श्रीखंड

Submitted by 'सिद्धि' on 27 March, 2019 - 13:51

घरगुती आणि ताजे श्रीखंड-

साहित्य:
ताजे दही - 1 किलो,
पिठी साखर -1 किलो
गोड कमी हवे असेल तर पाऊण किलो साखर ,
केशर ४ काडी,
वेलची पूड -अर्धा चमचा,
थोडी जायफळ पूड - अर्धा चमचा,
चारोळी १०-१२ दाणे,
ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे पण मी काजू, बदाम घेते ते ही पातळ काप करून.

कृती: ताजे दही पातळ कापडात बांधून वरती लटकवावे (८ ते १० तास) एक रात्र.
पूर्ण पणे पाणी निघाल्यावर एक पातेल्यात काढावे. त्यात साखर मिसळावी.
नंतर मिश्रण (चक्का) फेटून घ्या (खूप वेळ लागतो हे मिश्रण चांगले एकजीव व्हायला)
किंवा पुरण पात्रा मध्ये किंवा चाळणीवर फिरवूनही श्रीखंड तयार करता येते.
तयार मिश्रणात केशर घोळून मिसळावा.
आता यात वेलची, जायफळ पूड घालून ढवळावे नंतर ड्रायफ्रूट्स काप पसरावेत. श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवून गार होऊ द्यावे.
श्रीखंड तयार आहे.
images (1).jpeg

टीप -
* मी गोड जरा जास्त खाते आणि श्रीखंड हा तर माझा all time favourite पदार्थ त्यामुळे मी १ कीलो दही लावून १ कीलो पिठी साखर वापरते पण तुम्ही मात्र साखरेचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.

* आणि same recipe मध्ये २-३ वाटी आमरस घालून सुद्धा करून बघा. (आम्रखंड)

अर्थात ही माझी पद्धत आहे.
कोणी जर अजुन वेगळ्या प्रकारे झटपट श्रीखंड तयार करत असाल तर please share करा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चक्का आणि साखर मिक्स केल्यावर थोड्या वेळाने एका भांड्याला तलम कापड घट्ट बांधून हाताने मिश्रण चांगले घासुन घावे. ह्या मध्ये मेहनत आहे पण श्रीखंड अतिशय मुलायम होते.

नेहमी घरीच पनीर केलं आणि वरचेवर चक्का केला तर पैसे वसूल होतील. Happy वापरायला सोपा आहे ना? चिकचिकाट/ लडबडाट होत नाही ना?

हो चटकन साफ होतं. तो फायदा आहे. दोन भांडी + एक कापडाचा त्रास वाचला. मी पंधरा दिवसांत एकदा पनीर करतोच.
पण श्रीख़ड करायला साखर मिश्रित चक्का पुन्हा स्ट्रेन करत होतो, ते यावेळी नाही केलं. पक्त खूप फेटलं. . .

पनीर साठी या भांड्याचा कसा काय उपयोग होतो ?मला नाही कळलं ..
पनीर करून त्या डब्याच्या आत जाळीचा डबा कम चाळणी आहे त्यात दाबून भरायचं का ?! कि काय ? आणि मग पुढे ? त्यावर वजन वगैरे नको का ठेवायला !!

इथेच कुठेतरी वाचलेलं. श्रीखंड विकत आणा किंवा घरी केलेलं असेल तरी ही युक्ती परफेक्ट जमते. आम्रखंड याकरता नको मात्र.
तर कुठल्याही श्रीखंडात एवरेस्ट चा दुधाचा मसाला घालायचा, चव मस्त एनहान्स होते. अर्ध्या किलोला एक लहान डबी मसाला पुरेसा होतो. करून पाहा.

कापडाने गाळण्याऐवजी चीझमेकर वापरायचा. पुढची प्रोसेस सेम. ताटलीत पनीर ठेवून त्यावर वजन ठेवायचं.
चीझमेकरचं आतल़ भांंडं w शेप्ड आहे.

कापडाने गाळण्याऐवजी चीझमेकर वापरायचा. पुढची प्रोसेस सेम चीझमेकरचं आतल़ भांंडं w शेप्ड आहे.>> झालं!.. मग माझा पास Sad मला वाटलं चौकोनी आहे . त्याच्या जाळीत अडकत नाही पनीर चे कण ?

मी कापडाची घट्ट आणि फ्लॅट पुरचुंडी बांधून त्यावर कुकर भरून पाण्याचं वजन ठेवते Wink
पनीर घट्ट झालं कि कापडाला काहीही चिकटून राहत नाही .. किंवा जे राहतं ते लग्गेच निघतं ..

Pages