भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कसे पत्राने की इ मेलने कळवले होते ?>> बिहका गेला होता तोंडी निरोप घेऊन.

हि तीच मुस्लिम लीग ज्यांनी भारता चे दोन तुकडे केले , > ऑ! मग गांधींचा खून का पाडला नथ्या गोडशाने?

फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे असे मानून १९०६ साली ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लीग पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त महंमद अली जीना यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली तरी अमेरिका-कॅनडा प्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांचा या सिद्धान्तास विरोध होता. आपला द्विराष्ट्रसिद्धान्त पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट १९४६ साली कलकत्त्यात "थेट कृतिदिना"चे (Direct Action Day)चे आवाहन केले. यात सुमारे ५००० लोक ठार झाले.

<< द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त महंमद अली जीना यांनी मांडला. >>
------ सावरकरांचा पण पाठिंबा होता ना?

पण महात्मा गांधी यांच्या खुनाचा फतवा फार फार आधी निघाला होता ज्यावेळी देशाची फाळणी झालेली नव्हती, फाळणीची कल्पना पण अस्तित्वात नव्हती आणि ५०० कोटी रुपयांचा प्रश्न निर्माण झालेला नव्हता.

मंदबुद्धी रा'फूल'च्या चमच्यानो,
भाजपामधे गुणवंत नेते आहेत कि नाहित ह्याची काळजी करणे सोडा. तुमचा तो मंदबुद्धी रा'फूल', जाहिर सभेत वाट्टेल ते बरळून 'मुर्ख' कॅटेग्रितील गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रॅकॉर्ड मिळवण्याचा प्रयत्न करत आहे त्याची थोडी मदत करा. Proud

६ डिसेंबर १९४६ रोजी ब्रिटीश सरकारने कोणतेही संविधान संविधानसमितीत अनुपस्थित राहिलेल्‍या घटकांवर सक्तीने लादले जाणार नाही, असे जाहीर केले. मुस्लिम लीगच्या दृष्टीने हे फायदेशीर ठरले. ९ डिसेंबर १९४६ च्या संविधानसमितीच्या बैठकीस मुस्लिम लीगचे सदस्य उपस्थित राहिले नाहीत. पुढे २० फेब्रुवारी १९४७ रोजी ब्रिटीश पंतप्रधान क्लेमंट अ‍ॅटली याने जून १९४८ पूर्वी हिंदुस्थानातील सत्ता सोडण्याचा ब्रिटीश शासनाला संकल्प जाहीर केला. मुस्लिम लीगने त्याला फारसा प्रतिसाद दिला नाही व पुन्हा प्रत्यक्ष कृतीची मोहीम हाती घेतली. परिणामताः पंजाब व वायव्य सरदद्द प्रांतात पुन्हा हिंसाचार उसळला. २४ मार्च १९४७ रोजी लॉर्ड माउंटबॅटन व्हाइसरॉय म्हणून हिंदुस्थानात आले. ३ जून १९४७ रोजी त्यांनी सत्तांतराची योजना-माउंट-बॅटन योजना-जाहीर केली. देशाच्या फाळणीची ही योजना काँग्रेस नेत्यांनी तत्कालीन परिस्थितीतील एकमेव व्यवहार्य योजना म्हणून स्वीकारली. त्यानुसार जुलै १९४७ मध्ये हिंदुस्थान स्वातंत्र्याचे विधेयक ब्रिटीश पार्लमेंटमध्ये संमत करण्यात आले. पुढे हिंदुस्थानची फाळणी होऊन पाकिस्थान व भारत हे दोन स्वतंत्र देश अस्तित्वात आले.

शिट्टल्या, छुपे ट्रान्स्मीटर, जागोजागी पोचणारे हेर, डिप्लॉमॅट्स झूल पांघरुन भेटणारे गनिम ह्याविषयी तुला काहीच ठाऊक नाही का? अभ्यास कर जरा आणि मग कीबोर्ड बडव.

Proud

अज्ञात माणसाने नथुरामाला पिस्तुल दिले,
तसेच अज्ञात व्यक्तीने सोनियांना निरोप दिला,

अजून एका अज्ञात व्यक्तीने हे सर्व भाजपाला सांगितले

हे फक्त माजे मत आहे आणि मी ते इतिहास वाचून तयार केले आहे कोणत्या च राजकीय पक्षाचा संबध नाही .
अखंड भारतात सुधा हिंदू ची संख्या मुस्लिम लोकसंख्या पेक्षा जास्त होती '
जातीनिहाय मतदार संघ धर्म निहाय मतदार संघ हिंदुनी कधीच मागितले नाहीत ते पूर्ण देशाचा विचार करायचे .
जात soduya .
मुस्लिम लोकांनीच मुस्लिम साठी ठराविक हिस्से दारी सरकार मध्ये असावी ही मागणी केली .
मुस्लिम राष्ट्र साठी लाखो हिंदू ची कत्तल केली .
हे सर्व महित असून सुधा महात्मा गांधी नि ठराविक रक्कम पाकिस्तान ला देण्यासाठी हट्ट केला म्हणूनच त्यांची हत्या झाली .

<< हे सर्व महित असून सुधा महात्मा गांधी नि ठराविक रक्कम पाकिस्तान ला देण्यासाठी हट्ट केला म्हणूनच त्यांची हत्या झाली . >>
------ ते ५५ कोटी रक्कम देण्याचा निर्णय कधी घेतला ? १९४८ मधे.... तारिख शोधा मिळेल.

हत्येचे किमान ६ - ७ प्रयत्न झाले.... १९३४ पासुन. त्यावेळी तर फाळणी, ५५ कोटी असे काहीच कारण कुणाच्याही स्वप्नात नव्हते. हे सर्व कारणे हत्या झाल्यानंतरच सुचलेली आहे. मारायचे होतेच केवळ निमीत्त हवे होते सांगायला.

उत्तर नाही .
असेल तर सविस्तर देणे

19 vyava शतका च्या सुरवाती पासूनच मुस्लिम लीग नि हिंदू शी संघर्ष केला .
नाहीतर कधीच देश स्वतंत्र झाला असता आणि फाळणी पण झाली नसती

एक करार 1938 साली झाला , द्विराष्ट्र साठी, त्याला सावरकरजी व जिनाजी होते ना ?
काँग्रेस बागंड्या घालून बसला होता ना मग..मग थांबवायचा ना ..

बाकी जिनाजी आणि मसूदजी सारखा आहे काँग्रेस वाल्यांचा ..

मग आता तुम्ही बांगड्या घालून बसलेत का ?
मंदिर कधी बांधणार ?-- आधी मशीद पडली ना , आता मंदिर पण बनवू तिथं , दोन्ही काम भाजपचं करेल , तुम्ही घातलेल्या आहेत ना .. त्या तश्याच ठेवा

बांगड्या तुमचीच संस्कृती , अन तुम्हीच मजाक उडवताय ?

एक मुस्लिम स्त्री पंतप्रधान झाली , मग एक ख्रिश्चन स्त्री काँग्रेसची अध्यक्ष झाली, आणि तुम्ही बांगड्या म्हणजे कमजोरी म्हणताय ?

आता अजून एक ख्रिश्चन बहीण जनेऊधारी भावाला मदत करायला आली , तर होलिका काय , शूर्पणखा काय , काय काय मेसेजेस फिरले व्हाट्सएपवरून.

स्त्रियांचा उपमर्द करणे , आता तरी थांबवा.

दोन्ही काम भाजपचं करेल ,

Proud

कोर्ट विचारून विचारून दमले , कुणी पाडली ?
फक्त ठाकरे बोलले , होय आमच्या लोकांनी पाडली म्हणून.

uVRvmdS.gif

महात्मा गांधी , इंदिरा , राजीव , इतक्या हत्या पाहिलेले काँग्रेसवाले व नेहरू गांधी , धमकीला घाबरून घरात बसले , हे मात्र अगदीच हास्यस्पद विधान आहे.

निवडणुका जवळ आल्या , वो लोग मुझे मारेंगे , मेरी जान को खतरा है, अजून लाडक्या मोडीजींचा हा अध्याय सुरू नाही झाला ?
Submitted by BLACKCAT on 6 April, 2019 - 10:30

मला एक पिस्तूल आणून द्या मी मोदींना गोळी घालतो अशी जाहिर गर्जना विजय तेंडूलकर यांनी केली होती. त्यावर आमच्या गुजरातमध्ये या, मी स्वतः तुम्हाला पिस्तूल देतो चालवा माझ्यावर गोळी असे प्रत्युत्तर देत मोदींनी तेंडूलकरांची बोलती बंद केली होती. ह्याला म्हणतात ५६ इंच छाती. उगाच नाही ते गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरुन भारताच्या पंतप्रधान पदापर्यंत पोचले.

Proud

यांच्या आधी बारा लोक पंतप्रधान म्हणूनच तर झाले, तेही शूर होते म्हणूनच

विजय तेंडुलकर साहित्यिक आहेत, त्यांनी उपहासाने म्हटले असणार ,

तसे तर मोडीही बोलले होते , 100 दिवसात हे करीन , नैतर फासावर चढवा , चौकात बोलवा वगैरे,

नन्तर म्हणूनच ते फोरिणात वगैरे बाहेर जास्त फिरायचे अन देशातले चौक टाळायचे का ?

डरपोक आहे ५६ इंची. डिसेंबर २०१६ ला चौकात उभे राहणार होते ना जनतेने दिलेली कोणतीही शिक्षा स्वीकारायला? काय झाले त्याचे?

विजय तेंडुलकर sahitik आहेत खरे बोलणारे .शब्द खरा करून दाखवला पहिजे होता
मोदी राजकारणी शब्द फिरवणारे ते त्यांच्या व्यवसाय नुसार पलटी मारू शकतात इतिहास आहे राजकारणी lokancha

मोदी राजकारणी शब्द फिरवणारे ते त्यांच्या व्यवसाय नुसार पलटी मारू शकतात इतिहास आहे राजकारणी lokancha

हो, म्हणूनच तेंडुलकर गुजरातला गेले नाहीत, मोदींनी पिस्तुल देण्याचा शब्द फिरवला तर ? उगाच गुजरातची ट्रिप वाया जायची.

<< मला एक पिस्तूल आणून द्या मी मोदींना गोळी घालतो अशी जाहिर गर्जना विजय तेंडूलकर यांनी केली होती. त्यावर आमच्या गुजरातमध्ये या, मी स्वतः तुम्हाला पिस्तूल देतो चालवा माझ्यावर गोळी असे प्रत्युत्तर देत मोदींनी तेंडूलकरांची बोलती बंद केली होती. >>
----- तिकडे हरेन पांड्या यांचे काय झाले ?
"माझ्या गल्लीत (गुजरात ) ये... " अशी धमकी दिल्यावर घाबरले असतील बिचारे तेंडूलकर, प्रत्येकाला आपला जिव प्यारा असतो.

<<ह्याला म्हणतात ५६ इंच छाती. उगाच नाही ते गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरुन भारताच्या पंतप्रधान पदापर्यंत पोचले.>>
------ पंतप्रधान पदावर काम करण्याची संधी त्यांना भारताच्या जनतेने दिली आणि मागच्या पाच वर्षात केलेले काम पसंत असेल तर पुन्हा संधी मिळेल, अन्यथा विरोधी पक्ष नेतेपद तर काही चुकत नाही.

>>
हत्येचे किमान ६ - ७ प्रयत्न झाले.... १९३४ पासुन. त्यावेळी तर फाळणी, ५५ कोटी असे काहीच कारण कुणाच्याही स्वप्नात नव्हते. हे सर्व कारणे हत्या झाल्यानंतरच सुचलेली आहे. मारायचे होतेच केवळ निमीत्त हवे होते सांगायला.
<<
मुस्लिमांचे अतिरेकी लांगूलचालन हे खरे कारण होते. गांन्धींनी मुस्लिम तुष्टीकरण आणि लांगूलचालन हे १९२३ पासून सुरू केले होते (खिलाफत चळवळ). ५५ कोटी पाकला देणे हे त्याचे एक फक्त उदाहरण आहे. त्यांच्या हिंदूंना हिणवण्याचा आणि मुस्लिमांना मान देण्याच्या उद्योगाला अनेक लोकांचा आ़क्षेप आधीपासूनच होता. फाळणीमुळे तो राग टिपेला पोचला आणि त्यातून त्यांची हत्या झाली.

भाजपात असलेली नेत्यान्ची उण नाव असलेला धागा इतरत्र वहात चालला आहे. इथले अनेक प्रतिसाद लिहिणारे जे भाजपच्या बाजूने बोलतात त्याना भक्त म्हणुन आपण कसे निपक्ष आहोत हे सान्गायचा प्रयत्न करताना दिसत आहेत. खरे तर भाजपात जर उणीव असेल तर तशी कॉन्ग्रेस मधे पण आहे का याचा ही विचार करायला हवा असे मला वाटते.

Pages