बालुशाही _ सविस्तर

Submitted by किल्ली on 15 November, 2018 - 13:22
balushahi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. मैदा: १/४ किलो
२. साजुक तुप: १०० ग्रॅम किंवा १ वाटी
३. खाण्याचा सोडा: चिमुटभर
४. दही किंवा ताकः २०० मिली किंवा एक पेला
५. तेलः तळणीसाठी
६. साखरः ३५० ग्रॅम अन्दाजे
७. पिण्यायोग्य पाणी

क्रमवार पाककृती: 

पाकः
१. साखर भिजेल इतपत पिण्यायोग्य पाणी टाकुन घट्ट पाक करुन घ्यावा
२. पाकात वेलची पूड टाकु शकता, आवडत असेल तर

बालुशाही:
१. तुप थोडे कोमट करुन घ्यावे/पातळ असावे.
२. मैद्यामध्ये तुप व सोडा घालुन एकजीव करावे.
३. पोळीसाठी कणिक मळतो तसे , वरील मिश्रणात ताक/दही घालत घालत मळून घ्यावे
हि तिंबलेली कणिक मऊसूत आणि सैलसर असावी. बोटाने स्पर्श करुन पाहिला तर कणकेच्या आत बोट गेलं पाहिजे
(थोडंफार पुरणपोळी साठी भिजवतो तशी कन्सिस्टन्सी )
४. वरील मैद्याच्या मिश्रणाचे लिंबाएवढे एक एक गोळे तळहातावर घेऊन चपटे करावे, मधोमध छिद्र पाडावे. थोडक्यात, त्या पामर मैद्याच्या गोळ्यांना बालुशाहीचा आकार द्यावा
५. जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवावे, तेल अगदी गरम करावयाचे नाही. फक्त कोमट होऊ द्यायचे आहे
६. तेल कोमट झाले की आच बंद करावी.
७. ह्या कोमट तेलात एक एक करुन वर तयार केलेली बालुशाही सोडावी
असे केल्यानंतर कडेकडेने पिटुकले बुडबुडे येऊ लागतील, एक एक बालुशाही तेलातल्या तेलात हळूच ऊडी मारुन वर तरंगु लागेल
८. असे झाल्यानंतर आच सुरु करावी.
९. बालुशाही थोड्या लालसर झाल्या की उलट करुन/ परतून/ दोन्ही बाजुंनी तळून घ्याव्यात
१०. लालसर दोन्ही बाजुंनी तळून झालं की आच बंद करावी
११. तळलेल्या बालुशाही एका स्टीलच्या चाळणीत किंवा ताटात झार्‍याने काढुन घ्याव्यात

१२. पाकात ह्या तळलेल्या बालुशाही बुडवुन थोडा वेळ (पाक मुरेपर्यन्त ठेवाव्यात)
पाकातुन काढुन डिशमध्ये आणि डिशमधुन उचलून थेट खाऊन टाकाव्यात.

प्रकाशचित्रे:
मैद्याचा तिंबलेला गोळा:
b1.jpg

कोमट तेलात बालुशाही:
b2.jpg

तळत असताना:
b3.jpg

तयार बालुशाही:
b4_0.jpg

झाल्या सगळ्या करूनः, या खायला
b5.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१. तळणीच्या तेलाचे तापमान योग्य साधले पाहिजे.
एकदा वरील कृतीप्रमाणे करुन पाहिलं की अंदाज येईल.
तेल जास्त गरम झाले तर बालुशाही खुसखुशीत होत नाहीत.

२. बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही

३. माझी मैत्रीण ह्यात वरून चोकोलेट सॉस घालून fusion बनवते, तसंही try करून पाहू शकता

४. आधीचे बालुशाही चे धागे
बालुशाही: https://www.maayboli.com/node/42163 : प्राजक्त्ता , 30 March, 2013
बालुशाही (फोटोसह): https://www.maayboli.com/node/39694 : madevi , 17 December, 2012

माहितीचा स्रोत: 
सासुबाई, सौ. दीपा कुलकर्णी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या रोजच्या वाटेवरच्या स्वीट शॉपचं टेकओव्हर झालं. आज तिथे गेलो तर आधीच्या फोटोतला पदार्थ आणि या आताच्या फोटोतला पदार्थ शेजारी शेजारी बसलेले.
balushahi1.jpg
याला खाजा म्हणतात. नुसताच खाजा. बंगाली खाजा नव्हे.

आणि ही बालुशाही (आधीचाच फोटो पुन्हा.)balushahi.jpg

दोहोंमध्ये फरक हाच की एकावर साखरेचा जाड , कडक थर आहे. दुसर्‍यावर नाही.

तेव्हा किल्ली, तुमच्यामुळे मला खर्‍याखुर्‍या बालुशाहीची पक्की ओळख झाली.
आता धागा किमान त्रिशतकी तरी व्हायलाच हवा.

resize bl.jpg
लेटेस्ट बालुशाही (मी बनवली नाही, साबांनी बनवली आहे, तिळ्गुळाच्या लाडवाबरोबर स्वीट पण घे म्हणून हेच मिळालं )

एक्झॉस्ट ब्लोअर वर कशाला ठेवलीय?>>> मानव, _/\_ Lol
कितीदा ग बालुशाह्या करता अगदी खीर वैगेरे सारखा सोपा पदार्थ असल्यासारखा. तुझ्या साबानाही _/\_

सस्मित ताई, अगं साबांना हा पदार्थ सोपाच वाटतो, त्यांची ही signature dish का काय म्हणतात ती आहे
सराव खुप झाला आहे त्यांना.. शिवाय हौस आहेच!

हसू अक्षरशः फुटल्यामुळे , फोटोतल्या बालुशाहीचं कौतुक करायचं राहिलं.
मी आता इतक्यात एका वाढदिवसाचं सेलिब्रेशन बालुशाही आणून केलं.
तुमच्या धाग्यामुळे दोनदा बालुशाही आणि एकदा खाजा आणला.
आता बास.
हे कधीतरी करून पाहायचं आहेच.

#अत्यंतफालतूकोटीडिस्क्लेमर
हा धागा सारखा वाचून बालुशाही सारखी बनवून आणि खाऊन सर्वांचे आकारमान भालूप्रमाणे होऊन मायबोलीवर एक वेगळीच भालूशाही चालू होईल
#अत्यंतफालतूकोटीएन्ड

शिवाय हौस आहेच। >>>>> हो पण या धाग्यावर आलं की मला कॅलरी मीटर हजारोंमध्ये फटफट वाढताना दिसतं ना. कदाचित बालुशाही आवडत नाही, म्हणून excuse असेल.

खुप खुप धन्यवाद भरत, तुम्हाला रेसीपी करून बघण्यासाठी उत्साह लवकरच येवो Happy
कॅलरी मीटर हजारोंमध्ये फटफट वाढताना दिसतं >>> हे तर खरं आहेच

हा धागा सारखा वाचून बालुशाही सारखी बनवून आणि खाऊन सर्वांचे आकारमान भालूप्रमाणे होऊन मायबोलीवर एक वेगळीच भालूशाही चालू होईल>>>> तुम्हाला भालुला याची देही याची डोळा पाहयच आहे का? मीट मी Proud

कुणीच बनवून पहिली नाही का बलुशाही?>>>> नाही ग किल्ली! लाळ आवरत बरेचदा धागा वाचला.विकत आणू आणू म्हणून वेळ काढला.अजून वजन वाढेल म्हणून रद्द केले.आता परत ह्या धाग्यामुळे मन चाळवले.

किल्ली तुझ्याकडूनच मिळतात ना तुपारे धाग्यावर. म्हणून नसेल केली.>>>> मस्तच.

IMG-20211011-WA0050.jpg
आजची बाशा
ह्यावेळेस फार छान जमली
(मी नाय, सब साबा )

मस्त.

Pages