बालुशाही _ सविस्तर

Submitted by किल्ली on 15 November, 2018 - 13:22
balushahi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. मैदा: १/४ किलो
२. साजुक तुप: १०० ग्रॅम किंवा १ वाटी
३. खाण्याचा सोडा: चिमुटभर
४. दही किंवा ताकः २०० मिली किंवा एक पेला
५. तेलः तळणीसाठी
६. साखरः ३५० ग्रॅम अन्दाजे
७. पिण्यायोग्य पाणी

क्रमवार पाककृती: 

पाकः
१. साखर भिजेल इतपत पिण्यायोग्य पाणी टाकुन घट्ट पाक करुन घ्यावा
२. पाकात वेलची पूड टाकु शकता, आवडत असेल तर

बालुशाही:
१. तुप थोडे कोमट करुन घ्यावे/पातळ असावे.
२. मैद्यामध्ये तुप व सोडा घालुन एकजीव करावे.
३. पोळीसाठी कणिक मळतो तसे , वरील मिश्रणात ताक/दही घालत घालत मळून घ्यावे
हि तिंबलेली कणिक मऊसूत आणि सैलसर असावी. बोटाने स्पर्श करुन पाहिला तर कणकेच्या आत बोट गेलं पाहिजे
(थोडंफार पुरणपोळी साठी भिजवतो तशी कन्सिस्टन्सी )
४. वरील मैद्याच्या मिश्रणाचे लिंबाएवढे एक एक गोळे तळहातावर घेऊन चपटे करावे, मधोमध छिद्र पाडावे. थोडक्यात, त्या पामर मैद्याच्या गोळ्यांना बालुशाहीचा आकार द्यावा
५. जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवावे, तेल अगदी गरम करावयाचे नाही. फक्त कोमट होऊ द्यायचे आहे
६. तेल कोमट झाले की आच बंद करावी.
७. ह्या कोमट तेलात एक एक करुन वर तयार केलेली बालुशाही सोडावी
असे केल्यानंतर कडेकडेने पिटुकले बुडबुडे येऊ लागतील, एक एक बालुशाही तेलातल्या तेलात हळूच ऊडी मारुन वर तरंगु लागेल
८. असे झाल्यानंतर आच सुरु करावी.
९. बालुशाही थोड्या लालसर झाल्या की उलट करुन/ परतून/ दोन्ही बाजुंनी तळून घ्याव्यात
१०. लालसर दोन्ही बाजुंनी तळून झालं की आच बंद करावी
११. तळलेल्या बालुशाही एका स्टीलच्या चाळणीत किंवा ताटात झार्‍याने काढुन घ्याव्यात

१२. पाकात ह्या तळलेल्या बालुशाही बुडवुन थोडा वेळ (पाक मुरेपर्यन्त ठेवाव्यात)
पाकातुन काढुन डिशमध्ये आणि डिशमधुन उचलून थेट खाऊन टाकाव्यात.

प्रकाशचित्रे:
मैद्याचा तिंबलेला गोळा:
b1.jpg

कोमट तेलात बालुशाही:
b2.jpg

तळत असताना:
b3.jpg

तयार बालुशाही:
b4_0.jpg

झाल्या सगळ्या करूनः, या खायला
b5.jpg

वाढणी/प्रमाण: 
अधिक टिपा: 

१. तळणीच्या तेलाचे तापमान योग्य साधले पाहिजे.
एकदा वरील कृतीप्रमाणे करुन पाहिलं की अंदाज येईल.
तेल जास्त गरम झाले तर बालुशाही खुसखुशीत होत नाहीत.

२. बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही

३. माझी मैत्रीण ह्यात वरून चोकोलेट सॉस घालून fusion बनवते, तसंही try करून पाहू शकता

४. आधीचे बालुशाही चे धागे
बालुशाही: https://www.maayboli.com/node/42163 : प्राजक्त्ता , 30 March, 2013
बालुशाही (फोटोसह): https://www.maayboli.com/node/39694 : madevi , 17 December, 2012

माहितीचा स्रोत: 
सासुबाई, सौ. दीपा कुलकर्णी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अंगुर रबडी >> कात्रज ला तळ्याकाठी विजय डेअरी ची आणून खाते.. निव्वळ अप्रतिम आहे> >>>>
हे असं काही लिहुन चॅलेंज करु नका बाई.
आमच्या गौरीशंकरची पण अप्रतिमच आहे. पण मी काही आता आणुन फोटो देणार नाहीये. आणि खाणार नाहीये.
कारण:-
१. तु वर लिहिलेलं. १०० किलो. Happy (माझं नाहीये. पण नकोच तरी)
२. आणि नवरा म्हणेल आयफ, दिक्षीत वैगेरे बोलुन बोलुन डोकं भण्जाळवते, कधी सकाळचा ब्रेफा स्किप, कधी रात्रीचं जेवण स्किप असं चालुये आणि मधेच गोडघाश्यासारखी गोडाचं काय आणुन खातेय. Lol

{{{एवढ सगळ करुन खात बसले तर माझ्या वजनाच काय होइल.. आधीच ते १०० च्या पुढे गेलंय}}}

सोप्पंय आता वजन पौंडात मोजण्याऐवजी किलोग्रॅम मध्ये मोजायला सुरुवात करा.

मधेच गोडघाश्यासारखी गोडाचं काय आणुन खातेय>> जेवताना ५५ मिनिटात्त गोड पदार्थ खाल्ले तर चालतं म्हणायचं Proud
पौंडात मोजण्याऐवजी किलोग्रॅम मध्ये मोजायला सुरुवात करा.>>>
पौंडात तर २०० च्या पुढे आहे Lol
काय सान्गु माझ्या जीवनाची गोड कथा

पौंडात तर २०० च्या पुढे आहे>>असेच प्रतिसाद येत राहिले तर दोनशेचे पाचशे होणार बहुतेक.
.
.
.
.
.
.
.
.
प्रतिसाद हो...! Lol Lol

गुजावरुन आठवले, माझे (साधे हा शाही नाही)गुजापण तेलात उडी मारतात. पण तेल तापलेले असते. बोट बुडवून अजीबात बघायचे नसते Happy

हा आमच्या इथल्या जनता दुग्धालयातील अप्रतिम, चविष्ठ खाजा. >>> बोरीवलीत कुठेशी गं ???

बोरीवलीत कुठेशी गं ???> >>>>ऑ? बोरीवली कुठे मधेच? म्हणजे मी बोरीवली मधे कुठे?
मी परळ-दादर मधे रहाते.

एवढ सगळ करुन खात बसले तर माझ्या वजनाच काय होइल.. आधीच ते १०० च्या पुढे गेलंय >>> या धाग्याने 200 का ओलांडले पहाण्यासाठी आवर्जून प्रतिसाद वाचले आणि या प्रतिसदावरच अडकून बसले. हे खरंच की असच आपलं म्हणायला? I am sure, you are joking. पण खरं असेल तर मैदा, तेल, साखर असलेली बालुशाही खाणं तर दूरच पण धागा सुद्धा काढू नका. वजन वाढत असलं की नुसत्या वासाने किंवा चर्चेने पण वाढतं Happy take care

एवढं नाही , but ya I am overweight .. गोड पदार्थ, मैदा, बेकरी सगळं बंद केलंय... बलुशाही सारख्या पदार्थांचा मान फक्त दिवाळी ला..

balushahi.jpg
हा धागा वाचून बालुशाही करून पाहायची सुरसुरी आलेली पण ती मावळली. मग आजुबाजूच्या हलवायांकडे बालुशाहीचा शोध सुरू केला. तो असफल झाल्यावर प्लेस ऑफ ओरिजिन वरून मागवल्या.

आमच्याकडे मिळायच्या त्या बालुशाही यापेक्षा मोठ्या, म्हणजे वाटीएवढ्या परिघाच्या आणि वर साखरेचा जाड पांढरा थर असलेल्या असत. त्यांची आठवण येतेय. त्या मिळाल्या की त्यांचाही फोटो टाकेन.

इतके धागे बघून आलो- नुसत्या गप्पा चालल्या आहेत.☺️

अभिनंदन किल्लीताई - 300 दूर नाहीय आता.

बलुशाहीने वजन वाढणार नाही हो, थोडी खा वन्स इन अ वहिले

आमच्या इथल्या जनता दुग्धालयातील अप्रतिम, चविष्ठ खाजा. >>
पूर्ण पत्ता मिळेल का? फोटो मस्तच आहे.

पहिल्या दोन पानात गोंधळ झाला.
बालुशाही कि चिरोटे की खाजा ? आणि मग अनारसे काय असतात वेगळे ? यातल्या दशम्या कुठल्या ?

बालुशाही कि चिरोटे की खाजा ? आणि मग अनारसे काय असतात वेगळे ? यातल्या दशम्या कुठल्या ?>>>>>>> बरेच हलवाई बालुशाहीलाच खाजाही म्हणतात.खाजे हे अजून वेगंळे प्रकरण आहे.तसेच अनारसे आणि चिरोटे हे वेगवेगळे आहेत.
पीठात फक्त दूध घालून मळले की त्याच्या पोळ्य,भाकरीला दशम्या म्हणतात.

अनारसे
https://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=15&cad=rja...

चिरोटे
https://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=12&cad=rja...

Pages