गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचं काल निधन झालं. कॅन्सरशी त्यांची झुंज त्यांच्या मरणाने संपली. त्यांना श्रद्धांजली.
गोवा सरकार निर्नायकी झाले. तसेही पर्रिकरांच्या आजाराने गंभीर रूप घेतल्यापासून गोव्याला मुख्यमंत्री नसल्यागत होता. नळ्या अडकवलेल्या अवस्थेत काम करता नाची त्यांची छायाचित्रे वेदनादायी होती. त्याही आधी गोवा विधानसभेच्या निवडणूक निकालानंतर पर्रिकर मुख्यमंत्री असतील या अटीवरच भाजपला अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून सत्त्ता स्थापन करता आली होती. त्यासाठी देशाच्या संर क्षणमंत्रीपदासारखे महत्त्वाचे पद सोडून पर्रिकर परतले होते. गोव्यासारख्या लहानशा राज्यात एक पर्यायी नेतृत्व असू नये?
तिथे दिल्लीत पाहिलं तर मोदीसरकारमध्ये पाच वर्षांत जेमतेम अर्था काळ एक पूर्णवेळ संरक्षणमंत्री असावा.
आधी अरुण जेटली अर्थखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्यासोबत संर क्षण खात्याचा कारभार बघत होते.
ते आजारी पडल्यावर पीयुष गोयल रेल्वे, कोळसा आणि अर्थ अशी तीन मोठी मंत्रालये पाहत होते.
आधीचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे भाजपने आयात केले होते.
गृहमंत्री राजनाथ सिंग आहेत की नाहीत हेही कळत नाही. त्यांचे अनेक अधिकार सुरक्षा सल्लागार अजित दोभाल गाजवतात का, असे मानायला जागा आहे
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या प्रशासकीय जबाबदार्या पाहतात असे भासते.
मानव संसाधन सारख्या महत्त्वाच्या खात्यावर नेमलेल्या स्मृति इराणींची कारकीर्द वादग्रस्त घडामोडींसाठी आणि संसदेतल्या त्यां च्या मेलोड्रामाटिक भाषणासाठीच लक्षात राहील.
शेतीसारख्या इतर अनेक खात्यांच्या मंत्र्यांची तर नावेही आठवत नाहीत.
सरकारच्या पाच वर्षांच्या कामकाजावर नजर टाकली तर बहुतेक सर्व अधिकार पी एम ओ कडेच केंद्रित होत असल्याचे दिसते.
या सरकारात पी एम ओ मध्ये असलेल्या अधिकार्यांची संख्या आधीच्या अनेक सरकारांच्या तुलनेत बरीच जास्त आहे, असे वाचले होते.
परदेशांशी आर्थिक गुंतवणूविषयक वाटाघाटी अणि अंम्लबजावणीसाठी पी एम ओ मध्ये कक्ष उघडले गेले आहेत.
राफेल करार पंतप्रधानांनी केला. त्यांच्या सोबत दोभाल होते असे दिसते. या सरकारात ते मोदींखालोखाल पॉवरफुल आहेत. संरक्षणमंत्री असलेले पर्रिकर राफेल कराराबाबत अनभिज्ञ होते हे त्यांच्या" मला माहिती करून घ्यावी लागेल, अॅपरंटली, इट अॅपिअर्स दॅट" अशा लेखी आणि तोंडी शब्दांवरून दिसून येते. त्यांच्यानंतरच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन देशापेक्षा सरकारच्या आणि मोदींच्या संरक्षणात अधिक ऊर्जा आणि वेळ खर्च करतात असे वाटते.
आता निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षांतील नेत्यांच्या आयातीच्या बातम्या सतत येत आहेत. हेच चित्र २०१४ च्या सार्वत्रिक
निवडणुकांआधी आणि अनेक राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळीही दिसून आले. ईशान्येकडच्या राज्यांत तर सगळा विधिमंडळ पक्षच आयात लोकांनी भरलेला असल्याचे दाखले आहेत.
दुसरीकडे जिथे आम्ही सर्वाधिक सुधारणा केल्या असे मोदीसरकार म्हणते त्या क्षेत्रातले अर्थतज्ज्ञ टिकत नाहीत. रघुराम राजन, अरविंद पानगडिया, अरविंद सुब्र मण्यन, उर्जित पटेल, सुरजीत भल्ला हे लोक सरकारची साथ सोडून गेले. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी प्रशासकीय अधिकारी बसला. नोटाबंदीचे समर्थन केलेल्या मोजक्या अर्थसास्त्र्यांतला एक कुणी मुख्य आर्थिक सल्लागार झाला. नोटाबंदीच्या बाबतीत सरकारने रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून तो निर्णय लादला असे इतिवृत्तावरून दिसते.
म्हणजे तज्ज्ञ मंडळी सरकारसोबत काम करू शकत नाहीत. जे आहेत ते लोक स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडण्याची हिंमत दाखवू शकतील का याबाबात शंका आहे. गुरुमूर्तींसारखे लोक रिझर्व बँकेच्या बोर्डावर आहेत.
भाजप हा तसा जुना पक्ष आहे. ७५ वर्षांचा इतिहास असलेली त्यांची मातृसंघटना आहे, जिच्या खुणा देशाच्या कारभाराशी संबंधित प्रत्येक संस्थेत सापडतील. तरीही अशी परिस्थिती का यावी?
सगळ्या आधिकार शक्ती एका पीएमओकडे एकवटल्या आहेत. यात गुंणवान लोकांच्या अभावाइतकाच अविश्वासाचाही मुद्दा आहे. तज्ज्ञ लोकांच्या म्हणण्याला किंमत नाही. भारतासारख्या खंडप्राय, अने कपदरी विविधता असलेल्या , महाकाय समस्या भेडसावणार्या देशाच्या
कारभाराचे हे चित्र सुखद आणि आशादायक खचित नाही. एका राज्याचे प्रशासन चालवायला हे मॉडेल कदाचित चालून जाईल (त्याबद्दलही शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहेच) पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?
ह्या सगळ्यांनी काय दिवे
ह्या सगळ्यांनी काय दिवे लावलेत ते कळेल का?
Rajesh,
Rajesh,
वर मी 5 महत्वाची खाती लिहिली आहेत,
त्यांचे 2014 पासून चे मंत्री आणि त्यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय सांगाल काय?
गंगा सफाई (जल व्यवस्थापन) महत्वाचे नाही, असे तुम्ही म्हणू शकाल, पण गंगा सफाई च्या प्रॉमिस वर मोदी वाराणशी मधून प्रचार करत होते, आणि ते प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी या मंत्रालयासाजे गठन करण्यात आले होते
शरद पवार सारखा गुणवान आणि
शरद पवार सारखा गुणवान आणि अनुभवी नेता कृषिमंत्री होता देशात किती जलसिंचन योजना पूर्ण झाल्या.
किती क्षेत्र ओलिताखाली आले
शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला का .
कर्जमाफी सारखे उथळ निर्णय घेवून फक्त धनदांडग्यांना फायदा देवून मुळ समस्या जैसे थी च राहिली .किती शेतकऱ्यांना फरक जाणवला .
होम लोन वरचे व्याज कमी झाल्या मुळे वर दर्शनी फायदा दिसत असला तरी घरांच्या किमती अमर्याद वाढल्या .आणि property chi किंमत आणि त्यातून भाड्या मधून मिळणारे return ह्यांचा balance बिघडला .
कोणतीच सामाजिक सुरक्षा योजना न राबवता ठेवी वरचे व्याज कमी झाले त्यामुळे व्याजावर जगणाऱ्या लोकांची अडचण निर्माण झाली ते सुधा अर्थशास्त्रात हुशार असलेल्या पंतप्रधान होते त्या काळी
कोणत्याच सरकार chya काळात
कोणत्याच सरकार chya काळात मुंबई लोकल सेवा थोडी सुधा सुधारली नाही मग हुशार रेल्वे मंत्राचा काय फायदा .
का त्यांचे गुण फक्त कागदावर .
त्या मुळे हे सरकार गुणवान की ते सरकार गुणवान ह्या प्रश्नात तसा काही अर्थ नाही
१ ) जास्त किमतीच्या चलनी नोटा
१ ) जास्त किमतीच्या चलनी नोटा मध्ये गैर मार्गाने आलेला पैसा साठवून ठेवता येतो हे चूक आहे की बरोबर
२) लाच देण्यासाठी जास्त किमतीच्या चलनी नोटांचा वापर होतो हे चूक की बरोबर .
३) सर्व व्यवहारात ऑनलाईन पेमेंट करण्या मुळे गैरव्यवहार नियंत्रणात आणता येतो हे चूक की बरोबर .
मग ५०० आणि १००० रुपयाच्या चलनी नोटा बंध करण्या मागे सरकारचा कोणता दुष्ट हेतू होता .
फक्त नियोजन कमी पडल्या मुळे जनतेला त्रास झाला हा तोटा सोडून
नंतर अर्थव्यवस्थेवर दबाव
नंतर अर्थव्यवस्थेवर दबाव आल्यामुळे २०००, ची चलनी नोट काढावी लागली .थोडे नियाजन झाले असते तर सरकारनी ५०० रुपये किमती पेक्षा जास्त किमती ची चलनी नोटा छापली च नसता आणि हाच मुल हेतू होता पण साध्य झाला नाही .
म्हणून नोटबंदी मागे सरकारची नियत चांगली नव्हती हा निष्कर्ष काढता येत नाही
Note शुढलेखन तपासू नये
Note शुढलेखन तपासू नये
सट्टेवाले म्हणतात , बीजेपी
सट्टेवाले म्हणतात , बीजेपी येणार,
बीजेपी म्हणत होती, काळे पैसेवाले मेले. तर त्यानी बीजेपीवरच सट्टा लावला
१) लोल २) लोल ३) लोल
१) लोल
२) लोल
३) लोल
<<बाकी मी विचारलेल्या
<<बाकी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं नाहीत असं दिसतं.
१. जागा भरायला माणसं का मिळत नाहीत? - कारण भाजप माणसं पारखून निवडून घेती, चापलुसी वाले नाही घेत काँग्रेस सारखे , हा आता नाही म्हणायला भरपूर आयात चालू आहे तिकडून कारण बुडत्या जहाजात कोण बसणार ..त्यामुळे पुढच्या सरकारला तास काही प्रश्न येणार नाही, काळजी नसावी.
२. सगळे अधिकार पंतप्रधानांकडे का एकवटले आहेत?- हो कारण ते काँग्रेस च्या काळासारखे नाममात्र पद नाही , नावाला उभा केल्यासारखं, जेंव्हा सगळे मंत्री भ्रष्टाचार करत होते तेंव्हा मनमोहन बघत बसलेले..
३. तज्ज्ञ लोक का सोडून जात आहेत?>> काहींना नाही आवडत कडक शिस्त , चालायचा, काँग्रेस काळात कसे सब चलता है , बस हमको खाणे दो भाई , नाही तो हम आलू से सोना निकालाने कि फॅक्टरी लगायंगे ..१० वर्ष नुसता टाईमपास केला ह्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाने संसदेत आणि दुसर्यांना नाव ठेवंत्यात अरे आधी आपलं काय दिवे लावलेत ते तरी सांग लोकांना ..
उदाहरण बघा
१) The number of individuals filing return of income has also increased by about 65% during this period from 3.31 crore in 2013-14 to 5.44 crore in 2017-18,
२) India has also improved its standing in ease-of-doing-business rankings by 65 positions in four years. It is currently 77th among 190 countries.
३) central and state fiscal deficits have come down from 6.7 per cent of GDP over 2013–14 to 5.9 per cent over 2018–19
४) Combined direct and indirect tax revenue is predicted to rise from 10.14 per cent of GDP over 2013–14 to 12.13 per cent over 2018–19. In a time span of five years, this increase is very significant.
५) NDA government National Highway programme has been a success, they are building more kilometres per day than we did - P Chidambaram (आयटी सेल वाल्यानी ह्याची दाखल घ्यावी कारण हा तुमचा महान नेता माजी अर्थ मंत्री होता आणि सध्या १२ व्य वेळा अटकपूर्व जमीन मंजूर करून बाहेर आहे )
६) Why are global leaders with market dominance, technological superiority and decades of experience are scared of a six-year-old sarkari project?
Read more at:
//economictimes.indiatimes.com/articleshow/66591913.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
७) As per this LGBR (The Load Generation Balance Report) the country is likely to experience energy surplus of 4.6 % and peak surplus of 2.5 %.
८) http://www.worldbank.org/en/country/india/brief/developing-india-first-m...
९) https://economictimes.indiatimes.com/tech/internet/india-has-the-cheapes...
१०) The food grains production of the country last year (2016-17) reached an all-time high of 275.68 million tonnes, Neem coating of urea (NCU), both domestic production and imported, has been made compulsory since 2015 and proved to be a very effective initiative.
लिहायला गेला तर अख्खा धागा काढावा लागेल .. मोदी सरकारने केलेल्या कामाचा , काँग्रेस आयटी सेल वाल्यानी खालील लिंक ला जाऊन अभ्यास करावा
https://48months.mygov.in/themes/development-for-all/
Nmate , मी मुद्दामच त्या
Nmate , मी मुद्दामच त्या प्रश्नांना उत्तरे देण्याचं टाळत होतो. तुम्ही उत्तर दिलंय.आता ट्रोलर्स ऍक्टिवेट होतील.
फक्त नियोजन कमी पडल्या मुळे
फक्त नियोजन कमी पडल्या मुळे जनतेला त्रास झाला हा तोटा सोडून
मग दोन हजाराची नोट अजून रद्द का केली नाही? बायपास रस्ता किती दिवस ठेवणार अजून?
इथे प्रश्नच गंडलेले आहेत नि
इथे प्रश्नच गंडलेले आहेत नि धागा लेखकाच्या पुरावाहिन परसेप्शन वर आधारित माहितीने भरलेला आहे, तरीही मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
माझ्या मते तज्ञ लोक सोडून का गेले हे त्यांनी स्वतः स्पष्ट करायला हवं. धागालेखकाकडे त्या तज्ज्ञांच्या स्टेटमेंटची एखादी कॉपी असेल तर इथे डकवावी. तज्ञ लोक संत नसतात त्यामुळे ते स्वतः जोपर्यंत स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत त्या पातळीवरील व्यक्तीसाठी सोयीस्कर अंदाज बांधणे चुकीचे आहे. काही घटना तर या तज्ञांच्या वागण्याबाबत बुचकळ्यात टाकतील. उदा. रघुराम राजन यांचे संसदीय समितीला दिलेले स्टेटमेंट हल्ली प्रसिद्ध झाले होते, ज्यात त्यांनी NPA बाबत युपीए सरकारला "वारंवार" आर्थिक धोक्याची जाणीव करून दिली होती आणि यावर लवकरात लवकर कारवाई सुरू करा असेही सांगितले होते. युपीए सरकारने काहीही केले नाही. रघुराम राजन सारख्या तज्ञ माणसाने तेव्हाच निषेध म्हणून राजीनामा द्यायला हवा होता, पण ते स्वतःची टर्म संपण्याची वाट बघत बसले !
लायक माणसे का मिळत नाहीत हा आणखी एक प्रश्न. त्याआधी लायक या शब्दात तुम्ही काय बसवता यावर सगळं अवलंबून आहे. संरक्षण मंत्री म्हणून पर्रीकर, जेटली, सीतारामन या सर्वांनी त्या त्या वेळी कामे पहिली, यातील कुणीच त्या पदासाठी लायक नाही हे तुम्ही कुठल्या पुराव्यांच्या आकडेवारीच्या आधारावर ठरवलं?
गंमत म्हणजे याआधीच्या तमाम तज्ञ व लायक अर्थमंत्र्यांना "लोकांसाठी बँक खाती उघडून त्यात थेट लाभ पोहोचवता येईल का?" हा प्रश्नच पडला नव्हता.
"सगळे" अधिकार पंतप्रधानांकडे एकवटलेत--- सगळे म्हणजे कुठले अधिकार? हे स्पष्ट करा. हे वाक्य कुठल्या पुराव्यावर आधारित आहे माहिती नाही, परंतु निव्वळ सरसकटीकरण सुरू आहे. महत्वाच्या खात्यांतील मोठ्या निर्णयासाठी पंतप्रधानांकडे जादा अधिकार असणे नवीन गोष्ट आहे का? पंतप्रधान अर्थसंकल्प मांडतात की शैक्षणिक पुस्तकांतील कन्टेन्ट ठरवतात?
<<< पण देशाच्या कारभाराचे काय? एकटा माणूस ही सगळी कामे करू शकतो, असे खरेच वाटते का?>>>
त्या त्या मंत्रालयाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेताना पंतप्रधान म्हणून मोदी सामील होते तर त्या मंत्रालयाची सगळीच कामे ते बघतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
जो माणूस देशाचा गाडा हाकण्यासाठी बांधील आहे तो महत्वाच्या निर्णयात सामील असला की त्याचा सहभाग दिसून येणारच. अर्थातच याआधीचे पंतप्रधान त्या त्या मंत्र्यांवर महत्वाचे निर्णय सोपवायचे आणि मग CAG च्या अहवालातून त्यांना अमुक अमुक खात्यात भ्रष्टाचार झाला हे समजायचं. ही परिस्थिती या सरकारात निर्माण झालेली नाही.
प्रश्न पुन्हा
प्रश्न पुन्हा
१. पाच वर्षांत किती काळ पूर्ण वेळ संरक्षण मंत्री होता? किती काळ पूर्णवेळ अर्थमंत्री होता?
सुषमा स्वराज निवडाणूक लढवणार नाहीत. अरुण जेटलींचं माहीत नाही. तसंही ते २०१४ च्या मोदी लाटेतही पराभूत होऊन राज्यसभेतून निवडून येऊन अर्थमंत्री झाले.
अधिकारपदाच्या अन्य जागांबद्दल लिहिलं नव्हतं कारण त्याचा परीघ खूप मोठा होईल.
FTII, Censor board या ठिकाणी काय वकूबाची माणसं नेमली होती ते लक्षात असेलच.
२. <तज्ज्ञ लोक का सोडून जात आहेत?>> काहींना नाही आवडत कडक शिस्त , चालायचा, काँग्रेस काळात कसे सब चलता है , बस हमको खाणे दो भाई , नाही तो हम आलू से सोना निकालाने कि फॅक्टरी लगायंगे ..१० वर्ष नुसता टाईमपास केला ह्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाने संसदेत आणि दुसर्यांना नाव ठेवंत्यात अरे आधी आपलं काय दिवे लावलेत ते तरी सांग लोकांना ..> हे खरंच तुमचं उत्तर आहे ?
अरविंद सुब्रमण्यम, अरविंद पानगडिया, ऊर्जित पटेल, सुरजीत भल्ला ही या सरकारने निवडलेली+/ बोलावलेली माणसं होती.
NSSO च्या सदस्यांनी NSC च्या प्रमुखांनी बेरोजगारीची आकडेवारी दडपल्याच्या कारणावरून राजीनामा दिलाय.
अनिल काकोडकर यांनी स्मृती इराणी यांच्यावर ठपका ठेवत आय आय टी गव्हर्निंग बोर्डावरून राजीनामा दिला.
३. एकवटलेले अधिकार अ. नोटाबंदीचा निर्णय रिझर्व बँकेचे आक्षेप धुडकावून लादला.
आ. राफेलसंबंधी संरक्षण मंत्रालयाच्या अधिकार्यांनी पंत प्रधान कार्यालयाच्या हस्तक्षेपावर आक्षेप नोंदवलाय. याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर (गुणवत्तावान, कर्तबगार) हे अनभिज्ञ होते. त्यांचे शब्द - अॅपरंटली, इट अॅपिअर्स दॅट, याबाबत पंतप्रधान परत आल्याशिवाय आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलल्याशिवाय काही सांगणं कठीण आहे.
हे मॉडेल निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी ठीक आहे. पण निर्णय प्रक्रियेत ते रा बवलं तर सगळ्या बाजूंचा विचार होण्याची शक्यता घटते.
१. <१. जागा भरायला माणसं का मिळत नाहीत? - कारण भाजप माणसं पारखून निवडून घेती, चापलुसी वाले नाही घेत काँग्रेस सारखे , हा आता नाही म्हणायला भरपूर आयात चालू आहे तिकडून कारण बुडत्या जहाजात कोण बसणार ..त्यामुळे पुढच्या सरकारला तास काही प्रश्न येणार नाही, काळजी नसावी.> पुन्हा एकदा . हे तुम्हांला तरी पटतंय का? महारा ष्ट्र भाजपचे एक नेते म्हणाले होते की खुनी आणि वेडा माणूस सोडून कोणालाही भाजपमध्ये प्रवेश आहे. भाजपमध्ये लोकांची आयात होते आहे कारण निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यांच्याकडे विनेबिलिटी आहे, जी भाजपच्या त्या त्या जागीच्या नेत्यांमध्ये नाही. काम करायला तयारीची माणसं हा पुढचा मुद्दा. सं घासारखी जुनी मातृसं स्था , इतका मोठा परिवार असताना अन्य पक्षा तून लोक आयात करावे लागावे, त्यातले अनेक आपणच भ्रष्टाचाराचा आरोप केलेले असावे, हे पार्टि वि थ अ डिफरन्स आणि चाल और चरित्र वर जोर देणार्या संघटनेच्या प्रतिमेशी जुळतं का?
बघितलत शशांक, दळण कस दळतात ते
बघितलत शशांक, दळण कस दळतात ते?
Do not waste your time and energy on these posts .... not worth!
ते धाग्याच सार लक्षात ठेवा
मोदी सरकारने म्हणे डायरेकत
मोदी सरकारने म्हणे डायरेकत ब्यांकेत अमाउंट जमा केल्या
लोकांचे पगार , गेस सबसिडी पूर्वीपासून खात्यातच जाआते
भाजपातही खुनी असतील
भाजपातही खुनी असतील
प्रदेशमध्ये भाजपाला हादरा
प्रदेशमध्ये भाजपाला हादरा बसला असून पक्षातील ८ आमदारांनी नॅशनल पीपल्स पार्टीत (एनपीपी) प्रवेश केला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार असून भाजपाला सोडचिठ्ठी देण्याऱ्यांमध्ये दोन मंत्र्यांचा देखील समावेश आहे. भाजपाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्षाला रामराम केला आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार असून या राज्यात विधानसभेच्या ६० जागा आहेत. ११ एप्रिल रोजी या राज्यात मतदान होणार असून भाजपाचे पेमा खांडू हे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
It will save my time and
It will save my time and energy too. वाचणारे वाचत राहतील.
गॅस सबसिडी bjp chya सरकारच्या
गॅस सबसिडी bjp chya सरकारच्या काळात ग्राहकांच्या अकाउंट मध्ये जमा होत आहे
पहिली ही सबसिडी ऑईल कंपनी ला दिली जायची त्यामुळे खूप मोठ्या रकमेचा अपहार होयचा.
धागा काढताना चुकीचा काढला आहे bjp सरकार मध्ये गुणवंताची कमी आहे तुम्ही कसं ठरवलं .
Bjp मध्ये गुणवंताची कमी आहे असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा पहिल्या सरकार मध्ये कसे गुणवंत होते हे पटवून देणे गरजेचे होते पण ते न करता तुमच्या सोयीचा विषय काढून .युद्ध bjp chya हद्दीत लढल जावे असा चतुर पना दाखवला आहे म्हणजे कशी ही चर्चा झाली तरी BJP la नुकसान दायक होईल हा कुटील हेतू
पक्षांतर हा जुना रोग आहे
पक्षांतर हा जुना रोग आहे .ह्या रोगांनी खूप मोठं भीषण रूप घेतल्या मुळे त्या काळी सरकारला पक्षांतर बंदी कायदा करावा लागला होता
<पहिली ही सबसिडी ऑईल कंपनी ला
<पहिली ही सबसिडी ऑईल कंपनी ला दिली जायची त्यामुळे खूप मोठ्या रकमेचा अपहार होयचा> भारीच शोध आहे हा. विनोद राय ना पण क ळलं नव्हतं हे. किती मोठ्या रकमे चा अपहार?
प्रिय भाजप समर्थकांनो, भाजपमध्ये गुणवंतांची कमतरता आहे हे मान्य करणारा एक माणूस तुमच्याच गोटातून मिळाला आहे.
आधीच्या सरकारची गुणवत्ता काढणं म्हणजे व्हॉटबाउट्री. तिच्यावर बंदी आहे.
पहिली ही सबसिडी ऑईल कंपनी ला
पहिली ही सबसिडी ऑईल कंपनी ला दिली जायची त्यामुळे खूप मोठ्या रकमेचा अपहार होयचा.
_______
कसा होईल ?
१) The number of individuals
१) The number of individuals filing return of income has also increased by about 65% during this period from 3.31 crore in 2013-14 to 5.44 crore in 2017-18,
बरं मग? एकूण डायरेक्ट टॅक्स कलेक्शन किति वाढले ह्यामुळे? शोधला पण आकडे काय सापडना, तुम्ही मदत करा जरा. नंतर ह्यावर बोलु.
२) India has also improved its standing in ease-of-doing-business rankings by 65 positions in four years. It is currently 77th among 190 countries.
फुस्स! इथेही घोटाळाच. २००९ साली १७ ठिकाणांवर डेटा गोळा केलेला, आता फक्त दोन ठिकाणांवरुन केला. पुढे कदाचित पीएमओ सांगतिल तोच डेटा प्रसिद्ध करतील (आताही तसेच केले नसेल ह्याची तरी काय खात्री?_)
रँकिंगमागचे सत्यः पूर्ण आर्टिकल शेवटपर्यंत वाचा. न्युट्रल लिहिलं आहे. https://www.clearias.com/ease-of-doing-business-rank/
"Though the report acts as an indicator to understand the ease of doing business with respect to companies in major cities, it has many shortcomings.
The Ease of Business Report in India does not cover Proprietary and Partnership Firms – Despite the fact that proprietorship and partnership firms dominate the small business space, the EODB rank does not include these types of firms – it covers only companies.
The Ease of Business Report in India covers only Mumbai and Delhi – The report does not take into account the red-tapism experienced by the business firms located in tier 2 or tier 3 towns. Delhi and Mumbai cannot be taken as an exact sample of India. Actually, it is the single-window clearance for securing building permits in Delhi and a new online system in Mumbai brought about this quantum change in India’s rankings recently.
Note: Subnational Doing Business Rankings were calculated in 2009 for 17 select locations in India. However, the same is not used to find the Ease of Doing Business Rank of India.
३) central and state fiscal deficits have come down from 6.7 per cent of GDP over 2013–14 to 5.9 per cent over 2018–19
कॅल्क्युलेशनचे फॉर्मुले बदलून आकडे फेकता येतात. पण पैशाला पैसाच लागतो. त्यासाठी मग आरबीआयच्या मागे लागावे लागते, पैसे न देणारा गवर्नर हाकलून लावला जातो. हे सग्ळे का घडते? कारण फिस्कल डेफिसिट कमी झाले आहे ना? वॉव सोक्युट.
https://www.business-standard.com/article/economy-policy/what-a-widening...
४) Combined direct and indirect tax revenue is predicted to rise from 10.14 per cent of GDP over 2013–14 to 12.13 per cent over 2018–19. In a time span of five years, this increase is very significant.
सिग्निफिकंट? रिअली? जीडीपीचे फॉर्मुले बदलल्यामुळे?
५) NDA government National Highway programme has been a success, they are building more kilometres per day than we did - P Chidambaram
काँग्रेसच्या नेत्यांवर तुम्ही केव्हापासून विश्वास ठेवायलेत? तसे असेल तर राहूल गांधीवर पण ठेवा. म्हणा चौकीदार चोर है. गडकरींनी रस्ते मोजायचा फॉर्मुला बदलला हे कळले नाही का तुम्हास? पूर्वी चार लेनचा एक किलोमिटरचा रस्ता बांधायचे तेव्हा त्याला एक किलोमिटर रस्ता बांध्ला असे मोजायचे. आता त्याच चार लेनला चार किलोमिटर मोजले जाते. अशा तर्हेने स्पीड वाढला बरे. पुढे जितक्या गाड्या धावतील त्यांच्या प्रत्येकी किलोमीटर मोजून तितका रस्ता बांधला असेही दाखवतील. म्हणजे एक हजार गाड्या एक किलोमीटर क्रॉस करुन गेल्या की एक हजार किलोमिटरचा रस्ता बांधला.
गॅस सबसिडी bjp chya सरकारच्या
गॅस सबसिडी bjp chya सरकारच्या काळात ग्राहकांच्या अकाउंट मध्ये जमा होत आहे
लिहायच्या आधी थोड्डासा अभ्यास करणे अपेक्षित आहे. पण काय की साहेबांचे अभ्यासाशी वाकडे त्यामुळे त्यांच्या प्रतिसादांची नदीवर लाकडे.
https://www.moneylife.in/article/is-the-lpg-subsidy-in-your-bank-account...
ही बातमी १४ मार्च २०१४ ची आहे.
As an offshoot of this project, the union government has been aggressively pursuing for crediting the subsidy due on the liquefied petroleum gas (LPG) to consumers directly through their bank accounts linked with Aadhaar with the stated objective of curbing leakages and preventing black marketing of cylinders.
Till the end of last year, 66 million consumers in 184 high Aadhaar coverage districts, in 18 states, have been covered under the scheme. Till 31 December 2013 about 40 million cash transfers amounting to Rs2,000 crore to consumers’ bank accounts have taken place since the launch of the scheme in June 2013. And from 1 January 2014, it was proposed to cover gas consumers in Delhi and Mumbai who will get cash subsidy through their bank accounts, as the direct benefit transfer for LPGs (DBTL) scheme would be extended to 105 more districts. When this roll out is completed almost half the country covering 289 districts would get covered by this scheme.
मंडळी , आकडेवारीचा कीस
मंडळी , आकडेवारीचा कीस काढायला वेगळा धागा येणार आहे. धीर धरा.
गॅस सबसिडीच्या गप्पा कशाला
गॅस सबसिडीच्या गप्पा कशाला मारताय?
कितीतरी प्रकारच्या सबसिड्या नि लाभ अकाउंट नसलेल्या लोकांसाठीही होत्या. त्याचे पैसे त्यांना कसे मिळायचे ते राजीव गांधीनी कबुल केलय?
तुम्हा लोकान्च्या मते त्या लोकान्ना पैसे कसे मिळायचे?
भरत , कट्टा गॅंग चे वस्त्रहरण
भरत , कट्टा गॅंग चे वस्त्रहरण करत आहेत,
आता वस्त्र पुरवायला कुणी भाषाप्रभू येतील, एखादया कमेंट् चा गैर अर्थ काढून धाग्याला ट्विस्ट द्यायला
Till 31 December 2013 about
Till 31 December 2013 about 40 million cash transfers amounting to Rs2,000 crore to consumers’ bank accounts have taken place since the launch of the scheme in June 2013.
म्हणूनच विचारले होते
भाजपे , निर्मला या भारताच्या पहिल्या स्त्री संरक्षणमंत्री असे बिनदिक्कत खोटे सांगत फिरतात.
Gas subsidy च्या गप्पा राजेश
Gas subsidy च्या गप्पा राजेश १८८ यांनी सुरू केल्यात.
Pages