तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्गर पोख्रून ज्सा उन्दिर निघ्तो तसा झी च्या सगल्या सिरिय्ल्स पच्केदार अस्तात. दाराच्या आत कहिहि नस्नार न्क्की. उगिच प्रेक्श्न्काना झुल्वत थेवय्चं काम कर्तात.

दाराच्या आत कहिहि नस्नार न्क्की>> ऑस्क्सं??? दाराच्या आत मोठ्ठा फोटू असेल आन् त्याच्या पायाशी रोज जाऊन बसत असेल, मी वचन दिलं होतं तिला की मी आजन्म वेळ देईन तुला ई ई.

पोट कमी करण्यासाठी विक्या बंद खोलीच्या आत आस्था चँनेलवर रामदेवबाबांच्या मार्गदर्शनाखाली योगा करत असेल.म्हणून चपला बाहेर,मोबाइल बाहेर,कुणीही नॉक करायच नाही.

सुभा वेडसर असेल.. नंदिनी त्याला सांभाळून घेत असेल.. त्याच्याशी लपाछपी खेळताना नंदिनी त्या खोलीत लपली असेल आणि तीच मन मोडायच नाही म्हणून ती बेडखाली लपली हे माहीत असून तो नंदिनी आऊट म्हणत नसेल.. तेव्हापासून नंदिनी तिथेच असेल..

आनंदी............++++++++++++++++++++१११११११११११११+++++++++++++++लई म्हणजे लईच भारी.लपाछपी....tooooo gooood

सुभा त्या खोलीत साफ सफाई करायला जात असेल. कारण त्यात सुभा शिवाय दुसरं कोणीही जात नाही

पोट कमी करण्यासाठी विक्या बंद खोलीच्या आत आस्था चँनेलवर रामदेवबाबांच्या मार्गदर्शनाखाली योगा करत असेल.म्हणून चपला बाहेर,मोबाइल बाहेर,कुणीही नॉक करायच नाही. >>> Lol

काल सुचलेला एक पांचट जोक

काल ईबाळाला त्या दाराशी आल्यावर फ्लॅशबॅक मधे आधीचा डायलॉग आठवतो विक्या म्हणतो "इशा, या दारावर पुन्हा असं नॉक नाही करायचं"
मंद ईबाळ - मग कसं करायचं सर'

Lol

सुभा वेडसर असेल.. नंदिनी त्याला सांभाळून घेत असेल.. त्याच्याशी लपाछपी खेळताना नंदिनी त्या खोलीत लपली असेल आणि तीच मन मोडायच नाही म्हणून ती बेडखाली लपली हे माहीत असून तो नंदिनी आऊट म्हणत नसेल.. तेव्हापासून नंदिनी तिथेच असेल.. >> आनंदी Rofl

हस्तर असेल दाराच्या आत >>> हस्तरच असेल. त्याच्याकडून मोहरा घेऊन घेऊन विकूने ३०० करोड चा बिझनेस उभा केलाय. हा विक्या ज्या कर्जतला राहतोय ते कर्जत म्हणजेच पूर्वीचं तुंबाड. विक्याने जुना वाडा पाडून त्या जागी हे आलिशान घर बांधलंय. पण जमिनीखाली हस्तरची विहीर तशीच आहे. 'त्या' खोलीतून विहीरीकडे जायचा रस्ता आहे म्हणे Proud

मला वाटतं मायरा नंदिनीची बहिण असावी आणि म्हणूनच ती जिवंत पण बेडरीडन असलेल्या बहिणीच्यावतीने घराचा सगळा कारभार बघत असेल.

हस्तरच असेल. त्याच्याकडून मोहरा घेऊन घेऊन विकूने ३०० करोड चा बिझनेस उभा केलाय. हा विक्या ज्या कर्जतला राहतोय ते कर्जत म्हणजेच पूर्वीचं तुंबाड. विक्याने जुना वाडा पाडून त्या जागी हे आलिशान घर बांधलंय. पण जमिनीखाली हस्तरची विहीर तशीच आहे. 'त्या' खोलीतून विहीरीकडे जायचा रस्ता आहे म्हणे>>>>>>आरारा!!! Rofl

मंद ईबाळ - मग कसं करायचं सर'>>> Lol

काल पूर्ण एपिसोड अर्धा वेळ फक्त पोळीचे लाडू. अरे मराठी मध्यम वर्गीय घरात काय चमचमीत ब्रेफा पदार्थ बनतात. केड्याला माहीत नाही वाटते.
विक्याच्या घरी घर चालवायला लायक कोणी नाही म्हणून सर्व काम मायराला दिले असावे. आईसा ब वयस्कर. जयदीप १० करोड खाली काही नाही. घर म्हणोन फाइव स्टार हॉटेलचे हाउसकीपीन्ग डिपार्ट मेंट विकत घेउन कामाला लावेल. ब्रिलिअंट आय्डिया. सॉन्या रिच्च बेबी. सर्व फेकून देते. विक्याला वेळ नाही. उद्योग कोण बघेल. राजनंदिनी गायब. शेवटी पोहे व फ्रूट बोल आणि मी आता घरचे सर्व बघणार ह्यावर तोड झाली आहे.
प्लस माफक रोमान्स, पोहे एकमेकांन भरवणे वा वा वावा वा. महिला प्रेक्षक वर्गाची विकेट गेली असेल.

टायमिंग ची गल्लत वाट ली. ही सकाळी उठून मंजे आठ च्या सुमारास पोळीचे लाडू बनवून ताट फिरवत असेल. व मग खपले नाही तर घरी पाठवले. ( मुंबई वेदर मध्ये ते खराब होतील कि नै) तर आई बाबा उठून चहा पीत असतानाच ड्रायवर कर्वी ते पोहोचले पण घरी. हे त्याच दिवशी का नेक्स्ट डे पोहोचले का दुपारच्या चहाला पोहोचले? का ड्रायवर चॉपरने डबा घेउन मग गाडी चालवत गेला व त्याच दिवशी साडे नौ परेन्त पोहोचले? शंका निरसन करा.

मग मेजर डिस्कशन की डब्यात काय द्यावे. त्यासाठी झेंडेस फोन . तो मस्त पैकी ठेवुन देतो. राँग नंबर हे आव्डले. व्हेरी फनी.

मग खीर द्यायचे ठरले ही कधी पोहोचेल. दुधाचा आय्टम विक्याच्या पोटा त जाईपरेन्त खराब होईल का वगिअरे विचार नाही.
तरी अरूण म्हणतो की गाजर हलवा बनव. त्यासाठी पैसे कुठून आले असतील. का घर परत आले आणि पन्नास लाख कॅस ची बॅग पण आली?

मग लगेच कट टू कर्जत. ऑण सेम डें? पोहे बनवून सुरी ने फळे कापून बेड्रूम मध्ये रूम सर्विस विथ रोमान्स ऑन द साइड.
ब्रिलीअंट आयडिया आय मस्ट से माय फ्रेंड वहिनी.

कसला बोअर एपिसोड होता तो गालावर लिपस्टिक वाला. काहीच झाले नाही पूर्ण एपिसोडमधे. फालतू ड्रामा.

आणि कंपनीमधे दोघांना जोडीने सही करावे लागेल असे कोणते डॉक्युमेण्ट कशाकरता असू शकते याबद्दल दहा मिनीटे विचार करूनही काही सुचले नाही. टोटल फेक सीन.

कंपनीमधे दोघांना जोडीने सही करावे लागेल असे कोणते डॉक्युमेण्ट कशाकरता असू शकते याबद्दल दहा मिनीटे विचार करूनही काही सुचले नाही>> हो ना एका डा यरेक्टरची सही चालते. चेक व काँट्रॅक्ट वर. अनलेस जागा खरेदी वगिअरे असेल तर. पण तिला पाव्र कुठून आली.?

पोहे बनवून सुरी ने फळे कापून बेड्रूम मध्ये रूम सर्विस विथ रोमान्स ऑन द साइड. >>> अमा Happy हा एकदम लेटेस्ट एपिसोड दिसतोय. उद्या इथे येइल.

< कंपनीमधे दोघांना जोडीने सही करावे लागेल असे कोणते डॉक्युमेण्ट कशाकरता असू शकते>
लग्न झाल्यावर आता तरी बेबीला बँकेच्या बेसिक बाबी समजू याव्यात म्हणून दोघांचे जॉईंट अकाऊंट उघडले असेल सरांनी. कारण माहेरी कुठली बँक? (सर, कसं शक्य आहे??) पगाराचे पैसे (चिल्लर) पितळेच्या पोच आलेल्या डब्यात जात असतील थेट..

Pages