श्रीखंड

Submitted by 'सिद्धि' on 27 March, 2019 - 13:51

घरगुती आणि ताजे श्रीखंड-

साहित्य:
ताजे दही - 1 किलो,
पिठी साखर -1 किलो
गोड कमी हवे असेल तर पाऊण किलो साखर ,
केशर ४ काडी,
वेलची पूड -अर्धा चमचा,
थोडी जायफळ पूड - अर्धा चमचा,
चारोळी १०-१२ दाणे,
ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे पण मी काजू, बदाम घेते ते ही पातळ काप करून.

कृती: ताजे दही पातळ कापडात बांधून वरती लटकवावे (८ ते १० तास) एक रात्र.
पूर्ण पणे पाणी निघाल्यावर एक पातेल्यात काढावे. त्यात साखर मिसळावी.
नंतर मिश्रण (चक्का) फेटून घ्या (खूप वेळ लागतो हे मिश्रण चांगले एकजीव व्हायला)
किंवा पुरण पात्रा मध्ये किंवा चाळणीवर फिरवूनही श्रीखंड तयार करता येते.
तयार मिश्रणात केशर घोळून मिसळावा.
आता यात वेलची, जायफळ पूड घालून ढवळावे नंतर ड्रायफ्रूट्स काप पसरावेत. श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवून गार होऊ द्यावे.
श्रीखंड तयार आहे.
images (1).jpeg

टीप -
* मी गोड जरा जास्त खाते आणि श्रीखंड हा तर माझा all time favourite पदार्थ त्यामुळे मी १ कीलो दही लावून १ कीलो पिठी साखर वापरते पण तुम्ही मात्र साखरेचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.

* आणि same recipe मध्ये २-३ वाटी आमरस घालून सुद्धा करून बघा. (आम्रखंड)

अर्थात ही माझी पद्धत आहे.
कोणी जर अजुन वेगळ्या प्रकारे झटपट श्रीखंड तयार करत असाल तर please share करा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शीतल, मी छोटासा खल ठेवला होता. एरवी तो लसूण, आले ठेचायला वापरते. भरतनी सांगितलेली युक्ती मीपण वापरली. धन्यवाद, भरत. साक्षी, रेसिपी छान आहे.

"shital Pawar -वजन मधेय काय ठेवले ? म्हणजे एकधे जड भांडे कि आँखे दुसरे काय"

- पुर्वी गावी माझी आज्जी जास्त प्रमानात श्रीखंड करायची, म्हणुन त्या गाठोड्यावर छोटा (दगडी) वरवन्टा ठेवायची. साधारण असा दिसायचा तो ( वरील छोटा दगड) .......
ईमेज नेट वरील आहे.

varvanta-pata.jpg

अरे वाह छान फ्रिज मधेय खल वैगेरे ठेवणे आमच्या माँ साहेब ठेवू देणार नाहीत , त्या नसल्या कि प्रयोग करावा लागणार Wink Wink Wink

होय होय बरोबर त्यानची पद्धत थोडी वेगळी आहे.
"पुर्वी गावी माझी आज्जी जास्त प्रमानात श्रीखंड करायची, म्हणुन त्या गाठोड्यावर छोटा (दगडी) वरवन्टा ठेवायची." पण ती फ्रिज मध्ये नाही ठेवायची.
चाळण एका टोपावर ठेवायची बाहेरच. च्यावर गाठोड् आणि गाठोड्यावर दगड.

"कापडात चक्का घालून त्याला दोरा बांधून टांगून ठेवला तरी तोच परिणाम मिळतो"- BLACKCAT -
मी असच करते आत्तापर्यत पण भरत यानची पद्धत try करून बघेन.

मी श्रीखंड थोड्या प्रमाणात केले होते भरत यांच्या पद्धतीने वजन ठेवून. आता खल या विषयावर खल नको, मी चक्क नारळ अख्खा ठेवला वजन म्हणून.

श्रीखंड मस्त !!!
काही वर्षांपूर्वी सकाळ आरोग्य मध्ये श्री बालाजी तांबे यांनी आयर्वेदातल्या पाककृती दिल्या होत्या , त्यामध्ये श्रीखंडाची एक वेगळी कृती शिखरिणी किंवा अशाच नावाची (कापूर ,केशर वगैरे द्रव्य घालून)दिली होती , कोणाकडे ती असेल तर मिळेल काय??

प्रतिसादा बद्दल आभार.

विक्रममाधव- काही वर्षांपूर्वी सकाळ आरोग्य मध्ये श्री बालाजी तांबे यांनी आयर्वेदातल्या पाककृती दिल्या होत्या , त्यामध्ये श्रीखंडाची एक वेगळी कृती शिखरिणी किंवा अशाच नावाची (कापूर ,केशर वगैरे द्रव्य घालून)दिली होती , कोणाकडे ती असेल तर मिळेल काय
- अशी पाककृती नाही सापडली कुठे.

त्यातली द्रव्ये माहीत असतील , तर अंदाजे घालून करून बघा, नाहीतरी भौतिक शास्त्रानुसार हे इमलशन की कसले ते मिश्रण आहे

असं म्हणतात की महाभारतात महापराक्रमी भीम जेव्हा विराट राजाकडे बल्लवाचार्य म्हणून काम करत होता तेव्हा त्याने ‘शिखरिणी’ नामक पदार्थ बनवल्याचा उल्लेख येतो. त्या शिखरिणीत भीमाने ताजी फळे वापरल्याचा संदर्भ आहे. आजच्या फ्रूट श्रीखंडाचे मूळ थेट भीमापर्यंत मागे गेलेले पाहून गंमत वाटते. दुकानदार मंडळी सीताफळ श्रीखंड, स्ट्रॉबेरी श्रीखंड विकताना अशी जाहिरात करतात की जणू काही हा नवा प्रयोग त्यांनीच केला असावा.

https://www.loksatta.com/khauchya-shodhkatha-news/shrikhand-1223946/

मी गेल्याच आठवड्यात बर्‍याच वर्षांनी श्रीखंड घरी केलं. एरवी मला ते दही टांगून करण्याचा आणि पुढच्या पसार्‍याचा कंटाळा येतो. यावेळी एक मोठं कोलँडर घेतलं. त्यात बाऊंटीचे पेपर नॅपकिन्स पसरले सगळीकडून. त्यात दोन डबे फुल फॅट दही ओतलं. वरुन पुन्हा पेपर नॅपकीनने कव्हर करुन माझ्याकडे मार्बलचा कटिंग बोर्ड आहे तो ठेवला. हे कोलँडर एका मोठ्या पातेल्यावर ठेवलं होतं. त्यात पाणी साठत गेलं. हे उद्योग सकाळी पावणे अकरा दरम्यान केले आणि रात्री ९ ला चक्का पुरणयंत्रातून काढला. मस्त गुळगुळीत श्रीखंड झालं.

मी इतक्यात हा डबा घेतला चक्क्यासाठी. घट्ट झाकण असल्यामुळे फ्रीजमध्ये ठेवता येतो - कशाचा कशाला वास न लागता.
भारतात मिळतो का कल्पना नाही.

BLACKCAT-असं म्हणतात की महाभारतात महापराक्रमी भीम जेव्हा विराट राजाकडे बल्लवाचार्य म्हणून काम करत होता तेव्हा त्याने ‘शिखरिणी’ नामक पदार्थ बनवल्याचा उल्लेख येतो. त्या शिखरिणीत भीमाने ताजी फळे वापरल्याचा संदर्भ आहे. आजच्या फ्रूट श्रीखंडाचे मूळ थेट भीमापर्यंत मागे गेलेले पाहून गंमत वाटते. दुकानदार मंडळी सीताफळ श्रीखंड, स्ट्रॉबेरी श्रीखंड विकताना अशी जाहिरात करतात की जणू काही हा नवा प्रयोग त्यांनीच केला असावा.
- छान महिती . अगदी महाभारता पर्यत गेलात.

सायो - धन्यवाद.

स्वाती_आंबोळे-हा डबा
डबा मिळाला तर बघते. ईमेज पाहिलि. अमेझोन वरती आहे.

फळांची ' शिखरिणी' म्हणजे शिकरण तर नसेल?
हीरा-मला काही कल्पना नाही. विक्रममाधव यांना माहित असावे.

आदू -1 लीटर दहि चा साधारण ३/४ चक्का. दही अगदी घट्ट असते तर नाहितर यापेक्षा कमी होतो.

मी स्वातींनी सांगितलेलं योगर्ट चीझ मेकर घेतलं.
आता सूप स्ट्रेनर इ. उपद्व्याप नाहीत. तीन तासात चक्का तयार झाला.

मी पाऊण लिटर लो फॅट दुधाला दही लावून त्याचं श्रीखंड केलं होतं. सव्वा लिटर दुधाचं दही मावेल त्यात. मी घेतलाय त्यापेक्षा मोठ्या साइजचे चीझ मेकरही आहेत.

Pages