लोकशाही निरर्थक आहे का?

Submitted by खग्या on 15 March, 2019 - 11:48

शाळेत लोकशाही शिकलो ती 'लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार' अशी. तेव्हा मला वाटायचं मला सगळं कळत, म्हणून माझ्या मताला देशात किंमत मिळायला हवी. पण वय वाढतंय तसं कळतंय मला फार कमी ज्ञान आहे, किंबहुना सामान्य माणसाला त्याच्या आवडीच्या आणि तो ज्यात काम करतो त्या क्षेत्रातलं प्रचंड ज्ञान असलं तरी सगळ्याच क्षेत्रातलं ज्ञान नसत. किंबहुना तुम्हाला जर स्वैपाकातलं काही काळात नसेल तर तुमची आई/बायको किंवा अगदी स्वैपाक करण्यासाठी ठेवलेली मोलकरीण तरी तुम्हाला स्वैपाक कसा करायचा या बद्दल मत विचारेल का आणि तुम्ही जरी स्वतःहून सांगितलं तर लक्ष देईल का?

मग जर एखाद्याला देश कसा चालवावा यातलं काहीच ज्ञान नाही तर त्या व्यक्तीच्या मताला किंमत का असावी? आपल्या भारत देशात ७९% जनतेचं उत्पन्न करपात्र नाही, मग अशा व्यक्तींना देशाची अर्थव्यवस्था चालवणाऱ्या व्यक्तीच्या निवडीसाठी मतदान करायचा अधिकार देणं चूक नाही का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लोकशाही ही भारतात नसून अखंड विश्वात आहे, तसेच लोकशाहीला तुम्ही इतरत्र न पाहता स्वतःच्या हृदयात बघा, लोकशाहीला स्वतःच्या हृदयात स्थान द्या. नफरत का चष्मा हटा दो, प्यार का चष्मा पेहन लो, लोकशाही तुम ना थे तब भी थी, और तुम्हारे बाद भी रहेगी, होळीला प्रेमाचे रंग उधळून पहा, आपल्या शेजारच्या गावापेक्षा आपली होळी कशी मोठी होईल ते पहा, मग पहा हे जग किती सुंदर दिसेल.

मागे एकदा लिहिला होता. परत एकदा.

भारत माझा देश आहे म्हणजे नक्की काय?
१९४७ आधी भारताची मालकी ब्रिटिशांकडे होती. मालकी याचा अर्थ सगळी जमीन आणि त्यावरची सर्व प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती हि ब्रिटिश सरकारची होती. हि मालकी ब्रिटिशांनी बंदुकीच्या जोरावर मिळवली होती. देश स्वतंत्र होताना ब्रिटिशांनी व त्यावेळेच्या नेत्यांनी असं ठरवलं कि सत्तेचे हस्तांतर होताना निवडणूक होतील आणि निवडून आलेली लोकं संविधान लिहितील व त्यानुसार काम केले जाईल. तसं संविधान लिहिले गेले आणि त्यात देश किंवा राष्ट्र हि संकल्पना मानली गेली आणि त्याची मालकी एकत्रितरित्या या देशातल्या सगळ्या लोकांना दिली गेली. याला लोकशाही म्हणतात. त्यानुसार देशातल्या प्रत्येक माणसाला काही हक्क दिले. त्याबदल्यात त्यांची काही कर्तव्ये मानली गेली.

आपण कर का भरतो?
देशावर सरकारची पर्यायाने आपलीच मालकी असल्याने देशातील जमीन आणि साधनसंपत्ती चा उपभोग घेण्याच्या बदल्यात प्रत्येक नागरिकाला कर द्यावा लागतो. आणि हा कर किती भरावा लागतो तर साधारणपणे ज्या प्रमाणामध्ये तुम्ही देशाच्या उपभोग घेता त्या प्रमाणात. हे प्रमाण कसा ठरते तर तुमच्या उत्पन्नावरून किंवा तुम्हाला मिळणाऱ्या सोयींच्या प्रमाणात किंवा तुमच्या खरेदी विक्रीच्या प्रमाणात. जो जितका जास्त उपभोग घेईन तो तितका कर भरतो.

आम्ही कर भरतो...
आजकाल कर भरतो हे एक कारण फार ऐकायला मिळतं. यात आपण जो कर भरतो तो सेवा आणि सुविधा बनून आपल्यालाच परत मिळतो. यात रस्ते पाणी वीज संरक्षण शिक्षण असा सगळं येतें. जर बजेट पाहिलं तर असा दिसेल कि उत्पन्नाचा काही भाग देश जनकल्याण योजनांवर खर्च करते. हा खर्च केला जातो कारण आत्ता जे नागरिक कर भरत नाही त्यांना शिक्षण व इतर सुविधा मिळाव्या जेणेकरून त्यांची उत्पन्न क्षमता वाढून ते कर भरतील आणि पर्यायाने भविष्यात सगळ्यांचा फायदा होईल. एक प्रकारचं डिलेड ग्रॅटिफिकेशन आहे हे.

कराच्या बदल्यात तुम्हाला काय मिळते?
कराच्या बदल्यात सरकार तुम्हाला तुमच्या वित्त आणि जीविताची हमी देते. म्हणजे तुम्हाला कोणी मारणार नाही आणि लुटणार नाही याची हमी. कुठे कोणी फसवणूक केली तर सरकार मध्यस्ती करून तुम्हाला न्याय मिळवून देते.

हे सगळं पुस्तकी आहे आणि जग असा चालत नाही. या सगळ्याची माहिती करून काय फायदा? आपण यात काय करू शकतो?
प्रत्यक्षात या सगळ्या संस्था आणि व्यवस्था आणि त्यातली लोकं कोणाचा लक्ष नाही हे पाहून प्रोसिजर हळू हळू पाळायचा कमी करतात. आपण सगळी लोकं या देशाचे मालक असल्याने यावर लक्ष ठेवणे हे आपले काम आहे. आणि हे लक्ष ठेवण्यासाठी हा सगळा कारभार कसा चालतो हे माहिती व्हावी म्हणून हा सगळा खटाटोप.

आम्ही निवडून दिलेले सरकार काय करताय हे आम्हाला कसा कळणार?
सरकार https://data.gov.in/ आणि इतर बऱ्याच प्रकारे वेगवेगळी माहिती जाहीर करते. माहितीचा अधिकार ह्या कायद्याचा पण उपयोग करू शकता. हि माहिती देणारी एक दोन विश्वसनीय वृत्तपत्र किंवा इतर माध्यमामध्ये हि माहिती मिळू शकते.

आम्ही यात बदल कसा करू ?
मतदान करताना विचार करून.

हे सगळं का करायचा?
हे सगळं करायचा कारण तुमच्या आयुष्याची उरलेली वर्षे सुखात जावी म्हणून. यात ज्येष्ठ नागरिकांना माफी आहे. त्यांनी नाही केले तरी चालू शकते. ज्यांना मुलं आहेत त्यांनी तुम्हाला जसा या जगाचा आनंद घेता आला तसा तुमच्या मुलांनाही घेता यावा म्हणून करा. या पलीकडे जाऊन आपल्याला हा देश जसा मिळालाय त्यापेक्षा चांगला किंवा आहे तसा तरी पुढच्या पिढीकडे द्यावा म्हणून हे सगळं करायचा.

हे सगळे बदल फार हळू हळू होतात...
सध्याच्या व्हाट्सअँप आणि इन्स्टाग्राम च्या काळात लोकांना सगळे लगेच पाहिजे असते. पण हे सगळे बदल हळू हळूच होतात. यात एक दोन माणसांमध्ये बदल करायचा नसून १३० कोटींच्या देशात ज्यामध्ये इतकी विविधता आहे तिथे करायचा आहे. त्याला वेळ हा लागतोच. पण हळू हळू कासव चालीने बदल होतो हे नक्की. नागरिक सजग असतील तर थोडा वेग नक्की वाढू शकतो.

अजून खोलात जाऊन विचार केला तर कळेल राष्ट्रनिर्मिती करणाऱ्या लोकांनी माणसाच्या कुठल्या गरजांची पूर्ती करण्यासाठी लोकशाही देशाची निर्मिती केली. वेळ मिळाल्यास दुपारी त्याबद्दल लिहीन.

चिडकू मस्त
असं काहीतरी लिहूनच ठेवावं, जेव्हा हे हुकूमशाही पेरू पाहणारे भामटे अशा चर्चा उठवायला लागतात तेव्हा तिथे तिथे हे टाकायचे.

हा धागा वेड पांघरून पेडगावला जायचा प्रयत्न आहे. लोकशाही कशी वाईट हि आयडिया लोकांच्या डोक्यात सोडून द्यायला हा खटाटोप सुरु आहे. हे लोक देशद्रोही आहेत, ह्यांना मृत्यदंड झाला पाहिजे

चिडकू, सुंदर प्रतिसाद. यात भर घालून वेगळा धागा बनवला तर लिंक द्यायलाही सोयीचा होईल.
किमान नागरीकशास्त्र माहीत/मान्य नसलेले भरमसाट लिहीत सुटलेले आहेत त्यांच्यासाठी याचा उपयोग होईल.

: आधुनिक लोकशाहीत नागरिकांकडे फक्त मतदारांचीच भूमिका असते. दोन निवडणुकांमधील कालावधीत नागरिकांकडे काहीच काम नसतं. त्यामुळे कार्यपद्धतीत नागरिकांचा सक्रिय सहभाग नसतो आणि काही निवडक लोकच प्रत्यक्षात राज्यकारभार करीत असतात व त्यांचं समाजावर वर्चस्व असतं, अशी सर्वसाधारण टीका लोकशाहीवर करण्यात येते. बहुपक्षीय पद्धती अस्तित्वात असलेल्या बहुतेक सर्व देशांत बहुमतातील पक्ष सत्ता हस्तगत करतो; परंतु निवडणुकीत अनेकदा इतर सर्व विरोधी पक्षांच्या तुलनेत संख्यात्मकदृष्ट्या त्या पक्षास प्रत्यक्षात कमी मतं मिळालेली असतात. त्यामुळे 'बहुमताचं राज्य' ही लोकशाहीतील मूळ कल्पनाच व्यवहारात नाकारली जाते.

बहुमताच्या लोकशाहीबाबत - तुमची जशी लायकी आहे तसे सरकार पण तुम्हाला मिळते. जर लोकच जागृत नसतील, प्रगल्भ नसतील तर तुम्हाला शासन, प्रशासन त्याच प्रमाणे मिळते. आता इथले लोक असे का आहेत हे इथल्या काहींना सांगून कपाळबडवती योगाला आमंत्रण देण्याचा कोणताही हेतू नाही.

तुम्ही आम्ही इथे चिखलोत्सव साजरा करतो ते देशात लोकशाही आहे म्हणून शक्य आहे. लोकशाही नसती तर काय बिशाद होती.

देशात लोकशाही आहे की नाय ते माहीत नाही पण प्रत्येकाच्या घरात बायकोशाही आहे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो.

वेळ मिळाल्यास दुपारी त्याबद्दल लिहीन.>>> नको एवढ्या घाई गडबडीत लिहू नका. आरामात संध्याकाळी लिहीलं तरी चालेल. दुपारी मस्तपैकी ac मध्ये झोप काढा. सोमवारी ऑफिसमध्ये लिहीलं तर उत्तमच.

पुस्तकी ज्ञानाबद्धल धन्यवाद चिडकू भाऊ,

50 च्या दशकाच्या सुरुवाती पासून जी लोकशाही सुरू झाली त्यात आतापर्यंत नक्कीच काही सुधारणा हळूहळू झाल्या असल्या पाहिजेत. तुमच्या मते कोणत्या प्रकारे आताची लोकशाही 50, 60 वा 70 च्या दशकापेक्षा वेगळी आहे? त्यावेळी लोकप्रतिनिधी जास्त भ्रष्टाचारी होते की आता आहेत?

कृपया दरडोई उत्पन्न व करसंकलन या फुटपट्टीवर लोकशाहीला मोजू नये. त्या ऐवजी तुमच्या आजूबाजूला वा देशात इतरत्र घडणाऱ्या घटनांचे संदर्भ द्यावे.

करांचा उपयोग कशासाठी केला जावा हे शाळेतील मुलेही सांगतील. तसा तो केला जातोय का?

सध्याची लोकशाही भ्रष्टाचार कशी रोखते?

जर स्वातंत्र्यानंतर 70 वर्षानंतरही बरेचसे नागरिक लोकप्रतीनिधींच्या चरित्र्याला/ कामाला न पाहता पैसे वा आमिष घेऊन वा जात /धर्म पाहून स्वतःच मत विकत असतील तर ती लोकशाही ठरते का? यावर उपाय काय?

बाकी माझा आधीचा प्रतिसाद कुणाला हुकूमशाही समर्थक वाटला असेल तर टर उडविण्या ऐवजी तसे वाटण्यामागची कारणे समजावून सांगावित.

समस्या सांगण्यापेक्षा उपाय सांगितलेले कधीही चांगलं..

लोकशाही जर चुकीच्या मार्गाने चालली आहे असे वाटत असेल तर जनजागृती करणे लोकांना त्याप्रमाणे शिक्षित करून त्यांना त्यांच्या मतांची किंमत पटवून देणे, त्यांना आत्मनिर्भर करणे, लोकशिक्षण करणे, चर्चा घडवून आणणे, त्यांना आपल्या समस्यांची सोडवणूक कोणत्या कायदेशीर मार्गाने होऊ शकते ह्याची माहिती करून देणे, त्याप्रमाणे उदाहरणे घालून देणे, संविधानाच्या कलमांची अमलबजावणी नीट होते का ह्याबद्दल जागरूक राहायला शिकवणे इत्यादी अनेक उपक्रम करण्यासारखे आहे.

पण ते सोडून लोकशाही कशी वाईट, लोक मते विकतात, आजवर कुठे काय भले झाले ह्या विधानांच्या आडून आडून चतुराईने संविधान आणि लोकशाही च्या विरोधात कारस्थान करणे सुरु आहे. लोकांना लोकशाही पेक्षा हुकुमशाहीत जास्त फायदा आहे असे स्वत:च वाटू लागले पाहिजे असे प्रयत्न सुरु आहेत. लोकांच्या हातात सत्ता असल्यापेक्षा कोण्यातरी एका मासिहाच्या हातात सत्ता असल्यास किती बरे असे चित्र उभे केले जात आहे.

जे लोक असे प्रयत्न करत आहेत त्यांनी एक लक्षात घ्यावे .. वस्तीला आग लावण्याच्या प्रयत्नात तुमचे घर जळणारच नाही ह्या भ्रमात राहू नका....

काही प्रतिसादांमधील प्रश्न प्रामाणिक आणि अतिशय महत्वाचे आहे.

कुठलीही व्यवस्था बदलायची असेल तर सध्याची व्यवस्था काय आहे, त्याआधी काय होते, आधीच्या व्यवस्थेमध्ये काय त्रुटी होत्या हे समजावं म्हणून पुस्तकी ज्ञान आणि इतिहास.

लोकशाही म्हणजे सत्तापालट करण्याचा हक्क. तुम्हाला तुमचे सरकार भ्रष्टाचारी आहे असा वाटतंय तर दर ५ वर्षांनी तुम्ही सत्ता बदल करू शकता. हा बदल करायला तुम्हाला हातात शस्त्र घ्यावे लागत नाही. जगाच्या पाठीवरील कित्येक देशात असंख्य वेळा हे झाले आहे. उत्तर कोरिया मध्ये निवडणूक कशा होतात ते पाहणे फारच विनोदी आहे. आपल्याप्रमाणे सर्व प्रोसेस होते. मतपत्रिकेवर फक्त किम जोंग ऊन हे एकच नाव असते. मतदान अनिवार्य आहे. मतदान उघडपणे करावा लागते. हे सगळे करून २ आठवड्यानंतर निकाल हि जाहीर होतो. असो.

देशावर प्रत्येकाला वंशपरंपरागत समान हक्क असणे याची किंमत आणि जबाबदारी फार आहे. असंख्य पूर्वजांनी त्यासाठी अपरिमित कष्ट घेतलेत. तेंव्हा कुठे स्वातंत्र्य दिसतंय. तो हक्क सोडून कोणाला तरी हुकूमशाह म्हणून स्वीकारायचं का लोकशाही अजून कशी चांगली होईल याचा विचार करायचा हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे.

झट्पट उत्तर लिहुन दणकुन मार्कस मिळवणे हे फक्त शाळा कॉलेजमध्येच होवु शकते. करांचा वापर होतो का, लोकशाहीचे मुल्य जपले जात आहे का? असे प्रश्न विचारणे, हा भाबडेपणा झाला. ह्यावर लिहलेल्या निबंधाला चांगले मार्क्स मिळतली, पण प्रत्यक्ष जीवनात संयम, अभ्यास आणि खात्रिलायक माहितीवरुन मत बनवावं लागत. उगाच मला काही फाकाहीनाही म्हणुन लगेच लोकशाही कुचकामी असा विचार करुन चालत नसते.
चिडकु +११११

फक्त प्रतिवादापुरते धरून चालू,
'लोकशाही ही अतिशय निरर्थक पद्धती आहे"

ज्यांना असे वाटते त्यांनी 1,2,3 करून लोकशाहीस काय पर्याय असू शकतो ते इकडे लिहावे, (भारतासारख्या वैविध्य असणाऱ्या देशात, शांततामय मार्गाने राबवता येईल असर पर्याय हवेत) धागा लेखक, शशांक, 188 यांना लिखाण करण्याचा विशेष आग्रह.
जर असे पर्याय उपलब्ध नसतील, तर सर्व दोषांसकट आत्ताची पद्धत कमीतकमी निरर्थक आहे असे समजून उगी राहावे.

कुठलीही "शाही" परिपूर्ण नसते. त्यामुळे तिला लवचिक राहून दरवेळी स्वत:त बदल करावे लागतात. भारतीय लोकशाहीत सध्या तिच्या वाईट गोष्टीचा अतिरेक झालेला आहे. दुर्दैवाने राजकारण व सरकारी नोकरी म्हणजे पैसे खाणे हे योगाने आलेच असा सर्वमान्य समज झाल्याने 90 टक्के राजकारणी व नोकरशहा भ्रष्टयाचारि आहेत. त्यात लोकशाहीत बदल होण्यासाठी लोकप्रतिनिधींचे एकमत व्हावे लागते, त्यामुळे सगळंच कठीण होऊन बसलंय. पण मूलभूत सुधारणा आणायच्या असतील तर सुरुवातच स्वच्छ चारित्र्याच्या लोकांनि करायला हवी जे प्रस्थापित लोकप्रतिनिधींना रिप्लेस करू शकतील. अशा लोकांचा मॅनिफेस्टो "लोकशाही मार्गाने सत्ता मिळवून लोकशाहीत सुधारणा करणार" असा असला पाहिजे.

आता त्या सुधारणा म्हणजे आदर्श समाजवादी हुकूमशाही या प्रकारात जसे लोकप्रतिनिधी व सरकारी नोकरांसाठी कडक नियमावली बनविली जाते ते नियम. त्याप्रकारच्या नियमांबद्धलच मी आधी लिहिलं (अर्थातच काही हेलिश लोकांनी ते समजून ना घेता मला फॅसिस्ट म्हणून स्वतःच्या मनाचे श्लोक तयार केले) असो.

भारतिय लोकशाहीला रुळावर आणण्यासाठी लोकप्रतिनिधींना व नोकरशाहीला शिस्त लावण्याची फार गरज आहे, कारण लोकशाही कितीही आदर्शवत वाटली तरीही तिच्यात दोषही आहेत.

स्वच्छ चारीत्र्यात दुस-या समाजाचा द्वेष न करणे, दंगलींनी खूष न होणे, एखाद्या समाजाच्या गरोदर बाईची हत्या झाली तरी त्याचे समर्थन न करणे इ. इ. अशा गोष्टींचा समावेश असेल तर क्या कहने

स्वच्छ चारीत्र्यात दुस-या समाजाचा द्वेष न करणे, दंगलींनी खूष न होणे, एखाद्या समाजाच्या गरोदर बाईची हत्या झाली तरी त्याचे समर्थन न करणे इ. इ. अशा गोष्टींचा समावेश असेल तर क्या कहने। >>>

नक्कीच, आणखी बरीच मोठी लिस्ट जोडता येईल.

कोणतीही राज्य पद्धती 100% चांगली किंवा 100% वाईट नसते .
राजेशाही विषयी समर्धण करताना आसं मत व्यक्त होते की ऐकाच घराची सत्ता असल्यामुळे राजा चा वारसाला लहानपणा पासून राज्यकारभाराची जान आस्ते .आणि दुसरे महत्वाचं म्हणजे त्यांना आव्हान नसते ,निवडून यायचे नसते त्यामुळे असुरक्षित ची भावना नसते .त्यामुळे राज्याचं चांगलच चालावं आशि राजा ची धोरण असतात.
राज्य चांगल्या स्थिती मध्ये तर राजा पण चांगल्या स्थितीत असतो त्यामुळे अशा राज्यात कायदा सुव्यवस्था उत्तम असते exa दुबई .
पण राजा जर दुष्ट निघाला तर जनतेवर अन्याय सुधा होवू शकतो आणि जनतेला राजा बदलायचा अधिकार नसतो ..

फॅसिझम हा ऐकाच समूहाची, जातीची,धर्माची सत्ता आस्ते .त्यामध्ये बाकी समूहाला ,जातीला,धर्माला काही किंमत नसते त्या मुळे त्यांच्यावर अगणित अत्याचार होतात आणि त्यांना माणूस म्हणून जगणे पण कठीण होते .

त्या मानाने लोकशाही ही कधी ही उत्तम इथे तुम्हाला अधिकार असतात,तुम्ही सरकार बदलू शकता,कोणत्या ही एका संस्थेच्या हातात सर्व अधिकार नसतात त्यामुळे मनमानी करता येत नाही .निवडणूक जिंकून परत सत्ता मिळवावी लागते त्या मुळे जनतेच मन सुधा राखव लागत .त्यामुळे जनतेच्या फायद्याचे निर्णय राबवावे लागतात आस सर्व गोड गोड वाटावे आशि की राज्यपद्धती आहे
पण

हे सर्व जेव्हा घडत जेव्हा जनता सुजाण असते ,तिला स्वतच्या अधिकार शिवाय आपली कर्तव्य काय आहेत ह्याची सुधा जाणीव असते .
जे धर्म,जात,प्रांत,आणि बाकी बाबींचा विचार न करता फक्त देश हिताला प्राधान्य देतात.
आपल्या देशात आशि सुजाण जनता नाही त्या मुळे लोकशाही ची चांगली बाजू झाकली जाते आहे .
मतदानाचा अधिकार मध्ये भेदभाव करता येणार नाही असा भेदभाव केला तर हा देश आपला नाही ही भावना तीव्र होवून लोकशाही ल धोकादायक ठरेल .
जी लोक उत्तम नोकरीला आहेत सर्व सुख उपभोगत आहेत आणि main म्हणजे हा वर्ग शिकलेला आहे .आणि ह्या वर्गाची जास्त जबाबदारी आहे मतदान करून योग्य उमेदवार निवडून देणे किंवा बाकी लोकांना योग्य अयोग्य ह्यातील फरक समजावणे .समाज म्हणून आणि देशाचे नागरिक म्हणून ते त्यांचं कर्तव्य आहे पण ते न करता टीका करणे हा ह्यांचा आवडता छंद आहे .
सुस्थितीत असलेल्या लोकांचं ऐक सर्वात मोठा गैरसमज असतो की आम्ही स्वतःच्या हिमतीवर कमवत आहे आणि आम्हाला सत्तेवर कोण आहे ह्याची विचार करण्याची गरज नाही .
त्यामुळे आम्ही मतदान पण करणार नाही आणि जे राजकारण चालू आहे त्या मध्ये भाग सुधा घेणार नाही .पण ह्या शिकलेल्या वर्गाच्या तटस्थ राहण्याा मुळे चुकीचे लोक निवडून जातात .
सरकारची धोरण चुकीची असतील तर सर्वांचेच जगणे मुश्किल होवू शकते. हे मात्र ह्यांच्या गावी पण नसतं .

फापट पसारा नको,
पॅन इंडिया राबवता येईल अशी शासन पद्धती कोणती?

किंवा आहे त्या लोकशाहीत कोणते बदल (सुधारणा शब्द मुद्दाम टाळत आहे) झाले की भारतातील लोकशाही तुम्हाला सार्थ वाटू लागेल?

आपल्या देशात विविध धार्मिक,विविध जातीय,विविध भाषिक,विविध संस्कृती असणारे लोक आहेत .
जेवढे भेद आहेत तेवढीच प्रत्येकाची अस्मिता वेगळी आहे .
त्या मुळे हुकुमशाही आणि राजेशाही ह्या दोन्ही पद्धती आपल्या देशाला अयोग्य आहे .
कारण राजा किंवा हुकूमशाही आपलीच मत जनतेवर टाकण्याचा प्रयत्न करतील आणि त्याला जनतेचा विरोध होवून यादवी माजेल .
लोकशाही ही आपल्या देशाला योग्य आहे .
एक देश एक भाषा .
एक देश एक प्रवेश परीक्षा असले उद्योग पहिले बंद केले पाहिजेत
लोकशाही मध्ये काय बदल केला पाहिजे हा प्रश्न आहे ?
ह्याच उत्तर ऐका वाक्यात देता येणार नाही .
समाज प्रबोधन आणि संस्कार हे समाज सुधारण्याचे महत्त्वाचे रस्ते आहेत पूर्वी गाडगे महाराज पासून संत तुकाराम पर्यंत खूप संतांनी समाज सुधारणेचे आणि अनिष्ट प्रथांच्य विरोधात कोणत्याच समाजाला न दुखवता प्रबोधन केले तसच कार्य आता घडणे अवशक्य आहे .
कोणताच धर्म हिंसा,कमजोर लोकांवर अन्याय करणे .पर धर्मातील लोकांवर अत्याचार शिकवत नाही त्या खरं धर्म काय आहे हे लोकांना सांगणे गरजेचं आहे .
Ias आणि आयपीएस ह्यांना पहिले निर्णय प्रक्रिये मधून बाजूला केले पाहिजे त्यांचं काम फक्त सरकारचे निर्णय अमलात आणणे हेच आहे .
प्रत्येक विभागातील मंत्र्याला सल्ला देण्यासाठी देशातील त्या क्षेत्रात हुशार आणि अनुभवी लोकांची समिती आसावी आणि त्यांची निवड सर्वपक्षीय खासदार केंद्रासाठी आणि सर्वपक्षीय आमदार राज्यासाठी करतील .
कोणतेही धोरण,निर्णय,घेताना ह्या समितीचा निर्णय अंतिम राहील ,मंत्री आणि प्रशासन फक्त ह्या निर्णयाची अंमलबजावणी करतील .
आणि हा निर्णय फेटाळून lavaycha अधिकार फक्त pm आणि cm la असेल .

पण त्या नकराचे दुष्परिणाम झाले तर आर्थिक दंडाची शिक्षा आसावी .
आसा बदल आपल्या लोकशाही मध्ये झाला पाहिजे असं माज मत आहे
आणि अस मत मी सविधनाचा पूर्ण आदर करून व्यक्त करतोय गैर अर्थ काढू नये .
पैसा,गुंडागर्दी,दडपशाही हा मार्ग अनुसरून देशात खासदार आमदार बनतील ह्याची कल्पना तेव्हा नसेल .

आणि हा निर्णय फेटाळून lavaycha अधिकार फक्त pm आणि cm la असेल .

पण त्या नकराचे दुष्परिणाम झाले तर आर्थिक दंडाची शिक्षा आसावी .>>>>

हा दंड भरणार कोण? व्यक्ती की पक्ष?
Demon सारखा निर्णय यशस्वी झाला की दुष्परिणाम झाले हे कोण मोजणार? पुढच्या पक्षाचे सरकार येईल तेव्हा मोजणार का?

सुधारणा सुचवण्याआधी खरोखर राज्यकारभार कसा चालतो ह्याचा अभ्यास करावा लागतो. तर त्याला सुधारणा म्हणतात. म्हणून राज्यव्यवस्थेचा अभ्यास लागतो. इथे बसून मनाला येईल ते फेकत बसायला तर लागत नाही.

हेला, मित्रा मला आता तुझी कीव यायला लागलीय.जबराट नकारात्मकता भरलीय तुझ्यात. काही डिप्रेशन वगैरे असेल तर सकारात्मक स्व-संमोहन खूप फायदेशीर ठरते. मला मेसेज केलास तर मी नक्की मदत करू शकेन...

<< >>
---- हेला, तुमचे या धाग्यावरचे तसेच इतरत्र दिलेले प्रतिसाद अभ्यासण्यासारखे असतात आणि समोरच्या व्यक्तीला विचार करायला लावणारे असतात. keep up the great work.

जे लोक तुमच्या विचारांचा सामना करु शकत नाही ते लोक नैराश्येपोटी तुमच्यावर प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष टिका करतील. बहुतेक वेळा अशा टिकेत तथ्यांश नसतो आणि टिका विषयाला धरुनही नसते. अशा टिकेकडे संपुर्ण दुर्लक्ष करायचे सामर्थ्य तुमच्याकडे आहेच आणि असे बळ वाढो म्हणुन शुभेच्छा. Happy

Pages