न्युझीलंड- दहशतवादी हल्ला

Submitted by भरत. on 16 March, 2019 - 07:33

न्यु झीलंडमधल्या ख्राइस्ट चर्च इथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. जगातला कोणताही देश अतिरेकी, द्वेषाधारित, विध्वंसक विचारसरणीपासून सुरक्षित राहिलेला नाही. या हल्ल्यानंतर न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी देशाला उद्देशून केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आश्वासक वाटलं. त्यांच्या भाषणातला हा काही भाग. (स्वैर अनुवाद)

या हल्ल्याने घायाळ झालेल्या लोकां करिता हा माझा संदेश. हा संदेश फ़क्त माझ्याच नव्हे तर माझ्या देशाच्या वतीने आहे , माझ्या देशवासियांच्या भावनाही याच असतील , याची मला खात्री आहे.
या हल्ल्यात क्षती पोचलेल्या लोकांसोबत आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. बळी पडलेले लोक ख्राइस्टचर्चचे होते. त्यातल्या अनेकांचे ते जन्मस्थान नव्हते. खरं तर त्यातल्या अनेकांनी आपल्या वास्तव्यासाठी न्युझीलंडची निवड केली होती. हा देश त्यांनी (स्थलांतरासाठी) स्वत:हून निवडला त्याच्याशी नातं जोडलं, इथे त्यांची कुटुंब होती, इथल्या समाजाबद्दल त्यांना जिव्हाळा होता आणि या समाजानेही त्यांना प्रेम दिलं. या जागी ते एक सुरक्षित निवारा शोधीत आले. इथे त्यांना त्यांच्या धर्म आणि संस्कृतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य होते.

तुमच्यातल्या अनेकांना प्रश्न पडला असेल, हे असं माझ्या देशात कसं घडू शकतं? आपण लक्ष्य ठरण्याचे कारण, आपण द्वेष करणार्‍यांना आसरा दिला हे नव्हते. आपण वंशभेदाला , अतिरेकी विचारसरणीला थारा दिला, म्हणून हा हल्ला इथे झाला नाही. यांतलं ( वंशभेद, द्वेष, अतिरेकी विचार) काहीही आपल्यात नाही, म्हणूनच केवळ आपल्याला लक्ष्य केलंय. आपल्याला लक्ष्य केलंय कारण आपण विविधता, प्रेम, आपुलकी ही तत्त्वं मानतो. ही तत्त्वं मानणार्‍यांना सामावून घेतो. निराधार गरजूंना आश्रय देतो.

या तत्त्वांपासून आम्ही जराही ढळणार नाही, ढळू शकणार नाही याची खात्री बाळगा.

दोनशे वेगवेगळ्या वंशाच्या आणि एकशे साठ भाषा बोलणार्‍यांचा हा देश आहे, याचा मला अभिमान आहे. या विविधतेत आमची काही सामाईक तत्त्वं सामावलेली आहेत. या हल्ल्याची झळ लागलेल्यांबद्दल आमच्या मनात सहवेदना आहे, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत; हे आजच्या घडीला माझे सांगणे आहे.

ज्या विचारसरणीतून हे कृत्य झालं तिचा मी तीव्रतम शब्दांत निषेध करते.
तुम्ही (आपला देश, आपला समाज म्हणून) आम्हांला निवडलं असेल, पण आम्ही तुम्हांला पूर्णपणे नाकारतोय. तुमचा धिक्कार करतोय.

Group content visibility: 
Use group defaults

हे पंडीत ही.मूर्खच.म्हणायचे आपल.सरळ..शांततावाद्याना सामील.व्हायच....तर बसलेत ईकडे देवदर्शन करत......वीस एक.वर्ष उगीच वाया नाही का गेली.....आणी दिल्लीत त्यांच्या झोपड्याना .जागा द्या परत...तीच जागा रोहींग्या साठी नसती का उपयोगात आली असती...आधीच दील्लीत जागा कमी...

प्रतिसादात लोक मारले गेल्याबद्दल दु:ख नाही.
आताही इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे तुम्हांला आनंद झाल्यासारखा दिसतोय.
भरत
हा त्यांचा पारंपरिक खेळ आहे त्या मुळे त्याचे विशेष वाटत नाही .
पण हा खेळ उर्वरित जगाला बिलकुल आवडत नाही आणि खेळता सुद्धा व्यवस्थित येत नाही .
त्या मुळे उर्वरित जग हा खेळ बंद पाडाव म्हणून खेळाडू वर कारवाई करणार की अजून कोणत्या प्रकारे उत्तर देणार ह्याच फक्त कोड आहे

पण हा खेळ उर्वरित जगाला बिलकुल आवडत नाही आणि खेळता सुद्धा व्यवस्थित येत नाही .
त्या मुळे उर्वरित जग हा खेळ बंद पाडाव म्हणून खेळाडू वर कारवाई करणार की अजून कोणत्या प्रकारे उत्तर देणार ह्याच फक्त कोड आहे >>

राजेश भाउ, त्यांना नक्की काय लिहायचं हेच कळत नाहीय. त्यामुळे इकडच्या तिकडच्या गप्पा मारताहेत.

लोकप्रिय असलेला हा धागा ओस का पडलाय ,
काही तरी त्रासदायक वळण ह्या धाग्याला येईल अशी भीती वाटतेय काय

लोकप्रिय असलेला हा धागा ओस का पडलाय ,
काही तरी त्रासदायक वळण ह्या धाग्याला येईल अशी भीती वाटतेय काय >>>>

बिगर मुस्लिम लोकांनी केलेला मुसलमानांवरील हल्ल्याचा बदला ISIS सारख्या संघटनांकडून नेहेमीच घेतला जातो. आपल्या धागालेखकांची न्यूझीलंडवरील हल्ला हा मायग्रंट्सवरील हल्ला होता अशी भाबडी समजून झाली. त्या समजुतीला न्यूझीलंडच्या पंतप्रधानांच्या मुत्सद्दी वक्तव्याने खतपाणी घातलं.

मी प्रतिसादांत पहिल्या पानावरच म्हटलंय कि या धाग्याचं शीर्षक बदला. आता श्रीलंकेतील हल्ले न्यूझीलंडवरील हल्ल्याचा बदला म्हणून झालेत असे इसिस ने स्पष्ट केल्याने व या धाग्याचे शीर्षक "न्युझीलंड- दहशतवादी हल्ला" असे असल्याने श्रीलंकेतील हल्ल्याची चर्चा इथे होणे स्वाभाविक आहे.

या विषयावर नक्की काय प्रतिक्रिया आता द्यायची हेच धागालेखकाला व कथित संतुलित समर्थन करणाऱ्यांना कळत नाहीय असे दिसते. नाहीतर एव्हढा मोठा सन्नाटा दिसला नसता.

कोणत्याही दहशत वादाचे कडाडून विरोध करणारे ,मानवता वादी
दहशत वाद हा लहान मोठा असा नसतो तर दहशत वादच असतो म्हणून साध्वी वर तुटून पडणारे तरी तिने कथित ब्लास्ट हे अत्यंत हीन दर्जाचे स्फोटके वापरून केल्याचं फक्त संशय होता तरी
मग असे सर्व शांतता प्रिय लोक इकडे आता दिसेनाशी झाली आहेत ,

नक्की तो दहशत वादी हल्ला होता की चुकून नजरचुकीने स्फोटके dispose करताना झालेला स्फोट होता हे निश्चित करण्यात सर्व गुंतले असतील ,
पूर्ण अभ्यास केल्या शिवाय श्रीलंकेतील स्फोटावर ते बोलणार नाहीत खूप विचारी लोक आहेत ती

चला यानिमित्ताने तुम्हाला न्यूझीलंडमधल्या दहशतवाद्याचं पुन्हा एकदा समर्थन करता आलं.
श्रीलंकेतले हल्ले निषेधार्ह आहेत आणि त्या दहशतवाद्यांचा चोख बंदोबस्त करायला हवा, त्यांना शिक्षा व्हायला हवी , असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून काळजी घ्यायला हवी , हे सगळं goes without saying
तुम्ही लोकांनी न्युझीलंड हल्ल्याचं समर्थन केलं, तसं याबाबत कोणीही करताना दिसत नाही. सोशल मीडियावर मुस्लिमही आयसिसला बोल लावताना दिसताहेत. त्यांना अन इस्लामिक म्हणताहेत.
जगभरातल्या अनेक मुस्लिम संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
तुमच्यासारखे लोक मात्र आधिकाधिक मुस्लिमांंना आयसिस कडे जावंसं वाटावं अशा प्रतिक्रिया देत आहेत.

समर्थन करण्याच्या webside वेगळ्या असतात ,
आयसिस चे उद्धिष्ट जगात फक्त मुस्लिम धर्मीय (म्हणजे फक्त सुन्नी मुस्लिम बोहरी आणि शिया नव्हेत) राहोत आणि काफिर जग सोडून जावेत हे आहे,
फक्त अन्याय विरुद्ध लढा देने हे नाही

डियर मी. भरत,

प्रत्येक वेळी तुम्ही तुमचा निषेध मायबोलीवर नोंदवावाच. मनातल्या मनात कितीहि वाईट वाटू दे, आणि मायबोलीवर निषेध नोंदवायचा नाही, असा दुटप्पीपणा तुमच्यासारख्या फेक्युलर लोकांनाच जमो... मायबोली इज द आरसा ऑफ युवर माईंड. तुमचं तन, मन, धन तिथे अर्पण राहायला हवं. बाकीचं रियल जग सगळं झूठ, मिथ्या....
या, लवकर या... मायबोलीवर येऊन अश्रू ढाळा... सगळे धागे तुमच्या अश्रूंमद्ये धुवून निघायला पाहिजे.....

चला यानिमित्ताने तुम्हाला न्यूझीलंडमधल्या दहशतवाद्याचं पुन्हा एकदा समर्थन करता आलं. >>> हे कुणी कुठल्या प्रतिसादात म्हटलय ?

सोशल मीडियावर मुस्लिमही आयसिसला बोल लावताना दिसताहेत. त्यांना अन इस्लामिक म्हणताहेत.
जगभरातल्या अनेक मुस्लिम संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
तुमच्यासारखे लोक मात्र आधिकाधिक मुस्लिमांंना आयसिस कडे जावंसं वाटावं अशा प्रतिक्रिया देत आहेत. >>>

आयसिस च्या कारनाम्यान्बद्धल किती मुस्लिम देशान्नी निषेध व "कारवाइ" केलीय ?

दुसर म्हणजे कुराण आम्ही लिहिलेल नाही आणि ईसीस च्या मते ते कुराणाने दाखवलेल्या मार्गाने जात आहेत आणि तसे ब्रेन वाशिन्ग "उच्चशिक्षीत" मुस्लिम तरुणान्मध्येही करत आहेत. त्यामुळे आमच्यामुळे अधिकधिक मुस्लिमान्ना ईसीस कडे जावस वाटत हा तुमचा दावा पोकळ आहे. उलट कुराणातील तत्वान्मुळे इतर धर्मान्ना वर्षानुवर्षे असुरक्शीत वाटत आहे याबद्धल आपण काय म्हणणार आहात?

मुस्लिम- बौध्द
मुस्लिम - हिंदू
मुस्लिम - ख्रिस्त

असे खूपव रक्त रणजित संघर्ष जगानी पाहिले आहेत
आणि ह्यात मुस्लिम हा कॉमन फॅक्टर आहे
कधी
हिंदू - बौध्द
हिंदू -christ
ख्रिस्त- बौध्द
असा रक्तरंजित संघर्ष झाल्याचा इतिहास नाही

काही रोचक घटना
- भारताने 7 दिवस आधी इंटेलिजन्स इनपुट्स दिले होते
भारतिय हेर खात्याला देशाबाहेर होणाऱ्या घटनांचा सुगावा 7 दिवस आधी लागतो, भारतात , त्यापन लष्करावर होणाऱ्या हल्ल्याचा सुगावा लागत नाही

- या inputs वर काम न करणाऱ्या उच्च अधिकाऱ्यांची हकालपट्टी
पुलवामा प्रकरणी कोणावर जबाबदारी ठेवली गेली का? (सोशल मीडिया वर भांडणार्या फुरोगामी आणि सेक्युलर लोकांना सोडून)

- हल्ला झाल्यावर काही तासात संशयित अटकेत
पुलवामा प्रकरणात कोणाला अटक वगैरे झाली का? वाचनात आले नाही

हल्ला झाल्यावर काही तासात संशयित अटकेत
पुलवामा प्रकरणात कोणाला अटक वगैरे झाली का? वाचनात आले नाही >>>

त्या मास्तर्माइन्डने स्वतःला अटक करु देण्याची परिस्थीती असेल तर अटकही झाली असती, पण लष्कराने त्याचा खात्मा केला. असो, हे सर्व पुलवामा धाग्याचे प्रश्न इथे कशाला? इथल्या विषयावर लिहा सिम्बा...

परत भारत,भारतीय तपास यंत्रणा,भारत सरकार
हे कसे बिनडोक आहे हे सांगण्याचा प्रयत्न होईल

श्रीलंका हल्ला , न्यूझीलंड हल्ल्याचा बदला म्हणून झाला की नाही?
मग श्रीलंका हल्ल्यानंतर सरकार ने जे उपाय योजले (आणि जे आपल्याकडे योजले गेले नाहीत) ते इकडे लिहिणे जाणारच Happy

मग श्रीलंका हल्ल्यानंतर सरकार ने जे उपाय योजले (आणि जे आपल्याकडे योजले गेले नाहीत) ते इकडे लिहिणे जाणारच Happy
>>

मग लिहा कि ! मी पुलवामा बद्धल विचारतोय.. वाचता येत ना?

मग तसाच कोलंबो चा वेगळा धागा काढा आणि लिहा,
इकडे अडगळ तयार का करताय? >>>

कोलंबो, न्यूझीलंड व पुलवामा येथील हल्ल्यांमधले परस्परसंबंध स्पष्ट करा.. मग बोलू

न्यूझील़डमधल्या दहशतवाद्याचा आयसिस सारख्या दहशतवादढ स़घटनांमुळे सामान्य मुस्लिमांवर राग होता व त्यातून त्याने हल्ला केला, अशी एक थियरी इथे मांडली गेली. थियरी मांडणाऱ्याने , त्या दहशतवाद्याने स्वतः असे कुठेही म्हटलेलं नाही, हे मलाच वाटतंय असं कबूल केलं.
या मंडळींनी तो दहशतवादी white supremacist होता, याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलंय.
आता तीच टेप पुन्हा वाजवली जाते आहे.
त्या टेपला पुन्हा उत्तर द्यायची गरज मला वाटत नाही.

न्यूझील़डमधल्या दहशतवाद्याचा आयसिस सारख्या दहशतवादढ स़घटनांमुळे सामान्य मुस्लिमांवर राग होता व त्यातून त्याने हल्ला केला, अशी एक थियरी इथे मांडली गेली. थियरी मांडणाऱ्याने , त्या दहशतवाद्याने स्वतः असे कुठेही म्हटलेलं नाही, हे मलाच वाटतंय असं कबूल केलं.
या मंडळींनी तो दहशतवादी white supremacist होता, याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलंय.
>>>

व्हाइट सुप्रिमसिस्ट गटांचे लक्ष विविध देशात वेगवेगळे समूह आहेत. अमेरिकेत त्यांचे लक्ष मुख्यत्वे काळे व ज्यु लोक आहेत. त्यानंतर मुस्लिम व मग इतर आशियायी वर्णाचे लोक यादीत येतात.

न्युझीलंड - ऑस्ट्रेलियातील व्हा.सु. गटांबद्दल फारसे वाचलेले नाही. त्यांचा संबंध युरोपियन नीओ-नाझींशी जवळचा आहे.

न्युझीलंडमध्ये १,६३,००० चायनीज वंशाचे लोक आहेत. त्यात इतर साउथ इस्ट एशियन जोडले तर साधारण अडीच लाखाच्या वर जाते संख्या. भारतीय वंशाचे (पाकिस्तानी धरून) साधारण १,७०,००० आहेत. त्यातले ५०% मुस्लिम आहेत असे पकडले तर साधारण ८०,००० मुस्लिम लोकसंख्या आहे. चायनीज समुदायावर वा हिंदू मंदिरांवर का हल्ला झाला नाही?
न्युझीलंड - ऑस्ट्रेलियातील व्हा.सु. गटांना मुस्लिम समुदाय अधिक धोकादायक का वाटतो? मुसलमान समुदायांचे एलियेनशन (वेगळी ओळख) अधिक प्रकर्शाने प्रतित होते का? की व्हा.सु. गटांचे हे कंडिशनिंग आहे की मुसलमान अधिक धोकादायक केला जातो?
प्रश्नाचे या बाजूने विचार केल्यावर जे बळी ठरले त्यांच्यावर (न्युझीलंडमधील मुसलमान समुदाय) जबाबदारी टाकली जात आहे असे वाटू लागते. त्याचवेळी अतिशय कमी दिवसात हल्ल्याच्या विरोधात दुसर्‍या देशात स्लीपर सेल जागृत करून नियोजीत हल्ले घडवणे हे समुदायाच्या पातळीवर तयारी असणे (प्रीपेअर्डनेस) दर्शविते.

समुदायाच्या पातळीवर विचार केल्याशिवाय या प्रश्नांची उत्तरे मिळणे अवघड आहे.

टवणे सर, you too?
हे मुद्दे आधीच चर्चेत येऊन गेले आहेत.
त्या दहशतवाद्याच्या मेनिफेस्टोचं विश्लेषण करणाऱ्या अभ्यासकांनी काय लिहिलंय, ते मी आधीच्या पानावर दिलं होतं.
तुमच्यामुळे पुन्हा कॉपी पेस्ट करावं लागतंय.
The individuals targeted were selected because Tarrant sees Muslims as “invaders” and he wants to make them afraid. (The irony here is rich, given the history of colonialism and genocide in Australia, New Zealand, and other majority-white countries that began as European colonies.) But he also chose to attack Muslims because existing levels of Islamophobia insure that “attacking them receives the greatest level of support.”

ज्यांना समजून घ्यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी
https://i.stuff.co.nz/national/christchurch-shooting/112265006/the-hazy-...

https://www.cnn.com/asia/live-news/sri-lanka-easter-bombings-investigati...
यात अनेक बातम्यांची जंत्री आहे.
त्यातली एक
Reyyaz Salley, chairman of the Shaikh Usman Waliyullah mosque, told CNN that he had repeatedly attempted to warn the government about radical preachers in Sri Lanka, including Zahran Hashim, the alleged mastermind of the attacks.

"They started to attack Sufi mosques and shrines (in 2010)," he said.

In February 2019, Salley sent police and intelligence officials videos that Hashim made, which Salley considered promoting jihad. He urged them to act upon it.

"People have been brainwashed. He was talking about jihad. These are all very dangerous messages for the country," he says.

"If the authorities had taken our advice this could have been prevented.”

But he also chose to attack Muslims because existing levels of Islamophobia insure that “attacking them receives the greatest level of support.”
या अर्थाची किमान एक स्पष्ट प्रतिक्रिया या धाग्यावर आहे. and it is so chilling that someone amongst us is thinking exactly like that terrorist.
अन्य काही प्रतिक्रियांतही तो दडलेला आहे.

असो. पुन्हा पुन्हा तेच लिहिण्यात अर्थ नाही.

भरत, इस्लामोफोबियाच का? आणि “attacking them receives the greatest level of support.” कारण रिटॅलिएशन लगेच होते दुसर्‍या बाजुने?

@हेला, मध्ययुगीन चर्च वि. इस्लाम काँक्वेस्ट आणि आजची दुश्मनी यांच्यात मला तरी संबंध जाणवत नाही. आजची दुश्मनी साइक्स-पिको/तेल या गेल्या १००वर्षातल्या घटनांवर बेतलेली आहे. व्हाइट सुप्रिमसिस्ट/निओ नाझी/नॅशनलिस्ट गट हे ख्रिश्चन धर्मापेक्षा युरोपियन संस्कृतीच्या जवळिकीस अधिक महत्त्व देतात. त्या युरोपियन संस्कृतिच्या ओळखीत ख्रिश्चन असणे एक भाग आहे, मात्र प्रमुख भाग नाही.

असे खूपव रक्त रणजित संघर्ष जगानी पाहिले आहेत
आणि ह्यात मुस्लिम हा कॉमन फॅक्टर आहे))))))))निश्चीतच त्या.तत्वज्ञानात काहीतरी..आहे....कि ज्याच्या मुळे सुसाईड बाँबर.स्वता मरायला तयार.होतायत...हे लोक चांगल्या घरचे.उच्चशिक्षीत श्रीमंत सुध्दा (ओसामा,वै...तसेच अल कायदा चा जवाहीरी).....आहेत....वर्ण,जात,सत्ता या परीमाणात याची चर्चा करून उत्तर सापडणार नाही ....ईतक्या.घाऊक पद्धतीने असे अनुयायी मीळणे हे नक्कीच विचार करण्या जोगे......मागे आयसीस मधे.सामील व्हायला.ठाण्यातून दोन तीन ईंजीनीयर.मुल ईराक मधे गेलेली ही घटना काय सांगते।...ईतक्या लांब जावून जीवावर उदार होवून लढाव अस.त्याना का वाटल...किंवा.england Europe मधून सुध्दा असे लोक.तीथ गेले होते...त्यात काही नव धर्मांतरीत white European पण होते...काय common ground त्याना.सापडल.....ब्रेनवाँश.वै म्हणणे हे.स्वताचि फसवणूक करण्या सारखेच...९/11मधे सुध्दा बरेचसे चागल्या घरचे लोकच...डँनीयल पर्ल चा शिरच्छेद.करणारा ऊमर.हा.london school of economics चा schooler...आता बाकीचे धर्म सुध्दा आपल्या परीने.त्याचा मुकाबला (newzelandचा.हल्ला).करायला.लागलेत.....युरोपात उजवा विचार राजकारणात मूळ धरू लागलाय...हे याचेच.side effect च....पण त्याला ईतक संघटीत रुप देणार तत्वज्ञान कुठल्याच धर्मात नाही..अर्थात आज हे.तत्वज्ञान नाही.म्हणजे उद्या येणार नाही अस नाही...मागणी हि पुरवठ्याची जननी आहे...रोहींग्याची हकालपट्टी, newzeland हल्ला,किंवा ट्रंप चे आगमन हे याचेच परिणाम.......हे अस का होतय.तेही संपूर्ण जगात याचा अभ्यास केला पाहीजे हे.नीश्चीत

आणि ह्यात मुस्लिम हा कॉमन फॅक्टर आहे))))))))निश्चीतच त्या.तत्वज्ञानात काहीतरी..आहे....
>>>
जगातले सगळे धर्म रक्तरंजित आहेत. आठव्या अन नवव्या शतकातला अरब समाज शास्त्र/प्रगतीमध्ये सर्वात अग्रेसर होता. एकाला ग्रेट वाटणार हिंदू धर्म दलिताला सगळ्यात जुलमी वाटतो.

धर्माची शिकवण वगैरे सुरु झाले की मूळ प्रश्न राहतो बाजूलाच.

newzelandचा.हल्ला).करायला.लागलेत.....युरोपात उजवा विचार राजकारणात मूळ धरू लागलाय...हे याचेच.side effect च....पण त्याला ईतक संघटीत रुप देणार.

डाव्यांचा भंपकपणा सर्वांना समजायला लागलाय
मला तर बिलकुल त्यांचे विचार पटत नाही .एक वाक्य पण त्यांचे ऐकावं किवा वाचावं असं वाटतं नाही तिडीक येते डोक्यात

Pages