श्रीखंड

Submitted by 'सिद्धि' on 27 March, 2019 - 13:51

घरगुती आणि ताजे श्रीखंड-

साहित्य:
ताजे दही - 1 किलो,
पिठी साखर -1 किलो
गोड कमी हवे असेल तर पाऊण किलो साखर ,
केशर ४ काडी,
वेलची पूड -अर्धा चमचा,
थोडी जायफळ पूड - अर्धा चमचा,
चारोळी १०-१२ दाणे,
ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे पण मी काजू, बदाम घेते ते ही पातळ काप करून.

कृती: ताजे दही पातळ कापडात बांधून वरती लटकवावे (८ ते १० तास) एक रात्र.
पूर्ण पणे पाणी निघाल्यावर एक पातेल्यात काढावे. त्यात साखर मिसळावी.
नंतर मिश्रण (चक्का) फेटून घ्या (खूप वेळ लागतो हे मिश्रण चांगले एकजीव व्हायला)
किंवा पुरण पात्रा मध्ये किंवा चाळणीवर फिरवूनही श्रीखंड तयार करता येते.
तयार मिश्रणात केशर घोळून मिसळावा.
आता यात वेलची, जायफळ पूड घालून ढवळावे नंतर ड्रायफ्रूट्स काप पसरावेत. श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवून गार होऊ द्यावे.
श्रीखंड तयार आहे.
images (1).jpeg

टीप -
* मी गोड जरा जास्त खाते आणि श्रीखंड हा तर माझा all time favourite पदार्थ त्यामुळे मी १ कीलो दही लावून १ कीलो पिठी साखर वापरते पण तुम्ही मात्र साखरेचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.

* आणि same recipe मध्ये २-३ वाटी आमरस घालून सुद्धा करून बघा. (आम्रखंड)

अर्थात ही माझी पद्धत आहे.
कोणी जर अजुन वेगळ्या प्रकारे झटपट श्रीखंड तयार करत असाल तर please share करा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तोंपासू. चितळे आणि वारणा यांचे श्रीखंड माझे आवडते पदार्थ आहेत. पोटाला तडस लागेपर्यंत श्रीखंड पुरी चेपणे ब्रह्मानंदी टाळी लावणारी गोष्ट आहे माझ्यासाठी.

हा धागा या ग्रुपात हलवा
https://www.maayboli.com/hitguj/marathi-recipes

आमच्याकडेही चक्का रात्रभर टांगून ठेवला जाई. पण एका कुकरी शो मध्ये ही पद्धत पाहिली.
दही कापडात काढून घ्यायचं. हे गाठोडं एका चाळणीत ठेवायचं. मी सूप स्ट्रेनर वापरतो. आता चाळणी दुसर्‍या भांड्यात ठेवायची. चाळणीचा तळ त्या भांड्याच्या तळापासून बराच वर राहील असं भांडं निवडायचं. गाठोड्यावर वजन ठेवायचं. हा सगळा डोंगर फ्रीजमध्ये ठेवायचा. दोन तासात हवा तसा चक्का तयार होतो. दही तितकं आंबट होत नाही, त्यामुळे साखर कमी लागते.
आता चक्क्यात पिठी साखर घालून ती विरघ ळेपर्यंत ढवळायचं. मग हे मिश्रण त्याच सूप स्ट्रेनरमधून गाळून घ्यायचं. मस्त हलकं, गुळगुळीत आणि चमकणारं श्रीखड होतं. वेलची जायफळ गाळायच्या आधी घातलं तर चालतं. पण केशर नंतर घातलेलंच बरं. सूप स्ट्रेनरला लागून वाया जातं.
मला श्रीखंडात चारोळी आणि ताजी हिरवी द्राक्ष आवडतात. द्राक्षांची सालं काढून काप करून.
श्रीखंड खायची हुक्की आली आणि घरात दही असेल तर तीनेक तासांत श्रीखंड मिळू शकतं.

मला सूप स्ट्रेनरबाबत एक शंका आहे. तो अॅल्युमिनीयमचाच असतो. त्यातून चक्का गाळावा का असं वाटतं कारण अॅल्युमिनियमचा तवा वगैरे ताकानं घासतात.

सिद्धी Bw
भरत बरं झालं नवीन युक्ती सांगितलीत .

देवकी - धन्यवाद.
मेधावि - सूप स्ट्रेनर स्टेनलेस स्टील चा सुद्धा असतो.
भरत - recipe आवडली, सूप स्ट्रेनर मी या आधी श्रीखंडा साठी वापरला नाहि, नक्की try करेन. ते धागा हलवायचा कसा मला माहित नाहि please guide.

संपादनवर क्लिक करा. खाली एका चौकटीत ग्रुप ऑडियन्स दिसेल.
तुम्ही गुलमोहर गतर कला निवडले आहे. त्याजागी पाकक्रुती आहारशास्त्र हा ग्रुप निवडा.

मी पण सेम भरत यांच्या सारखाच करते चक्का दही फ्रीज मध्ये ठेवून. त्यामुळे चक्का आंबट होत नाही .

बाकी घरी दूध विरजून केलेल्या श्रीखंडाची चव विकतच्याला नाही ...

रेसीपी अगदी पारंपारिक आहे. ह्या पद्धतीने केले आहे पूर्वी श्रीखंड. घरगुती बेस्ट. माझी आवड म्हणजे पुण्यातील चितळेचा चक्का घ्यायचा. त्यात
साधी साखर घालायची व मिसळायचे, साखर क्रंची असतानाच एक वाटी खायचे, फ्लेवर नाही कसला. तुम्ही म्हणाल दही साखरच की. पण लै भारी लागते.

आम्ही तर विकतचे श्रिखंड आनतो. ते खुप गोड असते म्हनुन त्यात विकतचे दही जे घरच्या दह्यापेक्शा जास्त घट्ट असते ते मिसळायचे.
हवी ती quantity बर्‍यपैकी स्वस्तात आणि कमी कष्टात मिलते.

छान दिसतय! पाककृती आवडली.

गायीच्या दुधाचे दही - चक्का करून केलेले श्रीखंड मऊ होतं. म्हशीचं जरा घट्ट होतं.
बाजारु चक्का हा उरलेल्या दुधाचा ( मिसळ भेसळ) असतो त्यामुळे त्याचे कण एकसारखे नसतात.)
चितळेंचं तयार श्रीखंड फार गोड असतं. त्यात त्यांचाच चक्का प्रमाणात मिसळला तर गोडी आटोक्यात आणता येते.

घरचे श्रीखंड बेस्ट लागते. रायगड जिल्ह्यात एक हुतात्मा ब्रँडचे श्रीखंड मिळते. आयत्या वेळी पाहुणे येणार असे कळले की हे श्रीखंड आणून त्यात भरपूर बदाम, पिस्ते, केशर आणि किंचित वेलचीपूड मिसळली की मस्त चव येते.

शशिराम-धन्यवाद
तुरू - मिक्सर मध्ये मिक्स केल तर चालेल का चक्का आणि पिठी साखर?
- शक्यतो तस करु नका .... मिक्सर मध्ये त्यातुन लोणी सेप्रेट होत आणि वरती तरंगु लागत, असच चमच्याने ही व्यवस्तीत मिक्स होत श्रीखंड.

एक किलो 'दह्याला' एक किलो साखर फारच जास्त नाही का होत?
शक्यतो एक किलो चक्क्याला एक किलो साखर आणि कमी गोड हवं तर कमी असं प्रमाण ना? Uhoh

भरत यांनी वर म्हटल्याप्रमाणे मी पुरण वाटायच्या जाळीवर पंचा पसरून त्यावर नुकतंच विरजण लागलं असं ताजं दही ओतलं. पंचाची टोकं नुसती वर झाकली आणि खाली उंच पातेलं ठेवून प्रकरण फ्रिजात ठेवलं. अप्रतिम चक्का तयार झाला. आंबट अजिबात नाही. फक्त पूर्ण ८ तास लागले. भरत म्हणाले तसा ३-४ तासांत नाही झाला. अर्थात मी मुद्दाम पुरेसं आधी, म्हणजे आत्ताच आम्रखंड तयार केलं आहे म्हणजे साखर, आंब्याची चव मुरेल नीट. धन्यवाद भरत आणि 'सिध्दी'.

मस्त दिसत आहे श्रीखंड.

भरत छान युक्ती सांगितलीत.
मी अद्याप श्रीखंड नाही बनवलं. या पद्धतीने बनवून बघेन एकदा.

Pages