आणि त्यानंतर ३ वर्षांनी दुसऱ्या आतंकवाद्यासाठी प्रार्थना, याचा अर्थ काय ?

असो.

झाकीर नाईक निर्मित "पीस टीव्ही" , ज्यावर त्यांची भाषणं दाखवली जातात, तीच प्रक्षेपण भारतात बंदी असताना अजूनही बेकायदेशीररीत्या प्रक्षेपित केलं जातंय , ते कुणासाठी ? (https://timesofindia.indiatimes.com/india/No-licence-to-air-in-India-but...)

हे सगळं पाहून शांतीप्रिय मुस्लिम नेमक्या कुणाच्या बाजूने आहेत, हे बाकीच्यांना कसं समजायचं ?

वरच्या त्या काही क्लिप्स पाहिल्या. एकतर इरफान खान (१०-१५ मिनीटेच पाहिली आहे ती क्लिप) काय चुकीचे बोलला ते समजले नाही. तो अर्णब गोस्वामी दुसर्‍याला एकही वाक्य पूर्ण न बोलू देता नुस्ताच ओरडत बसतो. >>

हो मग तुम्हाला माहिती असेलच अर्णबने पहिल्या दहा मिनिटात कोणते प्रश्न इरफानला विचारले ते . पहिल्या दहा मिनिटात तरी अर्णबने काहीही गडबडगोंधळ न करता ३ प्रश्नावर इरफानचे वैयक्तिक मत विचारले :
१) ट्रिपल तलाक अन्याय आहे हे तुम्ही मानता का ? (८:०४)
२) पॉलीगामी (बहुपत्नीत्व ) हा रिफॉर्म (चांगल्या उद्देशाने केलेला एक सामाजिक बदल) आहे हे तुम्ही मानता का ? (८:०९)
३) हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश दिला पाहिजे की नाही ? (८:४४)

इरफान हा भारताचा एक सुजाण आणि सुधारणावादी अभिनेता आहे, आणि भारतीय संविधानाचे समतेचे सूत्र लक्षात घेतलं तर वरील प्रश्नांची उत्तर देणं फार अवघड नाही, आणि त्याचं मत व्यक्त करायचा अधिकार त्याला संविधानाने दिलाय. तरीही त्यानं आपलं मत व्यक्त करायचं टाळलं (जसं बाळासाहेबांनी बाबरी मशीद कांडात शिवसेनेच्या सहभागाविषयीचे प्रश्न टाळले होते). त्याला त्याचं मत, त्याला वाटलेलं सत्य सांगायला कशाची भीती वाटली ? शांतीप्रिय मुस्लिमसुध्दा कुराणातल्या अवघड बाबतीत चुप्पी ठेवतात, याच उदाहरण म्हणून ती लिंक दिलेली.

दुसरी ती पॅलेस्टाइन वाल्यांची. त्यातूनही हे अनुमान कसे निघते ते समजले नाही. >>
कदाचित मुस्लिमांचा ज्यूंबरोबर असलेला झगडा कुराणाशी कसा निगडित आहे, याच्यावर एक प्रबंधच प्रकाशित करण्यात आलाय, त्याची ही एक लिंक - (https://www.researchgate.net/publication/249101782_Disparity_and_Resolut...). आणि हा शतकानुशतकांचा झगडा अजूनही बरेच सामान्य मुस्लिम , फक्त कुराणात लिहिलंय म्हणून पुढे चालू ठेवताहेत. हमासची उत्पत्ती याच कारणामुळं झालीय. अमेरिकेत राहून हमासला सपोर्ट करणाऱ्या विद्यार्थिनीचा एक विडिओ मी त्याच पोस्टीत दिलाय.

कारण मी प्रतेक्ष अनुभव घेतला घेतला आहे 93 chya हिंदू मुस्लिम दंगलीत माझा मित्र जो मुस्लिम होता तो त्याच्या आईला फोन करून परिस्थिती काय आहे हे विचारून त्या नुसार तो मला मुस्लिम वस्ती मधून सुखरूप बाहेर काढायचा
माझे जे मुस्लिम मित्र आहेत ते प्रत्येक सणाला त्या सणाच्या फोटोसहित wish करतात.
>>

चांगला अनुभव आहे. अशाच गोष्टीमुळे आशा टिकून आहे. फक्त हर्ड मेन्टॅलिटी मध्ये या गोष्टी सगळे समाज सोयीस्कर नजरेआड करतात (आठवा बाबरी मशीद कांडांनंतर सख्ख्या हिंदूमुस्लिम शेजाऱ्यांनी एकमेकांचे कसे गळे कापले होते). त्यातूनही मैत्री टिकून राहिली, ही खरंच आनंदाची गोष्ट.

पण मुस्लिम लोकांनी घाउकरीत्या एक समाज म्हणून आत्मपरीक्षण करावे अशी प्रतिक्रिया, ती ही घटनेचा निषेध करताना त्याबरोबरच - हे मला पटले नाही. एखाद्या समाजातील वाईट लोक कसे वागतात, याची जबाबदारी तसे न वागणार्‍या इतरांवर येत नाही हाच माझा प्रमुख मुद्दा आहे. त्यांनी त्यावर काही करायचे ठरवले तर चांगलेच आहे, पण त्यांनी तसे केले नाही तर त्यांचा या दहशतवादाला पाठिंबा आहे, कारण ते जी धार्मिक पुस्तके वाचतात त्यातही तेच आहे - ही फार मोठी उडी आहे.
>>

कदाचित ही मोठी उडी आहे, आणि त्यामागची कारणमीमांसा मी उदाहरणासहित स्पष्ट करायचा प्रयत्न करतो. प्रतिसाद लांबेल पण तरीही माझा तर्क समजण्यासाठी कृपया तो पूर्ण वाचावा, ही विनंती. ->

किमान हजार वर्ष झाली जातीव्यवस्था भारतीय हिंदू समाजात अस्तित्वात आहे. सुरवातीला तथाकथित "कामानुसार" विभागणी अशा गोंडस नावाखाली हळूहळू धर्ममार्तंडांनी बहुतांश हिंदू समाजाला जातींच्या बेड्यात अडकवून ठेवले. पण तत्कालीन ब्राह्मण संख्येने इतके कमी असताना एवढ्या मोठ्या जनसमूहावर आपलं नियंत्रण कसे ठेऊ शकले ? तर मनुस्मृतीच्या साहाय्याने.

मनुस्मृतीच्या क्रूर आणि अन्याय नियम (जे ह्यांनी स्वतःच घुसडले होते) त्यांनी धर्माचे अधिष्ठान दिले. त्यावेळी ब्राह्मण हाच धर्म आणि देवाची इच्छा सांगणारा अधिकारी पुरुष, आणि त्यांना बाकीच्यांच्या मनात धर्माची भीती कशी घालायची, याची कला चांगलीच अवगत होती. कोणी शूद्र जाब विचारायला उठला, की त्याच्या अवनतीला त्याचाच पूर्वजन्म कसा कारणीभूत आहे हे मनुस्मृतीची वचनं सांगून गप्प बसवलं जायचं. तरीही खळखळ केली तर देवाची, पुढच्या किड्याच्या जन्माची भीती आहेच, अगदी झालंच तर मनुस्मृतीतल्या अमानुष शिक्षा आहेत. कालांतराने याचीच सवय झाडून सगळ्या जातींना लागली. बामणांनी, क्षत्रियांनी दाबत राहायचे, आणि बाकीच्यांनी दबून घ्यायचे , वर आपल्या अमानवी कृत्याचं समर्थन करताना मनुस्मृती आणि बाकीच्या धार्मिक ग्रंथांचा आधार घ्यायचा.

पण सगळीच जनता शांत बसली नव्हती, काहींना जातिव्यवस्थेचा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहवत नव्हता. त्यांनी आपल्या सारासार बुद्धीला साकडं घातलं, आत्मपरीक्षण केलं (हो आत्मपरीक्षण/self introspection या शब्दावर जोर द्यावा), आणि त्यातून गौतम बुद्ध, संत ज्ञानेश्वर, गुरु नानक , संत एकनाथ, संत तुकाराम अशी संतांची मांदियाळीच उभी राहिली. या सर्वांनी स्वतः आत्मपरीक्षण (self introspection) तर केलेच पण न्याय्य धर्माचा योग्य अर्थ लावून तो लोकांपर्यंत पोहोचवला. लोकांच्या सारासार विवेकबुद्धीला आवाहन केलं, विचाराला प्रवृत्त केलं. बदलाचं चाक हळूहळू फिरत होत पण अजूनही त्याला म्हणावी तशी गती येत नव्हती.

अशातच १९ व्या शतकाच्या अखेरीस आंबेडकर नावाच्या अवलियाचा जन्म झाला. आपल्या नव्या आधुनिक तर्काच्या आधारे त्यांनी मनुस्मृतीची चिरफाड तर केलीच शिवाय सर्व दलितांच्या मनातून धर्माची, मनुस्मृतीची भीती घालवली. दलितांवरच्या अन्यायाचे मूर्तिमंत प्रतीक अशा मनुस्मृतीच्या प्रतीचं दहन केलं (outright rejection of unjust laws). तसंच उच्च जातींच्या न्यायप्रियतेला आंबेडकरांनी आवाहन केलं (call to oppressor for introspection), कारण दोन्ही बाजूनं न्यायाच्या बाजूने करून त्यांना कमीत कमी बेबनाव निर्माण होईल, या दृष्टीनं प्रयत्न केले.

सततच्या लढ्यात जेव्हा निर्णायक यश येत नाही, असं बाबासाहेबाना जाणवलं तेव्हा त्यांचा अखेरीस हिंदू धर्माकडून फारशा आशा उरल्या नाहीत. अखेरीस आपल्या ५,००,००० दलित बांधवांसोबत बुद्ध धर्मात प्रवेश केला (rejection of unjust religion), जिथे जातीवादाला मुळीच थारा नसेल.
संदर्भ - (https://www.sabrangindia.in/article/why-did-dr-babasaheb-ambedkar-public...)

वरच्या उदाहरणात मनुस्मृतीच्या जागी "कुराण", ब्राम्हण क्षत्रियांच्या जागी "जहाल मुल्ला मौलवी" आणि दलितांच्या जागी "मवाळ मुस्लिम" टाका. मग जहालवाद्यांची मवाळांवर असलेल्या सत्तेची, धर्माच्या भयाची कल्पना येईल.

वरच्या उदाहरणातून असं दिसतं की आंबेडकरांनी किंवा अन्य संतांनी जातीव्यवस्था मोडीत काढण्यासाठी खालील उपायांचा अवलंब केला :
१) self introspection (आत्मपरीक्षण)
२) call to oppressor for introspection (ब्राह्मणांच्या सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन)
३) outright rejection of unjust laws (मनुस्मृतीचं दहन आणि तीच अनुसरण न करण्याची प्रतिज्ञा)
४) rejection of unjust religion (सगळ्यात शेवटचा उपाय, धर्मपरिवर्तन)

याच धर्तीवर मलाही वाटतं की मवाळ मुसलमानांनी वरील उपायांचा अवलंब करून हळूहळू आपल्या धर्मातला अन्याय्य भाग हळूहळू हटवावा. आंबडेकरांनी या मार्गाने न्यायाच्या दिशेने वाटचाल केलीय आणि त्यात ते बऱ्याच अंशी यशस्वी झालेत, मुस्लिमही त्या मार्गाने स्वतः न्यायाच्या मार्गावर पुढे जातील.

जस देश स्वच्छ ठेवायचा असेल तर देशातल्या प्रत्येक नागरिकाला प्रथम सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी लागते, फक्त सरकारवर त्याची जबाबदारी टाकता येत नाही.
तसंच समाजातल्या अस्वच्छ विचारांचा सफाया करण्याची जबाबदारी समाजातल्या प्रत्येकाची आहे.

<हे मी म्हणालो होतो. त्याने असं म्हटलंय, हे मला म्हणायचं नाही
मुस्लिमांना टार्गेट करायचा एक हेतू जहाल इस्लामला कंटाळलेल्या न्यूझीलंडच्या जनतेची सहानुभूती मिळवणे हे ही असणार , हे आपलं माझं मत.>

धन्यवाद. त्याच्या जाहिरनाम्यात काय काय म्हटलंय त्याबद्दल तज्ज्ञ लोकांनी लिहिलंय. विश्लेषण केलंय. तुम्ही ते वाचावं असं मी आता सांगणार नाही. पुढचे प्रतिसाद मी वाचत नाहीए. ते या धाग्याशी संबंधित आहेत, असे मला वाटत नाही.

जाता जाता. व्हाइट सुम्प्रमसिस्ट दहशतवाद्यांना / अतिरेक्यांना डोनाल्ड ट्रंप आपल्यातलेच एक वाटतात, असं सांग णार्‍या एका लेखाची लिंक मी आधी दिली होती. ती वाचा असंही सांगणार नाही.

याकूब मेमनच्या अंत्ययात्रेला लोक गेले वरून: आज गोडसे सारख्या दहशतवाद्याला फाशी देऊन त्याचं प्रेत दहन करायला पुण्यात आणलं असतं तर कोणकोण गेलं असतं? हात वर करा!

गोडसे सारख्या दहशतवाद्याला फाशी देऊन त्याचं प्रेत दहन करायला पुण्यात आणलं असतं तर कोणकोण गेलं असतं? हात वर करा! >>>

हे राम नावाचा धागा आहे. तिथे हा प्रश्न टाका. इथे विषय इस्लामी दहशतवाद आणि व्हाइट सुप्रीमिस्ट चा आहे.

ह्या हल्ल्या नंतर न्यूझीलंड मध्ये स्वयंचलित रायफल वर बंदी आली आहे मला वाटतं जगातील सर्व देशांनी सर्व प्रकारच्या हत्यारावर बंदी आणली पाहिजे .
पोलिसांकडे हत्त्यारे असतात ना मग जनतेला कशाला हवीत .इ

दिडशे प्रतिसाद झाले. बर्‍याच लोकांनी इथे मुस्लिम समाज दहशतवादाविरोधात काही प्रतिक्रिया का देत नाही असा सूर लावून धरलेला दिसला. ह्यात त्यांची चूक नाहीये म्हणा. एकतर असं मानणारे (की मुस्लिम समाज दहशतवादाविरोधात नाही) स्वतः मुस्लिमांमध्ये राहत नसतात. ते जी मिडिया बघतात वाचतात तिथे जे मुस्लिम प्रोटेस्ट करत आहेत त्याच्या बातम्याच येत नसतात. केवळ मुस्लिम अतिरेकी घातपात करतात त्याच बातम्या एकतर्फीपणे भडकपणे येत राहतात, त्याचे विश्लेषण करणारी एक लिंक वर दिली आहे. त्याच्यावरच्या चर्चा जाणीवपूर्वक कुराण आणि ते कथित रित्या फॉलो करणारा प्रत्येक मुस्लिम त्या दहशतवादाला कसा कारणीभूत आहे ह्या फसव्या मुद्द्यावर आहेत. दुसरी बाजू कधीच समाजासमोर येत नाही. इथे कोणी मुस्लिम बंधू त्यांची बाजू लिहित नाही. लिहिली तरी पिसाटलेल्या कुत्र्यांसारखे हिंदुत्ववादी कसे तुटून पडतात हे बघितले आहे. त्यामुळेच त्यांचे लिहिणे मराठी आंजावर बंद झाले. आता मनाला येईल तसे सगळे मुस्लिम सरसकट राक्षस, रानटी रंगवले तरी जबाब कोण विचारणार आणि तपास कोण करणार? ह्याला नाझीपणाच म्हणतात. आता तसं थेट कोणी म्हटले की तीळपापड होतो.

मला धाग्याशी संबंध नसलेले बरेच प्रश्न पडलेत. उत्तरे नकोत कोणाकडून.

पुलवामा हल्ल्यानंतर कित्येक शहरांतून मुस्लिमांनी पाकिस्तानविरोधात मोर्चे काढले घोषणा दिल्या. किति चॅनेल्सनी पेपर्सनी ह्या बातम्या दिल्या? मुळात तशा काही दिल्या तरि का? त्या त्यांना का द्याव्याशा नाही वाटल्या? पाकिस्तानला मूंहतोड जवाब देण्यासाठी उपाशी वाघासारख्या पिंजर्‍यातल्या पिंजर्‍यात फेर्‍या मारणार्‍या आणि डरकाळ्या फोडणार्‍या एकही चॅनेलबहाद्दराला भारतीय मुस्लिमांचे हे देशप्रेम जगासमोर आणावेसे का वाटले नसेल?

दहशतवादाने लोक मारली जातात म्हणून तो मोठा विषय होतो का? मग गेल्या तीस वर्षात ह्या भारतात दहशतवादाने काही हजार लोक मारले असतील पण लाखो शेतकर्‍यांनी स्वतःचे जीव दिले ते मरण नाही का? एकाला एक आणि दुसर्‍याला दुसरा हा न्याय का?

देशाच्या सरकारी धोरणांमुळे रोज दोन पाच शेतकरी मरतात त्याला आपण कधी इतका वेळ देतो का चर्चेला?

मुले कुपोषणाने मरतात, ऑक्सिजनशिवाय मरतात, अन्नधान्याशिवाय मरतात, दुष्काळाने मरतात, रस्त्यांच्या खड्ड्यात मरतात, आपल्याच लोकांनी केलेल्या दंग्यात मरतात, पोटातल्या पोटात मरतात त्याचेबद्द्ल आपण अशा हमरीतुमरीवर येऊन चर्चा कर्तो का?

मागच्या तीन वर्षात ३७७ खाणकामगार मरण पावले, त्याच्या आधीही कित्येक हजार मेले असतील. केल्या कधी आपण त्यावर अशा चर्चा?

हजारो स्वच्छता कर्मचारी कामावर असतांना गुदमरुन मेलेत, कित्येक आजार होऊन ऐन तारुण्यात मेलेत. त्यांचा जीव जीव नाही?

लाखो आदिवासींना त्यांच्या राहत्या घरातून हाकलण्याचे आदेश देण्यात आले, त्या जमिनी धनदांडग्यांना हव्यात म्हणून, एकाने तरी त्याबद्दल माबोवर कुठेतरी प्रश्न विचारला का? का ते आपले देशबंधू नाहीत, त्यांचे जीव जीव नाहीत?

जेवढे लोक आतापर्यंतच्या रेल्वेतल्या बॉम्बस्फोटांमध्ये मेले नसतील त्यापेक्षा जास्त दर महिन्याला एकट्या मुंबईच्या लोकलमुळे मरतात. त्यांचे मरण जणू नैसर्गिक असते. त्यावर चर्चा नकोत.

ह्या देशात दहशतवादाच्या समस्येपेक्षा आकाराने आणि प्रभावानेही अक्राळविक्राळ समस्या आहेत. त्यावर आपल्याला एक दोन तिरकस पिंका मारण्याशिवाय काही सुचत नाही. कारण इथे सगळे गुन्हेगार आपलेच असतत, आपल्यातले असतात. त्यांची मान आपण पकडून देऊ शकतो पण आपण तसे करत नाही. मात्र धर्माच्या नावाखाली कोण्या अदृश्य अशा दहशतवादी शत्रूविरुद्ध लढायला, त्यावर भांडायला एका पायावर तयार असतो. असे का?

बुशने अफगानिस्तानमध्ये गनिम लपलाय म्हणून वॉर अगेन्स्ट टेरर नावाचे युद्ध सुरु केले. त्याचा फायदा कोनाला झाला? संपला का दहशवाद?
जनतेचा फोकस रोजच्या जगण्याच्या मुद्द्यांवरुन हटून दहशतवादासारख्या क्राफ्टेड मुद्द्यावर असावा ह्याचा फायदा सगळ्या देशांच्या सगळ्या सरकारांना होत असावा.

असो. Sad

Pages