अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो मानव ते शिमग्यात शिमग्याचे सोंग घेऊन आणी मशाली घेऊन जे पळापळी करतात ना त्यांना गडे म्हणतात. ( अय्या, इश्श वाले गडे नाही )

मानवजी, मागे मी(पान 36) वर गडे ह्या प्रकाराबद्दल लिहिले होते. गोव्यात साळ या गावी व काणकोण या गावचे गडे हे प्रसिद्ध आहेत. गडे म्हणजे ही त्या ठराविक गावातील माणसे असतात त्यांच्यावर अवसर वा वारं येतं, हे वंशंपरागत किंवा त्या त्या गावापुरतं मर्यादित असतं. देवाची तरंगे हा काहीसा छत्री सारखा प्रकार असतो. लाकडी वर्तुळाकार कांब त्यावर गोल नववारी साड्या लावलेल्या किंवा नेसवलेल्या असतात अग्रावर देवतेचा मुखवटा किंवा निशाण असतं. एरवी एकावर एक अशा साड्यांचे थर आणि मुख्य लाकूड व वर मुखवटा असल्याने ती जड असतात. ती उचलून रिंगणात आणावी लागतात. ती उचलून आणली जातात पण वरील ऊत्सव चाललेला असतांना त्यांनां धरावं लागत नाही, कुठल्याही आधाराविना ती उभी असतात.

भरतजी एक प्रेमळ सल्ला. जेवताना वाचत किंवा टिव्ही बघत जेवू नये, अंगी लागत नाही असं म्हणतात. Happy
त्रास झाल्याबद्ल साॅरी.

शशिरामजी, हो बर्‍याच जणांना हा प्रकार अघोरी वाटू शकतो, त्या बद्दल दुमत नाही पण तो देवस्थानच्या रिचुवल्स मध्ये मोडणारा असल्याने केला जातो. व त्या गड्यांना (डोक्यावर भात शिजवलेल्या ) काही ही होत नाही. एकदम ठणठणीत असतात.

आजकाल मला अमानवी शक्ती म्हणजे भुतांनी झपाटले असावं असं सारखं वाटतंय. गोड खाऊ नका असे सांगितले आहे तर हटकून गोड पदार्थ खातोय. नवे कपडे, गाडी घ्यावे रोजच वाटायलंय. स्वप्नात नको त्या गोष्टी करतोय. घरचं जेवण नको रोज बाहेर चमचमीत सामिष जेवण करण्याची इच्छा होते आहे. देवळात जावेसे वाटत नाही. खरंच तर मला झपाटलं नसेल ना.

हे असं ज्या व्यक्तीला होत नाही तिला झपाटलेलं आहे असं समजतात. (देवळात जावेसे वाटत नाही भाग वगळता).
देवळात जावेसे न वाटणे हे आजकाल बऱ्यापैकी स्वीकारले जाते आहे.

@शशिराम होतं असं कधी कधी, हळूहळू होईल कमी त्रास, इन्स्टंट मुक्ती पाहिजे असेल या त्रासातून तर हे लिहिलेलं बायकोला दाखवा.

मागच्या आठवड्यात रात्रीस खेळ चाले मध्ये सरीतावर जो उपाय केला ज्या मध्ये २५ कोंबडे उतरवून टाकले तो विधी कोणता आहे? नंतर काशीची बायको उंबरठा वर रुपया ठेवून हळदीकुंकू वाहुन पैसे येणार म्हटल्यावर पैसे घेउन सरिता येते, हे विधी कितपत खरे आहेत ?

बोकलत तुमचे पोस्ट्स खूपच मिश्किल आणि स्ट्रेसबस्टर्स आहेत. मजा येते आहे हा धागा वाचायला.
I just like comedy posts here.
Keep smiling.

राजेश १९९ भूत माझ्या मागे लागलं आहे. मी जिथं जाईन तिथं हजर राहतंय लेकाचं.
रात्री स्वप्नात दोन तीन भुतनी व दोन चार भुतं कपडे काढून मला भेवडीत होती. त्यांना मी इचारलं कशाला तरास देत्याय,कोणे तुम्ही तर त्यांनी दात इचकत नावं सांगितली. ईनता झक्कड, फुसमी, चालू चवचाल चवऱ्यांशी, अख्खा चारशे इस. मी तर लै भेलो. च्यामारी आजराच्च्याला बी सपनात आली तर... आधीच टोनगा भूतानं पिच्चा पुरिवला हाय. झोपतच नाय.

कुणीतरी माझ्या मागे आहे, कुणीतरी मी जाणार तिथेच येतं असे भास प्रत्येक जन्मात कंटीन्यु होतात का?

कुणीतरी माझ्या मागे आहे, कुणीतरी मी जाणार तिथेच येतं असे भास प्रत्येक जन्मात कंटीन्यु होतात का?>>>>
होतात होतात ! 'मला' अनुभव आहे Proud Lol Lol Lol

मी पाचवी सहावीत शिकत असल्यापासून मला श्री हे साप्ताहिक वाचायचा नाद होता. मायापुरी, चित्रलेखा, जत्रा सारखी साप्ताहिके देखील वाचत होतो. असेच प्लॅंचेट विषयी वाचनात आले. काही झाले तरी ते करून पहायचेच हे ठरवले. माझ्या शेजारी दत्तु रहात होता, माझ्या पेक्षा वयाने मोठा होता. मी त्याला प्लॅंचेट ची सर्व माहिती सांगितली. तो तयार झाला.
एकेदिवशी घरी कोणी नाही हे बघून एका पाटावर खडूने बाराखडी, हो, नाही व एक ते दहा अंक लिहिले. एक पितळी छोटा लोटा पालथा ठेवून सुरू केले प्लॅंचेट. दोघांनी त्यावर बोटे ठेवली व लोट्याच्या हालचालीची वाट पाहू लागलो. बराच वेळ झाला तरी प्रयोगाला यश येईना. आणि अचानक दत्तू ओरडला हरामखोरा... त्याचे डोळे मोठे झाले होते व नजर टाईट. मी खूप घाबरलो व पळून गेलो.
नंतर दत्तूला विचारले तर तो म्हणाला काय आठवत नाही. आपण असले उद्योग करायला नकोत. परत हे करण्याचं मला धाडस झाले नाही.

Pages