भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

भाजपात असलेली नेत्यान्ची उण नाव असलेला धागा इतरत्र वहात चालला आहे. इथले अनेक प्रतिसाद लिहिणारे जे भाजपच्या बाजूने बोलतात त्याना भक्त म्हणुन आपण कसे निपक्ष आहोत हे सान्गायचा प्रयत्न करताना दिसत आहेत. खरे तर भाजपात जर उणीव असेल तर तशी कॉन्ग्रेस मधे पण आहे का याचा ही विचार करायला हवा असे मला वाटते.

==55 कोटी कुणी पाकिस्तानला दिलेच नाहीत.

==त्या नावाने लोक अजून खोटे बोलत असतात
दोन देशातील कराराप्रमाणे भारत पाकिस्तानला ५५ कोटी देणे लागत होता. आणि ते भारताने दिलेही. फक्त त्यामागे गांधींचं उपोषण होते की नाही हाच वादाचा मुद्दा आहे
मात्र गांधींनी केलेले मुस्लिम लांगूलचालन हा मुद्दा निर्विवाद आहे.

गांधी मुस्लिमांचं तथाकथित लांगूलचालन कशासाठी करत होते? त्यांचा नेमका उद्देश काय होता?

फाळणीपूर्व भारतातले मुस्लिम (जे मुस्लिम लीग आणि जिनांच्या मागे गेले ते) गांधींना आपला नेता का मानत नव्हते? स्पेसिफिकली - हिंदूंचा नेता का मानत होते?

स्त्रीवाद आणि गांधी याबद्दल पुन्हा मौन वाटतं!
स्वतःला स्त्रीवादी म्हणवणारे लोक गांधींना आदर्श का मानतात?
राजीवची विधवा म्हणून मतं मागणाऱ्या सोनियाजी डीएमकेची जवळीक का करतात?
स्वतःला पुरोगामी म्हणवणारे लोक सनातन-ब्रिगेडयुक्त पक्षाचा जीव तोडून प्रचार का करतात?
स्वतःला जातीयवाद-सॉरी-ब्राम्हणवाद-विरोधी म्हणवणारे लोक आपल्या नेत्याचं जानवं कसं मिरवतात!
आणि हो- एखाद्या उमेदवाराने झोपडपट्टीत ५०० च्या नोटा वाटून मतं मागितली तर तो गुन्हा आहे बरं का. पण आम्हाला मत दिलं तर आम्ही झोपडपट्टीला लाईफटाईम ७२००० रुपये दरवर्षी देऊ , असं सांगणं गुन्हा नाही तर मास्टरस्ट्रोक आहे.

गांधी मुस्लिमांचं तथाकथित लांगूलचालन कशासाठी करत होते?

क्षणभर धरून चालू , खरे आहे,

मग उरलेल्या 10 कोटीपैकी सावरकर , गोडसे , हेडगेवार , मुखर्जी , बाजपेयीं वगैरे तुमचे नेते होते ना ? त्यांच्याकडून तुमचे लाड तुम्ही करवून घ्यायचे होते,
आताही मोदी फडनवीसांचे शासन आहे, आता घ्या करून लाड.

लिहितोय .

मुद्दा होता प्रचारसभांत मोदींनी काँग्रेसची विधवा (विधवा पेन्शन योजनेच्या संदर्भात्), पचास करोड की गर्लफ्रेंड असे शब्द वापर ण्याचा.

यात मोदींच्या त्या विधवा वक्तव्याचा निषेध भाजप समर्थकांनी केला असं ढळढळीत खोटं लिहून त्याच वाक्यात (त्याच श्वासातच्या चालीवर) पुढे त्यांचं म्हणणं कसं योग्य होतं (सोनियांनी आपल्या नवर्‍याच्या बलिदा नाचा उल्लेख केला म्हणजे स्वतःच विधवा असल्याब द्द ल गळा काढून मतं मागितली हे स्ट्रॉमेन ऑर्ग्युमेंट (ज्यात तुमची मास्टरी आहे..जिथून हा विषय निघाला - काँग्रेसचा ब्राह्मणविरोध /द्वेष) आणलंत.

मग पुढचे डीएमकेशी जवळीक वगैरे संपूर्णपणे असंबद्ध मुद्दे आणलेत.
ते जानवं का मिरवतात वगैरे प्रश्नांची उत्तरं आधीही लिहिली आहेत. पुन्हा लिहितो.
राहुल गांधी हिंदू नाहीत, (तस्मात हिंदूं नी त्यांना मतदान करू नये ) हा भाजपचा पिढीजाद (नेहरूच हिंदू नाहीत इथपासून) प्रचार.
राहुल सोमनाथ मंदिरात गेल्यावर त्याने गैर हिंदूंसाठी असलेल्या रजिस्टरमध्ये सही केली असा प्रचार भाजपने सुरू केला. त्यावर काँग्रेसप्रवक्त्याने ते जनेऊधारी हिंदू असल्या चं उत्तर दिलं.
मग ते कुठे होमाला बसल्यावर त्यांचं गोत्र काढलं, त्यावर काँग्रेस प्रवक्त्याने त्यांचं गोत्र सांगितलं.

विरोधकांच्या खासगी आयुष्यातल्या असलेल्या आणि नसलेल्या गोष्टींबद्दल वावड्या उडवून त्यांना श त्रू ठरवायचं हा भाजप आणि संघ परिवाराचा जुना खेळ.

आता गांधीनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात केलेल्या गोष्टींचा संबंध काँग्रेसच्या पॉलिसींशी जोडणं हा त्यातलाच प्रकार. ते मीटू मध्ये बसतं की नाही हे त्या स्त्रियाच सांगू शकतील. त्यांना जज करायचा अधिकार मला नाही. इथे लगेच मोदीं च्या बा यकोचा मुद्दा आणालाच, तर मी तो कधीही आणलेला नाही. असं करणा र्‍यांना थांबवायचा प्रयत्नही केला आहे.

माझा प्रश्न होता, मोदी स्त्रियांविषयी राजकीय व्यासपीठावरून जी भाषा वापरतात ( याची मी फक्त दोनच उदाहरणं दिलीत, अनेक आहेत)
ती स्त्रीवादी स्त्री आयडींना खटकते की नाही.
त्याचं १. गांधींचे प्रयोग २. सोनिया आणि डीएमके हे कसं असू शकतं ?
(मोदींचा प्रचंड निषेध केला या थापा नकोत. सोनियांना बारगर्ल म्हणून हिणवणारे असंख्य लोक पाहण्यात आहेत).

उपप्रश्न - डिस्लेक्सिया सारख्या गंभीर गोष्टींवरून आपल्या विरोधकाला टारगेट करणं (नाव कुठे घेतलं ही पळवाट नको) तेही विद्यार्थ्यांसमोर, हे पंतप्रधानपदावरच्या व्यक्तीला शोभनीय आहे का?
-------------
भाजपायींचा सगळा भर वैयक्तिक चारित्रहननावर राहिलेला आहे. आणि स्व तःच्या नसलेल्या चारित्र्यसंवर्धनावर. मग मी त्या काळी नसलेल्या स्टेशनवर चहा विकला आणि मला बाय कापोरं नाहीत, म्हणून मी भ्रष्टाचार करत नाही, असल्या गोष्टी सांगाव्या लागतत.
----------
ब्राह्मणवाद म्हणजे काय ? स्वतःची व्याख्या लिहा.
---------
न्याय योजनेमुळे भाजपायींच्या पा याखालची जमीन सरकलीय हे स्पष्ट आहे. ते नियमात बसतं की नाही हे निवडाणूक आयोग बघेलच. भाजपच्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केलं म्हणून काँ ग्रेसला ती सवलत मिळेल की काय?

फाळणीचा राग होता आणि अजूनही अखंड भारत हवा असं म्हणणारे आज भारतात असलेल्या मुस्लिमांना बघून घेत नाहीत.
फाळणी झाली नसती, तर मुस्लिमांचं प्रमाण कितीतरी अधिक असतं. इतक्या प्रमाणातल्या मु सलमानांचं हे फाळणी विरोधी लोक काय करणार होते? उद्या तुमच्या स्वप्नातला अखंड भारत झाला, तर ह्या एवढ्या मुसलमानांचं काय करणार आहात?

फाळणी नसती तर आपल्या विरोधकांना , पाकिस्तानात चालते व्हा, असं सांगू शकला नसतात. त्यांचं काय केलं असतंत?

बिपिनचंद्र स्कूल ऑफ लॉजिक
१. बाहुबलीचं यश- अमीर - दंगल - चीन.
२. २००९ च्या निवडणु का - कोणतासा चित्रपट
३. हेमामालिनी - कार कम्फर्ट - अ‍ॅक्सिडंट -७०+
४. सोनिया एल्टीटीई - राहुल - पंतप्रधानहवा
खरं तर हे असले प्रतिसाद एकत्र ठेवायला एक धागा काढायला हवा.

राहुल गांधी देवळात गेले, जानवे घातले तर हिंदूंच्या पोटात का दुखते समजले नाही,

मी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे समजल्यावर मला माझ्या मुस्लिम मित्राने मराठी कुराण व पैगंबरांचे चरित्र पाठवून दिले.

शिका आमच्या लोकांकडून !

{{{ विरोधकांच्या खासगी आयुष्यातल्या असलेल्या आणि नसलेल्या गोष्टींबद्दल वावड्या उडवून त्यांना श त्रू ठरवायचं हा भाजप आणि संघ परिवाराचा जुना खेळ. }}}

बरोबर आहे. सुशीलने कधी बाय्कोला तंदूरमध्ये जाळलीच नसावी. कारण मी ती बातमी पुन्हापुन्हा चिटकवतो (खरंतर तीनच वेळा चिटकवली. भरत यांनी पचास करोड की गर्ल्फ्रेंड आणी काँग्रेसकी विधवा चा दहापेक्षा जास्त वेळा उल्लेख केलाय) असा आरोप करणारे भरत. सुशील विषयी काहीच बोलायला तयार नाहीत.

बरं सुशील असा एकटाच नाहीये. काँग्रेस्मध्ये अजुनही शशी थरूरसारखे असे कितीतरी आहेत ज्यांनी स्त्रियांवर / त्यांच्या बायकांवर अनेक अन्याय अत्याचार केलेत. गांधी नेहरुही याला अपवाद नाहीत. त्यावेळी मात्र ती त्यांची खासगी बाब म्हणून सोडून द्यायचं का?

{{{ माझा प्रश्न होता, मोदी स्त्रियांविषयी राजकीय व्यासपीठावरून जी भाषा वापरतात }}}

जनरल सर्वच स्त्रियांविषयी की फक्त काँग्रेस संबंधित दोन पाच स्त्रियांविषयी? आणि या अशा स्त्रियांविषयी मोदी काही बोललेच संबंध माय्बोलीच्या स्त्रियांना मोदी शत्रू का वाटावेत? आणि तसे ते वाटले नाहीत तर त्या आयडी स्त्रिया नव्हेतच असा संशय घ्यायला तुम्हाला मोकळीक मिळावी का? मायबोलीवर किती स्त्रिया आहेत ज्या मोदींच्या समर्थनार्थ लिहितात? ५ ? १० ? ५० ?

मायबोलीबाहेर किती महिला आहेत ज्या मोदींना प्रत्यक्षात मत देतात? त्यांच्या समर्थनार्थ बोलतात, लिहितात? त्या सगळ्यांच्याच स्त्री असण्यावर तुम्ही शंका घेणार का? आता ती एक रेणुका चौधरी गडगडाटी हसली म्हणून मोदींनी तिच्या हसण्याने रामायण मालिका आठवली असे सांगितले (लक्षात घ्या - मोदींनी शूर्प्णखा असा शब्दही वापरला नाही) तर काँग्रेस समर्थक लगेच बोंबलायला लागले की मोदींनी समस्त स्त्रीवर्गाचा अपमान केला पण इतर महिलांना ते कसे पटावे? आणि का? तेव्हा निवडक स्त्रियांबद्द्ल मोदींनी काही कॉमेंट केली म्हणजे समस्त स्त्रियांनी / स्त्रीवाद्यांनी (मायबोलीवरच्या आणी बा हेरच्याही) त्यांचा निषेध करायचे काय कारण? हा सामना स्त्री विरुद्ध पुरुष असा नाहीये. तो चांगले विरुद्ध वाईट असा आहे. दोन्ही गटात पुरुष आहेत तसेच स्त्रिया देखील आहेत. एका गटातले दुसर्‍या गटाविरोधात बोलतात तेव्हा ते बोलणे स्त्रीविरोधी किंवा पुरुष विरोधी नसून दुसर्‍या गटाच्या सदस्याविरोधी असते हे सामान्य ज्ञान काँग्रेसींना नसले तरी आम जनतेस आहे.

हिंदुत्ववाद्यांनी आपल्या घरवापसी योजनेचं मॉडेल म्हणून राहुलला निवडायला हवं. मोतीलाल नेहरूंच्याही आधीपासून मुस्लम असलेल्या खानदानाचा वंशज हिंदू झाला म्हणून.

आता गांधीनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात केलेल्या गोष्टींचा संबंध काँग्रेसच्या पॉलिसींशी जोडणं हा त्यातलाच प्रकार. ते मीटू मध्ये बसतं की नाही हे त्या स्त्रियाच सांगू शकतील. त्यांना जज करायचा अधिकार मला नाही.

ओके!गांधींनी जे केलं अल्पवयीन मुलींशी ते ठामपणे चूक म्हणावंसं तुम्हाला वाटत नाही हे समजलं. त्या मुली abuse बद्दल बोलू शकल्या नाहीत म्हणून तर उर्वरित समाजाची जबाबदारी होती त्यांना प्रोटेक्ट करणं. अल्पवयीन/barely legal age मुलामुलींना अनेकदा कळतपण नाही की त्याना abuse केलं जात आहे आणि राष्ट्रपिताविरुद्ध बोलायची हिंमत ती मुलं कुठून आणणार? म्हणून मग abuse झाला की नाही असा स्टँड घेणं हे महान आहे. सर्व पुरावे असताना संघ खोटा प्रचार करतो असा आरोप करायचा पण गुगल केलं की कळतं परदेशातील रेप्युटेड न्यूज साईटवर लेख आहेत. तेपण संघ चालवतो का?

२.राईट विंग लोकांना सोशल मीडियावर मी भरपूर फॉलो करते , मोदी काय बोलले व कसे चुकले हे मला याच लोकांच्या ट्विट, पोस्ट्स वाचून कळलं. तुम्हाला ते खोटं वाटत असेल तर तुमचा प्रश्न आहे.पण मला राईट विंग सोमीचं हेच वागणं आवडतं. काही आडमुठे अपवाद सोडले तर आपल्या पक्षाला घरचा आहेर द्यायला अजिबात प्रॉब्लेम नसतो. अमरिंदर सिंग धनंजय मुंडे सुजात आंबेडकर यांचं वेळोवेळी कौतुकही मी वाचलेलं आहे.

३. राहुलचं जानवं context मध्ये बघितलं पाहिजे, तुमचा पक्ष सनातन व ब्रिगेडयुक्त झाला त्याचाही context असेलच पण सोनियाजींच्या विधवा स्टेट्स बद्दल बोलताना त्यांच्या करुणानिधी व डीएमके नात्याबद्दल विचारलं तर ते 'असंबद्ध' ठरतं. तिथे मात्र context बघायचा नाही.
असोच.

तुम्ही एक सामान्य व्यक्ती आहात. राजीव गांधी सामाजिक क्षेत्रातील मोठे नाव आहे .
त्यांच्या वर टीका होणारच .

काँग्रेस सनातनवादी आणि ब्रिगेडी झालेला दिसला, तर माझं मत त्याला असणार नाही. पीरियड.

bjp सरकार केंद्रात सत्तेवर आल्या पासून एक गोष्ट दखल घेण्यासारखी जाणवली ती म्हणजे जातीय राजकारणाला ऊत आला
असे महाराष्ट्रात कधीच घडले नव्हते .
सर्व जातीचे मोर्चे निघाले .
जातीचा गर्व असलेले you tube वीडियो आणि त्याच अर्थाचे msg social माध्यमात खूप मोठ्या प्रमाणत फिरू लागले
हे द्वेषाचे राजकारण महाराष्ट्रात कोण घडवून आणत आहेत हे मात्र समजत नाही .
फक्त मोहरे प्रकाशात आहेत सूत्रधार अंधारात

{{{ bjp सरकार केंद्रात सत्तेवर आल्या पासून एक गोष्ट दखल घेण्यासारखी जाणवली ती म्हणजे जातीय राजकारणाला ऊत आला
असे महाराष्ट्रात कधीच घडले नव्हते . }}}

ब्राह्मण व्यक्ति मुख्यमंत्रीपदावर असल्याची पोटदुखी निघतेय बाहेर..

<< असे महाराष्ट्रात कधीच घडले नव्हते . }}}

ब्राह्मण व्यक्ति मुख्यमंत्रीपदावर असल्याची पोटदुखी निघतेय बाहेर.. >>
-------- चर्चेला व्यवस्थित दिशा दिली जाते आहे. एकाने चर्चेत जात आणायची.... मग त्याला उत्तर मिळाल्यावर पुढे दुसर्‍याने जाती वरुन बोल्ला असे रडायचे...

काम करा, नसेल जमत तर सत्ता सोडा.

काळा पैसा तर काही बाहेर आणता आलेला नाही, कामात काही विशेष असे दिवे लावले नाही वर सेनेला नियंत्रणात ठेवण्यासाठी पदमविभूष णाचा मास्टरस्ट्रोक पण हाणला... असंगाशी संग केल्यावर ते अंगलट येणारच.... मग अमक्या जातीचा मुख्यमंत्री आहे म्हणुन. अनेकांना त्यांची जातही माहित नसते आणि कुणालाही त्याचे काहीच घेणे देणे नसते.

काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी प्रचारादरम्यान समर्थकांना
बिर्याणी खाऊ घालण्याचा बेत आखला. त्यानुसार बिर्याणीही दिली. पण बिर्याणी खाण्यावरून त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यात अनेक जण जखमी झाले. या प्रकरणी ३४ जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून, आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बिजनौर मतदारसंघातील काकरौली ठाण्याच्या हद्दीतील टडहेडा गावात शनिवारी माजी आमदार मौलाना जमील यांच्या घरी प्रचार सभा आयोजित केली होती. प्रचार सभेनंतर दुपारी जेवण ठेवण्यात आलं होतं. समर्थकांना बिर्याणी देण्यात येणार होती. पण बिर्याणी घेण्यावरून उपस्थित समर्थकांमध्ये हाणामारी झाली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगवलं. विभागीय अधिकारी राम मोहन शर्मा यांनी सांगितलं की, 'आचारसंहितेचं उल्लंघन आणि विविध कलमांखाली ३४ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

अरेरे!
२००४ मध्ये निवडणुकांआधी वाजपेयींच्या मतदारसंघात, लखनौत, भाजपनेते लालजी टंडन यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून साड्यावाटपाचा कार्यक्रम होता. त्यात चेंगराच़ेंंगरी होऊन वीसेक बायका मरण पावल्या ते आठवलं.

कोनी बटर चिकन दिले तर कार्यकर्ते तिकडे.
मग बिर्याणी ल कोण विचारताय

. त्यात चेंगराच़ेंंगरी होऊन वीसेक बायका मरण पावल्या ते आठवलं.
Submitted by भरत. on 7 April, 2019 - 18:24

मग भाजपा उगाचच २००४ ची निवडणूक सत्ताच्युत झाली का? त्या बायकांचे तळतळाट, दुसरं काय?

==गांधी मुस्लिमांचं तथाकथित लांगूलचालन कशासाठी करत होते? त्यांचा नेमका उद्देश काय होता==
आपण हिंदू आणि मुस्लिमांचे नेते आहोत हे बनण्याचा अट्टाहास, अहंकार काहीतरी असावा. मात्र हिंदूंना विविध सामाजिक सुधारणा करण्याकरता प्रोत्साहन देणार्‍या, टीका करणार्‍या गांधीं मुस्लिमांना त्यांच्या कुठल्याही अनिष्ट प्रथेबद्दल कधी काही बोलले नाहीत. त्यांना आधुनिक विचारांचे मुस्लिम नको होते. जुनाट, धार्मिक, कडव्या विचारांचे मुस्लिम अधिक प्रिय होते. खिलाफत चळवळीचे आयोजन करण्याचे खरे तर काहीही कारण नव्हते. खिलाफत हा प्रकार मुस्लिमांना मध्ययुगात ठेवणारा आहे. लोकशाही, स्त्रीपुरुष समानता ह्या आधुनिक मूल्यांना सुरुंग लावणारा होता आणि आहे. पण तरी तो प्रकार गांधींनी आपलासा केला.

==फाळणीपूर्व भारतातले मुस्लिम (जे मुस्लिम लीग आणि जिनांच्या मागे गेले ते) गांधींना आपला नेता का मानत नव्हते? स्पेसिफिकली - हिंदूंचा नेता का मानत होते?

गांधींनी कितीही आव आणला तरी ते होते हिंदूच. कडवे धार्मिक मुसलमान त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याखेरीज त्यांना आपले म्हणू शकले नसते. (ईश्वर अल्ला तेरो नाम वा राम रहीम कृष्ण करीम वगैरे मंत्र धार्मिक मुस्लिमांना कधीही पटणार नाहीत) जिना हा माणूस आधुनिक विचारांचा होता. महत्त्वाकांक्षी होता. गांधी भारतातील मुस्लिमांचा नेता बनू पहातात हे त्याला आवडले नाही. मग त्यानेही मुस्लिम धार्मिक विचार आपलेसे केले. कसाही असला तरी शेवटी मुस्लिम आहे म्हणून आणि बाकी इंग्रजीवर उत्तम प्रभुत्त्व, उत्तम वक्ता, अभ्यासू हे सगळे असल्यामुळे कडव्या मुस्लिमांनी जिनाला आपला नेता मानले. मुस्लिम धर्मात सुधारणा केल्या नाहीत तर हिंदू मुस्लिम ऐक्य शक्य नाही हे गांधीना कधीही कळले नाही. (किंवा त्यांनी हे सत्य स्वीकारणे जाणून बुजून नाकारले).
इस्लाममधे गझवा-अल-हिंद अशी संकल्पना उल्लेखलेली आहे. भविष्यात कधीतरी जगभरातले समस्त मुस्लिम एकत्र येऊन सगळ्या जगावर इस्लामचे राज्य स्थापन करणार आहेत. ह्या क्रांतीचा एक मोठा भाग म्हणजे एक शूर मुस्लिमांचा गट भारतावर चाल करुन् त्याला पादाक्रांत करेल. पाकिस्तान निर्माण व्हावा ह्या विचारांच्या मुस्लिमांची गझवा-अल-हिंद ही एक प्रेरणा होती. जेव्हा हे घडेल तेव्हा मुस्लिम संघटित असले पाहिजेत जेणेकरून ह्या पवित्र कार्यात भारतीय उपखंडातील मुस्लिम उत्तम कामगिरी बजावू शकतील.

Submitted by shendenaxatra on 7 April, 2019 - 19:23

शब्दाशब्दाशी सहमत. अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद आणि उत्तम विवेचन.

गांधी यांना दोन्ही समाजा बद्दल सारखीच आत्मियता होती, प्रेम होते. आई वडिलांना दोन्ही अपत्यांबद्दल सारखेच प्रेम असते अगदी तसेच.

खिलाफत च्या निमीत्ताने हिंदू -मुस्लिम एकत्र आले. खिलाफत १९२३ मधेच मरण पावली. गांधी यांनी एकाच धर्माचे तुष्टीकरण केले हा फार मोठा अप-प्रचार आहे.

हत्येचा पहिला प्रयत्न १९३४ ला म्हणजे खिलाफत संपल्यावर दहा वर्षांनी... खिलाफत हा तुष्टीकरणाचा भाग होता तर १९२३ मधे मेलेल्या खिलाफतचा राग १९३४ मधे पहिल्या प्रयत्नाच्या रुपाने बाहेर आला हे पटत नाही. १९३४ नंतरही मारण्याचे अनेक प्रयत्न झाले होते आणि शेवटी जानेवारी १९४८ मधे निर्घुणपणे मारण्यात आले.

गांधी यांना जिवाने मारण्याचे कोणतेही ठोस / सबळ कारण नव्हते. त्यांच्या विचारांचा सामना करता आला नाही, येत नाही आणि त्यांना मनापासुन आपलेसे पण करता येत नाही हिच मोठी अडचण आहे. हत्या करण्याची सर्व नंतर कारणे हत्या केल्यानंतर सुचलेली आहेत.

त्याच ठिकाणी काही छान वाचनीय पुस्तके सहज उपलब्द आहेत. वाचकांनी लाभ घ्यावा.
सुर्यासमोर काजवा हे मराठी त केलेले भाषांतर आहे.
https://www.mkgandhi.org/ebks/marathi/suryasamor-kajwa.pdf

न्यायमधली हवा काढून घेणारं मोदींचं आश्वासन - टेलिफोन कॉल फुकट होतील आणि इंटरनेट स्वस्त होईल
(जियो मेरे लाल. मत पूछो बीएसेनेल का हाल)

Pages