Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Submitted by आ.रा.रा. on 21
Submitted by आ.रा.रा. on 21 January, 2019 - 21:46 >>>>> इंटरेस्टिंग माहिती आहे ही.
पुणेकर मंडळी पुढल्या वीकएंडला
पुणेकर मंडळी पुढल्या वीकएंडला बसूयात का?
हापुसमयी (Alphanso Mango
हापुसमयी (Alphanso Mango Liqueur)
- प्रसाद शिरगावकर
तुम्ही टकीलाचे शॉट्स मारले आहेत का कधी? छोट्या शॉट ग्लासमध्ये पन्नास मिली टकीला घ्यायची, हाताच्या मुठीवर मीठ ठेवायचं आणि दुसऱ्या हातात लिंबाची फोड. पटकन तो शॉट पिऊन वर मीठ आणि लिंबू चाखायचं. छाती जाळत ते ड्रिंक पोटात जाताना जाणवतं. पण अत्यंत बेचव किंवा विचित्र चव असल्याने मीठ / लिंबू खाऊन आपण तोंडाची चव शाबूत ठेवायचा प्रयत्न करतो.
तर, 'ड्रिंकचा असा जबरदस्त शॉट पाहिजे, पण विचित्र चवी ऐवजी भन्नाट चव असली पाहिजे' असं कसं करता येईल असा विचार करत होतो आणि त्यातून 'हापुसमयी' चा जन्म झाला!!
हापुसमयी हा माझ्या मधु-प्रयोग-शाळेतला ताजाताजा प्रयोग! ही वाईन नाही, तर लिक्योर (Liqueur) आहे. लिक्योर म्हणजे फळं, फुलं, मसाले यांच्या स्वादा-गंधाने मुरलेलं अल्कोहोलिक पेय (infused alcoholic drink). कॉफीच्या स्वादाची Kaluha, संत्र्याच्या स्वादाची Cointreau अशा काही प्रसिद्ध लिक्योर्स आहेत.
संत्र्याची होऊ शकते तर हापुसची पण होईल असा विचार केला आणि घरी कशी करायची याच्या रेसिप्या शोधल्या!
एक अत्यंत सोपी रेसिपी सापडली ती करून बघितली. एक पूर्ण बाटली व्होडका (750ml) आणि दोन छान पिकलेल्या रत्नागिरी हापुस आंब्यांचा रस एका काचेच्या बरणीत एकत्र करून ठेवला. आठवड्यानंतर हे मिश्रण वस्त्रगाळ करून आंब्याचा चोथा टाकून दिला आणि उरलेलं पेय बाटलीत भरून ठेवलं.
जे हातात आलंय ते विलक्षण महान पेय झालं आहे. हापुसचा रंग जसाच्या तसा ह्या पेयाला आला आहे. हापुसचा स्वाद आणि गोडवा पूर्णपणे ह्यात उतरला आहे.
हे पेय थंडगार करून छोट्या शॉटग्लासमध्ये घ्यावं, छोटे छोटे सिप घ्यावेत किंवा रप्पकन शॉट मारावा. निव्वळ स्वर्गसुख!!
सध्या या पेयाचं नाव मी 'हापुसमयी' असं ठेवलं आहे... नावासाठीच्या सूचनांचं स्वागत आहे!!
(एक पेग पिऊन झाल्यावर Alpana नं याला 'व्होडांबा' असं नाव सुचवलंय! तिचा व्होडांबा आणि माझी हापुसमयी अशी दोन नावं झालीयेत!!)
- प्रसाद शिरगावकर
(वैधानिक इसारा: यात अत्यंत high alcohol content असतो. त्यामुळे हापुसमयी कितीही गोड लागली तरी मर्यादेतच प्यावी!!)
अमसूला - अर्थात कोकमची वाईन!!
अमसूला - अर्थात कोकमची वाईन!!
मला कोकम सरबत प्रचंड आवडतं. रणरणत्या उन्हात जाऊन आल्यानंतर थंडगार कोकम सरबत पिणं हे निव्वळ स्वर्गसुख असतं.
अर्थात रणरणत्या उन्हामध्ये जाऊन आल्याबर थंडगार बीयर पिणं हे सुद्धा स्वर्गसुख असतं.
तर ह्या दोन्ही स्वर्गसुखांची युती (किंवा आघाडी म्हणा आपापल्या आवडीनुसार!) करता येतीये का असा प्रयोग करून बघुया म्हणलं आणि कोकमची वाईन (किंवा खरंतर cider) करुन बघायचं ठरवलं!
तीन लिटर पाण्यात पाऊण किलो साखर आणि चारशे मिलि कोकम आगळ घातलं (आगळ म्हणजे साखर नसलेला, नुसता कोकमचा अर्क) आणि त्याचं सरबत बनवलं. या सरबतात पाव चमचा वाईन यीस्ट घालून ते फर्मेंट करायला ठेवलं.
यीस्ट ह्या गुणी बुरशीने सरबतातली साखर गट्टम करून तिचं अल्कोहोलमध्ये रुपांतर केलं आणि माझ्या चवदार कोकम सरबताची चवदार कोकम वाईन (cider) तयार झाली!!
*****
साधारण वाईन्स आपल्या हवामानात आठ-दहा दिवसात तयार होतात. Somehow कोकमच्या सरबताचं fermentation खूपच slow होत होतं, आठदहा दिवसांनी जेमतेम २% alcohol असलेलं पेयं झालं होतं. (कदाचित आगळ मध्ये असलेल्या मिठामुळे असेल किंवा सरबतात यीस्टना पुरेसं खाद्य मिळत नसल्याने असेल)
मग यीस्टना थोडासा खाऊ म्हणून बेदाणे टाकले आणि निवांतपणे खूप पेशन्स ठेवून तब्बल दोन महिने वाट बघितली!!
फायनल प्रॉडक्टमध्ये कोकमचा अत्यंत सेक्सी मरून रंग आणि कोकमची अस्सल आंबट चव दोन्ही शिल्लक आहे, साखर पूर्णपणे संपल्यामुळे dry wine झाली आहे आणि त्याला मूळ आगळातल्या मिठाची हलकिशी चव आहे!!
Final alcohol percentage is 6.5% abv, म्हणजे माईल्ड बियर पेक्षा थोडं जास्त आणि वाईनपेक्षा थोडं कमी!!
*****
संध्याकाळचं प्रचंड उकडत असताना, खूप थंड केलेली ही वाईन घोट घोट घ्यायला फारच मजा येते!! सोबत कोकणातलेच काजू असतील तर फारच भारी काँबिनेशन!!
कोकमपासून अमसूल बनतं, तशीच ही कोकमची कन्या ‘अमसूला'!!
- प्रसाद शिरगावकर
ताक: माझी एक मैत्रिण ताजी कोकमची फळं पाठवणार आहे कोकणातून, ती मिळाली की आगळा ऐवजी फळांपासूनची वाईन करून बघणार आहे!
(अमसूला हे नाव सुचवण्याचं श्रेय माझा मित्र Vivek Mahajan याचं)
यीस्टसाठी आमसुला बनवताना
यीस्टसाठी आमसुला बनवताना बटाटा कापे करून खाद्य म्हणून देवू शकता. अधिक लवकर रिझल्ट मिळेल. बटाटा मुळे चवीत काय बदल होईल ते मात्र चाखल्या नंतर कळेल.
अर्थात रणरणत्या उन्हामध्ये
अर्थात रणरणत्या उन्हामध्ये जाऊन आल्याबर थंडगार बीयर पिणं हे सुद्धा स्वर्गसुख असतं.
>>> सहमत!!! आणि समुद्रकिनारी तर म्हणजे जन्नतच!
हापुसमयी इंटरेस्टिंग आहे, नक्की ट्राय करू शकतो!!!!
आज शनिवार.
आज शनिवार.
एक प्लेट कांदेपोहे
त्यावर एक मोठा चमचा मटणाचा रस्सा
त्यावर जसे वरणभातावर तूपाची धार सोडावी तसे एकदिड बूच रम
आजच नाहीतर उद्याच संडेलाच ट्राय करा !
याच प्रकारे जांभळाची वाईन
याच प्रकारे जांभळाची वाईन करता येईल का याचा विचार करतोय
दारचे झाड आहे त्यामुळे मुबलक जांभळं येतात
आशुचॅम्प , प्रसाद
आशुचॅम्प , प्रसाद शिरगावकरांनी जांभळाची वाइन देखील तयार केलीये.
त्यांच्या टाईमलाईनवर कृती आहे
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10156254739066411&id=672736410
व्होडंबा प्रकार अतिशय आवडला
व्होडंबा प्रकार अतिशय आवडला आहे. Absolute व्होडकाची अर्धी बॉटल होती,म्हणून दीड आंब्याचा रस घालून ठेवली आहे. टेस्टिंग झाल्यावर हिट की फ्लॉप ते इथे नक्की कळवणार.
बिअर कडक उन्हाळ्याशिवाय इतर वेळेस आवडत नाही, पण कोकम बरोबर आवडावी. शिवाय आगळ शिल्लक आहे, त्यामुळे करून पाहीन.
दोनही प्रकार इंटरेस्टिंग वाटले.
बाप्रे माबोवर फार पुढारलेले
बाप्रे माबोवर फार पुढारलेले लोक आहेत.
अगदी बेसिक प्रश्न. हे
अगदी बेसिक प्रश्न. हे व्होडकामधे मिसळून फ्रिजमधे ठेवायचं की बाहेर? साधारण किती रूम टेंपरेचर लागेल?
आज शनिवार.
आज शनिवार.
एक प्लेट कांदेपोहे
त्यावर एक मोठा चमचा मटणाचा रस्सा
त्यावर जसे वरणभातावर तूपाची धार सोडावी तसे एकदिड बूच रम
आजच नाहीतर उद्याच संडेलाच ट्राय करा !
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 8 June, 2019 - 12:13
<<
अन हा रुन्म्या दारूबंदी हापिसर असल्यागत झटके मारत अस्तो नेहेमी. हो ना?
पिऊ द्या त्याला- बुच पिऊन काय
पिऊ द्या त्याला- बुच पिऊन काय होणार आहे।
मग मंडळी? काय विचार आहे?
मग मंडळी? काय विचार आहे?
चकणा कोण आणणार आहे.
चकणा कोण आणणार आहे.
ठरवा प्लॅन
ठरवा प्लॅन
गटारी मुबारक
गटारी मुबारक
> २५ ते ३० वयाची ५ मुली आणि ९
> २५ ते ३० वयाची ५ मुली आणि ९ मुलगे असे एकूण १४ जण
> रात्रीच्या जेवणासाठी
• व्हिस्की (३ की ४ बाटल्या? ब्रँड? माझा मॅकिन्टोशचा विचार होता.)
• मोड आलेले मूग सॅलड
• मोनॅको+चीज
• उकडलेली अंडी (२०?)
• चिकन टिक्का (प्रत्येकी ५ येतील एवढे)
• पनीर टिक्का (प्रत्येकी ३ येतील एवढे)
• चिकन बिर्याणी (१.५ किलो) आणि एका शाकाहारीसाठी एक प्लेट व्हेज बिर्याणी
• केक
(१ किलो)
दारू आणि स्टार्टर्सवरच भर असणार आहे. मेनू आणि अंदाज ठिकय का?
स्टार्ट्रर्स अजुन लागतील अस
स्टार्ट्रर्स अजुन लागतील अस वाटतय
हम्म. १.५ अंडे, ५ चिकन टिक्का
हम्म. १.५ अंडे, ५ चिकन टिक्का आणि ३ पनीर टिक्का नाही पुरणार का एका माणसाला? किती लागेल मग?
बिर्याणी वाढवा अजून किलोभर!
बिर्याणी वाढवा अजून किलोभर!
शिवाय १४ मंडळी म्हणजे १ बाटली एका राउंडलाच संपणार. किमान ४ ठेवा. मॅकिन्टोश / रॉकफोर्ड चांगल्या आहेत. थोडं बजेट वाढवलं तर सुलाची ग्रेप्स बेस्ड व्हिस्की किंवा बकार्डिची स्कॉच येऊन जाईल. नायतर हायलँड क्रीम टीचर्स!!
अय्या वेफर्स नाहीत? एक किलो
अय्या वेफर्स नाहीत? एक किलो लागतील नक्की. लेडीस असतील तर दुसरा ड्रिं क चॉइस प्लस कोक, फँटा सेवन अप नक्की ठेवा. जिन किंवा व
व्होडका, बकार्टी ब्रीझर्स, बीअर एक कार्टन फॉस्टर आणा. सर्वच व्हिस्की पीत नाहीत ना.
मसाला पापड नाही का चालणार?
मसाला पापड नाही का चालणार?
आमच्यात असतात. म्हणजे जरा सोपं काम टिक्क्यापेक्षा.
श्रावणात मैफिल जमली. चला घेऊ
श्रावणात मैफिल जमली. चला घेऊ वारुणीचा आस्वाद!
रॉनी,
रॉनी,
बिर्याणी २.५ किलोची लागेल? खूप जास्त नाही का होणार?
आणि ४ बाटल्या लागणार असतील तर मॅकिन्टोशच ठिकय
अमा,
मुगडाळ किंवा चणाडाळ किंवा मसाला शेंगा किंवा वेफर्स असे एक काहीतरी ठेवणार होते पण दुसऱ्या धाग्यावर मीराने 'मोड आलेले मूग सॅलड' हा पर्याय सुचवला जो मला चांगला वाटला.
या पाचही मुली व्हिस्की पितात, पण तरी जीन हवी का विचारते.
व्होडका, बकार्टी ब्रीझर्स, बीअर एक कार्टन फॉस्टर हे नाही पीत कोणी व्हिस्की असेल तर.
सस्मित,
टिक्का बिर्याणी वगैरे सगळं बाहेरून मागवणार आहे ग
अमर,
तसे या ग्रुपमधले कोणी श्रावण पाळत नाही. पण मैफिल श्रावन संपल्यावर होणार आहे. प्लानिंग लवकर चालू केले
व्हिस्की पिणार्याला ब्रीझर
व्हिस्की पिणार्याला ब्रीझर दाखवून मूड घालवू नका.
आणखी एक व्हिस्की बफर मध्ये ठेवा.
जशा गप्पा रंगतील ,व्हिस्की आणखी लागण्याची शक्यता त्याच्यावर आहे.
मेनू छान आहे, व्हेन्यू पण सांगा- आम्ही पण येतो
मी आपलं सगळे खाणारे म्हणून
मी आपलं सगळे खाणारे म्हणून अंदाज दिला! कुछ कम ना रहे
आणि एन्जॉय!!
There is no such thing as
There is no such thing as "veg biryani'.
फार तर पुलाव म्हणता येईल. 
शुभेच्छा!!
शुभेच्छा!!
Pages