Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://m.timesofindia.com/tv
https://m.timesofindia.com/tv/news/marathi/tula-pahate-re-vikrants-first...
फारएंड चा फार आवडता आहे
फारएंड चा फार आवडता आहे जालिंदर.... तो ईशाचा हंगामी धोका आहे म्हणे!
ऑन - ऑफ असतो ...... त्या काम करणार्या नटाला किती फटीग येत असेल....... आपल्या भूमिकेला काहीच दिशा नाही असे वाटून..!!
चला म्हणजे आता बेबी पुनर्जन्म
चला म्हणजे आता बेबी पुनर्जन्म हे फिक्स.आता केड्याला अस होईल की मी किती बिनडोकपणा दाखवू आणि किती नाही.
म्हणजे एखादा मानसोपचारतज्ञ पण येणार का.
जनरली यात मानणारे आणि न मानणारे असे दोन भाग असतात.त्यामुळे न मानणारे याला आजार समजतील बहुतेक ,
केड्याला म्हण एक लक्षात ठेव तो पुनर्जन्म आहे,भुताटकी नाही,नाहीतर आहट चालू करशील.
फारएंड चा फार आवडता आहे
फारएंड चा फार आवडता आहे जालिंदर.... तो ईशाचा हंगामी धोका आहे म्हणे! >>>
तो सॉन्या इन किचन, बाबा मला सर म्हणू नका एपिसोड आख्खा पाहूनही नक्की काय दाखवले २२ मिनीटे असे वाटले. काहीच घडले नाही. सीन्स जम्प मारतात आजकाल. ईपालक अचानक गायब झाले सीनमधून.
तिकडे ऑफिसमधे नुसते फायलींवर सह्या करत बसतात लोक. आज झेंडे ने मायराकडून कसलीतरी सही घेतली. कशाबद्दल? काही पत्ता नाही. अरे किमान लोक ती फाइल कसली आहे त्याबद्दल तरी बोलतात. "ही ती सिक्युरिटी स्टाफला पगारवाढ देण्याबद्दल. सरांना माहीत आहे पण ते इथे नाहीत म्हणून तुम्ही अॅप्रूव्ह करा" असे अगदी ढोबळ कामचलाउ ऑफिसमधले वाक्य सुद्धा लिहायची तसदी घेत नाहीत हे लोक. परवाही सर आले, ईशा आली, फाइल आली. सह्या करून मोकळे. No questions asked
हे एपिसोड्स आपल्यासाठी नसून
हे एपिसोड्स आपल्या मनोरंजनासाठी नसून केड्या आणि त्याच्या फौजेची चूल पेटती रहावी ह्यासाठी असतात हे लक्षात ठेवले पाहीजे आपण. कोंड्याचा मांडा करावा तसं फारेंडसारखे भवभूती त्यातूनही मनोरंजन करून देतात.
घराची जबाबदारी घरातल्याच
घराची जबाबदारी घरातल्याच व्यक्तीकडे "अनधिकृतपणे" कशी देतात? सरांनी म्हणे ती जबाबदारी "अधिकृतपणे" दिली सॉन्याकडे.
आजचे एकूणच संवाद १९७० मधल्या माहेर मासिकातील एखाद्या चतुर सुनेने सासू व थोरली जाउ यांच्यात सामंजस्य कसे घडवून आणावे याचा सल्ला देताना त्यांच्यात नाटकी संवाद लिहीतात तसे वाटले.
किती वेळ ती गोळी हातात पकडून बसल्या होत्या आईसाहेब माहीत नाही. त्यात नुसत्या पांढर्या कॅप्सूलवरून ही जयदीपची गोळी सुद्धा ओळखले त्यांनी.
"आईसाहेब, मैने आपका नमक खाया है आईसाहेब!"
"अब, गोली खा"
निमकरांच्या घरातला कुकरचे हॅण्डल दुरूस्त करतानाचा सीन ओके होता. पैशाची तयारी करतो काहीतरी म्हंटल्यावर आता हा काय विकणार असे आपल्या डोक्यात येताच ईशाच्या आईने त्यावरून त्याला बोलणे - वगैरे सहज येणारे संवाद होते. एरव्ही हे लॉ़जिक कोठे जाते?
एक ताजा खबर :
@फारएण्ड
काकडी डोळ्यावर ठेवण्यासाठी असते हेच माहिती असलेल्या व्यक्तीला ती चोचवायला लावणे हे खास नाही?
तो सॉन्या इन किचन, बाबा मला सर म्हणू नका एपिसोड आख्खा पाहूनही नक्की काय दाखवले
परवाही सर आले, ईशा आली, फाइल आली. सह्या करून मोकळे. No questions asked >>>>
हिरा हिराच असतो, आपण जवाहिरे नाही ना तिथे गोची होते
दूरदृष्टी हो. मग नंतर प्रॉपर्टी नावावर करणे, घटस्फोट संमतीपत्रावर सही घेणे सोपे नाही का होणार (लेखकासाठी)
********
एक ताजा खबर :
कुठलीही जाहिरात किवा प्रोमो न दाखवता या रविवारी सरप्राईज एपिसोड ( म्हणजे आश्चर्य धक्का भाग, सरंजामेना बक्षीस देण्याचा नव्हे ) आहे. राजनंदिनी येण्याचा. भारतीय वेळेनुसार दुपारी १२ ला आहे. प्रेक्षकांच्या सोयीसाठी दु ३, सं ६, रा ९, मध्यरात्री १२ ला पुनःप्रक्षेपण आहे.
पुनःप्रक्षेपणात वेगळेपणा असावा यासाठी राजनंदिनीची सावली वेगवेगळ्या रंगात दिसेल.
शीर्षकगीत स्पॅनिश अणि रशियन मध्येही असेल.
तसेच मालिकेतील स्त्री पात्रे चपलांची अदलाबदल करतील.
पहायला विसरू नका. तुला पाहते रे, खास भाग.
या भागात शेवटी -- मालिकेचा पहिला सीझन संपल्याचे जाहीर होईल.
सकाळी ९ ते रात्री ९ मालिकेचे निर्माते, वित्तपुरवठादार, कलाकार, तंत्रज्ञ आणि लेखक छोट्या गृप्समध्ये -- बोरीवली, ठाणे आणि दादर येथे मार खाण्यासाठी उपलब्ध असतील. इच्छुकांनी लाभ घ्यावा. ज्यांनी १०० पेक्षा जास्त भाग पाहिलेत त्यांना काठीने मारण्याची परवानगी असेल.
या जागा आणि गृपमधील व्यक्ती याची माहिती फेसबूक पेजवर मिळेल.
निर्माते, वित्तपुरवठादार, कलाकार, तंत्रज्ञ आणि लेखक पूर्ववत / बरे झाले की सीझन २ ची जुळवाजुळव करतील.
शेवटच्या वाक्याची रसिकांनी विशेष नोंद घ्यावी. न रहेगा बास न बजेगी बासुरी हे सर्वशृत आहेच.
लोभ असावा.
कारवी किती तो संताप??
कारवी किती तो संताप??

Submitted by किल्ली on 1
Submitted by किल्ली on 1 February, 2019 - 12:51 >>> फक्त ५-६ भाग बघितलेत. ३ पूर्ण, उरलेले पुढे ढकलून ढकलून २० ची ५ मि करून.
रविवार ३ फेब १९ चा, तुला
रविवार ३ फेब १९ चा, तुला पाहते रे : खास भाग -- राजनंदिनी अवतरण .
मायबोलीकरांसाठी खास ओव्हन फ्रेश.
:१:
( पु, ई फोनवर)
पु : ईशा, बाळा आवडली का खीर जावईबापूंना?
ई : आई, अगं तुझी खीर अजून खाल्ली नाही, फ्रीझमध्येच आहे. मायरा मॅम कॅलरी कॅल्क्युलेट करून सांगणारेत, सरांनी किती थेंब खायची ते. वाट बघतेय.
पु : असं कसं, खराब नाही का व्हायची... आम्ही येतोय, गरम करून ठेव. निमकर, चला, निघूयात ना?
नि : पुष्पा, अगं कामातून वेळ मिळाला की खातील ते. आपण जाणं बरं दिसतं का?
पु : बोल्ले!! चला..
:२:
(ईशा दारातच खिरीचा वाडगा घेऊन उभी, सोबत सगळे उभे कामधाम सोडून, मग चहापाणी )
पु : ते ना आम्ही जावई बापूंना खीर भरवायला आलोत. जाऊ ना?
आ : अगंबाई, हो का? ईषा, आईबाबांना तुझ्या खोलीत घेऊन जा
पु : हो, हो, चल गं. चला हो.
:३:
( वि ताण कमी करण्यासाठी शवासनात गालिचावर. पु खाली बसते, ई कडे बघून )
पु : अगंबाई योगासनं पण करतात का?
( ई ऐकू न आल्यासारखी कानावरचे केस नीट करते + वेंधळ्यासारखी इथे तिथे बघते )
पु : आण...
ई : काय आई? काय आणू?
पु : अगं खीर आण इकडे
ई : हो, हो
(खिरीचा वाडगा देते, खिरीचा क्लोजप विथ सुकामेवा)
:४:
पु : अगं चमचा कुठेय ईशा?
( चमचा येतो .. चमचा + खिरीचा क्लोजप ; तोपर्यंत खिरीचा वाडगा, खिरीची लेवल, खिरीचा प्रकार बदलेला दिसतो आणि सुकामेवा गायब होतो)
पु : जावईबापू
वि : (उत्तर नाही)
पु : अहो जावईबापू
वि : (उत्तर नाही)
पु : अहो जावईबापू, खीर खाताय ना?
( शवासन करता करता डुलकी लागलेल्या वि ला पु खसकन ओढून पायावर घेते, बाळासारखे;)
:५:
( दचकून उठलेला वि सासूला पाहून चेहरा हसरा करण्याचा प्रयत्न करतो. आता गालिचा गायब आणि वि चे कपडे वेगळे असतात )
पु : निमकर, बघा हो, गुलाम हसतोय. कळलं... आता खीर येणार ते..
( वि उठायच्या प्रयत्नात, पु बाजूला पडलेला नॅपकीन विच्या गळ्याकडे लावता लावता )
पु : निमकर तुम्ही पाय धरा. ईशा तू हात पकड हं नीट. वाडगा पाडतील नाहीतर
( इथून पुढे, पार्श्वसंगीत म्हणून बुलबुल तरंग आणि घोड्याच्या टापांचा आवाज आलटून पालटून येतो)
:६:
( वि केविलवाणे बघत, बाबा म्हणून हाक मारायला तोंड उघडतो. १ चमचा खीर आत जाते. )
वि : गड गड गड ( गिळतो आणि ईशाकडे मदतीसाठी बघतो )
ई : आयडू, काय गं हे, बघ ना सर कसे बघतायत माझ्याकडे. नको ना गं भरवू.
पु : तू गप्प बस ईशा. तुला काय कळतय? या पुरूषांना लग्नाच्या पहिल्याच महिन्यात वठणीवर नाही आणले ना तर आयुष्यभर मिर्या वाटतात डोक्यावर.
ई : हो आई ?? !! बाबा हो का हो?
नि : ( हताश, हतबुद्ध, सहानुभूतीच्या नजरेने जावयाकडे बघतात)
:७:
( वि तोंड मिटून घेतो, पु गाल दाबून ओठांत फट करते. १ चमचा खीर भरवते. थोडी आत जाते थोडी ओघळते )
पु : अहो निमकर लक्ष कुठेय तुमचं? एक पाय सोडवून घेतला त्यांनी. घट्ट धरा बघू.
( आता वि च्या डोळ्यात पाणी, उताणा झोपूनही ते गालावरूनच ओघळते, गळ्यातील नॅपकीनचे डिझाईन बदललेले दिसते)
वि : मायरा, वाचव (फक्त तोंड उघडते, आवाज नाही, खीर चमचा नं ३ आत)
वि : फुर्र... गड गड गड
ई : सSSSर..... आईSS थांब ना गं
वि : झेंडे.. (फक्त तोंड उघडते, आवाज नाही, खीर चमचा नं ४ आत)
ई : सSSSSर्र..... आईSS पुरे ना
:८:
(वि नजर चुकवून खीर बाहेर टाकतो. पु पुसून घेते.)
पु : जावईबापू, खिरीच्या चुळा टाकायच्या नाहीत. गाठ माझ्याशी आहे. भेंडे नाहीयेत इथे तुम्हाला उचलून न्यायला. कळतय का?
वि : आईसाहेब... (फक्त तोंड उघडते, आवाज नाही, खीर चमचा नं ५ आत)
वि : फुर्र... गड गड
ई : स SSSSSSSS र आयडू SSSS ( स्वतःच रडते )
पु : झालं शोन्या, आता एकच चमचा
वि : राजनंदिनी... (फक्त तोंड उघडते, आवाज नाही, खीर चमचा नं ६ आत)
वि : गड गड गड
:९:
( पु ओल्या टिश्यूने वि चे तोंड पुसत, त्याला चमच्याने पाणी देत, ई कडे बघून )
पु : बघितलस, कशी मटामटा खाल्ली. आणि तू म्हणत होतीस मायरा मॅम नको म्हणाल्या मग सर खाणार नाहीत. असे कसे खाणार नाहीत ? मी असताना !!
( पार्श्वसंगीत म्हणून रातकिड्यांची किरकिर + हृदयाचे ठोके )
( बाहेर लख्ख ऊन असताना विजा चमकतात आणि दिसतातही, घरातले अर्धे दिवे डीम आणि उरलेले प्रखर पेटतात, हलके पडदे स्थिर आणि जड पडदे हेलकावू लागतात. प्रत्येक पडदा वेगळ्या दिशेत उडतो. सरंजामे-इ-खास खोलीतून धुपाचे लोट येतात आणि राजनंदिनीची सावली प्रकट होते.)
ई : अय्या, आयडू, पाऊस येतोय... मी भिजायला जाते.... मज्जा मज्जा
( इतक्यात राजनंदिनीची सावली ईशात विलीन होते आणि ईशाच्या चेहर्याच्या जागी शि.तु. दिसू लागते.)
(पार्श्वसंगीत सतार द्रुत लयीत)
(ईशाच्या अभिनय अत्याचारातून सुटका होण्याच्या कल्पनेने रोमांचित प्रेक्षक गोडधोड आणण्यासाठी दाराकडे धावतात.
मुंबई आणि उपनगरातील दुकानांतून आईस्क्रीम, मिठाई, चॉकलेट, खजूर, गूळ, साखर याचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाल्याची बातमी न्यूज चॅनेल्सवर झळकू लागते. सॉन्या आणि आईसाहेब हॉलमध्ये टीव्ही बघताना)
:१०:
आ : ( आनंदाने हसत) अगंबाई सॉन्या, रॉनी सूनबाई आल्या वाटतं !!
सॉ : या, सीम्स सो, मॉम-इन-लॉ. अँड येस, थँक्स फॉर कॉलिंग माय नेम करेक्ट.
तुला पाहते रे -- सीझन १ समाप्त
( सरंजामे उदी शाल पांघरून, झुलणार्या आरामखुर्चीत डोळे मिटून बसले आहेत. मावळतीची किरणे भिंतीतून आरपार येऊन त्यांच्यावर पडताना दिसतात.
त्यांना अर्धा स्क्रीन देऊन उरलेल्या जागेत मालिकेचे कडबोळे करण्यात खारीचा ....ते... सिंहाचा वाटा उचलणार्यांची श्रेयनामावली सरकू लागते)
पुरूष पार्श्वगायक गाऊ लागतो.
खीर केली कुणी
जाच झाला कुणा
ईशा चाहिली मी
हाच माझा गुन्हा
तों-चि-को, अं-चि-भा
घो-चि-भ, पो-चा-ला ( श्रेय अमा + पूर्वसूरी ज्यांनी हे प्रथम वापरले @मायबोली )
अताSS चाखतो मी
अता चाखतोSS
पाहिलेSS मी झी लाSS
पाहिली मी कथाSS
पाहता पाहता
रोल स्वीकारला
चक्रव्यूह मालिकेचे भेदू आता मी कसा
माय बाप अर्जी तुम्हा, डोळे माSSझे पुसाSSSS
मलाSSSS वाचवा रे, मला वाचवाSSSS
अस्सा होणारे रविवारचा खास भाग. माहितीये का?
कुठेही याची माहिती प्रसृत झालेली नाही. आपणच पहिले. सो एन्जॉय.
वि.सू :
१. या लेखनाचे प्रताधिकार लेखक, मायबोली आणि संदर्भ देणारे + भर घालणारे मायबोलीकर यांचे संयुक्त प्रताधिकार असतील.
२. या प्रताधिकाराचा भंग करणारी कुठलीही कृती / कलाकृती कायदेशीर कारवाईला पात्र असेल.
३. फोन / एसएमएस द्वारे प्रताधिकार खरेदी करता येणार नाहीत याची इच्छुकांनी नोंद घ्यावी, ही विनंती.
क... ह... र....
क... ह... र....
कारवी, पाहुण्यासाठी
कारवी, पाहुण्यासाठी दोनेक्वेळा मालिका लावलीत आणि बघितलीत तर एवढं? मग रोज बघुन काय होईल

कारवी,
कारवी,
अगं कारवी बास कर गं बाई ,
अगं कारवी बास कर गं बाई , तोंड दुखले हसून.
कारवी..............अफाट,हसून
कारवी..............अफाट,हसून पार वाट लागली.
धन्यवाद सगळ्यांना.
सस्मित, ५-६ वेळा बघितली.
काकांकडे गणपतीत पहिल्यांदा. वहिनी म्हणे, ही संपली की मग करू आरती.
मग फारेण्ड यांची नॉर्मंडी--मित्रराष्ट्र सैन्य पार्श्वसंगीत ऐकण्यासाठी. मग १-२ वेळा अशीच आणि आता २-३ दिवस.
पण सापडलेच कुणी त्यातले हातात तर खैर नाही हे नक्की. किती बकवास करावा काही मर्यादा?
कारवी, अशक्य आहे. कहर. आता
कारवी, अशक्य आहे. कहर. आता असं करा, रोजचा एपि लिहीत जा इथं. तोच जास्त चांगला असतोय.
कारवी मी मेले हसून...
कारवी मी मेले हसून...
कारवी
कारवी

कारवी, अशक्य आहे. कहर. आता
कारवी, अशक्य आहे. कहर. आता असं करा, रोजचा एपि लिहीत जा इथं. तोच जास्त चांगला असतोय. >>>> + ११११
धन्यवाद सर्वांना आणि मनमुराद
बरं आता किल्लीबेनच्या धाग्यावर जायची वेळ आली. इथे २००० झाले. तेव्हा पुढचे प्रतिसाद तिकडे देऊ या.
कारवी,किती ते हिंस्त्र व्हावे
कारवी,किती ते हिंस्त्र व्हावे?
कारवी, खुर्चीवरुन पडता पडता
कारवी, खुर्चीवरुन पडता पडता वाचले!

शिरीयलची लक्तरेच काढली तुम्ही
कारवी, केवळ महान!!
कारवी, केवळ महान!!
कारवी डोळ्यासमोर पदर खोचून,
कारवी
डोळ्यासमोर, पदर खोचून, हातातल्या बांगड्या जरा घट्ट वर सारुन, दात ओठ खात " तुला पाहते रे...." म्हणणारी कारवी उभी राहीली 
Farend आणि आता कारवी हे झी ने
Farend आणि आता कारवी हे झी ने इथे पाठवलेले त्यांचे प्रतिनिधी आहेत याबद्दल शंका नाही
TRP नक्की कसा काढतात?
कारवी धन्य आहेस तू ..
कारवी धन्य आहेस तू ..

चांगलाच खून केलास शिरेलीचा
वरच्या कमेंट्स वाचून हसून हसून मेले मी
पण खरंच अतिशय क ह र चालू आहे सध्या मालिकेत ..
जिथे आईबाबा आले तरी त्यांना ओळखपत्र दाखवा म्हणून अडवतात आणि भाजीवाल्याला चक्क डायरेक्ट किचन मध्ये एंट्री .. (तिकडे मायराने पिन मारल्यावर लगेच आले वॉचमन हाकलायला) .. तिथे कारवी ने लिहिलेलं नक्कीच होऊ शकतं
बाकी कुठेही कधीही डोकं न चालवता येणारी (जिला काय भाव चालू आहेत भाज्यांचे हे सुद्धा माहित नाहीत .. त्यासाठी आई ला फोन ?? )अचानक अर्धा किलो तोंडली कमी वाटत आहेत हे ओळखू लागली क्षणात !!!
फोनवर घासाघीसचा भाग GOOGLE
फोनवर घासाघीसचा भाग GOOGLE DUO च्या अॅडवरुन ढापलाय. त्यांच्या एका अॅडमध्ये मुलगा भाजी घ्यायला जातो नि आईला GOOGLE DUO वरुन काॅल करतो. मग ती भाजीवाल्याला दम देते वगैरे आहे.
बाकी कारवी एकदम सुटलीय सुस्साट.
कारवी
कारवी

आई दिवाळ सण पहिले बाळंत पण मोड मध्ये आहे. किती महत्वा कांक्षी बाई!!....
कारवी अजून फक्त पहिले एक दोन
कारवी
अजून फक्त पहिले एक दोन भागच त्यातले वाचले आहेत. महान लिहीले आहे. जबरी हसतोय. सरांनी किती थेंब खायचे ते मायरा कॅल्क्युलेट करणार (इथे ऑफिस मधे कॅल्क्युलेटर समोर डोक्याला हात लावून बसलेली मायरा आली डोळ्यासमोर), सरांना खसकन ओढून पायाशी घेणे, प्रसंग २ च्या ओपनिंग सीन चे वर्णन (दारात वाडगा घेउनच उभी असणे, बाकी सगळे समोर कामधाम सोडून ई) - हे कहर आहे. आणि ती कंटिन्यूटी हुकल्याची धमाल वर्णने!
या सर्व संवादांत मधूनमधून पेरीफेरी वर सॉन्या चे तुसडे एक्स्प्रेशन्सही डोळ्यासमोर आले. पण ती सध्या सौजन्य सप्ताहांत आहे.
पुन्हा पुन्हा वाचावे लागेल हे. कारवी यांनी इथल्या दुसर्या तिसर्या इनिंग मधेच डबल सेंचुरी मारली आहे!
Pages