गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.
गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?
तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.
गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.
सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.
राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अॅपरंटली, इट अॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.
आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.
दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.
भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?
सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?
नाह,
नाह,
शंबीत पात्रा ला पुढे मागे मंत्री केले तर त्याच्या ऐवजी TV शो वर जाऊ देत.
मनोरंजन मै कमी नहीं होनी चाहीये
कमाल आहे या लोकांची.
कमाल आहे या लोकांची. भाजपमधल्या उच्च गुण्वत्तेची, अत्युच्च कार्यकुशलतेची चर्चा करायला धागा काढला, तर तिथेही काँ ग्रेसबद्दलच बोलताहेत. भाजप आणि मोदींबद्दल बोलण्यासारखं काहीच नाही की काय?
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/52145
मोदीना , भाजपाला वारस कोण , हे ह्यांनी शोधून पाहिले होते,
पण मोदी बाजूलाच राहिले , हा धागाच बेवारस झाला.
कमाल आहे या लोकांची.
कमाल आहे या लोकांची. भाजपमधल्या उच्च गुण्वत्तेची, अत्युच्च कार्यकुशलतेची चर्चा करायला धागा काढला,

<<
भाजपाचे सोडा तुम्ही. पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीर आहेत सरकार चालवायला व त्यांनी पाच वर्षे सरकार चालवले सुद्धा.
--
बाकी तुम्ही लेखात मांडलेले व तथाकथित पुरोगामी, विचारवंत, बुद्धीजीवी वगैरे बेरोजगार लोक मिडीयात जे वायफळ बरळत असतात ते फक्त नावालाच आहे.
ह्यापाठी खरे कारण हे आहे की मोदी सरकार सत्तेत आल्यापासून ह्या सर्व रिकामटेकड्या लोकांना कॉंग्रेसची खुषमस्करी करण्याकरता जी पोटगी मिळत होती ती बंद झाली व एका क्षणात हे खुषमस्करे बरोजगार झाले.
व आता पुन्हा भाजपा सत्तेत आल्यास हातात कटोरा घेऊन रस्त्यावर उभी राहायची वेळ ह्या रिकामटेकड्यांवर येईल ह्या भितींने हे सर्व कॉंग्रेसी खुषमस्करे आज भाजपावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. ह्यांच्या एका तरी आरोपात दम असता तर टिव्हीवर बोंबलत बसण्याऐवजी हे सरळ कोर्टात गेले असते.
जाऊ द्या. तुम्ही बीबीसी न्युज
जाऊ द्या. तुम्ही बीबीसी न्युज हब वाचा किंवा तिथे लिहा.
अवांतर
अवांतर
१) पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते. गोव्यात दुखवटा पाळणे हे अगदी योग्य. त्यांना सद्गती मिळो.
ते औट घटकेचे संरक्षणमंत्री होते. अशा माजी केंद्रीय मंत्र्यांबाबतीत सार्वत्रिक दुखवट्याच्या काय प्रथा आहेत किंबहुना सगळ्याच सरकारी दुखवट्याच्या प्रथा काय आहेत? राष्ट्रध्वज अर्ध्यावर कधी उतरवला जातो ? तो तसा किती काळ असतो?
दुखवट्याच्या दिवसांत कोणते कार्यक्रम वर्ज्य असतात? खरे तर मला ध्वजसंहितेविषयीसुद्धा प्रश्न पडतात. पूर्वी वाचल्याप्रमाणे राष्ट्रध्वजस्तंभ अमुक इतक्या उंचीचाच असावा असे नियम होते. प्रचंड उंचीचे स्तंभ आणि अवाढव्य आकाराचे राष्ट्रध्वज असू शकतात का? बागेत, सार्वजनिक उद्यानात कायमस्वरूपी राष्ट्रध्वज उभारता येतो काय? राष्ट्रध्वज केव्हाही हातात धरून मिरवता येतो का? खेळांच्या सामन्यात तसा तो अनेकवेळा दिसतो म्हणून विचारले. हे प्रश्न प्रामाणिकपणे विचारले आहेत.
अवांतर २)आमच्या भागात शनिवार रात्रीपासून एका चित्रपटगृहात रात्रीच्या वेळी एक चित्रपट फुकट दाखवत आहेत. अख्खी झोपडपट्टी लोटते आहे तो बघायला. देशभक्तिपर असावा बहुधा.
१) पर्रीकर हे गोव्याचे
१) पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते. गोव्यात दुखवटा पाळणे हे अगदी योग्य. त्यांना सद्गती मिळो.
<<
अगदी बरोबर, गोव्यात बहुतेक सात दिवसाचा राजकिय दुख:वटा जाहिर केला आहे.
--
ते औट घटकेचे संरक्षणमंत्री होते. अशा माजी केंद्रीय मंत्र्यांबाबतीत सार्वत्रिक दुखवट्याच्या काय प्रथा आहेत किंबहुना सगळ्याच सरकारी दुखवट्याच्या प्रथा काय आहेत?
<<
ते औट घटकेचे संरक्षणमंत्री होते म्हणूनच सरकारने देशभर फक्त औट घटकेचे म्हणजे एका दिवसापुरते राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्याचे आदेश दिले आहेत. आता स्वर्गीय मनोहर पर्रीकर 9 November 2014 ते 13 March 2017 पर्यंत देशाचे संरक्षण मंत्री होते. ह्याला औट घटका म्हणता येईल का ?
---
तुमच्या भारतीय झेंड्याबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर "Flag code of India" इथे आहे
--
२)आमच्या भागात शनिवार रात्रीपासून एका चित्रपटगृहात रात्रीच्या वेळी एक चित्रपट फुकट दाखवत आहेत. अख्खी झोपडपट्टी लोटते आहे तो बघायला. देशभक्तिपर असावा बहुधा.
<<
अक्खी झोपडपट्टी सिनेमा बघायला लोटते, तेही रात्री. यावरुन मला तरी नाही वाटत ते देशभक्तिपर पिश्चर दाखवत असतील.
एक दिवस जरी पद भूषवले तरी
एक दिवस जरी पद भूषवले तरी सन्मान सारखाच असतो ना ?
एक दिवस जरी पद भूषवले तरी
एक दिवस जरी पद भूषवले तरी सन्मान सारखाच असतो ना ?
नवीन Submitted by BLACKCAT on 18 March, 2019 - 18:33
<<
तो सन्मान फक्त कॉंग्रेसीना असतो इतरांना नाही.
नाहीतर राजीव गांधीच्या मृत्युवेळी ते पंतप्रधान नसूनही ७ दिवसाचा दुख:वटा जाहिर केला होता संपूर्ण देशभर.
वाजपेयी वारले तेव्हा ते
वाजपेयी वारले तेव्हा ते पंतप्रधान होते का?
किती दिवसांचा दुखवटा पाळाला होता?
https://www.google.com/amp/s/m.timesofindia.com/india/vajpayee-to-be-acc...
शंबीत पात्रा ची रिप्लेसमेंट उगाच नाही म्हणत
सिम्बा, त्यांना याची सवय आहे.
सिम्बा, त्यांना याची सवय आहे.
एवढे हुरळून जायची काहीच गरज
एवढे हुरळून जायची काहीच गरज नाही लोकसत्ताकार.
---
वाजपेयींच्या मॄत्युवेळी भाजपा सत्तेत होती म्हणून तो बहुमान त्यांना मिळाला. नाहितर नरसिंहरावांच्या मृत्युनंतर कॉंग्रेसने त्यांची कशी हेटाळणी केली हे सर्व देशाने पाहिले आहे.
अनिरुद्धांचे एकंदरीत कारनामे
अनिरुद्धांचे एकंदरीत कारनामे पाहता हा मिलिंद जाधवांचा पुनरावतार असावा असे वाटू लागले आहे
अनिरुद्धांचे एकंदरीत कारनामे
अनिरुद्धांचे एकंदरीत कारनामे पाहता हा मिलिंद जाधवांचा पुनरावतार असावा असे वाटू लागले आहे
नवीन Submitted by सिम्बा on 18 March, 2019 - 19:29
<<
अड्डा गॅंगच्या ठेवणीतल्यानो तुम्ही एक काय ते ठरवा, मी नक्की कुणाचा पुनरावतार आहे तो.
एक जण मंदार जोशी म्हणतो. दुसरा विजय आंग्रे म्हणतो तर तिसरा मिलिंद जाधव. नक्की मी कोण आहे ते फायनल झाल्यावर इथे सांगा उगाच कंन्फुझ नका करत जाऊ.
सिम्बा, त्यांचा उद्देश
सिम्बा, त्यांचा उद्देश भाजपमधल्या गुणवत्तेच्या अभावावरचा आणि मोदीनी सगळ्या पॉवर्स स्वतःकडे घेण्याच्या मुद्द्यावरचा फोकस स्वतःवर घेणं असा आहे. सावध.
पहिला प्रतिसाद पटला
पहिला प्रतिसाद पटला
हे हल्ली धागे काढू लागले आहेत हे पाहून खूप बरे वाटले
भरत नक्की भीती कसली वाटतीय ,
भरत नक्की भीती कसली वाटतीय , एवढे उतावीळ पणा कशाला ? स्वर्गवासी मनोहर पर्रीकर ह्यांना जो काँग्रेस ने त्रास दिला होता तो ह्याच मेन्टॅलिटी चा भाग होता, राहुल गांधींनी तर ५ मिनिटाच्या भेटीत राफेल चा विषय काढून त्याचा निष्कर्ष पण काढला होता त्यावर पर्रीकर साहेबांनी शेवटी लिखित जाब मागितला होता ..आजारपणाच्या भेटी च्या नावाखाली जायचा आणि म्हणायचं कि राफेल ची कागदपत्र साहेबांच्या घरी आहेत असा पत्रकार परिषदेत म्हणायचं का तर तो माणूस आजारी आहे त्याला उत्तर देता येणार नाही, दैनिक हिंदू मध्ये सुद्धा पर्रीकर साहेबांचा शेरा वगळून अर्धवट मजकूर छापला होता आणि लगेच काँग्रेस ने तोच दाखवून स्वतःची थू थू केली होती , आत्ताही पर्रीकर साहेबांची तब्येत खालावली असतानाच काँग्रेस ने लगेच सरकार स्थापनेचे पात्र राज्यपालांना दिले , हे सगळे लोक बघत आहेत ..शेवटी हेच कि काँग्रेस आता उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अश्या तोऱ्यात आहे ..काँग्रेसच्याच मित्र पक्षाच्या जितेंद्र आव्हाड ह्यांनी तर हद्द केलीय म्हणे पर्रीकर साहेब हे राफेल चे पहिले बळी ..अरे थोडी तरी जनाची नाही मनाची ..
शेवटी धाग्याचे नाव बदलायची
शेवटी धाग्याचे नाव बदलायची नामुष्की ओढवलीच तर.
<<
हा माणूस आयटी सेल चा आयडियल मेंबर आहे.
उद्या उठून भरत यांनी सकाळी चहा पिऊन कपबशी विसळली तरी,
शेवटी कपबशी धुवायची नामुष्की ओढवलीच तर. अस्ली फडतूस दिशाभूल कॉमेंट हा मारणारच.
***
बाकी पर्रीकर नावाच्या खाण घोटाळा भ्रष्ट माणसाबद्दल, व (केजरीवालबद्दलही कोणताही आदर नसताना)त्याची जीभ छाटली पाहिजे छाप टिपिकल भाजपेयी बरळणार्या माणसाबद्दल कोणताही आदर माझ्या मनात नाही.
कॅन्सरच्या वेदनांपासून सुटले. भाजपा/मोदी-शहा कडून अधिक नाचवले गेल्यापासून सुटले. बरे झाले. इतकेच म्हणतो.
अन हो.
अन हो.
हाय बेफि, बाय बेफी.
आम्ही बघतांय हा, आमी बघतांय.
आता व्यवस्थित सुटोत,
आता व्यवस्थित सुटोत, बाजपेयीं व्हायला नकोत
Nmte, तुम्ही पूर्ण खोटं ल
Nmte, तुम्ही पूर्ण खोटं ल
लिहिलं आहे, ते जाब विचारून पर्रीकर स्वतः तोंडावर पडले, संघी बाता आता चालत नाहीत उघड्या पडतात लगेच,
धागाकर्त्यांची भाजपविषयीची
धागाकर्त्यांची भाजपविषयीची इतकी कळकळ पाहून फार भरुन आले हो.
अशीच कळकळ सच्चा कार्यकर्त्याप्रमाणे काँग्रेसबद्दलही दाखवावी ही नम्र विनंती, कारण तिथे अध्यक्षांच्याच कर्तबगारीची वानवा आहे, बाकीच्यांची काय कथा?
मेरे जन्म से पहले इस देश के
मेरे जन्म से पहले इस देश के लोग सापो से खेळते थे , अब चुहो से ( कॉम्पुटर) खेलते है
असे कधी बोलले होते म्हणे ?
BJP मध्ये गुणवंताची कमी आहे
BJP मध्ये गुणवंताची कमी आहे मग काय बाकी सर्व पक्षात गुणवंत ठासून भरले आहेत की काय .
बाकी पक्षात gunvsntanchi संख्या खूप वाढल्या मुळे त्यांचा ओव्हरफ्लो BJP chya दिशेने चालू आहे .
की त्या सर्व पक्षांना त्यांच्या असलेल्या गुणवंत लोकांची कदर नाही
काँग्रेसमधल्या हिंदुत्वाचा
काँग्रेसमधल्या हिंदुत्वाचा ओव्हरफ्लो बाजूला वळवून हेडगेवारनी संघ निर्माण केला, 1925
<राहुल गांधींनी तर ५
<राहुल गांधींनी तर ५ मिनिटाच्या भेटीत राफेल चा विषय काढून त्याचा निष्कर्ष पण काढला होता त्यावर पर्रीकर साहेबांनी शेवटी लिखित जाब मागितला होता> हे मी राफेलच्या धाग्यावर आधीही लिहिलंय.
पर्रिकरांनी त्या भेटीत असं काही म्हटलंय असं राहुलनी कधीही म्हटलेलं नाही. उलट त्याआधीच पर्रिकरांनी तसं म्हटलंय, तेही मीडियाशी बोलताना, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत, हे उत्तर दिलेलं आहे.
बाकी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नाहीत असं दिसतं.
१. जागा भरायला माणसं का मिळत नाहीत?
२. सगळे अधिकार पंतप्रधानांकडे का एकवटले आहेत?
३. तज्ज्ञ लोक का सोडून जात आहेत?
<अक्खी झोपडपट्टी सिनेमा
<अक्खी झोपडपट्टी सिनेमा बघायला लोटते, तेही रात्री. यावरुन मला तरी नाही वाटत ते देशभक्तिपर पिश्चर दाखवत असतील>
यांच्या डोक्यात किती प्रकारचे पूर्वग्रह आहेत? किती प्रकारच्या लोकांचा हे द्वेष करतात?
१. काँग्रेसी, पुरोगामी , वगैरे
२. परधर्मीय
३. उत्तर प्रदेश , बिहारचे लोक
४. गरीब.
देशभक्तीपर चित्रपट एकच ,
देशभक्तीपर चित्रपट एकच , विवेक ओबेरॉयचा , तो अजून येणार आहे.
म्हणून ते तसे बोलले
१. जागा भरायला माणसं का मिळत
१. जागा भरायला माणसं का मिळत नाहीत?
२. सगळे अधिकार पंतप्रधानांकडे का एकवटले आहेत?
३. तज्ज्ञ लोक का सोडून जात आहेत?
>>>> प्रियांका गांधींना उगवता तारा म्हटलेल्या धाग्यात तुम्ही मला गांधी खानदानाच्या माहितीसाठी RTI दाखल करायला सांगितला. मग वरील प्रश्नांच्या उत्तरांसाठी तुम्ही RTI दाखल का करत नाही. तुमचा आणि तुमच्या कंपूचा अजेंडा सेट असल्याने कुणी काहीही उत्तर दिले तरीही तुम्ही ते मान्य ना करता त्यातून टिंगल कशी करता येईल तेच पाहणार.
{तुम्ही ते मान्य ना करता
{तुम्ही ते मान्य ना करता त्यातून टिंगल कशी करता येईल तेच पाहणार}
दोन्ही बाजूचे प्रतिसाद स्वतःच लिहून मोकळे व्हायचं
यह अच्छी बात नहीं है।
Pages