लोकशाही निरर्थक आहे का?

Submitted by खग्या on 15 March, 2019 - 11:48

शाळेत लोकशाही शिकलो ती 'लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार' अशी. तेव्हा मला वाटायचं मला सगळं कळत, म्हणून माझ्या मताला देशात किंमत मिळायला हवी. पण वय वाढतंय तसं कळतंय मला फार कमी ज्ञान आहे, किंबहुना सामान्य माणसाला त्याच्या आवडीच्या आणि तो ज्यात काम करतो त्या क्षेत्रातलं प्रचंड ज्ञान असलं तरी सगळ्याच क्षेत्रातलं ज्ञान नसत. किंबहुना तुम्हाला जर स्वैपाकातलं काही काळात नसेल तर तुमची आई/बायको किंवा अगदी स्वैपाक करण्यासाठी ठेवलेली मोलकरीण तरी तुम्हाला स्वैपाक कसा करायचा या बद्दल मत विचारेल का आणि तुम्ही जरी स्वतःहून सांगितलं तर लक्ष देईल का?

मग जर एखाद्याला देश कसा चालवावा यातलं काहीच ज्ञान नाही तर त्या व्यक्तीच्या मताला किंमत का असावी? आपल्या भारत देशात ७९% जनतेचं उत्पन्न करपात्र नाही, मग अशा व्यक्तींना देशाची अर्थव्यवस्था चालवणाऱ्या व्यक्तीच्या निवडीसाठी मतदान करायचा अधिकार देणं चूक नाही का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लोकशाही निरर्थक आहे का ?

असे शीर्षक आहे धाग्याचे. तर या प्रश्नावर जेव्हढी शक्य तेव्हढी उत्तरे देऊन झाल्यावरही काही लोक निव्वळ वितंडवाद करताहेत. त्यातून एक जण असे आहेत ज्यांचे दोन ओळीचे प्रतिसादही अशुद्ध भाषा + असंबद्धततेचं वरदान यामुळे समजत नाहीत. आता तर ते निबंध लिहू लागले आहेत. कमेण्ट बॉक्स मधे तीन तीन ठिकाणी सु सु सु करून बुकींग करून ठेवत आहेत.

हे सर्व १९५२ पासूनचे सर्व भौतिक फायदे सर्वात जास्त उपटून इतर सर्वांवर नाराज असलेले लोक आहेत. हे इतिहासात रमून सत्ताधीश होण्यासाठी आतुरलेले लोक आहेत. बाकीचे येडे लोक यांच्या थापांना बळी पडून सेवा करत आहेत. एकीकडे काँग्रेसचे लोकही तेच करत आहेत. फक्त ते आपण सत्ता उपभोगत आहोत याची जाणीव कुणालाही होऊ देत नाहीत. त्यामुळे सगळेच खूष असा मामला असतो. सत्ताधारी पक्ष म्हणून अनेक वर्षे असल्याने लोकांच्या नाड्या ओळखून आहेत. लोकांना सक्ती चालत नाही त्यामुळे कथनी एक आणि करणी एक अशी त्यांची नीती आहे. शिवाय लोकांनाही या पक्षाकडून फारशा अपेक्षा नाहीत. त्यामुळे या पक्षाने काही जरी केलं तरी ते गृहीतच धरलेलं असतं.

लोकांच्या दारात जोपर्यंत सत्ताधा-यांचा दहशतवाद येत नाही तोपर्यंत लोकांना कशाचाच प्रॉब्लेम नसतो. हे फार काळ चाललं नसतंच. त्यामुळे दुस-या एका पक्षाची हिंदुत्ववादी भूमिका यांच्या पथ्यावर पडली आहे. ती भूमिका डार्क करत आपली इमेज व्हाईट ठेवणे हे हा पक्ष करतो. तर काँग्रेसला हिरवा रंग मारून भगव्या रंगाचा पुरस्कार एक पक्ष करतो. एकदा हे मुद्दे निवडणुकीचे झाले , की मग लोकांच्या जीवनावश्यक मुद्द्यांवर लोकांकडे मत मागणे गरजेचे नसते.

ही लोकशाहीची विटंबना आहे.
ही विटंबना करणारे प्रश्न विचारतात की लोकशाहीची गरज आहे का ?
ज्यांना लोकशाहीशी काहीही घेणं देणं नाही असे लोक आपसात वाद घालून तो अजेण्डा बनवतात. हे सर्व लोकशाहीचे फायदे उपटून.
याशिवाय तिस-या कुठल्याही पक्षाचे नाव काढले की यांच्या पायाची आग मस्तकात जाते. इतर सर्व पक्ष बालायक आहेत असे यांचे लाभार्थी लोक चित्र निर्माण करत असतात ज्याचे उत्तर द्यायला इतरांकडे साधने नाहीत.

या दोन पक्षांनी लोकशाही मार्गाने भांडवलशाही देशात घट्ट करत नेलेली आहे. तिचे दुष्परिणाम जाणवू नयेत आणि लोकांनी लोकशाहीचे हक्क बजावत बंड करू नये म्हणून हा गोंधळ चालू आहे जो इथे सुद्धा प्रत्येक धाग्यावर चालू आहे.

कुठलीही गोष्ट हे लोक नेहरू, गांधी, गोडसे, कलम ३७०, रामजन्मभूमी, बाबरी मशीद किंवा देशभक्त की देशद्रोही या मुद्द्यांवर आणून सोडतात. मोदी प्रत्येक भाषणात नेहरूंना दोष देतात. आणि काँग्रेसवाले नेहरूंना बिच्चारे म्हणून प्रोजेक्ट करतात.

यातले कुणीही लोकशाहीसाठी गंभीर नाहीत.
समस्या निर्माण होण्याचे मूळ कुणीच सांगत नाही.

भाजप कडून प्रत्येक गोष्टीच्या समस्येचे मूळ हे राज्यघटना आणि लोकशाही आहे हे बिंबवले जाते. त्यासाठी हुकूमशाही कशी सुंदर याचे एक चित्र मनावर बिंबवले जाते. पण कुठेही भारतात हुकूमशाही आणायची आहे असे वाक्य पेरले जात नाही. मात्र भारताला हुकूमशाही शिवाय पर्याय नाही असे म्हटले जाते. त्यासाठी हिटलरला हिरो बनवले जाते. हिटलरने नावडत्या वंशाची हत्या केली. तसेच नावडत्या वंशाची हत्या करणे पाप नसल्याचे बिंबवले जाते. अधून मधून सावरकरी विचार बिंबवले जातात. ज्याच्यात सक्षम स्त्री पुरूषांपासून उत्तम संतती पैदा करून वगैरे वगैरे काही काही असते. यांच्याशिवाय बाकीचे जगायला नालायक असा एक दृष्टीकोण तयार होतो.

त्यातूनच मग कर भरणारे आणि न भरणारे असे असंवेदनशील प्रश्न बिचारले जातात. यांच्या डोक्यातही कधी येत नाही की उत्पन्न नाही म्हणून कर नाही भरता येत तर हे जगतील कसे ? उलट अशा लोकांची जबाबदारी नको असल्याने काहींना दहशतवादी, काहींना नक्षलवादी ठरवून जगायला नालायक आहेत अशी स्वतःची समजूत घालण्यात हे मग्न असतात. फुकटे वगैरे त्यांची संभावना केली जाते. यांच्यासमोर कुठलेही लॉजिकल ऑर्ग्युमेंट करून उपयोग नस्सतो. कारण मेंदूच्या जागी बथ्थड दगड असतो.

असल्या किरकि-या लोकांशी चर्चा करून काय मिळणार ?

ज्यांना हुकूमशाही हवी आहे त्यांना तो हुकूमशहा म्हणून ओवेसी / मुलायमसिंह / लालूप्रसाद सिंह / अजित पवार पैकी कुणी एक चालणार असेल तर बघा ..

ओवेसी = १५ मी. सर्व हिंदू खल्लास.
मुलायमसिंह = No Comment.
लालूप्रसाद सिंह = ???
अजित पवार = भारतात पाऊस पडायची गरजच राहाणार नाही.

त्यातूनच मग कर भरणारे आणि न भरणारे असे असंवेदनशील प्रश्न बिचारले जातात. यांच्या डोक्यातही कधी येत नाही की उत्पन्न नाही म्हणून कर नाही भरता येत तर हे जगतील कसे ? उलट अशा लोकांची जबाबदारी नको असल्याने काहींना दहशतवादी, काहींना नक्षलवादी ठरवून जगायला नालायक आहेत अशी स्वतःची समजूत घालण्यात हे मग्न असतात. फुकटे वगैरे त्यांची संभावना केली जाते. यांच्यासमोर कुठलेही लॉजिकल ऑर्ग्युमेंट करून उपयोग नस्सतो. कारण मेंदूच्या जागी बथ्थड दगड असतो.
असल्या किरकि-या लोकांशी चर्चा करून काय मिळणार ?
>>>>>>

अबब , केवढा हा फाफटपसारा. मुख्य म्हणजे सगळं रडगाणंच दिसतंय.. समस्या अधोरेखित करून त्यावर उपाय सांगणे फार कठीण गोष्ट असावी या व्यक्तीसाठी.

कारण या व्यक्तीचे 100 टक्के प्रतिसाद टिंगलटवाळी, कुजकट वाक्ये व दुसरे कसे न्यून आहेत हेच सांगणारे असतात.

तुम्हाला तुमची आताची लोकशाही आवडते नि त्यातील काही समस्यांवर बाकीच्यांनी सांगितलेले उपाय पसंत नसतील तर या धाग्यावर येऊ नका आणि इतरांचे विचार मानू नका, कसलीही जबरदस्ती नाही.

लोकशाही आवडते की नाही हे प्रत्येक व्यक्ती स्वतः ठरवेल. तुम्ही दुसऱ्यांना "लोकशाही परिपूर्ण हेच खरं माना" ही जबरदस्ती करू शकत नाही. लोकशाहीत दोष आहेतच.

मुख्य म्हणजे तुम्ही म्हणता त्या तिसऱ्या पक्षाचं नाव सांगा.. आपलं ठेवायचं झाकून नि दुसर्याच पाहायचं वाकून ही गोष्ट नेहेमी चालत नाही.

राजेश188 असो वा मी असो, आम्ही सांगितलेले उपाय जेव्हा अमलात येतील तेव्हा येतील, पण आम्ही आमची मते कोणावर लादतोय किंवा दुसऱ्यांची अक्कल काढतोय अशा प्रकारचे कुठलेही प्रतिसाद लिहिले गेलेले नाहीत ( केलेल्या टिंगलटवाळीला उत्तर देणे सोडून).

अर्थातच ज्या लोकांना दुसऱ्यांचे विचार ऐकण्याची सवय नसते वा मीच मोठा ज्ञानी असा अहंकार असतो, ते लोक याआधीच्या प्रतिसादा सारखा फाफटपसारा करतात.

राजेश188 असो वा मी असो, आम्ही सांगितलेले उपाय जेव्हा अमलात येतील तेव्हा येतील, >>>>
काहीतरी भुक्कड उपाय रॉकेट सायन्स असल्याच्या थाटात सांगायचे....
आर्थिक दंड कोणाला करायचा? एखाद निर्णय यशस्वी झाला की नाही हे कोण ठरवणार? इतके बेसिक प्रश्न स्वतः ला न पाडून घेता इकडे "उपाय" लिहायचे.... आणि स्वतः च त्या बद्दल शाबासकी द्यायची.

प्रश्नाचा सांगोपांग विचार न करता उपाय सुचवणे याला बोकील बुद्धी म्हणतात

सांगोपांग विचारच आहेत त्यात पूर्ण paragraph मधील एक वाक्य उचलायचे आणि टीका करण्यासाठी वापरायचं ह्याला कोणती बुध्दी म्हणतात .
माजी मत तुम्हाला समजून घेता आली नाहीत हयात तुमचा दोष आहे .
मी तीन पॉइंट मांडलेत .
१ समाज सुधारणा करण्याची गरज आहे मग ती धर्माचा आधार घेवून केली तरी चालेल .
पण लोकांनी .
२ निवडून येणारे आमदार खासदार ह्यांना विषयाची खोलवर माहिती नसते तेव्हा त्यांना सल्ला देण्यासाठी हुशार आणि अनुभवी लोकांची समिती हवी आणि त्यांच्या निवडीत विरोधी पक्षाचा सुधा सहभाग हवं म्हणजे सदस्य निःपक्ष निवडले जातील .
३ ias अधिकारी नोकरीचे गुलाम असतात आणि त्यांना फक्त पुस्तकी माहिती असते म्हणून त्यांचा सहभाग निर्णय प्रक्रियेत नको .
हेच तीन महत्वाचे पॉइंट मी मांडले आहेत ह्याच्यावर बोलायचं सोडून मधलाच एकदा वाक्य उचलायचे आणि टीका करायची ही सवय सोडा .

लोकशाही निरर्थक आहार का?
असेल , तर कोणती शासन पद्धती हवी?
या मूळ प्रश्नाला बगल देऊन शासन पद्धतीने कोणते निर्णय घेतले पाहिजेत या कडे चर्चा वळवण्याचा प्रयत्न का चालू आहे लोकांचा?
>>

मला वाटत की मी आणि राजेश188 यांनी लोकशाही राबवयाच्या नियमांबद्धलच लिहिलंय, कुठेही लोकशाही हटवा आणि हुकूमशाही आणा अस लिहिलेलं नाही.

–---------
माझा प्रश्न सरळ सोपा आहे,
तुम्हाला (भारतीय) लोकशाहीची जी लिमिटेशन वाटते, ती दूर करण्यासाठी घटनात्मक चौकटीत राहून काय बदल सुचवाल?
या सूचना पॅन इंडिया राबवता आल्या पाहिजेत, घटनेत असलेल्या समानता आणि समान संधी तत्वांचे पालन करणाऱ्या असल्या पाहिजेत.

–-----------
मी त्याच लिहिल्या, परंतु कुणालातरी त्या हुकूमशाहीसारख्या वाटल्या.

हेला, तुम्ही राज्यकारभाराची पुस्तक कोळून प्याला असाल तर इथे काहीतरी ज्ञान वाटा. दुसऱ्यांच्या ज्ञानाची चिंता करू नका, इतरांना निदान स्वतःची मते स्पष्टपणे मांडता येतात आणि इतरांशी कशा प्रकारे बोलायचं त्याचीही अक्कल आहे.

मुख्य म्हणजे सगळ्यांनी समोरच्याच्या मतावरून त्याची टिंगल वा त्याच्यावर टीका करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या मतांना ऐकून घ्यायला शिका ( लोकशाहीचे पुरस्कर्ते म्हणून सर्वांनी एव्हढं तर करायलाच हवं)

काहीतरी भुक्कड उपाय रॉकेट सायन्स असल्याच्या थाटात सांगायचे....>>>

तो माणूस काहीतरी सांगायचा प्रयत्न तरी करतो, तुम्हाला तर भुक्कड उपायही सुचत नाहीत ते पहा.

आणि जे शुद्ध लेखनात हुशार आहेत त्यांच्यासाठी .
तुम्ही लोकांचे शुद्ध लेखन तपासू नका .
ऐकदा शब्द अशुद्ध लिहल्या मुळे तुम्हाला पूर्ण वाक्याचा अर्थ समजत नसेल तर मराठी चा परत क्लास लावा

शशांक बरोबर प्रतिसाद दिला तुम्ही .
काही लोक फक्त स्वतःलाच बुद्धिवान समजतात .
पण बुध्दीची चमक फक्त टिंगल टवाळी करण्यासाठीच वापरतात .
कोणतेच चांगले विचार ह्यांच्या पोस्ट मध्ये नसतात

किती पलट्या मारणार ? धाग्याचे शीर्षक काय आहे ? लोकशाही निरर्थक आहे तर मग काय हवेय ?
त्यामुळं उड्या मारत आलेल्यांना इथे जोरदार प्रतिवाद झाल्याने नमते घेत सुधारणांची सारवासारव चालू आहे इतकेच.. सुधारणा हव्यात तर कुठल्या हे ज्यांना आवश्यक वाटते त्यांनीच सांगावे हा साधारण नियम आहे. इथे कुणालाही लोकशाही निरर्थक वाटत नाही त्यामुळे त्यांनी कशाला सुधारणा सांगायच्यात ?
मुळात लोकशाही निरर्थक का आहे याचे कर भरण्याचे एक उदाहरण पहिल्याच काही प्रतिसादात फुस्स होऊनही किल्ला लढवणा-यांकडे आता शिव्याशापाशिवाय काही शिल्लक नाही. मायबोलीवर इतर पोर्टल्स प्रमाणे थेट शिवीगाळ करता येत नसल्यानतोनाईलाज आहे इतकेच.

एव्हढे बोलून मी माझे भाषण संपवतो.
चालू द्या गोंधळ.

लोकशाही निरर्थक आहे तर मग काय हवेय ?
आपल्या देशात लोकशाहीच्या नावाखाली जो तमाशा चालला आहे तो नको आहे .
आपल्या इथे निवडणूक पद्धती पासून सर्वच गोष्टीत सुधारणा हवी आहे .
हुकूमशाही कोणालाच नको आहे .

चर्चा कुणाला हवी तरी आहे का इथं? आपल्या आवडीचा हुकूमशाह हि एक कवी कल्पना असते एवढेही समजत नसलेल्यांशी काय ज्ञान वाटणार? दान सत्पात्री करावं असे पूर्वज सांगतात...

राज्यशास्त्र विषयावर इथे न लिहिण्याचे कारण असे की आताशा फोरम्सवर कशा चर्चा होतात हे माहिती आहे. इथे ज्यांना कवडीची माहिती नाही त्यांच्याशी चर्चा करण्यात स्वतःची उर्जा घालवण्यात अर्थ नाही. कारण विरोधी मत असणारे स्वतःचा अजेंडा रेटत असतात. त्यांना खरोखर जाणून घ्यायची अजिबात इच्छा नसते. दुसरं असे की एखादा अज्ञानी असेल तर त्यालापण माहिती देऊ नये का? नक्कीच देऊ शकतो पण ती माहिती देण्याचे हे स्थळ नाही. ज्यांना खरोखर राजव्यवस्था कशा चालतात ह्याचा अभ्यास करायचा असेल त्यांनी रितसर लायब्ररीमध्ये जाऊन ह्या विषयावरची पुस्तके वाचावी. राज्यव्यवस्था कशा अस्तित्वात आल्या, पुर्वि काय होते, नंतर काय झाले ह्याचा सांगोपांग अभ्यास करावा, वाचन करावे. सर्व प्रकारच्या राज्यव्यवस्थांमध्ये चांगले काय वाईट काय ह्याचा तुलनात्मक अभ्यास झालेला आहे.

लोकशाही कधीच निरर्थक नसते. ती ज्या देशात आहे तिथले लोक कसे आहे ह्यावर सगळे अवलंबून असते. फ्रान्स जर्मनी सारख्या अतिप्रगत देशांतही लोकशाही आहे.

हजारो वर्षे राजेशाही असलेल्या भारतात लोकशाही अजून रुजते आहे. लोकांना आपल्या मतांची अजून जाणीव नाही. त्याबद्द्दल लोकशिक्ष्ण गरजेचे आहे. व्यवस्थेला वाकवून फाय्दा उपटणारे हरामखोर प्रत्येकच देशात असतात.

https://goo.gl/9qeU8Y

हे बेसिक आहे. आधी इथून करा सुरुवात. ह्या पुस्तकाचा अभ्यास झाला की एक छानपैकी लेख टाका काय समजले त्याचा. मग पुढे बघू तुमची प्रामाणिकता किती त्यानुसार किती गंभीर चर्चा करायची.

ज्यांनी आजवर शाळेत नागरिकशास्त्र ऑप्शन ला टाकले आजवर कधी काही वाचले नाही त्यांनीही वरच्या लिंक वरचे पुस्तक नीट अभ्यासून घ्यावे. बेसिक्स क्लीअर होतील...

एक स्वतःला राज्य शास्त्रातील स्वतःला सर्वच समजते आस स्वतःच समजत आहे तर दुसरा सर्व विषयात पारंगत असल्याचा आव आणत आहे .
मला वाटतं ही मानसिक रोगाची लक्षण आहेत .

मी कधीच मला सर्व कळत आस समजत नाही .
पण तुमच्या सर्व पोस्ट मध्ये मीच हुशार आणि जाणकार आहे आणि बाकी लोकांना काही समजत नाही ही भावना असते

आणि महत्वाचं विरोधी पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीची चांगली पोस्ट आली तर तिचे कौतुक करण्याचे मोठे मन सुधा आमच्याकडे आहे आणि न पटणारी असेल तर चिखलफेक न करण्याचा संयम सुधा आहे

ते बघितलंच नागरीकशास्त्राची लिंक मिळाल्याबरोबर काय केलंय त्यावरून.. असो. चालू द्या तुमचे. मला काही इंटरेस्ट नाही तुमच्यात.

ते बघितलंच नागरीकशास्त्राची लिंक मिळाल्याबरोबर काय केलंय त्यावरून.. असो. चालू द्या तुमचे. मला काही इंटरेस्ट नाही तुमच्यात.

Rajesh188, या पढत मूर्खांना प्रश्न आणि मत यातीलही फरक कळत नाही नि दुसऱ्यांना शुद्धलेखन आणि नागरिकशास्त्राची पुस्तक वाचायला सांगत आहेत...

म्हणजे यांना तुम्ही विचारलं की राफुल गांधी येडा आहे का? की हे लोक राफुल गांधी येडा आहे असं तुम्ही म्हटल्याचा प्रचार करत सुटतील!

वरून आव जरी विचारजंताचा आणत असतील तरीही हे लोक मानसिकरित्या अजूनही अपरिपक्व आहेत हेच त्यांच्या बाळबोध विचारांवरून आणि मनाच्या श्लोकांवरून दिसून येत.

नागरिक शास्त्राची चांगली पुस्तके कोणती हे विचारल्यावर 2, तासांनी fyba chya पुस्तकाची अनुक्रमणिका पाठवली
जे समजायचे ते समजले

बेसिक क्लीअर नाही रे तुझे चिंटू... ते आधीच कळले म्हणून तुला फस्ट year बीए ची पुस्तके दिली. तुझी तीसुद्धा कुवत नाही. तू आपला पहिलीपासून सुरुवात कर. तू पुस्तके मागून काय दिवे लावणार हे माहित होते मला. म्हणून एक लिंक दिली. सिद्ध झालेच काय ते... Rofl
अभ्यास कर म्हटल्यावर तंतरली भौ ची. आला मोठा शाणा...

माणसाला स्वतःची मत असावीत .
पुस्तकात व्यक्त केलेली दुसऱ्याची मत व्यक्त करणारा स्वतःची बुध्दी कधीच वापरू शकत नाही .
आजूबाजूची परिस्थिती बघा आणि स्वतःची मतं व्यक्त करा देशा विषयी आणि system विषयी

Pages