भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

<< जनता जाणते वगैरे शब्द वापरून कोणाला मूर्ख बनवतात हे? असे बोलण्याचे कारण म्हणजे जनतेतल्या प्रत्येक व्यक्तीला असे वाटले पाहिजे कि इतर जनता मोदिन्सोबत आहे त्यामुळे तू एकटा वेगळा राहून काय उखाड्शील .. असे करून एक एक विरोधातला व्यक्ती खोट्या जनाधाराची भीती घालून पलटवण्याचे षड्यंत्र आहे. >>
------- योग्य निरीक्षण आहे... असे म्हणायचे आणि स्वत:ला धिर द्यायचा.

पायाखालची वाळू सरकते आहे म्हणुन तर... बालकोट, क्षेपणास्त्र नष्ट, अनेक अनेक सॅटेलाईट सर्व प्रकार झाले.... अजुन एक हुकमी एक्का येणार आहे... किती फरक पडेल हे लवकरच समजेल कारण भारताच्या जनतेचे प्रश्न वेगळेच (बेरोजगारी, काळा पैसा, शेतकर्‍यांचे प्रश्न आणि आत्महत्या, विविध जाती-धर्म यामधे द्वेष पसरवणे) आहेत आणि त्यांच्या लेखी या कशालाही प्राधान्य नाही आहे.

<< मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळचा पादचारी पुल कोसळला तरी त्याचा दोष थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी वा मुख्यमंत्री एवेंद्र फ़डणवीस यांच्यापर्यंत पोहोचत असतो. जणू तेच नित्यनेमाने त्या पुलाची पहाणी करून रोजच्या रोज त्याची देखभाल करणारे कर्मचारी असतात. >>
-------- प. बंगाल मधे पुल कोसळल्यावर मोदी यांचे वक्तव्य. १:४९ नंतर अगदीच म्हत्वाचा संदेश आहे.
https://scroll.in/video/806344/watch-narendra-modi-say-the-kolkata-flyov...

<< अन्यथा अशा कुठल्याही बाबतीतले दोष त्यांच्या माथी कशाला मारले गेले असते? >>
-------- त्यांनी आधी तेच काम केले आहे. २६-११ च्या मुंबई हल्यानंतर चा त्यांचा संदेश बघा. हल्लेखोरांवर सम संपुर्णा नियंत्रणही मिळवलेले नव्हते, हल्ला सुरुच होता आणि यांच्या भाषणात पंतप्रधानांना दोष... मग अगदी त्याच न्यायाने उरी, पठाणकोट, पुलवामा येथे अतिरेकी हल्ला झाल्या नंतर मोदी यांना दिल्या जात असेल तर ते योग्यच आहे.
तुम्ही जसे पेराल तसेच उगवणार.
मोदींचे २६-११ हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशीचे भाषण गुगला...

<< दिल्लीनजिक दादरी येथे उत्तरप्रदेश पोलिसांची हुकूमत असताना व त्या राज्यात समाजवादी पक्षाचे अखिलेश सरकार सत्तेत असतानाही, अखलाख नावाच्या मुस्लिमाला जमावाने ठार मारले, तर गुन्हेगार पंतप्रधान मोदी असतो.>>
------ १, २ तुरळक घटना आणि एक ट्रेंड या मधे फरक आहे.
अगदीच ताज्या घटनेत, उ. प्र. मधे तर जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला, पोलीस अधिकार्‍याचा खुन केला... राज्यात सत्ता भाजपाची, केंद्रात सत्ता भाजपाची.
काश्मीरी भारतीयांना लखनौमधे मस्त चोपले... राज्यात सत्ता भाजपाची, केंद्रात सत्ता भाजपाची.
२५-३० च्या जमावाने गुडगाव ( हरियाणा) मधे मुस्लिम घरात शिरुन त्यांना मारहाण केली... राज्यात सत्ता भाजपाची, केंद्रात सत्ता भाजपाची.

हिंसाचार कुठेही झाला पहिली जवा जबाबदारी राज्याची असते, पण त्या मधे एक ट्रेंड दिसत असेल तर केंद्र हस्तक्षेप करतोच.

२००२ गुजरात दंगलीच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांना "राजधर्मका पालन करे" अशी समज दिली होती.
https://www.youtube.com/watch?v=xDzugJ1WiNo

त्यावेळी मोदी सरकार बरखास्त होणार होते... पण लालकृष्ण आडवाणी यांनी मोदी यांना संजिवनी दिली... आणि वाचवले.... आज लालकृष्ण आडवाणी यांना त्या निर्णयाचा सर्वात जास्त पष्चाताप होत असेल.

<< त्यात स्थानिक पोलिस वा ठाणेदार वगैरे कोणी दोषी नसतो. थोडक्यात कुठेही काही विपरीत घडले, तर त्यातला आरोपी मोदी असतात. अगदी पुलवामा येथे लष्करी ताफ़्यावर हल्ला झाला, तर छप्पन इंची छाती म्हणून मोदींना जाब विचारला जातो. >>
------- अरे २०१४ च्या आधी सर्व दोष पंत्प्रधान मनमोहन सिंग यांना देणारे मोदीच होते ना ?
आता नियम बदलला का ?

<<जणू त्या प्रत्येक लष्करी तुकडीचा म्होरक्या मोदीच असतात. तिथे काही गफ़लत झाली, तर गुन्हेगार मोदीच असतात. हे आजकाल पुरोगामी तर्कशास्त्र झाले आहे. >>
------- काल अगदी अशाच प्रकारचा दोष देणारे मोदी / भाजपा होते... आता ते सरकारात गेले म्हणजे तर्क शास्त्र बदलले का ?

पण हीच मोजपट्टी लावायची झाल्यास तिथे काही चांगले वा स्पृहणिय झाले, तर त्याचेही श्रेय मोदींनाच द्यायला नको का? तिथे तात्काळ स्पेशल केस म्हणून तर्कशास्त्र पलटी मारत असते.

<< हवाई दलाने पाकिस्तानात बालाकोटला जाऊन मोठा प्रतिहल्ला केल्यास त्याचे श्रेय मात्र सरकार वा मोदींना असू शकत नाही., तिथे हवाई दल वा सेनादलाची पाठ थोपटायची असते. हा भेदभाव किंवा पंक्तीप्रपंच आता नित्याचा झाला आहे आणि डोळसपणे त्याकडे बघणारी सामान्य जनताही त्यातला भेदभाव समजू लागलेली आहे. त्यामुळेच कालपरवा अवकाशात उपग्रहाचा वेध घेणार्‍या क्षेपणास्त्राच्या विकासाचे श्रेय मोदींचे आहे, हेही जनता जाणते आणि त्याची ग्वाही देण्यासाठी डीआरडीओ या संस्थेचे माजी प्रमुखही समोर आलेले आहेत. >>
------ बालकोट ला हल्ला केला आणि ३००च काय ३००० अतिरेकी मारले असे मी समजतो...
त्या बाजूला काही तर हालचाली झाल्या असत्या ? जखमींना दवाखन्यात नेण्यासाठी, मृतांना बाहेर काढण्यासाठी?
१००० - १००० किलो चे अनेक स्फोटके टाकल्यावर काहीच नुकसान झाले नाही?
याला पण 'सरकारचा' जुमला समजायचा का?
३०० मोबाईल "बंद" झाले हे जसे शोधता आले तसे स्फोट घडवणार्‍याच्या हालचाली, ३०० किलो स्फोटके कशी/ कुठून आली हे का नाही अगोदर शोधले?

लखु रिसबुड , तोरसेकरना हा व्हिडीओ दाखव.
"प्रधान मंत्रीजी आप मुझे बताईये, सारा कम्युनिकेशन भारत सरकार के हात मे है, आप कोई भी फोन टॅप कर सकते हो, आप् ने अभीतक क्या किया? अभीभी घुसपेटी भारत के अंदर कसे आते है ? कितने आतण्कवादीयोंको आपने विदेशसे भारत लाया?
आतंकवादीयोंके पास बाहर से गन आता है, गोला बारूद आता है, हवाला के माध्यमसे पैसा आता है, पैसा बँको के माध्यमसे आता है, प्रधान मंत्री, आप ईतनी निगरानी नही रख सकते? ये राज्योंका विषय नही है.. ये आपका विषय है.. काय किया है आपने ?"

नरेंद्र मोदींनी २०१२ मध्ये मनमोहन सिंगांना भाषणात विचारलेले हे काही प्रश्न.

(https://www.youtube.com/watch?v=SZQwy91riOo&t=737s२०:०० ते २३:००)

दुचाकीच्या परवान्यावर चारचाकी चालवणाऱ्या कडून होतात नियमांच्या छोट्या मोठ्या चुका , चारचाकीची चावी काढून घेणे हाच आता पर्याय आहे. प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही, त्यांच्या मंद बुध्दीला ते कळणारही नाही.

शालजोडितले?? अहो, चक्क कानफटीत वाजवली आहे त्या लखुच्या आणि भावड्याच्या

अर्थतज्ज्ञ की अकलेचे दिवाळखोर

जामीनावर सुटलेला आरोपी गरिबांना वर्षाला ७२००० रुपये देणार आहे. त्यांच्या सध्याच्या हिशेबाने हा वार्षिक बोजा ३६०००० कोटी रुपये इतका असेल.

आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचे कॉर्पोरेट टॅक्स वगळून इन्कम टॅक्स कलेक्शनचे रिव्हाईज एस्टीमेट ५२९००० कोटी इतके आहे.
काँग्रेस लोकांना टॅक्स वाढवून पिळून या खिरापतीची तरतूद करणार आहे.

ही मी भीती घालत नसून तसे सुतोवाच काँग्रेसी विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ भालचंद्र मुणगेकर यांनी केले आहे. कालच्या लोकसत्तेत या योजनेबद्दल त्यांचा लेख आलाय.

त्यात या पैशाची तरतूद कशी करायची याबाबत त्यांनी धक्कादायक विधाने केली आहेत....

प्रत्यक्ष करांचा ( इन्कम टॅक्स ) दर वाढवावा लागेल.

ग्रामीण रोजगार योजनेचा एकत्रित विचार करावा लागेल.(म्हणजे नक्की काय ते त्यांनाच ठाऊक. बहुतेक इधर का माल उधर)

अनुत्पादक खर्च कमी करावा लागेल..( काँग्रेसचा डीएनए तर उधळपट्टीचा आहे. कमी करूनच दाखवावा.)

हितसंबंधीयांचा रोष पत्करून काही अनुदानांचा फेरविचार करावा लागेल.( ते गेले ***त)

यामुळे जर अर्ध्या पाऊण टक्क्यांनी वित्तीय तूट वाढली तर त्यामुळे देशाचे काही नुकसान होणार नाही.

आता तुम्ही मला सांगा इतकी निर्लज्ज आणि धोकादायक विधाने करून हा विद्वान त्या चोराच्या बिनडोक योजनेला पाठीशी घालतोय. आणि एक दशांश टक्का जीडीपी कमी झाला तर आग लागली म्हणून बोंबाबोंब करणारे कुबेर हा कचरा छापत आहेत. काय दिवस आलेत आपल्यावर...

गांधी कुटुंबाच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला निवडणुकीत देशोधडीला लावणे हे आपले परमकर्तव्य आहे.

मोठया संख्येने बाहेर पडा, भाजपला पूर्ण बहुमत मिळवून द्या, मोदींना कमीतकमी आणखी ५ वर्षे मिळवून द्या.

#फिरएकबारमोदीसरकार

आनंद देवधर
०१/०४/२०१९

ही पोस्ट व्हायरल करा. लोकांना कळू दे की काँग्रेस अर्थव्यवस्थेला कसा सुरुंग लावणार आहे. हे असले काँग्रेसी गुणवंत भाजपम्ध्ये नाहीत हीच धागाकर्त्याची खंत आहे का?

डुक्करखाऊ आनंद देवधर आहे का हा? संघी-भाजप्यांच्या कोणत्याच बोलण्यावर कधीच विश्वास ठेवायचा नसतो.

त्यात स्थानिक पोलिस वा ठाणेदार वगैरे कोणी दोषी नसतो. थोडक्यात कुठेही काही विपरीत घडले, तर त्यातला आरोपी मोदी असतात. अगदी पुलवामा येथे लष्करी ताफ़्यावर हल्ला झाला, तर छप्पन इंची छाती म्हणून मोदींना जाब विचारला जातो. >>
------- अरे २०१४ च्या आधी सर्व दोष पंत्प्रधान मनमोहन सिंग यांना देणारे मोदीच होते ना ?
भारतात राजकीय पक्षात काही तरी फरक हवा ना .
त्यानी अस केले होते म्हणून आम्ही पण तसेच करणार हे कोणते लॉजिक aahe.
आणी परत कॉंग्रेस च सांगत असते आमच्या पक्षाची उज्वल परम्परा आहे .
नक्की कशावर विश्वास ठेवायचा

मोदींनी अर्थव्यवस्थेवर अणुबॉंब टाकलेला नोटाबंदीच्या रूपात. त्यात होरपळलेल्यांसाठी न्याय ही योजना आहे.

नोटाबंदी चा अर्थव्यवस्थेवर दूरगामी वाईट परिणाम झालच नाही .फायदाच झाला उलटा सर्व पैसे बँकेत जमा झाले

अरे राजा , तुला अर्थव्यवस्थेतील ' अ ' कळला असता तर असं बोलला नसता.
पैसा बँकेत गेला होय? नोटाबंदी मुळे ज्यांचे रोजगार गेले ते कोणत्या बँकेत गेले ? देणार का पकोडे वाले मोदी ते?

तू समजून सांग म्हणजे महिती पडेल अर्थशास्त्र ची डिग्री clg मध्ये घेतली आहे की कॉंग्रेस नि बोगस डिग्री दिली आहे ते .
समजू दे सर्वाना

देवधर साहेबांना सांगा ते ७२००० स्विस बँकेत जाणार नाहीत, इथल्याच अर्थव्यवस्थेत फिरणार आहेत.अर्थव्यवस्थेचे चाक गती घेणार आहे.

गोंदियातील मोदींच्या सभेला येण्यासाठी मिळाले १५० रुपये, सिग्नल टोळी गावातील महिलांची कबुली
--- माबो वरील भक्त बिचारे फुक्ट राबतायत. भक्त नस्लेले लोक १५० रुपये कमवतात.

बोगस डिग्री वाल्यांनी तुमचे बौद्धिक घेऊन मेंदूचे अपरिमित नुकसान केले आहे, आता तुम्हाला शिकवणे कठीण आहे.

१.शेतकर्यांच्या वाढलेल्या ( 14 हजारपेक्षा जास्त ) आत्महत्त्या चर्चेत नाहीत.
२.स्वामीनाथन आयोग लागू करण्यावर चर्चा नाही.
३.कामगार कायद्यातील अनिष्ट बदलांवर चर्चा नाही.
४ मागासवर्गीय यांच्या बढतीतील आरक्षणावर चर्चा नाही
५.महिला आरक्षणावर चर्चा नाही.
६.बेरोजगारी प्रचंड वाढलेली असतांना, बेकारी कमी करण्यासाठी कोणतीही चर्चा नाही.
७.दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर चर्चा नाही.
८.मुस्लिमांच्या दारिद्र्यावर, सच्चर अहवालावर चर्चा नाही.
९.आदिवासींच्या वन हक्कापासून रेशन कार्डापर्यंतच्या कोणत्याच प्रश्नावर चर्चा नाही.
१०.नोटाबंदीतून लादल्या गेलेल्या मंदीची व त्यात म्रुत्यु पडलेल्या ११० लोकांवर काहीच फोकस नाही.
११.गोरगरीबांच्या उपाशी राहण्याची व कुपोषणाने दगावण्यासंबंधी चर्चा नाही.
१२.खचत चाललेल्या लघु-उद्योगांची, बंद पडत चाललेल्या छोट्या व्यवसायांची चर्चा नाही.
१३.साडे तीन लाख करोड रुपये बुडीत कर्जासंबंधात काहीच चर्चा नाही.
१४.भारतातील मोठे उद्योगपती चाळीस हजार करोड रुपये घेऊन पळाले त्यासंदर्भात काहीच चर्चा नाही.
१५. गॅस सिलेंडर , डिझेल व पेट्रोलचे भाव वाढले त्या संदर्भात काहीच चर्चा नाही(आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव प्रति ब्यारल कमी असतानाही).
१६. अंदाजे पाचशे सैनिक व 80 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्या संदर्भात काहीच चर्चा नाही.
१८. 28 हजार करोड रुपये रिझर्व बँकेच्या रिझर्व्ह फंडातून काढून इतर बँकांना देण्यासंदर्भात, आजपर्यंतच्या इतिहासात कधीही न घडलेल्या बाबींची काहीच चर्चा नाही.
१९. गोरक्षणाच्या नावाखाली दलित, आदिवासी व अल्पसंख्यांक समाजावर झालेले शेकडो अत्याचार, त्यांना मारहाण व मृत्यूंची काहीच चर्चा नाही.
२०.भारतातील अंदाजे चार ते पाच करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्या संदर्भात काहीच चर्चा नाही.
२१. उच्चवर्णीय समाजातील लोकांनी पाकिस्तानातील आयएसआयला भारतीय लष्करा संदर्भात गुपिते विकली त्यासंदर्भात काहीच चर्चा नाही.
२२. भारतीय संविधान जाळून देशद्रोही कृत्ये करण्यासंदर्भात काहीच चर्चा नाही.
२३. मनुवादी विरोधात लिहिणाऱ्या विचारवंतांच्या हत्या घडवून आणल्या गेल्या, त्या संदर्भात काहीच चर्चा नाही.
२४. करोडो रुपयांची स्फोटके मनुवादी व सनातनी विचारसरणीच्या अनुयायाकडे व संस्थाकडे सापडलीत याची काहीही चर्चा नाही.
२५.स्वीस बँकेतील भारतीयांचे काळे धन दुपटीने व अब्जावधीने वाढले त्यासंदर्भात काहीच चर्चा नाही.
२६. भारतातील अब्जोपतींची संख्या 42 वरून दुप्पट झाली त्या संदर्भात काहीच चर्चा नाही.
२७. दलित आदिवासी व अल्पसंख्यांकावरील,शेकडो मा‌‌ॅबलींचिंगच्या घटना घडल्या व त्यात शेकडो लोकं मारली गेलीत,त्याची काहीच चर्चा नाही.
२८.मागिल २०१४ च्या सार्वत्रीक निवडणूकीत भ्रष्टाराचे प्रचंड आरोप करण्यात आले, पैकी मागिल पाच वर्षात कोणतीही कारवाई नाही या विषयावर चर्चा नाही. भ्रष्टाचाराचे सर्व आरोप खरे होते तर त्यावर कारवाई का केली गेली नाही? कि त्यावेळी केलेले सर्व आरोप खोटे होते या विषयी चर्चा नाही !

मग निवडणूका नेमक्या कोणासाठी आहेत? आणि भारताची संसद नेमकी कोणाला उत्तरदायी आहे?

ह्या सर्व विषयावर विरोधका नाच चर्चा नको आहे .प्रत्येक प्रश्नांचे उत्तर सरकार देईल आणि विरोधक तोंडावर पडतील अशी परिस्थिती आहे

मोदी प्रचारसभांत नोटाबंदीबद्दल बोलताहेत का?
बोलत असतील तर काय?
बोलत नसतील तर का बोलत नाहीत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गोंदियामधील प्रचारसभेमध्ये राष्ट्रावादीच्या नेत्यांवर केलेल्या टिकेल्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप तिहार जेलवर अवलंबून आहे असं वक्तव्य करणाऱ्या मोदींना आव्हाड यांनी उत्तर देताना, ‘आम्ही अटकेला घाबरणाऱ्यांमधले नाही’ असं म्हटलं आहे.

मोदींनी गोंदीया येथील प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना तिहार जेलची भिती वाटत असल्याचे वक्तव्य केले होते. ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आजकाल झोप येत नाही. त्यांची झोप तिहार जेलवर अवलंबून आहे. तिहार जेलच्या आत जो गेला आहे तो काही बोलेल का, हा प्रश्न त्यांना छळतो आहे. सर्व गोष्टी लवकरच बाहेर येतील, तो दिवस दूर नाही’, असं विधान पंतप्रधानांनी या सभेमध्ये केलं होतं. या वक्तव्यावरुनच आव्हाड यांनी मोदींना सुनावले आहे. ‘चंद्रकांत पाटील आणि मोदींमध्ये काहीच फरक नाही. चंद्रकांत पाटील हे राज्यातील मंत्री आहेत. पण ते जे बोलतायत तेच मोदी पंतप्रधान म्हणून बोलताय. हे दोघेही फक्त घाबरवण्याचं काम करतात. दर चोवीस तासाने पाच मिनिटे ते तुम्हाला पकडू, तुम्हाला पकडू असं करत घाबरवण्याच काम करतात. अटकेला घाबरून पळवणाऱ्यांची तुमची जात, आम्ही घाबरणाऱ्यांमधले नाही. स्वातंत्र्यलढ्यात जेवढे माफीनामे आहेत ते सर्वजण तुमचे नातेवाईक आहेत. ती तुमची पिल्लावळ आहे. अटकेला सामोरे गेलेले गांधी होते,’ असं सांगत आव्हाड यांनी मोदींच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे.

समजून तर सांगा फक्त डायलोग नकोत
हाच प्रश्न पंतप्रधानांना विचार, विकास दाखव, फक्त डायलॉग नको.

जेलमध्ये जाण्याचे सगळे गुण असताना बिचारे सत्तेत बसले, निवृत्ती साठी त्यांची जागा ते दुसऱ्यांना कशाला देतील?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आजकाल झोप येत नाही. त्यांची झोप तिहार जेलवर अवलंबून आहे. तिहार जेलच्या आत जो गेला आहे तो काही बोलेल का, हा प्रश्न त्यांना छळतो आहे. सर्व गोष्टी लवकरच बाहेर येतील, तो दिवस दूर नाही’,>>>>>

हे असेच काहीसे ये 2014 मध्ये पण बोलत होते ना? किती जण तुरुंगात गेले?
तुरुंगात गेले सोडा....किती जनांविरुद्ध चौकशी सुरू झाली?

ते पण सोडा... किती जणांविरुद्ध तक्रार नोंदवली गेली?

Pages