भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

If you are getting any commodity free,

you are a commodity!

हे मात्र सत्य आहे मुस्लीम समाजाने स्वतंत्र पूर्व काळात हिंदू विरोधी हिंसक आंदोलन खूप वेळा केली होती .
राखीव मतदार संघ मागणे .सत्तेत हिस्सा मागणे असले प्रकार खूप केले .
हिंदू ना फक्त ब्रिटिश जावे हीच इच्या होती तर मुसलमान राखीव जागेत मग्न होते
त्या मुळे ज्या व्यक्ती मुळे पाकिस्तान निर्माण झाला त्या व्यक्तीला हिंदू चा सलाम .
मग ते जिना असू द्यात नाही तर गांधी

सत्तेत हिस्सा मागितला तर बिघडले कुठे ?

मोदीच्या सरकारने एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता ना ?

जर हे भाजपाने काल मुस्लिमाबाबत केले तर उद्या हिंदूंच्याच एखाद्या जातीबद्दलही होऊ शकेल . मग तेंव्हा डोळे उघडणार का ?

नवीन एच आय व्ही कायद्यानुसार , HIV रुग्णाअना सर्वत्र प्रतिनिधीत्व द्यायचे आहे, सेंटरमध्ये दोन विशिष्ट नोकर्या फक्त एच आय व्ही बाधित व्यक्तीलाच द्याव्या लागतात.

त्या मंदबुद्धी रा'फूल' गांधीने वर्षाला ७२००० रु. देण्याचे आश्वासन काय दिले.
इथले कॉंग्रेसी चमचे २४x७ मायबोलीवर पडीक राहायला लागलेत. Proud

सत्तेत हिस्सा मागितला तर बिघडले कुठे ?
ज्या वेळी मागितला त्या वेळी स्वतंत्र महत्वाच होते .आणि त्या वेळी हे भारतीय लोकांचीच कत्तल करत होते .

जर हे भाजपाने काल मुस्लिमाबाबत केले तर उद्या हिंदूंच्याच एखाद्या जातीबद्दलही होऊ शकेल . मग तेंव्हा डोळे उघडणार का
?
म्हणून महाराष्ट्र मध्ये जातीय राजकारणाला ऊत आलाय .महाराष्ट्रियन म्हणून एकसंघ समाज असणे राज्या च्या भवितव्य साठी गरजेच असताना स्वतंत्र पूर्व वेळी मुस्लीम samajani घेतलेली भूमिका जातीचे राजकारण करणारे घेत आहेत
आणि ह्या राज्याचे नुकसान करून राज्य द्रोह करत आहेत

<< जर हे भाजपाने काल मुस्लिमाबाबत केले तर उद्या हिंदूंच्याच एखाद्या जातीबद्दलही होऊ शकेल . मग तेंव्हा डोळे उघडणार का
?
म्हणून महाराष्ट्र मध्ये जातीय राजकारणाला ऊत आलाय .महाराष्ट्रियन म्हणून एकसंघ समाज असणे राज्या च्या भवितव्य साठी गरजेच असताना स्वतंत्र पूर्व वेळी मुस्लीम samajani घेतलेली भूमिका जातीचे राजकारण करणारे घेत आहेत
आणि ह्या राज्याचे नुकसान करून राज्य द्रोह करत आहेत >>

------- सहमत... मग असेच देशपातळीवर असायला हवे.
महाराष्ट्र = भारत
राज्य = देश
जात = धर्म

सहमत
आणि शाल जोडी मधून तुम्ही जो टोमणा मारला आहे तो सुध्दा समजला .
आजच मायावती ह्यानी मुस्लिम धर्माच्या लोकाना उघड आव्हान केले की त्यानी कॉंग्रेस ला मत न देता त्यान्चा पक्षाला द्यावे
असे उघड आव्हान करून देशाच्या नागरिका मध्ये कोण भेद निर्माण करतय .
तुम्हीच सांगा

<< सहमत
आणि शाल जोडी मधून तुम्ही जो टोमणा मारला आहे तो सुध्दा समजला .
आजच मायावती ह्यानी मुस्लिम धर्माच्या लोकाना उघड आव्हान केले की त्यानी कॉंग्रेस ला मत न देता त्यान्चा पक्षाला द्यावे
असे उघड आव्हान करून देशाच्या नागरिका मध्ये कोण भेद निर्माण करतय .
तुम्हीच सांगा>>
-------- माझे मत मी अनेक वेळा मांडलेले आहेच. असे करणे योग्य नाही. जात-धर्म या वरुन समाजा मधे द्वेष पसरवणार्‍या, फूट पाडणार्‍या आणि भेद निर्माण करणार्‍यांना थारा देऊ नका.

तीन तलाकचे कारण सांगून भाजपाने मुस्लिमांचे मत मागितले होते,

आणि आयोध्येवरून हिंदूंचे मत मागणे , हे काय होते ?

( आणि आता 3 तलाक अन राम मंदिर दोन्ही मुद्दे गायब आहेत. )

महाराष्ट्रियन म्हणून एकसंघ समाज असणे राज्या च्या भवितव्य साठी गरजेच असताना स्वतंत्र पूर्व वेळी मुस्लीम samajani घेतलेली भूमिका जातीचे राजकारण करणारे घेत आहेत.

------

आता तर देश स्वतंत्रच आहे, कोणताही समाज कधीही मागणी करू शकतो.

की निवडणुकीच्या तोंडावर बुच बसले , म्हणून आता नको होते का ?

तीन तलाक हे स्त्री हक्कही संबंधित धर्माचा संबंध नाही .
अयोध्या हे पुराणिक गोष्टीशी संबंधित शास्त्रीय विश्लेषण करून योग्य निर्णय अपेक्षित

Proud

मग कधी मागायचे , ते मुहूर्त भाजपाला विचारायचे का ?

( वस्तुतः उच्च लोकांना आरक्षण हे मला मान्य नाही. )

==गांधी यांना दोन्ही समाजा बद्दल सारखीच आत्मियता होती, प्रेम होते. आई वडिलांना दोन्ही अपत्यांबद्दल सारखेच प्रेम असते अगदी तसेच.
अत्यंत गोड गैरसमज. गांधींना दोन्ही समाजाने आपला नेता मानावे अशी आकांक्षा नक्की होती.

==खिलाफत च्या निमीत्ताने हिंदू -मुस्लिम एकत्र आले. खिलाफत १९२३ मधेच मरण पावली. गांधी यांनी एकाच धर्माचे तुष्टीकरण केले हा फार
== मोठा अप-प्रचार आहे.
तुर्कस्तानमध्ये केमाल अतातुर्क ह्याने जुनाट मुस्लिम राजवट उलथवून तिथे आधुनिक, लोकशाहीवर आधारित , स्त्रीपुरुषांना समान अधिकार देणारी राजवट आणली. त्याला भारतात बसून काही "विद्वान" मुस्लिम लोकांनी विरोध करायचे ठरवले. त्या आंदोलनाचे नाव खिलाफत. अशा पुरोगामी सामाजिक क्रान्तिला विरोध करणे हे पूर्णतः: असमर्थनीय आहे. अफगाणिस्तानात रशियाचा सामना करायला अतिरेकी जिहादी लोकांना हाताशी घेतले गेले पण खिलाफत हा त्याहूनही वाईट प्रकार होता. ह्याची तुलना जर कुणी अस्पृश्यता परत आणावी म्हणून काही डोकेफिरू हिंदू लोक आंदोलन करत असतील आणि कुणी मुस्लिम नेता हिंदू मुस्लिम ऐक्य व्हावे म्हणून अशा चळवळीत पुढाकार घेत असेल त्याच्याशी होऊ शकेल.

== हत्येचा पहिला प्रयत्न १९३४ ला म्हणजे खिलाफत संपल्यावर दहा वर्षांनी... खिलाफत हा तुष्टीकरणाचा भाग होता तर १९२३ मधे मेलेल्या खिलाफतचा राग १९३४ मधे पहिल्या प्रयत्नाच्या रुपाने बाहेर आला हे पटत नाही. १९३४ नंतरही मारण्याचे अनेक प्रयत्न झाले होते आणि शेवटी जानेवारी १९४८ मधे निर्घुणपणे मारण्यात आले
===
खिलाफत चळवळीचा राग हा केवळ खिलाफत चळवळ चालू असतानाच व्यक्त व्हावा हा आपला आग्रह अनाठायी आहे. पुरेसा असंतोष खदखदत असेल तर यथावकाश त्याचा उद्रेक होतो. अमुक एका वेळीच तो झाला पाहिजे असा अट्टाहास बिनबुडाचा आहे.
उदा. अमेरिकेने कुवेतमधे सैन्य नेले ते १९८९ मध्ये. त्याविरुद्ध जिहादींमध्ये प्रचंड असंतोष होता. पण तो व्यक्त व्हायला १९९५, १९९८, २००१ अशी वर्षे उजाडली. ह्या वर्षी अमेरिकेविरुद्ध या अल कायदा संघटनेने विध्वंसक कृत्ये घडवली. एखादी घटना आणि त्यावरील प्रतिक्रिया ह्यात अनेक वर्षांचा काळ जाऊ शकतो. प्रत्युत्तराची तयारी करणे, लोक सामग्री जमवणे ह्यात वेळ जातो.
मी हिंदू लोकांची जिहादी लोकांशी बरोबरी करत आहे असे वाटू नये म्हणून अजून एक उदाहरण. १९१९ साली जालियनवाला बाग कत्तल झाली. त्या वेळच्या पंजाबी गव्हर्नरला (ओ ड्वायर ) उधम सिंग नामक क्रान्तिकारकाने ठार मारले ते १९४० साली. आता १९१९ साली हत्याकांड झाले मग तेव्हाच का नाही मारले असे प्रश्न जितके निरर्थक आहेत तितकेच आपलेही निरर्थक आहेत.

==गांधी यांना जिवाने मारण्याचे कोणतेही ठोस / सबळ कारण नव्हते. त्यांच्या विचारांचा सामना करता आला नाही, येत नाही आणि त्यांना
== मनापासुन आपलेसे पण करता येत नाही हिच मोठी अडचण आहे. हत्या करण्याची सर्व नंतर कारणे हत्या केल्यानंतर सुचलेली आहेत.
आजिबात नाही. गांधी हे गांधीविचारांचे मोठे प्रतीक होते. त्यांना मारून आपला गांधीविरोध व्यक्त केला गेला. अर्थात गांधी विचार त्यामुळे नष्ट झाला नाही. उलट जास्तच डोक्यावर बसला. त्यामुळे गांधींना मारणे चूकच होते. गांधींच्या मुस्लिम अनुनयामुळे हिंदूंचा एक गट अत्यंत संतप्त होता आणि त्यांची हत्या ह्या संतापामुळे घडली.

आरक्षण हा विषय नाहीच
हळू हळू सरकारी नोकऱ्या कमी होत जाणार .देशाच्या , राज्याच्या आर्थिक धोरण जागतिक आर्थिक व्यवस्थेशी जोडली जातील .
भारतीय व्यक्तीला आर्थिक फायदा हवा असेल तर योग्य रीत्या प्रत्येकाचे आर्थिक हित जपणे गरजेचं आहे .
कोणावर अन्याय न होता

===याततून तुमचा इस्लामद्वेष आणि गांधीद्वेषच दिसून येतोय..
जमल्यास वाचा
https://www.mkgandhi.org/articles/gandhi-on-theory-and-practice-of-islam...
==
मुद्दे संपले की वैयक्तिक टीका हा जगाचा नियमच आहे!
असो. तुम्ही दिलेल्या लेखातील अनेक चुकीचे दावे आहेत. उदा. Islam never sanctioned destroying places of worship of other religions. (Gandhi, 1949, 139) : हे पूर्ण चुकीचे आहे. महंमदाने स्वतः: अन्य धर्माची श्रद्धास्थाने उध्वस्त केली आहेत. मक्केतील कुरेशी लोक मूर्तिपूजक होते. ६३० साली महंमदाने मक्केवर हल्ला करून तिथल्या मूर्ती फोडून नष्ट केल्या.
https://en.wikipedia.org/wiki/Hubal
ह्याला इस्लामद्वेष म्हणत असाल तर आनंद आहे!

माझे काही भोळेभाबडे प्रश्न!

इथे इतकं तावातावाने भांडणाऱ्या दोन्ही पार्टीनां काही आर्थिक लाभ होतो का, त्यांच्या पक्षाकडून?
इथली मते वाचूनच १३० कोटी लोक मतदान करायला जाणार आहेत का?
राजकीय पक्षांच्या बाजूने, इतका भारी युक्तिवाद करणारी इथली मंडळी, कधी सभेत वा टीव्हीवर का दिसली नाही?
आजपर्यंत इथल्या कुठल्याही सदस्याचा मोदी किंवा राहुलनी सत्कार का केला नाही? काही सदस्यांनी तर प्राणपणाने त्यांची बाजू मंडलीये?
आणि एकास एक मेगाबायटी प्रतिसाद चालू असतात, इतका वेळ येतो कुठून? इथे तर ऑफिसच्या कामाने जीव जातो.

>>माझा एक भोळाभाबडा प्रश्न!
प्रतिप्रश्न. एक भोळाभाबडा प्रश्न असे शीर्षक देऊन सहा प्रश्न विचारण्याचे काय बरे प्रयोजन?

बदल केला आहे.
मान्यवरांच्या उत्तरांच्या परीक्षेत!

माझ्या वतीने काही उत्तरे.
>>इथे इतकं तावातावाने भांडणाऱ्या दोन्ही पार्टीनां काही आर्थिक लाभ होतो का, त्यांच्या पक्षाकडून?
काहींना होत असावा. काहींना होत नसावा.

>>इथली मते वाचूनच १३० कोटी लोक मतदान करायला जाणार आहेत का?
नाही. इथली चर्चा मराठीत होत असल्यामुळे समस्त भारतीय ती वाचत नसावेत.

>>राजकीय पक्षांच्या बाजूने, इतका भारी युक्तिवाद करणारी इथली मंडळी, कधी सभेत वा टीव्हीवर का दिसली नाही?
मला दिसली. आपण पुरेसे शोधले नसेल. किंवा इथे वाद करणारी मंडळी खूप कुरुप असतील म्हणून टीव्हीवर जायला उत्सुक नसतील.

>>आजपर्यंत इथल्या कुठल्याही सदस्याचा मोदी किंवा राहुलनी सत्कार का केला नाही? काही सदस्यांनी तर प्राणपणाने त्यांची बाजू मंडलीये?
अजून वेळ गेलेली नाही. भविष्यात योग्य त्या व्यक्तीचा सत्कार होईल. वाट पहा.
>>आणि एकास एक मेगाबायटी प्रतिसाद चालू असतात, इतका वेळ येतो कुठून? इथे तर ऑफिसच्या कामाने जीव जातो.
(आपला ऑफिसच्या कामाने जीव जातो हे ऐकून तीव्र दु:ख झाले. पण जीव जात असेल तर इथे प्रश्न विचारण्याइतके प्राण आणि त्राण कुठून आणलेत? असो)
इथले अनेक लोक निरुद्योगी आहेत. अनेक लोक निवृत्त आहेत. तर काही असे भाग्यवान आहेत ज्यान्चे ऑफिसच्या कामाने जीव जात नाहीत. असे लोक इथे प्रतिसाद देतात.

राजा महाराजांची युद्धे व्हायची तर सामान्य लोकांची घरे मोडतच होती, दोन्ही राजे भिन्न धर्माचे असतील तर देवळेही मोडली जायची.
त्यामुळे मला आम जनतेला दोन्ही सारखेच. तसेही 70 % बहुजनांना देवळात प्रवेश नव्हताच, पहिल्या दोन वर्णाचे पोट , पैसा व मोठेपणा देवळात गुंतलेला होता , त्यामुळे देऊळ पाडल्याचे सोयरसुतक फक्त त्यांनाच असायचे.

आणि त्यांनी पाडले , त्यांनी पाडले , हे जुने झाले , आता राजेशाही येणार नाही. लोकशाहीच रहाणार.

त्यांनी पाडलेल्या जागी , तुमचे राममंदिर उभे कधी रहाणार ? काँग्रेसच्या काळात तर रोज ओरडत होते , वही बनायएंगे, पैसे , विटाही गोळा केल्या होत्या ना ? शहाजहानने दहा वर्षात लाल किल्ला बांधला.

==https://www.mkgandhi.org/articles/gandhi-on-theory-and-practice-of-islam...
ह्या लेखातले पहिलेच वाक्य कमालीचे खोटारडे आणि दिशाभूल करणारे आहे.
"The word Islam means peace but today it invokes images of violence, totalitarianism and irrationality."
लिहिणारा अडाणी असला पाहिजे किंवा जाणून बुजून खोटे बोलत आहे. सुदैवाने आजच्या इंटरनेटच्या युगात असा खोटारडेपणा फार टिकत नाही. इस्लाम ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ submission असा आहे. म्हणजे submission to the will of Allah. देवाच्या इच्छेनुसार वागणे म्हणजे इस्लाम. इस्लाम म्हणजे शांती हा अर्थ चुकीचा आहे. ज्याचे इस्लामविषयीचे मूलभूत ज्ञान इतके कच्चे आहे त्या व्यक्तीला इस्लामबद्दल अधिकारवाणीने बोलता येईल असे मला वाटत नाही. (झाकीर नाईक ह्यांची क्षमा मागून) असे वाटते की २+२=५ असे मानणार्‍या व्यक्तीने गणिवावर प्रबंध लिहिला आहे.

submission to the will of Allah. केले की शांती उर्फ पीस peace

तुम्ही दिलेल्या लेखातील अनेक चुकीचे दावे आहेत. - ते गांधींचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यांनी ते मुस्लिमांसमोरच मांडलंय.
अर्थात तुम्ही इस्लामवर फायनल ऑथोरिटी अस ल्याने गांधी चूक की बरोबर, खोटे की खरे हे तुम्हांलाच अधिक माहीत असेल.

भारतात अल्पसंख्य असलेल्या लोकांना तुमच्याबाबत भेदभाव होणार नाही, असे आश्वासन देणं लांगूलचालन असेल तर असो.
त्या परिच्छेदातलं गांधींच बुरख्याबद्दलचं मत तुमच्या आधीच्या प्रतिपादना ला खोटं पाडणारं असल्याने त्याची दखल घ्यायची गरज नाही.

गांधींनी सुधारकी मुस्लिमांपेक्षा प्रतिगामी/स्थितीवादी मुस्लिमांना जवळ केलं म्हणताना, आपण मौलाना अबुल कलम आझाद यांना सोयिस्करपणे विसरतो.

<जातीनिहाय मतदार संघ धर्म निहाय मतदार संघ हिंदुनी कधीच मागितले नाहीत ते पूर्ण देशाचा विचार करायचे .
जात soduya .>
राजेश१८८, लखनौ करार आणि पुणे करार यांबद्दल माहिती करून घेतली आहे का तुम्ही?

इस्लाम म्हणजे शांती हा अर्थ चुकीचा आहे. >> म्हणजे ते सुषमाताईंनी ओआयसी च्या मीटींगमधे एवढं सांगितलं तो पण जुमलाच होता तर. देशात पण जुमला आणि देशाबाहेर देशाचं प्रतिनिधित्व करताना पण जुमलाच? कुठं नेउन ठेवलाय भारत माझा?

==
- ते गांधींचं इंटरप्रिटेशन आहे आणि त्यांनी ते मुस्लिमांसमोरच मांडलंय.
अर्थात तुम्ही इस्लामवर फायनल ऑथोरिटी अस ल्याने गांधी चूक की बरोबर, खोटे की खरे हे तुम्हांलाच अधिक माहीत असेल.
==
उगाच व्यक्तिगत हल्ले करु नका. मी गांधींचा खोटारडेपणा साधार सिद्ध केला आहे. तुम्हाला तो दिलेला ऐतिहासिक पुरावा मान्य आहे की नाही? उगाच मी इस्लामवर किती ज्ञानी आहे अशी शेरेबाजी कशासाठी? जर तो पुरावा तुम्हाला बरोबर वाटत नसेल तर सकारण सांगा.
Islam never sanctioned destroying places of worship of other religions. (Gandhi, 1949, 139)
हे विधान मी दिलेल्या पुराव्यानंतर कसे खरे मानता येईल ते सांगा. सत्य हे सत्य असते. मुस्लिम लोकांसमोर बोलताना एक सत्य आणि अन्य कुणासमोर बोलताना वेगळे सत्य असे काही नसते.
इस्लामच्या आधारस्तंभांमधे महंमदाचे आयुष्य आणि वागणे हे आदर्श मानले जाते. त्याच्या आयुष्यातील सर्व कृती ह्या शिरोधार्य समजल्या जातात. असे असताना त्याने मक्केमधे कुरेश लोकांच्या त्यावेळच्या धर्माला पूज्य अशा मूर्ती फोडल्या, नष्ट केल्या असे इतिहास सांगतो. ह्याला destroying places of worship of other religions असे का म्हणू नये ते कृपया सांगा.

======
म्हणजे ते सुषमाताईंनी ओआयसी च्या मीटींगमधे एवढं सांगितलं तो पण जुमलाच होता तर. देशात पण जुमला आणि देशाबाहेर देशाचं प्रतिनिधित्व करताना पण जुमलाच? कुठं नेउन ठेवलाय भारत माझा?
==
होय. सुषमा स्वराज बाईंनीही खोटेच सांगितले आहे. मग ते त्यांचे अज्ञान असेल वा जाणून बुजून केलेली लबाडी असेल. त्यांच्या भाषणात इस्लामबद्दल अजूनही काही खोटारडेपणा होता. आणि तो दाखवून दिलाच पाहिजे.

Pages