न्युझीलंड- दहशतवादी हल्ला

Submitted by भरत. on 16 March, 2019 - 07:33

न्यु झीलंडमधल्या ख्राइस्ट चर्च इथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलंच असेल. जगातला कोणताही देश अतिरेकी, द्वेषाधारित, विध्वंसक विचारसरणीपासून सुरक्षित राहिलेला नाही. या हल्ल्यानंतर न्युझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी देशाला उद्देशून केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आश्वासक वाटलं. त्यांच्या भाषणातला हा काही भाग. (स्वैर अनुवाद)

या हल्ल्याने घायाळ झालेल्या लोकां करिता हा माझा संदेश. हा संदेश फ़क्त माझ्याच नव्हे तर माझ्या देशाच्या वतीने आहे , माझ्या देशवासियांच्या भावनाही याच असतील , याची मला खात्री आहे.
या हल्ल्यात क्षती पोचलेल्या लोकांसोबत आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत. बळी पडलेले लोक ख्राइस्टचर्चचे होते. त्यातल्या अनेकांचे ते जन्मस्थान नव्हते. खरं तर त्यातल्या अनेकांनी आपल्या वास्तव्यासाठी न्युझीलंडची निवड केली होती. हा देश त्यांनी (स्थलांतरासाठी) स्वत:हून निवडला त्याच्याशी नातं जोडलं, इथे त्यांची कुटुंब होती, इथल्या समाजाबद्दल त्यांना जिव्हाळा होता आणि या समाजानेही त्यांना प्रेम दिलं. या जागी ते एक सुरक्षित निवारा शोधीत आले. इथे त्यांना त्यांच्या धर्म आणि संस्कृतीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य होते.

तुमच्यातल्या अनेकांना प्रश्न पडला असेल, हे असं माझ्या देशात कसं घडू शकतं? आपण लक्ष्य ठरण्याचे कारण, आपण द्वेष करणार्‍यांना आसरा दिला हे नव्हते. आपण वंशभेदाला , अतिरेकी विचारसरणीला थारा दिला, म्हणून हा हल्ला इथे झाला नाही. यांतलं ( वंशभेद, द्वेष, अतिरेकी विचार) काहीही आपल्यात नाही, म्हणूनच केवळ आपल्याला लक्ष्य केलंय. आपल्याला लक्ष्य केलंय कारण आपण विविधता, प्रेम, आपुलकी ही तत्त्वं मानतो. ही तत्त्वं मानणार्‍यांना सामावून घेतो. निराधार गरजूंना आश्रय देतो.

या तत्त्वांपासून आम्ही जराही ढळणार नाही, ढळू शकणार नाही याची खात्री बाळगा.

दोनशे वेगवेगळ्या वंशाच्या आणि एकशे साठ भाषा बोलणार्‍यांचा हा देश आहे, याचा मला अभिमान आहे. या विविधतेत आमची काही सामाईक तत्त्वं सामावलेली आहेत. या हल्ल्याची झळ लागलेल्यांबद्दल आमच्या मनात सहवेदना आहे, आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत; हे आजच्या घडीला माझे सांगणे आहे.

ज्या विचारसरणीतून हे कृत्य झालं तिचा मी तीव्रतम शब्दांत निषेध करते.
तुम्ही (आपला देश, आपला समाज म्हणून) आम्हांला निवडलं असेल, पण आम्ही तुम्हांला पूर्णपणे नाकारतोय. तुमचा धिक्कार करतोय.

Group content visibility: 
Use group defaults

अत्यंत दुर्दैवी घटना. या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागलेल्या सगळ्यांच्या आत्म्यास शांती लाभो तसेच त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सवरण्याचे बळ देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. या हल्ल्यात दोषी असलेल्या नराधमांना भर चौकात दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा द्यावी जेणेकरून बाकी कोणाचे असे करण्याचे धाडस होऊ नये.

बोकलत, सहमत आहे तुमच्याशी. मनातले लिहीलेत. मला विशेषता न्युझीलंडच्या पंतप्रधानांनाचा संदेश आवडला. खरे तर आवडला हे वाक्य योग्य नाही, पण नेमक्या शब्दात त्यांनी त्यांचे दु:ख व्यक्त केलेय. कट्टरता, मग ती कोणत्या का धर्माची असेना, नेहेमी क्लेषकारकच ठरते. आणी दु:खाची अजून एक गोष्ट म्हणजे हा हल्लेखोर भारतीयांनाच शत्रु ठरवतोय. का तर याला वर्णभेदावर विश्वास आहे म्हणून. जे दुर्दैवाने आपल्या पण देशात अजूनही सुरु आहे. हल्लेखोरांना कडकच्या पेक्षा कडक शिक्षा व्हावी.

न्यूझीलंड च्या PM चे वक्तव्य अतिशय मॅच्युऑर्ड आहे.
मुझे जला दो, लाथ मार कर निकाल दो , फासी दो वगैरे प्रकारच्या वक्तव्याच्या किंवा बाळगलेल्या मौनाच्या पार्श्वभूमीवर जास्तच उठून दिसते.

पहिले या दहशतवादी hallyacha तीव्र निषेध.
पण आशा हल्ल्यामागे आताची जीवन जगण्यासाठी करावी लागणारी तीव्र स्पर्धा आणि त्यातून येणारे नैराश्य हे पण कारण आसव .

हल्ल्याचा निषेध.
पंतप्रधान खरच आपल्या पदाला योग्य तेच नव्हे तर माणुसकीला धरून बोलल्या.

At least 9 people of Indian nationality or Indian origin are missing after Friday's shootings at two mosques in New Zealand's Christchurch left 49 people dead, High Commissioner Sanjiv Kohli said.

https://www.indiatoday.in/amp/world/story/hello-brother-new-zealand-mosq...

Submitted by राजसी on 16 March, 2019 - 19:26.>>>> +१११
मुख्य म्हणजे धागा काढायचा सुप्त हेतु तोच आहे.
सुधरा

न्यूझीलंड च्या पंतप्रधानांनी तत्काळ या घटनेचा धिक्कार केला आहे. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. अशा घटना घडल्यानंतरच नेतृत्वाची खरी कसोटी असते. घटनेचा ताबडतोब निषेध धिक्कार आणि या कडक शब्दांना कृतीची जोड मिळणे पण तेव्हढेच महत्वाचे आहे.

निरपराधी व्यक्तींना मारणार्‍या सर्वप्रकारच्या हिंसाचाराचा निषेध करणे महत्वाचे आहे.

<< मला विशेषता न्युझीलंडच्या पंतप्रधानांनाचा संदेश आवडला. खरे तर आवडला हे वाक्य योग्य नाही, पण नेमक्या शब्दात त्यांनी त्यांचे दु:ख व्यक्त केलेय. कट्टरता, मग ती कोणत्या का धर्माची असेना, नेहेमी क्लेषकारकच ठरते. >>
------- सहमत...
जगासमोर अनेक प्रश्न आहेत, आणि आपण धर्म (मग पुढे रंग, जात, भाषा...) च्या भिंती मजबूत करत आहोत.

<<आणी दु:खाची अजून एक गोष्ट म्हणजे हा हल्लेखोर भारतीयांनाच शत्रु ठरवतोय. का तर याला वर्णभेदावर विश्वास आहे म्हणून. जे दुर्दैवाने आपल्या पण देशात अजूनही सुरु आहे. हल्लेखोरांना कडकच्या पेक्षा कडक शिक्षा व्हावी. >>
------ कडक संदेश वरुन यावा लागतो आणि तो तत्काळ यायला हवा. आलेल्या संदेशाला कृतीची जोड पण हवी. असे होत नसेल तर त्या संदेशाला काहीही अर्थ नाही.
लखनौ मधे काश्मीरी भारतीयांना मारलेले सर्व जगाने बघितले... काय दोष होता त्यांचा ? कष्ट करुन रोजी-रोटी करुन कमा वत होते बिचारे.

गोमांस च्या नावाने मोठा 'संतप्त' जमाव पोलीस स्थानकावर चालुन जातो, पोलीसांवर हल्ला करतो, चौकी जाळतो... एक घटना असेल तरी वाईटच आहे, पण आतापर्यंत १००+ वेगवेगळे हल्ले झाले आहेत, आणि डिसेंबर २०१८ पर्यांत ४४ हत्या झाल्या आहेत.
https://www.hrw.org/news/2019/02/18/interview-killing-name-cows

घटनेची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री योगी म्हणाले. कुठली घटना तर मांस तिथे आलेच कसे... हत्याबद्दल सगळी कडे चिडीचुप.... कारण काही बोलले तर हिंतसंबंध दुखावाण्याचा धोका आहे. आता तर हल्लेखोराच्या घरात पोलीसांनीच पिस्तुल/ हत्यार आदी ठेवल्याचा आरोप होतो आहे (केस मजबुत बनणार नाही याची सर्व काळजी वरिष्ठ पातळीवर घेतली जात आहे ?).

'गोमांस' च्या नावाखाली झुंडीने केलेल्या हल्ल्यात केवळ निरपराधी मुसलमान लोक मारले जातात.... आणि आपण सोईनुसार शांत रहाणे (किंवा काहीच न बोलणे, काहीच न लिहीणे) पसंत करतो. या शांतपणामुळे यातुन आपण केवळ द्वेष भावना पसर वायला नकळत पणे हातभार लावत आहोत. या द्वेषाच्या वातावरणात आपल्याला आपली पुढची पिढी वाढवायची आहे?

हल्लेखोराने भारतीयांना शत्रू ठरवले नसते तरी हा हल्ला माझ्यासाठी तेव्हढाच निषेधार्ह आणि घृणास्पद आहे कारण तो मानवतेच्या विरोधात आहे.

अमेरिकेत ट्रम्पला पाठिंबा देणार्‍यात, ट्रम्प च्या प्रत्येक कृतीची भलामण करणार्‍यात अनेक भारतीय आहेत.... कारण काय त्याची धोरणे 'मुस्लिम विरोधात आहेत'. आपल्याला बालपणापासुनच मुस्लिम द्वेषाचे विष पाजले गेले आहे आणि शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने ट्रम्प जवळचा वाटतो. तो दिवस दुर नाही जेव्हा त्याच्या वक्तव्यामुळे भारतीय लोकांना लक्ष्य बनवले जाईल (असे आधी झाले आहे - तुरळक घटना आहेत... आणि "मला तर झळ बसली नाही... मग ठिक आहे").

जर न्यूझीलंडच्या माथेफिरुने ट्रंपकडून स्फूर्ती घेतल्याचा दावा केला म्हणून ट्रंप दोषी तर मग इस्लामी अतिरेकी कुरान, हदीस, सुन्ना वगैरे मुस्लिम धर्माच्या मूलतत्त्वांकडून स्फूर्ती घेतल्याचा दावा करतात (महंमद आटा, ओसामा बिन लादेन वगैरे सगळे). मग त्या मुस्लिम धर्माच्या मूलतत्त्वांना दोषी मानायचे का?
ट्रंपने ह्या माथेफिरुला प्रत्यक्ष मदत केल्याचा कुठलाही पुरावा नसताना त्याला आरोपीच्या पिंजर्यात का उभे केले जात आहे?

न्यूझीलंडमधल्या मशीदींवरच्या हल्ल्यामागे स्टॉकहोम इथल्या मुस्लिम इमिग्रंटने केलेल्या हल्ल्याचे कारण आहे असे स्वत: त्या हल्लेखोराने म्हटलेले आहे.

https://www.thedailybeast.com/new-zealand-shooting-who-was-ebba-akerlund...

रिवर्स स्वीप, तुम्ही मांडलेला मुद्दा गैरसोयीचा आहे. म्हणूनच धाग्यात तो लिहिला गेला नव्हता.

समजून घ्या बिचार्यांना..

वाचतोय. वेळ झाला की लिहीन.
वरच्या एका लिंकमध ले गैरसोयीचे मुद्दे
Terrorists love to exploit the deaths of children at the hands of the people they declare enemies. The propaganda of al Qaeda and the so-called Islamic State is filled with images of mutilated toddlers that give the jihadis, they claim, license to take revenge and commit mass murder.

So, too, with white supremacists—including the alleged murderer of 49 people at mosques in New Zealand on Friday. They have seized on the image of 11-year-old Ebba Åkerlund, killed in a 2017 terror attack in Sweden and often made into memes, to feed their hatred. Her name was scrawled on to the butt of the New Zealand shooter’s assault rifle along with other pretexts for his “revenge.

When I testified in court, I said that I am reminded of my daughter’s death all the time and not only when I hear about about Drottninggatan [the neighborhood where she was killed], but also when similar acts occur in other countries,” he wrote. “But then of course I could not even imagine the idea that someone would write my daughter’s name on a rifle.” He goes on to condemn the attacks in New Zealand. “How sick it is.”

धागा भरकटण्याची शक्यता असल्याने , ज्या विषयासाठी हा धागा काढलाय त्या विषयाप्रमाणे शीर्षक बदलावे ही विनंती.

धाग्यात न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचेच वक्तव्य असल्याने व हल्ल्याच्या मूळ कारणांविषयी कुठलाही उहापोह नसल्याने या धाग्याचे शीर्षक "न्यूझीलंड वरील हल्ला व तेथील पंतप्रधानांचे भाषण" असा असला पाहिजे.

I have condemned this attack on two mosques and am going this evening to a prayer at Ahamadiya Mosque. It is said that this is an anti immigration and due to rampant Islamophobia in Western world. While agreeing with this I believe that it high time that Muslims should introspect to find out the reason for Islamophobia. Hope that happens and the perhaps there will be less violence.

<<<ट्रंपने ह्या माथेफिरुला प्रत्यक्ष मदत केल्याचा कुठलाही पुरावा नसताना त्याला आरोपीच्या पिंजर्यात का उभे केले जात आहे?>>>
योग्य प्रश्न. Fair and balanced!

न्युझीलंडमधल्या त्या दहशतवाद्याला दहशतवादी न म्हणता माथेफिरू म्हणण्याचं काही खास कारण असावं.
This can only be described as a terrorist attack या न्युझीलंडच्या पंतप्रधानांच्या म्हणण्याला महत्त्व न देण्याचं नक्कीच काही कारण असावं.
त्यांनी हे कृत्य सुनियोजित असल्याचं आणि मारेकर्‍यांची विचारसरणी अतिरेकी असल्याचंही म्हटलंय.

While agreeing with this I believe that it high time that Muslims should introspect to find out the reason for Islamophobia >>> हे कोणी म्हंटले आहे कल्पना नाही पण या कशातच नसलेल्या सर्वसामान्य मुस्लिम व्यक्तीने काय करणे अपेक्षित आहे नक्की? जे कोण अतिरेकी आहेत त्यांचे बॅगेज त्याने कशाला डोक्यावर घ्यायचे?

जे कोण अतिरेकी आहेत त्यांचे बॅगेज त्याने कशाला डोक्यावर घ्यायचे? >>

ते निरपराध आहेत यात काही वादच नाही. जी कृत्य दहशतवाद्यांनी केलीत त्याची किंमत निरपराध मुस्लिमांनी आपल्या कुर्बानीने द्यावी हे कोणीही मानणार नाही.
पण रॅडिकल इस्लाम मुळात इतका फोफावला त्याचं कारण कट्टर मुस्लिमांपेक्षाही कित्येक मवाळ मुस्लिम, जे या विरोधात उठून उभे राहत नाहीत, हे आहे.

"I believe that it high time that Muslims should introspect to find out the reason for Islamophobia" >> म्हणजे आत्ता बाकीच्या मुसलमांनीही आपला दहशतवाद विरोधी आवाज बुलंद करायची गरज आहे, इतकाच घ्यावा

रच्याकने - ज्या व्हाईट सुप्रीमिस्ट गटाकडून हा हल्ला झाला, त्यांच्या रागाचं एक मुख्य कारण , मवाळ मुसलमानांची इस्लामी दहशतवादाविषयीची चुप्पी , हेसुद्धा आहे. अशा नरो वा कुंजरो टाईप भूमिका घेतल्याने बाकी जनतेचा रोष एक प्रकारे त्यांनी आपल्या अंगावर ओढून घेतलाय. फार कशाला, न्यूझीलंडच्या हल्ल्याविरोधात मेणबत्ती मार्च करायलाही फार थोडे लोक पुढे आले, यातच कायतें समजा. बऱ्याच जणांमध्ये (यात क्रिश्चन, हिंदू, ज्यू सगळेच आले) या हल्ल्याला उलट छुपी सहानुभूती आहे.

न्यूझीलंडमधील हे हत्याकांड निंदनीय होते. संबंधित लोकांना मृत्युदंडच योग्य आहे. पण अल कायदा आणि आयसिसच्या तुलनेत हा कितपत व्यापक म्हणता येईल? इस्लामी दहशतवादाचे कट हजारो मैल दूर कुठेतरी शिजतात. शेकडो मैल दूर असणारे अरब देश त्यांना सढळ हस्ते पैसे आणि सामग्री पुरवतात. मग ते अतिरेकी शेकडो वा हजारो मैल दूर कुठल्यातरी देशात जातात. यथावकाश हल्ला, विध्वंस घडवतात. आणि हे चालत रहाते.

इस्लामी दहशतवादाच्या मोठ्या कटात आणि न्यूझीलंडमधील एका लहानशा गटाने घडवून आणलेले हिंसक कृत्य ह्यात फरक नाही का?

<< ते निरपराध आहेत यात काही वादच नाही. जी कृत्य दहशतवाद्यांनी केलीत त्याची किंमत निरपराध मुस्लिमांनी आपल्या कुर्बानीने द्यावी हे कोणीही मानणार नाही.
पण रॅडिकल इस्लाम मुळात इतका फोफावला त्याचं कारण कट्टर मुस्लिमांपेक्षाही कित्येक मवाळ मुस्लिम, जे या विरोधात उठून उभे राहत नाहीत, हे आहे.

<<"I believe that it high time that Muslims should introspect to find out the reason for Islamophobia" >> म्हणजे आत्ता बाकीच्या मुसलमांनीही आपला दहशतवाद विरोधी आवाज बुलंद करायची गरज आहे, इतकाच घ्यावा >>
------- हे प्रत्येकानेच करायला हवे, केवळ मुसलमानांनीच करायला हवे अशी भुमिका नको. दुर्दैवाने आत परिस्थिती त्यांच्यावर आली आहे, उद्या इतरांवर येणारच नाही असे नाही. कुठेतरी गुरुद्वारावर (२०१२, ओल्ड क्रिक- विस्कॉन्सिन) असाच हल्ला झाला होता... .

ओ वॉव आता हल्ल्याचे ट्रिवियलाय्झेशन पण सुरु झाले का? लव्हली हां. मुस्लिमविरोधात काही झालं की ती कशी मुस्लिमांचीच चूक आहे हे मस्त पटवून देतात लोक. उघडपणे लिहा ना मुस्लिम मारले त्याचा आम्हाला खुप आनंद झालाय. ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचे?

<< इस्लामी दहशतवादाच्या मोठ्या कटात आणि न्यूझीलंडमधील एका लहानशा गटाने घडवून आणलेले हिंसक कृत्य ह्यात फरक नाही का? >>
------- फरक आहे. प्रतिक्रिया बदलते.
अशा हल्या नंतर मुस्लीमांनीच आत्मनिरीक्षण करायला हवे असे वर कुणी तरी म्हटले आहेच.
इस्लाम करतो तो मोठा दहशतवाद.... येथे मात्र माथेफिरु पणा आणि लहानसा गट...

हे प्रत्येकानेच करायला हवे, केवळ मुसलमानांनीच करायला हवे अशी भुमिका नको. >>

बरोबर. दुसऱ्यांची घरं जळताना जे स्वस्थ राहिले, त्यांना स्वतःच घर पेटल्यावर कशी मदत मिळेल ?

मुस्लिमविरोधात काही झालं की ती कशी मुस्लिमांचीच चूक आहे हे मस्त पटवून देतात लोक. >>
मग नाहीये का त्यांची थोडीतरी चूक ? नाझीवाद फोफावला तेव्हा त्या वणव्याला वारा देणारे शांतीप्रिय जर्मनचं होते ना ? का दुसर्यांनी तिकडे काड्या केल्या ?
बाबरी पाडणारे हिंदूच होते ना ? पाडणारे आणि त्याहून जास्त तमाशा बघणारे ? थेट शस्त्र उचललं नाही म्हणून ते निर्दोष ठरत नाहीत, ती विचारसरणी तिथल्यातिथे न दाबण्याची किंमत समाजाला आपल्याच निरपराध माणसांच्या रक्ताने चुकवावी लागते.

विलभसर.. कट्टर हिंदुत्ववाद्यांची पापं समस्त हिंदूंच्या माथी मारु नका हो. प्लीज. ते जे काही करत आहेत त्याला बहुतांश हिंदू लोक पाठींबा देत नाहीत. बहुतांश हिंदू हे प्रेम आणि सहजीवन ह्यात विश्वास ठेवतात.

<< कट्टर हिंदुत्ववाद्यांची पापं समस्त हिंदूंच्या माथी मारु नका हो. प्लीज. ते जे काही करत आहेत त्याला बहुतांश हिंदू लोक पाठींबा देत नाहीत. बहुतांश हिंदू हे प्रेम आणि सहजीवन ह्यात विश्वास ठेवतात. >>

------- हेला बरोबर आहे...

प्रत्येक धर्मात हे कट्टरवादी आहेत. पण असे असले तरी त्यांच्या (कट्टरवाद्यांच्या) हिंसक/ दहशवादी कृत्यांची झळ नेहेमीच निरपराधी सामान्य जनतेलाच बसते.

वरचे काही प्रतिसाद वाचून न्युझीलःडच्या पंतप्रधानांच्या या संदेशाचं महत्त्व आणखीनच पटलं.
त्यांच्यासारखे नेते विरळा आहेत.

मुस्लिम धर्म आणि इतर धर्म यांच्यात असे संघर्ष इस्लामच्या स्थापनेपासून आहेत. त्यात तुम्हा लोकांना विशेष काय वाटत?
शेवटी धर्माची तत्वे (सहिष्णुता की धर्मपरिवर्तनासाठी जबरदस्ति करण्याचा अधिकार) काय आहेत यावर सगळं अवलंबून असतं हेही तुम्हा लोकांना माहीत असावं.

शरियाचे पालन करणारे राज्य स्थापन करण्यास कुठल्याही प्रकारे मदत करणे आणि त्यासाठी कुठलेही मार्ग अवलंबणे हे प्रत्येक मुसलमान व्यक्तीचे कर्तव्य आहे. तसे कुराणात लिहिलेले असून कुराणातील बाबी कधीही बदलता येत नाहीत, कारण ती अल्लाहची वाणी आहे असंही कुराणातच लिहिलेले आहे.

हिंदू, ख्रिश्चन कट्टरवादी वा म्यानमारमधील बौद्ध असे का वागतात याचे कारण त्या धर्मांना बसत असलेल्या शरिया वा जिहादच्या झळा हे आहे.

त्याउपर कुणाला अजूनही इस्लाम दहशतवादाला खतपाणी घालत नाही असे वाटत असेल तर त्यांनी "जिहाद"च्या मार्गावर गेली कित्येक दशके चालणार्या पाकिस्तान नामक देशाच्या लष्कराचे व काश्मिरी युवकांचे प्रबोधन करावे, कारण त्यांनी भारताविरुद्ध जिहाद पुकारलाय, तेही जेव्हा प्रो-हिंदू म्हणविला जाणारा भाजप सत्तेवर नव्हता तेव्हापासून...

एखाद्या इस्लामेतर धर्म बहुसंख्य असलेल्या देशाकडून इस्लामिक बहुसंख्य असलेल्या देशावर अन्याय झाला की त्याच्या प्रतिकाराला जिहादचा मुलामा चढवला जातो.
एव्हढंच नाही तर मुस्लिम धर्मातील वेगवेगळे पंथही एकमेकांविरुद्ध जिहाद लढत असतात!

ही समस्या जागतिक आहे आणि केवळ इस्लामेतर धर्मांच्या लोकांना संयम व सहिष्णुतेचे पाठ पढवून सुटणारी नाही. त्याची सुरुवात मुस्लिम धर्मापासूनच व्हायला हवी आणि जोपर्यत कुराणात , शरियात बदल घडत नाहीत तोपर्यंत ते होणार नाही.

माझे मत ना पटणार्या तुमच्यापैकी कुणी तुमच्या आजूबाजूच्या किमान 5 शांततावादी मुस्लिमांना कुराणात/शरियात सुधारणा / बदल करण्याचा सल्ला देऊन जी प्रतिक्रिया मिळेल ती कृपया इथे सांगाल का?

ता. क. - कृपया यावर मनुस्मृतीची व्हॉटअबाउटगिरी करू नये, कारण मी मनुस्मृतीचा समर्थक नाही आणि आताच्या जमान्यात मनुस्मृतीला कोणीही विचारत नाही. तरीही करायचीच असेल मनुस्मृतीचा शेवटचा पाठ नीट वाचून त्याची शरियाबरोबर तुलना करून मगच करावी.

Pages