भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हि लोक गरिबांना लुटून पैसे कमावतात.. त्यांच्या कडून थोडे पैसे गरिबांना दिले तर लगेच ह्यांच्या पोटात दुखते..
७२००० ची योजना फार चांगली आहे.. सगळ्यांना मिनिमम पैसे मिळायला पाहिजेतच ..
लागल्यास सगळा टॅक्स सरसकट १०% वाढावावा,
सरकारी नोकरदारांनि १ दिवसाचा पगार द्यावा आणि नाही दिला तर तो कापून घ्यावा सरकार ने ...
पुढील ५ वर्षात ७२००० चे लिमिट महागाई वाढेल तसे कमीत कमी वाढवून ९०००० तरी करावे...
ग्रामीण गरिबांचे ७२००० मधे भागेल, शहरात गरिबांनी राहू नये का? त्यांचे पण काहीतरी करायला पाहिजे..
मुंबई, दिल्ली बंगलोर पुणे इथे आत्ताच १००००० द्यावेत... सातारा कोल्हापूर येथे ८५००० .. बाकी भाग ७२०००..
सगळे मिळून मज्जाच मज्जा करूयात...

चापलुसी गॅंग विषय भरकटून चालूच आहे अजून , विषय गुणवंतांचा होता बहुतेक .. काँग्रेस मध्ये एवढे गुणवंत असून पण ह्यांच्या दाजींना बैलगाडी चा आधार घ्यावा लागलाच , परत २३ एप्रिल ला उरलेले गांधी परत बैलगाडी चा आधार घेणारच आहेत ..असून खोळंबा अशी अवस्था आहे ह्यांच्या गुणवंताची , एक गुणवंत लंडन ला धावला म्हणे जास्त काही उलगडा होऊ नये म्हणून आणि एक तिहार जेल कडे ..लै बेकार अवस्था होईल अस दिसतंय बेल पार्टी ची , मस्त व्यूहरचना केली आहे सगळे गुणवंत पळत सुटलेत निवडणुकीतच..

<< अर्थतज्ज्ञ की अकलेचे दिवाळखोर
जामीनावर सुटलेला आरोपी गरिबांना वर्षाला ७२००० रुपये देणार आहे. त्यांच्या सध्याच्या हिशेबाने हा वार्षिक बोजा ३६०००० कोटी रुपये इतका असेल.
आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचे कॉर्पोरेट टॅक्स वगळून इन्कम टॅक्स कलेक्शनचे रिव्हाईज एस्टीमेट ५२९००० कोटी इतके आहे.
काँग्रेस लोकांना टॅक्स वाढवून पिळून या खिरापतीची तरतूद करणार आहे. >>

--------- ते जामिनीवर सुटले आहेत, आपल्याकडे अनेक वर्षे तडीपार केलेले आरोपी आहेत. पुराव्या अभावी आणि कटकारस्थान रचुन सुटले.

७२,००० रुपयांची योजना अत्यंत कल्पक आहे, आणि सामान्यातल्या सामान्य जनतेला केंद्रस्थानी गृहित धरुन अत्यंत विचारपुर्वक मांडलेली आहे. तळागाळातल्या लोकांचा फायदा बघणारा धाडसी नेता म्हणजे राहुल गांधी आहेत.

<<< ही मी भीती घालत नसून तसे सुतोवाच काँग्रेसी विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी केले आहे. कालच्या लोकसत्तेत या योजनेबद्दल त्यांचा लेख आलाय.
त्यात या पैशाची तरतूद कशी करायची याबाबत त्यांनी धक्कादायक विधाने केली आहेत....
प्रत्यक्ष करांचा ( इन्कम टॅक्स ) दर वाढवावा लागेल. >>
------ यात धक्कादायक काहीच नाही. गेल्या पाच वर्षात जनतेने अनेक धक्के पचवले आहेत, आता तावुन सुलाखुन निघालेली आहे.

<< ग्रामीण रोजगार योजनेचा एकत्रित विचार करावा लागेल.(म्हणजे नक्की काय ते त्यांनाच ठाऊक. बहुतेक इधर का माल उधर)
अनुत्पादक खर्च कमी करावा लागेल..( काँग्रेसचा डीएनए तर उधळपट्टीचा आहे. कमी करूनच दाखवावा.) >>
------- काही तासांसाठी दहा-विस लाखांचा पोषाख घालुन स्वत:ला मिरवणारे पंतप्रधान आणि दुसर्‍या बाजूला अगदी सामान्य "गांधी" वादी जिवन जगणारे... यात उधळपट्टी कोण करतो हे जनता ठरवणार.

लाखो रुपयांच्या सूटावर संपुर्ण नाव सोन्याने मढवले होते.... किती चिप.
खुप बोंबा-बोंब झाल्यावरच तो सूट लिलावात काढावा लागला... "गरिबांना" पैसे वाटले... अरे गरिबांना पैसे वाटायचेच होते तर आधीच वाटले असते. एव्हढी आदळ आपट करुन, धाकट दपशा दाखवुन किती जमले तर तुटपुंजे चार कोटी रुपये... होणार्‍या टिकेपासुन पंतप्रधानांना वाचवल्याबद्दल परतीमधे त्या व्यावसायीकाला सूटासोबत अजुन काय मिळाले असेल हे गुलदस्त्यातच राहिले.
बूंद सी गई वो हौद से नही आती.

जाहिरातींवर किती हजार कोटीची उधळपट्टी होते?
https://www.thehindu.com/news/national/modi-govt-spent-4343-crore-on-pub...

परदेश दौर्‍यांसाठी किती हजार कोटी खर्च झालेला आहे?
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/over-rs-20...

उधळपट्टी याला म्हणतात.

<< हितसंबंधीयांचा रोष पत्करून काही अनुदानांचा फेरविचार करावा लागेल.( ते गेले ***त)
यामुळे जर अर्ध्या पाऊण टक्क्यांनी वित्तीय तूट वाढली तर त्यामुळे देशाचे काही नुकसान होणार नाही. आता तुम्ही मला सांगा इतकी निर्लज्ज आणि धोकादायक विधाने करून हा विद्वान त्या चोराच्या बिनडोक योजनेला पाठीशी घालतोय. आणि एक दशांश टक्का जीडीपी कमी झाला तर आग लागली म्हणून बोंबाबोंब करणारे कुबेर हा कचरा छापत आहेत. काय दिवस आलेत आपल्यावर... >>
------ निवडणू कांची धामधुमीत आकडे तपासाणे आव्हानात्मक आहे...

<< गांधी कुटुंबाच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला निवडणुकीत देशोधडीला लावणे हे आपले परमकर्तव्य आहे.
मोठया संख्येने बाहेर पडा, भाजपला पूर्ण बहुमत मिळवून द्या, मोदींना कमीतकमी आणखी ५ वर्षे मिळवून द्या. >>
------- मोठ्या संख्येने बाहेर पडा... आणि धर्मांध/जात्यंध शक्तींचा बिमोड करा.
काम करणारे, प्रामाणिक नेते यांना निवडा. ते जिथे नसतील तिथे दगडापेक्षा विट बरी अशी भुमिका घ्या.

<< #फिरएकबारमोदीसरकार >>
------- India Shinning part II

<< ही पोस्ट व्हायरल करा. लोकांना कळू दे की काँग्रेस अर्थव्यवस्थेला कसा सुरुंग लावणार आहे. हे असले काँग्रेसी गुणवंत भाजपम्ध्ये नाहीत हीच धागाकर्त्याची खंत आहे का? >>
-------- मागच्या पाच वर्षात प्रत्येक नागरिकाला १५,००,००० रुपये मिळालेत, आणि तो आर्थिक फटका अर्थव्यावस्थेने व्यावस्थित पेलवला तर हे ७२,००० रुपये काहीच नाही.

कोंग्रेस आघाडीच्या राजू शेट्टी यांनी ब्राम्हण लोक सैन्यात जात नाहीत अशा अर्थाचं विधान केलं आहे. वास्तविक, अनेक ब्राम्हण सैन्यात आहेत आणि पुरुषच नव्हे तर स्त्रियाही आहेत. जैन समाजातील राजू शेट्टी यांनी आधी आपल्या समाजाच्या योगदानाची माहिती द्यावी. पण अर्थात, काँग्रेसच्या propaganda ला अनुसरूनच हे स्टेटमेन्ट आहे. काँग्रेस समर्थक ब्राम्हण लोकांचं आश्चर्य वाटतं की इतके अपमान सहन करतात, संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांसमोर मन झुकवतात. कठीण आहे.

राजू शेट्टी भाजपातही होते ना ?

ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, काँग्रेसचे मत नव्हे. स्वतः काँग्रेस अध्यक्ष जानवे घालून फिरतात.

भारतीय सेनाच काय , अमेरिकन सरकारही ब्राह्मणांच्या हुशारीवरच टिकून आहे , असे विधान तुम्हीही करू शकता, तितके स्वातंत्र्य तुम्हांसही आहे.

ब्राह्मण.
मला वाटू लागलंय म.ब्रा. हे रोहिंग्यांसारखेच एन्डेन्जर्ड स्पिशी आहेत.

साधं सोप गणित आहे 1 व्यक्ती 1 मत ह्या मुळे लोकशाहीत ब्राह्मण मताला जास्त राजकीय किमत नाही कारण त्यांची लोकसंख्या महाराष्ट्रात कमी आहे त्यमुळे महाराष्ट्रात राजकीय नेते ब्राह्मण समाज वर टीका करतात .त्यांच्या कडे ब्राह्मण samajani दुर्लक्ष करावे राजकारणा तून सत्ता काबीज करण्या पेक्षा ias आणि ips बनून राज्यकर्ता बनावे

आपण ground reality cha विचार केला तर सर्वांना हे नक्कीच माहीत आहे नोकरी मिळवणे किती अवघड आहे ते सुधा सरकारी .सुखवस्तू घरातील मुलगा एक तर उच्च शिक्षण घेतो किंवा पैसे आसतात त्यामुळे धंद्यात settle होतो सैन्यात जाणे हा पर्याय तो वापरत नाही .मग तो कोणत्याही जातीचा असेल तरी .
देश सेवा म्हणून सैन्यात जाण्याचे प्रमाण किती असेल आणि नोकरी म्हणून सैन्यात जाणाऱ्या लोकांचे प्रमाण किती असेल .ह्या प्रश्नात च सर्व उत्तर आहेत.
त्यामुळे राजू शेट्टी chya विधानाला फक्त राजकीय किंमत आहे

राजू शेट्टी भाजपातही होते ना ?
~ नाय नाय ते राजु शेट्टी आता काँग्रेसचेच वो काका.... जे जे गैरसोयीचे ते सगळे काँग्रेसचे.. पण तो कोण एक भारतीय जवानांच्या पत्नींबद्दल अश्लाघ्य अपमानास्पद बोललेला तो भाजपचा असून गुपचूप होते हे लोक.

कश्मिरी पंडीत, सैन्यातले ब्राह्मण असे काही मुद्दे आले तेव्हाच कसे सिलेक्टीवली बेंबीच्या देठापासून बोंबाबोंब करायला लागतात.

सुखवस्तू घर, उच्च शिक्षण आणि धंद्यात सेटल होणे हा ट्रेंड कधीपासून सुरू झाला ? ५ वर्ष,१० वर्ष....७० वर्ष नक्की कधीपासून?

माझे दोघेही चुलत भाऊ आहेत सैन्यात. हो, ऑफिसर आहेत आणखीन. काय आहे ना, ब्राह्मणांना शिकण्याची भारी हौस असते. त्यातुन ते जातात वरच्या पदाला. कोणी काहीही म्हणो, शिव्या देवो, समजो. ब्राह्मणांनी त्यांच्या वाटेत कितीही अडथळे आले तरी प्रगती केलीय आणी करत रहाणाराच.

ब्राह्मण सैन्यात नाहीत असे कुजकट बोलणार्‍यांनी इतिहास वाचावा. जनरल वैद्यांसारखे कित्येक सापडतील. पण ब्राहण द्वेषाची पट्टी डोळ्यावर असल्यावर ते कधीच दिसणार नाही. आणी असे अगणित राजू शेट्टी इथे मायबोलीवर पण दिसतायच म्हणा. Proud

काँग्रेसच्या propaganda ला अनुसरूनच हे स्टेटमेन्ट आहे >> त्याचप्रमाणं संघ आणि भाजपाच्या प्रपोगंडाला अनुसुरूनच यांची पोस्ट आहे.

जनरल वैद्यांसारखे कित्येक सापडतील.>> ते वैद्य शिंपी नाहीतर सिकेपी तर नव्हेत ना..?? चेक करा बघु आधी Proud

संघ भाजप मोदींचा प्रपोगंडा हिंदू खतरे में
ब्राम्हण, ब्राह्मण नाही बर्का, खतरे में हा त्या आयडीचा पर्सनल अजेंडा आणि प्रपोगंडा.

ब्राह्मणांनी त्यांच्या वाटेत कितीही अडथळे आले तरी प्रगती केलीय आणी करत रहाणाराच.
ब्राह्मण आहे म्हणून शिक्षण, धंद्यात कोणते अडथळे आले? उच्च शिक्षण मिळताना काही अडचण आली का?

21 vavya शतकात समस्या वेगळ्या स्वरूपाचा असताना राजकीय नेत्यांनी कोणत्या ही विशिष्ट जातीला टारगेट कारणे बिलकुल सहन करण्या सारखे नाही मग तो नेता कोणत्या ही पक्षाचा असू धा राजकीय जीवनातून बाहेरच गेला पहिजे

>> ब्राम्हण, ब्राह्मण नाही बर्का, खतरे में हा त्या आयडीचा पर्सनल अजेंडा आणि प्रपोगंडा

सनव यांची संतुलित स्ट्रॉमॅन आर्ग्युमेंट्स दाखवुन दाखवुन मला कंटाळा आला. ताई जनाची नाही तर मनाची बाळगुन त्यांचा पर्सनल अजेंडा सोडतील अशी भाबडी आशा होती पण कस्चं काय, ज्याचं जे आर्ग्युमेंट नाहीच त्याच्या तोंडी ते कोंबुन व्हिक्टीम कार्ड भिर्कावत कांगावा करायचा हेच करताहेत त्या गेले कित्येक महीने.

राहुल गांधी यांच्या मुलाखतीला सुरूवात होण्याआधी सुबोधनं स्वत:ची ओळख करून दिली. ‘मी अभिनेता आहे आणि आजवर अनेक बायोपिक मी केले आहेत. मला अनेकदा लोक सांगतात की तू राहुल गांधींसारखा दिसतो. त्यामुळे माझा पुढचा बायोपिक मला राहुल गांधींवर करायचा आहे’. असं सुबोध म्हणला. यावेळी ‘तू माझ्यासारखा दिसण्यापेक्षा मीच तुझ्यासारखा दिसतो असं म्हटलं तर योग्य ठरेल’, असं राहुल गांधी मिश्लीकपणे म्हणाले.

भावे = गांधी = जनेउधारी

https://www.loksatta.com/elections-news/raju-shetty-statement-against-br...

खरे तर त्यांना माफी मागायची पण जरुर नव्हती. कारण रागाच्या भरात माणुस कधी कधी काय बोलतो, ते त्यालाच उमगत नाही. आणी निवडणुकांच्या वेळी कुठलिही माहिती गोळा न करता डायरेक्ट विधाने करुन जो गोंधळ माजवला जातो त्याने त्या माणसाची प्रतिमा अजून विस्कळीत बनते.

डिजे सोडा, तुमच्या सारख्यांना ते समजायाचे नाही. Proud राजु शेट्टींनी माफी मागीतली आम्ही माफ केले. राजू शेट्टींनी स्वतःचे चूकले ते तरी मोठ्या मनाने जाहीर केले आणी आम्ही मोठ्या मनाने माफ केले. विषय संपला. तुम्हाला वाढवायचा असेल तर तो तुम्ही आणी तुमचे मित्र वाढवुन खेळत बसा.

शेट्टीने कुठे आणि काय पाचर ठोकली आहे ते तुम्हाला कळालेलं दिसत नाहीय रश्मी वैनी. आता तुम्हीच बघा काय आणि कसे होतेय ते. Proud

माझा प्रश्न पुन्हा एकदा लिहितो. इथल्या स्त्रीवादी स्त्री आयडींबद्दल प्रचंड नवल वाटतं.
पचास करोड की गर्लफ्रेंड, काँग्रेस की विधवा, बलात्काराच्या धमक्या, बाजारबसवी यासारखे शब्द वापरणार्‍यांची मांदियाळी म्हणजे भाजप. संघाचे स्त्रियांबद्दलचे विचार उघडच आहेत.
तर अशा पक्षाला हे स्त्रीवादी स्त्रीआयडी पाठिंबा का देतात?

एखाद्या स्त्रीला जर्सी गाय म्हटलेलं त्यांना खटकणार नाही, कारण त्यांचे स्वतःचे विचारही रेसिझमने भारलेले आहेत.

Pages