गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.
गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?
तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.
गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.
सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.
राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अॅपरंटली, इट अॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.
आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.
दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.
भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?
सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?
अगदी बरोबर..!
अगदी बरोबर..!
{{{ पचास करोड की गर्लफ्रेंड,
{{{ पचास करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा, बलात्काराच्या धमक्या, बाजारबसवी यासारखे शब्द वापरणार्यांची मांदियाळी म्हणजे भाजप. संघाचे स्त्रियांबद्दलचे विचार उघडच आहेत.
तर अशा पक्षाला हे स्त्रीवादी स्त्रीआयडी पाठिंबा का देतात?}}}
मग काय तंदूर संस्कृतीच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा का?
https://khabar.ndtv.com/news/india/release-1995-tandoor-killer-sushil-sh...
चला , यांना ही बातमी पुन्हा
चला , यांना ही बातमी पुन्हा चिकटवायला मिळाली. परत परत अगदी आवडीने वाचत असावेत.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/avinash.pawar.90038882/posts/10214629671316258
भाजपच्या प्रचार रॅलीला भारतीय जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद....
परत परत पचास करोड की
परत परत पचास करोड की गर्ल्फ्रेंड आणि काँग्रेस की विधवा लिहिण्यापेक्क्षा बरंय ना...
शिवाय ते काँग्रेस की विधवा चा पूर्ण इतिहास लिहावा. अर्धवट कशाला लिहिता? सोनियाजींनी स्वतःच आधी स्वतः चे राजकारणातले योगदान (?) सांगताना आपल्या सासुबाई व पती यांनी देशाकरिता बलिदा न दिले आप्ण विधवा झालो असा गळा काढला होता. तोच संदर्भ घेत भाजप नेत्यांनी काँग्रेस विधवेच्या नावाने मत मागत आहेत असा उल्लेख केला होता. मग भरतलॉजिक नुसार तरीही भाजपवालेच दोषी का?
मग काय तंदूर संस्कृतीच्या
मग काय तंदूर संस्कृतीच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा का?
https://khabar.ndtv.com/news/india/release-1995-tandoor-killer-sushil-sh...
Submitted by बिपीन चन्द्र हर... on 5 April, 2019 - 18:33
चला , यांना ही बातमी पुन्हा चिकटवायला मिळाली. परत परत अगदी आवडीने वाचत असावेत.
Submitted by भरत. on 5 April, 2019 - 18:59
एखाद्या महिलेला तंदूर भट्टीत जाळले अशी बातमी आवडीने वाचण्याची आणि अशा प्रकारे बायका जाळण्याची सडकी मानसिकता केवळ काँग्रेसवाल्यांचीच आहे. मी ही बातमी अतीव दु:खाने आणि संतापाने वाचतो. असल्या विकृत पक्षाला कधीच मत द्यायचे नाही हे कायम लक्षात राहावे म्हणून...
चीकटवायला किंवा चोरायला काही
चीकटवायला किंवा चोरायला काही मिळावं म्हणून जगत असतात बहुतेकजण हल्ली
Telling lies again? No wonder
Telling lies again? No wonder. Like leader, like follower.
भाजपच्या एका अत्यंत गु णवान
भाजपच्या एका अत्यंत गु णवान नेत्याचं व क्तव्य - आम्ही पुन्हा सत्ते वर आलो तर गृ हकर्जाचा ई एम आय, घरभाड्याच्याही खाली आणू.
म्हणजे व्याजदर कमी करणार.
आमच्या भागात वन बीएचके चा भाव ७५ लाख चाललाय, तर घरभा डं २०,०००.
वर्षाला २.४ लाख.
७५ लाखावर ३.२ %.
व्याज दर इतके कमी करणार की घरांच्या किंमती कमी होणार? (नोटाबंदीनंतरही घरां च्या किंमती कमी झालेल्या नाहीत)
दुसरे गुणवत्ता धारक हंगामी अर्थमंत्री रिझर्व बँकेला आत्मपरीक्षण करायला सांगताहेत की अधिक व्याजदरा मुळे आपण दोन आकडी वृद्धीदर गाठू शकलो नाही.
कोणीतरी त्यांना नोटाबंदीमुळे घटलेल्या वृद्धीदराची आठवण करून देईल का?
काँग्रेसच्या propaganda ला
काँग्रेसच्या propaganda ला अनुसरूनच हे स्टेटमेन्ट आहे>>+१
ब्राह्मण सैन्यात नाहीत असे कुजकट बोलणार्यांनी इतिहास वाचावा. जनरल वैद्यांसारखे कित्येक सापडतील. पण ब्राहण द्वेषाची पट्टी डोळ्यावर असल्यावर ते कधीच दिसणार नाही. आणी असे अगणित राजू शेट्टी इथे मायबोलीवर पण दिसतायच म्हणा. Proud>>>+१११ अगदी सौ टका खरी बात बोली बेन!
व्याज दर इतके कमी करणार की
व्याज दर इतके कमी करणार की घरांच्या किंमती कमी होणार? (नोटाबंदीनंतरही घरां च्या किंमती कमी झालेल्या नाहीत)
व्याज दर कमी झाले की घराच्या किमती कमी होत नाहीत वाढतात .
कमी व्याज दराचा फ़ायदा सामान्य लोकाना कमी च होतो .
पर्सनल कर्ज बँका सामान्य लोकाना देतच नाहीत .
चापलुसी विषय भरकटत आहेत परत ,
चापलुसी विषय भरकटत आहेत परत , काँग्रेस ने भाजप मधून घालवलेले गुणवंत ला कसे सांभाळते ते बघणे इंटरेस्टिंग आहे , ह्या वेळेस सिद्धू पाजी , शत्रूगन सिन्हा आणि कीर्ती आजाद ह्यांना तिकीट मिळत नाही असा दिसतंय , दुसरी कडे राहुल खान ह्ह्यांनी वायनाड मध्ये इंडिअन मुस्लिम लीग बरोबर समजोता केला आहे हे ऐकून बरे वाटले नाही तर CPM वाले काय येऊन देत नाही तिथे पण , हि तीच मुस्लिम लीग ज्यांनी भारता चे दोन तुकडे केले , थँक you नेहरूजी ..
बैलगाडी पार्टी ला अजून एक
बैलगाडी पार्टी ला अजून एक धसका, गुणवंतची परत धावाधाव.
http://www.indiapost.com/michel-identified-ap-as-ahmed-patel-ed-chargesh...
मुस्लिम लीग म्हणजे तीच ना ,
मुस्लिम लीग म्हणजे तीच ना , जीच्याबरोबर हिंदू सभेने स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसच्या विरोधासाठी युती केली होती, अन नेमके तेच भाग फाळणीत दूर गेले ?
आणि थांक्यु मात्र नेहरूंना ?
मग काय तंदूर संस्कृतीच्या
मग काय तंदूर संस्कृतीच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा का?
नाय नाय ,सभागृहात अश्लील चित्रफिती बघनाऱ्यांना द्यायचा, हीच खरी संस्कृती.
तेव्हा भारताचे तुकडे झाले
तेव्हा भारताचे तुकडे झाले नसते तर इथे टनाटना उडणार्यांचे मात्र नक्कीच झाले असते. नेहरुजीचे आभार मानायचे का?
सडक्या डोक्याची ही पिलावळ
सडक्या डोक्याची ही पिलावळ गेल्या शंभर वर्षांपासून या देशात मुस्लिम वाढतील मग ते तुमच्यावर राज्य करतील असा बागुलबुवा दाखवत वाढत गेली आणि स्वतःच कधी आमच्यावर राज्य करु लागली आणि आमच्यावरच फुत्कारु लागली कळलेही नाही.
<<सडक्या डोक्याची ही पिलावळ
<<सडक्या डोक्याची ही पिलावळ गेल्या शंभर वर्षांपासून या देशात मुस्लिम वाढतील मग ते तुमच्यावर राज्य करतील असा बागुलबुवा दाखवत वाढत गेली>> हा घ्या मग आरसा
http://www.lokmat.com/national/india-will-be-largest-muslim-population-2...
मुस्लिम लीग म्हणजे तीच ना ,
मुस्लिम लीग म्हणजे तीच ना , जीच्याबरोबर हिंदू सभेने स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसच्या विरोधासाठी युती केली होती, अन नेमके तेच भाग फाळणीत दूर गेले ?आणि थांक्यु मात्र नेहरूंना ?
किती उपकार आहे त्यांचे , तुम्ही जे काय बोलत आहेत ते त्यांनी दीलेल्या माहिती मुळेच ..हिंदू सभा जी स्वातंत्र्य पूर्वी मुस्लिम लीग बरोबर युती केली होती कशासाठी तर काँग्रेस ला विरोध करण्यासाठी ..हा हा ..आणि काँग्रेस च्या विरोध होता तरीही फाळणी झाली ...भारी वाटत नाही का .ऐकायला .
The Lucknow Pact was an
The Lucknow Pact was an agreement that reached between the Indian National Congress and the Muslim League at the joint session of both the parties held in Lucknow in December 1916. Through the pact, the two parties agreed to allow over representation to religious minorities in the provincial legislatures. Mohammad Ali Jinnah and Mahatma Gandhi also participated in this event
सगळं तर ठरल होत मग माशी कुठे शिंकली.. म्हणूनच थँक यु नेहरूजी
शिवाय ते काँग्रेस की विधवा चा
शिवाय ते काँग्रेस की विधवा चा पूर्ण इतिहास लिहावा. अर्धवट कशाला लिहिता? सोनियाजींनी स्वतःच आधी स्वतः चे राजकारणातले योगदान (?) सांगताना आपल्या सासुबाई व पती यांनी देशाकरिता बलिदा न दिले आप्ण विधवा झालो असा गळा काढला होता. तोच संदर्भ घेत भाजप नेत्यांनी काँग्रेस विधवेच्या नावाने मत मागत आहेत असा उल्लेख केला होता.]]
ते पतीच्या बलिदानाचा मतांसाठी उल्लेख करणं ही एकवेळ परवडलं हो पण सोनियाजींनी पतीच्या हत्येच्या मास्टरमाईंड प्रभाकरनला आपला मित्र म्हणवणाऱ्या करुणानिधींना पित्याच्या जागी मानलं होतं. पतीच्या मारेकऱ्यांच्या मित्राशी, समर्थकांशी हातमिळवणी करणारी महिला यांची आदर्श पण वाईट कोण तर मोदी? अगदी यंदाही काँग्रेस आघाडी (डीएमके) च्या जाहीरनाम्यात राजीवच्या मारेकऱ्यांना सोडून देऊ असं वचन आहे.
अर्थात मोदींनी तो उल्लेख करणं चूकच होतं , त्यांना नीट articulate करता आलं नाही. तो उल्लेख आलेला तेव्हा मोठ्या प्रमाणात भाजप समर्थक व भक्तांनी आपला निषेध नोंदवला होता. समोर पीएम आहे मग करा जस्टिफाय किंवा बसा गप्प असा प्रकार नव्हता. This was something he said during rally. तरी इतका विरोध भक्तांकडून झाला.
बाकी DJ च्या धाग्यावर गांधी आणि #metoo बद्दल लिहिलं आहे. ज्यांचे आदर्श गांधी आहेत त्यांना स्त्रीवाद कसा समजवायचा हा प्रश्नच आहे.
<दुसरी कडे राहुल खान
<दुसरी कडे राहुल खान ह्ह्यांनी वायनाड मध्ये इंडिअन मुस्लिम लीग बरोबर समजोता केला आहे हे ऐकून बरे वाटले नाही>
हे वाचा. बरेच बरे वाटेल.
नागपूर मनपात सत्ता टिकवण्यासाठी भाजपने मुस्लिम लीगच्या दोन नगरसेवकांना आपल्या आघाडीत घेतले.
allow over representation
allow over representation
म्हणजे प्रतिनिधित्व देणे, फाळणी करणे नव्हे,
एक करार 1938 साली झाला , द्विराष्ट्र साठी, त्याला सावरकरजी व जिनाजी होते ना ?
{{{ सोनियाजींनी पतीच्या
{{{ सोनियाजींनी पतीच्या हत्येच्या मास्टरमाईंड प्रभाकरनला आपला मित्र म्हणवणाऱ्या करुणानिधींना पित्याच्या जागी मानलं होतं. पतीच्या मारेकऱ्यांच्या मित्राशी, समर्थकांशी हातमिळवणी करणारी महिला यांची आदर्श पण वाईट कोण तर मोदी? अगदी यंदाही काँग्रेस आघाडी (डीएमके) च्या जाहीरनाम्यात राजीवच्या मारेकऱ्यांना सोडून देऊ असं वचन आहे. }}}
तो कृतज्ञतेचा भाग आहे सोनियाजींचा एलत्टीईच्या प्रति. तुम्हाला जर तीस पस्तीस वर्षांपूर्वीचे राजीव गांधींचे दौरे आठवत असतील तर प्रत्येक वेळी विमानातून उतरतानाचा हात उंचावत येणारे राजीव आणि सनग्लासेस घातलेल्या सोनिया यांचा फोटो पेपरमध्ये किंवा दूरदर्शनवरील व्हिडीओ लगेच डोळ्यांसमोर येईल. प्रत्येक दौर्यात राजीव यांच्यासोबत असणार्या सोनिया श्रीपेरुंबुदुर च्या दौर्यात का नव्हत्या? कारण त्यांना एल्टीटीईने कळवले होते की आमचे वैर तुमच्याशी नसून तुमच्या पतीसोबत आहे. सबब प्राण वाचवायचे असतील तर या दौर्यात येऊ नका. तसेच पतीच्या मृत्यूनंतर स्वतः किंवा तुमच्या घरातील कुणीही पंतप्रधान पद स्वीकारु नका अन्यथा त्यांचेही प्राण घ्यावे लागतील. याच कारणास्तव त्यांनी पंतप्रधान पद स्वीकारले नाही.
आता एल टी टी ई संपल्याची पूर्णतः खात्री झालीय म्हणूनच राहूल पंतप्रधान बनायची स्वप्ने पाहत आहेत. तरीही सोनियाजी राजीवच्या मारेकर्यांना सोडतील कारण हे त्यांचा जीव वाचवल्याबद्दल दिलेले बक्षीस आहे.
प्रत्येक दौर्यात राजीव
प्रत्येक दौर्यात राजीव यांच्यासोबत असणार्या सोनिया श्रीपेरुंबुदुर च्या दौर्यात का नव्हत्या?
मग ह्याने काय सिद्ध होते ?
तसे तर तुमचे मोडीजीही पत्नीला घेऊन जात नाहीत.
महात्मा गांधी , इंदिरा , राजीव , इतक्या हत्या पाहिलेले काँग्रेसवाले व नेहरू गांधी , धमकीला घाबरून घरात बसले , हे मात्र अगदीच हास्यस्पद विधान आहे.
निवडणुका जवळ आल्या , वो लोग मुझे मारेंगे , मेरी जान को खतरा है, अजून लाडक्या मोडीजींचा हा अध्याय सुरू नाही झाला ?
प्रत्येक दौर्यात राजीव
प्रत्येक दौर्यात राजीव यांच्यासोबत असणार्या सोनिया श्रीपेरुंबुदुर च्या दौर्यात का नव्हत्या? कारण त्यांना एल्टीटीईने कळवले होते की आमचे वैर तुमच्याशी नसून तुमच्या पतीसोबत आहे.
कसे पत्राने की इ मेलने कळवले होते ?
राजीव जी च्या अगोदर
राजीव जी च्या अगोदर कोणत्याच भारतीय पंतप्रधान ltt ला दुश्मन वाटला नाही , राजीव जी च का दुश्मन वाटू लागले .
इथे पाकिस्तान ला कश्मीर मध्ये हस्तक्षेप करतो म्हणून आदळआपट करायचा आणि दुसऱ्या बाजूला ltt ला सपोर्ट करायच ही भूमिका राजीव जी ना मान्य नव्हती आणि ती भूमिका
नैतिक बाजुने योग्य असली तरी राजकीय विचार करता साफ चुकीची होती .
तेव्हा ज्येष्ट कॉंग्रेस नेत्यांनी त्याना यीग्य सल्ला द्यायला पहिजे होता असे मनापासून वाटत
नवी दिल्ली :
नवी दिल्ली :
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात काँग्रेसला ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात गुरफटण्याचा भाजपने जोरदार प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प्रचारसभांमध्ये ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यावरून काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य केले. मात्र, या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या चौकशीदरम्यान आपण कोणाचेही नाव घेतले नसल्याचे सध्या अटकेत असलेला आरोपी ख्रिस्तियान मिशेल याने दिल्लीच्या विशेष न्यायालयात सांगून भाजपच्या आरोपातील हवा काढली.
ईडीने गुरुवारी विशेष न्यायालयात मिशेलविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. चौकशीत मिशेलने काँग्रेस आघाडीचे काही नेते, संरक्षण मंत्रालयातील काही अधिकारी-कर्मचारी तसेच काही पत्रकार अशा लाभार्थींची नावे घेतल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे. मात्र मिशेलने चौकशीत कोणाचेही नाव घेतले नसल्याचा दावा करणारा अर्ज त्याच्या वकिलांनी शुक्रवारी विशेष न्यायालयात सादर केला. त्यावर विशेष न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी ईडीला नोटीस पाठवली असून मिशेलच्या अर्जावर आज, शनिवारी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.
'हा भाजपचा राजकीय स्टंट'
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभवाची भीती वाटत असून, ज्वलंत मुद्यांवरून लक्ष उडविण्यासाठी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाचा वापर करण्याचा राजकीय स्टंट भाजपने चालविला असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख रणदीपसिंह सुरजेवाला यांनी शुक्रवारी केला. तर, 'पंतप्रधान मोदी हीन पातळीचे राजकारण करीत असून चोरांना सारे चोरच दिसतात,' अशी टीका अहमद पटेल यांनी केली आहे.
<< कोंग्रेस आघाडीच्या राजू
<< कोंग्रेस आघाडीच्या राजू शेट्टी यांनी ब्राम्हण लोक सैन्यात जात नाहीत अशा अर्थाचं विधान केलं आहे. वास्तविक, अनेक ब्राम्हण सैन्यात आहेत आणि पुरुषच नव्हे तर स्त्रियाही आहेत. जैन समाजातील राजू शेट्टी यांनी आधी आपल्या समाजाच्या योगदानाची माहिती द्यावी. पण अर्थात, काँग्रेसच्या propaganda ला अनुसरूनच हे स्टेटमेन्ट आहे. काँग्रेस समर्थक ब्राम्हण लोकांचं आश्चर्य वाटतं की इतके अपमान सहन करतात, संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांसमोर मन झुकवतात. कठीण आहे. >>
------- ग्रॅहॅम स्टेन्स, सोबत १० आणि ६ वर्षांच्या मुलांना जिवंत जाळणे; उ. प्र. तर कायद्याचे रक्षण करणार्या पोलीस अधिकार्यांना मारणे, गोरक्षा च्या आवरणाखाली एका विशिष्ट समुहाला टारगेट करणे.... अशा अनेक कटकारस्थानात गुंतलेल्या बजरंग दला सोबत भाजपाचे लोक नाही का नतमस्तक होत अगदी तसेच असेल.
<< राजीव जी च्या अगोदर
<< राजीव जी च्या अगोदर कोणत्याच भारतीय पंतप्रधान ltt ला दुश्मन वाटला नाही , राजीव जी च का दुश्मन वाटू लागले .
इथे पाकिस्तान ला कश्मीर मध्ये हस्तक्षेप करतो म्हणून आदळआपट करायचा आणि दुसऱ्या बाजूला ltt ला सपोर्ट करायच ही भूमिका राजीव जी ना मान्य नव्हती आणि ती भूमिका
नैतिक बाजुने योग्य असली तरी राजकीय विचार करता साफ चुकीची होती .
तेव्हा ज्येष्ट कॉंग्रेस नेत्यांनी त्याना यीग्य सल्ला द्यायला पहिजे होता असे मनापासून वाटत >>
-------- त्यावेळेच्या श्रीलंकेतली परिस्थिती ची माहिती करुन घ्या. त्यांनी योग्य निर्णय घेतला होता. भारताने शातंता सेनेस नकार दिला असता तर अमेरिका / चीन तयारच होते. जयवर्धने हुशार होते... भारताने तसे लंकेने मोठी किंमत मोजली.
Pages