न्युझीलंड- दहशतवादी हल्ला

Submitted by भरत. on 16 March, 2019 - 07:33

न्यु झीलंडमधल्या ख्राइस्ट चर्च इथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. जगातला कोणताही देश अतिरेकी, द्वेषाधारित, विध्वंसक विचारसरणीपासून सुरक्षित राहिलेला नाही. या हल्ल्यानंतर न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी देशाला उद्देशून केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आश्वासक वाटलं. त्यांच्या भाषणातला हा काही भाग. (स्वैर अनुवाद)

या हल्ल्याने घायाळ झालेल्या लोकां करिता हा माझा संदेश. हा संदेश फ़क्त माझ्याच नव्हे तर माझ्या देशाच्या वतीने आहे , माझ्या देशवासियांच्या भावनाही याच असतील , याची मला खात्री आहे.
या हल्ल्यात क्षती पोचलेल्या लोकांसोबत आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. बळी पडलेले लोक ख्राइस्टचर्चचे होते. त्यातल्या अनेकांचे ते जन्मस्थान नव्हते. खरं तर त्यातल्या अनेकांनी आपल्या वास्तव्यासाठी न्युझीलंडची निवड केली होती. हा देश त्यांनी (स्थलांतरासाठी) स्वत:हून निवडला त्याच्याशी नातं जोडलं, इथे त्यांची कुटुंब होती, इथल्या समाजाबद्दल त्यांना जिव्हाळा होता आणि या समाजानेही त्यांना प्रेम दिलं. या जागी ते एक सुरक्षित निवारा शोधीत आले. इथे त्यांना त्यांच्या धर्म आणि संस्कृतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य होते.

तुमच्यातल्या अनेकांना प्रश्न पडला असेल, हे असं माझ्या देशात कसं घडू शकतं? आपण लक्ष्य ठरण्याचे कारण, आपण द्वेष करणार्‍यांना आसरा दिला हे नव्हते. आपण वंशभेदाला , अतिरेकी विचारसरणीला थारा दिला, म्हणून हा हल्ला इथे झाला नाही. यांतलं ( वंशभेद, द्वेष, अतिरेकी विचार) काहीही आपल्यात नाही, म्हणूनच केवळ आपल्याला लक्ष्य केलंय. आपल्याला लक्ष्य केलंय कारण आपण विविधता, प्रेम, आपुलकी ही तत्त्वं मानतो. ही तत्त्वं मानणार्‍यांना सामावून घेतो. निराधार गरजूंना आश्रय देतो.

या तत्त्वांपासून आम्ही जराही ढळणार नाही, ढळू शकणार नाही याची खात्री बाळगा.

दोनशे वेगवेगळ्या वंशाच्या आणि एकशे साठ भाषा बोलणार्‍यांचा हा देश आहे, याचा मला अभिमान आहे. या विविधतेत आमची काही सामाईक तत्त्वं सामावलेली आहेत. या हल्ल्याची झळ लागलेल्यांबद्दल आमच्या मनात सहवेदना आहे, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत; हे आजच्या घडीला माझे सांगणे आहे.

ज्या विचारसरणीतून हे कृत्य झालं तिचा मी तीव्रतम शब्दांत निषेध करते.
तुम्ही (आपला देश, आपला समाज म्हणून) आम्हांला निवडलं असेल, पण आम्ही तुम्हांला पूर्णपणे नाकारतोय. तुमचा धिक्कार करतोय.

Group content visibility: 
Use group defaults

कट्टर हिंदुत्ववाद्यांची पापं समस्त हिंदूंच्या माथी मारु नका हो. प्लीज. ते जे काही करत आहेत त्याला बहुतांश हिंदू लोक पाठींबा देत नाहीत. बहुतांश हिंदू हे प्रेम आणि सहजीवन ह्यात विश्वास ठेवतात. >>

फक्त काही मूठभर भडकलेली टाळकी इतकी घातक कशी ठरतात ? बाकीच्या टोळीने त्याविरोधात लगेच बोटं उचलली नाही म्हणून.

हे शांतीप्रिय हिंदू जर बहुंतांशाने होते, तर भाजप त्यानंतर दोनवरून थेट ८६ जागांवर निवडून कशी आली ? म्हणजे उघड पाठिंब्याबरोबर बऱ्याच शांतिप्रियांचा छुपा पाठिंबा होताच ना ? आणि बाबरी मशीद पाडल्याची किंमत कारसेवकांबरोबर गोध्रातल्या निरपराध हिंदूंनी चुकवली. नंतर बाकीच्या हिंदूंना हळूहळू जाग (?) आली आणि भडक विचारसरणीला खाली खेचण्याचे प्रयत्न सुरु झाले. पूर्ण यशस्वी झाले नसतील पण थोडी आशादायक प्रगती नक्कीच आहे

आता बहुतांश मुस्लिमसुध्दा शांतिप्रियच आहेत. मग उघड उघड इस्लामी दहशतवादाचा विरोध सगळीकडून का होत नाही ? शांतीप्रिय मुस्लिम एकत्र येऊन धर्मांध सत्तेला आव्हान का देत नाहीत ? अहो किमान जे शिकले सवरले मुस्लिम आहेत त्यांच्याकडून किमान उघड विरोधाची अपेक्षा आहे. काही थोडे आहेत जे खंबीरपणे चुकीच्या विरोधात उभे आहेत, पण त्यांचा आवाज अत्यंत क्षीण आहे. मोठ्या प्रमाणात त्यांना शांतीप्रिय मुसलमान जनतेचा पाठिंबा हवाय तो मिळत नाहीये.
उलट हमाससारख्या संघटनेच्या पाठी जेव्हा शिकले सावरले लोक उभे राहतात तेव्हा मात्र वाईट वाटतं ( https://www.youtube.com/watch?v=8fSvyv0urTE)

माझे मत ना पटणार्या तुमच्यापैकी कुणी तुमच्या आजूबाजूच्या किमान 5 शांततावादी मुस्लिमांना कुराणात/शरियात सुधारणा / बदल करण्याचा सल्ला देऊन जी प्रतिक्रिया मिळेल ती कृपया इथे सांगाल का? >>

हो, कधीही न बदलणारं कुराण ही मोठी समस्या आहे खरी. काहीकाही वचने तर निघृण शब्द फिका पडेल अशा आशयाची आहेत. जोपर्यंत ती हद्दपार होत नाहीत , तोपर्यंत इस्लाम पूर्णपणे लिबरल, शांतताप्रिय होण्याची शक्यता खूप धूसर आहे.

प्यू रिसर्च ह्या संघटनेने जगभर मुस्लिम लोकांना काही प्रश्न विचारले त्यातील काही प्रश्नांची उत्तरे पाहिली तर अशा मुस्लिमांना शांतताप्रिय का म्हणावे असा प्रश्न पडेल.
१. इस्लाम धर्म सोडल्यास मृत्युदंड दिला जावा का?
होय म्हणणारे: मलेशिया: ६२%, इंडोनेशियः १८%, अफगनिस्तानः७९%, पाकः७६%, बांगला देशः४४%
इजिप्तः८६%, जॉर्डनः६६%, इराकः४२%

२. महंमदाचे चित्र काढल्यास मृत्युदंड दिला जावा का?
धर्म व प्रेषित यांचा अपमान केल्यास मृत्युदंड दिला जावा का? हे सगळे इस्लामी शरियत लागू केल्यास होऊ शकते. देशाचे कायदे शरियतप्रमाणे लागू असावेत असे म्हणणारे असे आहेत.
इजिप्तः७४%, इराक्:९१%, अफ्गानिस्तानः९९%, पाकः८४%, बांगलादेशः८४%, मलेशिया:८६%, इंडोनेशिया:७२%

जर वरीलपैकी कृत्य कोणी केले (इस्लाम सोडला, धर्माचा अपमान (कशाला अपमान म्हणायचे तेही नक्की निश्चित नाही), प्रेषिताचे चित्र काढले) तर कुणी मरत नाही, जखमी होत नाही वा कुणाचे द्रव्य हिरावले जात नाही, कुणाचा अपमान होत नाही. परंतु तरी ते करणार्‍याला मृत्यूदंड दिला जावे असे इतक्या प्रचंड लोकसंख्येला वाटते. असे ज्याला वाटते त्याला शांतताप्रेमी म्हणता येईल का? माझ्या मते नाही. आणि असे लोक किती संख्येने आहेत? वरील जनमतचाचणीच्या आकड्यानुसार कित्येक कोटी आहेत. जगभर विखुरलेले आहेत.

ही एक जनमतचाचणी होती. कुणाचे वैयक्तिक मत नाही. इस्लामी अतिरेक हा निव्वळ अंगाभोवती बाँब बांधून गर्दीत घुसून तो फोडणे आणि स्वतःबरोबर अनेक लोक मारणे असा नसतो. विचारांचाही असतो.
इस्लामी अतिरेकी विचारांचे अनेक स्तर आहेत. कुणी निव्वळ वैचारिक समर्थन करतो, कुणी जिहादी संघटनेबद्दल लेखी वा मौखिक सहानुभुती व्यक्त करतो. कुणी पैसे पुरवतो, कुणी आपला एक मुलगा त्याकरता देतो तर कुणी स्वत: अशा कार्यात सामील होतो. विविध स्तरांवरील लोकांशी संख्या वेगवेगळी आहे. पण प्रत्येकाचा इस्लामी दहशतवादात सहभाग आहे.

इस्लामी अतिरेकी विचारांचे अनेक स्तर आहेत. कुणी निव्वळ वैचारिक समर्थन करतो, कुणी जिहादी संघटनेबद्दल लेखी वा मौखिक सहानुभुती व्यक्त करतो. कुणी पैसे पुरवतो, कुणी आपला एक मुलगा त्याकरता देतो तर कुणी स्वत: अशा कार्यात सामील होतो. विविध स्तरांवरील लोकांशी संख्या वेगवेगळी आहे. पण प्रत्येकाचा इस्लामी दहशतवादात सहभाग आहे. >>

एक शेवटचं वाक्य सोडलं तर बाकी प्रत्येक शब्दाशी सहमत.

पण रॅडिकल इस्लाम मुळात इतका फोफावला त्याचं कारण कट्टर मुस्लिमांपेक्षाही कित्येक मवाळ मुस्लिम, जे या विरोधात उठून उभे राहत नाहीत, हे आहे.>>>>>
आता इकडे मुस्लिम च्या जागी हिंदू घाला बरं,

आणि मग मवाळ हिंदू जर एखादया गोष्टी विरोधात उभे राहिले तर त्यांची कशी संभावना होते ते आठवा, त्यांनि धर्मनिष्ठ मुस्लिमांचे कसे अनुकरण केले पाहिजे असे सांगितले जाते ते आठवा

पण रॅडिकल इस्लाम मुळात इतका फोफावला त्याचं कारण कट्टर मुस्लिमांपेक्षाही कित्येक मवाळ मुस्लिम, जे या विरोधात उठून उभे राहत नाहीत, हे आहे. >>> याच्याशी अजिबात सहमत नाही. इतर सर्वसामान्य जनतेप्रमाणे त्या मवाळ मुस्लिमांनाही त्यात पडायचे नसते. अशा अतिरेकी लोकांची त्यांच्या स्वतःच्या समाजातील विरोधकांकरताही तितकीच दहशत असते. असे असंख्य लोक आहेत की ज्यांना आपले कुटुंब, आपले काम वगैरे हेच महत्त्वाचे असते. कोणी अतिरेकी त्याच्या धर्माचे आहेत म्हणून त्याच्यावर इतरांपेक्षा वेगळी जबाबदारी वगैरे येत नाही.

जे अतिरेकी आहेत त्यांचे काय करायचे ते करावे. जे लोक यात पडत नाहीत व अशा हल्ल्यांचे समर्थन करत नाहीत अशा लोकांनी त्यात इण्ट्रोस्पेक्शन वगैरे करावे असा त्यांचा त्यात काही संबंध नसतो

आणि मग मवाळ हिंदू जर एखादया गोष्टी विरोधात उभे राहिले तर त्यांची कशी संभावना होते ते आठवा, त्यांनि धर्मनिष्ठ मुस्लिमांचे कसे अनुकरण केले पाहिजे असे सांगितले जाते ते आठवा. >>

होतेच ना. कुठे नाही होत संभावना? तरीसुद्धा राजा राम मोहन रॉय, फुले, गांधी, आंबेडकर सगळे अंगार झेलून उभे राहिलेच की, हे ही आधीचे हिंदूच ना?
फुल्यांनी हिंदूंच्या रुढी बदलल्या, गांधींनी विचार बदलले आणि आंबेडकरांनी अन्यायाला वाव देणारा धर्मच बदलला. कट्टर हिदुंचा कांगावा फार काळ टिकला नाही, बाकीच्या न्यायप्रिय हिंदूंचा भक्कम पाठिंबा त्यांच्यामागे उभा राहिला..

आता मला एक असे मुस्लिम सुधारक दाखवा, ज्यांचं काम कुरानविरोधात पण न्याय्य आहे म्हणून पूर्ण मुस्लिम समाज त्यांच्या मागे ठामपणे उभा राहिला? आपले हमीद दलवाई, घशाच्या शिरा ताणून दमले, पण बाकी मुस्लिम समाजाने त्यांना हळूहळू खड्यासारखे बाजूला केले (https://m.timesofindia.com/india/hamid-dalwai-man-who-started-triple-tal...)

इतर सर्वसामान्य जनतेप्रमाणे त्या मवाळ मुस्लिमांनाही त्यात पडायचे नसते. अशा अतिरेकी लोकांची त्यांच्या स्वतःच्या समाजातील विरोधकांकरताही तितकीच दहशत असते. असे असंख्य लोक आहेत की ज्यांना आपले कुटुंब, आपले काम वगैरे हेच महत्त्वाचे असते. कोणी अतिरेकी त्याच्या धर्माचे आहेत म्हणून त्याच्यावर इतरांपेक्षा वेगळी जबाबदारी वगैरे येत नाही.

जे अतिरेकी आहेत त्यांचे काय करायचे ते करावे. जे लोक यात पडत नाहीत व अशा हल्ल्यांचे समर्थन करत नाहीत अशा लोकांनी त्यात इण्ट्रोस्पेक्शन वगैरे करावे असा त्यांचा त्यात काही संबंध नसतो >>

किती सोपे आहे ना, आमचा त्यांचा काही संबंध नाही म्हणजे आम्ही जबाबदारीपासून मोकळे. फुल्यांचा, सावित्रीबाईंचा काय संबंध होता? बाकीच्यांच्या बायका, विधवा मरायच्यात मरुदे, आपल्याला काय ? आपण सुधारक आहोत ना आपल्यापुरते? काय गरज आहे दगड, लाठ्या, शेण गोळे झेलायची? ते गप्प बसले नाहीत म्हणून सुधारणा झाल्या. त्यांनी तत्कालीन हिदुत्वावर टीका करायचं धैर्य दाखवले, आणि त्यासाठी आपल्या जीवाची जरासुद्धा पर्वा केली नाही.

ज्या समाजात आपण राहतो, फक्त त्याचे फायदे उपटून काम होत नाही, त्याच्या चुका पण वेळोवेळी दाखवाव्या लागतात. कुरणातल्या अन्याय्य बाबींना तुमचा उघड विरोध नसेल तर कट्टरवादी आपला अजेंडा पुढं करणारच, आणि त्यात तुमची मूक संमती असते.
नाहीतर कट्टरपंथी मुस्लिम इतके कसे फोफावले? त्यांना पैसे कुठून मिळतात? आजही सिरियातल्या ISIS संघटनेच्या अमिषाला बाकीच्या देशातले मुसलमान कसे बळी पडतात?

दहशतवादी काही आकाशातून पडत नाहीत, आपल्याच आजूबाजूच्या लोकांमधून ते येतात, मग ते हिंदू असोत वा मुस्लिम. आणि इतकं मोठ काम समाजातल्या बहुसंख्यांच्या नजरेआड त्यांच्या सहमतिशिवाय होणे, हे शक्यच नाही.
तेव्हा कुरानातल्या अंन्याय बाबींवर बहुसंख्य मुस्लिम समाजाने माना डोलावल्या, आणि आता बुडाला चटके बसत आहेत म्हणून हम आपके है कौन? व्वा रे व्वा.

दहशतवाद रहुद्या एकवेळ, तिथे बाकीचे धर्म येतात. फक्त स्त्री सुधरणाविरोधी कुरणातली कलम बदलणारा महावीर मला दाखवा,(निदान इथेतरी दुसरा धर्म आड येणार नाही) मी त्याचं पाय धुऊन पाणी पिईन.

एकतर स्वतः सुधारणा करायच्या नाहीत, दुसरे करतो म्हणाले करू द्यायच्या नाहीत, मग कट्टर इस्लाममध्ये बदल येणार कसा?

सुधारणेची सुरुवात होण्याआधी आपल काहीतरी चुकतंय हे तर वाटायला हवं. त्यालाच introspection म्हणतात. ज्यांना काही चुकल्यासारखं वाटतच नाही, ते काय introspection करणार? फारच अवांतर होतय पण इथ मी अभिनेता इरफान खानचा व्हिडीओ टाकतोय - https://youtu.be/tFV-6zi2cgo (7:50 - 9:30)

स्वतः च पाहा आणि ठरवा, मवाळ मुस्लिम कुराणातल्या अश्मयुगीन कलमांना किती विरोध करतात ते.

कुरणातल्या अन्याय्य बाबींना तुमचा उघड विरोध नसेल तर कट्टरवादी आपला अजेंडा पुढं करणारच, आणि त्यात तुमची मूक संमती असते. >>>
इतकं मोठ काम समाजातल्या बहुसंख्यांच्या नजरेआड त्यांच्या सहमतिशिवाय होणे, हे शक्यच नाही. >>>

कर्मठ असणे आणि अतिरेक्यांना समर्थन असणे हे दोन्ही सारखेच नाही. त्या समाजातून अजून समाजसुधारक पुढे येत नाहीत (ही वस्तुस्थिती) आणि तसे आहे म्हणजे अतिरेक्यांना त्यांची सहमती आहेच हे गृहीत धरणे (जे लॉजिक पूर्ण चुकीचे आहे) यातही मिक्स अप झाले आहे.

उलट अतिरेक्यांविरूद्ध त्याच समाजातील लोक पुढे यावेत असे वाटत असेल, तर इतर जनतेने सर्वांना घाउकरीत्या आरोपीच्या पिंजर्‍यात उभे न करणे हे प्रचंड महत्त्वाचे आहे. अतिरेक्यांच्या प्रभावाला आणखी लोक बळी पाडण्याचा हुकमी मार्ग आहे असे घाउक आरोप म्हणजे. कारण इतर बहुसंख्य समाजाकडून जर भीती असेल तर तुलनेने सुरक्षित वाटणार्‍या स्वतःच्या घेटोज मधे परत जाण्याशिवाय लोकांकडे पर्याय राहात नाही.

फारएण्ड +१. या वरच्या प्रतिसादातले तुमचे म्हणणे बोल्ड अक्षरांत लिहा.

इथले अनेक प्रतिसाद वाचून टेरर अपॉलॉजिस्ट्स, अर्बन नक्सलीझम या संज्ञा आठवल्या.
न्युझीलंडमधला हल्ला हा दहशतवादी हल्ला नाही, इथपासून त्या हल्ल्याला त्यात बळी पडलेला सर्वसामान्य मुस्लिमच जबाबदार आहे, इथपर्यंतची मांडणी वाचायला मिळते आहे. असं करून आपण या प्रकारच्या दहशतवादाचं स मर्थन करतो आहोत, हे लक्षात येतंच नसेल, असं नाही. हा दहशतवाद नाही, इस्लामी दहशतवादाचा सूड आहे, अशी विधाने फेअबुकवर वाचलीत.

मुस्लिम दहशतवादाला उत्तर म्हणून आपण दुसर्‍या प्रकारचा दहशतवाद फोफावू देणार आहोत का? या असल्या द हशतवादासाठी एक उत्तम बौद्धिक बैठक करून देणारे इथले काही प्रतिसाद आहेत.

इथे प्रतिसादांत मला गैरेसोयी चे ठरतील असे मुद्दे मां डणारी म्हणून एक लिंक दिली गेली होती. नीट वाचलं तर लक्षात येई ल की आ एस आणि तत्सम इस्लामी दहशतवादी तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायला जसं आधी मुस्लिमछळाची चित्रं दाखवून त्यांचं रॅडिकला य झेशन करतात आणि त्यावर धर्माची अफू पाजतात तोच प्रकार इतर प्रकारचे दहशतवादीही करतात. ते इस्लामी दहशतवाद्यां च्या कृत्यांचा दाखला देतात.
आप ल्याअतिरेकी, हिंसाधारित, टोकाच्या विचारसरणींत लोकांना ओढण्याची ही पहिली पायरी असते. इथल्या सनातनवाल्यांची मोडस ऑपरेंडीसुद्धा हीच आहे.

ए का गोष्टीकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं गेलं आहे. न्युझीलंडमधला तो दहशतवादी स्वतःला व्हाइट सुप्रिमिस्ट म्हणवून घेतोय. त्याचा स्थलांतरितांना विरोध आहे. तो जन्माने ऑस्ट्रेलियन आणि वास्तव्याने न्युझीलंडचा. त्याच्या मते हे दोन्ही देशही युरोपियनच.( ते युरोपोयन कसे झाले याचा इतिहास त्याने माहीत करून घेतला असेल का? ) तर युरोपात येणार्‍या सर्व प्रकारच्या स्थलांतरितांबद्दल त्याला राग आहे आणि त्यात इंडियन्सही आलेत. या रागाला वाट देण्यासाठी त्याने लक्ष्य निवडलं मशिदीचं. त्याने एखाद्या मंदिराला ल क्ष्य केलं असतं तर आपल्या प्रतिक्रिया अशाच असत्या का?
ऑस्ट्र्लियात भारतीयांवर वंशद्वेषी हल्ले झाल्याच्या बातम्या फार जुन्या नाहीत. अमेरिकेत ९/११ नंतर शीख लोकांना टारगेट केलं जायचं. सुप्रसिद्ध भिंत आणि इमिग्रेशन धोरणाबद्दल सांगायला हवं का? इंग्लंडमध्ये ब्रेक्झिटनंतर, साउथ एशियन्सना , आता तुम्ही फुटा असं सांगितलं जाऊ लागलं होतं हे खोटं आहे का?
इस्लामी दहशतवादा साठी सर्वसामान्य मुस्लिम व्यक्तीला जबा बदार धरताना स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझमसदहशत, दहशतवाद्यांच्या अर्थसहाय्यासाठी आणि जोपासनेसाठी ज्या देशाचं नाव घेतलं जातं, त्याच्या गळ्यात गळे घालायचं तर थांबलेलं नाही.

( इथे लिहिताना मध्ये इतर कामे उपटल्याने, प्रतिसाद विस्कळीत झाला असण्याची शक्यता आहे)

एखादया देशाच्या सामान्य नागरिकांना एखाद्या लोकसमूहाकडून (परकीय अथवा स्वकीय) त्रास होत असेल तर त्यांनी (स्थानिक जनतेने) त्या लोकसमूहाला आता इथून फुटायचं बघा! सांगण्यात मला तरी काही चूक वाटत नाही.

नेहेमीप्रमाणे चर्चा भरकटत हिंदूंमध्ये हि कशी कट्टरता आहे किंवा हिंदूंमधील मवाळ गटाला कसा त्रास भोगावा लागतो याकडे चाललीय.. तद्दन व्हॉटअबौटगिरी !
हिंदूंबाबतच चर्चा करायचीय तर वेगळा धागा काढा... आणि कृपया "मुस्लिम मेले म्हणून तुम्हाला आनंद झाला" असले मनाचे श्लोक सांगू नका.

हिंदू धर्मातील समाजसुधारक मुस्लिम धर्मातील समाजसुधारकांपेक्षा संख्येने कितीतरी पट अधिक आहेत. हिंदूंची धार्मिक शिकवणच बदलाला अनुकूल अशी आहे. म्हणूनच विद्वांनामध्ये वादविवाद रंगायचे नि त्यात ज्याचे तत्वज्ञान सर्वमान्य असे तो जिंकायचा (उदा आद्य शर्कराचार्यांचा अद्वैत सिद्धांत). हे असे कधी इस्लाम धर्मात झालेलं ऐकिवात आहे काय? बाकी बदल होताना काहींचा विरोध आणि काहींचे समर्थन ओघाने येते. परंतु शेवटी "बदल झाला" हे सर्वात महत्वाचं आहे.

हिंदू धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर कुणी बॉम्ब वा बंदुका घेऊन हल्ला केला नि त्याचे समर्थन म्हणून एखाद्या हिंदूने मारलेल्या गोऱ्या किंवा काळ्या व्यक्तीचे उदाहरण दिले असे कधी झाले आहे का? आतापर्यंतचे हिंदू मंदिर वा हिंदू धर्मगुरुंवरचे हल्ले निव्वळ आकसातून वा द्वेषातून झालेत.

आता ख्राईस्टचर्च येथे जो हल्ला झाला तसेच हल्ले कितीतरी चर्चेस वा मशिदींवर आफ्रिकेत सतत होत असतात. परधर्मीयांच्या स्त्रियांची अपहरणे व बलात्कार तर तिथे सर्रास होतात. ते तिथे हिंदू धर्मामुळे नक्कीच होत नाही. परंतु जिथे जिथे अशा प्रकारचे धार्मिक संघर्ष होतात तिथे इस्लाम हा धर्म common element असतोच असतो.

इतर धर्मियांनी मुस्लिम समाजाला वाळीत टाकू नये वा त्यांच्यावर दहशतवादाचा शिक्का मारू नये हे लिहिणं जितकं सोपं आहे तितकंच अमलात आणणं अशक्य आहे. याच कारण कुठला मुसलमान सुधारणावादी आहे आणि कुठला कट्टर आहे हे त्यांनी स्वतःची मते मांडल्याशिवाय समजणार नाही. आणि नेमकी स्वतःची सुधारणावादी मते मांडण्यालाच इस्लाम मध्ये मनाई आहे. शिवाय इस्लामची मूळ तत्वे, जी मुस्लिम आणि इतर धर्मीयांमध्ये सुस्पष्ट वर्गीकरण करतात त्या तत्वांना मानणारा व्यक्ती नेहेमी वेगळाच असेल वा मुद्दाम वेगळा राहण्याचा प्रयत्न करेल, त्यांना वाळीत टाकणे किंवा त्यांना वेगळे करण्याचा प्रश्नच येत नाही. एखादी मुस्लिम व्यक्ती तुम्ही हिंदू असतानाही तुमच्याशी सलोख्याने वागते याचा अर्थ ती सुधारणावादी आहे असा होत नसतो.

म्हणूनच मी ५ शांतताप्रिय मुस्लिम हेरून त्यांच्याशी शरिया / कुराणातील बदलांबाबत चर्चा करण्याचा व त्यांची प्रतिक्रिया इथे सांगण्याचा सल्ला दिला.

हि परिस्थितीत सुधारायची असेल तर त्यासाठी पुढाकार मुस्लिमांनीच घ्यायला हवा. त्यांच्या धर्मात सुधारणावादी चळवळ सुरु होऊन इस्लामची मूळ कट्टर तत्वे त्यांनी कुराण व शरियात बदलायला हवीत. तरच इतर धर्मीयांमध्ये इस्लामबाबत सकारात्मक संदेश जाईल.

<हि परिस्थितीत सुधारायची असेल तर त्यासाठी पुढाकार मुस्लिमांनीच घ्यायला हवा. त्यांच्या धर्मात सुधारणावादी चळवळ सुरु होऊन इस्लामची मूळ कट्टर तत्वे त्यांनी कुराण व शरियात बदलायला हवीत. तरच इतर धर्मीयांमध्ये इस्लामबाबत सकारात्मक संदेश जाईल.> त्यासाठी इतरांनी अशा सुधारणावादी मुस्लिमांना बळ मिळेल हे पाहिले पाहिजे. आपण सगळ्या मुस्लिम समाजाला तुम्ही सुधारायला तयार ना ही, तुम्ही दहशत वाद्यांना पोस्ताय, तयार करताय असं म्हटल्याने ते होणार नाही.
वरचं फा रेंण्ड यांचंच म्हणणं वेगळ्या शब्दांत लिहिलंय.

सामाजिक सुधारणांबाबत मुस्लिम काही बाबतींत हिं दूपेक्शा मागे आहेत हे उघड आहे. कदाचित आपण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला किं वा मध्यावर जिथे होतो, तिथे ते आज असतील.
आणखी एक विरोधाभास असा की एकीकडे आमचा हिंदू धर्म बघा कसा प्रगतीशील, सुधारणावादी असं म्हणायचं आणि आज जे लोक हिंदू धर्मा तल्या अनिष्ट गोष्टींबद्दल विचार करताहेत, बोलताहेत त्यांना हिंदूद्वेष्टा, हिंदु धर्मविरोधी म्हणायचं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी चालू असतात आणि त्यात काही चूक आहे असंही वाटत नाही.

राजसी, ऑस्ट्रे लिया आणि अमे रिकेचा इतिहास माहीत करून घ्याल का? जे लोक आज आम्हांला बाहेरुन कोणी याय ला नको म्हणताहेत, ते स्वतःच बा हेरून आलेले आहेत. आणि त्यांनी तिथल्या मूळच्या लोकांना जवळपास नामशेष केलं आहे.
युरोपियन वसाहतवादाने आणि अमेरिकन आरलावलीआणि सामारिक साम्राज्यवादाने तिसर्‍या जगाचं जे नुकसान केलंय, त्याची भरपाई द्यायला लावली तर अनेक प्रश्न सुटतील आणि बॅलन्स साधला जाईल.

अवांतर - मुंबईत छशिमट जवळाचा ब्रिज पडण्याला परप्रांतीय(च) जबाबदार आहेत, असं अनेकांचं मत आहे.

ए का गोष्टीकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं गेलं आहे. न्युझीलंडमधला तो दहशतवादी स्वतःला व्हाइट सुप्रिमिस्ट म्हणवून घेतोय. त्याचा स्थलांतरितांना विरोध आहे. तो जन्माने ऑस्ट्रेलियन आणि वास्तव्याने न्युझीलंडचा. त्याच्या मते हे दोन्ही देशही युरोपियनच.( ते युरोपोयन कसे झाले याचा इतिहास त्याने माहीत करून घेतला असेल का? ) तर युरोपात येणार्‍या सर्व प्रकारच्या स्थलांतरितांबद्दल त्याला राग आहे आणि त्यात इंडियन्सही आलेत. या रागाला वाट देण्यासाठी त्याने लक्ष्य निवडलं मशिदीचं. त्याने एखाद्या मंदिराला ल क्ष्य केलं असतं तर आपल्या प्रतिक्रिया अशाच असत्या का?>>>>>>>> +११११

राजसी, ऑस्ट्रे लिया आणि अमे रिकेचा इतिहास माहीत करून घ्याल का? जे लोक आज आम्हांला बाहेरुन कोणी याय ला नको म्हणताहेत, ते स्वतःच बा हेरून आलेले आहेत. आणि त्यांनी तिथल्या मूळच्या लोकांना जवळपास नामशेष केलं आहे.
युरोपियन वसाहतवादाने आणि अमेरिकन आरलावलीआणि सामारिक साम्राज्यवादाने तिसर्‍या जगाचं जे नुकसान केलंय, त्याची भरपाई द्यायला लावली तर अनेक प्रश्न सुटतील आणि बॅलन्स साधला जाईल.>>>>>>. दुसर्‍या महायुद्धात की त्याच्या पूर्वी ऐन हिवाळ्यात पोलंडच्या ८० हजार सैनिकांना रशिया आणी जर्मन फौजेने क्रुरतेने घेरुन मारले. रशियाने त्याबाबत मध्यंतरी माफी मागीतली, जर्मनांनी मागीतली की नाही ते माहीत नाही.

पण अमेरीकन्स आणी युरोपीयन्स दुसर्‍याची माफी मागणार नाहीतच. नाहीतर स्वतःच्या स्वार्थापायी, सद्दाम कडे अणु अस्त्रे आहेत अशी राळ / हूल उठवुन निव्वळ तेलसाठ्या च्या हव्यासापायी इराक उध्वस्त केले. त्याचा परीणाम इसिस मध्ये दिसतो आहे. तो महामुर्ख जॉर्ज बुश आणी ते येडं ब्रिटनचा माजी पंप्र ( नाव आठवेना ) यांची ती पापं आहेत. त्यात या येड्या सुप्रिमीस्ट लोकांची भर पडली.

आता ख्राईस्टचर्च येथे जो हल्ला झाला तसेच हल्ले कितीतरी चर्चेस वा मशिदींवर आफ्रिकेत सतत होत असतात. परधर्मीयांच्या स्त्रियांची अपहरणे व बलात्कार तर तिथे सर्रास होतात. ते तिथे हिंदू धर्मामुळे नक्कीच होत नाही. परंतु जिथे जिथे अशा प्रकारचे धार्मिक संघर्ष होतात तिथे इस्लाम हा धर्म common element असतोच असतो. >>>

याच माझ्या वाक्याला जोडून आणखी एक गोष्ट नमुद करावीशी वाटते. आपल्यापैकी किती लोक आफ्रिकेतील वांशिक व धार्मिक संघर्षाला महत्व देतात? वर्तमानपत्रातील शेवटच्या पानावर कुठल्यातरी कोपऱ्यात ती बातमी छापली गेलेली असते. याच कारण म्हणजे आपले कुठलेही हितसंबंध आफ्रिकेतील "त्या" देशांमध्ये गुंतलेले नाहीत.

परंतु न्यूझीलंड / अमेरिका / इंग्लंड / युरोप / आस्ट्रेलिया इत्यादी देशांमध्ये असे काही झाले कि काही लोक हिंदूंमध्येही कसे कट्टर लोक आहेत, इस्लामला वाळीत टाकलं जातंय वा दहशवादाचा / द्वेषाचा सामना प्रेमाने आणि सलोख्याने करा असले हास्यास्पद मुद्दे सांगू लागतात. या वागण्याला काय म्हणता येईल?

जेव्हा स्थलांतरित लोकांची संख्या अमर्याद वाढते आणि हे बाहेरून आलेले लोक स्थानिक समाजात आणि शासन व्यवस्थेत हस्तक क्षेप करतात तेव्हाच अशा प्रतिक्रिया उमटत राहतात .
तोपर्यंत नाही

<< आणखी एक विरोधाभास असा की एकीकडे आमचा हिंदू धर्म बघा कसा प्रगतीशील, सुधारणावादी असं म्हणायचं आणि आज जे लोक हिंदू धर्मा तल्या अनिष्ट गोष्टींबद्दल विचार करताहेत, बोलताहेत त्यांना हिंदूद्वेष्टा, हिंदु धर्मविरोधी म्हणायचं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी चालू असतात आणि त्यात काही चूक आहे असंही वाटत नाही. >>
------- आपणही सुधारकांना त्रासच दिलेला आहे. फार मागे कशाला दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांना जिवाने मारले आहे, हे सर्व लोक समाजात सुधार आणण्यासाठी लढत होते. दाभोलकरांना मारल्यावर मायबोलीवरच्या शिकलेल्या लोकांंच्या प्रतिक्रिया बघितल्या तर आपल्याला अजुनही खुप मोठा पल्ला गाठायचा आहे. मुसलमान समाजापेक्षा चार दोन पावले पुढे आहोत पण प्रत्येक वेळी इतर धर्मासोबत तुलना करायची.

साबरीमल मंदिर प्रवेशा बाबत सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांना पण आपल्यातलीच महाकर्मठ लोक महिलांच्या प्रवेशाला अजुनही कडाडुन विरोध करत आहेत.

आपल्या धर्मातही आपण सुधारकांना खुप त्रास दिलेला आहे आणि सामाजिक बदलांना आपण कठोर विरोध केला आहे, अजुनही करत असतो. वर साबरीमल एक उदा.

सामाजिक सुधारणांबाबत मुस्लिम काही बाबतींत हिं दूपेक्शा मागे आहेत हे उघड आहे. कदाचित आपण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला किं वा मध्यावर जिथे होतो, तिथे ते आज असतील. >>

नक्कीच नाही, फक्त शस्त्रे बदललीत, इस्लाम मानणाऱ्यांची विचारसरणी तीच आहे. कुराण / शरिया ७ व्या शतकात सन्गितले / लिहिले गेले, २०व्या शतकात नाही. आणि त्यात कुठलाही बदल ईस्लामविरोधी आहे.

आणखी एक विरोधाभास असा की एकीकडे आमचा हिंदू धर्म बघा कसा प्रगतीशील, सुधारणावादी असं म्हणायचं आणि आज जे लोक हिंदू धर्मा तल्या अनिष्ट गोष्टींबद्दल विचार करताहेत, बोलताहेत त्यांना हिंदूद्वेष्टा, हिंदु धर्मविरोधी म्हणायचं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी चालू असतात आणि त्यात काही चूक आहे असंही वाटत नाही.

अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्या दोन लोकांची नावे सांगता का? किंवा तसे सांगणाऱ्या एखाद्या लेखाची लिंक देता का (फक्त आधी तो पूर्ण वाचून घ्या) ?

https://www.ndtv.com/india-news/all-india-muslim-personal-law-board-aimp...

वरील बातमीत सांगितलेल्या हालचाली भारतातील लोकशाहीच्या विरुद्ध आहेत कि लोकशाहीला समर्थन म्हणून आहेत हे मला फारएन्ड, भरत, सिम्बा, हेला व उदयभाऊ सांगतील काय? मी तुमच्या उत्तरावर कसलेही प्रतिवाद करणार नाही. मला फक्त तुमची मते जाणून घ्यायची आहेत.

इतक्यात आणखी लिहायला वेळ नाही.
पण अनेक प्रतिसादांतून परवाच्या दहशतबादी हल्यासाठी सर्व मुस्लिम समाजाला दोषी धरण्याचा जो प्रकार चालला आहे आणि इतर सर्व प्रकारच्या दहशतवादांसाठी इस्लामी दहशतवादाच जबाबदार असल्याचे जे दावे केले जात आहेत, ते गंभीर आहेत.

त्या दहशतवाद्याच्या व्हाइट सुप्रीमिस्ट म्ह णवून घेण्याबद्दल काही लिहिलेलं दिसलं नाही. अर्थात घाईत वाचलंय. वेळ मिळाला की पुन्हा वाचेन.

नाही लिहिलं कोणी.
मज्जा येणार आता, सफेदी कि चमकार विरुद्ध इस्लामी हाहाकार... तिसरं महायुद्ध

त्या दहशतवाद्याच्या व्हाइट सुप्रीमिस्ट म्ह णवून घेण्याबद्दल काही लिहिलेलं दिसलं नाही. अर्थात घाईत वाचलंय. वेळ मिळाला की पुन्हा वाचेन.

>> आता चर्चा मूळ मुद्द्यावर येतेय. अर्थात मी विचारलेला प्रश्न कुठे गायब होऊ नये हि अपेक्शा..

पण अनेक प्रतिसादांतून परवाच्या दहशतबादी हल्यासाठी सर्व मुस्लिम समाजाला दोषी धरण्याचा जो प्रकार चालला आहे आणि इतर सर्व प्रकारच्या दहशतवादांसाठी इस्लामी दहशतवादाच जबाबदार असल्याचे जे दावे केले जात आहेत, ते गंभीर आहेत.
<<

त्यात गंभीर काय आहे ?
जसे पेराल तसेच ऊगवेल. हा निसर्गाचा नियम आहे.

चांगली चर्चा आहे. दोन्हीकडील थोडं थोडं पटलं.

इस्लाम कट्टर असण्यात अमेरिका युरोपातील देशांचा काय सहभाग आहे हेही माहित करून घ्यावं. अफगाणिस्तान नेहमीच असा कट्टर होता का? की शीतयुद्धाचा परिणाम म्हणून तालिबान झालं? त्याआधी १९७८ मधील मिनिस्कर्टमधील अफगाण कॉलेज कन्यकांचे फोटो इंटरनेटवर बघायला मिळतात. पाकिस्तानची निर्मिती होण्याचे मुख्य प्रयत्न इंग्रजांचे नव्हते का? पाकिस्तानला इतकी दशकं इंग्लड अमेरिका का पोसत आहेत? (भौगोलिक स्थान, ग्रेट गेम वगैरे).

बाकी कट्टर इस्लामी इमिग्रेशनची परिणीती त्या त्या देशाचं इस्लामीकरण होण्यात होऊच शकते. पण त्याला हा उपाय नाही तर इमिग्रेशन पॉलिसी अशी असावि की कट्टर धर्मियांना येऊनच दिलं जाऊ नये.

मुस्लिम समाज मागास आणि स्थितिवादी असल्याचा आणि इस्लामी दहशतवादाचा परस्परसंबंध काय हे समजून घ्यायचे आहे.
त्या दहशतवाद्याच्या व्हाइट सुप्रिमिस्ट म्हणवून घेण्याबद्दल समजून घ्यायचे आहे
सांस्कृतिक, भाषिक, प्रादेशिक दहशतवाद यांत जात नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे ‘मनुस्मृती’ जाळली. ‘मनुस्मृती’ जाळण्याची योजना डॉ. आंबेडकरांनी आधीच ठरविलेली होती. ती योजनाबद्ध कृती होती. महाडला परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपाच्या दारातच शृंगारलेली वेदी तयार करण्यात आली होती. प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या परिषदेतही तसा ठराव झाला होता. रात्री ९ वाजता त्या वेदीवर ‘मनुस्मृती’ एका अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते जाळण्यात आली.

एका हिंदुबहुल राष्ट्रात मनुस्मृती जाळण्यात आल्यावर ती जाळण्याचा कार्यक्रम करणारे नेतेच पुढे संविधान कर्ते बनले. अशा प्रकारे दुसरा एखादा विशिष्ट शांतताप्रिय धर्म त्यांच्या हजारो वर्षे जुनाट धर्मग्रंथात काही अनिष्ट तरतुदी आहेत म्हणून तो धर्मग्रंथ जाळणार्‍याला संविधान कर्ता बनू देईल का?

या प्रश्नाचे उत्तर नसल्यास उठसूट मनुस्मृतीतल्या प्रथांवरुन हिंदूंना दूषणे देणे योग्य नव्हे.

Pages