भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गुणवंत प्रज्ञावंत सत्शील सुसंस्कृत भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ

मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या असलेल्या पत्रकारांना ट्रोल करू नका असा इशारा देण्यात आला होता. यावर उत्तर देताना अवधूत वाघ यांनी आक्षेपार्ह भाषा वापरत पातळी सोडली. ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा’, असं उत्तर अवधूत वाघ यांनी दिलं. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

चांगले प्रतिनिधी निवडा पक्ष बघू नका हेच मला सांगायचे होते आम्ही चांगले प्रतिनिधी निवडले चांगले झाले पक्ष बगून मत नाही व्यक्ती बघून मत हेच सामान्य लोकंच धोरण आसवे

आमदार .खासदार ह्या लोकांचा कमी सम्पर्क असतो लोकांशी पण ग्रामपंचायत , नगरपालिका ह्या निवडणुकीत कोण kam करेल हे नक्की महित asat

आणि आमच्या आमदारांना आणि स्थानिक प्रतिनिधी ना जनतेच्या प्रश्नांची जाणीव आहे ह्याचा गर्व आहे पण ते ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाची धोरणे मला पटतात आसा त्याचा अर्थ नाही

भाजप ने incoming का वाढू दिले याचा विचार भाजपने करायला हवा

भाजपचे incoming का वाढले याचा विचार बाकीच्यांनी

कसै की भाजपा सुसंस्कृत नेत्यांचा पक्ष आहे त्यामुळे तिथे सगळे भ्र्ष्टाचारी नेते ( राणे पासुन सुखराम व्हाया रेड्डी बंधु) आपली पापं धुणासाठी येतात. आणि नरुभाऊ किंवा अमितशेठ मोठ्ठ्या दिलाचे असल्याने त्यांना पावन करुन घेतात. जा आता बि़ळात

मेंढर आणि लोक कसा फरक करणार
नवीन Submitted by Rajesh188 on 29 March, 2019 - 15:36
<<

सोप्प आहे !
जी लोक वर्षोनुवर्ष गांधी नावाच्या मेंढपाळापाठी हिंडतात ती मेंढर.

असे समजा की mi X पक्षाचा समर्थक आहे y पक्षाचा तिरस्कार करतो .पण X पक्षांनी जर भ्रषटाचारा करणारा गुंड उमेदवार दिला आणि y पक्षाचा उमेदवार चांगला असेल तर मी पक्ष आवडत नसेल तरी त्याला मत देईन

असे समजा की mi X पक्षाचा समर्थक आहे y पक्षाचा तिरस्कार करतो .पण X पक्षांनी जर भ्रषटाचारा करणारा गुंड उमेदवार दिला आणि y पक्षाचा उमेदवार चांगला असेल तर मी पक्ष आवडत नसेल तरी त्याला मत देईन>> हे वाचुन मला माझ्या क्लासमेट ची आठवण झाली. २०१४ लोकसभा निवडणुकीसाठी त्याचा सातारा मतदारसंघ भाजप्/शिवसेने ने आर.पी.आय. साठी सोडला होता. माझ्या मित्राला मोदी पंतप्रधान व्हावे असे वाटत होते पण त्याला आर.पी.आय. चा उमेदवार पसंत नव्हता. मग निवडणुकीच्या दिवशी मतदानकेंद्रात गेल्यावर 'झाडु'च्या उमेदवाराचं बटण दाबलं. त्यावेळेस सातारा लोकसभेसाठी १.५ लाखांच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले निवडुन आले आणि आश्चर्य म्हणजे मित्राने 'झाडु'ला वोट देऊनही मोदीच पंप्र झाला..!! Biggrin

कोंग्रेसची गुणग्राहकता सतत वाढतेच आहे. सनातन साधकांनंतर आता संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड सर यांनी आपल्या सहकारींसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या स्वागताला कोंग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. ब्रिगेड आणि काँग्रेसचे हे मनोमिलन पाहून छान वाटले. Lol
शक्यता कमी पण चुकून यांचे सरकार आलेच तर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने आपले अजून शिल्लक असलेले artefacts एकतर परदेशात पाठवावे किंवा पूर्ण संस्था गुजरात/यूपीमध्ये शिफ़्ट करावी. उगाच रिस्क नको.

राज्यातील काही संघटना ह्या काही राजकीय पक्षाच्या च गुप्त शाखा आहेत असे मला खूप दिवसा पासून वाटत आहे

<< ब्रिगेड आणि काँग्रेसचे हे मनोमिलन पाहून छान वाटले. Lol >>
--------- भांडारकरवरचा हल्ला आणि त्यात केलेल्या अतोनात हानी बद्दल दु:ख आहे; संभाजी ब्रिगेडचे हे कृत्य कुठल्याही अर्थाने समर्थनीय नाही. तेव्हढाच तिरस्कार आपल्याला निरपराधी व्यक्तींवर होणार्‍या हल्ल्यांबद्दलही असायला हवा.

गुडगाव येथे २५-३० लोकांचा घोळका हातात लाठ्या काठ्या बाळगत निरपराध, निशस्त्र व्यक्तींवर त्यांच्याच घरात शिरुन प्राणघातक मारहाण करतो... या घटनेचा व्हिडीओ वेगाने पसरतो आहे. भावी पिढी मधे विद्वेष पसरवण्यासाठी अशा घटनांचा उपयोग चांगलाच होणार आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे... किती हानी पोहोचवली ?

अशाच प्रकारच्या (कारणे वेग वेगळी असतील... कधी गोमांस हलवले, खाल्ले , बाळगले याचा निव्वळ संशय पण पुरेसा आहे) अनेक घटनांत निरपराधी व्यक्तींना टारगेट करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे, काहींना आपले प्राण गमवावे लागले आहे.

जैश, लष्कर, हिजबूल साठी ताज्या दमाची / नव्या रक्ताची भरतीसाठी कोण मदत करत आहे?

परतीमधे जैश, लष्कर, हिजबूल काय करतात ? जैशने पुलवामा येथे हल्ला करुन ४४ जवानांची हत्या केली. जैशने संसदेवर हल्ला केला पण सावध सुरक्षा जवानांनी शर्थीने तो हल्ला निस्तेज केला. या हल्ल्यात अनेक सुरक्षा जवानांना विरमरण आले. संसदेवर हल्ला झाला त्यावेळी आणि पुलवामाच्या हल्ल्याच्या वेळी दोन्ही वेळा भाजपा हा केंद्रात सत्तास्थानी होता...

बुलंदशहरात जमावाने पोलीस ठाण्यावर, पोलींसांवरच हल्ला केला. या हल्यात एका कर्तव्यदक्ष अधिकार्‍याचा खुन करण्यात आला.
https://www.thehindu.com/news/national/main-accused-in-bulandshahr-mob-v...

या व अशा अनेक घटना देशात घडतात.... नित्य नियमाने घडतात आणि त्यावर सत्तास्थानी असलेले सर्वोच्च, सर्व शक्तिमान नेते चुप्प बसतात तेव्हा संभाजी ब्रिगेड संघटना खुप सौम्य वाटायाला लागते.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचा पादचारी पुल कोसळला तरी त्याचा दोष थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी वा मुख्यमंत्री एवेंद्र फ़डणवीस यांच्यापर्यंत पोहोचत असतो. जणू तेच नित्यनेमाने त्या पुलाची पहाणी करून रोजच्या रोज त्याची देखभाल करणारे कर्मचारी असतात. अन्यथा अशा कुठल्याही बाबतीतले दोष त्यांच्या माथी कशाला मारले गेले असते? दिल्लीनजिक दादरी येथे उत्तरप्रदेश पोलिसांची हुकूमत असताना व त्या राज्यात समाजवादी पक्षाचे अखिलेश सरकार सत्तेत असतानाही, अखलाख नावाच्या मुस्लिमाला जमावाने ठार मारले, तर गुन्हेगार पंतप्रधान मोदी असतो. त्यात स्थानिक पोलिस वा ठाणेदार वगैरे कोणी दोषी नसतो. थोडक्यात कुठेही काही विपरीत घडले, तर त्यातला आरोपी मोदी असतात. अगदी पुलवामा येथे लष्करी ताफ़्यावर हल्ला झाला, तर छप्पन इंची छाती म्हणून मोदींना जाब विचारला जातो. जणू त्या प्रत्येक लष्करी तुकडीचा म्होरक्या मोदीच असतात. तिथे काही गफ़लत झाली, तर गुन्हेगार मोदीच असतात. हे आजकाल पुरोगामी तर्कशास्त्र झाले आहे. पण हीच मोजपट्टी लावायची झाल्यास तिथे काही चांगले वा स्पृहणिय झाले, तर त्याचेही श्रेय मोदींनाच द्यायला नको का? तिथे तात्काळ स्पेशल केस म्हणून तर्कशास्त्र पलटी मारत असते. हवाई दलाने पाकिस्तानात बालाकोटला जाऊन मोठा प्रतिहल्ला केल्यास त्याचे श्रेय मात्र सरकार वा मोदींना असू शकत नाही., तिथे हवाई दल वा सेनादलाची पाठ थोपटायची असते. हा भेदभाव किंवा पंक्तीप्रपंच आता नित्याचा झाला आहे आणि डोळसपणे त्याकडे बघणारी सामान्य जनताही त्यातला भेदभाव समजू लागलेली आहे. त्यामुळेच कालपरवा अवकाशात उपग्रहाचा वेध घेणार्‍या क्षेपणास्त्राच्या विकासाचे श्रेय मोदींचे आहे, हेही जनता जाणते आणि त्याची ग्वाही देण्यासाठी डीआरडीओ या संस्थेचे माजी प्रमुखही समोर आलेले आहेत.

-भाऊ तोरसेकरांच्या ब्लॉग मधून साभार

काँग्रेसने निवडणूक घोषणपत्र जाहीर केल्यापासून जेटलींची तगमग बघवत नाही, म्हणे अशक्य आश्वासने दिलीत कॉंग्रेसने. २०१४ ला तर परदेशातील काळया पैशावर भरोसा ठेवून सगळी आश्वासने मोदींनी दिली होती हे विसरले वाटते जेटली. त्यामुळे सगळी आर्थिक धोरणे कोलमोडली बिजेपीच्या राज्यात. काँग्रेसचे जी एस टी धोरण धरसोडीचे नसणार हे नक्की.

जनता जाणते वगैरे शब्द वापरून कोणाला मूर्ख बनवतात हे? असे बोलण्याचे कारण म्हणजे जनतेतल्या प्रत्येक व्यक्तीला असे वाटले पाहिजे कि इतर जनता मोदिन्सोबत आहे त्यामुळे तू एकटा वेगळा राहून काय उखाड्शील .. असे करून एक एक विरोधातला व्यक्ती खोट्या जनाधाराची भीती घालून पलटवण्याचे षड्यंत्र आहे. आपल्याच देशातल्या जनतेशी असली षड्यंत्र करणारे देशद्रोही समजले पाहिजे.

.. असे करून एक एक विरोधातला व्यक्ती खोट्या जनाधाराची भीती घालून पलटवण्याचे षड्यंत्र आहे. आपल्याच देशातल्या जनतेशी असली षड्यंत्र करणारे देशद्रोही समजले पाहिजे.
नवीन Submitted by हेला on 3 April, 2019 - 13:23

"हिंदीरा ईज हिंडीया अ‍ॅंड हिंडीया ईज हिंदीरा"
असे ऐकेकाळी म्हणणारे कॉंग्रेसी देशद्रोही होते म्हणजे !

सगळे पोल्स बघता भरत पुढची पाच वर्ष तुमच हे दुकान जोरात चालणर्र अस दिसतय... लगे रहो... Wink
नवीन Submitted by पेशवा on 3 April, 2019 - 14:51
<<
Lol

अनिरुद्ध , चौकीदार धाग्यावर तुम्ही कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याबद्दल जे लिहिलंय, त्याच्या लिंक्स देताय ना?

शिर्षापासून पाताळापर्यंत सर्वच्या सर्व खोटारडे आणि निर्लज्ज भरलेले आहेत भाजपात. अनिरुद्ध त्यपैकि एक.

Pages