बालुशाही _ सविस्तर

Submitted by किल्ली on 15 November, 2018 - 13:22
balushahi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. मैदा: १/४ किलो
२. साजुक तुप: १०० ग्रॅम किंवा १ वाटी
३. खाण्याचा सोडा: चिमुटभर
४. दही किंवा ताकः २०० मिली किंवा एक पेला
५. तेलः तळणीसाठी
६. साखरः ३५० ग्रॅम अन्दाजे
७. पिण्यायोग्य पाणी

क्रमवार पाककृती: 

पाकः
१. साखर भिजेल इतपत पिण्यायोग्य पाणी टाकुन घट्ट पाक करुन घ्यावा
२. पाकात वेलची पूड टाकु शकता, आवडत असेल तर

बालुशाही:
१. तुप थोडे कोमट करुन घ्यावे/पातळ असावे.
२. मैद्यामध्ये तुप व सोडा घालुन एकजीव करावे.
३. पोळीसाठी कणिक मळतो तसे , वरील मिश्रणात ताक/दही घालत घालत मळून घ्यावे
हि तिंबलेली कणिक मऊसूत आणि सैलसर असावी. बोटाने स्पर्श करुन पाहिला तर कणकेच्या आत बोट गेलं पाहिजे
(थोडंफार पुरणपोळी साठी भिजवतो तशी कन्सिस्टन्सी )
४. वरील मैद्याच्या मिश्रणाचे लिंबाएवढे एक एक गोळे तळहातावर घेऊन चपटे करावे, मधोमध छिद्र पाडावे. थोडक्यात, त्या पामर मैद्याच्या गोळ्यांना बालुशाहीचा आकार द्यावा
५. जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवावे, तेल अगदी गरम करावयाचे नाही. फक्त कोमट होऊ द्यायचे आहे
६. तेल कोमट झाले की आच बंद करावी.
७. ह्या कोमट तेलात एक एक करुन वर तयार केलेली बालुशाही सोडावी
असे केल्यानंतर कडेकडेने पिटुकले बुडबुडे येऊ लागतील, एक एक बालुशाही तेलातल्या तेलात हळूच ऊडी मारुन वर तरंगु लागेल
८. असे झाल्यानंतर आच सुरु करावी.
९. बालुशाही थोड्या लालसर झाल्या की उलट करुन/ परतून/ दोन्ही बाजुंनी तळून घ्याव्यात
१०. लालसर दोन्ही बाजुंनी तळून झालं की आच बंद करावी
११. तळलेल्या बालुशाही एका स्टीलच्या चाळणीत किंवा ताटात झार्‍याने काढुन घ्याव्यात

१२. पाकात ह्या तळलेल्या बालुशाही बुडवुन थोडा वेळ (पाक मुरेपर्यन्त ठेवाव्यात)
पाकातुन काढुन डिशमध्ये आणि डिशमधुन उचलून थेट खाऊन टाकाव्यात.

प्रकाशचित्रे:
मैद्याचा तिंबलेला गोळा:
b1.jpg

कोमट तेलात बालुशाही:
b2.jpg

तळत असताना:
b3.jpg

तयार बालुशाही:
b4_0.jpg

झाल्या सगळ्या करूनः, या खायला
b5.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१. तळणीच्या तेलाचे तापमान योग्य साधले पाहिजे.
एकदा वरील कृतीप्रमाणे करुन पाहिलं की अंदाज येईल.
तेल जास्त गरम झाले तर बालुशाही खुसखुशीत होत नाहीत.

२. बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही

३. माझी मैत्रीण ह्यात वरून चोकोलेट सॉस घालून fusion बनवते, तसंही try करून पाहू शकता

४. आधीचे बालुशाही चे धागे
बालुशाही: https://www.maayboli.com/node/42163 : प्राजक्त्ता , 30 March, 2013
बालुशाही (फोटोसह): https://www.maayboli.com/node/39694 : madevi , 17 December, 2012

माहितीचा स्रोत: 
सासुबाई, सौ. दीपा कुलकर्णी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

शालू घातला होता बनवताना.>> हे महा कठीण आहे, आधीच बाशा बनवणॅ किचकट त्यात शालु नेसण्याचे साहस केले म्हणजे धन्य होती ती व्यक्ती Happy

आवडती मिठाई.

बालूशाहीला राजस्थानात 'मक्खन बडा' म्हणतात. फक्त शुद्ध तुपात करतात- नो तेल.

बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात Happy Happy

दंगेखोर नातवंडा ना खायला घालायला म्हणून बुक मार्क करून ठेवलेली आहे >>>> दंगेखोर असली म्हणून काय झालं? नातवंडांना बुकमार्क खायला घालणार? ते ही आतापासून करून ठेवलेले? Sad

(बनवता येईल, फक्त खाणार कोण हा प्रश्न उरेल ☺️☺️)>>>
रुग्णालयात कंत्राट मिळवायचे आहारतज्ञांना पटवून, रोग्यांसाठी कॅल्शियमयुक्त नाचणीची पौष्टिक बालुशाही.
वाटल्यास साखरेच्या पाकाऐवजी मधात बुडवून बनवायची, लोकांना मध खूप पौष्टिक वाटतो.
इन-पेशंट्सच्या थाळीत अनु रुग्णोद्योग कंपनीची पौष्टिक नाबालुशाही.

रुग्णालयात कंत्राट मिळवायचे आहारतज्ञांना पटवून, रोग्यांसाठी कॅल्शियमयुक्त नाचणीची पौष्टिक बालुशाही.
वाटल्यास साखरेच्या पाकाऐवजी मधात बुडवून बनवायची, लोकांना मध खूप पौष्टिक वाटतो.
इन-पेशंट्सच्या थाळीत अनु रुग्णोद्योग कंपनीची पौष्टिक नाबालुशाही.>>>> Rofl
धन्य धन्य ते मानव Light 1 Proud

धन्यवाद अनिंद्य, अनामिका, अश्विनी के Happy

@VB: धन्यवाद Happy

आये क्यो नही हवेली पर, म्हणजे घरी?
आधी कळवलं असतं तर भेटलो असतो की Happy
(पण आता बालुशाही संपली आहे, पुन्हा बनवावी लागेल Proud Light 1 )

बालुशाही काय ऐकत नाय.200 पार करेल.
पण मला खात्री आहे की धागाकर्ते सोडून कोणीही घरी बनवणार नाही.सगळे इकडून तिकडून पार्सल आणतील ☺️☺️☺️

बालुशाही काय ऐकत नाय.200 पार करेल.
पण मला खात्री आहे की धागाकर्ते सोडून कोणीही घरी बनवणार नाही.सगळे इकडून तिकडून पार्सल आणतील >>>> बालुशाही बन्वण्याचा व्यवसाय सुरु करावा का? Lol
अनायासे जाहिरात झालेलीच आहे.. वीकेन्डला बनवुन वीक्डेला हिन्जवडी, वाकड , पिं. सौ. मध्ये विकता येइल Proud

अनु ह्याना कम्पनीत पार्सल आणुन देण्यात येइल.. हिन्जवडी मेट डिस्काऊन्ट

आये क्यो नही हवेली पर, >>>
'हवेली' हे पुणे शहराच्या तालुक्याचे नांव आहे! त्या पुण्याला म्हणजे हवेलीला आल्या होत्या! Happy

साखरेच्या पाकाऐवजी मधात बुडवून बनवायची,>>>

मग बालुशाही ऐवजी 'मधमाशीही' असे नांव द्यावे लागेल! Wink

हवेली' हे पुणे शहराच्या तालुक्याचे नांव आहे! त्या पुण्याला म्हणजे हवेलीला आल्या होत्या>> अरेच्चा, हो की Proud

'मधमाशीही>> Rofl

किल्ले, मला बालुशाही प्रचंड आवडते. मेथीचा सोडुन कोणताही लाडु आणी बालुशाही मला जाम आवडते. हो, मी बालुशाही घरी बनवली होती, पण नवरा गोड खात नसल्याने मलाच संपवावी लागली ( याचा भयानक आनंद मला त्यावेळी झाला होता. Proud ) त्या वेळी आम्ही दोघेही भारताबाहेर असल्याने सासर- माहेर असे कोणी वाटेकरी नव्हते.

बालुशाही इझीली बनवता येते, असे माझे ठाम मत आहे, आणी रेसेपी देऊन तू ते सिद्ध केलेस, त्याबद्दल तुला लय लय ठेंकु !!

याचा भयानक आनंद मला त्यावेळी झाला होता>>> समजु शकते, कारण असा आनंद माझ्या नवर्‍याने बासुन्दी आवडत नाही म्हटल्यावर झाला होता Happy Happy
बालुशाही इझीली बनवता येते, असे माझे ठाम मत आहे>>> माझे पण
त्याबद्दल तुला लय लय ठेंकु >>> कसचं कसचं :लाजणारी भावली:

Submitted by mi_anu on 22 November, 2018 - 16:00 >>> अख्ख्या पोस्ट ला मम

हो, मी बालुशाही घरी बनवली होती >>> रश्मी , किल्ली खरेच तेलात बोट बुडवुन बघता का तुम्ही की ते किती गरम झालेय म्हणजे बालुशाही ऊडी मारेल. मला खरेच हा प्रश्न पडलाय

किल्ली लवकर व्हिडीओ द्या हो तुम्ही

हिहीहुहू
एक लपवलेले सिक्रेट आता सांगते
मला पण आवडत नाही बालुशाही. पण आवडणाऱ्यानीच इथे प्रतिसाद द्यावे असा नियम नाहीये ☺️☺️
आय कॅन किल फॉर मैसूरपा, नंदिनी किंवा कृष्णा स्वीटस चा

मला पण आवडत नाही बालुशाही. >> मग आता पार्सल रद्द Proud
आय कॅन किल फॉर मैसूरपा>> मी टू ,
पण अर्थातच आईच्या हातचा Happy

माझ्या बालुशाहीने तेलात उडी मारली नव्हती. Proud कारण मी प्रायोगीक तत्वावर बनवली आणी चक्क छान झाली होती.

मला त्या कडक म्हैसूर पाकापेक्षा तो मऊ मऊ मै पाक जास्त आवडतो.

मलापण मऊ मैसूर पाकच आवडतो आणि तो घराजवळच एका दुकानात उत्कृष्ट मिळतो त्यामुळे मी घरी-बिरी अजिबात ट्राय करणार नाहीये Lol

असे पदार्थ घरी बनवणे ट्राय करायला सांगणारे लेख हे समाजासाठी(बायकांसाठी) एक घातक पायंडा पाडत आहेत ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️

हो ना! Lol सोप्पं आहे सोप्पं आहे वाचून वाचून उद्या बालुशाही खरंच घरी करावीशी वाटली तर काय घ्या! आणि खरंच सोपी वाटली तर मग घातक पायंडा पडायला काय वेळ लागतोय!

किल्ली, धाग्याची धन्यवादांकडून हळूहळू निषेधाकडे वाटचाल व्हायला लागली दुसऱ्या शतकात Lol

धाग्याची धन्यवादांकडून हळूहळू निषेधाकडे वाटचाल व्हायला लागली दुसऱ्या शतकात>>>>> Lol

मला तर सत्कारस्थळावरून तूतू मैंमैं होईल की काय हे वाटत होतं.

Pages