भाजपामध्ये असलेली गुणवंतांची/ नेत्यांची उणीव

Submitted by भरत. on 18 March, 2019 - 01:23

गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.

गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?

तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्‍या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.

सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्‍यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.

राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अ‍ॅपरंटली, इट अ‍ॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.

आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.

दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.

भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?

सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्‍या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मग तुम्ही आधी उल्लेख फक्त काँग्रेसचाच का केला होता ? >>

हा प्रश्न माझ्यासाठी असेल तर माझा प्रतिसाद पुन्हा वाचा.

आता काळजी मिटली! विखे-पाटील, मोहिते-पाटील, आदी गुणवंत पिता-पुत्र नेते भा.ज.पा. कडे आले आहेत!! आणखीही येताहेत म्हणे!!!
प्रभाकर (बापू) करंदीकर

संसार करा , पोरे मोठी करा , हे असले क्षुद्र संसारी रस्ते कशाला?

अख्खे घराणेच भाजपात घ्यायचे , उदा मनेका वरूण, आताचे हे विखे , मोहिते वगैरे

आणि नेहरू गांधी नावाने ओरडत फिरायचे

आणि नेहरू गांधी नावाने ओरडत फिरायचे >>>

याची चर्चा आधी झालेली आहे.

यावरील चर्चा पाहण्यासाठी प्रियांका वद्रा यांच्यावरील धाग्यातील 2 ते 5 या पानांवरील प्रतिसाद वाचावेत.

जे काँग्रेस चे जुने नेते किंवा त्यांची मुले भावी सत्ताधारी पक्ष BJP असेल असं समजून BJP मध्ये गेले हयात nalike ते काँग्रेस चे नेते आहेत की bjp वाले

In 2014 India Today published an article titled "The worst defence minister ever: AK Antony's tenure, the longest for a defence minister, has seen scams, crises, unpreparedness". Those who complain about shortage of able persons in BJP should also consider that Congress is also not full of capable persons.

दिगोची, तुम्ही व्हॉट अबाउट टाइप लिहिलंय. मला वाटत की काँग्रेसची उदाहरणे देण्यापेक्षा धागलेखकाने कुठल्या मापदंडांवर व कुठल्या पुराव्यांच्या आधारे ते सर्व विश्लेषण केलंय हे आपण विचारलं पाहिजे.

भाजपे पूर्वी लढले त्यापेक्षा कमी सीट लढणार आहेत म्हणे.

मग पूर्वीपेक्षा जास्त सीट कशा जिंकणार ?

लाट कुठे गेली ?

मग पूर्वीपेक्षा जास्त सीट कशा जिंकणार ?

Plata o plomo उर्फ अमितशाह असल्यावर असा प्रश्न?
मॉर्निंग वॉक करायचा नाही वाटतं तुम्हाला..!

पहिल्या निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार जाहीर होवू द्यात मग माहीत पडेल कोण किती उमेदवार उभे करत आहे ते
आणि नंतर त्या विषयावर चर्चा करा
Mature कधी होणार

मला तर रॉबर्ट वदरा फार आवडला, ज्या लंडनने भारतावर राज्य केले , तिथे ह्याने 9 फ्लॅट / बंगले घेतलेत म्हणे.

नाहीतर भाजपयांचे चौकीदार, संडास बांधून फोटो मिरवत बसलेत.

Proud

<< मला तर रॉबर्ट वदरा फार आवडला, ज्या लंडनने भारतावर राज्य केले , तिथे ह्याने 9 फ्लॅट / बंगले घेतलेत म्हणे. >>
------- आमच्या निरवजींचा पण ८ - ११, मिलीयन पौंडाचा अलिशान फ्लॅट जवळच आहे...

<< नाहीतर भाजपयांचे चौकीदार, संडास बांधून फोटो मिरवत बसलेत. >>
------ किमान शब्दात कमालीचा प्रभाव.... हे तुमच्या कडून शिकण्यासारखे आहे.

गुणवन्त सनातन समर्थकाला कोंग्रेसने रत्नागिरीत तिकीट दिल्याची बातमी वाचली आणि मनापासून खोखो हसायला आलं. काय टॅलेंट जमतंय काँग्रेसमध्ये. लोल्स!

भाजपमधे गुणवंत नेत्यांचि वानवा नसती तर कोंग्रेस-राकाँ मधुन आयत केलेल्यांना तिकीट का बरं दिलं असतं?? अगदी पायघड्या घालुन त्यांना घेत आहेत.

जर भाजप वाले काँग्रेस-राकाँ मधील आयात उमेदवारांनाच उमेदवारी देणार असतील तर मग सरळ काँग्रेस-राकाँ च्याच उमेदवारांना मते दिलेली काय वाईट..??

मग भाजप कडुन मैदानात उतरलेल्या एक्स्पिरियंस्ड लुटारुंपेक्षा काँग्रेस-राकाँ कडुन उमेदवारी मिळालेल्या फ्रेशर्सना निवडुन आणणे जनतेच्या हिताचे नाही का..? Wink

काल परवा टीव्हीवर बातम्यात ज्याच्या विषयी गोंधळ चालला होता, तोच का हा? Uhoh

टीव्हीचं माहित नाही पण सोशल मीडियावर लोकांची हसून हसून पुरेवाट झाली आहे. कोंग्रेसचे लोक कधी सनातनवर बंदीची मागणी करतात आणि आता त्यांच्या माणसाला तिकीट दिलंय. ओम फट स्वाहा! Biggrin
अशोक चव्हाण म्हणतात की त्यांचं कोणी ऐकत नाही. महाराष्ट्रात आघाडीचे अनेक नेते ऑलरेडी भाजपात गेलेत किंवा रांगेत उभे राहिलेत. अर्थात कोणी भाजपात गेल्याने काँग्रेसला फरक पडणार नाही त्यांच्याकडे आता नवसाधक तयारच असतील. Lol
ही फक्त स्टेट लेव्हलची गुणवत्ता. नॅशनल लेव्हलला तर डोळेच दिपतील. १२००० प्रति महिना पण वर्षाला ७२००० गरिबांना देणार असं गणित व रिऍलिटी दोन्हीला उलटपालट करणारं तत्वज्ञान राहुलजींनी मांडलंय. तर राम काल्पनिक होता, किंवा तो वाईटच होता इथपासून सुरु करून आता प्रियंकाजी रामभक्त बनून अयोध्येला जाणार आहेत.

१५ लाखांची चौकशी कधी न करणारे आता हजाराची गणिते तपासून पाहू लागलेत... गुड. लोकशाहीत प्रश्न विचारणारे हवेतच.

भाजप सेना युतीची लोकसभा २०१९ ची काही महत्वाची उमेदवार यादी

कोल्हापूर ---- संजय मंडलिक (वडिल सदाशिवराव मंडलिक... राष्ट्रवादी चे खासदार होते)

हातकणंगले---- धनंजय माने ( आई राष्ट्रवादी च्या खासदार होत्या व आजोबा काँग्रेस चे खासदार)

सातारा------ नरेंद्र पाटिल ( माजी आमदार राष्ट्रवादी)

सांगली----- संजय काका पाटिल ( माजी आमदार राष्ट्रवादी)

बारामती -----कांचनताई राहुल कुल ( सासु राष्ट्रवादीच्या आमदार होत्या तर सासरे काँग्रेस चे आमदार)

माढा १----- रणजितसिंह मोहिते पाटील ( माजी खासदार राष्ट्रवादी तीन पिढ्या काँग्रेस मध्ये)

माढा 2----रणजित निंबाळकर (काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष)

उस्मानाबाद------ ओमराजे निंबाळकर ( वडिल पवनराजे काँग्रेस कार्यकर्ते जिल्हा बँक, तसेच सह. साखर कारखाना)

नांदेड------प्रताप पाटील चिखलीकर (काँग्रेस माजी आमदार)

नगर------ सुजय विखे ( तीन पिढ्या काँग्रेस मध्ये)

नंदुरबार------ हिना गावित ( वडिल राष्ट्रवादीत माजी मंत्री)

दिंडोरी----- भारती पवार (सासरे राष्ट्रवादीचे दिवंगत ज्येष्ठ नेते माजी मंत्री, आमदार ए. टी पवार )

आता ज्या लोकांना हे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक भ्रष्ट वाटत होते ते आता कोणाला मतदान करणार ?

पूर्णवेळ स्वयंसेवक मेले झोळ्या वाहून वाहून लग्न न करताच
Proud

त्याचे कारण असे असावे की आताच फक्त पूर्ण बहुमतांनी BJP sarkar banle आहे त्या अगोदर वाजपाई चे सरकार सुधा पूर्ण बहुमत वाले नव्हते .
आणि BJP chi ताकद शहरी भागातच होती ग्रामीण भागात पूर्वी पासूनच काँग्रेस,राष्ट्रवादी मजबूत आहे सर्व बँका,कारखाने, ह्या दोन्ही पक्षाकडे आहेत. जे काही आयात उमेदवार आहेत ते ग्रामीण भागातील .

भाजप सेनेतर्फे कोणीही उभं असेल तरी आता काही उपयोग होणार नाही. काँग्रेसचे गुणवान सनातन नवसाधक आहेत समोरच्या बाजुला. Biggrin

काही भाबडे प्रश्न , ७२ हजार रोख देणार कि मोदी नि काढून दिलेल्या बँक खात्यात ? ५ कोटी फॅमिलीज ला ७२ हजार म्हणजे एकूण ३ लाख ६० हजार कोटी , गरिबांना आणि शेतकऱ्याचा सगळं कर्ज माफ म्हणजे त्याचे साधारण ४-५ लाख कोटी , गरिबांना ५०० स्के. फुटाची घर म्हणजे त्यासाठी २-३ लाख कोटी, खतांसाठी ७५ हजार कोटी, डिझेल साठी काही लाख कोटी , आरोग्यासाठी परत काही लाख कोटी - पैसे राहुल गांधी घरचे देणार आहे कि लोन काढून, मोदींनी १५ लाख काय सरकारच्या बजेट मधून द्यायचे म्हणाले होते का ?, राहुल गांधी ना जास्त साऊथ चे सिनेमे बघत जाऊ नका असे वाईट परिणाम होतात ..

Pages