तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

बकार्डी ब्लॅक. (ओल्ड मंक पेक्षा बरी/भारी आहे. चवीला. शक्यतो एक्साईज सीलवाली मिळवा.

मांशन हाऊस मिळतेय की,ऐन थंडीत तीच होती सोबतीला Wink
ब्लॅक चांगली आहे, सहन होत नाय रम त्यांनी कोक सोबत प्या!!

हल्ली सिमरन आफ ऍपल फ्लेवर मस्त वाटतेय इसप्राईट सोबत!

बजेट ब्रँड आहे की नाही माहिती नाही पण मुंबै एअरपोर्टवर ड्युटी फ्री दुकानात वूडफर्ड रीझर्व्ह बर्बन पाहिली होती. इथल्या बर्बन प्रेमी मित्र मंडळींची आवडती आहे .

ज्यांना दारू बिअर आवडते त्यांनी कधीच मँगोला, स्लाइस, माझा, लस्सी यासारखे पेय प्यायलेले नसतात. एकदा प्यायले तर दारू, बिअर सोडून देतील.

मी तर पियुष पण प्यालोय
मस्तानी तर नेहमीच
मँगोला आणि स्लाइस तर शुद्ध बनवाबनवी आहे
त्यापेक्षा सरळ आंबे खावेत निदान समाधान तरी मिळतं

हल्ली सिमरन आफ ऍपल फ्लेवर मस्त वाटतेय इसप्राईट सोबत!>> tropicana pineapple ज्यूस मध्ये पण झकास.. पण फार कमी (२ ते ३ पेगच) जाते.

tropicana pineapple ज्यूस मध्ये पण झकास.. पण फार कमी (२ ते ३ पेगच) जाते.
>>>

तेवढीच पुरे! जास्त घेऊन काय फायदा? बिंजिंग करायचं असेल त 30 मिली चे 6 7 घेत मस्त 4 5 तास सत्कारणी लागतात!!

बोकलत,

हाय राम कम्बखत तुने पी ही नही!!

ज्यांना दारू बिअर आवडते त्यांनी कधीच मँगोला, स्लाइस, माझा, लस्सी यासारखे पेय प्यायलेले नसतात. एकदा प्यायले तर दारू, बिअर सोडून देतील.
>>> तुम्ही जी नावे घेतली आहेत. त्यात किती साखर आहे माहित आहे का... त्यापेक्षा दारू जास्त हेल्दी म्हणावी लागेल.

ज्यांना दारू बिअर आवडते त्यांनी कधीच मँगोला, स्लाइस, माझा, लस्सी यासारखे पेय प्यायलेले नसतात. एकदा प्यायले तर दारू, बिअर सोडून देतील.
Submitted by बोकलत on 8 February, 2020 - 18:20

पंजाबी लोक लस्सीप्रेमी असतात आणि मद्यप्रेमीदेखील...

काय उपयोग, स्टॉक संपलाय आणि नवीन आणता येत नाही
अंदाजच आला नाही इतके दिवस लॉक डाऊन असेल
असो, त्यामुळे सक्तीचा श्रावण सुरू आहे

कटप्पानी लॉक डाउनचे औचित्य साधुन खरे तर आता...
घरच्या घरी दारू कशी बनवता ?
.... असा एक नवीन धागा काढ़ायला हवा !!

असं कसं जागोजागी भोचकपणा करणे त्याचे आद्य कर्तव्य आहे
शाहरुख ने लोकांना दारू प्या म्हणून सांगितलेले चालते
तरी यांची त्यावरची भक्ती कमी होत नाही
पण लोकं शांतपणे आपल्या घरी पीत असतील तर लगेच यांची पोटदुखी सुरू होते
त्यातून धागा कसा भरकटत नेता येईल याचा पदोपदी विचार करणे सुरूच असते
दुर्दैवी आहे तो बिचारा, त्याला यातून बाहेर पडताच येत नाही
सतत त्याला अटेंशन्स लागतं
देव त्याचं भलं करो

शुक्रवारी ऑफिस सुटल्यावर २-२ पेग लावून, ती बऱ्यापैकी उतरल्यावर गाडी काढून आंजरल्याला निघालो. पहाटे पहाटे पोचलो, खास कोकणी, ओलं नारळ घातलेले पोहे खाऊन ताणून दिली.. दुपारी जेवण करून किनाऱ्यावर फिरून आलो. संध्याकाळी हर्णे बंदरावर माश्यांचा लिलाव असतो, तिथे पोचलो. काय तो बाजार, काय ती बहार.. इथं मासे घ्यायचे तर अनुभवी लोक असायला हवे, नसता थोडंफार फसण्याची शक्यता असते. ज्या दादा- वहिनींच्या होमस्टेला आम्ही उतरलो होतो, त्यांनी मासे कसे निवडायचे ते सांगितलं होतं, पण आम्ही पैशात फसलो. तर ते असो. सुरमई, पापलेट आणि ३ वाटे कोळंबी घेऊन आणि खूप सारी फोटोग्राफी करून दारू शोधण्यास निघालो. हर्णे गावात लीगल शॉप नाही. फक्त बिअरविक्रीचा परवाना असलेले एकमेव दुकान तिथे होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता व्हिस्कीमध्ये OC, RS होते. त्यामुळे आवडती old monk, thaums up, कोरडा चखना घेऊन आमच्या रूम वर परतलो. आता रूम म्हणजे दार उघडलं की समोर समुद्र! मासे आणि कोळंबी वहिनीच्या हवाली केले तोवर दादांनी मागच्या ट्रिपची आठवण ठेवून खास पुळणीवर, समुद्राची गाज ऐकू येईल, एखादी मोठी लाट पायाला चाटून जाईल अश्या ठिकाणी टेबल टाकून ठेवला होता. त्यावर मिरगुंड, ग्लास आणि पाणी तयारच होतं. आमचा पहिला पेग संपेपर्यंत कोळंबी फ्राय पण पोचलं. हळू हळू झकास मसाला लावून तवा फ्राय केलेला पापलेट आणि सुरमईचे तुकडे पोचले. समुद्राचा आवाज ऐकत आमच्या गप्पा हळू हळू शांत झाल्या, आणि फक्त ती गाज कानात साठवत पेग वर पेग संपले. तिघांमध्ये एक पूर्ण बाटली संपवून नंतर पुन्हा गप्पांची मैफिल रंगली. रविवारी रात्री सेम प्रोग्राम रिपीट झाला, पण रविवारी आम्ही सुमो फाईट, कबड्डी वगैरे प्रकारही केले! सोमवारी सकाळी पुण्याला परतलो. हे ३ दिवस आठवून आठवून आता लॉकडाऊन काढत आहोत.. असो!

क्या बात अजिंक्य...
इकडे अमेरिकेत फुल स्टॉक आहे आणि होम डिलिव्हरी पण देतायत... आजच मी सिंगल मॉल्ट मागवली आहे - ग्लेन

दारूचे उत्पादन चालू आहे का?>>>
तू पीत नाहीस, मग तुला काय करायच्या आहेत या नसत्या उठाठेवी.

नवीन Submitted by जिंदादिल. on 4 April, 2020 - 14:54

>>>>>

सरकारने अंमली पदार्थावर छापा घातला, किंवा एखादे सेक्स स्कॅंडल वेश्याव्यवसाय पकडला या बातम्या आपण बघत नाही का?
की आपण यातले काही करतो की नाही यावर त्या बातम्या बघायच्या की नाही हे ठरवता?

आशुचॅम्प आपणही याचे ऊत्तर द्या.

मला दोघांनी आपापली उत्तरे दिलेली आवडेल

शाहरुख ने लोकांना दारू प्या म्हणून सांगितलेले चालते
तरी यांची त्यावरची भक्ती कमी होत नाही

>>>>>

मी कधीच याचे समर्थन केले नाही आणि करणारही नाही.
पण त्यासाठी शाहरूख आवडायचा बंद का करावा?
मला मद्य पिणारयांबद्दल राग नाहीये तर काळजी आहे.

बाकी गरज नसतना धाग्यात शाहरूख आणलात आणि मग धागा भरकटवायचे बिल माझ्यावर फाडाल Happy

सरकारने अंमली पदार्थावर छापा घातला, किंवा एखादे सेक्स स्कॅंडल वेश्याव्यवसाय पकडला या बातम्या आपण बघत नाही का?
की आपण यातले काही करतो की नाही यावर त्या बातम्या बघायच्या की नाही हे ठरवता?>>> इथे काय बातम्यांचे चॅनल सुरु आहे का? टिव्ही सुरू कर आणि बघ बातम्या.

धागा भरकटवायचे बिल माझ्यावर फाडाल Happy>>> ते करण्याची काय आवश्यकता आहे. जिथे तिथे लोचटासारखा जाऊन तेच करतोस.
तुझ्यासाठी एक चखण्याचा धागा आहे. तिथे जा आणि तुझे काम इमानेइतबारे पार पाड.

जाऊ द्यात हो, मानसिक स्थिती ठीक नाहीये ह्या माणसाची..
Virtual schizophrenia झालाय त्याला.. त्याच्यासाठी
कशाला चांगल्या धाग्याची वाट लावत आहात? इग्नोर करा.. इग्नोर झाल्याचा सर्वाधिक त्रास होतो अश्या अटेंशन सिकर लोकांना!

उन्हाळ्यासाठी शितसुधा आणलं आहे घरी
मस्त टेस्ट आहे त्याची खस फ्लेवर
ते कुठल्या दारूत मिक्स केलं तर भारी लागेल याचा विचार करतोय?
रम, व्हिस्की ची वाट लागेल पण कदाचित व्होडका सोबत मस्त कोम्बो होईल असे वाटते आहे

तुझ्यासाठी एक चखण्याचा धागा आहे. तिथे जा आणि तुझे काम इमानेइतबारे पार पाड.
>>>
चखणा नाही त्याला चकणा म्हणतात
असो
लिंक मिळेल का?

Pages